सात दिवस आणि सहा रात्री - भाग २ (भयकथा) - मित्रांच्या सहा दिवसांच्या पिकनिकचे रहस्य उलगडणाऱ्या भयकथेचा भाग २.
सहा दिवसांच्या पिकनिकचे रहस्य उलगडणारी भयकथा
सात दिवस आणि सहा रात्री - भाग २ (भयकथा)
(Saat Diwas Aani Saha Ratri Part - 2 - Marathi Katha) पिकनिकमध्ये काही मित्रांना सस्पेंन्स, भयानक घटना अनुभवन्यास मिळतात व इथेच मैत्री, प्रेम आणि आयुष्याची खरी किंमत त्यांना कळते या मित्रांच्या सहा दिवसांच्या पिकनिकचे रहस्य उलगडणारी भयकथा.
आता त्यांची जीप ‘सायलेंट व्हॅली’मधील एका लॉज समोर येते. ते लॉज खुप मोठे असते. अजिंक्य त्या सर्वांना ‘आपण या लॉजमध्ये रहायचे का?’ असे विचारतो. यावर नेहा, विवेक, किरणकडून ‘मी तयार आहे’ असे उत्तर येते. मग तो हाच प्रश्न प्रार्थनाला विचारतो. प्रार्थना अजून त्याच विचारात असते. अजिंक्यला तिची ती मुद्रा थोडी विचित्र वाटते. तो तिला एक दोनदा हाक मारतो. मग ती एकदम दचकते. अजिंक्य तिला विचारतो, कुठे हरवली आहेस? ती त्याला मान डोलवून कुठेही नाही असे सांगते. अजिंक्य तिला विचारतो आपण या हॉटेलमध्ये रहायचे का? प्रार्थना त्या लॉज, हॉटेलच्या दिशेने पाहते. तिला तिचे मन सांगत असते कि या लॉजच्या ठिकाणी काहीतरी गडबड आहे. आपण इथे रहायला नको.
ती काही सांगणार इतक्यात अजिंक्य जीप स्टार्ट करून लॉजच्या गेटमधून आत प्रवेश करतो. पुढे रूम बुक करण्यासाठी ते पाचजण काऊंटरवर असलेल्या व्यक्तीकडे जातात. प्रार्थना त्या लॉजच्या आसपास चौफेर नजर फिरवत असते. अजिंक्य आपली रूम बुक करतो व चावी प्रार्थनाच्या हातात देतो आणि तिला पुढे जायला सांगतो. बाकीची मित्रमंडळी देखील आपली रूम बुक करतात व फ्रेश होण्यासाठी रूममध्ये जातात. अजिंक्य आपल्या रूममध्ये येतो. दार उघडुन तो हॉलमध्ये येतो व समोर नजर टाकतो तर त्याला एक लाल रंगाचा ड्रेस परिधान केलेली, मोकळे केस सोडलेली व अगदी प्रार्थना सारखी दिसणारी तरूण मुलगी दिसते.
ती त्याला पाठ करून उभी असते. अजिंक्य आपले जॉकेट काढत त्या मुलशी बोलू लागतो. “अजून तू माझ्यावर नाराज आहेस? प्रवासात देखील खूप शांत होती तू.” पण त्याला त्या दिशेने काहीच उत्तर येत नाही. आता अजिंक्यला सायलेंट व्हॅलीच्या थंड वातावरणात व प्रार्थनासारख्या दिसणार्या मुलीची वेशभूषा पाहून तिच्याशी सेक्स प्रणय करण्याची इच्छा होते व त्या इच्छेनेच तो तिच्याजवळ जातो. तिला मिठीत घेऊन तिचे मानेवरचे केस बाजूला सारून एक चुंबन घेतो व प्रणयाला सुरवात करतो. इतक्यात त्याला बाथरूमच्या दिशेने दार ठोठावल्याचा व ‘अजिंक्य’, ‘अजिंक्य’ अशी हाक ऎकू येते. सुरवातीला तो दुर्लक्ष करतो.
पण नंतर त्याला तो आवाज प्रार्थनाचा असल्याची जाणीव होते व अजिंक्य बाथरूमच्या दिशेने पाहतो. तर त्याच्या मिठीतील तरूणी अचानक नाहीशी होते. त्याला क्षणभर काय झाले हे कळतच नाही. बाथरूममधून प्रार्थनाच्या ओरडण्याचा आवाज ऐकून नेहा, किरण, विवेक त्या रूममध्ये येतात. नेहा बाथरूमचा दरवाजा उघडते तर अजिंक्यला तिथे प्रार्थना दिसते. प्रार्थना बाथरूममधून अजिंक्यला रागवत बाहेर येते. पण नेहा तिला शांत करते व म्हणते, “ए बाबांनो, तुम्ही पुन्हा नका सुरू होऊ. अजिंक्य तू पटकन फ्रेश हो व डायनिंग हॉलमध्ये लंचला ये.” ते चारही जण खाली डायनिंग हॉलमध्ये जातात.
अजिंक्य आपल्याला भास झाला असेल असे समजतो व तोही फ्रेश होऊन डायनिंग हॉलमध्ये जातो. सर्वजण गप्पागोष्टी करत जेवण करतात. जेवण झाल्यावर अजिंक्य प्रार्थनाला बाहेर येण्याबाबत विचारतो. सुरवातीला ती ‘नाही’ म्हणत असते पण इतर मित्राच्या सांगण्यावर ती जायला तयार होते. ते दोघे लॉजच्या बाहेर फिरण्यासाठी जातात. दोघेही शांत असतात मग अचानक प्रार्थना अजिंक्यला म्हणते, “अजिंक्य, मी इतका वेळ तुला आवाज देत होते. दार ठोठावत होते. तरी तुझे लक्ष नव्हते. मी किती घाबरले होते.” अजिंक्य तिला दिलगिरी व्यक्त करत सॉरी, सॉरी प्रार्थना म्हणतो. यावर प्रार्थना त्याला म्हणते, “तुझं नेहमीच आहे हे. आधी चूक करायची मग सॉरी बोलायचं. त्यादिवशी देखील असेच केलेस. तुला माहितेय कि आपले लव्हशीप रिलेशन सुरू होऊन उद्या दोन वर्षे पूर्ण होत आहेत. पण तुला त्याचं काहीच नाही.” असे म्हणून ती नाराज होऊन जात असते.
तेवढ्यात अजिंक्य तिच्या हात पकडून प्रेमाने तिला आपल्याकडे खेचतो व तिला म्हणतो, ‘ओ माय स्वीट हार्ट’, तू नाराज कशी होते लगेच? प्रार्थना त्याला म्हणते, ‘तू असे वागतो म्हणून’. अजिंक्य म्हणतो, ‘असे म्हणजे?’ प्रार्थना म्हणते, ‘वेंधळ्यासारखे’ व हसू लागते. तेव्हा अजिंक्य आपल्या हातांनी तिच्या गालावरचे केस बाजूला सारून आपले ओठ तिच्या गुलाबी मऊ ओठांवर ठेवून एक दिर्घ चुंबन घेतो. ते जिथे उभे असतात तेथून थोडयाच अंतरवर एक घनदाट जंगल असते व त्या जंगलातून तिथे असलेली एक अतृप्त शक्ती त्यांना पाहत असते. त्यांना त्या अवस्थेमध्ये पाहून त्या अतृप्त शक्तीचा जळफळाट होतो व अचानक उंच आकाशात वटवाघूळ पक्षांचा थवा कल्लोळ करतो व त्या आवाजाने ते दोघेही दचकतात व त्यांचे मित्र त्यांना शोधत बाहेर येतात व नेहा त्या दोघांना म्हणते, “खूप रात्र झाली आहे. रूमवर चला.” व ते रूमवर जाऊन झोपी जातात.
मध्यरात्रीचे बारा वाजलेले असतात. सर्वजण झोपी गेलेले असतात. पण तेव्हा प्रार्थना व अजिंक्य यांच्या रूमबाहेरून एक सावली ये - जा करत असते. अचानक प्रार्थनाला जाग येते. बहुधा ती पाणी प्यायला उठलेली असते. तिची नजर त्या सावलीकडे जाते. दार उघडून बाहेर डोकावते तर बाहेर कोणी नसते. पुन्हा ती सावली तिला पॅसेजच्या बाहेर जात असलेली दिसते. ती त्या सावलीच्या मागे जाते व लॉजच्या हॉलमध्ये येते. तिथे कोणीही नसते ती सावलीही दिसेनाशी होते व तेवढयात घडयाळाच्या गजरचा आवाज होतो. आणि दूरवरून कोल्हेकुई व कुत्री रडण्याचा आवाज प्रार्थनाच्या कानी येतो. ती या सर्वांकडे दुर्लक्ष करून रूमकडे जाणार इतक्यात एक भयानक मोठी किंचाळी तिला ऐकू येते. आता ती लॉजचे दार उघडुन बाहेर येते. दचकत दचकत पुढे जाते तेवढ्यात तिच्या पाठीवर एक वेडसर झालेला तरूण अचानक हात टाकतो.
प्रार्थना घाबरून मागे पाहते त्या वेडसर तरूणाची वेशभूषा पाहून तर ती आणखी जास्त घाबरते. तो तिला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असतो पण ती घाबरून आरडाओरडा करते. तिच्या ओरडण्याने लॉजचे वॉचमन व तिचे मित्रमंडळी जागे होतात तो वेडसर तरूण तिला शूऽऽ शूऽऽ करून शांत बसवत असतो. तेवढ्यात वॉचमन अजिंक्य आणि बाकीचे मित्र तिथे येतात. वॉचमन त्या वेडसर तरूणाला तिथून हकलवून लावतात. अजिंक्य प्रार्थनाला विचारतो ‘इथे काय करत आहेस?’ विवेक वॉचमनला त्या माणसाबाबत विचारतो. वॉचमन सांगतात, तो माणूस वेडा आहे दोन वर्षापासून इथे घुटमळत आहे. त्याला अनेकवेळा मेंटल हॉस्पिटलमध्ये भरती करूनही तो सतत तिथून पळून जातो. विवेक व किरण वॉचमनशी त्या माणसावरून वाद घालत असतात. अजिंक्य दोघांना शांत करतो व ते झोपण्यासाठी जातात.
आता त्यांचा ट्रिपमधला दुसरा दिवस उजाडतो. ते सर्व मित्र सायलेंट व्हॅलीतील निसर्गरम्य पिकनिक पॉईंट्स बघण्यासाठी बाहेर पडतात. घनदाट जंगल रंगीबेरंगी पक्षी, झाडे इ. तिथून थोड्याच अंतरावर एक खोल दरी असते. त्या दरी शेजारी एक झाड असते त्या झाडावर एक सुंदर पक्षी चिवचिवाट करत असतो. प्रार्थना त्या पक्षाचा अवाज ऐकूण त्या दरीजवळ जाते. ती त्या झाडाखाली जाऊन थांबते. झाडाच्या बुंध्याला हात लावून उभी असते. अचानक तिच्या हाताला झाडाचा खडबडीतपणा टोचतो व ती आपला हात लगेच मागे घेते. पण तोवर तिच्या हातातून रक्त येत असते. ती आपल्या हाताला झालेली जखम पाहते व नकळत तिच्या जखमेतून रक्ताचे एक - दोन थेंब त्या खोल दरीत पडतात. तिला हे समजत नाही. तेवढ्यात अजिंक्यची हाक तिला ऐकू येते. ती मागे वळून पाहते तेवढ्यात तिला मागे वार्याचा एक झोका स्पर्श करतो.
प्रार्थनाला हा स्पर्श थोडा विचित्र वाटतो. ज्या रात्री प्रार्थना व अजिंक्य रोमान्स करत असतात व जी अतृप्त शक्ती त्यांना पाहत असते, ती शक्ती आता प्रार्थनाच्या रक्ताने जागृत झालेली असते व प्रार्थनाच्या शरीरात प्रवेश करते. प्रार्थनाला शोधत अजिंक्य व नेहा तिथे येतात. तेव्हा प्रार्थना त्यांना पाठ करून उभी असते. वार्याने तिचे केस उडत असतात. तिला पाहून अजिंक्य नेहाला म्हणतो, ‘हि बघ इथे उभी आहे आणि आपण तिला केव्हाचा आवाज देत आहोत.’ नेहा म्हणते, ‘प्रार्थना, कम ऑन यार चल पटकन’ व दोघेही तिच्या जवळ जातात.
अजिंक्य प्रार्थनाला हाक देतो ‘प्रार्थना, हॅलो.’ तेव्हा अचानक प्रार्थना अजिंक्यला मिठीत घेते. अजिंक्य म्हणतो, ‘ए काय झालं तुला यार.’ नेहा म्हणते, ‘घाबरली असेल’ असे म्हणून हसते. तिच्या बोलण्याचा प्रार्थनाला राग येतो. ती अचानक नेहाला जोराचा धक्का देते व नेहा खाली कोसळते.
क्रमशः
सात दिवस आणि सहा रात्री - मराठी कथा (कथेचे सर्व भाग):
- सात दिवस आणि सहा रात्री भाग १
- सात दिवस आणि सहा रात्री भाग २
- सात दिवस आणि सहा रात्री भाग ३
- सात दिवस आणि सहा रात्री भाग ४
- सात दिवस आणि सहा रात्री भाग ५
अभिप्राय