सात दिवस आणि सहा रात्री - भाग ३ (भयकथा) - मित्रांच्या सहा दिवसांच्या पिकनिकचे रहस्य उलगडणाऱ्या भयकथेचा भाग ३.
सहा दिवसांच्या पिकनिकचे रहस्य उलगडणारी भयकथा
सात दिवस आणि सहा रात्री - भाग ३ (भयकथा)
(Saat Diwas Aani Saha Ratri Part - 3 - Marathi Katha) पिकनिकमध्ये काही मित्रांना सस्पेंन्स, भयानक घटना अनुभवन्यास मिळतात व इथेच मैत्री, प्रेम आणि आयुष्याची खरी किंमत त्यांना कळते या मित्रांच्या सहा दिवसांच्या पिकनिकचे रहस्य उलगडणारी भयकथा.
ती बेसावध असलेने तिला हा धक्का खूप जोराचा बसतो व तिच्या हाताला थोडी दुखापत होते. नेहाला या गोष्टीचा राग येतो. अजिंक्य नेहाला सावरायला जात असतो. पण प्रार्थनाने त्याचा हात धरून ठेवलेला असतो. व ती नेहाकडे रोखून पाहत असते. तेवढ्यात तिथे विवेक व किरण हे दोघे येतात. विवेक नेहाला सावरतो तो नेहाला विचारतो, ‘नेहा काय झालं?’ त्यावर ती घडलेला प्रकार सांगते. पण अजिंक्य व विवेकच्या समजुतदाराने तो वाद तिथेच मिटतो.
ते सर्वजण दुपारच्या जेवणाला डायनिंग हॉलमध्ये जमतात सर्वजण आपली आवडती डिश ऑर्डर करतात. प्रार्थना मात्र आपल्यासाठी मांसाहारी जेवणाची डिश ऑर्डर करते. तिची ऑर्डर ऐकूण सर्वजण चकीत होतात. सर्वांना प्रश्न पडतो कि ही शुध्द शाकाहारी असलेली ही मुलगी आज मांसाहारी जेवण मागवते म्हणजे काय? सर्वजण याच गोष्टीचा विचार करत असतात तोवर टेबलावर जेवणाच्या डिश येतात. प्रार्थनाच्या नाकात मांसाहरी जेवणाचा वास जातो. ती मान वर करून डोळे उघडते सर्वजण तिलाच पाहत असतात ती त्या मांसाहरी जेवणावर अशी तुटून पडते कि एक हिंस्त्र जनावर आपल्या भक्षावर. एरवी तिचे सुंदर दिसणारे डोळे आज लाल भडक दिसत असतात. ती ज्या पद्धतीने जेवत असते ते पाहून बाकीच्या मित्रांना अगदीच किळस येते.
ते सर्व तिच्यापासून लांब होऊन उभे राहतात. अचानक जेवत असताना तिला एक भयंकर मोठी उचकी येते व ती त्या डायनिंग टेबलवर एकदम कोसळते. ते पाहून अजिंक्य तिच्या जवळ जातो. तिला एक - दोनदा हाक मारतो. पण ती काहीच बोलत नाही हे पाहून तिला उचलून आपल्या बेडरूममध्ये घेऊन जातो. तिला पलंगावर झोपवून बेडरूमचे दार बाहेरून लॉक करतो व विवेक आणि नेहा यांच्या रूममध्ये येतो. ती सर्वजण चिंतेत असतात. किरण अजिंक्यला विचारतो, “अज्या, अचानक काय झालं प्रार्थनाला? ती अशी का बिहेविअर करू लागली आहे?” यावर अजिंक्य म्हणतो, “अरे यार, मला काहिच माहित नाही ती अशी का वागत आहे ते. तिच्या हाताला कसलीतरी जखम झाली आहे.” नेहा म्हणते, “तिला मांसाहरी डिश आवडत नाही त्यावरून असे वाटले कि ही आपली प्रार्थना होती कि आणखी कोण?” नेहाच्या या बोलण्याने अजिंक्य दुःखी होतो त्याला काही क्षणांसाठी रडू कोसळते पण विवेक व नेहा त्याला सांभाळतात.
त्यासर्व घटनांना वैतागून किरण म्हणतो, “शीट यार, आपण इथे कशासाठी आलेलो होतो व काय होत आहे. यू नो गाईज, सेलिब्रेट करण्यासाठीच तर आपण इथे आलेलो होतो.” तेवढयात काळोख पसरतो. अजिंक्य आपल्या रूमकडे जात असतो. त्याला सतत प्रार्थनाची काळजी सतावत असते. रूमचे दार उघडुन आत जातो व रूमच्या आतील दृष्य पाहून एकदम चकीत होतो. रूमच्या प्रत्येक भिंतीवर बदामच्या आकाराचे फुगे लावलेले असतात. पलंग एखाद्या सुहागरात्रीसारखा सजवलेला असतो. सर्वत्र लाल -पिवळ्या रंगाचे दिवे फुलांच्या माळा व वातावरणात एक प्रकारचा मंद सुगंध दरवळत असतो. तो दोन पावले पुढे येतो व अचानक रूमचे दार झाकले जाते. पलंगाच्या टेबलावर एक पत्र ठेवलेले असते. त्या पत्रावर एक प्रेमाची शायरी लिहिलेली असते. त्या शायरीत अजिंक्य व प्रार्थनाच्या लव्ह रिलेशनबाबत लिहिलेले असते. अजिंक्य ते पत्र वाचणार इतक्यात प्रार्थना तिथे येते.
प्रार्थनाने आज संपूर्ण अंगावर लाल रंगाचा ड्रेस परिधान केलेला असतो. तिची केशभूषा अत्यंत सुंदर असते. तिच्या हातात एक केक असतो. ती पूर्वीपेक्षा फार सुंदर व रोमॅंटिक दिसत असते. तिच्या डोळ्यात एक प्रकारची वासना दिसत असते. ती अजिंक्यजवळ येते. तो तिला काही विचारणार इतक्यात ती त्याच्या ओठांवर आपले बोट ठेवते व त्याच्या कानात म्हणते, “शूऽऽऽ आज काहीच बोलू नकोस. आजच्या रात्री आपल्याला लव्ह रिलेशनशीप मध्ये येऊन दोन वर्षे पूर्ण झाली आहेत व सेलिब्रेट करायला आपण या सायलेंट व्हॅली परिसरात आलेलो आहोत.” असे म्हणून ती त्याच्या समोर केक धरते व त्याला कट करायला सांगते.
अजिंक्य केक कट करतो प्रार्थना तो कट झालेला पीस आपल्या तोंडात धरते व तशीच अजिंक्यला घेवून पलंगावर पडते. तिथे त्यांचा धूंद प्रणय सुरू होतो. प्रार्थनाच्या शरीरात शिरलेली ती अतृप्त शक्ती एक स्त्री आत्मा असते व ती आपली अतृप्त कामेच्छा अजिंक्यकडून पूर्ण करवून घेते. रात्रभर त्यांचा धुंद प्रणय सुरू असतो. ती अतृप्त स्त्री आत्मा प्रार्थनाच्या शरीराचा वापर करून अजिंक्यकडून आपल्या सर्व प्रकारच्या कामेच्छा पूर्ण करवून घेते.
दिवस उजाडतो. अजिंक्य पलंगावर पडून असतो. त्याची अवस्था फार बिकट झालेली असते. तो शरीराने पूर्ण थकलेला असतो. प्रार्थनाची न संपणारी, न शांत होणारी कामेच्छा अनुभवून तो अचंबित झालेला असतो. विवेक, किरण व नेहा त्या रूममध्ये येतात अजिंक्यला असे निपचीत पडलेला पाहून किरण व विवेक त्याच्या जवळ जाऊन त्याला जागे करतात. नेहा अजिंक्यला प्रार्थनाबद्दल विचारते. तो काहीही न बोलता फक्त बाथरूमकडे बोट दाखवतो. बाथरूमचे दार उघडून प्रार्थना बाहेर येते.
ती नेहमीपेक्षा फार आनंदित व उत्तेजित झालेली असते. ती तिथे आलेल्या सर्वांशी बोलायला लागते. काल आपण आपल्या मित्रांशी कसे वागलो आहोत याचा तिला जरा देखील थांगपत्ता नसतो. ती सर्वांना अगदीच कॅज्यूअली पद्धतीने म्हणते, “चला, आपण ब्रेकफास्ट करू व उरलेले स्पॉट्स पाहू.” पण ते सर्वजण संदिग्ध अवस्थेमध्ये असतात. प्रार्थना त्यांना पुन्हा एकदा ‘चला’ असे म्हणते. नेहा तिला ‘तू हो पुढे, आम्ही येतो’ असे म्हणून कटवते. प्रार्थना तिथून गेल्यावर विवेक अजिंक्यला धीर देत त्याच्या अवस्थेबाबत त्याला विचारतो.
अजिंक्य त्या सर्वांना रात्रीचा घडलेला प्रकार सांगतो. ते ऐकूण तिघेही हबकतात. नेहा अजिंक्यला म्हणते, “अजिंक्य, इफ यू डोण्ट माईंड. आम्ही काल रात्रभर या गोष्टींचा विचार करत होतो व तू सांगितलेली घटना आणि प्रार्थनाचे बिहेविअर पाहता या सर्व घटना नॉर्मल माणसाच्या हातून घडणार्या नाहीत.” विवेक तिला विचारतो, “म्हणजे नक्की काय म्हणायचे आहे तुला? प्रार्थना अॅबनॉर्मल आहे?” यावर नेहा म्हणते, “नाही. मला तसे म्हणायचे नाही. म्हणजे पाहा ना या आधी अशी वागली आहे का प्रार्थना आपल्याशी.”
“आपण येथील काही ठिकाणे पाहायला गेलो व तिथून आल्यापासून प्रार्थना अशी वागू लागली आहे. हे गाईज्, रागवू नका थोडं स्पष्ट बोलते. प्रार्थनाच्या बाबतीत काही भूतप्रेतांचा त्रास तर नाही ना घडत.” विवेक नेहाला यावर रागवून म्हणतो, “शट आप नेहा, व्हॉट आर यू सेयिंग, ही वेळ आहे का हे सर्व बोलायची.” किरण विवेकला म्हणतो, “नाही विवेक मला नेहा बोलते ते खरे वाटत आहे.” विवेक यावर वैतागून म्हणतो, “वा! काय मित्र भेटले आहेत आपल्याला.” अजिंक्य नेहाला सौम्य आवाजात म्हणतो, नेहा माझा या गोष्टींवर विश्वास नाही.
मग ते सर्वजण ब्रेकफास्ट करायला जातात. प्रार्थना त्यांना म्हणते, “अरे, केव्हाची मी इथे तुमची वाट पाहत आहे.” ते सर्वजण तिला अगदी सावधपणे पाहत असतात. त्यांची ही अवस्था पाहून प्रार्थना त्यांना म्हणते, “अरे, काय पाहता मला तुम्ही असे.” यावर ते चारही जण भानावर येतात व ब्रेकफास्ट करून उरलेले पिकनिक पॉईंट्स पाहायला बाहेर पडतात. ते लॉजपासून थोड्या अंतरावर बाहेर येतात त्याचवेळी प्रार्थनाच्या शरीरातील अतृप्त स्त्री आत्मा पुन्हा जागृत होते. तिची कामेच्छा पुन्हा एकदा बाहेर येते आणि ती प्रार्थनाकरवी पूर्ण करवून घेण्यासाठी तिच्याकडून एक नाटक करवून घेते. अचानक प्रार्थनाचा पाय मुरगळतो व ती खाली बसते ती अजिंक्यला म्हणते, “आऊच! अजिंक्य माझा पाय खूप दुखत आहे रे. मी आणखी नाही चालू शकत. प्लीज मला रूमवर घेवून चल.” तिचा पाय खराखुरा मुरगळलेला असतो.
क्रमशः
सात दिवस आणि सहा रात्री - मराठी कथा (कथेचे सर्व भाग):
- सात दिवस आणि सहा रात्री भाग १
- सात दिवस आणि सहा रात्री भाग २
- सात दिवस आणि सहा रात्री भाग ३
- सात दिवस आणि सहा रात्री भाग ४
- सात दिवस आणि सहा रात्री भाग ५
खुप छान लिखाण आहे.... वाचताना अकरशः चित्रं डोळ्यासमोर येतात.....
उत्तर द्याहटवाभाग ४ वाचण्याची खुप उत्सुकता आहे.....
‘सात दिवस आणि सहा रात्री’ या भयकथेचे ‘भाग ४’ आणि अखेरचा ‘भाग ५’ अनुक्रमे उद्या आणि परवा प्रकाशित होत आहेत.
हटवाआपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद.