५ ऑगस्ट दिनविशेष - इतिहासातील जागतिक दिवस, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवसांची संदर्भासहित माहिती देणारे दिनांक ५ ऑगस्ट चे दिनविशेष.
दिनांक ५ ऑगस्ट च्या जगभरातील ठळक घटना, घडमोडी, जन्म, मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन आणि जागतिक दिवस
लाला अमरनाथ भारद्वाज - (११ सप्टेंबर १९११ - ५ ऑगस्ट २०००).
शेवटचा बदल ४ ऑगस्ट २०२२
जागतिक दिवस
५ ऑगस्ट रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस- स्वातंत्र्य दिन: बर्किना फासो.
- विजयदिन, मातृभूमी आभार दिन: क्रोएशिया.
- बाल दिन: चिली.
ठळक घटना (घडामोडी)
५ ऑगस्ट रोजी घडलेल्या ठळक घटना आणि घडामोडी- ११००: हेन्री पहिला इंग्लंडच्या राजेपदी.
- १३०५: स्कॉटिश क्रांतीकारी विल्यम वॉलेस ग्लासगो जवळ पकडला गेला.
- १८६०: कार्ल चौथा स्वीडनच्या राजेपदी.
- १८६१: अमेरिकन यादवी युद्ध - युद्धाच्या खर्चास हातभार लागावा म्हणून अमेरिकन सरकारने प्रथमतः आयकर लागू केला.
- १८८२: जपानमध्ये लश्करी कायदा लागू.
- १९०१: पीटर ओ'कॉनोरने २४ फूट ११.७५ ईंच लांब उडी मारून विश्वविक्रम रचला.
- १९१४: जगातील पहिला विद्युतचलित वाहतूक नियंत्रक दिवा अमेरिकेच्या क्लीव्हलॅंड शहरात सुरू झाला.
- १९४४: दुसरे महायुद्ध - ऑस्ट्रेलियाच्या कौरा गावाजवळील युद्धबंद्यांच्या तुरुंगातून ५४५ जपानी युद्धबंदी पळाले. बव्हंशी मारले गेले व उरलेल्यांपैकी मोठ्या संख्येने आत्महत्या केली.
- १९४४: ज्यूंचे शिरकाण - पोलिश क्रांतीकार्यांनी वॉर्सोतील कारागृहातून ३४८ बंद्यांची सुटका केली.
- १९४९: इक्वेडोरमध्ये भूकंप. ६,००० ठार.
- १९६०: बर्किना फासोला फ्रांसपासून स्वातंत्र्य.
- १८६१: अमेरिकन सैन्यातील चाबकाचे फटके मारण्याची शिक्षा बंद करण्यात आली.
- १९६२: कन्या नक्षत्रात पहिल्या क्वासार तार्याचं अस्तित्त्व सिद्ध करण्यात यश.
- १९६२: मॅरिलिन मन्रोने आत्महत्या केली.
- १९६२: दक्षिण आफ्रिकेत नेल्सन मंडेलाला कैद. २८ वर्षांनी १९९०मध्ये सुटका.
- १९६४: व्हियेतनाम युद्ध - अमेरिकेच्या यु.एस.एस. टिकोंडेरोगा व यु.एस.एस. कॉन्स्टेलेशन या विमानवाहू युद्धनौकांवरील विमानांनी टोंकिनच्या अखातातील हल्ल्यास प्रत्युत्तर म्हणून उत्तर व्हियेतनामवर बॉम्बफेक केली. वस्तुतः टोंकिनच्या अखातातील हल्ला ही बनावट घटना होती.
- १९६५: पाकिस्तानी सैन्याने साध्या वेषात घुसखोरी केल्यामुळे भारत पाकिस्तान युद्धाला सुरूवात झाली.
- १९८१: अमेरिकेन राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रेगनने संपावर असलेल्या ११,३८१ हवाई वाहतूक नियंत्रकांना नोकरीतून काढून टाकले.
- १९९४: इंडियन नॅशनल सायन्स अॅकेडमी (INSA) तर्फे दिला जाणारा होमी जहांगीर भाभा पुरस्कार राष्ट्रीय पदार्थविज्ञान प्रयोगशाळेले (NPL) संचालक प्रा. इरोड सुब्रमणियन राजगोपाल यांना प्रदान.
- १९९५: क्रोएशियाच्या सैन्याने सर्बियातील क्निन शहर जिंकले.
- १९९७: रशियाच्या दोन अंतराळवीरांना घेऊन सोयूझ-यू हे अंतराळयान मीर अंतराळस्थानकाकडे रवाना.
- १९९७: फ्रेंच खुल्या लॉनटेनिस स्पर्धेत मिश्र दुहेरी गटात विजेतेपद मिळवणार्या महेश भूपतीला क्रीडा खात्यातर्फे २ लाख रुपयांचा पुरस्कार जाहीर.
- २००६: मराठी विकिपिडीयाने ५,००० लेखांचा टप्पा ओलांडला.
- २०१२: अमेरिकेच्या विस्कॉन्सिन राज्यातील ओक क्रीक शहरातील गुरुद्वारामध्ये घुसून एका माथेफिरूने गोळीबार केला. सहा व्यक्ती ठार. हल्लेखोराला पोलिसांनी गोळ्या घालून ठार मारले.
- २०१९: जम्मू आणि काश्मीर राज्याचे विभाजन. जम्मू आणि काश्मीर व लद्दाख स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश म्हणून अस्तित्वात.
जन्म (वाढदिवस, जयंती)
५ ऑगस्ट रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे- १९४७: टोनी ओपाथा (श्रीलंकेचे क्रिकेटर, मृत्यू: ११ सप्टेंबर २०२०).
- १८५८: वासुदेव वामन / वासुदेवशास्त्री खरे (इतिहासाचार्य, लेखक, नाटककार व कवी, मृत्यू: ११ जून १९२४)
- १८९०: दत्तो वामन पोतदार (इतिहासकार, लेखक, वक्ते आणि पुणे विद्यापीठाचे कुलगुरू, टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू, पद्मविभूषण महामहोपाध्याय, मृत्यू: ६ ऑक्टोबर १९७९).
- १९३०: नील आर्मस्ट्राँग (चंद्रावर पाऊल ठेवलेला पहिला मानव, मृत्यू: २५ ऑगस्ट २०१२).
- १९३३: विजया राजाध्यक्ष (लेखिका व समीक्षिका).
- १९५०: महेंद्र कर्मा (भारतीय वकील आणि राजकारणी, मृत्यू: २५ मे २०१३).
- १९६९: वेंकटेश प्रसाद (भारतीय क्रिकेट खेळाडू, जलदगती गोलंदाज).
- १९७२: अकिब जावेद (पाकिस्तानी जलदगती गोलंदाज).
- १९७४: काजोल (भारतीय अभिनेत्री).
- १९८७: जेनेलिया डिसोझा (भारतीय अभिनेत्री).
मृत्यू (पुण्यतिथी, स्मृती दिवस, बलिदान दिवस, शहीद दिवस)
५ ऑगस्ट रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे- ८८२: लुई (तिसरा) (फ्रान्सचा राजा, जन्म: ८६३/८६५).
- १९६२: मेरिलीन मन्रो (अमेरिकन अभिनेत्री, जन्म: १ जून १९२६).
- १९८४: रिचर्ड बर्टन (अभिनेते, जन्म: १० नोव्हेंबर १९२५).
- १९९१: सुइचिरो होंडा (होंडा कंपनी चे स्थापक, जन्म: १७ नोव्हेंबर १९०६).
- १९९२: अच्युतराव पटवर्धन (स्वातंत्र्यसैनिक, विचारवंत, तत्त्वचिंतक व सामाजिक कार्यकर्ते, जन्म: ५ फेब्रुवारी १९०५).
- १९९७: के. पी. आर. गोपालन (स्वातंत्र्यसैनिक, कम्युनिस्ट व नक्षलवादी नेते, जन्म: १९०६).
- २०००: लाला अमरनाथ भारद्वाज (भारतीय क्रिकेटचे भीष्माचार्य, स्वतंत्र भारताच्या पहिल्या क्रिकेट संघाचे कर्णधार व स्वतंत्र भारताचे पहिले शतकवीर, जन्म: ११ सप्टेंबर १९११).
- २००१: ज्योत्स्ना भोळे (गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार विजेत्या गायिका आणि अभिनेत्री, जन्म: ११ मे १९१४).
- २०१४: चापमॅन पिंचर (भारतीय - इंग्रजी इतिहासकार, जन्म: २९ मार्च १९१४).
ऑगस्ट महिन्यातील दिनविशेष | ||||||
---|---|---|---|---|---|---|
१ | २ | ३ | ४ | ५ | ६ | ७ |
८ | ९ | १० | ११ | १२ | १३ | १४ |
१५ | १६ | १७ | १८ | १९ | २० | २१ |
२२ | २३ | २४ | २५ | २६ | २७ | २८ |
२९ | ३० | ३१ | ||||
तारखेप्रमाणे ऑगस्ट महिन्यातील सर्व दिनविशेष पहा. |
- [col]
- [col]
- - मराठी व्यंगचित्र
- - विचारधन
- - मराठी शब्द
- ... आज
सर्व विभाग / सेवा सुविधा / मराठी दिनदर्शिका / दिनविशेष / ऑगस्ट दिनविशेष
विभाग -
जानेवारी दिनविशेष · फेब्रुवारी दिनविशेष · मार्च दिनविशेष · एप्रिल दिनविशेष · मे दिनविशेष · जून दिनविशेष · जुलै दिनविशेष · ऑगस्ट दिनविशेष · सप्टेंबर दिनविशेष · ऑक्टोबर दिनविशेष · नोव्हेंबर दिनविशेष · डिसेंबर दिनविशेष
विषय -
जानेवारी · फेब्रुवारी · मार्च · एप्रिल · मे · जून · जुलै · ऑगस्ट · सप्टेंबर · ऑक्टोबर · नोव्हेंबर · डिसेंबर
अभिप्राय