२५ जुलै दिनविशेष - इतिहासातील जागतिक दिवस, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवसांची संदर्भासहित माहिती देणारे दिनांक २५ जुलै चे दिनविशेष.
जागतिक दिवस
ठळक घटना / घडामोडी
जन्म / वाढदिवस / जयंती
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतीदिन
आज
सर्व विभाग / सेवा सुविधा / मराठी दिनदर्शिका / दिनविशेष / जुलै महिन्यातील दिनविशेष
विभाग -
जानेवारी दिनविशेष · फेब्रुवारी दिनविशेष · मार्च दिनविशेष · एप्रिल दिनविशेष · मे दिनविशेष · जून दिनविशेष · जुलै दिनविशेष · ऑगस्ट दिनविशेष · सप्टेंबर दिनविशेष · ऑक्टोबर दिनविशेष · नोव्हेंबर दिनविशेष · डिसेंबर दिनविशेष
विषय -
जानेवारी · फेब्रुवारी · मार्च · एप्रिल · मे · जून · जुलै · ऑगस्ट · सप्टेंबर · ऑक्टोबर · नोव्हेंबर · डिसेंबर
२५ जुलै रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस
- गॅलिशिया दिन: गॅलिशिया(स्पेन).
- संविधान दिन: पोर्तोरिको.
- प्रजासत्ताक दिन: ट्युनिसीया.
ठळक घटना / घडामोडी
२५ जुलै रोजी घडलेल्या ठळक घटना आणि घडामोडी
- ३०६: कॉन्स्टॅटाईन पहिला रोमन सम्राटपदी.
- ८६४: इंग्लंडचा राजा चार्ल्स द बाल्डने व्हाईकिंग लुटारूंपासुन संरक्षणासाठी तटबंदी उभारण्यास सुरूवात केली.
- १५४७: हेन्री दुसरा फ्रांसच्या राजेपदी.
- १५९३: फ्रांसचा राजा हेन्री चौथ्याने जाहीररीत्या कॅथोलिक धर्म स्वीकारला.
- १६४८: आदिलशहाच्या आज्ञेवरून शहाजीराजे यांना कैद केले.
- १७९७: स्पेनच्या तेनेरीफ द्वीपांवरील हल्ल्यात होरेशियो नेल्सनने ३०० सैनिक व स्वतःचा उजवा हात गमावला.
- १७९९: नेपोलियन बोनापार्टने ईजिप्तमधील अबु किर जवळ ओट्टोमन सैन्याचा पराभव केला.
- १८६१: अमेरिकन यादवी युद्ध - अमेरिकन कॉंग्रेसने जाहीर केले की युद्ध हे गुलामगिरीच्या विरुद्ध नसून देशाची एकसंधता कायम ठेवण्यासाठी आहे.
- १८६८: वायोमिंगला अमेरिकेचा प्रांत म्हणून मान्यता.
- १८९४: पहिले चीन-जपान युद्ध सुरू.
- १८९८: अमेरिकेने पोर्तोरिकोवर आक्रमण केले.
- १९०७: कोरिया जपानच्या आधिपत्याखाली आले.
- १९०८: किकुने इकेदाने मोनोसोडियम ग्लुटामेट(आजिनोमोटो)चा शोध लावला.
- १९०९: लुई ब्लेरियोने प्रथम विमानातून इंग्लिश खाडी पार केली.
- १९१७: कॅनडात आयकर लागू.
- १९२५: सोवियेत संघाची वृत्तसंस्था तासची स्थापना.
- १९३४: ऑस्ट्रियाच्या चान्सेलर एंगेलबर्ट डॉलफसची हत्या.
- १९४३: दुसरे महायुद्ध - इटलीत बेनितो मुसोलिनीची हकालट्टी.
- १९४४: दुसरे महायुद्ध-ऑपरेशन स्प्रिंग - तुंबळ युद्धात ५,०२१ ठार, १३,०००पेक्षा जास्त जखमी.
- १९५२: पोर्तोरिकोने नवीन संविधान अंगिकारले.
- १९५६: अमेरिकेची प्रथम सागरी अणुचाचणी बिकीनी बेटांनजीक घेण्यात आली.
- १९५६: नान्टुकेट द्वीपाजवळ एस.एस. ॲंड्रीया डोरीया व एस.एस. स्टॉकहोमची धुक्यात टक्कर. ॲंड्रीया डोरीया बुडाले. ५१ मृत्युमुखी.
- १९७३: सोव्हिएत संघाचे मार्स ५ हे अंतराळयान प्रक्षेपित.
- १९७८: जगातील प्रथम टेस्ट ट्यूब बेबी लुईझ जॉय ब्राऊन चा इंग्लंडमधील लॅंकेशायर येथे जन्म.
- १९८४: सोव्हिएत संघाची स्वेतलाना साव्तोस्काया अंतराळात चालणारी प्रथम महिला अंतराळवीर.
- १९९४: इस्रायेल व जॉर्डनमधले १९४८पासूनचे युद्ध अधिकृतरीत्या समाप्त.
- १९९५: पॅरिसच्या उपनगरी रेल्वेत स्फोट. ८ ठार, ८० जखमी.
- १९९७: के.आर. नारायणन भारताच्या राष्ट्राध्यक्षपदी.
- १९९९: लान्स आर्मस्ट्रॉॅंगने आपली पहिली टुर दि फ्रांस सायकल शर्यत जिंकली.
- २०००: एर फ्रांस फ्लाइट ४५९० हे कॉॅंकोर्ड विमान पॅरिस विमानतळावरून उडताच कोसळले. जमिनीवरील चौघांसह ११३ ठार.
- २००७: प्रतिभा पाटील भारताच्या राष्ट्रपतीपदी.
जन्म / वाढदिवस / जयंती
२५ जुलै रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
- ११०९: अफोन्सो (पहिला) (पोर्तुगालचा राजा, मृत्यू: ६ डिसेंबर ११८५).
- १८७५: जिम कॉर्बेट (ब्रिटीश भारतीय वन्यजीवतज्ज्ञ, शिकारी लेखक, मृत्यू: १९ एप्रिल १९५५).
- १९१९: सुधीर फडके (गायक संगीतकार, मृत्यू: २९ जुलै २००२)
- १९२२: वसंत बापट (कवी, वक्ते, कलावंत, संपादक, मृत्यू: १७ सप्टेंबर २००२).
- १९२९: सोमनाथ चटर्जी (लोकसभेचे सभापती आणि माकप नेते, मृत्यू: १३ ऑगस्ट २०१८).
- १९७८: लुईस ब्राऊन (पहिली मानव टेस्टट्यूब बेबी).
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतीदिन
२५ जुलै रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
- ३०६: कॉन्स्टान्शियस क्लोरस (रोमन सम्राट, जन्म: ३१ मार्च २५०).
- १८८०: गणेश वासुदेव जोशी ऊर्फ सार्वजनिक काका (समाजसुधारक, स्वदेशी चळवळीचे प्रणेते, जन्म: ९ एप्रिल १८२८).
- १९७३: लुईस स्टिफन सेंट लोरें (कॅनडाचे १२वे पंतप्रधान, जन्म: १ फेब्रुवारी १८८२).
- १९७७: कॅ. शिवरामपंत दामले (महाराष्ट्रीय मंडळ, पुणे संस्थापक, जन्म: १४ एप्रिल १९००).
- २०१२: बी. आर. इशारा (चित्रपट दिग्दर्शक आणि पटकथा लेखक, जन्म: ७ सप्टेंबर १९३४).
- २०१५: आर. एस गवई (भारतीय वकील आणि राजकारणी, जन्म: ३० ऑक्टोबर १९२९).
२५ जुलै दिनविशेष संबंधी महत्त्वाचे दुवे:
जुलै महिन्यातील दिनविशेष | ||||||
---|---|---|---|---|---|---|
१ | २ | ३ | ४ | ५ | ६ | ७ |
८ | ९ | १० | ११ | १२ | १३ | १४ |
१५ | १६ | १७ | १८ | १९ | २० | २१ |
२२ | २३ | २४ | २५ | २६ | २७ | २८ |
२९ | ३० | ३१ | ||||
तारखेप्रमाणे जुलै महिन्यातील सर्व दिनविशेष पहा. |
- [col]
- [col]
- - मराठी व्यंगचित्र
- - विचारधन
- - मराठी शब्द
- ... आज
आज
सर्व विभाग / सेवा सुविधा / मराठी दिनदर्शिका / दिनविशेष / जुलै महिन्यातील दिनविशेष
विभाग -
जानेवारी दिनविशेष · फेब्रुवारी दिनविशेष · मार्च दिनविशेष · एप्रिल दिनविशेष · मे दिनविशेष · जून दिनविशेष · जुलै दिनविशेष · ऑगस्ट दिनविशेष · सप्टेंबर दिनविशेष · ऑक्टोबर दिनविशेष · नोव्हेंबर दिनविशेष · डिसेंबर दिनविशेष
विषय -
जानेवारी · फेब्रुवारी · मार्च · एप्रिल · मे · जून · जुलै · ऑगस्ट · सप्टेंबर · ऑक्टोबर · नोव्हेंबर · डिसेंबर
अभिप्राय