सात दिवस आणि सहा रात्री - भाग १ - मराठी कथा - [Saat Diwas Aani Saha Ratri Part - 1 - Marathi Katha] मित्रांच्या सहा दिवसांच्या पिकनिकचे रहस्य उलगडणाऱ्या भयकथेचा भाग १.
सहा दिवसांच्या पिकनिकचे रहस्य उलगडणारी भयकथा
सात दिवस आणि सहा रात्री - भाग १ (भयकथा)
(Saat Diwas Aani Saha Ratri Part - 1 - Marathi Katha) पिकनिकमध्ये काही मित्रांना सस्पेंन्स, भयानक घटना अनुभवन्यास मिळतात व इथेच मैत्री, प्रेम आणि आयुष्याची खरी किंमत त्यांना कळते या मित्रांच्या सहा दिवसांच्या पिकनिकचे रहस्य उलगडणारी भयकथा.
नाशिक शहरातील ‘सेंट मेरी अॅण्ड जोसेफ’ या टेक्निकल एज्यूकेशन कॉलेजमधील स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमामधून कॉलेजची सर्वात सुंदर, रूपवान मुलगी प्रार्थना हिचा परफॉर्मन्स होणार असतो. ती आपल्या मेकअप रूममध्ये असते. तिच्या मित्रमंडळींपैकी किरण हा प्रेक्षक वर्गात बसलेला असतो तर नेहा व विवेक बाईकवरून कॉलेजमध्ये येतात. त्यांची किरणशी भेट होते. विवेक किरणला विचारतो कि “अज्या, अजिंक्य अजून आला नाही ? किरण म्हणतो, “मी त्याला बर्याच वेळापासून फोन करत आहे. पण तो माझा फोन उचलत नाहीये.” यावर नेहा म्हणते, “अजून तरी यांचा अबोला मिटला नाही बहुतेक ?”.
तेवढयात प्रार्थनाच्या परफॉर्मन्सची घोषणा होते. ते तिघेही आत जातात. प्रार्थना एका मराठमोळ्या वेशभूषेत स्टेजवर येते. छान पोपटी रंगाची साडी. केसांचा अंबाडा व त्याला माळलेली गजरा - वेणी आणि तिला निसर्गकृपेने मिळालेले नखशिखांत सौंदर्य यांमुळे ती एका हिर्याप्रमाणे चमकत होती. तिने एका मराठी लावणीवर जबरदस्त ठेका धरला. तिच्या नृत्यावर उपस्थितांनी टाळ्या - शिट्टयांचा अक्षरशः पाऊस पाडला. प्रार्थनाच्या नृत्याने त्या स्नेहसंमेलनाची सांगता होते. प्रार्थनाशी त्या तिघांची गाठ पडते. नेहा प्रार्थनाजवळ जाते. प्रार्थना आपली आवरावर करत असते. नेहा तिचे अभिनंदन करते. प्रार्थना तिला आपल्या नृत्याबाबत विचारते व त्या दोघी मेकअप रूमच्या बाहेर पडतात. नेहाला मनात वाटते कि ही आपल्याला अजिंक्यबाबत काही विचारेल तर ही स्वतःच्या नृत्याबाबत विचारत आहे.
त्या दोघी किरण व विवेक जिथे थांबले आहेत तिथे जातात. त्या चौघांच्यात अजिंक्यचा विषय निघणार इतक्यात अजिंक्य त्यांच्या पासून थोडे लांब अंतरावर जीप घेऊन येतो. नेहाला तो दिसतो. ती ‘अजिंक्य’ अशी हाक देते. किरण व विवेक त्याला पाहून आनंदित होतात. प्रार्थना अजिंक्याला पाहते व रागाने पाठमोरी उभी राहते. अजिंक्य त्यांच्या जवळ येतो. नेहा प्रार्थनाला म्हणते, “प्रार्थना, अगं बघ. अजिंक्य आला आहे.” प्रार्थना तिच्या बोलण्यावर काहीच उत्तर देत नाही.
अजिंक्य त्या सर्वांना इशार्याने शांत रहा असे सांगतो. तो आपले हात प्रार्थनाच्या खांद्यावर ठेवतो आणि शूऽऽऽ असे उच्यारतो, पण प्रार्थना त्याचे हात झिडकारून दोन पावले पुढे जाते. इथे प्रार्थनाची अवस्था फार बिकट झालेली असते. तिचे डोळे पाणवलेले असतात. तिचे एक मन असे सांगत असते की सगळे विसरून अजिंक्यला आपल्या मिठीत घ्यावे पण दुसरे मन म्हणते कि मी एक संवेदनशील मुलगी आहे. उलट अजिंक्यनेच माझी माफी मागावी.
या घटनेवर किरण जाम वैतागतो व प्रार्थनाला म्हणतो कि ‘ए प्रार्थना, आता बस झालं यार, तुम्ही मुली खूप इगो जोपासता.’ विवेक किरणला शांत बसवत असतो. किरण त्यालाही म्हणतो कि ‘बघ ना यार, आता अजिंक्य स्वतः आला आहे तरीही ही अशी करते.’ यावर अजिंक्य म्हणतो कि ‘आफ्टर ऑल शिज् माय लव्ह बर्ड’ असे म्हणून तिच्या समोर गुलाबाचे फुल धरून एका गुडघ्यावर बसून तिला प्रपोज करतो व तिला मनवण्याचा प्रयत्न करतो. प्रार्थना देखील या घटनेवरून आपला राग विसरते व त्याचे फुल स्वीकारते आणि तिच्या पाणीदार डोळ्यातून अश्रू येतात व ती अजिंक्यला आपल्या मिठीत घेते.
यावर नेहा ‘वॉव’ असे म्हणत टाळ्या वाजवते. किरण मोठयाने ओरडून आनंद साजरा करतो. विवेक त्यांच्या जवळ जातो व त्यांना म्हणतो, ‘काय यार, तुम्ही दोघे नेहमी रूसवे फुगवे करता व आम्हाला बोअर करता. एनिव्हे सर्व काही ठिक होईल’ असे म्हणून तो सुटकेचा निश्वास सोडतो. नेहा म्हणते, ‘अरे, आता दोन दिवसांवर तुमची ‘लव्ह अॅनिव्हर्सरी’ आली आहे व या अॅनिव्हर्सरी निमित्त व कॉलेजला ख्रिसमसची सुटी असलेने आपण नेहमीच्या रूटिनमध्ये बदल करणेसाठी आपण सर्वजण कुठेतरी बाहेर ट्रिपला जावूया. विवेक व किरणला नेहाची कल्पना फार आवडते.
किरण म्हणतो, पण जायचे कुठे? या प्रश्नावर बर्याच वेळेपासून शांत व इनोसंट असलेल्या प्रार्थनाच्या तोंडून ‘सायलेंट व्हॅली’ या केरळ राज्यातील एका पर्यटन स्थळाचे नाव बाहेर येते. ते ठिकाण सर्वांना पसंत पडते व ते सर्वजण अजिंक्य व प्रार्थनाच्या ‘लव्ह अॅनिव्हर्सरी’ च्या दिवशी म्हणजेच २५ डिसेंबर २०१७ रोजी आपल्या घरातील मंडळींची परवानगी घेऊन पहाटे पाच वाजता नाशिकमधून सायलेंट व्हॅली या पिकनिक पॉईंटकडे रवाना होतात. प्रवासी वाहन म्हणून अजिंक्यची जीप असते. तसा नाशिक ते सायलेंट व्हॅली हा प्रवास बावीस तासांचा असतो. ते तिघेही आलटून पालटून ड्रायव्हिंग करत असतात. आता ते मुंबई - गोवा महामार्गावर असतात व यांची ही ट्रिप ‘सहा दिवस आणि सात रात्रींची’ असते. त्यांना मार्गात कोकणचे नयनरम्य सौंदर्य पाहावयास मिळते. प्रवासात त्यांची मजामस्ती सुरू असते. एकमेकांचे फोटो काढणे, सेल्फी काढणे इ. प्रकार सुरू असतात. प्रार्थनाही अजिंक्यचा हात हाती घेऊन त्याच्या खांद्यावर डोके ठेवून निषचित पडलेली असते.
‘आत्तापर्यंत आपण पाहिले कि नाशिकमधील एक पाच मित्र - मैत्रिणींचा ग्रुप कॉलेजला सुट्टी असलेने व अजिंक्य आणि प्रार्थनाचे हरवलेले प्रेम परत मिळविण्यासाठी केरळ मधील हिल स्टेशन सायलेंट व्हॅलीकडे सहा दिवस मजामस्ती व त्या दोघांची लव्ह अॅनिव्हर्सरी साजरी करण्यासाठी जातात. पण हि ट्रिप त्यांच्या आयुष्याला एक वेगळी कलाटनी देणारी ठरते. या पिकनिकमध्ये त्यांना सस्पेंन्स, भयानक घटना अनुभवयाला मिळतात व इथेच त्यांना मैत्री, प्रेम आणि आयुष्याची खरी किंमत कळते व त्यांची सहा दिवसांची पिकनिक ‘सात दिवस सहा रात्रींची’ कशी होते हे आता पाहुयात..
आता ते पाचजण उटीतील एका हॉटेलमध्ये जेवणासाठी थांबलेले असतात. उटीतून सायलेंट व्हॅली या परिसराचे अंतर अगदीच चार तासांचे असते. अजिंक्य व विवेक बिल द्यायला काउंटरवर जातात. प्रार्थना त्यांच्या मागे उभी असते. बिल घेणारी व्यक्ती त्या हॉटेलची मालक असते. त्या काउंटरच्या मागच्या भिंतीवर प्रवाशांसाठी ‘हॅप्पी जर्नी’ नावाची एक पाटी लिहिलेली असते. प्रार्थना ती पाटी पाहत असते. बिल घेताना तो हॉटेलचा मालक त्या दोघांना हिंदीमधून विचारतो कि “आप कहॉं जा रहे हो सहाब?”
“हम सायलेंट व्हॅली जा रहे है।”
अजिंक्यच्या तोंडून निघालेले ते उत्तर ऐकून तो हॉटेलमालक थोडा दचकतो. का कोणास ठाऊक त्याला वाटत असते कि या मुलांनी तिकडे जाऊ नये तो हाच विचार करत असतो. तेवढ्यात विवेक त्याच्यासमोर चुटकी वाजवून त्याला भानावर आणतो व त्याला म्हणतो कि ‘कहॉं खो गये अंकल, जल्दी पैसे दे दिजीये हमे अभी आगे जाना है।’ यावर तो हॉटेल मालक त्यांना तातडीने त्यांचे पैसे देऊन टाकतो.
प्रार्थनाला त्याचे हे वागणे थोडे खटकते. मिळालेले पैसे घेऊन अजिंक्य व विवेक जीपच्या दिशेने चालू लागतात अजिंक्य प्रार्थनाचा हात आपल्या हातात धरतो. पण प्रार्थनाला थोडी भीती व अस्वस्थता वाटू लागते आपल्याला पुढे काही धोका नाही ना? हा प्रश्न तिच्या मनात सतत येत असतो व ती त्याच विचारात मागे वळून पाहते तर काउंटरवरील हॅप्पी जर्नीची पाटी थोडी तिरकी झालेली असते व भिंतीतून रक्तासारखा द्रवपदार्थ बाहेर येत असतो. हि घटना ती अजिंक्यला सांगणार इतक्यात किरण व नेहा त्या तिघांना ओरडून आवाज देतात. किरण त्या दोघांना म्हणतो ‘अरे यार, चला ना लवकर. किती उशीर लावताय, सायंकाळ व्हायच्या आत आपल्याला तिथे पोहचावे लागेल.’ यावर अजिंक्य म्हणतो, ए प्रार्थना, विवेक तुम्ही लवकर बसा. ड्रायव्हिंग मी करतो. व ते आपला पुढचा प्रवास सुरू करतात.
आता ते कोईंबत्तूर व उटीच्या घनदाट जंगलातून सायलेंट व्हॅलीकडे जात असतात. पण प्रार्थनाच्या मनात त्या हॉटेलमालकाचे काही क्षणांसाठी विचित्र वागणे व त्या आसपासच्या वातावरणातून झाडांमधून आपल्याला कोणीतरी डोळे वटारून बघत असल्याचा भास होत असतो.
क्रमशः
सात दिवस आणि सहा रात्री - मराठी कथा (कथेचे सर्व भाग):
- सात दिवस आणि सहा रात्री भाग १
- सात दिवस आणि सहा रात्री भाग २
- सात दिवस आणि सहा रात्री भाग ३
- सात दिवस आणि सहा रात्री भाग ४
- सात दिवस आणि सहा रात्री भाग ५
Very good blogs
उत्तर द्याहटवाआपल्या अभिप्रायाबद्दल आभारी आहोत.
हटवा