४ डिसेंबरचा इतिहास - इतिहासातील जागतिक दिवस, दिनविशेष, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवसांची संदर्भासहित माहिती देणारा दिनांक ४ डिसेंबरचा इतिहास.
जागतिक दिवस, दिनविशेष, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवस तसेच प्रसिद्ध, मनोरंजक आणि उल्लेखनीय घटना घडलेला दिनांक ४ डिसेंबरचा इतिहास पहा.
जनार्दन दत्तात्रेय गोंधळेकर - (२१ एप्रिल १९०९ - ४ डिसेंबर १९८१) चित्रकार, कलासमीक्षक, भारतीय व पाश्चिमात्य कलाविषयक वाचन असणारे अभ्यासक आणि उत्तम व्याख्याते.
शेवटचा बदल ३ डिसेंबर २०२३
जागतिक दिवस / दिनविशेष
४ डिसेंबर रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस- -
४ डिसेंबरचा इतिहास (ठळक घटना / घडामोडी)
४ डिसेंबरचा इतिहास, ठळक घटना आणि घडामोडी- ७७१: कार्लोमानचा मृत्यू. शार्लमेन फ्रॅंकिश सम्राटपदी.
- १७९१: द ऑब्जर्व्हर हे जगातील पहिले रविवार वृत्तपत्र प्रकाशित झाले.
- १८८१: लॉस ऍन्जेलिस टाइम्स वृत्तपत्राचा पहिला अंक प्रकाशित झाला.
- १९२४: गेट वे ऑफ इंडिया या वास्तूचे व्हाईसराय लॉर्ड रीडिंग यांच्या हस्ते उद्घाटन.
- १९४८: भारतीय लष्कराचे सरसेनापती म्हणून जनरल करिअप्पा यांची नेमणूक झाली.
- १९६७: थुंबा येथील तळावरुन रोहिणी या पहिल्या भारतीय अग्निबाणाचे यशस्वी उड्डाण.
- १९७५: सुरीनामचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.
- १९९१: पॅन अॅम या अमेरिकन विमानकंपनीने दिवाळखोरी जाहीर केली.
- १९९३: उस्ताद झिया फरिदुद्दीन डागर आणि पंडित एस. सी. आर. भट यांना मध्यप्रदेश सरकारचा तानसेन सन्मान जाहीर.
- १९९७: संगीत दिग्दर्शक कल्याणजी-आनंदजी यांना मध्यप्रदेश सरकारचा लता मंगेशकर पुरस्कार प्रदान.
- १८२९: भारतीयांचा कट्टर विरोध असूनही लॉर्ड बेंटिंकने जाहीनामा काढून सतीच्या प्रथेला मदत करणार्यांना खूनी ठरवले जाईल असा कायदा केला.
- १८७२: ब्रिटीश आरमारी नौकेला मेरी सेलेस्त हे अमेरिकन जहाज समुद्रात प्रवासी किंवा खलाशांशिवाय तरंगत असलेले आढळले.
- १९१८: पहिले महायुद्ध - अमेरिकन राष्ट्राध्यक्ष वूड्रो विल्सन व्हर्सायच्या तहासाठी फ्रांसला जाण्यास रवाना. राष्ट्राध्यक्ष असताना युरोपला भेट देणारा विल्सन पहिलाच अमेरिकन राष्ट्राध्यक्ष होता.
- १९४३: दुसरे महायुद्ध - युगोस्लाव्हियाने परागंदा सरकार स्थापन केले.
- १९५२: लंडनवर थंड धुके पसरले. पुढील काही आठवड्यांत या धुक्या व प्रदूषणामुळे १२,००० पेक्षा अधिक मृत्यू.
- १९५४: मायामी, फ्लोरिडा येथे पहिले बर्गर किंग सुरू झाले.
- १९५८: डाहोमी (आताचे बेनिन)ला फ्रांसच्या आधिपत्याखाली स्वायत्तता.
- १९७१: भारत-पाकिस्तान तिसरे युद्ध - भारत आणि पाकिस्तानमधील परिस्थिती चिघळत असल्याचे पाहून संयुक्त राष्ट्रांनी आणीबाणीची बैठक बोलवली.
- १९७१: भारत-पाकिस्तान तिसरे युद्ध - ऑपरेशन ट्रायडेंट - भारतीय आरमाराने कराचीवर हल्ला केला.
- १९७१: अल्स्टर व्हॉलंटीयर फोर्सने लावलेल्या बॉम्बच्या स्फोटात बेलफास्टमध्ये १५ ठार, १७ जखमी.
- १९७७: मलेशिया एरलाइन्स फ्लाइट ६५३ या विमानाचे अपहरण. नंतर तांजोंग कुपांग येथे विमान कोसळून १०० ठार.
- १९८४: चीनने नवीन संविधान अंगिकारले.
- १९८४: हिझबोल्लाहने कुवैत एरलाइन्सच्या विमानाचे अपहरण केले व चार प्रवाशांना ठार मारले.
- १९९१: ओलिस धरलेल्या अमेरिकन पत्रकार टेरी ॲंडरसनची बैरुतमध्ये सात वर्षांनी सुटका.
- २००८: कॅनडाची संसद बरखास्त.
जन्म (वाढदिवस, जयंती)
४ डिसेंबर रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे- १८३५: सॅम्युअल बटलर (इंग्लिश लेखक, मृत्यू: १८ जून १९०२).
- १८५२: ओरेस्ट ख्वोल्सन (रशियन भौतिकशास्त्रज्ञ, मृत्यू: ११ मे १९३४).
- १८६१: हंगेस हफस्टाइन (आइसलँड देशाचे पहिले पंतप्रधान, मृत्यू: १३ डिसेंबर १९२२).
- १८९२: फ्रान्सिस्को फ्रँको (स्पेनचा हुकुमशहा, मृत्यू: २० नोव्हेंबर १९७५).
- १९१०: आर. व्यंकटरमण (भारताचे माजी राष्ट्रपती, मृत्यू: २७ जानेवारी २००९).
- १९१०: मोतीलाल राजवंश ऊर्फ मोतीलाल (भारतीय अभिनेते, मृत्यू: १७ जून १९६५).
- १९१६: बळवंत गार्गी (पंजाबी नाटककार, दिग्दर्शक, कादंबरीकार व लघुकथाकार, पंजाब विद्यापीठातील भारतीय रंगभूमी विभागाचे प्रमुख, मृत्यू: २२ एप्रिल २००३).
- १९१९: इंद्रकुमार गुजराल (भारताचे माजी पंतप्रधान, मृत्यू: २९ नोव्हेंबर २०१२).
- १९३२: रोह तै-वू (दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष, मृत्यू: २६ ऑक्टोबर २०२१).
- १९३५: शंकर काशिनाथ बोडस (पंडित विष्णू दिगंबर पलुसकर यांच्या परंपरेतील गायक, मृत्यू: २० जुलै १९९५).
- १९४३: फ्रान्सिस दिब्रिटो (मराठी लेखक कॅथोलिक ख्रिस्ती फादर).
- १९७७: अजित आगरकर (भारतीय क्रिकेटर).
मृत्यू (पुण्यतिथी, स्मृती दिवस, बलिदान दिवस, शहीद दिवस)
४ डिसेंबर रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे- १८५०: विल्यम स्टर्जन (विद्युत मोटरचे शोधक, जन्म: २२ मे १७८३).
- १९०२: चार्ल्स डो (डो जोन्स एंड कंपनी चे सहसंस्थापक, जन्म: ६ नोव्हेंबर १८५१).
- ११३१: ओमर खय्याम (पर्शियन तत्त्वज्ञ, गणितज्ञ, खगोलशास्त्रज्ञ आणि कवी, जन्म: १८ मे १०४८).
- १९७३: गिरीश / शंकर केशव कानेटकर (कवी, जन्म: २८ ऑक्टोबर १८९३).
- १९७५: हाना आरेंट (जर्मन तत्त्वज्ञ आणि लेखक, जन्म: १४ ऑक्टोबर १९०६).
- १९८१: ज. द. गोंधळेकर / जनार्दन दत्तात्रेय गोंधळेकर (मराठी चित्रकार, कलासमीक्षक, जन्म: २१ एप्रिल १९०९).
- २०००: हेन्क अर्रोन (सुरिनाम प्रजासत्ताकचे पहिले पंतप्रधान, जन्म: २५ एप्रिल १९३६).
- २०१४: व्ही. आर. कृष्ण अय्यर (भारतीय वकील आणि न्यायाधीश, जन्म: १५ नोव्हेंबर १९१५).
४ डिसेंबरचा इतिहास संबंधी महत्त्वाचे दुवे:
डिसेंबर महिन्याचा इतिहास | ||||||
---|---|---|---|---|---|---|
१ | २ | ३ | ४ | ५ | ६ | ७ |
८ | ९ | १० | ११ | १२ | १३ | १४ |
१५ | १६ | १७ | १८ | १९ | २० | २१ |
२२ | २३ | २४ | २५ | २६ | २७ | २८ |
२९ | ३० | ३१ | ||||
तारखेप्रमाणे डिसेंबर महिन्यातील सर्व इतिहास पहा. |
- [col]
- [col]
- - मराठी व्यंगचित्र
- - विचारधन
- - मराठी शब्द
- ... आज
सर्व विभाग / सेवा सुविधा / मराठी दिनदर्शिका / इतिहासात आज / डिसेंबर महिन्याचा इतिहास
विभाग -
जानेवारी महिन्याचा इतिहास · फेब्रुवारी महिन्याचा इतिहास · मार्च महिन्याचा इतिहास · एप्रिल महिन्याचा इतिहास · मे महिन्याचा इतिहास · जून महिन्याचा इतिहास · जुलै महिन्याचा इतिहास · ऑगस्ट महिन्याचा इतिहास · सप्टेंबर महिन्याचा इतिहास · ऑक्टोबर महिन्याचा इतिहास · नोव्हेंबर महिन्याचा इतिहास · डिसेंबर महिन्याचा इतिहास
विषय -
जानेवारी · फेब्रुवारी · मार्च · एप्रिल · मे · जून · जुलै · ऑगस्ट · सप्टेंबर · ऑक्टोबर · नोव्हेंबर · डिसेंबर
अभिप्राय