
मराठी साहित्याचा मानदंड वि. वा. शिरवाडकर यांचा जन्मदिवस
मराठी भाषा गौरव दिन (२७ फेब्रुवारी)
मराठी साहित्याचा मानदंड ‘वि. वा.शिरवाडकर’ यांचा जन्मदिवस - ‘२७ फेब्रुवारी’ अर्थात ‘मराठी भाषा गौरव दिन’ (Marathi Bhasha Gaurav Din). मराठी भाषा दिवस (Marathi Bhasha Diwas) जागतिक मराठी भाषा दिवस / मराठी भाषा दिन / मराठी भाषा गौरव दिन. २७ फेब्रुवारी हा दिवस मराठी साहित्याचा मानदंड वि.वा.शिरवाडकर यांचा जन्मदिवस, हा दिवस ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा केला जातो.
मराठी भाषा गौरव दिन (विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्मदिवस - २७ फेब्रुवारी).
मराठी राजभाषा दिन: मराठी भाषा दिन / मराठी राजभाषा दिन हा दिवस १ मे रोजी महाराष्ट्रभर साजरा केला जातो.मराठी राजभाषा दिनआणिमराठी भाषा गौरव दिनहे दोन्ही दिवस वेगवेगळे असून मराठी भाषेसंदर्भातील महत्त्वाचे आहेत.
कुसुमाग्रज / विष्णू वामन शिरवाडकर - (२७ फेब्रुवारी १९१२ ते १० मार्च १९९९) पूर्ण नाव विष्णू वामन शिरवाडकर. हे एक श्रेष्ठ आधुनिक मराठी कवी नाटककार व कादंबरीकार होते. वि. वा. शिरवाडकर हे कुसुमाग्रज या नावाने काव्यलेखन करायचे. कुसुमाग्रजांचा जन्म २७ फेब्रुवारी १९१२ रोजी पुणे जिल्ह्यात झाला. मात्र नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील शिरवाडे हे गाव त्यांचे जन्मगाव म्हणूनच ओळखले जाते.
जीवनलहरी, किनारा, मराठी माती, वादळवेल इत्यादी त्याचे प्रकाशित काव्यसंग्रह आहेत. विशाखा हा काव्यसंग्रह आधुनिक मराठी काव्याचे एक कायमचे भूषण आहे. दुसरा पेशवा, वीज म्हणाली धरतीला, नटसम्राट, राजमुकुट इत्यादी त्यांची गाजलेली नाटके आहेत.
१९७४ मध्ये नटसम्राट ह्या नाटकाला साहित्य अकादमीचे पारितोषिक मिळाले. वैष्णव, जान्हवी, कल्पनेच्या तीरावर ह्या कादंबर्या. १९६४ मधील गोव्याच्या साहित्य समेलनाचे ते अध्यक्ष होते.
- [col]
- कुसुमाग्रज । वि.वा.शिरवाडकर
श्रेष्ठ आधुनिक मराठी कवी,नाटककार व कादंबरीकार - मराठी भाषा
मराठी भाषेसंदर्भात माहिती देणारा विभाग - मराठी लेख
अक्षरमंच विभागातील मराठी लेख
- [col]
- मराठी कविता
अक्षरमंच विभागातील मराठी कविता - मराठी भाषा दिवस शुभेच्छापत्रे
मराठी भाषा दिवसाची शुभेच्छापत्रे - मराठी भाषा शिका
मराठी भाषा ऑनलाईन शिकण्यासाठी उपयुक्त विभाग
- [col]
- मराठी भाषा संवर्धन
मराठी भाषा संवर्धन - मराठी साहित्य
महाराष्ट्राच्या समृद्ध मराठी साहित्याचा मागोवा - मराठी नाटकाचा इतिहास (महाराष्ट्र)
मराठी नाटकाचा सुसंगत संक्षिप्त इतिहास
मराठी भाषा गौरव दिन (महत्वाच्या प्रश्नांची उत्तरे)
- [accordion]
- मराठी भाषा गौरव दिन हा कोणाचा जन्मदिवस आहे?
‘मराठी भाषा गौरव दिन’ हा दिवस मराठी भाषेतील अग्रगण्य कवी वि.वा. शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस आहे.
- मराठी राजभाषा दिन केव्हा साजरा केला जातो?
१ मे रोजी ‘मराठी राजभाषा दिन’ महाराष्ट्रभर साजरा केला जातो.
- मराठी भाषा कोणत्या लिपीत लिहिली जाते?
मराठी भाषा देवनागरी लिपीत लिहिली जाते.
नागरी लिपी हि एक प्रसिद्ध भारतीय लिपी आहे. महाराष्ट्रात या लिपीचे ‘देवनागरी लिपी’ असेही एक नाव विशेष रूढ आहे. दहाव्या शतकाच्या आरंभी अखिल भारतात थोड्याफार फरकाने या लिपीचा अंगीकार केलेला आढळून येतो. आठव्या शतकापासून दहाव्या शतकापर्यंत ‘सिद्धमातृका लिपी’ किंवा ‘कीलकशीर्षक लिपी’ चे हळूहळू नागरी लिपीत रूपांतर होऊ लागले.
- कुसुमाग्रज कोण होते?
विष्णु वामन शिरवाडकर (तात्यासाहेब शिरवाडकर) हे मराठी भाषेतील ज्येष्ठ कवी, लेखक, नाटककार, कथाकार व समीक्षक होते. त्यांनी कुसुमाग्रज या टोपणनावाने कवितालेखन केले. ते आत्मनिष्ठ व समाजनिष्ठ जाणीव असणारे मराठीतले महत्त्वाचे लेखक मानले जातात.
- कवी कुसुमाग्रज यांचा पहिला काव्यसंग्रह कोणता?
‘जीवनलहरी’ हा कुसुमाग्रज यांचा पहिला काव्यसंग्रह.
झंकारूनि अव्याहत
तात तुटे वीणेवर,
हौनिया खिन्न जणू
कोसळुनी पडती स्वर!
घेता मधु गन्ध जरी
कोमेजत कुसुम करी
जीवन, तव सुन्दरता
सुन्दर होण्यात सरे!- कुसुमाग्रज (जीवनलहरी).
- मराठी भाषा गौरव दिन केव्हा साजरा केला जातो?
दर वर्षी २७ फेब्रुवारी रोजी म्हणजेच कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्त ‘मराठी भाषा गौरव दिन’ साजरा केला जातो.
- जागतिक मातृभाषा दिन केव्हा साजरा केला जातो?
दरवर्षी २१ फेब्रुवारी रोजी ‘जागतिक मातृभाषा दिन’ साजरा केला जातो.
- कवी कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्त कोणता दिन साजरा केला जातो?
कवी कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्त ‘मराठी भाषा गौरव दिन’ साजरा केला जातो.
माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा
माझ्या मराठी मातीचा
लावा ललाटास टिळा
हिच्या संगाने जागल्या
दऱ्याखोऱ्यांतील शिळा
हिच्या कुशीत जन्मले
काळे कणखर हात
ज्यांच्या दुर्दम धीराने
केली मृत्यूवरी मात
नाही पसरला कर
कधी मागायास दान
स्वर्णसिंहासनापुढे
कधी लवली ना मान
हिच्या गगनात घुमे
आद्य स्वातंत्र्याची द्वाही
हिच्या पुत्रांच्या बाहूत
आहे समतेची ग्वाही
माझ्या मराठी मातीचा
लावा ललाटास टिळा
हिच्या संगे जागतील
मायदेशातील शिळा
माझ्या मराठी मातीचा (© २७ फेब्रुवारी २०१० शेमारू एंटरटेनमेंट लिमिटेड)
संगीत: कौशल इनामदार, स्वर: कल्याणी पांडे-साळुंके, कौशल इनामदार, मधुरा कुंभार, मिथिलेश पाटणकर
मराठी भाषा गौरव दिन (पोस्टर्स / भित्तीचित्रे)
मराठी भाषा गौरव दिन (२७ फेब्रुवारी) यासंबंधी महत्त्वाचे दुवे:
- [col]
ताजे लेखन
या आठवड्यात प्रकाशित झालेले कुसुमाग्रज या विभागातील नवीन लेखनसर्व विभाग / विशेष / मराठी भाषा गौरव दिन (२७ फेब्रुवारी)
विभाग -
मराठी · मराठी भाषा · मराठी भाषा संवर्धन · मराठी भाषा गौरव दिन (२७ फेब्रुवारी) · महाराष्ट्र दिन (१ मे) · जागतिक महिला दिन (८ मार्च) · गणेशोत्सव विशेष · पुण्याचा गणेशोत्सव · दिवाळी सण विशेष · रिस्पेक्ट झेब्रा · वारी विशेष · पर्यावरणपूरक गणेशोत्सव · मातीचा बाप्पा · माझा बाप्पा · शिवजयंती
विषय -
विशेष · मराठी · कुसुमाग्रज