२८ जुलै दिनविशेष - इतिहासातील जागतिक दिवस, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवसांची संदर्भासहित माहिती देणारे दिनांक २८ जुलै चे दिनविशेष.
जागतिक दिवस
ठळक घटना / घडामोडी
जन्म / वाढदिवस / जयंती
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतीदिन
आज
सर्व विभाग / सेवा सुविधा / मराठी दिनदर्शिका / दिनविशेष / जुलै महिन्यातील दिनविशेष
विभाग -
जानेवारी दिनविशेष · फेब्रुवारी दिनविशेष · मार्च दिनविशेष · एप्रिल दिनविशेष · मे दिनविशेष · जून दिनविशेष · जुलै दिनविशेष · ऑगस्ट दिनविशेष · सप्टेंबर दिनविशेष · ऑक्टोबर दिनविशेष · नोव्हेंबर दिनविशेष · डिसेंबर दिनविशेष
विषय -
जानेवारी · फेब्रुवारी · मार्च · एप्रिल · मे · जून · जुलै · ऑगस्ट · सप्टेंबर · ऑक्टोबर · नोव्हेंबर · डिसेंबर
२८ जुलै रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस
- स्वातंत्र्य दिन: पेरू.
- जागतिक निसर्ग संवर्धन दिवस.
- जागतिक कावीळ दिवस.
ठळक घटना / घडामोडी
२८ जुलै रोजी घडलेल्या ठळक घटना आणि घडामोडी
- १४९३: मॉस्को शहराचा मोठा भाग आगीत भस्मसात.
- १५४०: दरबारी राजकारणात इंग्लंडचा राजा हेन्री आठव्याने थॉमस क्रॉमवेलला मृत्युदंड दिला.
- १७९४: फ्रेंच क्रांती - मॅक्सिमिलियें रॉबिस्पियरेला गिलोटिनवर मृत्युदंड.
- १८२१: पेरूने स्वतःला स्पेनपासून स्वतंत्र जाहीर केले.
- १९१४: पहिले महायुद्ध - ऑस्ट्रिया-हंगेरीने सर्बियाविरुद्ध युद्ध पुकारले.
- १९३०: रिचर्ड बेडफोर्ड बेनेट कॅनडाच्या पंतप्रधानपदी.
- १९३३: सोव्हिएत युनियन आणि स्पेनमधे राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले.
- १९३३: अँडोराचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.
- १९३४: पं. मदनमोहन मालवीय आणि बापूजी अणे यांनी काँग्रेस राष्ट्रीय पक्षाची स्थापना केली.
- १९४२: दुसरे महायुद्ध - सोवियेत संघाच्या अध्यक्ष जोसेफ स्टालिनने हुकुम काढला ज्यानुसार कोणत्याही परिस्थितीत लढाईतून माघार घेणार्या सोवियेत सैनिकांना तत्काळ मृत्यूची शिक्षा लागू झाली.
- १९४३: दुसरे महायुद्ध - रॉयल एर फोर्सच्या जर्मनीतील हांबुर्ग शहरावरील बॉम्बफेकीत ४२,००० नागरिक ठार.
- १९४३: दुसरे महायुद्ध – रॉयल एअर फोर्सने जर्मनीतील हॅम्बुर्ग शहरावर केलेल्या तुफानी बॉम्बहल्ल्यात ४२,००० नागरिक ठार झाले.
- १९४५: होजे बुस्टामांटे इ रिव्हेरो पेरूच्या राष्ट्राध्यक्षपदी.
- १९४५: अमेरिकेचे बी.२५ प्रकारचे विमान न्यू यॉर्कमधील एम्पायर स्टेट बिल्डींगच्या ७९व्या मजल्यावर आदळले. १४ ठार.
- १९५०: मनुएल ओड्रिया पेरूच्या राष्ट्राध्यक्षपदी.
- १९५६: मनुएल प्राडो उगार्तेशे पेरूच्या राष्ट्राध्यक्षपदी.
- १९६३: फर्नान्डो बेलॉंडे टेरी पेरूच्या राष्ट्राध्यक्षपदी.
- १९७६: चीनच्या तांग्शान प्रांतात रिश्टर मापनपद्धतीनुसार ७.८ ते ८.२च्या दरम्यान तीव्रता असलेला भूकंप. २,४२,७६९ ठार, १,६४,८५१ जखमी.
- १९७९: भारताच्या ५व्या पंतप्रधानपदी चौधरी चरणसिंग यांची नियुक्ती.
- १९८०: फर्नान्डो बेलॉंडे टेरी परत पेरूच्या राष्ट्राध्यक्षपदी.
- १९८४: लॉस एंजिलिस येथे २३व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.
- १९८५: ऍलन गार्शिया पेरूच्या राष्ट्राध्यक्षपदी.
- १९९०: आल्बेर्तो फुजिमोरी पेरूच्या राष्ट्राध्यक्षपदी.
- १९९५: आल्बेर्तो फुजिमोरी दुसर्यांदा पेरूच्या राष्ट्राध्यक्षपदी.
- १९९८: सर्वोच्च आणि उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींच्या नियुक्त्या आणि बदल्यांबाबत नऊ न्यायमूर्तींचा समावेश असलेले स्वतंत्र घटनापीठ स्थापन.
- १९९९: भारतीय धवल क्रांतीचे शिल्पकार डॉ. वर्गीस कुरियन यांना पालोस मार ग्रेगोरिओस पुरस्कार प्रदान.
- २०००: आल्बेर्तो फुजिमोरी तिसर्यांदा पेरूच्या राष्ट्राध्यक्षपदी.
- २००१: अलेहांद्रो टोलेडो पेरूच्या राष्ट्राध्यक्षपदी.
- २००१: आसामी लेखिका इंदिरा गोस्वामी यांना ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान.
- २०१७: पनामा पेपर्सद्वारे उजेडात आलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने १० वर्षे निवडलेले पद घेण्यापासून बंदी घातल्यावर तेथील पंतप्रधान मियॉं नवाझ शरीफने राजीनामा दिला.
जन्म / वाढदिवस / जयंती
२८ जुलै रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
- १९०७: अर्ल टपर (टपर वेअरचे संशोधक, मृत्यू: ३ ऑक्टोबर १९८३).
- १९२५: बारूच सॅम्युअल ब्लमबर्ग (हेपटायटीस बी रोगजंतू चे शोधक, मृत्यू: ५ एप्रिल २०११).
- १९२९: जॅकलिन केनेडी (जॉन एफ. केनेडी यांच्य पत्नी, मृत्यु: १९ मे १९९४).
- १९३६: सरगॅरी सोबर्स (वेस्ट इंडीजचे क्रिकेट कर्णधार आणि फलंदाज).
- १९४५: जिम डेव्हिस (अमेरिकन व्यंगचित्रकार, मृत्यु: २६ एप्रिल १९८१).
- १९५४: ह्युगो चावेझ (व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष, मृत्यू: ५ मार्च २०१३).
- १९७०: पॉल स्ट्रँग (झिम्बाब्वेचा क्रिकेट खेळाडू).
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतीदिन
२८ जुलै रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
- ४५०: थियोडॉसियस दुसरा (पवित्र रोमन सम्राट, जन्म: १० एप्रिल ४०१).
- १७९४: मॅक्सिमिलियें रॉबिस्पियरे (फ्रेंच क्रांतिकारी, जन्म: ६ मे १७५८).
- १८४४: जोसेफ बोनापार्ते (नेपोलियनचा फ्रेंच, जन्म: ७ जानेवारी १७६८).
- १९३४: लुइस टँक्रेड (दक्षिण आफ्रिकेचे क्रिकेट खेळाडू, जन्म: ७ ऑक्टोबर १८७६).
- १९६८: ऑटो हान (नोबेल पारितोषिक विजेते जर्मन रसायनशास्त्रज्ञ, जन्म: ८ मार्च १८७९).
- १९७५: राजाराम दत्तात्रय तथा राजा ठाकूर (चित्रपट दिग्दर्शक, जन्म: २६ नोव्हेंबर १९२३).
- १९७७: पंडितराव नगरकर (गायक आणि अभिनेते, जन्म: २६ डिसेंबर १९१०).
- १९८१: बाबूराव गोखले (नाटककार, (जन्म: १९ सप्टेंबर १९२५).
- १९८८: सैद मोदी (राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत सलग ८ वेळा विजेतेपद मिळवणारे, जन्म: १९६२).
- २०२०: कोंडाला राव (भारतीय तेलगू अभिनेते, निर्माता आणि दिग्दर्शक, जन्म: ११ फेब्रुवारी १९३२).
२८ जुलै दिनविशेष संबंधी महत्त्वाचे दुवे:
जुलै महिन्यातील दिनविशेष | ||||||
---|---|---|---|---|---|---|
१ | २ | ३ | ४ | ५ | ६ | ७ |
८ | ९ | १० | ११ | १२ | १३ | १४ |
१५ | १६ | १७ | १८ | १९ | २० | २१ |
२२ | २३ | २४ | २५ | २६ | २७ | २८ |
२९ | ३० | ३१ | ||||
तारखेप्रमाणे जुलै महिन्यातील सर्व दिनविशेष पहा. |
- [col]
- [col]
- - मराठी व्यंगचित्र
- - विचारधन
- - मराठी शब्द
- ... आज
आज
सर्व विभाग / सेवा सुविधा / मराठी दिनदर्शिका / दिनविशेष / जुलै महिन्यातील दिनविशेष
विभाग -
जानेवारी दिनविशेष · फेब्रुवारी दिनविशेष · मार्च दिनविशेष · एप्रिल दिनविशेष · मे दिनविशेष · जून दिनविशेष · जुलै दिनविशेष · ऑगस्ट दिनविशेष · सप्टेंबर दिनविशेष · ऑक्टोबर दिनविशेष · नोव्हेंबर दिनविशेष · डिसेंबर दिनविशेष
विषय -
जानेवारी · फेब्रुवारी · मार्च · एप्रिल · मे · जून · जुलै · ऑगस्ट · सप्टेंबर · ऑक्टोबर · नोव्हेंबर · डिसेंबर
अभिप्राय