३० जुलै दिनविशेष - इतिहासातील जागतिक दिवस, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवसांची संदर्भासहित माहिती देणारे दिनांक ३० जुलै चे दिनविशेष.
जागतिक दिवस
ठळक घटना / घडामोडी
जन्म / वाढदिवस / जयंती
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतीदिन
आज
सर्व विभाग / सेवा सुविधा / मराठी दिनदर्शिका / दिनविशेष / जुलै महिन्यातील दिनविशेष
विभाग -
जानेवारी दिनविशेष · फेब्रुवारी दिनविशेष · मार्च दिनविशेष · एप्रिल दिनविशेष · मे दिनविशेष · जून दिनविशेष · जुलै दिनविशेष · ऑगस्ट दिनविशेष · सप्टेंबर दिनविशेष · ऑक्टोबर दिनविशेष · नोव्हेंबर दिनविशेष · डिसेंबर दिनविशेष
विषय -
जानेवारी · फेब्रुवारी · मार्च · एप्रिल · मे · जून · जुलै · ऑगस्ट · सप्टेंबर · ऑक्टोबर · नोव्हेंबर · डिसेंबर
३० जुलै रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस
- -
ठळक घटना / घडामोडी
३० जुलै रोजी घडलेल्या ठळक घटना आणि घडामोडी
- ७६२: खलिफा अल-मन्सूरने बगदाद शहराची स्थापना केली.
- १५०२: क्रिस्टोफर कोलंबस आपल्या चौथ्या सफरीदरम्यान होन्डुरासच्या किनाऱ्याजवळील बे आयलॅंड्स बेटांतील ग्वानाहा येथे उतरला.
- १६२९: इटलीच्या नेपल्स शहरात भूकंप. सुमारे १०,००० ठार.
- १७२९: बाल्टिमोर शहराची स्थापना.
- १८११: शिवावा, मेक्सिको येथे स्पॅनिश राज्यकर्त्यांनी फादर मिगेल हिदाल्गो इ कॉस्तियाला मृत्युदंड दिला.
- १८६६: न्यू ऑर्लिअन्स येथे राजकीय पक्षाच्या बैठकीवर पोलिस हल्ला. ४० ठार, १५० जखमी.
- १८७१: वेस्टफील्ड या स्टेटन आयलंड फेरीबोटीवर स्फोट. ८५ ठार.
- १८९८: विल्यम केलॉग यांनी कॉर्नफ्लेक्स विकसित केले.
- १९३०: उरुग्वेने मॉंटेव्हिडीयोमध्ये पहिला फिफा विश्वचषक जिंकला.
- १९४५: दुसरे महायुद्ध - जपानच्या आय-५८ या पाणबुडीने अमेरिकेची युएसएस इंडियानापोलिस ही नौका बुडवली. ८८३ ठार.
- १९६२: ट्रान्स कॅनडा हायवे हा सुमारे ८,०३० किमी लांबीचा जगातील सर्वात मोठा राष्ट्रीय महामार्ग सुरू झाला.
- १९६५: अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष लिंडन बी. जॉन्सनने सोशल सिक्युरिटी ऍक्ट ऑफ १९६५वर सही करून मेडिकेर व मेडिकेडची रचना केली.
- १९७१: अपोलो १५ चंद्रावर उतरले.
- १९७१: मोरियोका, जपान येथे ऑल निप्पॉन एरवेझच्या बोईंग ७२७ आणि जपानी वायुसेनेच्या एफ-८६ विमानांची टक्कर. १६२ ठार.
- १९८०: व्हानुआतुला स्वातंत्र्य.
- १९९७: गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना राजीव गांधी राष्ट्रीय सद्भावना पुरस्कार जाहीर.
- २०००: चंदन तस्कर वीरप्पनने अभिनेते डॉ. राजकुमार यांचे अपहरण केले.
- २०००: कोणत्याही प्रवासी वाहनातून एखादा प्रवासी अपघाताने खाली पडून त्याचा मृत्यू झाल्यास त्याबद्दल त्या वाहनचालकाला जबाबदार धरता येणार नाही, असा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल.
- २००१: जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर.
- २००६: इस्रायेली वायुसेनेच्या हल्ल्यात १६ बालकांसह २८ असैनिकी व्यक्ती ठार.
- २०१२: दिल्लीतील पावर ग्रिड खराब झाल्यामुळे उत्तर भारतील ३० कोटी पेक्षा जास्त लोकांची वीज खंडित झाली.
- २०१४: पुणे जिल्ह्यातील माळीण गावावर दरड कोसळून ५० पेक्षा अधिक ठार.
जन्म / वाढदिवस / जयंती
३० जुलै रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
- १८१८: एमिली ब्रॉंटे (इंग्लिश लेखिका, मृत्यू: १९ डिसेंबर १८४८).
- १८५५: जॉर्ज विलहेम फॉन सिमेन्स (जर्मन उद्योगपती, (मृत्यू: १४ ऑक्टोबर १९१९).
- १८६३: हेन्री फोर्ड (फोर्ड मोटार कंपनीचे संस्थापक, मृत्यू: ७ एप्रिल १९४७).
- १९४७: आर्नोल्ड श्वार्झनेगर (ऑस्ट्रियाचा अभिनेता व कॅलिफोर्नियाचा गव्हर्नर).
- १९६२: यकब मेमन (भारतीय दहशतवादी, मृत्यू: ३० जुलै १९६२).
- १९७३: सोनू निगम (पार्श्वगायक).
- १९८०: जेम्स अँडरसन (इंग्लिश क्रिकेट खेळाडू).
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतीदिन
३० जुलै रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
- १६२२: संत तुलसीदास (एक हिंदू संत कवी, जन्म: १३ ऑगस्ट १५३२).
- १७१८: विल्यम पेन (पेनसिल्व्हेनियाचे स्थापक, जन्म: १४ ऑक्टोबर १६४४).
- १८९८: ऑटोफोन बिस्मार्क (जर्मनीचे पहिले चान्सलर, जन्म: १ एप्रिल १८१५).
- १९३०: जोन गॅम्पर (बार्सिलोना फुटबॉल क्लब चे स्थापक, जन्म: २२ नोव्हेंबर १८७७).
- १९४७: जोसेफ कूक (ऑस्ट्रेलियाचे ६वे पंतप्रधान, जन्म: ७ डिसेंबर १८६०).
- १९६०: गंगाधर बाळकृष्ण देशपांडे (कर्नाटक सिंह स्वातंत्र्यसैनिक, जन्म: ३१ मार्च १८७१).
- १९८३: वसंतराव देशपांडे (शास्त्रीय नाट्यसंगीत गायक, जन्म: २ मे १९२०).
- १९९४: शंकर पाटील (मराठी ग्रामीण साहित्यिक, चित्रपट कथालेखक, महामंडळाचे संस्थापक सचिव, जन्म: ८ ऑगस्ट १९२६).
- १९९५: डॉ. विनायक महादेव तथा वि. म. दांडेकर (अर्थतज्ञ, इंडियन स्कूल ऑफ पॉलिटिकल इकॉनॉमी चे संस्थापक, जन्म: ६ जुलै १९२०).
- १९९७: बाओ डाई (व्हिएतनामचा राजा, जन्म: २२ ऑक्टोबर १९१३).
- २००७: इंगमार बर्गमन (स्विडिश चित्रपट दिग्दर्शक, जन्म: १४ जुलै १९१८).
- २००७: मिकेलांजेलो अँतोनियोनी (इटालियन चित्रपट दिग्दर्शक, जन्म: २९ सप्टेंबर १९१२).
- २०११: डॉ. अशोक रानडे (संगीत समीक्षक, जन्म: २५ ऑक्टोबर १९३७).
- २०१३: बेंजामिन वॉकर (भारतीय-इंग्रजी लेखक, कवी आणि नाटककार, जन्म: २५ नोव्हेंबर १९१३).
३० जुलै दिनविशेष संबंधी महत्त्वाचे दुवे:
जुलै महिन्यातील दिनविशेष | ||||||
---|---|---|---|---|---|---|
१ | २ | ३ | ४ | ५ | ६ | ७ |
८ | ९ | १० | ११ | १२ | १३ | १४ |
१५ | १६ | १७ | १८ | १९ | २० | २१ |
२२ | २३ | २४ | २५ | २६ | २७ | २८ |
२९ | ३० | ३१ | ||||
तारखेप्रमाणे जुलै महिन्यातील सर्व दिनविशेष पहा. |
- [col]
- [col]
- - मराठी व्यंगचित्र
- - विचारधन
- - मराठी शब्द
- ... आज
आज
सर्व विभाग / सेवा सुविधा / मराठी दिनदर्शिका / दिनविशेष / जुलै महिन्यातील दिनविशेष
विभाग -
जानेवारी दिनविशेष · फेब्रुवारी दिनविशेष · मार्च दिनविशेष · एप्रिल दिनविशेष · मे दिनविशेष · जून दिनविशेष · जुलै दिनविशेष · ऑगस्ट दिनविशेष · सप्टेंबर दिनविशेष · ऑक्टोबर दिनविशेष · नोव्हेंबर दिनविशेष · डिसेंबर दिनविशेष
विषय -
जानेवारी · फेब्रुवारी · मार्च · एप्रिल · मे · जून · जुलै · ऑगस्ट · सप्टेंबर · ऑक्टोबर · नोव्हेंबर · डिसेंबर
अभिप्राय