डाळींबी भाग ३, मराठी कथा - [Dalimbi Part 3, Marathi Katha] डाळींबी म्हणजे एका गोड चिमुकल्या मुलीची हृदयद्रावक कथा.
डाळींबी म्हणजे एका गोड चिमुकल्या मुलीची हृदयद्रावक कथा
कांचनच्या तोंडून आलेले हे प्रेमाचे बोल ऐकून सदानंद खूप खूष होतो व आपल्या कामावर जातो. ज्योती बाथरूममध्ये ब्रश करायला जाते. तशी कांचन बाथरूमचा दरवाजा बाहेरून बंद करते. ज्योतीचे ब्रश करून होते. ती दार उघडण्याचा प्रयत्न करते पण दार काही उघडत नसते. तो दरवाजा कांचन ने बंद केलेला असतो. ज्योती आतून दरवाजा बडवत असते. तेवढयात दाराच्या खालच्या भागातून एकदम कडक कडक उकळते पाणी येते. व ज्योतीच्या पायाला त्या पाण्याचा एकदम जोरात चटका बसतो. तशी ती खूप मोठ्याने ओरडू लागते. दार उघडा उघडा म्हणून पण कांचन काही दरवाजा उघडतं नसते. शेवटी ज्योती रडू लागते. मग कांचन ज्योतीला रागात धमकी देऊ लागते. की पुन्हा जर तुझ्या पप्पाला माझ्याबद्दल काही सांगितलस तर याहून वाईट हाल हाल करेन तुझे. कांचनच्या अशा निष्ठूर व असूरी बोलण्याचा ज्योतीच्या लहान नाजूक मनावर गंभीर परिणाम होतो.ज्योती आता कांचनला पाहून खूप घाबरू लागते. सदानंद दुपारी जेवायला घरी येतो. ज्योती एक पाय लंगडत चालत चालत सदानंदकडे जाते. बेटा काय झालं तुझ्या पायाला. काही लागलं का? सदानंद ज्योतीला विचारतो ज्योती त्याला काही सांगणार इतक्यात कांचन तिथे पाण्याचा ग्लास घेऊन येते. ज्योती कांचनला पाहून एकदम घाबरून जाते व सदानंदला म्हणते. की काय नाही बाबा मी बाहेर खेळत असताना थोडे पायाला खरचटले. दाखव बघू सदानंद तिचा पाय बघणार इतक्यात कांचन त्याला म्हणते की आहो काही नाही मी लावते मलम तिच्या पायाला तुम्ही जेवायला या. असे बोलून कांचन ज्योतीकडे रोखून व आठ्या पाडून बघते. सर्वांचे जेवण होते. कांचन ज्योतीच्या पायाला जिथे गरम पाण्याने चटका बसलेला असतो. तिथे मलम लावत असते. ती केवळ सदानंद समोर ज्योतीशी प्रेमानं वागत असते. तो गेला की तिचा छळ करत असते.
सदानंद पुन्हा कामावर जातो तो गेलेला बघून कांचन ज्योतीचा पाय आपल्या हातातून झटकून टाकते. आणि मलमची ट्यूब तिच्या अंगावर फेकून तिला म्हणते हे घे स्वतः लाव तुला मलम. असे म्हणून तिथून निघून जाते. ज्योतीच्या बाल मनाला याचे खूप दुःख होते ती तशीच दुःखी चेहऱ्याने व डोळ्यांत अश्रू आणून आपल्या खरी आई शारदा हिच्या फोटोकडे पाहते. सायंकाळ होते. कांचन खुर्चीवर आरामात बसलेली असते. तर ज्योती तिचे पाय चेपीत बसलेली असते तेवढयात सदानंद घरी येतो. कांचन हे काय? समोरील दृश्य पाहून तो कांचनला विचारतो. तशी कांचन ताडकन उभी राहते काही नाही ओ माझे पाय थोडे दुखत होते मीच ज्योतीला ते चेपायला सांगितले. यावर सदानंदला थोडा राग येतो. तो कांचनला म्हणतो तुला लाज नाही वाटतं एका लहान मुलीकडून असे काम करून घेताना. कांचन काही बोलणार इतक्यात गप्प बस...! एक शब्द बोलू नको व तो तसाच ज्योतीला आपल्या खोलीत घेऊन निघून जातो. यावर कांचन ला खूप खजिल झाल्यासारखे वाटते आणि ज्योतीचा खूप रागही येतो.
रात्री सदानंद झोपायची तयारी करत असतो. कांचन खोलीमध्ये येते. ती सदानंद शी बोलायचा प्रयत्न करीत असते. सदानंद कपाळावर एक हात ठेवून असाच पाहुडलेला असतो. कांचन त्याच्या शेजारी येऊन बसते. सदानंद तिच्याशी एक शब्दही बोलत नाही. कांचन सदानंदच्या पायाला आपले दोन्ही हात लावून त्याची माफी मागते ती त्याला म्हणते की “मला माफ करा चुकले मी पुन्हा नाही असे वागणार!” तसा सदानंद थोडा भानावर येतो. तो उठून कांचनला म्हणतो की “ज्योती ही फक्त माझी नाही तर तुझीही मुलगी आहे. भले ही तू तिला जन्म दिला नाहीस पण तिला अशी सावत्र आईसारखी वागणूक तरी नको देऊ.” कांचन स्वतःला खूप शहाणी समजत असते तिला असे दुसऱ्याकडून उपदेशाचे डोस घेणे आवाडत नसते. पण तरीही ती त्यावेळी सदानंदचे बोलणे ऐकून घेते. एवढे बोलून कांचन पुन्हा एकदा सदानंदची माफी मागते. त्यानंतर सदानंद कांचनला आपल्या मिठीत घेतो व खोलीतील दिवे विझूण जातात. दुसऱ्यादिवशीची सकाळ उजाडते सदानंद लवकरच कामावर जातो. ज्योती अजून झोपलेली असते. कांचन तिच्या खोलीत जाते. ज्योतीला पाहून कांचनला काल रात्री सदानंद तिला जे काही बोलला ते आठवते तसा तिला राग चढत जातो. व ज्योतीच्या अंगावरील पांघरूण ओढून काढते. तशी ज्योती आपले डोळे चोळीत उठते “काय ग ए औदसे काल काय सांगणार होतीस तुझ्या बाऽऽऽ ला? काल तुझ्यामुळे माझ्यावर तो ओरडला. चल ऊठ इथून असे म्हणून ती ज्योतीचा हात पकडून तिला बाहेरच्या खोलीत ओढत नेते. चल ही भांडी घास आणि नाही घासलीस ना तर खूप बदडेन तुला.
एवढे बोलून कांचन बाहेर जाते. ज्योती मुसुमूसु रडू लागते तिच्या बाल मनाला हे काय चालले आहे. ते समजतचं नसते. तेवढयात दारावर टकटक असा आवाज येतो. दारात कांचनची मैत्रीण मंजू उभी असते. मंजू ला पाहून कांचनला खूप आनंद होतो. मंजू ही कांचन ची मैत्रीण असते. कांचनला मंजूमुळेच दारूचे व्यसन लागलेले असते. कांचन व मंजू त्यांच्या भूतकाळाविषयी बोलत असतात बोलता बोलता त्या दोघी आपल्या हातातील सिगारेट एकमेकींना पास करत असतात. ज्योती तो भांड्यांचा ढिगारा घासून खोलीत येते. काय ग काय म्हणतो तुझा नवा नवरा? मंजू कांचनला प्रश्न विचारते. काय नाही गं खूप भावनिक व मूर्ख आहे तो. कांचन मंजूला उत्तर देते. अस होय बर बर मंजू यावर उत्तरीत होते. तेवढ्यात मंजू ची नजर ज्योतीवर पडते आणि ही कोण ग? मंजू कांचनला प्रश्न विचारते. “ही माझ्या नवऱ्याच्या पहिल्या बायकोची मुलगी.” कांचन मंजूला सांगते. मंजूला अचानक ठसका लागतो. कांचन ज्योतीला ओरडून म्हणते “एऽऽऽ जा जाऊन पाणी घेऊन ये.” ज्योतीने सकाळपासून काही खाल्ले नसते तिला हळूहळू भिरभीरी येत असते. ती तशीच हातात पाण्याचा ग्लास घेऊन मंजूजवळ जात असते की अचानक तिला चक्कर येते व ते पाणी मंजूच्या साडीवर पडते मंजूला या घटनेचा भयंकर राग येतो.
मंजू रागाने खुर्चीवरून ऊठते व कांचनला नाही नाही ते बोलून जाते याचाही कांचनला खूप राग येतो. कांचन ज्योतीच्या तोंडावर पाणी ओतते ज्योती शुद्धीवर येते. तशी कांचन आपल्या हातातील सिगारेटचे चटके ज्योतीला देते. ज्योतीला याचा खूप त्रास होतो. तिला खूप वेदना होतात ती मोठमोठयाने ओरडू लागते. तिच्या ओरडण्याने शारदाचा भिंतीवरील फोटो खाली पडून फुटतो. इकडे एम. आय. डी. सी. मध्ये कामावर सदानंदचे लक्ष लागत नसते तो एका मशीनवर उभा असतो. मशीनच्या आत एक कास्टिंग पार्ट असतो.
क्रमशः
अभिप्राय