७ सप्टेंबर दिनविशेष - [7 September in History] दिनांक ७ सप्टेंबर च्या ठळक घटना/घडामोडी, जन्म/वाढदिवस, मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन आणि जागतिक दिवस यांची माहिती.
इतिहासातील जागतिक दिवस, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवसांची संदर्भासहित माहिती देणारे दिनांक ७ सप्टेंबर चे दिनविशेष
इला रमेश भट - (७ सप्टेंबर १९३३) भारतातील असंघटित महिला कामगारांच्यासाठी काम करणाऱ्या एक सामाजिक कार्यकर्त्या. स्वयंरोजगार करणाऱ्या महिला कामगारांना संघटित करून त्यांचे जीवनमान उंचावण्याचे कार्य इला भट यांनी केले आहे.
शेवटचा बदल ३ सप्टेंबर २०२१
जागतिक दिवस
७ सप्टेंबर रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस
- स्वातंत्र्य दिन: ब्राझिल.
- विजय दिन: मोझाम्बिक.
ठळक घटना / घडामोडी
५ सप्टेंबर रोजी घडलेल्या ठळक घटना आणि घडामोडी
- ११९१: तिसरी क्रुसेड- इंग्लंडचा राजा रिचर्ड पहिल्याने सलाद्दिनला हरवले.
- १६७९: सिद्दी जौहर आणि इंग्रजांचा मारा रोखत मराठ्यांनी खांदेरी किल्ल्याभोवती एक मीटर उंचीचा तट उभारून पूर्ण केला.
- १८१४: दुसर्या बाजीरावाने पांडुरंग कोल्हटकराच्या साहाय्याने उंदेरी-खांदेरी किल्ल्यांचा ताबा परत मिळवला.
- १८२१: ग्रान कोलंबियाच्या प्रजासत्ताकची स्थापना.
- १९०६: बँक ऑफ इंडिया ची स्थापना झाली. ही भारतात स्थापन झालेली पहिली स्वदेशी व्यापारी बँक आहे.
- १९२३: इंटरनॅशनल क्रिमिनल पोलीस ऑर्गनायझेशन (इंटरपोल) ची स्थापना झाली.
- १९२९: फिनलंडमध्ये जहाज बुडून १३६ मृत्युमुखी.
- १९३१: दुसर्या गोलमेज परिषदेची सुरूवात झाली.
- १९४०: दुसरे महायुद्ध - ब्लिट्झ - जर्मनीने लंडनवर बॉम्बफेक सुरू केली. यानंतर ५६ अजून रात्री सतत बॉम्बवर्षा होत राहिली.
- १९४३: ह्युस्टनमध्ये हॉटेलला आग लागून ५५ ठार.
- १९४३: दुसरे महायुद्ध- जर्मनीची पूर्व आघाडीवरुन पीछेहाट सुरू झाली.
- १९४५: दुसरे महायुद्ध - जपानच्या सैन्याने ने वेक द्वीपावर आत्मसमर्पण केले.
- १९५३: निकिता ख्रुश्चेव सोवियेत संघाच्या सर्वेसर्वापदी.
- १९७८: मधुमेह नियंत्रित करण्यासाठी उपयोगी पडणारे इन्सुलिन प्रथमच जनुक अभियांत्रिकी पद्धतीने तयार करण्यात यश.
- १९७९: क्रायस्लर कॉर्पोरेशनने दिवाळे न काढण्याबद्दल अमेरिकेच्या सरकारकडे एक अब्ज डॉलरची मागणी केली.
- १९९८: लॅरी पेज आणि सर्गेई ब्रिनने गूगलची स्थापना केली.
- १९९९: अथेन्समध्ये रिश्टर मापनपद्धतीनुसार ५.९ तीव्रतेचा भूकंप. १४३ ठार, ५०० जखमी.
- २००४: हरिकेन आयव्हन हे ५व्या प्रतीचे चक्रीवादळ ग्रेनडावर आले. ३९ ठार. ग्रेनडातील ९०% इमारतींना नुकसान.
- २००५: इजिप्तमध्ये पहिल्या राष्ट्राध्यक्षीय निवडणुका.
जन्म / वाढदिवस / जयंती
७ सप्टेंबर रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
- १५३३: एलिझाबेथ पहिल्या (इंग्लंडच्या राणी, मृत्यु: २४ मार्च १६०३).
- १७९१: उमाजी नाईक (आद्द क्रांतिकारक स्वातंत्र्य सैनिक, मृत्यू: ३ फेब्रुवारी १८३२).
- १८०७: हेन्री सिवेल (न्यूझीलंड देशाचे पहिले पंतप्रधान, मृत्यू: १४ मे १८७९).
- १८२२: रामकृष्ण विठ्ठल तथा भाऊ दाजी लाड (प्राच्यविद्या पंडित, समाजसेवक आणि धन्वतंरी, मृत्यू: ३१ मे १८७४).
- १८३६: हेन्री कॅम्पबेल-बॅनरमन (युनायटेड किंग्डमचे पंतप्रधान, मृत्यु: २२ एप्रिल, १९०८).
- १८४९: बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर (हिंदुस्तानी शास्त्रीय गायक, मृत्यू: ८ फेब्रुवारी १९२७).
- १८५७: जॉन मॅकइलरेथ (ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू, मृत्यु: ५ जुलै १९३८).
- १८९४: व्हिक रिचर्डसन (ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू, मृत्यु: ३० ऑक्टोबर १९६९).
- १९१२: डेव्हिड पॅकार्ड (ह्युलेट पॅकार्ड कंपनीचे एक संस्थापक, मृत्यू: २६ मार्च १९९६).
- १९१५: डॉ. महेश्वर नियोग (प्रख्यात आसामी साहित्यिक आणि इतिहासकार, पद्मश्री, मृत्यू: १३ सप्टेंबर १९९५).
- १९२५: भानुमती रामकृष्ण (तामिळ व तेलगू चित्रपटांतील अभिनेत्री, मृत्यू: २४ डिसेंबर २००५).
- १९३३: इला भट्ट (असंघटित महिला कामगारांच्यासाठी काम करणाऱ्या एक सामाजिक कार्यकर्त्या).
- १९३४: सुनील गंगोपाध्याय (बंगाली कवी व कादंबरीकार, मृत्यू: २३ ऑक्टोबर २०१२).
- १९३४: बी. आर. इशारा (चित्रपट दिग्दर्शक आणि पटकथालेखक, मृत्यू: २५ जुलै २०१२).
- १९३६: बडी हॉली (अमेरिकन गायक, संगीतकार, मृत्यु: ३ फेब्रुवारी १९५९).
- १९४०: चंद्रकांत खोत (लेखक व संपादक, मृत्यु: १० डिसेंबर २०१४).
- १९५५: अझहर खान (पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू).
- १९६४: नुरुल आबेदिन (बांगलादेशी क्रिकेट खेळाडू).
- १९६७: स्टीव जेम्स (इंग्लिश क्रिकेट खेळाडू).
- १९६७: आलोक शर्मा (भारतीय-इंग्लिश अकाउंटंट आणि राजकारणी).
- १९८४: फरवीझ महरूफ (श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू).
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृती दिवस
७ सप्टेंबर रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
- १३१२: फर्डिनांड चौथे (कॅस्टिलचे राजे, जन्म: ६ डिसेंबर १३१२).
- १६०१: जॉन शेक्सपियर (विल्यम शेक्सपियर यांचे वडील, जन्म: १५३१).
- १८०९: बुद्ध योद्फा चुलालोक (थायलंडचे राजे, जन्म: २० मार्च १७३७).
- १९५३: भगवान रघुनाथ कुळकर्णी (मराठी कवी, लेखक, जन्म: १५ ऑगस्ट १९१३).
- १९७९: जे. जी. नवले (कसोटी क्रिकेट संघाचे पहिले यष्टिरक्षक, जन्म: ७ डिसेंबर १९०२).
- १९९१: रवि नारायण रेड्डी (कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे सहसंस्थापक, जन्म: ५ जून १९०८).
- १९९४: टेरेन्स यंग (इंग्लिश दिग्दर्शक आणि पटकथाकार, जन्म: २० जून १९१५).
- १९९७: मुकूल आनंद (हिंदी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक, जन्म: ११ ऑक्टोबर १९५१).
- १९९७: मोबुटु सेसे सेको (झैरचे हुकुमशहा, जन्म: १४ ऑक्टोबर १९३०).
७ सप्टेंबरचा इतिहास संबंधी महत्त्वाचे दुवे:
सप्टेंबर महिन्याचा इतिहास | ||||||
---|---|---|---|---|---|---|
१ | २ | ३ | ४ | ५ | ६ | ७ |
८ | ९ | १० | ११ | १२ | १३ | १४ |
१५ | १६ | १७ | १८ | १९ | २० | २१ |
२२ | २३ | २४ | २५ | २६ | २७ | २८ |
२९ | ३० | |||||
तारखेप्रमाणे सप्टेंबर महिन्यातील सर्व इतिहास पहा. |
- [col]
- [col]
- - मराठी व्यंगचित्र
- - विचारधन
- - मराठी शब्द
- ... आज
सर्व विभाग / सेवा सुविधा / मराठी दिनदर्शिका / इतिहासात आज / सप्टेंबर महिन्याचा इतिहास
विभाग -
जानेवारी महिन्याचा इतिहास · फेब्रुवारी महिन्याचा इतिहास · मार्च महिन्याचा इतिहास · एप्रिल महिन्याचा इतिहास · मे महिन्याचा इतिहास · जून महिन्याचा इतिहास · जुलै महिन्याचा इतिहास · ऑगस्ट महिन्याचा इतिहास · सप्टेंबर महिन्याचा इतिहास · ऑक्टोबर महिन्याचा इतिहास · नोव्हेंबर महिन्याचा इतिहास · डिसेंबर महिन्याचा इतिहास
विषय -
जानेवारी · फेब्रुवारी · मार्च · एप्रिल · मे · जून · जुलै · ऑगस्ट · सप्टेंबर · ऑक्टोबर · नोव्हेंबर · डिसेंबर
अभिप्राय