Loading ...
/* Dont copy */

बायंगी मराठी भयकथा

बायंगी मराठी भयकथा - भरभराटीसाठी आणलेले बायंगी भुत मंदारला भरभरून देऊन गेले पण... यशाचा शॉर्टकट मंदारला कसा महागात पडला याची ही भयकथा.

बायंगी मराठी भयकथा

भरभराटीसाठी आणलेले बायंगी भुत मंदारला भरभरून देऊन गेले पण त्याच्या एका मागणीने मंदारचे सर्वस्व लुटून नेले. यशाचा शॉर्टकट मंदारला कसा महागात पडला याची ही भयकथा


बायंगी मराठी भयकथा

मी कॉलेजला असतानाची ही गोष्ट आहे. दोन तास रांगेत उभे राहिल्यावर, “महिन्याच्या बस पासचे ३५० रुपये होतील” हे पास देणाऱ्याचे वाक्य ऐकल्यावर माझा चेहरा पडला. अचानक पासची किंमत वाढली होती आणि माझ्याकडे ५० रुपये कमी होते. आता फक्त तेवढ्यासाठी मला दुसऱ्या दिवशी परत रांगेत ताटकाळत उभे राहावे लागणार होते. हातातल्या ३०० रुपयांकडे पाहत आता काय करायचे असा मी विचार करत असतानाच एक पन्नासची नोट पुढे आली. मी मागे वळून बघितले. “तु तुषारचा मित्र ना? हे घे पन्नास रुपये!” माझ्या मागे रांगेत एक मुलगा ती नोट घेऊन उभा होता.

मी त्याला म्हणालो, “सॉरी पण मी तुला ओळखले नाही.” तो म्हणाला, “मी मंदार. तुषारचा वर्ग मित्र. मी तुला तुषार सोबत खुप वेळा बघितलंय. मी ओळखतो तुला.” एवढ्यात तो पास देणारा खेकसला, “तुला पास हवाय का नको? पास घे नाही तर बाजुला हो, उगाच माझा आणि इतरांचा वेळ फुकट घालवू नको.” मी थॅंक्स म्हणत मंदारकडून पैसे घेतले आणि पहिला पास ताब्यात घेतला. केवळ आपल्या मित्राचा मित्र म्हणून, ओळख पाळख नसतानाही न मागताच मदत करणारा, तिही पैशांची! असा हा मंदार मला खुप भावला. दुसऱ्या दिवशी ५० रुपये परत करायचे वचन देऊन आणि आभार मानुन मी त्याचा निरोप घेतला.



अशी झाली माझी आणि मंदारची पहिली भेट. पुढे कॉलेज डेजमध्ये व्यक्तिमत्व स्पर्धा भरवली होती. मी, तुषार आणि मंदार आम्ही तिघांनीही भाग घेतला होता. तुषार पहिला रनर अप तर मी दुसरा रनर अप ठरलो. मंदारला मात्र दुसऱ्याच फेरीत बाहेर पडावे लागले. बक्षीस वितरण समारंभ झाल्यावर सर्व मुलांनी एकच जल्लोष केला. आपला लंगोटी यार तुषार, पहिला रनरअप झालेला पाहुन मंदार धावतच स्टेजवर आला आणि तुषारला त्याने घट्ट मिठी मारली. आपण स्पर्धा हरल्याच्या दु:खाचा लवलेशही कुठे दिसला नाही पण आपला मित्र जिंकल्याचा आनंद मात्र त्याच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहात होता. वाऽऽऽ रे दोस्ती! मंदारच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहताना पाहुन, तुषार माझा मित्र असुनही क्षणभर मला त्याचा हेवा वाटला.

असा मित्र मिळायला खरच भाग्य लागते. केवळ म्हणायला म्हणुन मित्र तर ढिगांनी होते पण प्रत्यक्ष सुख-दु:खात पाठीशी उभा राहील असा माझा एकही जवळचा मित्र नव्हता हे मला त्यावेळी प्रकर्षाने जाणवले. पुढे मंदारशी माझी पण मैत्री झाली. कॉलेज मध्ये भेटणे, गप्पा मारणे, बाईक वर फिरायला जाणे सुरु झाले. मस्त दिवस चालले होते. शेवटच्या वर्षाच्या परीक्षा झाल्या आणि कॉलेज मधील आमचे फुलपाखरी आयुष्य संपले आणि इतरांसारखी वास्तव जगातील अस्तित्व टिकवण्यासाठी आमची जीवघेणी धडपड सुरु झाली.

काही दिवसांनी मंदारचे राणी बरोबर प्रेम जुळल्याचे समजले. राणी दिसायला अगदीच सामान्य आणि खुपच बारीक होती, अगदी पाप्याच पितर म्हणतात ना तशी. पण मंदार खुप देखणा होता. त्यांची जोडीच विजोड वाटायची. सर्वांनी मंदारला खुप समजावले पण दिल आय गधी पे तो परी क्या चीज है? अशी मंदारची अवस्था झाली होती. मंदार आपल्या मतावर ठाम होता, शेवटी आम्ही त्याला समजवायचा नाद सोडला.

राणीचे वडील खुप श्रीमंत होते तर मंदारचे वडील मध्यम वर्गीय पण जमदग्नीचा अवतार. त्यांना मंदारचे प्रेम प्रकरण कळल्यावर त्यांनी खुपच आकांडतांडव केले, तेव्हा मंदार आणि राणीला पळून जाऊन लग्न करण्याव्यतिरिक्त काही उपायाच उरला नव्हता. गणपतीपुळ्याला जाउन त्या दोघांनी लग्न केले. मंदारच्या वडिलांनी त्यांच्यासाठी घराचे दरवाजे बंद केल्यामुळे दोन दिवस त्यांनी एका मित्राकडे काढले. नंतर लगेचच एक घर भाड्याने घेऊन त्यांनी आपला संसार थाटला.

सुदैवाने मंदारला एकलव्य या शैक्षणिक संस्थेत नोकरी लागली होती. प्रत्येक एडमिशनसाठी त्याला दोन हजार रुपये मिळायचे. नेटाने ते संसार करू लागले. सुरवातीला सगळे ठीक होते पण दुर्दैवाने पुढे पुढे एडमिशनस् कमी मिळू लागल्या आणि खर्च भागवताना मंदारची ओढाताण होऊ लागली. साठवलेल्या पैशातून त्याने चायनीजची गाडी टाकली. दिवसभर एडमिशन मिळवण्यासाठी फिर फिर फिरायचा आणि संध्याकाळी चायनीजची गाडी चालवायचा. बिच्चारा संसाराचा गाडा ओढताना पुरता पिचुन निघाला होता. पण त्याच्या चेहऱ्यावर कधी पश्चात्ताप नाही दिसला, की त्याने कधी आपल्या नाशिबाला दोषही नाही दिला. खुप वाईट वाटायचे त्याचे. कष्ट तर खुप करायचा पण त्याला मनासारखे फळ काही मिळत नव्हते.

पुढे रत्नागिरी सोडून नोकरी निमित्त मी पुण्याला आलो आणि आमचा संपर्क जवळ जवळ तुटला. जवळपास सात आठ महिन्यांनी मी रत्नागिरीला घरी गेलो होतो. संध्याकाळी समुद्रावर भेळ खात बसलो असताना कोणी तरी मला हाक मारली. आवाज ओळखीचा वाटला म्हणुन वळून बघतो तर गर्दीत ओळखीचे कोणीच दिसेना. परत हाक ऐकू आली. आवाजाच्या दिशेने पाहातो तर मंदार मारुती एस्टीम मधुन हात हलवताना दिसला. मला तर शॉकच बसला.

वर्षभरापुर्वी ज्याचे खायचे वांदे झाले होते तो आज नव्याकोऱ्या कारमध्ये बसला होता. गळ्यात सोन्याची चेन, बोटात अंगठी आणि झकपक कपडे घातलेला मंदार एकदम देखणा दिसत होता. श्रीमंतीचे तेज त्याच्या चेहऱ्यावर झळकत होते. आपले ठेवणीतले हास्य ओठांवर आणत तो कार मधुन उतरला आणि मला मिठी मारून म्हणाला, “कसा आहेस? आणि कधी आलास पुण्याहून?” मी त्याच्याकडे पाहातच बसलो. म्हणाला, “पाहतोस काय असा? ओळखलेस नाही की काय मला?”

कारच्या दुसऱ्या दरवाज्यातून गणेशोत्सवातल्या गौरी सारखी दागिने आणि उंची साडी नेसलेली त्याची पत्नी राणी उतरली. श्रीमंती माणसाला सुंदर पण बनवते असे उगाच मला वाटुन गेले. अजुनही मी त्या धक्यातून सावरलो नव्हतो. मी म्हटले, “अरे मंदार! काय लॉटरी बिटरी लागली की काय? नवीन गाडी, अंगावर एवढे सोने हा काय प्रकार आहे?” सांगतो, सगळे सांगतो. आधी घरी तर चल असे म्हणत मंदारने मला कारमध्ये बसवले. एका छानश्या घराच्या गेटसमोर गाडी थांबली.

गेट मधुन आत जाताना अनिमिष नेत्रांनी मी त्याचे वैभव पाहत होतो. घरासमोर छोटासा पोर्च होता, डाव्या बाजूला हिरवीगार लॉन केली होती, त्यावर स्प्रिंकलरस्‌ बसवले होते. लॉनच्या कडेला एक कारंजे होते ज्यात मध्यभागी एक जलपरी होती आणि साइडने चार डॉलफिन मासे बसवले होते. त्या माशांच्या तोंडातून बाहेर पडाणाऱ्या जलधारांमधे ती जलपरी न्हाऊन निघत होती.

मंदारच्या आवाजाने मी भानावर येत घराच्या पायऱ्या चढत दिवाणखान्यात आलो. घर एकदम मस्त सजवले होते. आत तीन पॉश अटैच्ड बेडरूमस्, एक किचन आणि ऐसपैस हॉल होता. सगळ्या आधुनिक सेवा आणि दिमतीला नोकर चाकर हजर होते. मला सोफ्यावर बसायला सांगुन राणी चहा नाश्त्याचे बघायला किचन मध्ये गेली. इतका वेळ दाबुन ठेवलेली उत्सुकता आता शिगेला पोहोचली होती. माझी अधीरता ओळखुन मला फार काळ ताटकाळत न ठेवता मंदार बोलू लागला. “अरे तुला माझी अवस्था तर माहीतच होती एकीकडे एडमिशनस्‌ होत नव्हत्या आणि दुसरीकडे चायनीजचा धंदा पण होत नव्हता.

चौकातच चायनीजच्या ८ गाड्या लागल्यावर काय धंदा होणार? असाच एक दिवस गिऱ्हाईकाची वाट पाहत बसलो असताना माझा कॉलेजचा एक मित्र चायनीज खायला आला. सहज गप्पा मारताना मी त्याला माझी परिस्थिती सांगितली. तसा तो मला म्हणाला की १० हजार रुपये खर्च करू शकत असशील तर एक उपाय आहे. तुझे नशीब पालटलेच म्हणुन समज. १० हजार म्हटल्यावर मी गप्पच बसलो. तो म्हणाला की माझ्या बरोबर लांज्याला चल तिथे एक माणुस आहे जो बायंगी भुत देतो, तु जे मागशील ते भुत तुला देईल. हो नाही करत मी तयार झालो. म्हटले एकदा जाऊन भेटायला काय हरकत आहे?

पुढच्या पौर्णिमेला तो मला लांज्यातील एका माणसाकडे घेऊन गेला. झोपडी वजा त्याचे घर पाहुन मला शंका आली. जर हा लोकांचे एवढे भले करतो तर याची ही अवस्था का? पण काही ना बोलता मी मित्रासोबत आत गेलो. आतमध्ये साधारण पन्नाशीचा एक माणुस कॉटवर बसला होता. आम्हाला पाहताच त्याने समोरच्या मोडक्याशा खुर्च्यांवर बसायला सांगितले. काही वेळ माझ्या चेहऱ्याकडे तो एकटक पाहात राहिला जणू काय माझा चेहराच वाचत होता. पाच एक मिनिटांनी तो म्हणाला, “तुम्हाला बायंगी धार्जिणे नाही. द्यायला ते तुम्हाला भरुपूर काही देईल, पैसा आडका, गाडी, सुख; जे म्हणाल ते देईल पण दर अमावस्या पौर्णिमेला तुमच्याकडे ते आपली इच्छा पुर्ण करण्याची विनंती करेल.

ती पुर्ण करण्यास जर का तुम्ही चुकलात तर मग ते तुम्हाला त्रास देईल आणि तो साधा सुधा नसेल. त्यामुळे तुम्ही बायंगी न नेलेलेच बरे.” असे म्हणुन त्या माणसाने आम्हाला बाहेरचा रस्ता दाखवला. पण खुप गयावया केल्यावर तो बायंगी द्यायला तयार झाला व म्हणाला, “पुढच्या पौर्णिमेला १० हजार घेऊन या आणि सोबत बायंगी घेऊन जा पण लक्षात ठेवा झटपट मिळालेले शाश्वत नसते तर आयुष्यासारखेच क्षणभंगुर असते.”

माझ्याजवळ १ महिना होता, त्यात मला १० हजारांचा जुगाड करायचा होता. मग बायकोचे मंगळसुत्र गहाण ठेवले तरी ५ हजार रुपये कमी पडत होते मग चायनीजची गाडी विकून आणि थोडे मित्रांकडून उसने पैसे घेऊन १० हजार रुपये जमवले आणि ठरल्याप्रमाणे पौर्णिमेला त्या माणसाकडे गेलो. त्याने मला एका रिंगणात बसवले अंगावर एक पंचा घ्यायला सांगितले. नंतर नजर लागू नये म्हणुन दारावर लिंबू मिरची सोबत काळी बाहुली बांधतात तशीच पण पांढऱ्या कापडाची एका बाहुली त्याने माझ्या बाजूला बसवली त्याने तिच्या पण अंगावर छोटे पंचासारखे वस्त्र ठेवले नंतर माझ्या आणि त्या बाहुलीच्या कपाळाला कसला तरी काळपट लालसर टिळा लावला.

नंतर धारीवाले एक लिंबू त्याने हातात धरले आणि डोळे मिटून काही मंत्र वगैरे पुटपुटु लागला. नंतर त्याने ते लिंबू उभे चिरले आणि त्या बाहुलीवर पिळले त्याबरोबर त्या बाहुलीत हालचाल होऊ लागली. ते पाहुन मी चांगलाच टरकलो पण त्याने मला न हलण्यास सांगितले. ती बाहुली आता भारली गेली होती. त्याने तिच्याकडे पाहात परत काहीतरी पुटपुटायला सुरवात केली आणि माझ्याकडे बोट केले तसे त्या बाहुलीने मान वळवून माझ्याकडे पाहिले.

तो प्रकार पाहुन मला चांगलाच घाम फुटला होता. जसे त्याचे अनुष्ठान संपले तसे त्याने तांदळावर एक सुपरी ठेवली तिच्यावर कुंकु आणि कसली तरी काळी पावडर टाकली. परत काही मंत्र पुटपुटू लागला. थोड्यावेळाने ती बाहुली निर्जीव झाली. नंतर माझ्या हातात ती सुपारी देऊन त्याने मला ती कोणाला न दाखवता घरात लपवून ठेवण्यास सांगितले. त्याला १० हजार रुपये देवून आम्ही निघणार तोच त्याने मला थांबवले व म्हणाला, “त्या बायंगीने सांगितलेली प्रत्येक इच्छा योग्य असो वा अयोग्य याचा विचार न करता जर का तु पुर्ण करू शकलास तर मग तुला कधीच मागे वळून बघायची गरज नाही.

पण ते शेवटी एक भुत असल्यामुळे त्याची एखादी इच्छा अमानवीय असण्याचीच जास्त शक्यता आहे तेव्हा तुझी परिस्थिती सुधारली की जास्त हाव न करता परत आणून दे.” आणि अशा प्रकारे मी त्या भुताला घरी घेऊन आलो आणि आज हे सगळे वैभव आहे. दोन्ही घरात आम्हाला आता यायची जायची परवानगी आहे. त्या बायंगीच्या मागण्या अगदीच शुल्लक आहेत. दर पौर्णिमा अमावस्येला कधी कोंबडं तर कधी नारळ कधी मटन वगैरे. त्यामुळे सगळे अगदी आलबेल आहे.”

मी सगळे शांतपणे ऐकले पण माझी सुई त्या बायंगीच्या अमानवीय मागणीवरच अडकली होती. त्याने असे काही मागितले जे मंदार देवू शकला नाही तर पुढे काय? हा प्रश्न मला छळु लागला. ‘मिळाले तेवढे पुरेसे आहे आता ते बायंगी काहितरी भलतेच मागण्या आधीच त्याने परत करावे’ असे मी त्याला बोलुनही दाखवले पण माझे म्हणणे उडवून लावत तो म्हणाला, “तु उगाचच काळजी करतोयस, त्याने तसे काहीच मागितले नाही आजपर्यंत.” “पण याचा अर्थ ते पुढे मागणार नाही असे होत नाही.

जास्त हाव बरी नव्हे.” मी माघार घेत नाही हे पाहुन त्याने “बघु रे मागेल तेव्हा, तु चहा तर घे पाहू आधी,” म्हणत त्याने विषयाला बगल दिली. माझे मन आतून ओरडून ओरडून सांगत होते की काहीतरी अनिष्ट घडणार आहे. पण त्यावेळी मी गप्प बसणेच उचित समजलो. दूसऱ्या दिवशी संध्याकाळी मी मंदारला समुद्रावर भेटायला बोलवले. थोडा नाखुशीनेच तो आला. “कालचा विषय काढणार असशील तर मी निघतो” आल्या आल्याच तो म्हणाला. मी नाही काढणार म्हटल्यावर तो बाजूला बसला. थोडा वेळ कोणी काहीच बोलले नाही. मग न राहवुन तोच म्हणाला, “बोल काय बोलायचे आहे तुला ते.”

पडत्या फळाची आज्ञा घेऊन मी त्याला विचारले, “हे बायंगी काम कसं करतं? म्हणजे ते तुला श्रीमंत कसे बनवते?” तो म्हणाला, “ते आपल्यासाठी सर्व काही अनुकुल करते. पैश्याची संधी उपलब्ध करुन देते. आधी त्याने माझ्या सासऱ्याला आणि बापाला नरम केला त्यामुळे दोघांचा मला सपोर्ट मिळाला. एक बिझनेस प्रपोझल चालून आले, त्यात गुंतवायला सासर्‍यांनी भांडवल दिले. तिप्पट फायदा झाला. सासर्‍यांचे पैसे परत केले. सट्टयामधे पैसे लावले तिथे पाचपट कमावले. असे करत करत शॉर्टकटने आज इथे पोहोचलो.

बिघडलेल्या नशिबाला सुधारायचे काम ते भुत करते.” “अरे पण असे शॉर्टकटने कमवलेले टिकत नाही मित्रा! त्याची खुप मोठी किंमत चुकवावी लागते,” मी म्हणालो. “अगदी त्या बाबासारखाच् बोलतोस तू पण! अरे माझी बायको उपाशी होती घरातच काय चायनिजच्या गाडीवर शिजवून लोकांना खायला घालायला पण अन्न शिल्लक नव्हतं. मग मला जे योग्य वाटले ते मी केले. तु म्हणतोस ते अगदी बरोबर आहे रे, पण पोटच्या भुके पुढे हा विचार माझ्यासाठी क्षुल्लक होता.” मंदार भावुक होवून रडु लागला तसा मी अजुन काही बोलण्यात अर्थ नाही हे समजून गप्प बसलो.

एकदा ते बायंगी बघायची मला इच्छा झाली पण त्या बाबाने त्याला लपवून ठेवण्यास सांगितले असल्याने तो विचार मी डोक्यातून काढून टाकला. रजा संपत आल्याने मी पुण्याला परत निघालो पण निघण्याआधी मंदारला थोडे सावध राहण्यास सांगितले आणि म्हणालो, “अशीच काही आवाक्याबाहेरील मागणी जर भूताने केलीच तर लगेच नाही म्हणू नकोस तर थोडा वेळ मागून घे. अजुनही वेळ गेलेली नाही ते भुत वेळीच परत कर, कमावलेस ते पुष्कळ आहे.

आता हा शॉर्टकट बस झाला. यापुढे कष्टाने कमव.” “ठीक आहे बघु कसे काय ते.” म्हणुन त्याने माझा निरोप घेतला. पुढे कामाच्या व्यापात तिन चार महिने रत्नागिरीला जाणे जमले नाही आणि एक दिवस अचानक तुषारचा मला फोन आला आणि ती दु:खद बातमी कळली. मंदारचा शून्यात हरवलेला चेहरा माझ्या डोळ्यासमोर आला. शेवटी बायंगीने आपला डाव साधला होता. माझ्या मनाने दिलेला कौल दुर्दैवाने खरा ठरला होता. CL टाकून मी तातडीने रत्नागिरीला आलो. आलो तो तडक मंदारच्या घरी गेलो. मंदारच्या घरावर अवकळा पसरली होती. घरी पांढऱ्या कपड्यात खुपसे लोक जमले होते. सर्वांच्याच् चेहऱ्यावर दु:ख दिसत होते.

घरात गेलो असता मला समोर चंदनपुष्पांची माळ घातलेला राणीचा फोटो दिसला. समोर शितपेटित पांढर्‍या शुभ्र चादरीत गुंडाळलेला राणीचा मॄतदेह पाहुन काळजात चरर् झाले. माझे डोळे मंदारला शोधत होते. आतल्या एका बेडरूम मध्ये शून्यात नजर लावून तो एकटाच बसलेला मला दिसला. मी त्याच्याकडे जाणार इतक्यात तुषारने मला अडवले. मी त्याला विचारले की नक्की काय झाले. तो म्हणाला, “बाजुला चल सांगतो. गेल्या पौर्णिमेला मंदारकडे त्या बायंगीने राणीचा बळी मागितला.

मंदार ही मागणी ऐकताच एकदम भडकला आणि त्या भुतावर धाऊन गेला. त्याला शिव्या देत इथुन चालता हो वगैरे रागात वाट्टेल ते बोलला. काही न बोलता ते भुत तिथून गायब झाले. मंदारला वाटले की आता काही काळजी नाही. बहुतेक ते भुत त्याचे घर सोडुन कायमचे निघुन गेले पण वस्तुस्थिती तशी नव्हती. अमावस्येला सुरूवात झाल्यावर बरोबर रात्री १२ वाजता राणीच्या पोटात असह्य कळा सुरु झाल्या. वेदनेने ती गडाबडा लोळु लागली. तिची आतडी पिळवटून निघत होती. नंतर तिचा गळा कोणी तरी प्रचंड ताकदीने दाबत असल्याचे तिला जाणवले.

तिला श्वास घेता येईना, एकदम घुसमटल्यासारखे झाले. छातीवर मणामणाचे ओझे ठेवल्यासारखे ती तडफडत होती. मंदार लाचारपणे ते सगळे पाहात होता. राणीची मदत तोच काय पण आता कुणीच करू शकणार नव्हते. डॉक्टर आले, त्यांनी तिला झोप लागावी म्हणुन इंजेक्शन दिले पण काहीच फरक पडला नाही. मंदारने त्या बाबाला फोन केला तेव्हा तो काहीही करण्यास असमर्थ असल्याचे त्याने सांगितले. तो बाबा म्हणाला, “मी आधीच तुम्हाला सावध केले होते पण तुम्ही माझे ऐकले नाहीत.

आपली इच्छा पुर्ण केल्याशिवाय ते भुत काही स्वस्थ बसणार नाही. पौर्णिमेच्या आधी जर का तुम्ही त्याला मुक्त केले असते तर कदाचित काही करता आले असते पण आता वेळ निघुन गेली आहे. तुम्ही त्याला जायला सांगितले असल्यामुळे त्याची इच्छा पूरी झाल्यावर ते तिथुन निघुन माझ्याकडे परत येईल. तुमच्या नुकसानाबद्दल सहानुभूती व्यक्त करण्याव्यतिरिक्त मी काहीही करू शकत नाही.” असे म्हणुन फोन कट झाला. थोड्याच् वेळात राणीची प्राणज्योत मालवली.”

मी मंदारच्या बेडरूममध्ये जड पावलानी गेलो. मला पाहताच मंदार धावत आला आणि मला घट्ट बिलगला. ढसा ढसा रडत म्हणाला, “तुझे मी ऐकायला हवे होते रे! जिच्यासाठी मी हे सगळे केले त्या माझ्या लाडक्या राणीचाच त्याने बळी मागितला. तुझे ऐकले असते आणि वेळीच ते परत दिले असते तर आज माझी राणी कदाचित जीवंत असती. तिच्यासोबत माझे बाळ पण गेले रे! मी आता जगुन काय करू? कोणासाठी जगू?” असे म्हणून त्याने हंबरडा फोडला. त्याची ती अवस्था बघुन माझा जीव तिळ तिळ तुटला पण जे घडु नये ते घडले होते. यशासाठी वापरलेल्या शॉर्टकटने मंदारने जेवढ्या वेगाने कमावले होते, तेवढ्याच वेगाने पुढे सर्व गमावले आणि परिस्थिती जैसे थे झाली. कष्टाला पर्याय नाही हेच खरे. म्हणतात ना easy come, easy go. पैशाची अती हाव माणसाच्या केवळ नाशास कारणीभुत ठरते. कष्टाने कमवलेले धनच खरे धन असते. मंदारच्या या कहाणीतून सुज्ञ वाचकांनी योग्य तो धडा घ्यावा व easy money च्या नादाला लागू नये हिच सदिच्छा.

- केदार कुबडे

अभिप्राय

नाव

अ रा कुलकर्णी,1,अ ल खाडे,2,अ ज्ञा पुराणिक,1,अंकित भास्कर,1,अंजली भाबट-जाधव,1,अंधश्रद्धेच्या कविता,5,अकोला,1,अजय दिवटे,1,अजित पाटणकर,18,अनंत दळवी,1,अनंत फंदी,1,अनंत भावे,1,अनिकेत येमेकर,2,अनिकेत शिंदे,1,अनिल गोसावी,2,अनिल भारती,1,अनिल वल्टे,8,अनुभव कथन,19,अनुरथ गोरे,1,अनुराधा पाटील,1,अनुराधा फाटक,39,अनुवादित कविता,1,अपर्णा तांबे,7,अब्राहम लिंकन,2,अभंग,6,अभिजित गायकवाड,1,अभिजीत टिळक,2,अभिव्यक्ती,1386,अभिषेक कातकडे,5,अभिषेक घुगे,1,अमन मुंजेकर,7,अमरश्री वाघ,2,अमरावती,1,अमित पडळकर,4,अमित पवार,1,अमित बाविस्कर,3,अमित सुतार,1,अमुक-धमुक,1,अमृत जोशी,1,अमृता शेठ,1,अमोल कोल्हे,1,अमोल तांबे,1,अमोल देशमुख,1,अमोल बारई,7,अमोल वाघमारे,1,अमोल सराफ,2,अरविंद जामखेडकर,1,अरविंद थगनारे,5,अरुण कोलटकर,1,अरुण म्हात्रे,1,अर्चना कुळकर्णी,1,अर्चना डुबल,2,अर्जुन फड,3,अर्थनीति,3,अल्केश जाधव,1,अविनाश धर्माधिकारी,2,अशोक थोरात,1,अशोक रानडे,1,अश्विनी तातेकर-देशपांडे,1,अश्विनी तासगांवकर,2,अस्मिता मेश्राम-काणेकर,7,अहमदनगर,1,अक्षय वाटवे,1,अक्षरमंच,1132,आईच्या कविता,29,आईस्क्रीम,3,आकाश पवार,2,आकाश भुरसे,8,आज,6,आजीच्या कविता,1,आठवणींच्या कविता,18,आतले-बाहेरचे,3,आतिश कविता लक्ष्मण,1,आत्मविश्वासाच्या कविता,15,आदर्श कामिरे,4,आदित्य कदम,1,आदेश ताजणे,8,आनंद दांदळे,8,आनंद प्रभु,1,आनंदाच्या कविता,26,आमट्या सार कढी,18,आर समीर,1,आरती गांगण,2,आरती शिंदे,4,आरत्या,82,आरोग्य,21,आशा गवाणकर,1,आशिष खरात-पाटील,1,आशिष चोले,1,इंदिरा गांधी,1,इंदिरा संत,6,इंद्रजित नाझरे,26,इंद्रजीत भालेराव,1,इतिहास,281,इलाही जमादार,1,इसापनीती कथा,48,उत्तम कोळगावकर,2,उदय दुदवडकर,1,उन्मेष इनामदार,1,उपवासाचे पदार्थ,15,उमा पाटील,1,उमेश कानतोडे,1,उमेश कुंभार,14,उमेश चौधरी,1,उस्मानाबाद,1,ऋग्वेदा विश्वासराव,5,ऋचा पिंपळसकर,10,ऋचा मुळे,18,ऋषिकेश शिरनाथ,2,ऋषीकेश कालोकार,2,ए श्री मोरवंचीकर,1,एच एन फडणीस,1,एप्रिल,30,एम व्ही नामजोशी,1,एहतेशाम देशमुख,2,ऐतिहासिक स्थळे,2,ऑक्टोबर,31,ऑगस्ट,31,ऑडिओ कविता,15,ऑडिओ बुक,1,ओंकार चिटणीस,1,ओम ढाके,8,ओमकार खापे,1,ओशो,1,औरंगाबाद,1,कपिल घोलप,12,करण विधाते,1,करमणूक,72,कर्क मुलांची नावे,1,कल्पना देसाई,1,कल्याण इनामदार,1,कविता शिंगोटे,1,कवितासंग्रह,280,कवी अनिल,1,कवी ग्रेस,4,कवी बी,1,काजल पवार,1,कार्यक्रम,12,कार्ल खंडाळावाला,1,कालिंदी कवी,2,काशिराम खरडे,1,कि का चौधरी,1,किरण कामंत,1,किल्ले,97,किल्ल्यांचे फोटो,5,किशोर चलाख,6,किशोर पवार,1,कुठेतरी-काहीतरी,3,कुणाल खाडे,3,कुणाल लोंढे,1,कुसुमाग्रज,9,कृष्णकेशव,1,कृष्णाच्या आरत्या,5,के के दाते,1,के तुषार,8,के नारखेडे,2,केदार कुबडे,40,केदार नामदास,1,केदार मेहेंदळे,1,केशव मेश्राम,1,केशवकुमार,2,केशवसुत,5,कोल्हापूर,1,कोशिंबीर सलाड रायते,14,कौशल इनामदार,1,खंडोबाची स्थाने,2,खंडोबाच्या आरत्या,2,खरगपूर,1,ग दि माडगूळकर,6,ग ल ठोकळ,3,ग ह पाटील,4,गंगाधर गाडगीळ,1,गझलसंग्रह,1,गडचिरोली,1,गणपतीच्या आरत्या,5,गणपतीच्या गोष्टी,24,गणेश कुडे,2,गणेश तरतरे,20,गणेश निदानकर,1,गणेश पाटील,1,गणेश भुसारी,1,गण्याचे विनोद,1,गाडगे बाबा,1,गायत्री सोनजे,5,गावाकडच्या कविता,14,गुरुदत्त पोतदार,2,गुरूच्या आरत्या,2,गुलझार काझी,1,गो कृ कान्हेरे,1,गो गं लिमये,1,गोकुळ कुंभार,13,गोड पदार्थ,55,गोपीनाथ,2,गोविंद,1,गोविंदाग्रज,1,गौतम जगताप,1,गौरांग पुणतांबेकर,1,घरचा वैद्य,2,घाट,1,चंद्रकांत जगावकर,1,चंद्रपूर,1,चटण्या,3,चातुर्य कथा,6,चित्रपट समीक्षा,1,चैतन्य म्हस्के,1,चैत्राली इंगळे,2,जयश्री चुरी,1,जयश्री मोहिते,1,जवाहरलाल नेहरू,1,जळगाव,1,जाई नाईक,1,जानेवारी,31,जालना,1,जितेश दळवी,1,जिल्हे,31,जीवनशैली,432,जुलै,31,जून,30,ज्योती किरतकुडवे,1,ज्योती मालुसरे,1,टीझर्स,1,ट्रेलर्स,3,ठाणे,2,डिसेंबर,31,डॉ मानसी राजाध्यक्ष,1,डॉ. दिलीप धैसास,1,तनवीर सिद्दिकी,1,तन्मय धसकट,1,तरुणाईच्या कविता,7,तिच्या कविता,63,तुकाराम गाथा,4,तुकाराम धांडे,1,तुतेश रिंगे,1,तेजश्री कांबळे-शिंदे,4,तेजस्विनी देसाई,1,दत्ता हलसगीकर,2,दत्ताच्या आरत्या,5,दत्तात्रय भोसले,1,दत्तो तुळजापूरकर,1,दया पवार,1,दर्शन जोशी,2,दर्शन शेळके,1,दशरथ मांझी,1,दादासाहेब गवते,1,दामोदर कारे,1,दिनदर्शिका,366,दिनविशेष,366,दिनेश बोकडे,1,दिनेश लव्हाळे,1,दिनेश हंचाटे,1,दिपक शिंदे,2,दिपाली गणोरे,1,दिवाळी फराळ,26,दीपा दामले,1,दीप्तीदेवेंद्र,1,दुःखाच्या कविता,76,दुर्गेश साठवणे,1,देवीच्या आरत्या,3,देशभक्तीपर कविता,3,धनंजय सायरे,1,धनराज बाविस्कर,71,धनश्री घाणेकर,1,धार्मिक स्थळे,1,धुळे,1,धोंडोपंत मानवतकर,12,नमिता प्रशांत,1,नलिनी तळपदे,1,ना के बेहेरे,1,ना घ देशपांडे,4,ना धों महानोर,3,ना वा टिळक,1,नांदेड,1,नागपूर,1,नारायण शुक्ल,1,नारायण सुर्वे,2,नाशिक,1,नासीर संदे,1,निखिल पवार,3,नितीन चंद्रकांत देसाई,1,निमित्त,4,निराकाराच्या कविता,16,निवडक,9,निसर्ग कविता,37,निसर्ग चाटे,2,निळू फुले,1,नृसिंहाच्या आरत्या,1,नोव्हेंबर,30,न्याहारी,50,पथ्यकर पदार्थ,2,पद्मा गोळे,4,परभणी,1,पराग काळुखे,1,पर्यटन स्थळे,1,पल्लवी माने,1,पवन कुसुंदल,2,पांडुरंग वाघमोडे,3,पाककला,322,पाककृती व्हिडिओ,15,पालकत्व,7,पावसाच्या कविता,40,पी के देवी,1,पु ल देशपांडे,9,पु शि रेगे,1,पुंडलिक आंबटकर,4,पुडिंग,10,पुणे,15,पुरुषोत्तम जोशी,1,पुरुषोत्तम पाटील,1,पुर्वा देसाई,2,पूजा काशिद,1,पूजा चव्हाण,1,पूनम राखेचा,1,पोस्टर्स,5,पोळी भाकरी,27,पौष्टिक पदार्थ,20,प्र श्री जाधव,12,प्रकाश पाटील,1,प्रजोत कुलकर्णी,1,प्रतिक बळी,1,प्रतिभा जोजारे,1,प्रतिमा इंगोले,1,प्रतिक्षा जोशी,1,प्रदिप कासुर्डे,1,प्रफुल्ल चिकेरूर,10,प्रभाकर महाजन,1,प्रभाकर लोंढे,3,प्रवास वर्णन,1,प्रवासाच्या कविता,11,प्रविण पावडे,15,प्रवीण दवणे,1,प्रवीण राणे,1,प्रशांतकुमार मोहिते,2,प्रसन्न घैसास,2,प्रज्ञा वझे,2,प्रज्ञा वझे-घारपुरे,10,प्राजक्ता गव्हाणे,1,प्रितफुल प्रित,1,प्रिती चव्हाण,27,प्रिया जोशी,1,प्रियांका न्यायाधीश,3,प्रेम कविता,97,प्रेरणादायी कविता,17,फ मुं शिंदे,3,फादर स्टीफन्स,1,फेब्रुवारी,29,फोटो गॅलरी,11,फ्रॉय निस्सेन,1,बहिणाबाई चौधरी,6,बा भ बोरकर,8,बा सी मर्ढेकर,6,बातम्या,11,बाबा आमटे,1,बाबाच्या कविता,10,बाबासाहेब आंबेड,1,बायकोच्या कविता,5,बालकविता,14,बालकवी,9,बाळाची मराठी नावे,1,बाळासाहेब गवाणी-पाटील,21,बिपीनचंद्र नेवे,1,बी अरुणाचलाम्‌,1,बी रघुनाथ,1,बीड,1,बुलढाणा,1,बेकिंग,9,बेहराम कॉन्ट्रॅक्टर,1,भंडारा,1,भक्ती कविता,23,भक्ती रावनंग,1,भरत माळी,2,भा दा पाळंदे,1,भा रा तांबे,7,भा वें शेट्टी,1,भाग्यवेध,1,भाज्या,29,भाताचे प्रकार,16,भानुदास,1,भानुदास धोत्रे,1,भावनांची वादळे,1,भुषण राऊत,1,भूगोल,1,भूमी जोशी,1,म म देशपांडे,1,मं वि राजाध्यक्ष,1,मंगला गोखले,1,मंगळागौरीच्या आरत्या,2,मंगेश कळसे,9,मंगेश पाडगांवकर,5,मंजुषा कुलकर्णी,2,मंदिरांचे फोटो,3,मंदिरे,4,मधल्या वेळेचे पदार्थ,41,मधुकर आरकडे,1,मधुकर जोशी,1,मधुसूदन कालेलकर,2,मनमोहन नातू,3,मनाचे श्लोक,205,मनिषा दिवेकर,3,मनिषा फलके,1,मनोज शिरसाठ,9,मराठी,1,मराठी उखाणे,2,मराठी कथा,107,मराठी कविता,1173,मराठी कवी,3,मराठी कोट्स,4,मराठी गझल,30,मराठी गाणी,2,मराठी गोष्टी,67,मराठी चारोळी,42,मराठी चित्रपट,19,मराठी टिव्ही,53,मराठी नाटक,1,मराठी पुस्तके,7,मराठी प्रेम कथा,23,मराठी भयकथा,44,मराठी मालिका,20,मराठी रहस्य कथा,2,मराठी लेख,48,मराठी विनोद,1,मराठी साहित्य,288,मराठी साहित्यिक,2,मराठी सुविचार,2,मराठीप्रेमी पालक महासंमेलन,5,मराठीमाती,145,मसाले,12,महात्मा गांधी,8,महात्मा फुले,1,महाराष्ट्र,307,महाराष्ट्र फोटो,11,महाराष्ट्राचा इतिहास,32,महाराष्ट्रीय पदार्थ,22,महालक्ष्मीच्या आरत्या,2,महेंद्र म्हस्के,1,महेश जाधव,3,महेश बिऱ्हाडे,9,मांसाहारी पदार्थ,17,माझं मत,4,माझा बालमित्र,88,मातीतले कोहिनूर,19,माधव ज्यूलियन,6,माधव मनोहर,1,माधवानुज,3,मानसी सुरज,1,मारुतीच्या आरत्या,2,मार्च,31,मिलिंद खांडवे,1,मीना तालीम,1,मुंबई,12,मुंबई उपनगर,1,मुकुंद भालेराव,1,मुकुंद शिंत्रे,35,मुक्ता चैतन्य,1,मुलांची नावे,1,मुलाखती,1,मे,31,मैत्रीच्या कविता,8,मोहिनी उत्तर्डे,2,यवतमाळ,1,यशपाल कांबळे,4,यशवंत दंडगव्हाळ,25,यादव सिंगनजुडे,2,योगा,1,योगेश कर्डिले,6,योगेश सोनवणे,2,रंगपंचमी,1,रंजना बाजी,1,रजनी जोगळेकर,5,रत्नागिरी,1,रविंद्र गाडबैल,1,रविकिरण पराडकर,1,रवींद्र भट,1,रा अ काळेले,1,रा देव,1,रागिनी पवार,1,राजकारण,2,राजकीय कविता,12,राजकुमार शिंगे,1,राजेंद्र भोईर,1,राजेश पोफारे,1,राजेश्वर टोणे,3,राम मोरे,1,रामकृष्ण जोशी,2,रामचंद्राच्या आरत्या,5,रायगड,1,राहुल अहिरे,3,रुपेश सावंत,1,रेश्मा जोशी,2,रेश्मा विशे,1,रोहित काळे,7,रोहित साठे,15,लघुपट,3,लता मंगेशकर,2,लहुजी साळवे,1,लक्ष्मण अहिरे,2,लक्ष्मीकांत तांबोळी,2,लातूर,1,लिलेश्वर खैरनार,2,लीना पांढरे,1,लीलावती भागवत,1,लोकमान्य टिळक,3,लोणची,9,वंदना विटणकर,2,वर्धा,1,वसंत बापट,12,वसंत साठे,1,वसंत सावंत,1,वा गो मायदेव,1,वा ना आंधळे,1,वा भा पाठक,2,वा रा कांत,3,वात्रटिका,2,वादळे झेलतांना,2,वामन निंबाळकर,1,वासुदेव कामथ,1,वाळवणाचे पदार्थ,6,वि दा सावरकर,3,वि भि कोलते,1,वि म कुलकर्णी,5,वि स खांडेकर,1,विंदा करंदीकर,8,विक्रम खराडे,1,विचारधन,215,विजय पाटील,1,विजया जहागीरदार,1,विजया वाड,2,विजया संगवई,1,विठ्ठल वाघ,3,विठ्ठलाच्या आरत्या,5,विद्या कुडवे,4,विद्या जगताप,2,विद्याधर करंदीकर,1,विनायक मुळम,1,विरह कविता,58,विराज काटदरे,1,विलास डोईफोडे,5,विवेक जोशी,3,विशाल शिंदे,1,विशेष,12,विष्णूच्या आरत्या,4,विज्ञान तंत्रज्ञान,2,वृषाली सुनगार-करपे,1,वेदांत कोकड,1,वैभव गव्हाळे,1,वैभव सकुंडे,1,वैशाली झोपे,1,वैशाली नलावडे,1,व्यंगचित्रे,17,व्रत-वैकल्ये,1,व्हिडिओ,13,शंकर रामाणी,1,शंकर विटणकर,1,शंकर वैद्य,1,शंकराच्या आरत्या,4,शरणकुमार लिंबाळे,1,शशांक रांगणेकर,1,शशिकांत शिंदे,1,शां शं रेगे,1,शांततेच्या कविता,9,शांता शेळके,11,शांताराम आठवले,1,शाम जोशी,1,शारदा सावंत,4,शाळेचा डबा,15,शाळेच्या कविता,11,शितल सरोदे,1,शिरीष पै,1,शिरीष महाशब्दे,8,शिल्पा इनामदार-आर्ते,1,शिवाजी महाराज,7,शिक्षकांवर कविता,4,शुभम बंबाळ,2,शुभम सुपने,2,शेतकर्‍याच्या कविता,14,शेती,1,शेषाद्री नाईक,1,शैलेश सोनार,1,श्याम खांबेकर,1,श्रद्धा नामजोशी,9,श्रावणातल्या कहाण्या,27,श्री दि इनामदार,1,श्री बा रानडे,1,श्रीकृष्ण पंडित,1,श्रीकृष्ण पोवळे,1,श्रीधर रानडे,2,श्रीधर शनवारे,1,श्रीनिवास खळे,1,श्रीपाद कोल्हटकर,1,श्रीरंग गोरे,1,श्रुती चव्हाण,1,संघर्षाच्या कविता,33,संजय उपाध्ये,1,संजय डोंगरे,1,संजय पाटील,1,संजय बनसोडे,2,संजय शिंदे,1,संजय शिवरकर,5,संजय सावंत,1,संजीवनी मराठे,3,संत एकनाथ,1,संत चोखामेळा,1,संत जनाबाई,1,संत तुकडोजी महाराज,2,संत तुकाराम,8,संत नामदेव,3,संत ज्ञानेश्वर,6,संतोष जळूकर,1,संतोष झोंड,1,संतोष सेलुकर,30,संदिप खुरुद,5,संदीपकुमार खुरुद,1,संदेश ढगे,39,संध्या भगत,1,संपादक मंडळ,1,संपादकीय,11,संपादकीय व्यंगचित्रे,2,संस्कार,2,संस्कृती,133,सई कौस्तुभ,1,सचिन पोटे,12,सचिन माळी,1,सण-उत्सव,22,सणासुदीचे पदार्थ,32,सतिश चौधरी,1,सतीश काळसेकर,1,सदानंद रेगे,2,सदाशिव गायकवाड,2,सदाशिव माळी,1,सनी आडेकर,10,सप्टेंबर,30,समर्थ रामदास,206,समर्पण,8,सरबते शीतपेये,8,सरयु दोशी,1,सरला देवधर,1,सरिता पदकी,3,सरोजिनी बाबर,1,सलीम रंगरेज,8,सविता कुंजिर,1,सांगली,1,सागर बनगर,1,सागर बाबानगर,1,सातारा,1,साने गुरुजी,5,सामाजिक कविता,113,सामान्य ज्ञान,8,सायली कुलकर्णी,7,साहित्य सेतू,1,साक्षी खडकीकर,9,साक्षी यादव,1,सिंधुदुर्ग,1,सिद्धी भालेराव,1,सिमा लिंगायत-कुलकर्णी,3,सुदेश इंगळे,24,सुधाकर राठोड,1,सुनिल नागवे,1,सुनिल नेटके,1,सुनील गाडगीळ,1,सुभाष कटकदौंड,2,सुमती इनामदार,1,सुमित्र माडगूळकर,1,सुरज दळवी,1,सुरज दुतोंडे,1,सुरज पवार,1,सुरेश भट,2,सुरेश सावंत,2,सुशील दळवी,1,सुशीला मराठे,1,सुहास बोकरे,6,सैनिकांच्या कविता,4,सैरसपाटा,128,सोपानदेव चौधरी,1,सोमकांत दडमल,1,सोलापूर,1,सौरभ सावंत,1,स्तोत्रे,2,स्नेहा कुंभार,1,स्फुटलेखन,4,स्फूर्ती गीत,1,स्माईल गेडाम,4,स्वप्ना पाटकर,1,स्वप्नाली अभंग,5,स्वप्नील जांभळे,2,स्वाती काळे,1,स्वाती खंदारे,320,स्वाती गच्चे,1,स्वाती दळवी,9,स्वाती नामजोशी,31,स्वाती पाटील,1,स्वाती वक्ते,2,ह मुलांची नावे,1,हमार्टिक समा,1,हरितालिकेच्या आरत्या,1,हर्षद खंदारे,42,हर्षद माने,1,हर्षदा जोशी,3,हर्षवर्धन घाटे,2,हर्षाली कर्वे,2,हसनैन आकिब,3,हितेशकुमार ठाकूर,1,हिरवळ,1,हेमंत जोगळेकर,1,हेमंत देसाई,1,हेमंत सावळे,1,हेमा चिटगोपकर,8,होळी,5,ज्ञानदा आसोलकर,1,ज्ञानदेवाच्या आरत्या,2,marathimati,1,
ltr
item
मराठीमाती । माझ्या मातीचे गायन: बायंगी मराठी भयकथा
बायंगी मराठी भयकथा
बायंगी मराठी भयकथा - भरभराटीसाठी आणलेले बायंगी भुत मंदारला भरभरून देऊन गेले पण... यशाचा शॉर्टकट मंदारला कसा महागात पडला याची ही भयकथा.
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhc_4H54O7fsoZyASI2Pr-9pSgfinuD8qnOmHJgxFuC6UOjXVkYqpJxJSZ_SYn15U-0jRH67c2zYOF-lbmKNsf847QaIJ-xpus8wAHV6re4hzk-VgE3lkGLiCQcbYvlXaqVaeh-hodJ48kN/s1600-rw/bayangi-marathi-katha.webp
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhc_4H54O7fsoZyASI2Pr-9pSgfinuD8qnOmHJgxFuC6UOjXVkYqpJxJSZ_SYn15U-0jRH67c2zYOF-lbmKNsf847QaIJ-xpus8wAHV6re4hzk-VgE3lkGLiCQcbYvlXaqVaeh-hodJ48kN/s72-c-rw/bayangi-marathi-katha.webp
मराठीमाती । माझ्या मातीचे गायन
https://www.marathimati.com/2018/09/bayangi-marathi-katha.html
https://www.marathimati.com/
https://www.marathimati.com/
https://www.marathimati.com/2018/09/bayangi-marathi-katha.html
true
2079427118266147504
UTF-8
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची