२६ जुलै दिनविशेष - इतिहासातील जागतिक दिवस, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवसांची संदर्भासहित माहिती देणारे दिनांक २६ जुलै चे दिनविशेष.
जागतिक दिवस
ठळक घटना / घडामोडी
जन्म / वाढदिवस / जयंती
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतीदिन
आज
सर्व विभाग / सेवा सुविधा / मराठी दिनदर्शिका / दिनविशेष / जुलै महिन्यातील दिनविशेष
विभाग -
जानेवारी दिनविशेष · फेब्रुवारी दिनविशेष · मार्च दिनविशेष · एप्रिल दिनविशेष · मे दिनविशेष · जून दिनविशेष · जुलै दिनविशेष · ऑगस्ट दिनविशेष · सप्टेंबर दिनविशेष · ऑक्टोबर दिनविशेष · नोव्हेंबर दिनविशेष · डिसेंबर दिनविशेष
विषय -
जानेवारी · फेब्रुवारी · मार्च · एप्रिल · मे · जून · जुलै · ऑगस्ट · सप्टेंबर · ऑक्टोबर · नोव्हेंबर · डिसेंबर
२६ जुलै रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस
- राष्ट्रीय क्रांती दिन: क्युबा.
- स्वातंत्र्य दिन: लायबेरिया, मालदीव.
- विजय दिन: भारत (कारगिल युद्धाची समाप्ती).
ठळक घटना / घडामोडी
२६ जुलै रोजी घडलेल्या ठळक घटना आणि घडामोडी
- ११३९: अफोन्सो पहिला पोर्तुगालच्या राजेपदी.
- १५०९: सम्राट कृष्णदेवराय यांनी विजयनगर साम्राज्याच्या पुनरुत्पादन सुरूवात केली.
- १७४५: इंग्लंडमध्ये गिल्डफोर्ड येथे महिलांचा पहिला क्रिकेट सामना.
- १७८८: न्यू यॉर्कने अमेरिकेचे संविधान मान्य केले व त्यायोगे अमेरिकेचे ११वे राज्य झाले.
- १८४७: लायबेरियाला स्वातंत्र्य.
- १८९१: फ्रान्सने ताहिती बेटे ताब्यात घेतली.
- १९३६: जर्मनी व इतर मित्र देशांचा स्पॅनिश गृहयुद्धात हस्तक्षेप.
- १९४१: दुसरे महायुद्ध - जपानच्या नैऋत्य एशियातील शिरकावास प्रत्युत्तर म्हणून अमेरिकन राष्ट्राध्यक्ष फ्रॅंकलिन डिलानो रूझवेल्टने अमेरिकेतील जपानी मालमत्ता सरकारी ताब्यात घेण्याचा आदेश दिला.
- १९४५: युनायटेड किंग्डममधील निवडणुकांत लेबर पार्टीचा विजय. विन्स्टन चर्चिलने पंतप्रधानपदाचा राजनामा दिला.
- १९४७: अमेरिकन राष्ट्राध्यक्ष हॅरी ट्रुमनने सी.आय.ए., संरक्षणखाते व राष्ट्रीय सुरक्षा समितीची स्थापना केली.
- १९४८: हॅरी ट्रुमनने अमेरिकन सैन्यातील वंशभेद नियमबाह्य ठरवला.
- १९४८: आंद्रे मरी फ्रांसच्या पंतप्रधानपदी.
- १९५३: क्युबन क्रांतीला सुरुवात.
- १९५३: अमेरिकेच्या अॅरिझोना राज्यात मोर्मोन पंथाच्या फंडामेंटालिस्ट चर्च ऑफ जिझस क्राइस्ट ऑफ लॅटर डे सेंट्स या बहुपत्नीत्त्व पाळणार्या मूलतत्त्ववादी उपपंथावर कार्रवाई.
- १९५६: जागतिक बॅंकेने आस्वान धरण बांधण्यासाठी अर्थसाहाय्य करण्यास नकार दिल्यावर ईजिप्तच्या राष्ट्राध्यक्ष गमाल नासरने सुएझ कालव्याचे राष्ट्रीयीकरण केले.
- १९५७: ग्वाटेमालाच्या हुकुमशहा कार्लोस कॅस्टियो अर्मासची हत्या.
- १९५८: अमेरिकेने एक्स्प्लोरर ४ या उपग्रहाचे प्रक्षेपण केले.
- १९६३: सिनकॉम २ या पहिल्या भूस्थिर उपग्रहाचे प्रक्षेपण.
- १९६३: युगोस्लाव्हियातील स्कोप्ये शहरात भूकंप. १,१०० ठार.
- १९६५: मालदीवला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.
- १९७१: अमेरिकेच्या अपोलो १५ अंतराळयानाचे प्रक्षेपण.
- १९९४: सनईवादक उस्ताद बिस्मिला खाँ यांना राजीव गांधी सद्भावना पुरस्कार जाहीर.
- १९९८: बुद्धिबळातील कामगिरीबद्दल विश्वनाथन आनंद याला प्रतिष्ठेचा चेस ऑस्कर पुरस्कार जाहीर.
- १९९९: क्रिकेटच्या उल्लेखनीय कामगिरीसाठी माजी कर्णधार पॉली उम्रीगर यांना सी. के. नायडू पुरस्कार जाहीर.
- १९९९: भारताचा कारगिल युद्धात विजय झाला.
- २००५: मुंबई व परिसरात २४ तासात जवळजवळ १ मीटर (९९५ मिलीमीटर) पाउस. महापूरात शेकडो मृत्युमुखी.
- २००८: अहमदाबाद, बॉम्बस्फोटांमधे ५६ ठार २०० जखमी झाले.
- २०११: मोरोक्कोमध्ये सी.१३० प्रकारचे विमान कोसळले. ७८ ठार.
जन्म / वाढदिवस / जयंती
२६ जुलै रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
- १८५६: जॉर्ज बर्नार्ड शॉ (नोबेल पारितोषिक विजेते आयरिश लेखक आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे (LSE) सहसंस्थापक, मृत्यू: २ नोव्हेंबर १९५०).
- १८६५: रजनीकांत सेन (भारतीय कवी आणि संगीतकार, मृत्यू: १३ सप्टेंबर १९१०).
- १८७५: कार्ल युंग (मानसशास्त्रज्ञ व मानसोपचारतज्ञ, मृत्यू: ६ जून १९६१).
- १८९३: पं. कृष्णराव शंकर पंडित (ग्वाल्हेर घराण्याचे शास्त्रीय गायक, मृत्यू: २२ ऑगस्ट १९८९).
- १८९४: वासुदेव गोविंद मायदेव (कवी समाजसेवक, मृत्यू: ३० ऑगस्ट १९६९).
- १८९४: अल्डस हक्सले (इंग्लिश लेखक, मृत्यू: २२ नोव्हेंबर १९६३).
- १०९४: एडविन अल्बर्ट लिंक (फ्लाइट सिम्युलेटर चे शोधक, मृत्यू: ७ सप्टेंबर १९८१).
- १९२७: जी. एस. रामचंद (भारतीय क्रिकेट खेळाडू, मृत्यू: ८ सप्टेंबर २००३).
- १९२८: इब्न-ए-सफी (भारतीय-पाकिस्तानी लेखक आणि कवी, (मृत्यू: २५ जुलै १९८०).
- १९३९: जॉन हॉवर्ड (ऑस्ट्रेलियाचे २५वे पंतप्रधान).
- १९४२: व्लादिमिर मेसियर (स्लोव्हेकियाचे पंतप्रधान).
- १९४९: थाकसिन शिनावात्रा (थायलंडचे पंतप्रधान).
- १९५४: व्हिटास गेरुलायटिस (अमेरिकन लॉन टेनिसपटू, मृत्यू: १७ सप्टेंबर १९९४).
- १९५५: आसिफ अली झरदारी (पाकिस्तानचे ११वे राष्ट्राध्यक्ष).
- १९७१: खलिद महमूद (बांगलादेशी क्रिकेटपटू).
- १९८६: मुग्धा गोडसे (अभिनेत्री मॉडेल).
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतीदिन
२६ जुलै रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
- ७५०: निसेफोरस (बायझेन्टाईन सम्राट, जन्म: ३१ ऑक्टोबर ८०२).
- १८४३: सॅम ह्युस्टन (टेक्सासच्या प्रजासत्ताकचे राष्ट्राध्यक्ष, जन्म: २ मार्च १७९३).
- १८६७: ओट्टो (ग्रीसचा राजा, जन्म: १ जून १८१५).
- १८९१: राजेन्द्रलाल मित्रा (बंगालमधील प्राच्यविद्या संशोधक, एशियाटिक सोसायटीचे पहिले अध्यक्ष, जन्म: १५ फेब्रुवारी १८२४).
- २००९: भास्कर चंदावरकर (मराठी नाट्य चित्रपट संगीतकार, जन्म: १६ मार्च १९३६).
- २०१०: शिवकांत तिवारी (भारतीय राजकारणी, जन्म: २० डिसेंबर १९४५).
- २०१५: बिजॉय कृष्णा हांडिक (भारतीय वकील आणि राजकारणी, जन्म: १ डिसेंबर १९३४).
२६ जुलै दिनविशेष संबंधी महत्त्वाचे दुवे:
जुलै महिन्यातील दिनविशेष | ||||||
---|---|---|---|---|---|---|
१ | २ | ३ | ४ | ५ | ६ | ७ |
८ | ९ | १० | ११ | १२ | १३ | १४ |
१५ | १६ | १७ | १८ | १९ | २० | २१ |
२२ | २३ | २४ | २५ | २६ | २७ | २८ |
२९ | ३० | ३१ | ||||
तारखेप्रमाणे जुलै महिन्यातील सर्व दिनविशेष पहा. |
- [col]
- [col]
- - मराठी व्यंगचित्र
- - विचारधन
- - मराठी शब्द
- ... आज
आज
सर्व विभाग / सेवा सुविधा / मराठी दिनदर्शिका / दिनविशेष / जुलै महिन्यातील दिनविशेष
विभाग -
जानेवारी दिनविशेष · फेब्रुवारी दिनविशेष · मार्च दिनविशेष · एप्रिल दिनविशेष · मे दिनविशेष · जून दिनविशेष · जुलै दिनविशेष · ऑगस्ट दिनविशेष · सप्टेंबर दिनविशेष · ऑक्टोबर दिनविशेष · नोव्हेंबर दिनविशेष · डिसेंबर दिनविशेष
विषय -
जानेवारी · फेब्रुवारी · मार्च · एप्रिल · मे · जून · जुलै · ऑगस्ट · सप्टेंबर · ऑक्टोबर · नोव्हेंबर · डिसेंबर
अभिप्राय