प्रेम हे नावावर नसतं - भाग ४,मराठी कथा - [Prem He Navavar Nasata - Part 4,Marathi Katha] लग्न,अर्पिताला जाग येते आजी तिच्या डोक्यावरून हात फिरवते.
लग्न
अर्पिताला जाग येते तिची आजी तिच्या डोक्यावरून हात फिरवत असते.“अर्पिता अग आज लग्न आहे तुझं, उठ लवकर.” प्रशांत वाट बघत असेल, आजी तिला प्रेमाने जवळ घेते. अर्पिता तयारीला लागते. लग्नाच्या मांडवात तिला सगळेच दिसतात, ती मांडवात अंतरपाठाच्या पलीकडे उभी असते तिला वाटते प्रशांत तिची वाट बघत आहे ती खूप खुश असते. अचानक गुरुजींच्या हातून अंतरपाट घसरतो व ती मान वर करते तर पुढे कुणीच नसतं. अचानक अंधार होतो आणि ती मांडवात स्वतःला एकटीच उभी दिसते. ती आजी आणि प्रशांत, दोघांना भरपूर शोधते पण ते कुठेच दिसत नाही.
ती दचकून उठते, तिच्या कपाळावर घाम असतो ती स्वप्न बघत असते हे तिला कळते. स्वतःला सावरत ती बेड वरून उठते व खोली बाहेर येते. सगळं शांत असतं. तिला उठलेलं बघून चंदूकाका वर येतात आणि अर्पिताला विचारतात, “ताईसाहेब झाली झोप? बाईसाहेबांचा निरोप आहे तुमच्यासाठी, लवकर तयारी करण्यास सांगितले आहे, तुम्ही आवरा मी चहा आणतो तुमच्या करता.” अस म्हणत तो वळतो पण थांबतो, परत पलटून अर्पिताला विचारतो “ताईसाहेब तुम्हाला आठवतंय लहानपणी तुम्हाला माझ्या हातचे पोहे आवडायचे, मी आजही तेच केलेत तुमच्या करता; तुम्हाला आवडेलना?
“हो नक्की आणा मला आवडेल ते खायला” अर्पिता एवढं बोलून आत जाते.
तिला काही सुचत नसतं; काय घालणार लग्न आहे सगळं अस झालंय कि काहीच विकत घेता नाही आलं. मग ती आधी आंघोळ करायच प्लॅन करते ती जातच असते तेवढ्यात तिचे कपडे घेऊन एक मुलगी आता येते.
“मॅडम, मला तुमच्या आईंनी हे कपडे घेऊन पाठवले आहे, आजच्या कार्यक्रमा करता” असं म्हणत ती ते कपडे दाखवते.
“अर्पिता पुढे जाते; ते कपडे हातात घेते आणि त्याला बघत ती ते कपडे टेबल वर ठेवते आणि अंघोळीला जाते, बाहेर येऊन बघते तर चहा नाश्ता आलेला असतो ती तो घेते आणि तयारीला लागते. तेवढ्यात तिथे दोन मुली येतात आणि दारावर नॉक करतात. ती वळून बघते “मॅडम आम्हाला तुमच्या आईंनी पाठवलंय लग्नाकरीता तयार करायला.”
ती त्यांना आत यायचा इशारा करते. त्या आत येतात आणि तिला तयार करायला सुरुवात करतात. लवकरच ती तयार होते. तिची तयारी झालेली बघून त्या फायनल टचअप करायला घेतात, बघतात तर ती जणू अप्सराच खूप सुंदर दिसत असते ती. तिचे लांब केस त्याची ती सुंदर केशरचना करतात एक छोटा अंबाडा त्यातुन केस बाहेर काढत त्याची वेणी करतात आणि अखंड वेणीला गजरे माळतात. तिच्या निळ्या डोळ्यांना साजेल अशी आयशॅडो लावतात आणि साडी साधारण हळदी कलरची असते त्यावर सुंदर लाल रंगाची छटा असलेली त्यात सोनेरी तारांनी सुंदर नक्षीकाम केलेलं असतं. तिच्या पायात सोनेरी पैंजण असतात. सोनेरी नागाची नक्षी असलेला कंबरपाट्याने तिची कंबर आणखीनच नाजूक दिसत असते. त्या रूपवतीला सगळे आपल भान हरवून बघत असतात.
ती खोलीबाहेर येते घराच्या दाराशी गाडी उभी असते; कोर्टात जाण्याकरीता, ती त्यात बसते आणि गाडी कोर्टाचा दिशेने पळू लागते.
गाडी कोर्टाच्या मेन गेटवर येते. ड्राइव्हर गाडी थांबवतो ती बाहेर डोकावते तिथे तिची आई रेखा सरनाईक आणि बाबा विनायक सरनाईक उभे असतात. त्यांच्या सोबत त्यांचाच वयातला एक माणूस आणि ईतर माणसं त्यांच्या मागे उभी असतात. त्यातील एक माणूस पुढे सरसावतो आणि कारचे दार उघडतो; ती बाहेर पडते. ती खाली उतरताच सगळीकडे नजर फिरवते तिच्या लक्षात येते कि सगळे लोक तिलाच पाहत आहेत. तिला थोडं लाजल्यासारखं होतं. ती तिच्या आई-बाबांजवळ जाऊन उभी राहते.
“या सूनबाई या, अजून नाही पण लवकरच होणार आहेस” सत्यजित सरदेसाई हसत पुढे येत बोलतात.
“अरे, पण विनायक राव तुम्ही मात्र या सोन परीला इतके दिवस कुठे लपवलीत” म्हणत तो अर्पिताकडे बघतो.
तशी अर्पिता लाजते विनायक सरनाईक उगाच जरा तोरा दाखवत हसतो. पण रेखा सरनाईकांची मात्र पूरती जळते; कारण तिथे तिची मुलगी नसून तिच्या सवतेची मुलगी असते आणि तेही ती इतकी सुंदर. तरी उगाच पुढे येत म्हणते “मग माझी मुलगी आहे, सुंदर तर असणारच”, रेखा उगाच तोरा मिरवत अर्पिताला पकडते.
सगळे आत जातात रजिस्ट्रार तिथे बसलेले असतात त्यांची वाट बघत; ते सगळे त्यांच्या पुढे उभे राहतात.
“मिस. अचल विनायक सरनाईक तुम्ही पुढे या इथे सही करा” रजिस्ट्रार तिला बघत. तशी ती लगेच पुढे येते आणि सही करते नंतर तो “मिस्टर. अनिकेत सरदेसाई“ म्हणत तिच्या शेजारी उभा असलेल्या मुलाकडे बघतो तो मुलगा स्वतःच पुढे येतो तिच्या हातून पेन घेतो आणि नावापुढे सही करतो लगेच रजिस्ट्रार साक्षीदारांना बोलवतो आणि त्यांना पण सही करण्यास सांगतो.
लग्न पूर्ण होतं ते दोघं एकमेकांच्या गळ्यात हार टाकतात अर्पिताची पूर्णवेळ मान खाली असते त्यामुळे त्या मुलाला म्हणजेच अनिकेत सरदेसाईला ती बघत नाही. दोघं एकमेकांना हार घालतात आणि “विवाह संपन्न” असा जोरदार सत्यजित सरदेसाई ओरडत ते सरळ विनायक सरनाईकांकडे जातात त्यांना अभिनंदन म्हणत मिठी मारतात आणि ते दोघे पुढे त्यांच्या त्यांच्या सेक्रेटरी कडून काही कागद घेत एकमेकांना देत परत अभिनंदन करत सगळे कोर्टातून बाहेर पडतात. अर्पिता आता मात्र अनिकेत सोबत त्याचा गाडीतून सरदेसाईच्या घरी जाणार असते तोच अनिकेत काही वेळात येतो महत्वाचं काम असल्याचं सांगून दुसऱ्या गाडीतुन उलट दिशेने निघून जातो.
गाडी एका मोठ्या बंगल्यापुढे थांबते, अर्पिता खाली उतरते बघते तर तो बंगला नसून मोठ महालच असतो. त्या मोठ्या राजवाड्याच्या गेट मधुन आत आलं कि दारापुढे एक मोठा कारंजा असतो त्यात सतत पाणी सुरु असतं. मोठी बाग त्यात वेगवेगळी फुलांनी बहरलेलं अशी मोठ मोठाली झाडे, छोटी रोपटी अश्या अनेक गोष्टीन्नी सुसज्ज असतं.
ती दाराकडे बघते तर त्यावर सुंदर नक्षीकाम केलेलं असतं ती आत जाते तेवढयात समोर एक आजी येतात. ती थबकते आणि त्यांच्याकडे बघते “थांब पोरी तिथेच थांब.” ती आवाज ऐकून जरा घाबरते तिला एक क्षण काहीच कळत नाही. त्या पुढे येतात आणि धान्यांनी भरलेला माप तिच्यापुढे ठेवतात इतर घरातील नौकर त्यापुढे कापड ठेवतात.
“आता याला लवंडून आत ये.” म्हणत त्या आजी खाली वाकतात आणि तो माप तिच्या पायाशी ठेवतात.
“अचल बेटा ह्या सावित्री आई आहेत अनिकेतला लहानपणा पासून यांनीच संभाळलंय”, सत्यजित बोलत पुढे येतात.
ती तो माप लवंडत गृहप्रवेश करते.
“वेल कम होम सूनबाई”, म्हणत सत्यजित तिच स्वागत करतात सगळे नौकर टाळ्या वाजवतात.
ती आत येते आणि सगळं घर बघते. “मारोती ताई साहेबाना त्यांची रूम दाखवा नि हो सोबत त्यांना काय हवाय नको ते बघा”, म्हणता सत्यजित आपल्या कामाला लागतात.
मारुती त्यांच्या घरचा नौकर असतो. तो त्यांना घेऊन वर जातो. ती खोलीत जाते मारुती मागून “मॅडम काही लागलं तर हाक मारा मी इथेच असतो” असं म्हणत तो निघून जातो.
ती रूममध्ये जाते आणि आता तिला कोणी बघणार नाही म्हणून ती उसासा टाकते आणि मान वर करते, बघते तर काय ती रूम एवढी मोठी असते कि साधारण तिच्या रत्नागिरीतील तीचं संपूर्ण घर. त्या घरातील ती सगळ्यात मोठी बेडरूम असावी असं ती विचार करते ती पुढे जाते बघते तर सगळ्या सुखसोई त्या एका रूम मधेच असतात. ती पुढे होऊन गादीवर बसते ती कमालीची मुलायम असते.
सगळं रूम बघतच असते कि मागून तिला कोणी आवाज देतं एक मुलगी रूमच्या दारावर नॉक करते “मॅडम तुमच्यासाठी हा ड्रेस सरांनी पाठवलाय आज रात्रीच्या पार्टी करता.” “हम्म! ईथे ठेऊन द्या” असं म्हणत अर्पिता बेडकडे हात करते.
क्रमशः
अभिप्राय