५ सप्टेंबर दिनविशेष - [5 September in History] दिनांक ५ सप्टेंबर च्या ठळक घटना/घडामोडी, जन्म/वाढदिवस, मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन आणि जागतिक दिवस यांची माहिती.
इतिहासातील जागतिक दिवस, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवसांची संदर्भासहित माहिती देणारे दिनांक ५ सप्टेंबर चे दिनविशेष
सर्वेपल्ली राधाकृष्णन - (५ सप्टेंबर १८८८ - १७ एप्रिल १९७५) भारताचे दुसरे राष्ट्रपती व नामांकित शिक्षणतज्ज्ञ. डॉ सर्वेपल्ली राधाकृष्णन भारताचे भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दुसरे राष्ट्रपती होते.
शेवटचा बदल ५ सप्टेंबर २०२१
जागतिक दिवस
५ सप्टेंबर रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस
- शिक्षक दिन: भारत.
ठळक घटना / घडामोडी
५ सप्टेंबर रोजी घडलेल्या ठळक घटना आणि घडामोडी
- १९०५: रशिया-जपान युद्ध-अमेरिकन राष्ट्राध्यक्ष थियोडोर रूझवेल्टच्या मध्यस्थीने न्यू हॅम्पशायर राज्यात जेता जपान व रशियात संधी.
- १९१४: पहिले महायुद्ध-पॅरिसवर चाल करून आलेल्या जर्मन सैन्याला फ्रेंच सैन्याने मागे रेटले.
- १९१५: झिमरवाल्ड परिषद सुरू.
- १९३२: बर्किना फासोच्या वसाहतीचे आयव्हरी कोस्ट, माली व नायजर या राष्ट्रांत विभाजन.
- १९३७: स्पॅनिश गृहयुद्ध-लेन्स शहर फ्रँकोच्या ताब्यात.
- १९३९: दुसरे महायुद्ध-अमेरिकेने आपण तटस्थ असल्याचे जाहीर केले.
- १९४१: इस्टोनिया हा प्रांत नाझी जर्मनीने ताब्यात घेतला.
- १९४२: दुसरे महायुद्ध-मिल्ने बेची लढाई-जपानच्या आरमाराने माघार घेतली.
- १९४४: दुसरे महायुद्ध-बेल्जियम, नेदरलँड्स व लक्झेंबर्ग मिळून बेनेलक्स तयार झाले.
- १९६०: रोम मधील ऑलिम्पिक खेळांमध्ये लाईट हेवीवेट बॉक्सिंग स्पर्धेत मोहम्मद अली यांनी सुवर्ण पदक जिंकले.
- १९६१: अलिप्त राष्ट्रांची पहिली परिषद बेलग्रेड येथे सुरू.
- १९६७: ह. वि. पाटसकर पुणे विद्यापीठाचे ७वे कुलगुरू झाले.
- १९७०: इटालियन ग्रांप्रीच्या प्रॅक्टिसमध्ये मारल्याच्या घटनेनंतर मरणोत्तर फॉर्मूला वन वर्ल्ड ड्रायव्हर्स चॅम्पियनशिप जिंकणारे जोकेन रांड हे एकमेव ड्रायव्हर ठरले.
- १९७२: ब्लॅक सप्टेंबर नावाने वावरणार्या पॅलेस्टाईनच्या अतिरेक्यांनी म्युनिक हत्याकांड-म्युनिकमधील ऑलिंपिक खेळात भाग घेणाऱ्या इस्रायेलच्या खेळाडूंना ओलिस ठेवले.
- १९७५: कॅलिफोर्नियातील साक्रामेंटो शहरात अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जेराल्ड फोर्डवर असफल खूनी हल्ला.
- १९७७: व्हॉयेजर १ या अंतराळयानाचे प्रक्षेपण.
- १९८०: स्वित्झर्लंडमधील सेंट गॉट्टहार्ड बोगदा खुला.
- १९८४: एस.टी.एस. ४१-डी-स्पेस शटल डिस्कव्हरीने आपली पहिली अंतराळयात्रा पूर्ण केली.
- १९८६: कराची आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पॅन ऍम फ्लाइट ०७३चे अपहरण.
- २०००: ऋषिकेश मुखर्जी यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर.
- २००५: मंडाला एरलाइन्स फ्लाइट ०९१ हे बोईंग ७३७-२०० प्रकारचे विमान इंडोनेशियातील सुमात्रा बेटावरील दाट वस्तीच्या भागात कोसळले. विमानातील १०४ व जमीनीवरील ३९ व्यक्ती ठार.
जन्म / वाढदिवस / जयंती
५ सप्टेंबर रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
- ११८७: लुई आठवा (फ्रांसचे राजे, मृत्यू: ८ नोव्हेंबर १२२६).
- १६३८: लुई चौदावा (फ्रांसचे राजे, मृत्यू: १ सप्टेंबर १७१५).
- १८२६: जॉन विस्डन (ब्रिटीश क्रिकेट रसिक, प्रकाशक, मृत्यु: ५ एप्रिल १८८४).
- १८४७: जेसी जेम्स (अमेरिकन दरोडेखोर, मृत्यु: ३ एप्रिल १८८२).
- १८७२: व्ही. ओ. चिदंबरम पिल्लई (भारतीय वकील आणि राजकारणी, मृत्यू: १८ नोव्हेंबर १९३६).
- १८८८: सर्वेपल्ली राधाकृष्णन (भारताचे राष्ट्रपती, मृत्यु: १७ एप्रिल १९७५).
- १९०७: जयंत पांडुरंग तथा जे. पी. नाईक (शिक्षणतज्ञ, इंडियन इन्स्टिट्युट ऑफ एज्युकेशनचे संस्थापक, नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग चे संस्थापक, मृत्यू: १० ऑगस्ट १९८१).
- १९०९: आर्ची जॅक्सन (ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू, मृत्यु: १६ फेब्रुवारी १९३३).
- १९१०: फिरोझ पालिया (भारतीय क्रिकेट खेळाडू, मृत्यु: ९ सप्टेंबर १९८१).
- १९२०: लीलावती भागवत (बालसाहित्यिका, मृत्यू: २५ नोव्हेंबर २०१३).
- १९२८: दमयंती जोशी (सुप्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना, मृत्यू: १९ सप्टेंबर २००४).
- १९४०: राकेल वेल्च (अमेरिकन अभिनेत्री).
- १९४६: फ्रेडी मर्क्युरी (मूळ भारतीय वंशाचे ब्रिटीश गायक व संगीतकार, मृत्यु: २४ नोव्हेंबर १९९१).
- १९५४: रिचर्ड ऑस्टिन (वेस्ट इंडिजचे क्रिकेट खेळाडू, मृत्यु: ७ फेब्रुवारी २०१५).
- १९६९: मार्क रामप्रकाश (इंग्लिश क्रिकेट खेळाडू).
- १९७२: गाय व्हिटॉल (झिम्बाब्वेचा क्रिकेट खेळाडू).
- १९७४: रॉल लेविस (वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू).
- १९७८: सिल्व्हेस्टर जोसेफ (वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू).
- १९८६: प्रग्यान ओझा (भारतीय क्रिकेट खेळाडू).
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृती दिवस
५ सप्टेंबर रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
- १८७७: क्रेझी हॉर्स (अमेरिकेतील सू जमातीचे नेते, जन्म: १८४०).
- १९०६: लुडविग बोल्ट्झमन (ऑस्ट्रियन भौतिकशास्त्रज्ञ, जन्म: २० फेब्रुवारी १८४४).
- १९१८: सर रतनजी जमसेटजी टाटा (उद्योगपती, जन्म: २० जानेवारी १८७१).
- १८७६: मॅन्युएल ब्लॅनको एन्कालदा (चिली देशाचे पहिले राष्ट्रपती, जन्म: २१ एप्रिल १७९०).
- १९७८: रॉय किणीकर (कवी, संवादलेखक, नाटककार व पत्रकार, जन्म: १९०८).
- १९९१: शरद जोशी (हिंदी कवी, लेखक व उपहासकार, जन्म: २१ मे १९३१).
- १९९५: सलील चौधरी (हिंदी व बंगाली चित्रपट सृष्टीतील संगीतकार, जन्म: १९ नोव्हेंबर १९२२).
- १९९६: बॅसिल सालदवदोर डिसोझा (भारतीय बिशप, जन्म: २३ मे १९२६).
- १९९७: मदर तेरेसा (समाजसेविका, जन्म: २६ ऑगस्ट १९१०).
- २०००: पांडुरंग पुरुषोत्तम शिरोडकर (स्वातंत्र्यसैनिक, गोवा विधानसभेचे पहिले सभापती, जन्म: १२ डिसेंबर १९१६).
- २०००: रॉय फ्रेड्रिक्स (वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू, जन्म: ११ नोव्हेंबर १९४२).
- २०१५: आदेश श्रीवास्तव (भारतीय गायक-गीतकार, मृत्यू: ४ सप्टेंबर १९६४).
५ सप्टेंबरचा इतिहास संबंधी महत्त्वाचे दुवे:
सप्टेंबर महिन्याचा इतिहास | ||||||
---|---|---|---|---|---|---|
१ | २ | ३ | ४ | ५ | ६ | ७ |
८ | ९ | १० | ११ | १२ | १३ | १४ |
१५ | १६ | १७ | १८ | १९ | २० | २१ |
२२ | २३ | २४ | २५ | २६ | २७ | २८ |
२९ | ३० | |||||
तारखेप्रमाणे सप्टेंबर महिन्यातील सर्व इतिहास पहा. |
- [col]
- [col]
- - मराठी व्यंगचित्र
- - विचारधन
- - मराठी शब्द
- ... आज
सर्व विभाग / सेवा सुविधा / मराठी दिनदर्शिका / इतिहासात आज / सप्टेंबर महिन्याचा इतिहास
विभाग -
जानेवारी महिन्याचा इतिहास · फेब्रुवारी महिन्याचा इतिहास · मार्च महिन्याचा इतिहास · एप्रिल महिन्याचा इतिहास · मे महिन्याचा इतिहास · जून महिन्याचा इतिहास · जुलै महिन्याचा इतिहास · ऑगस्ट महिन्याचा इतिहास · सप्टेंबर महिन्याचा इतिहास · ऑक्टोबर महिन्याचा इतिहास · नोव्हेंबर महिन्याचा इतिहास · डिसेंबर महिन्याचा इतिहास
विषय -
जानेवारी · फेब्रुवारी · मार्च · एप्रिल · मे · जून · जुलै · ऑगस्ट · सप्टेंबर · ऑक्टोबर · नोव्हेंबर · डिसेंबर
अभिप्राय