आडवी खोरी मराठी भयकथा - कोकणातील काळीजादू, करणी, भूतप्रेत आडव्या खोरीचे रहस्य उलगडणारी भयकथा म्हणजे आडवी खोरी.
कोकणातील आडव्या खोरीचे रहस्य उलगडणारी भयकथा म्हणजे आडवी खोरी
आडवी खोरी
आडवी खोरी म्हणजे कोकण, महाराष्ट्र राज्यातील एक समृद्ध प्रदेश. अगदी कोकणी ब्राम्हण ते कोकणचा आंबा इथपर्यंत कोकणाची ख्याती सर्वदूर पसरली आहे. ब्रिटिश काळात ब्रिटिश कोकण प्रदेशाला (wonders of the western ghats) असे म्हणत. असे म्हणतात की, “कोकणची माणसं लई साधी भोळी” हे जरी खरं असले तरी आजही या एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर कोकणात काळीजादू, करणी, भूतप्रेत, आडवी खोरी या गोष्टींवर कोकणातील लोकांचा गाढ विश्वास आहे.
आज आपण एक अशीच रहस्यमय कथा पाहणार आहोत जी कोकणातील एका आडवी खोरी या रहस्यमय ठिकाणाचे रहस्य आहे. आडवी खोरी तसं पाहायला गेलो तर हा मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्ग आहे जो संगमेश्वरमध्ये ‘आडवी खोरी’ या नावाने ओळखला जातो. हा मार्ग जंगलातून जात असल्यामुळे येथील लोक त्याला ‘आडवी खोरी’ म्हणतात.
चेटकीणीची सावली
असे म्हणतात की, या आडव्या खोरीवर एका चेटकीणीची सावली आहे. सायंकाळी सात नंतर गावातील लोक त्या दिशेला पाहणे देखील अशुभ समजतात. बऱ्याच वेळेला गावातील लोकांना तिथे एक अदृश्य शक्ती वावरताना आढळून आली आहे. रात्री - अपरात्री येणाऱ्या लोकांना आपल्या सोबत आणखी कोणी तरी आहे याचा भास देखील होतो.
एका रात्री श्रीपतराव व रंगराव कामावरून घरी जात होते. खूप उशीर झाल्याने त्यांना परतीचे वाहन मिळाले नाही. “आरं, आज खूप उशीर झाला रं रंग्या.” श्रीपती रंगरावांना म्हणाला. “व्हय रं, आज लई कांडाप निघाला माझा.” बोलता बोलता रंगरावाने तोंडात बिडी धरली. बिडीला काडी लावून तो श्रीपतीला म्हणाला, “काय रं, आज कारभारी लई वैतागलेलं का?” श्रीपती म्हणाला, “का रं, काय झालं?”
“आरं काय न्हाई. जरा पैशे मागितलं त्याच्याकडं तर बेनं खेकसून अंगावरच आलं माझ्या.” रंगराव बिडीचा धूर हावेत उडवत बोलत होता. “बहुतेक रात्री त्याच्या कारभारीनीबरोबर काय तर झालं असणार म्हणून असं वागला असंल.” रंगरावाच्या हातची बिडी घेत श्रीपती त्याला म्हणाला. त्या काळोखात फक्त बिडीचा विस्तव चमकत होता. अचानक बोलता बोलता श्रीपतीच्या पायात काटा घुसला व तो ‘आई गं’ असे म्हणून केकटत खाली बसला. रंगराव पुढे चालत होता. “काय रं रंग्या, आज शामल का न्हाई आली रं?” श्रीपतीने रंग्याला प्रश्न विचारला. “आरं, तिची सून हाय पोटूशी. ती कशी येईल कामावर?” रंग्याने श्रीपतीला उत्तर दिले.
प्रश्न
“पण तुला का तिचा उचका पडला रं?” रंग्याने सोबतच हा प्रश्न श्रीपतीला विचारला. “आरं, काय न्हाई. असंच ईचारलो.” श्रीपती रंगरावाला म्हणाला. “हां... असंच की काय तर येगळं हाय.” “ऐ शिरपा, तू मला सांगू नको. मी बऱ्याचदा बघितलो हाय तुमच्यात चुना सुपारीची देवाण घेवाण कशी चालती ते.” यावर श्रीपती अधाशासारखा हसू लागला. तोंडातली बिडी संपली म्हणून रंगरावाने खिशात हात घालून बिडी व काडेपेटी बाहेर काढली.
रंगरावासमोर
तोंडात बिडी धरून हातातील काडी ओढली आणि त्या काडीच्या उजेडात समोर पाहतो ते काय जिथे श्रीपती उभा होता त्या जागेवर तो नव्हताच, तर तिथे एक काळी गोल टोपी, काळा कोट घातलेली एक आकृती उभी होती. त्या आकृतीला ना हात होते ना पाय होते. फक्त काळी टोपी आणि काळा कोट एवढेच दिसत होतं. हे पाहून रंगराव अचानक दचकलाच. ती काडी तशीच पेटत होती. रंगरावाने आपला हात फिरविला तर त्याच्या बरोबर दहा पावले मागे श्रीपती उभा होता.
रंगरावासमोर उभा राहिलेल्या आकृतीला तो ही बघत होता. त्याचे हात पाय लटपटू लागले होते. अचानक वाऱ्याचा एक झोका आला व रंगरावाच्या हातातील पेटती काडी विझून गेली. विझताना रंगरावाच्या हाताला चटका बसला. पुन्हा काळोख पडला. दोघेही सुन्न होऊन उभे होते. दोघांच्याही मनात आपण कुठे आहोत याची कल्पना आली होती. ते दोघेही आडव्या खोरीत होते जिथे एका चेटकीणीचा वावर आहे.
आरं रंग्या, थांब थांब
रंगराव जिवाच्या आकांताने पळत सुटला. त्याच्या मागे श्रीपती ही एक पाय लंगडत लंगडत पळू लागला. ‘आरं रंग्या, थांब थांब’ असे तो म्हणू लागला. दोघेही वस्तीवर येऊन पडले. चावडीवरील चार पाच माणसं त्यांच्या जवळ आली. “आरं रंग्या, शिरपा काय झालं तुम्हाला?” त्यातील एका वयस्कर माणसाने त्यांना विचारलं. दोघांच्याही तोंडून मरू लागलेल्या जनावरासारखा फेस गळत होता. आपण काय बघितलं ते काय होतं हे प्रश्न त्यांच्या मनात येत होते.
या गोष्टीला सुरूवात झाली होती ती सात वर्षापूर्वी. संगमेश्वर गावात नारायण केळकर व त्यांची पत्नी चित्रा हे राहायला आले होते. नारायणराव हे पेशाने पुरोहित होते. चातुर्मासातील पूजा, श्रावणातील सत्यनारायण पूजा आणि इतर पूजा सांगून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करत. पण नारायणराव हे नावाने जरी नारायण असले तरी त्यांना पत्नीसुख काही चांगले मिळाले नव्हते. त्यांची पत्नी चित्रा ही दिसायला खूप सुंदर होती पण मनाने ती चंचल होती.
तिला सतत चैनी विलासात राहणे, पैशांची उधळपट्टी करणे हेच आवडत असे. तिला आपल्या पतीपेक्षा परपुरूषांची खूप लालसा होती. ती बाहेर बाजारहाट करायला जायची तर आपली कंबर ठुमकत व आपली मोठी केसांची वेणी हलवत जात असे.
पण गावातील काही माणसांना तिचे हे वागणे खटकत असे. चित्राने गावातील पुरूषोत्तम, जो गावाचे पाटील भिमाजी नाईक यांचा एकुलता एक मुलगा आहे. त्याच्यासोबत संग केला होता. जेव्हा नारायणराव रात्री गाढ झोपी जात तेव्हा चित्रा व पुरूषोत्तम यांचा प्रणयरूपी खेळ चालत असे. पण नारायणरावांना याची पुसटशीही कल्पना नव्हती.
कोकणातील आडव्या खोरीचे रहस्य
एकेदिवशी नारायणराव तळकोकणात एका त्यांच्या मित्राच्या मुलग्याची मुंज सांगायला गेले होते. ही संधी साधून पुरूषोत्तम सकाळीच एखाद्या लांडग्यासारखा नारायणरावांच्या घरात शिरला. तेव्हा चित्रा किचनमध्ये पोळ्या बनवत होती. त्याने चित्राच्या कमरेत हात घातला. तशी ती शहारली. तिला आपल्याकडे खेचून घेतले व एखाद्या आधाश्यासारखा पुरूषोत्तम चित्राच्या तोंडावर चुंबनांचा वर्षाव करू लागला. नंतर त्याने तिला उचलले व पलंगावर ठेवले व दोघेही धुंद प्रणयात रमून गेले.
गॅसवरील पोळी करपत होती व दुसऱ्या गॅसवरील दूध उतु जात होते तसा नारायणरावांचा संसार देखील वाया जात होता. घराशेजारून गावातील एक व्यक्ती जात होती; दुसऱ्या दिवशी त्या व्यक्तीच्या घरी सत्यनारायण पूजा घालायची होती. नारायणरावांना सांगायला ती व्यक्ती त्यांच्या घरी जात गेली. दार वाजवणार इतक्यात खिडकीतून त्या व्यक्तीला तो आतला सगळा प्रकार दिसला.
ते पाहून त्या व्यक्तीच्या तळपायाची आग मस्तकात गेली. तो व्यक्ती तडक गावाचे पाटील भिमाजी नाईक यांच्या घरी जातो तेव्हा भिमाजी नाईक हे गावातील प्रश्न उत्तराच्या सभेत होते. ती व्यक्ती सभेत पोहोचते व नारायणराव यांच्या घरी जे काही पाहिलं ते सगळं काही सांगून टाकते. आपल्या आदर्श गावात हा गलिच्छ प्रकार भिमाजी नाईकांना सहन होत नाही. ते तडक ८ ते १० माणसांसोबत नारायण केळकर यांच्या घराकडे कूच करतात. दिवस मावळायला लागतो. अजूनही पुरूषोत्तम व चित्रा यांचा प्रणय सुरूच असतो. “बरं झालं अजून माझं लग्न नाही ठरलं, नाहीतर ही मलई मला कशी खाता अली असती.” चित्राच्या ओठांवर बोट फिरवीत पुरूषोत्तम बोलत होता.
चित्रा त्याला हसत ‘हो का...?’ असे बोलते. तेवढ्यात भिमाजी नाईक दारावर लाथ मारून घरात घुसतात. आपल्या मुलग्याला अशा रूपात पाहून भिमाजी नाईकांना खूप राग येतो. ते लगेच पुरूषोत्तमला पलंगावरून खेचून बाजूला करतात व खाडकन् एक कानशिलात लगावतात. “अरं लेका, ह्ये काय केलंस? लाज काढलीस रं माझी.” म्हणून आणखी एक कानशिलात लगावतात.
मला माफ करा
सगळ्या गाववाल्यांसमोर आपली अब्रू जात आहे हे पाहून पुरूषोत्तमला खूप लाज वाटते. तो लगेच पलटी मारतो. “आण्णा, आण्णा मला माफ करा. या छिनालीनं मला आपल्या जाळ्यात ओढलं. मला माफ करा.” व पुरूषोत्तम ते सर्व काही सांगू लागतो जे चित्रा व पुरूषोत्तम यांच्यात घडत होते, जसं की कसं चित्राने त्याला आपल्या जाळ्यात ओढले. हे ऐकून भिमाजी नाईकांची बायको गावाची पाटलीन हिला खूप राग येतो.
ती खाडकन् चित्राच्या कानशिलात लगावते. “काय गं ए औदसे, तुला माझंच पोरगं दिसलं का या सगळ्यासाठी?” चित्रा ‘पुरष्या’ असे मोठ्याने किंचाळत त्याच्या अंगावर जात असते पण भिमाजी नाईक तिला अडवतात व आणखी एक कानशिलात लगावतात. ‘मारून टाका या औदसेला.’ तिथे असलेल्या दोन तीन बायका तिला चपलाने मारू लागतात. जे काही घडलं आहे यावर भिमाजी नाईकांना खूप राग येतो. रागाच्या भरात ते नारायणरावांच्या घराला आग लावायला सांगतात. चित्राला तिच्याच घरात कोंडून घातले जाते व बाहेरून ते घर पेटवून दिले जाते.
चित्रा एक चारित्र्यहिन व वाईट प्रवृत्तीची बाई असते. ती जळत असताना तिच्या तोंडून खूप सारे अपशब्द बाहेर पडतात. ती शिव्या शाप देऊ लागते. काही वेळात चित्रा तिच्या घरासोबत जळून खाक होते. नारायणराव तळकोकणातून संगमेश्वरमध्ये येतात. वाटेतच त्यांना भिमाजी नाईक व इतर लोक भेटतात व घडलेला सगळा प्रकार सांगतात. हे ऐकून त्यांना मोठी हबकी बसते व त्या हबकीमध्ये ते आपली चेतनाच हरवून बसतात. त्यानंतर थोडा कालावधी निघून जातो.
मोक्ष प्राप्ती
चित्रा ही एक हट्टी वाईट स्त्री असते. जिवंत असताना तिच्या खूप इच्छा असतात. त्यामुळे मृत्यूनंतर तिला मोक्ष प्राप्ती होत नाही. मृत्यूनंतर तिचा आत्मा चेटकीणीच्या योनीमध्ये प्रवेश करतो व तिची काळी सावली त्या आडव्या खोरीवर पडते. तिथे रात्री अपरात्री येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना तिचा अतृप्त आत्मा त्रास देऊ लागतो. याच भितीमुळे काही जणांचे हृदय बंद पडून गूढ मृत्यू होतो.
काही जण आयुष्यभरासाठी वेडे होतात. चित्राच्या शिव्या शापाने भिमाजी नाईकांचे कुटुंब देशोधडीला लागते. कारण त्यांचा मुलगा पुरूषोत्तम हा चित्राच्या मोहक जाळ्यात ओढला गेला असतो. त्याच्या एका चुकीची शिक्षा संपूर्ण नाईक कुटुंबाला भोगावी लागते. जेव्हा आडव्या खोरीची ही भयानक बातमी गावचे सरपंच शशिकांत मोहिते यांना समजते तेव्हा ते कोसूंबे गावातील पंडित संध्यानंद स्वामी यांच्याकडे सल्ला घेण्यासाठी जातात.
अभिप्राय