एकतर्फी प्रेमाची कारणमीमांसा भाग २, मराठी प्रेम कथा - [Ektarphi Premachi Karanmimansa Part 2, Marathi Prem Katha] मोहीत, वैष्णवी व अमित या तीन कॉलेज तरूणांच्या आयुष्याची प्रेम या अडीज अक्षरासोबत सांगड घालणारी एक अपूर्ण प्रेमकथा.
मोहीत, वैष्णवी व अमित या तीन कॉलेज तरूणांच्या आयुष्याची प्रेम या अडीज अक्षरासोबत सांगड घालणारी एक अपूर्ण प्रेमकथा
सायंकाळी ६ वाजता वैष्णवी तिच्या रूमबाहेच्या गॅलरीत कॉफी पीत उभी असते. ब्लॅक कलरची नाईट पॅंट व ब्ल्यू कलरच्या टी शर्ट मध्ये ती खूप सुंदर दिसत असते. तिच्या डोक्यात एकच प्रश्न येत असतो कि स्नेहसंमेलनात कोणते गाणे म्हणायचे. इतक्यात तिला खाली उभे असलेले तेजस, निकिता व श्री ही मुले दिसतात. त्यांना पाहून तिला आठवते कि आपण यांना कविता म्हणून दाखवायचे प्रॉमिस केले होते. ती तडक त्यांना आपल्या रूममध्ये बोलावून घेते. ते तिघे तिच्या रूममध्ये येतात. त्यांना खूप आनंद झालेला असतो. निकिता वैष्णवीच्या हातात कवितेचे पान देते. ती एक इंग्रजी भाषेतील टेंशन फ्री फिल करणारी कविता असते. वैष्णवी आपल्या गोड मधुर आवाजात ती कविता म्हणू लागते. ते तिघेही मंत्रमुग्ध होऊन ती कविता ऐकत असतात. कविता ऐकून दाखविल्याबद्दल ते तिघेही वैष्णवीला एक गोड गिफ्ट देतात. ती कविता म्हणत असताना वैष्णवीला आपणही एखादे असेच टेंशन फ्री व रिलॅक्स गाणं म्हणायचं ही कल्पना सुचते, तशी ती लगेच इंटरनेटवर गाणी शोधायला बसते.एक दहाबारा गाणी ऐकल्यावर तिला “स्पायडर मॅन २” या इंग्रजी चित्रपटातील “Raindrops keep falling on my head” हे गाणं फार आवडते व ती या गाण्याचा सराव करू लागते. इकडे अमित वैष्णवीवर एक फिशपॉंड टाकायच्या तयारीत असतो. कारण ती त्याच्या आयुष्यात आलेली पहिली मैत्रीण असते. पण या मैत्रीच्या नात्यात एक वेगळा ट्रॅंगल आलेला असतो आणि याची जाणीव त्याला झालेली असते. वैष्णवीने सिलेक्ट केलेले गाणे ती प्रथम घरी ऐकवून दाखविते. तिला घरच्यांकडून उत्तम प्रतिसाद मिळतो. नंतर ती हे गाणे आपल्या मैत्रिणींना ऐकवून दाखविते. त्या ही तिला उत्तम प्रतिसाद देतात. कॉलेजमध्ये रंगीत तालीम सुरू होते. वैष्णवीने सिलेक्ट केलेले गाणे भंडारे मॕडम व इतर शिक्षकांना खूप आवडते. गाणे ऐकल्यावर भंडारे मॅडम वैष्णवीचे सिलेक्शन करतात.
[next] अठरा तारीख - फिशपॉंडचा दिवस उजाडतो. कॉलेजमध्ये सर्वांची एकच लगबग सुरू असते. सकाळी दहा वाजता कार्यक्रम सुरू होतो. व्यासपीठावर सर्व शिक्षक आलेले असतात. भंडारे मॅडम मनोगत व्यक्त करतात आणि विद्यार्थ्यांना सांगतात कि, “हा फिशपॉंडचा कार्यक्रम मनोरंजनासाठी आहे. विद्यार्थ्यांनी केवळ करमणूक म्हणून या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा.” कार्यक्रमाला सुरूवात होते. सर्व विद्यार्थ्यांनी एकमेकांवर फिशपॉंड्स टाकलेले असतात. कोणी कॉलेजमध्ये बॉलीवूड निर्माण करतो तर कोणी क्रिकेट टिम. एकमेकांच्या स्वभावावर, दिसण्यावर उपहासात्मक टिका केलेली असते. नीलम आणि कविता या दोघींनी वैष्णवीच्या गोड गळ्यावर सुंदर फिशपॉंड टाकलेला असतो. अमित आपल्या फिशपॉंडची आतुरतेने वाट पाहत असतो. त्याचे लक्ष सतत वैष्णवी व त्याच्या फिशपॉंडवर असते. वैष्णवीने आज छान पिवळ्या कलरचा पंजाबी ड्रेस घातलेला असतो व मोकळे केस सोडून त्याला गोल क्लिप लावलेली असते. फिशपाँडचा कार्यक्रम संपत आलेला असतो. पाटील सर शेवटचा फिशपॉंड वाचू लागतात. तो अमितचा फिशपॉंड असतो. “हा फिशपाँड बहुधा एका मित्राने आपल्या मैत्रीणीसाठी लिहिला आहे.” unknown फिशपॉंड आहे. अमितच्या चेहऱ्यावर हसू खुलते. तो वैष्णवीकडे एक कटाक्ष टाकतो. पाटील सर फिशपाँड वाचू लागतात.
“तू माझ्या आयुष्यात आलीस आणि माझं
सारं आयुष्यचं बदलून गेले. भकास अशा
वाळवंटात कोवळे फूल उमलू लागले.
आपले नाते निखळ मैत्रीचे त्याला वासनेची
जोड नाही. तुझ्या माझ्या मैत्रीला
कोणत्याही formalities ची गरज नाही.
- तुझा प्रिय मित्र.
[next] सर्वजण टाळ्या वाजवू लागतात. वैष्णवीही हसत टाळ्या वाजवते. तिला हा फिशपॉंड खूप आवडलेला असतो. भंडारे मॅडम व्यासपीठावर येऊन उद्या होणाऱ्या रेकॉर्ड डान्स व गीत गायनाच्या कार्यक्रमाची माहिती देतात व फिशपॉंडचा कार्यक्रम संपन्न झाला हे जाहीर करतात. तो शेवटचा फिशपॉंड कोणी टाकला असेल गं? आणि कोणावर? किती छान होता ना. असे नीलम कविता व वैष्णवीला विचारते. बहुधा हा कोणीतरी आपल्या कॉलेजचा सायलेंट रोमियो दिसतोय. कविता या गोष्टीवर आपले मत व्यक्त करते. हो ना वैष्णवी? वैष्णवीचे मन अजून त्या फिशपॉंडमध्येच गुंतलेले असते. त्या दोघीही तिला पाहात असतात. नीलम तिच्या खांद्यावर हात ठेवते तशी ती भानावर येते. हां काय? अग तो शेवटचा फिशपॉंड, कविता तिला सांगते. हो छान होता तो. मला फार आवडला. आम्हांला तरी वाटतंय कि कॉलेजाचा कोणीतरी सायलेंट रोमियो असणार. त्या दोघी एकदम तिला म्हणतात. असेल बहुधा, बरं मी निघते. मला उद्याची प्रॅक्टिस करायची आहे असे म्हणून वैष्णवी त्या दोघींचा निरोप घेते व घरी जायला निघते. त्या तिघींचे बोलणे अमितच्या कानावर येते तसा तो गालातल्या गालात हसतो.
वीस तारीख - स्नेहसंमेलनाचा प्रमुख दिवस सुरू होतो. नऊ वाजल्यापासून कॉलेजमध्ये मुलामुलींची गर्दी वाढू लागते. प्रत्येक पार्टीसिपेटर आपल्या मेकअप रूममध्ये व्यस्त असतो. मोहित गोडबोले ज्याला भंडारे मॅडमनी स्टेजवरील प्रत्येक पार्टीसिपेटरचे फोटो काढायला बोलावले असते, त्याचा कॅमेरा प्रत्येक विद्यार्थ्यावर फिरत असतो. अमित आपले स्वयंसेवकाचे काम चोख करत असतो. स्टेजवर शिक्षक, मान्यवर येतात. सर्वजण थोडक्यात मनोगत व्यक्त करतात. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कॉलेजची लेडी GS मनिषा कुमठेकर करीत असते. सुरूवात आर्ट्स विभागातील विद्यार्थ्यांच्या भयनाट्याने होते. प्रत्येक विद्यार्थी आपली कलाकृती अगदी उत्तमरीत्या सादर करत असतो. मोहित सर्वांची पोज आपल्या कॅमेरात कैद करत असतो. वैष्णवी आपल्या मेकअप रूममध्ये असते. तिचा मेकअप नीलम आणि कविता या दोघी करत असतात. एका रेकॉर्ड डान्सनंतर तिच्या गाण्याचा परफॉर्मंस असतो. स्टेजवर वैष्णवीचे नाव पुकारण्यात येते. तिचा मेकअप पूर्ण झालेला असतो. नाव पुकारताच ती मेकअपरूमधून स्टेजकडे जायला लागते.
[next] आज तिची वेशभूषा खूपच सुंदर असते. कमरेपासून ते पायाच्या तळव्यापर्यंत पूर्ण ब्लॅक कलरची लेगीन्स पॅंट त्यावर चमकत असलेला ब्लॅक स्कर्ट व त्या स्कर्टवर चॉकलेटी कलरचा कोट. केशरचना केसांचा अर्धचंद्राकार बट [फुगा] व एकफूट वेणी. तिच्या उंच हाईटला हि संपूर्ण वेशभूषा एकदम शोभून दिसत असते. ती स्टेजवर येते. सर्व विद्यार्थी शांत बसतात. ती आपल्या नाजूक हातात माईक धरते. सर्वप्रथम मोहितचा कॅमेरा तिच्यावर फोकस धरतो. नंतर मोहित कॅमेरा बाजूला सारून आपल्या डोळ्यांनी वैष्णवीचे नखशिकांत सौंदर्य न्याहाळू लागतो. काही सेकंद हाच प्रकार तिथे सुरू असतो. अचानक मोहित कॅमेराचा फ्लॅश तिच्या चेहऱ्यावर पाडतो. त्या प्रकाशझोतामुळे तिचे पाणीदार डोळे उघडझाप पावतात. मग ती हलकसं स्माईल करून आपण जे गाणं म्हणणार आहोत त्याचा थोडक्यात अर्थ सांगायला लागते. मित्रांनो मी आज एक असे गाणं म्हणणार आहे जे तुम्हाला टेंशन फ्री आयुष्य कसं जगायचं हे सांगेल. गाण्याचे बोल इंग्रजी भाषेतील आहेत. कृपया समजून घ्या.” अशी ती उपस्थित सर्वांना विनंती करते व तिच्या गोड मधुर आवाजात तिने सिलेक्ट केलेले स्पायडर मॅन २ या इंग्रजी चित्रपटातील “Raindrops keep falling on my head” गाणं म्हणायला सुरूवात करते.
एका स्टुलावर बसून कॉलेजची सर्वात सुंदर मुलगी गोड आवाजात गाणं म्हणत आहे, याचा कॉलेजच्या सर्व मुलींना हेवा वाटत असतो. ती ज्या पद्धतीने गाण्यातील इंग्रजी उच्चार म्हणत असते, त्या पोझिशन मध्ये ती खूप स्मार्ट, सुंदर व कॉन्फिडन्ट दिसत असते. मोहित तिची प्रत्येक स्माईल, पोझ कॅमेरात कैद करत असतो. अमित एक साईडला उभा राहून एकसारखे तिच्याकडे पाहत असतो. ते दोघेही तिचे आरसपानी सौंदर्य आपल्या डोळ्यात साठवत असतात. त्या दोघांच्याही मनात तिच्याबद्दल प्रेमाची भावना तयार होते. सर्वप्रथम मोहित आपल्या भावना व्यक्त करतो. ‘ही मुलगी किती सुंदर आहे आणि तितकाच सुंदर आवाज देखील आहे हिचा. ही जर आपली “गर्लफ्रेंड” झाली तर काय मजा येईल.’ हे बोलत असताना त्याची नजर वैष्णवीच्या संपूर्ण चेहऱ्यावर फिरत असते. तशीच ती नजर तिच्या ओठांवर येते. तो सर्वप्रथम तिचे ओठ आपल्या कॅमेरात कैद करतो. वा! काय सुंदर ओठ आहेत या मुलीचे या ओठांवर फक्त माझाच हक्क आहे. हिच्या गोड ओठांचे चुंबन घेऊन मला हिला कायमची आपली करायची आहे. नाव पण किती सेक्सी आहे. ‘वैष्णवी...!’ आता अमित आपली प्रेमाची भावना व्यक्त करतो. ‘मी खूप लकी आहे कि कॉलेजची सर्वात सुंदर मुलगी माझी मैत्रीण आहे आणि या मैत्रीणीला माझी “सहचारीणी” बनवून तिच्यासोबत माझं संपूर्ण आयुष्य व्यतीत करायला मला फार आवडेल. वैष्णवी, I love you. अंह फक्त तुझ्या शरीरावर नाही तर मनावर देखील माझं खूप प्रेम आहे.
अशाप्रकारे दोघांनीही वैष्णवीबद्दलची प्रेमाची भावना व्यक्त केली आहे. मोहितच्या भावनेत अश्लीलता आहे. तर अमितच्या भावनेत सात्विकता आहे. आता वैष्णवी मोहितची गर्लफ्रेंड होते कि अमितची सहचारीणी बनून राहते कि याचा शेवट काही वेगळाच होतो हे पाहूयात पुढच्या भागात.
अभिप्राय