आपल्या मेंदूला कसे जपावे? (आरोग्य) - मनुष्याच्या मेंदूची क्षमता उत्तम राहण्यासाठी नेमके काय करावे? याबद्दल विस्तृत माहिती देणारा आरोग्य लेख.
रक्तातील चरबी न वाढवता मेंदूचे पोषण करण्यासाठी साधा सोपा उपाय
आपल्या मेंदूला कसे जपावे? (आरोग्य)
जगातील बहुतेक सर्व प्राण्यांच्या वजनाच्या तुलनेत मनुष्याच्या मेंदूचे वजन जास्त असते. मनुष्याला बौद्धिकदृष्ट्या सर्वात प्रगत प्राणी समजले जाते (Health Article about How to protect your brain?).
मनुष्याच्या शरीराच्या सुमारे २ टक्के वजन (१ किलो २०० ग्रॅम) त्याच्या मेंदूचे असते. त्यात एकूण शंभर अब्ज पेशी असतात. जगातील बहुतेक सर्व प्राण्यांच्या वजनाच्या तुलनेत मनुष्याच्या मेंदूचे वजन जास्त असते. मनुष्याला बौद्धिकदृष्ट्या सर्वात प्रगत प्राणी समजले जाते. अर्थात हे माणसानेच ठरवले आहे. काही प्राण्यांमध्ये विशिष्ट बौद्धिक कौशल्य किंवा क्षमता निसर्गतः अधिक विकसित असतात. जसे कुत्रे वासाच्या सहाय्याने गुन्हेगार शोधू शकतात.
त्सुनामी किंवा भूकंप येण्याच्या अगोदर गुरांना आणि इतर काही प्राण्यांना त्याची जाणीव होते आणि त्यामुळे त्यांचे वर्तन भयभीत किंवा विचित्र होते. त्यांना काहीतरी सुचवायचे असते पण मनुष्य ते समजू शकत नाही. कबूतरांचे दिशेचे ज्ञान विशेष असते. अशा कितीतरी गोष्टी आहेत की ज्या मनुष्यापेक्षा प्राण्यांना जास्त समजतात. निसर्गाने त्यांच्या मेंदूच्या पेशींमध्ये आणि रचनेमध्ये काही बदल करून त्यांना या विशेष क्षमता प्रदान केल्या आहेत. मनुष्याच्या मेंदूची क्षमता उत्तम राहण्यासाठी नेमके काय करावे हे आपण सदर लेखात समजून घेणार आहोत.
म्हणी आणि वाक्प्रचार
एखादा मनुष्य खूप हुशार असेल तर त्याला ‘तैलबुद्धी’ म्हणतात. एखाद्या कामाकडे काळजीपूर्वक लक्ष ठेवण्यासाठी सुचवायचे असेल तर म्हणतात ‘डोळ्यात तेल घालून लक्ष ठेव’. लक्षपूर्वक ऐक असे सांगायचे असल्यास म्हणतात ‘माझं बोलणं कानात तेल घालून ऐक’. आता या सर्व शब्दप्रयोगांच्या मागे काय शास्त्रीय संदर्भ आहे हे समजून घेऊया.
सर्व ज्ञानेंद्रियांचा संपर्क आपल्या मेंदूशी असतो. मुळात ज्ञान ग्रहण करणारी इंद्रिये म्हणून त्यांना ज्ञानेंद्रिय म्हणतात. मेंदूमधे सर्व ज्ञान एखाद्या लायब्ररीप्रमाणे विशिष्ट कप्प्यात व्यवस्थितपणे साठवून ठेवले जाते. गरज पडेल त्याप्रमाणे ते स्मरण केले जाते. हाडे ज्याप्रमाणे कॅल्शियमने तयार झालेली असतात त्याप्रमाणे मेंदूची जडणघडण स्निग्ध पदार्थांच्या माध्यमातून झालेली असते, त्यातूनच या म्हणींचा उगम झाला आहे.
मराठी भाषेत प्रत्येक शब्दाला शास्त्रीय अर्थ असतो. याचे आणखीन एक उदाहरण देता येईल. उशिरापर्यन्त झोपलेल्या माणसाला उठल्यावर विचारतात ‘झाली का साखरझोप?’ पहाटे लवकर उठल्यामुळे रक्तातली साखर चांगल्याप्रकारे नियंत्रणात राहते आणि उशिरा उठल्यामुळे ब्लड शुगर खरोखर वाढते असे सिद्ध झाले आहे. तर मेंदूच्या पेशींमध्ये सर्वात जास्त सहभाग स्निग्ध पदार्थांचा असतो म्हणूनच त्यांच्या पोषणासाठी किंवा त्यांची कार्यक्षमता उत्तम राहण्यासाठी पुरेशा प्रमाणात स्निग्ध पदार्थांची गरज असते.
हाडांच्या स्वास्थ्यासाठी जसे आहारात कॅल्शियम गरजेचे किंवा रक्तातल्या हिमोग्लोबिन साठी आहारात लोहयुक्त पदार्थ गरजेचे तसेच मेंदूसाठी स्निग्ध पदार्थ असे समीकरण लक्षात ठेवावे. आता प्रश्न पडतो की मेंदूसाठी आपण जास्त प्रमाणात तूप किंवा तेल आहारात घेऊ लागलो तर रक्तातील चरबी म्हणजे कोलेस्टेरॉल वाढेल आणि हृदयाचे रक्ताभिसरण मंदावेल. मग हा समतोल कसा साधायचा?
नाकातून करा मेंदूचे पोषण
रक्तातील चरबी न वाढवता मेंदूचे पोषण करण्यासाठी साधा सोपा उपाय म्हणजे नाकातून तूप किंवा तेल नियमितपणे घेणे. आयुर्वेदात याला नस्य चिकित्सा म्हणतात. नाकात टाकलेले औषध त्वरित मेंदूच्या पेशींपर्यन्त जाते आणि आपला प्रभाव दाखवू लागते. म्हणूनच अचानक कोणी फीट येऊन रस्त्यात पडला तर कांदा फोडून नाकाने हुंगण्यास देतात. ऑपरेशन करण्यापूर्वी भूल देण्यासाठी विशिष्ट औषधी द्रव्य नाकाने हुंगण्यास देतात आणि त्यामुळे मेंदूच्या पेशींची संवेदना नाहीशी होते. याचाच अर्थ नाकाने शरीरात प्रविष्ट झालेल्या घटकाचे कार्य मेंदूच्या पेशींवर त्वरित होते.
आयुर्वेदाला ही क्रिया आणि याचे फायदे माहिती होते. म्हणून ग्रंथकर्त्यांनी श्लोकरूपात दिले आहे -
नासा हि शिरसो द्वारं तत्रावसेचितं औषधं स्रोतः शृंगाटकं प्राप्य व्याप्य मूधोनं
नेत्रश्रोत्रकण्ठादि शिरामुखानि च मुंजादीषिकां इवासक्तां
ऊर्ध्वजत्रुगता वैकारिकों अशेषं आशु दोषसंहतिं उत्तमांग गदापकर्षति
श्लोकाचा अर्थ
नाक हा शिरोभागाचा दरवाजा आहे. त्यामार्गाने जाणारे औषध शृंगाटक मर्मापर्यंत जाऊन पुढे मेंदूच्या संपर्कातील इंद्रिये जसे डोळे, कान, कंठ, मुख इत्यादी भागातील दोष नाहीसे करून मानेच्या वरच्या सर्व आजारांवर प्रभावीपणे कार्य करते.
नस्याचे फायदे किती
नाकातून औषध देण्याबद्दल जगात भरपूर संशोधन झाले आहे. शरीरात होणाऱ्या प्रत्येक लहान मोठ्या क्रिया मेंदूच्या नियंत्रणाखाली असतात आणि त्यासाठी नाकातून दिलेले औषध अत्यंत प्रभावी ठरते. नाकात टाकण्याचे औषध म्हणजे सर्दीसाठी असा समज सर्वसामान्य लोकांमध्ये आहे. वास्तविक याची व्याप्ती फार मोठी आहे. सर्दीपडशापासून ते तळपायच्या भेगांपर्यन्त शेकडो विकरांमध्ये नस्य चिकित्सेचा उपयोग होऊ शकतो.
मेंदू म्हणजे शरीराची राजधानी आहे. संपूर्ण शरीराची एंडोक्राइन सिस्टिम याच्या अधिपत्याखाली असते.
- हायपोथॅलॅमस
- पीनियल बॉडी
- पिट्यूटरी
- थायरॉइड
- पॅराथायरॉइड
- थायमस
- अॅड्रिनल
- पॅंक्रिया
- ओव्हरीज
- टेस्टीज्
अशा सर्व यंत्रणा मेंदूच्या नियंत्रणाखाली असतात. त्यामुळे शरीरातील द्रवाचे संतुलन, झोपेचे संतुलन, तापमान, भूक, रक्तदाब, प्रजनन यंत्रणेचे कार्य, रक्तातील साखरेवर नियंत्रण, शरीराचा बॅलन्स, कंपन, मेंदूची कार्यक्षमता या सर्व गोष्टी केवळ नस्य चिकित्सेने काबूत ठेवता येतात. बुद्धीचे कार्य दीर्घकाळ उत्तमप्रकारे चालू राहावे असे वाटत असेल तर उत्तम दर्जाचे स्निग्ध पदार्थ नाकाच्या मार्गाने दिले गेले पाहिजेत.
सर्वात उत्तम स्निग्ध पदार्थ
आयुर्वेदात स्निग्ध पदार्थांच्या यादीत एकूण चार मूळ पदार्थ सांगितले आहेत. घृत, तैल, वसा आणि मज्जा. घृत म्हणजे तूप, अर्थात याठिकाणी भारतीय वंशाच्या गाईचे तूप अपेक्षित आहे. तैल म्हणजे निरनिराळ्या तैलबियांपासून काढलेला स्नेह. आयुर्वेदाच्या दृष्टीने तिळाचे तेल सर्वात मुख्य आहे. त्याशिवाय मोहरीचे (राईचे) तेल, आळशीचे तेल, कुसुंभ (सॅफ्लॉअर) तेल, करडई तेल, सर्जरस (राळेचे), नारळाचे तेल, भल्लातक तेल, खसखस तेल, एरंड तेल अशा कित्येक तेलांचे वर्णन आहे.
वसा म्हणजे प्राणिज चरबी आणि मज्जा म्हणजे हाडांच्या पोकळीतून प्राप्त होणारा स्नेह. या सर्व स्निग्ध पदार्थांपैकी मेंदूच्या पोषणासाठी गाईचे तूप आणि नारळाचे तेल हे सर्वोत्तम स्नेह आहेत. याशिवाय बुद्धीच्या आणि मेंदूच्या उत्तम पोषणासाठी काही वनस्पतींपासून निर्माण केलेले स्नेह यांचा सखोल अभ्यास करून एक नस्य (नाकात टाकायचे औषध) ‘कुंकुम नस्य’ नावाने मी स्वतः तयार करतो. या उत्पादनाचा परिचय आता प्रश्नोत्तरांच्या रूपाने करून देतो.
प्रश्न - कुंकुमघृत (Saffron Nasal drops) काय आहे?
उत्तर - देशी गाईचे तूप, नारळाचे तेल यांच्या समभाग मिश्रणात केशर, वेखंड, तुळस आणि ब्राह्मी या वनस्पतींचे तैलार्क विशिष्ट प्रमाणात मिश्र करून हे कुंकुम नस्य (SafroNasal drops) तयार केले आहे. नाकात टाकण्याचे ड्रॉपस म्हणून याचा वापर करावा.
प्रश्न - कुंकुम (Saffron Nasal drops) नस्य कशासाठी?
उत्तर - रक्तातील चरबी / कोलेस्टेरॉल वाढेल, वजन वाढेल अशा भीतीमुळे आजकाल आहारातून स्निग्ध पदार्थांचे सेवन कमी होत चालले आहे. खरंतर मेंदूच्या पोषणासाठी स्निग्ध पदार्थ नितांत आवश्यक असतात. किंबहुना मेंदूची जडणघडणच स्निग्ध द्रव्यांनी झालेली असते. हाडांसाठी जसे कॅल्शियम तसे मेंदूसाठी स्निग्ध पदार्थ. गर्भावस्थेत बाळाच्या मेंदूची निर्मिती होताना मातेच्या रक्तातून विविध प्रकारचे स्निग्ध पदार्थ गर्भात शोषले जातात. अशाप्रकारे मानवी मेंदूची निर्मिती होते. रक्तातील चरबी किंवा वजन न वाढता त्याचा परिणाम केवळ मेंदूच्या पेशींवर व्हावा म्हणून श्रेष्ठ दर्जाचे स्निग्ध पदार्थ नाकाच्या मार्गाने शरीरात घातले तर त्याचा उपयोग तडक मेंदूच्या पेशींवर होतो.
प्रश्न - या नस्याचा वापर कोणी करावा?
उत्तर - नाकात टाकण्याचे औषध म्हटल्याबरोबर ते सर्दी पडशासाठीच असणार असा आपला समज होतो. या नस्याचा वापर मेंदूच्या पेशींचे पोषण करण्यासाठी होतो. मुलांना शालेय वयात, तरुणपणी नोकरी - व्यवसायात सक्षम राहून तणावमुक्त राहण्यासाठी आणि उतारवयात होणाऱ्या बहुतेक सर्व विकारांच्या संरक्षणासाठी याचा वापर अगदी नियमितपणे आणि डोळे झाकून करावा. डिमेन्शिया, अल्झायमर्स किंवा पार्किन्सन्स सारख्या रोगांची सुरुवात वयाच्या पन्नाशीलाच मेंदूमध्ये होत असते पण लक्षणे मात्र पुढे हळू हळू १० ते १५ वर्षांनी दिसू लागतात. हे विकार होऊच नयेत म्हणून हे नस्य पन्नाशीला सर्वांनीच सुरु करावे.
प्रश्न - कोणकोणत्या आजारांसाठी ह्या नस्याचा उपयोग होतो/ होऊ शकतो?
उत्तर - सर्वेन्द्रियाणां नयनं प्रधानम् ।
सर्वेषु गात्रेषु शिरः प्रधानम् ॥
अर्थात् सर्व इंद्रियांमध्ये डोळे आणि सर्व शारीरिक यंत्रणांमध्ये शिर (मेंदू) प्रधान आहे. या तत्त्वानुसार हे नस्य चिकित्सेचा उपयोग मेंदू आणि ज्ञानेंद्रियांच्या पोषणासाठी होतो.
- लहान वयात चष्मा लागणे
- मायग्रेन
- अर्धशिशी
- निद्रानाश
- विसरभोळेपणा
- अभ्यासात लक्ष न लागणे
- स्मरणशक्ती खालावणे
- डोळ्यांची आग
- कॉम्प्यूटरच्या सतत वापरामुळे डोळे दुखणे
- कानात दडे बसणे
- उन्हामुळे डोकेदुखी होणे
- थायरॉइड विकार
- रजोनिवृत्ती (मेनोपॉझ) दरम्यान होणारा हॉट फ्लशेसचा त्रास
- अंथरुणात लघवी होणे
- राग अनावर होणे
- ADHD
- अकाली केस गळणे
- हात कापणे (थरथरणे)
- पार्किन्सन्स डिसीज
- पॅरालिसिस (अर्धांगवात)
- फेशियल पाल्सी
- सायनसायटिस
- डिमेन्शिया
- अल्झायमर्स डिसीज
आणि मेंदूशी निगडीत अशा अनेक विकारांमध्ये हे नस्य लाभदायक आहे.
मल्टिपल स्क्लेरोसिस विकारात काही रुग्णांनी लक्षणे कमी झाल्याचे नुकतेच निदर्शनास आणून दिले आहे. हे नस्य नियमितपणे वापरणाऱ्या लोकांनी आपले अनुभव कळवले आणि त्यात नवनवीन मुद्दे लक्षात येत आहेत. रोज ३ ते ४ वेळा इन्सुलीन घ्यावे लागते अशा अतिशय गंभीर मधुमेही रुग्णांना हे नस्य चालू केल्यानंतर इन्सुलीनची मात्रा कमी करता आली आणि मधुमेह उत्तमप्रकारे नियंत्रणात आला. काही लोकांनी तळहातांची आग थांबली असे अभिप्राय दिले. शरीरातील सर्व प्रक्रिया मेंदूच्या अधिपत्याखाली नियंत्रित होतात म्हणूनच मेंदूला उत्तमांग म्हणतात.
प्रश्न - फ्रीजमध्ये ठेवावे का?
उत्तर - फ्रीजमध्ये ठेऊ नये, बाहेर परंतु उन्हात किंवा सूर्यप्रकाशात ठेवू नये. कपाटात सावलीमध्ये ठेवावे.
प्रश्न - किती दिवस टिकते?
उत्तर - सावलीमध्ये ठेवावे, दोन वर्ष टिकते. एक वर्षानंतर त्याचा सुगंध थोडा कमी होतो पण गुणधर्म शाबूत राहतात.
प्रश्न - ही ट्रीटमेंट किती दिवस करावी?
उत्तर - मुळात ही ट्रीटमेंट नसून चांगली सवय आहे. जसे नियमितपणे दात घासणे, केसांना तेल लावणे वगैरे. कोणत्याही यंत्राला नियमितपणे ऑइलिंग ग्रीसिंग केल्याने यंत्राची कार्यक्षमता ज्याप्रमाणे दीर्घकाळ उत्तम राहते, झीज कमी होते, यंत्र अधिक काळ टिकते त्याप्रमाणे मेंदूची आणि ज्ञानेंद्रियांची कार्यक्षमता दीर्घकाळ चांगल्याप्रकारे टिकून राहण्यासाठी ही एक चांगली सवय आहे.
प्रश्न - गर्भावस्थेत हे नस्य केले तर चालेल का?
उत्तर - नाही. गर्भावस्थेत कोणतेही औषध नाकात टाकू नये. नाकात टाकलेल्या औषधाचा परिणाम गर्भाच्या वाढीशी निगडीत संप्रेरकांवर होतो. गर्भावस्थेत नैसर्गिकरीत्या हे चढउतार बाळाच्या गरजेनुसार होत असतात. त्यात आपण ढवळाढवळ करणे योग्य नाही.
प्रश्न - लहान मुलांना हे नस्य केले तर चालेल का?
उत्तर - तान्ह्या वयात काडीला कापूस लावून नाकातून फिरवावा. ६ ते १२ वर्षांपर्यंत दोन्ही नाकपुड्यांमध्ये सकाळी आणि संध्याकाळी १ - १ थेंब, १२ वर्षांच्या पुढे २ - २ थेंब.
प्रश्न - नाकात टाकल्यानंतर किती वेळ आडवे पडून राहावे?
उत्तर - सुमारे दोन मिनिटे मान कलती करून पडून राहावे.
प्रश्न - नाकात टाकल्यानंतर घशात उतरते आणि घशाला खवखव होते. अशा वेळी काय करावे?
उत्तर - खवखव वाटल्यास २ घोट गरम पाणी प्यावे.
प्रश्न - ह्याचे काही साईड इफेक्ट्स होतात का?
उत्तर - साईड इफेक्ट्स होत नाहीत. उलट नकळतपणे अनेक साईड बेनेफिट्स (स्वास्थ्याच्या दृष्टीने लाभ) होतात. मुळात कोणत्याही यंत्राला वेळच्यावेळी ऑईलिंग ग्रीसिंग केल्यावर त्याचे कार्य आणि टिकण्याचा काळ वाढतो तशी ही नस्याची जादू आहे.
प्रश्न - नेहमी सर्दी होत असेल तर ह्याचा उपयोग होतो का?
उत्तर - मुळात हे नस्य सर्दीसाठी नसून मेंदू आणि ज्ञानेंद्रियांची कार्यक्षमता सुधारण्यासाठी आहे. सर्दीसाठी ह्याचा विशेष उपयोग होत नाही. परंतु (जुनाट सर्दी) सायनसायटिसचा त्रास मात्र बरा होतो. नाकाच्या आतील त्वचेला स्निग्धपणा मिळाल्याने श्वासमार्गात धूळ जात नाही आणि वारंवार सर्दी होण्याची सवय असेल तर हा त्रास आटोक्यात राहतो. कायम सर्दी असणाऱ्यांना याने सुरुवातीला ४ - ५ दिवस नाकातून भरपूर कफ / साठलेला शेंबूड बाहेर पडतो आणि नंतर काही दिवसांनी त्रास कमी होतो.
प्रश्न - चाळीशीचा चष्मा पण जातो का?
उत्तर - नाही. सामान्यतः लहान वयात लागलेला चष्म्याचा नंबर हळूहळू कमी होतो आणि कालांतराने जातो असे बरेच अनुभव आहेत. चाळीशीचा चष्मा जाणार नाही पण नंबर वाढण्याचा वेग मात्र आटोक्यात राहू शकतो. पन्नाशीनंतर हे नस्य नियमितपणे केल्यास मोतिबिंदू (कॅट्रॅक्ट) होण्याची शक्यता कमी होते.
प्रश्न - याची किंमत किती? कुठे मिळते?
उत्तर - १५ मिलि बाटलीची किंमत रु. १५०/- (सध्याची किंमत) आहे. बाहेर कुठेही विक्रीसाठी उपलब्ध नाही. मी स्वतः कुरियरने सर्वत्र पाठवतो. सध्याच्या किमतीनुसार ४ बाटल्या मागावल्या तर कुरियर फ्री होते. एखादे औषध बाहेर विक्रीसाठी उपलब्ध करण्यासाठी त्याची लायसन्सेस, टॅक्सेस, लॉजिसटिक्स, रिटेलर्स मार्जिन, होलसेलर्स मार्जिन, स्कीम इत्यादि गोष्टी विचारात घेतल्या तर उत्पादनाची किंमत ७०० च्या आसपास ठेवावी लागेल म्हणून मी लहान प्रमाणात करतो आहे.
सदर उपचार हे केवळ डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावे.
- डॉ. संतोष जळूकर
अभिप्राय