एकतर्फी प्रेमाची कारणमीमांसा भाग ५, मराठी प्रेम कथा - [Ektarphi Premachi Karanmimansa Part 5, Marathi Prem Katha] मोहीत, वैष्णवी व अमित या तीन कॉलेज त
मोहीत, वैष्णवी व अमित या तीन कॉलेज तरूणांच्या आयुष्याची प्रेम या अडीज अक्षरासोबत सांगड घालणाऱ्या एका अपूर्ण प्रेमकथेचा पाचवा भाग
ऑक्टोबर महिण्याच्या पाच तारखेला सर्वजण माथेरान या हिल स्टेशनवर जायचे ठरवतात सेकंड इयरचे सेकंड सेमिस्टर एक्झाम देऊन सर्वजण आनंदाने माथेरानला जाण्यासाठी उत्सुक असतात. आदल्यारात्री सर्वजण एकमेकांना मेसेज करून आठवण करून देतात. दुसऱ्यादिवशी सर्वात आधी अमित चाळीबाहेर पडतो. थोड्या वेळाने वैष्णवीही बाहेर पडते. यांनी घरच्या लोकांना काहीच कल्पना दिलेली नसते. दोघेही मुंबई - पुणे महामार्गावर येऊन इतरांची वाट पाहत थांबतात. थोड्या वेळाने अक्षय व कविता तिथे येतात. कविता अग नीलम अजून आली नाही तिझा फोन देखील ऑफ येतोय. तुला काही निरोप सांगितला आहे का तिने? वैष्णवी कविताला विचारते. “नाही गं मीही तिला कालपासून फोन ट्राय करतेय पण नो रिस्पॉन्स येतोय; थांबा मी तिला फोन करतो.” असे म्हणून अमित नीलमला फोन लावतो पण इथे एक वेगळाच प्रकार घडलेला असतो.नीलमचे आई बाबा दोन - तीन दिवसांसाठी बाहेरगावी गेलेले असतात व तिला तिच्याच घरात मोहित व त्याच्या चार मित्रांनी बांधून ठेवलेले असते. तोंडाला पट्टी व हातापायांना एका घट्ट दोऱ्याने तिला बांधून ठेवलेले असते. तिच्या समोरच तिचा फोन वाजत असतो; पण तो फोन ती उचलू शकत नसते. त्याचा एक मित्र तो फोन मोहितला देतो. फोनवरील अमितचे नाव बघून मोहित म्हणतो की “याला तर मी जिवंत सोडणार नाही.” त्याच्या डोक्यात एक कल्पना येते. तो फोन घेऊन नीलमजवळ जातो. नीलम त्याला भेदरलेल्या अवस्थेत पाहत असते. ती त्याला मला सोड अशी केवीलवाणी विनंती करते फोनची रिंग एक सारखी वाजत असते. फोन कट होऊन पुन्हा रिंग वाजू लागते मोहित फोन उचलून नीलमच्या कानाला लावतो. अमित नीलमने फोन उचलला या आनंदात मोठयाने हॅलो म्हणतो. “अगं कुठे आहेस तू?” वैष्णवी लगेच अमितकडून फोन काढून घेते. “काय गं ए सर्किट कुठे पत्ता आहे तुझा आम्ही कालपासून तुला फोन ट्राय करतोय आपल्याला बाहेर जायचे आहे विसरलीस काय?” वैष्णवीचे हे प्रेमाचे बोल ऐकून नीलमच्या डोळ्यांत पाणी येते. ती त्यांना सर्व काही सांगणार असते. पण पण मोहित तिला डोळे वटारून पाहात असलेला बघून ती वैष्णवीला म्हणते. आय एम सॉरी वैषू माझे आई बाबा दोघेही बाहेरगावी गेले आहेत व कालपासून माझा हँडसेटही खराब झालाय म्हणून तुमच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
“बरं मग तू ट्रिपला येणार आहेस कि नाही. वैष्णवी तिला विचारते. नीलम थोडे थांबून तिला म्हणते कि हो मी येणार आहे. पण तुम्ही जा पुढे मी परस्पर येते.” ऐवढे बोलून फोन कट होतो. नीलमकडे पाहून मोहित छद्मीपणाने हसत असतो. ती हुंदके देत मोहितला विचारते तु का आम्हांला असा त्रास देत आहे यावर मोहित तिला म्हणतो कि कारण माझं प्रेम आहे वैष्णवीवर तिला मिळवण्यासाठी मी काहीही करू शकतो. हे सगळं तो अगदी असुरीवृत्तीने बोलत असतो. “पण वैषू तर अमितवर प्रेम करते.” आमित चे नाव ऐकताच मोहित रागाने लालबुंद होतो. “त्याला तर मी जिवंत नाही सोडणार” असे बोलत तिथून उठून बाजूला जातो; आणि म्हणतो कि “साला एक आपल्या जवळची व्यक्ती आवडली होती ती आपल्याला मिळावी अशी इच्छा मनात होती. खूप प्रेम ही आहे तिच्यावर पण इथेही प्रेम त्रिकोण? ए सोडून द्या हिला पण हीने आपले तोंड तिच्या मित्रांसमोर उघडलं तर.” एक मित्र मोहितला ही शंका विचारतो. “नाही ही काही बोलणार. कारण मित्रांपेक्षा हीला आपल्या आई वडिलांची जास्त काळजी आहे”. तो ज्या पद्धतीने हे बोलत असतो. त्यावरून नीलमला सगळं समजत. तिला तिथे एकटे सोडून ते सर्वजन तिथून निघून जातात व नीलम हतबल होऊन रडू लागते.
इकडे हे सगळे माथेरानला पोहोचतात. तिथले वातावरण खूप आल्हाददायक असते. चारहीबाजूला धुके पसरलेले असते. त्या वातावरणात वैष्णवीला खूप फ्रेश फिल होतं. तिला बघून अमित म्हणतो कि या फ्रेश वातावरणात मी एक गाणं म्हणणार आहे माझ्या प्रिंसेससाठी यावर वैष्णवी अलगद हसते कविता व अक्षय खूप खूश होतात. अक्षय लगेच अमितच्या हातात गिटार देतो. ते सर्वजण खाली गवतावर बसतात. अक्षय व कविता वैष्णवीच्या डाव्या उजव्या बाजूला बसतात. अमित तिथे समोर असलेल्या दगडावर बसतो व यंगिस्तान या सिनेमातील ‘सुनो ना संग, हे रोमँटिक गाणं गातो. वैष्णवी एका खास पोझ मध्ये बसलेली असते. त्याच्या तोंडून जे गाण्याचे बोल येत असतात. त्यावरून त्यांच्या निखळ प्रेमाची त्यांच्यात असलेल्या विश्वासाची जाणीव त्यांना होऊ लागते. गाणं पूर्ण म्हणून झाल्यावर वैष्णवी त्याच्याजवळ धावत जाते. आणि त्याला मिठीत घेते अमित आपल्या हातातील गिटार बाजूला ठेवतो आणि तिथे त्यांचे एक चुंबन होतं. तो प्रसंग पाहून अक्षय कविताकडे बघतो. कविताही त्याला अधी सहज बघते पण अक्षय तिच्याकडे टक लावून पाहत असतो हे बघितल्यावर ती त्याला म्हणते “Shut up you battery” व त्याचा पाय तुडवून पुढे जाते.
थोड्या वेळाने ते सर्वजन आंधळी कोशिंबीर हा खेळ खेळू लागतात मस्त धुके पडलेले असते. व त्या वातावरणात त्यांना या खेळाची मजा वाटत असते. वैष्णवीच्या डोळ्यावर पट्टी बांधलेली असते. व बाकिचे सर्वजन धुक्यात लपलेले असतात. ती धुक्यात त्यांना शोधत असते. अचानक तिचे हात एका व्यक्तीच्या पाटीवर पडतात. तिला तो अमितसारखा वाटतो. पण तो मोहित असतो. वैष्णवी तिच्या डोळ्यावरील पट्टी काढते. व मोहितला बघून एकदम चकित होते. अरे तुम्ही I am sorry आम्ही friends इथे आंधळी कोशिंबीर खेळत आहोत. मग मला नाही घेणार तुमच्या friendsircul मध्ये. मी तुमचा मित्र नाही का? मोहित वैष्णवीला म्हणतो. यावर वैष्णवी त्याला हसून म्हणते कि हो या ना यू मोस्ट वेलकम ती तिच्या मित्रांना हाक मारून बोलवत असते. ती मोहितकडे वळून पाहते एक वाऱ्याची झुळूक येते तिच्या डोळ्यावररील पट्टी तिच्या ओठांवर येते. ती पट्टी काढत असताना अचानक मोहितचा हात त्या पट्टीकडे जातो. व तो तिच्या ओठांवरची पट्टी खाली ओढतो ती पट्टी तिच्या दोन्ही ओठांना नकळत स्पर्श करून खाली येते. वैष्णवी एका प्रश्नांकीत नजरेने मोहितकडे बघते. मोहित तिला हलकंस स्माईल करतो. ती दोन पावले मागे येते. मोहित दोन पावले पुढे सरकतो. व तिथून काही न बोलता निघून जातो. तेवढयात तिथे बाकीचे सगळे येतात. कविता तिला काय झालं असं विचारते. "अं काही नाही आपण निघूयात आता इथून.” वैष्णवी अमितला म्हणते. व पूर्ण प्रवासात तिला मोहितचे तसे वागणे आठवत असते. कि हा असे का वागला याच्या मनात माझ्याबद्दल काही नाही ना? असा विचार करत ती एका उद्विग्न मुद्रेने अमितकडे पाहते आणि त्याच्या खांद्यावर आपले डोके ठेवते.
दुसऱ्या दिवशी वैष्णवी कॉलेजवर जाते. लेक्चर संपवून ती घरी जात असते. रस्ता अगदी निर्मनुष्य असतो. थोड पुढे आल्यावर मोहित तिला दिसतो. तो आज तिला प्रपोज करायच्या हेतूने आलेला असतो. वैष्णवी त्याला बघून गाडी थांबवते आणि मोहित थोडं पुढे येतो. हॅलो मला थोड बोलायचं आहे तुझ्याशी; “काय बोलायचं आहे?” वैष्णवी त्याला आपले हेल्मेट काढत विचारते.
मोहित आपल्या हातातील गुलाबाचे फूल तिच्यासमोर धरतो आणि “आय लव्ह यू” हे तीन शब्द उच्चारतो. वैष्णवी हे सर्व ऐकल्यावर अचानक अवाक् होते. थोडं थांबून त्याला म्हणते की तुमचा काही तरी गैरसमज होत आहे. यावर मोहित लगेच म्हणतो की नाही माझं खरचं प्रेम आहे तुझ्यावर जेव्हा तू तुमच्या कॉलेजच्या गॅदरिंग मध्ये गाणं गात होतीस ना तेव्हा पासून माझ तुझ्यावर प्रेम बसलं आहे “आय रियली लव्ह यू” वैष्णवीला अनकंफरटेबल वाटू लागतं. ति तिथून जाण्याचा प्रयत्न करू लागते. मोहित तिला अडवून “प्लीज माझं म्हणणे ऐकून घे; मी खरचं खूप प्रेम करतोय तुझ्यावर.” सतत मोहितच्या तोंडून हे वाक्य ऐकून वैष्णवी चिडून त्याला म्हणते. “स्टॉप इट; काय लावलयस मगापासून प्रेम, प्रेम.” “का? मला कोणावर प्रेम नाही होऊ शकत?” मोहित लगेच तिला प्रतिप्रश्न करतो. व पुढे तो तिच्यावर किती प्रेम करतोय हे पटवून सांगू लागतो. पण वैष्णवी तिथून जाऊ लागते. तो तिचा हात पकडतो. ती त्याला हात सोडायला सांगते. पण तो काही ऐकत नाही त्यावर वैष्णवी त्याचा हात झिडकारून मोहितला एक कानाखाली लगावते. थोड्यावेळेसाठी वातावरण शांत होत वैष्णवी त्याला रागाच्या भरात नाक फुगवून Stupid म्हणते व तिथून निघून जाते.
वैष्णवी घरी आल्यावर कोणाशी काही न बोलता आपल्या रूममध्ये जाते. तेव्हा दिवसभर तिला तो मोहित त्यांच्या रिलेशनविषयी जी काही स्वप्ने पाहिलेली असतात व जे काही तो तिला सांगत असतो तेच तिला आठवू लागते. त्यामुळे ती दिवसभर अपसेट राहते. दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये वैष्णवी कविताला घडलेला सगळा प्रकार सांगते. कविता हे ऐकून अवाक् होते. “तू अमितला हे सगळं सांगितलं आहेस का?” कविता वैष्णवीला विचारते. यावर वैष्णवी म्हणते की नाही अजून मी त्याला काही बोलले नाही. तोपर्यंत अचानक अमित समोर येतो हे “Girls what happen” असं का सॅड आहात. त्या दोघी एकमेकांकडे पाहू लागतात. अं काही नाही आम्ही जरा exam विषयी बोलत होतो. कविता अमितला सांगते. बरं चला कॅंटिनमध्ये जाऊ ते तिघेही कॅंटिनमध्ये जातात. नीलमशी काही संपर्क झाला का तुझा वैष्णवी कविताला विचारते. नाही गं अजूनही तिचा फोन ऑफ येतोय. यावर वैष्णवीच्या मनात शंका येते. एक दोन दिवस वातावरण शांत राहते. एका रात्री वैष्णवीला एक मेसेज येतो. तो “तुझे हसू एका गुलाबासारखे तर तुझे रागावणे त्याच गुलाबाच्या काट्यासारखे आय लव्ह यू.” तो मेसेज पाहून ती थोडा वेळ शांत राहते त्यानंतर तिला आय लव्ह यू चे शंभर मेसेज येतात. मग तिची सहनशिलता संपते ती त्या नंबरला कॉल करते. दोन तीन रींगमध्ये कॉल उचलला जातो “ए तू जो कोणी आहेस एक गोष्ट लक्षात ठेव तू माझं मन कधीही जिंकू शकत नाहीस. पुन्हा मला असे फालतू मेसेज केलेस तर बघ.” एवढे बोलून वैष्णवी फोन कट करते. तो नंबर मोहितचा असतो.
मोहितला या गोष्टीचा थोडा राग येतो. नेहमीप्रमाणे अमित वैष्णवीला मेसेज करत असतो. पण वैष्णवी थोड्या स्ट्रेस मध्ये असते म्हणून त्याच्या मेसेजचा ती रिप्लाय करू शकत नाही. अमित वैष्णवीला चार पाच मेसेज करतो. पण वैष्णवी एकाही मेसेजला रिप्लाय देत नाही हे पाहून अमितचा जीव कासावीस होतो. त्याला एकवेळ वाटते आपण वैष्णवीला फोन करूया का? पण नंतर त्याला वाटते की नको उगाच गडबड नको. उद्या सकाळी भेटून तिला विचारतो. ती रात्र त्या तिघांसाठी खूप कठीण जाते. दुसऱ्यादिवशी सकाळी अमित वैष्णवीला भेटायचा प्रयत्न करतो. पण वैष्णवी सकाळीच नीलमला भेटायला गेलेली असते. नीलमच्या घरी तिचे आई वडील असतात. वैष्णवी तिच्या घराची बेल वाजवते नीलमची आई दार उघडते “काकू नीलम कुठे आहे? तिचा फोन ही बंद येतोय.” “अगं दोन दिवस तिने स्वतःला तिच्या रूममध्ये बंद करून ठेवले आहे. आमच्याशीही काय बोलली नाही ती.” नीलमची आई वैष्णवीला सांगते. तशी वैष्णवी तडक नीलमच्या बेडरूमकडे जाते दोन वेळा बेडरूमचे दार वाजवते नीलम काही दार उघडत नाही. “नीलम प्लीज दार उघड मी वैष्णवी आहे.” वैष्णवीचा आवाज ऐकून नीलमच्या जीवात जीव येतो ती दार उघडून थेट वैष्णवीच्या गळ्यात पडून रडू लागते. नीलमची आई नीलमला विचारते “नीलू अगं काय झालं? तू रडत का आहेस?” नीलम वैष्णवीकडे बघून आणखी रडू लागते. “काकू तुम्ही एक ग्लास पानी घेऊन या!” “नीलम चल आपण गार्डनमध्ये जाऊ” नीलम थोडी घाबरलेली असते.
त्या दोघी गार्डनमध्ये येतात “काय झालं नीलम? तू त्या दिवशी ट्रीपला नाही आलीस आता स्वतःला असं बंद करून ठेवली होतीस काय झालंय?” वैष्णवी धीर देत नीलमला विचारते. तशी नीलम घडलेला सगळा प्रकार वैष्णवीला सांगते कि मोहितने तिला घरी अडकवून ठेवले होते. त्रास दिला होता या सगळ्या गोष्टी नीलम वैष्णवीला सांगते व हे पण सांगते कि तो तुझ्यावर म्हणजे वैष्णवीवर एकतर्फी प्रेम करतोय व तिला मिळविण्यासाठी तो काहीही करू शकतो. थोडे थांबून वैष्णवी नीलमला सांगते कि तो मोहित त्यादिवशी आम्ही जेथे ट्रीपला गेलो होतो. तिथे आला होता व त्याने मला दोन दिवसांपूर्वी प्रपोज केले आहे. हा सगळा प्रकार ऐकून नीलमच्या पायाखालची जमीन सरकते. तू अमितला हे सगळं सांगितलं आहेस का नीलम वैष्णवीला विचारते. नाही अजून मी त्याला काहीच बोलले नाही. तेवढयात अमित आपल्या बाईकवरून नीलमच्या घरी येतो तो तडक त्या दोघींकडे जातो. त्या दोघी अमित आपल्याकडे येत आहे हे पाहून घाबरून जातात. अमित वैष्णवीच्या नजरेला नजर मिळवत तिला विचारतो कि “वैष्णवी काय झालं आहे ते सांग अचानक तुझ्या वागण्यात मला बदल दिसत आहे. नीलम तू तरी सांग काय झालं आहे ते तुम्ही दोघी माझ्यापासून काहीतरी लपवत आहात.” यावर नीलम अमितला तिच्यासोबत घडलेला सगळा प्रकार सांगते वैष्णवी देखील मोहित तिला कधी भेटला, त्यांची ओळख कशी झाली, नंतर त्याने तिला प्रपोज कसे केले. या सगळ्या गोष्टी सांगते. हे सगळं ऐकून अमितच्या रागाचा पारावर उरत नाही तो थोडा विचार करून मोहित, म्हणजे मोहित गोडबोले काय? यावर नीलम म्हणते हां तोच आहे ज्याला भंडारे मॅडम यांनी कॉलेजच्या गॅदरींगच्या दिवशी फोटो काढायला बोलवले होते. यावर अमित एक मोठा श्वास घेऊन म्हणतो कि हा तर माझा लहानपणीचा क्लासमेट आहे.
अभिप्राय