भारतातील पहिले पेन काँग्रेस पुणे - लेखक, साहित्यिक, कवी, प्रकाशक, कलाकार यांच्यासाठी काम करणाऱ्या पेन इंटरनॅशनलचे भारतात पहिलेच अधिवेशन.
भारतातल्या पहिल्या पेन काँग्रेस मध्ये सहभागी होऊन माय मराठीची पताका डौलाने फडकवा
भारतातील पहिले पेन काँग्रेस पुणे येथे
(PEN International Congress in Pune - Event) लेखक, साहित्यिक, कवी, प्रकाशक, कलाकार यांच्यासाठी काम करणाऱ्या पेन इंटरनॅशनलचे भारतात पहिलेच अधिवेशन २४ ते २९ सप्टेंबर या दरम्यान पुणे येथे भरणार आहे.
पेन इंटरनॅशनल हि ९८ वर्षे सातत्याने कार्यरत असणारी वैश्विक पातळीवरची अशी एकमेव आणि जगविख्यात संस्था आहे.
- लेखकांचे हक्क सुरक्षित ठेवणे
- साहित्यिक, प्रकाशक, पत्रकार यांच्यात समन्वय साधणे
- ग्लोबलसाऊथ मधल्या देशातील साहित्यिकांना व्हिझिबिलिटी मिळवून देणे
- भाषांतर संस्कृती वाढवणे
- नागरिकांचे भाषा अधिकार जोपासणे / त्यांचे रक्षण करणे
इत्यादी कामे जी केवळ साहित्य संमेलने अथवा साहित्य मेळे भरवतात अश्या संस्था करू शकत नाहीत, पेन इंटरनॅशनल संस्था अशी कामे करत आली आहे.
या संस्थेची १८० हुन जास्त ‘पेन केंद्रे’ जवळपास १२० देशात पसरली आहेत. भारतात अशी तीन केंद्रे आहेत. ही सारी पेन-केंद्रे दरवर्षी प्रत्येकी दोन अधिकृत प्रतिनिधी आणि अन्य काही सभासद पाठवून पेन-काँग्रेस भरवतात. त्यात होणारे ठराव जगातील अनेक राष्ट्रांची सरकारे अत्यंत गंभीरपणे घेतात.
पेन काँग्रेसचे आपल्या देशातील महत्वाचे लेखक
यापूर्वी आपल्या देशातील महत्वाचे लेखक पेन इंटेरनशनलचे सभासद होते. त्यात ‘गुरुदेव रवींद्रनाथ टागोर’, ‘मुन्शी प्रेमचंद’, ‘पंडित जवाहरलाल नेहरू’, ‘निस्सीम इझिकेल’, ‘सलमान रश्दी’ हि नांवे घेता येतील.
रवींद्रनाथांची पेन काँग्रेसचे अधिवेशन भारतात भरवण्याची इच्छा होती, पण त्या वेळच्या युद्ध परिस्थिमुळे ते शक्य झाले नाही.
पेनच्या संपूर्ण इतिहासात पेन काँग्रेसचे एकही अधिवेशन भारतात साजरे झाले नाही. या वर्षी ते होत आहे, ही आपल्या देशातील सगळ्या साहित्यिकांसाठी अत्यंत आनंदाची बाब आहे.
जवळ जवळ गेले वर्षभर त्या आयोजनासाठी ‘पेन साऊथ इंडिया टीम’ प्रयत्नरत होती. येत्या पेन काँग्रेससाठी ५२ देशातील १७० नामांकित आणि बरेचसे जगविख्यात लेखक या निमित्ताने पुण्यात उपस्थित असतील.
पेन काँग्रेस दरम्यान होणाऱ्या जगातल्या अस्तित्वात असणाऱ्या ६००० भाषांची ‘जागतिक भाषा वारी’ निघेल तेंव्हा आपल्या माय मराठीची दिंडी सर्वात आघाडीवर असेल. ‘मराठी भाषा’ जगातील समग्र भाषांचे नेतृत्व करेल ह्या कल्पनेनेही आपण रोमहर्षीत होऊ.
भारतात होणारे खऱ्या अर्थाने हे जागतिक साहित्य संमेलन असेल आणि ते अत्यंत परखडपणे आणि गंभीरपणाने पार पडले जाईल. असे हे संमेलन महाराष्ट्रात होणार आहे, त्याचा सार्थ अभिमान आपल्यातल्या प्रत्येकाला वाटेल. पेन काँग्रेसचे स्वरूप संमेलना सारखे नसते. ते साधारणतः युनोच्या बैठकीसारखे असते. त्या बैठकीत आपल्या देशातील दोन प्रतिनिधि असतील.
जगभरातून येणाऱ्या मान्यवर साहित्यिकांनी आपल्या देशातील साहित्यिकांशी संवाद साधण्याची संधी उपलब्ध व्हावी आणि आपल्या साऱ्यांना त्यात सहभागी होता यावे यासाठी, सार्वजनिक कर्यक्रमांचे वेळापत्रक पुढील प्रमाणे असेल.
दिनांक २४-२५-२७-२८-२९ सप्टेंबर २०१८ रोजी खालील प्रमाणे खुले कार्यक्रम योजण्यात आले आहेत.
भारतातील पहिले पेन काँग्रेस - कार्यक्रम वेळापत्रक
दिनांक: २४ सप्टेंबर संध्याकाळी
वेळ: ६.०० वाजता
ठिकाण: बालगंधर्व रंगमंदिर, कला दालन, पुणे.
विषय: ‘भारतीय लिप्या आणि हस्तकला’ विषयीचे प्रदर्शन (उदघाटन)
दिनांक: २५ सप्टेंबर
वेळ: सकाळी ९.३० वाजता
ठिकाण: महात्मा फुले स्मारकाला भेट आणि वंदना (यात पेनचे अध्यक्ष व इतर पदाधिकारी उपस्थित असतील, हा कार्यक्रमसर्वांसाठी खुला असेल)
दिनांक: २५ सप्टेंबर ते २८ सप्टेंबर* कला गजर प्रदर्शन
ठिकाण: राजा रविवर्मा कला दालन घोले रोड, पुणे.
दिनांक: २५ सप्टेंबर
ठिकाण: सिंबाँयसिस डिझायनिंग स्कूल , विमान नगर छायाचित्र प्रदशंन
दिनांक: २६ सप्टेंबर
वेळ: सायंकाळी ६ वाजता
ठिकाण: पंडित जवाहरलाल नेहरू सांकृतिक भवन घोलेरोड, पुणे.
प्रसिद्ध चित्रकार गुलाम शेख यांचे व्याख्यान.
दिनांक: २७ सप्टेंबर
वेळ: दुपारी २ ते ५
ठिकाण: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
दक्षिणायन ह्या आंदोलन-बद्दलची मुक्त चर्चा
हिंदीकवी अशोक वाजपेयी ह्यांचे व्याख्यान व त्यानंतर रामदास भटकळ लिखित ‘जगदंबा’ ह्या नाटकाचा इंग्लिश मध्ये सादर केलेला एक-पात्री प्रयोग
दिनांक: २८ सप्टेंबर
वेळ: सकाळी ११ ते दुपारी ३ पर्यंत
ठिकाण: एस एम जोशी फौंडेशन सभागृह
विविध देशातील साहित्यिकांबरोबर चर्चा
दुपारी ३ ते सायंकाळी ५ पर्यंत ‘जागतिक भाषा वारी’
सायंकाळी ५ : ३०ते ७ : ०० पर्यंत केनयाचे जगविख्यात विचारक एनगुगी वा थियॉन्ग यांचे चिंतनात्मक व्याख्यान
दिनांक: २८ सप्टेंबरला
ठिकाण: वेगवेगळ्या २० शैक्षणिक संस्थांमध्ये
भारतीय साहित्यिक आणि परदेशातून अलेलले साहित्यिक यांचा संयुक्त व्याख्यानचा कार्यक्रम
दिनांक: २९ सप्टेंबर
वेळ: दुपारी ३ ते संध्याकाळी ८ पर्यंत
काव्यवाचन. यात अनेक देशातील कवी भारतीय भाषांतील कवी आणि मराठी कवीता-प्रभू काव्य-वाचन करणार आहेत.
तारीख २७ पासून २९ पर्यंत (भारतातील पहिले पेन काँग्रेस)
ह्या साऱ्या कार्यक्रमांना तुम्ही उपस्थित राहावे. तारीख २७ पासून २९ पर्यंत तुम्ही पुण्यास यावे, या अभूतपूर्व सोहळ्याचे साक्षी व्हावे, त्यात उत्साहानं भाग घ्यावा, तो पार पाडण्यासाठी सहकार्य द्यावे, ऊर्जा वाढवावी, त्या विषयी लिहावे, परदेशातील लेखकांबरोबर मैत्री जोडावी, परस्पर अनुवादाची कामे त्यातून उभी कारावीत, भारतीय साहित्यातील विविध घडामोडी जगापर्यंत पोहोचवण्यास मदतरूप हवे, आणि ह्या पेन काँग्रेसच्या निमित्ताने मराठीची पताका दक्षिण ध्रुवापासून उत्तर ध्रुवापर्यंत फडकवण्याची अद्वितीय किमया साध्य करण्यासाठी मदतीचा आणि स्नेहाचा हात पुढे करावेत
आपल्या सहभागाबद्दल १५ ऑगस्ट २०१८ पर्यंत हे तपशीलवार श्री संदेश भंडारे ह्यांना इ-मेल (sandeshbhandare@gmail.com) द्वारे कळवावे. म्हणजे नियोजन करणे सोपे जाईल.
पेन काँग्रेससाठी कोणतेही सरकारी अनुदान मिळत नाही. तुम्ही स्वतः पदरमोड करून या भारतातील पहिले पेन काँग्रेस पुणे येथील कार्यक्रमात सहभागी व्हाल असा आम्हाला विश्वास आहे.
- पेन साऊथ इंडिया टीम | पेन इंटेरनशनल
अभिप्राय