२४ जुलै दिनविशेष - इतिहासातील जागतिक दिवस, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवसांची संदर्भासहित माहिती देणारे दिनांक २४ जुलै चे दिनविशेष.
जागतिक दिवस
ठळक घटना / घडामोडी
जन्म / वाढदिवस / जयंती
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतीदिन
आज
सर्व विभाग / सेवा सुविधा / मराठी दिनदर्शिका / दिनविशेष / जुलै महिन्यातील दिनविशेष
विभाग -
जानेवारी दिनविशेष · फेब्रुवारी दिनविशेष · मार्च दिनविशेष · एप्रिल दिनविशेष · मे दिनविशेष · जून दिनविशेष · जुलै दिनविशेष · ऑगस्ट दिनविशेष · सप्टेंबर दिनविशेष · ऑक्टोबर दिनविशेष · नोव्हेंबर दिनविशेष · डिसेंबर दिनविशेष
विषय -
जानेवारी · फेब्रुवारी · मार्च · एप्रिल · मे · जून · जुलै · ऑगस्ट · सप्टेंबर · ऑक्टोबर · नोव्हेंबर · डिसेंबर
२४ जुलै रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस
- सिमोन बॉलिव्हार दिन: इक्वेडोर, व्हेनेझुएला.
- बाल दिन: व्हानुआतु.
ठळक घटना / घडामोडी
२४ जुलै रोजी घडलेल्या ठळक घटना आणि घडामोडी
- १४८७: नेदरलॅंड्सच्या लीयुवार्डेन शहरातील नागरिकांनी परदेशी बीयरवरील बंदीविरुद्ध आंदोलन सुरू केले.
- १५६७: मेरी क्वीन ऑफ स्कॉट्स पदच्युत. १ वर्षाचा जेम्स सहावा स्कॉटलंडच्या राजेपदी.
- १७०१: ऑंत्वान दि ला मॉथ कॅडिलॅकने फोर्ट पॉन्ट्चारट्रेन ही दुकानवजा वसाहत स्थापन केली. याचेच पुढे डेट्रॉईट शहर झाले.
- १७०४: ब्रिटनने जिब्राल्टरचा ताबा घेतला.
- १८२३: चिलीमध्ये गुलामगिरीची प्रथा समाप्त झाली.
- १८३२: बेन्जामिन बॉनिव्हिलच्या नेतृत्त्वाखाली बैलगाड्यांचा पहिला तांडा वायोमिंगमधील घाट चढून रॉकी माउंटन्स पर्वतरांगेच्या पश्चिमेस पोचला. अमेरिकेच्या पश्चिमेकडील विकासातील ही महत्त्वाची घटना होती.
- १८४७: आयोवातून १७ महिने पश्चिमेकडे वाटचाल केल्यावर ब्रिगहॅम यंग व १४८ इतर मोर्मोन व्यक्ती सॉल्ट लेक सिटी येथे पोचले.
- १८६६: टेनेसी परत अमेरिकेत दाखल.
- १९०१: प्रसिद्ध अमेरिकन लेखक ओ. हेन्रीची बॅंकेतील पैश्यांच्या अपहाराबद्दलची ३ वर्षांची शिक्षा संपून सुटका.
- १९११: हायराम बिंगहॅम तिसर्याने पेरूतील माचु पिच्चु हे प्राचीन कालीन इंका संस्कृतीचे शहर शोधले.
- १९१५: ईस्टलॅंड हे प्रवासी जहाज शिकागो जवळ बुडाले. ८४५ मृत्युमुखी.
- १९२३: लॉसेनचा तह. तुर्कस्तानची सीमा ठरवण्यात आली.
- १९३१: पिट्सबर्ग येथे वृद्धाश्रमास आग. ४८ ठार.
- १९४३: दुसरे महायुद्ध - दोस्त राष्ट्रांच्या विमानांनी जर्मनीतील हांबुर्ग शहरावर तुफान बॉम्बफेक सुरू केली.
- १९६५: व्हियेतनाम युद्ध - उत्तर व्हियेतनामने अमेरिकेचे लढाउ विमान पाडले.
- १९६९: सफल चंद्र मोहिमेनंतर अपोलो ११ हे अंतराळयान पॅसिफिक समुद्रात सुखरूप उतरले.
- १९७४: वॉटरगेट कुभांड - अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयानेने निकाल दिला की राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सनने स्वतःविरुद्धचा पुरावा अवैधरीत्या दडवून ठेवला होता.
- १९९०: इराकने कुवेतच्या सीमेजवळ सैन्याची जमवाजमव करण्यास सुरूवात केली.
- १९९१: अर्थमंत्री मनमोहन सिंग यांनी आर्थिक सुधारणांचा पाया घालणारा अर्थसंकल्प संसदेत सादर केला.
- १९९७: बंगाली लेखिका महाश्वेतादेवी यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर.
- १९९७: माजी हंगामी पंतप्रधान गुलझारीलाल नंदा आणि स्वातंत्र्यसैनिक अरुणा असफ अली यांना भारतरत्न पुरस्कार प्रदान.
- १९९८: परकीय चलन नियमन कायद्याच्या (FERA) जागी परकीय चलन व्यवस्थापन कायदा (FEMA) जारी करण्यात आला.
- २०००: विप्रो आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत चेन्नईची विजयालक्ष्मी सुब्रह्यण्यम भारताची पहिला महिला ग्रँडमास्टर बनली.
- २००१: सिमिओन सॅक्स-कोबर्ग-गोथा बल्गेरियाच्या पंतप्रधानपदी.
- २००२: आल्फ्रेड मॉइसियु आल्बेनियाच्या राष्ट्राध्यक्षपदी.
- २००५: लान्स आर्मस्ट्रॉंगने आपली सातवी टुर दि फ्रांस ही सायकलशर्यत जिंकली.
- २०१४: एर अल्जेरी फ्लाइट ५०१७ हे मॅकडोनेल डग्लस एमडी-८३ प्रकारचे विमान मालीमध्ये कोसळले. ११६ ठार.
जन्म / वाढदिवस / जयंती
२४ जुलै रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
- १७८६: जोसेफ निकोलेट (फ्रेंच गणितज्ञ व शोधक, मृत्यु: ११ सप्टेंबर १८४३).
- १८५१: फ्रेडरिक शॉटकी (जर्मन गणितज्ञ, मृत्यु: १२ ऑगस्ट १९३५).
- १९११: गोविंदभाई श्रॉफ (हैदराबाद मुक्तिसंग्रामातील स्वातंत्र्यसेनानी, मृत्यु: २१ नोव्हेंबर २००२).
- १९११: अमलज्योती तथा पन्नालाल घोष (बासरीवादक संगीतकार, मृत्यू: २० एप्रिल १९६०).
- १९२८: केशुभाई पटेल (गुजरातचे माजी मुख्यमंत्री, राज्यसभा सदस्य, मृत्यु: २९ ऑक्टोबर २०२०).
- १९३७: मनोज कुमार (भारतीय अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते आणि पटकथालेखक).
- १९४५: अझीम प्रेमजी (विप्रो या जगप्रसिद्ध कंपनीचे चेअरमन).
- १९४७: जहीर अब्बास (पाकिस्तानी फलंदाज).
- १९६९: जेनिफर लोपेझ (अमेरिकन अभिनेत्री, गायिका आणि नर्तिका).
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतीदिन
२४ जुलै रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
- ११२९: शिराकावा (जपानी सम्राट, जन्म: ७ जुलै १०५३).
- १९७०: पीटर दि नरोन्हा (भारतीय उद्योगपती, जन्म: १९ एप्रिल १८९७)
- १९७४: सर जेम्स चॅडविक (नोबेल पारितोषिक विजेते ब्रिटिश पदार्थवैज्ञानिक, जन्म: २० ऑक्टोबर १८९१).
- १९८०: उत्तम कुमार (बंगाली हिंदी चित्रपट अभिनेते, जन्म: ३ सप्टेंबर १९२७).
- १९८०: पीटर सेलर्स (इंग्लिश विनोदी अभिनेता आणि गायक, यांचे निधन. (जन्म: ८ सप्टेंबर १९२५).
- २०१२: रॉबर्ट लिडले (सीटी स्कॅन चे शोधक, जन्म: २८ जुन १९२६).
२४ जुलै दिनविशेष संबंधी महत्त्वाचे दुवे:
जुलै महिन्यातील दिनविशेष | ||||||
---|---|---|---|---|---|---|
१ | २ | ३ | ४ | ५ | ६ | ७ |
८ | ९ | १० | ११ | १२ | १३ | १४ |
१५ | १६ | १७ | १८ | १९ | २० | २१ |
२२ | २३ | २४ | २५ | २६ | २७ | २८ |
२९ | ३० | ३१ | ||||
तारखेप्रमाणे जुलै महिन्यातील सर्व दिनविशेष पहा. |
- [col]
- [col]
- - मराठी व्यंगचित्र
- - विचारधन
- - मराठी शब्द
- ... आज
आज
सर्व विभाग / सेवा सुविधा / मराठी दिनदर्शिका / दिनविशेष / जुलै महिन्यातील दिनविशेष
विभाग -
जानेवारी दिनविशेष · फेब्रुवारी दिनविशेष · मार्च दिनविशेष · एप्रिल दिनविशेष · मे दिनविशेष · जून दिनविशेष · जुलै दिनविशेष · ऑगस्ट दिनविशेष · सप्टेंबर दिनविशेष · ऑक्टोबर दिनविशेष · नोव्हेंबर दिनविशेष · डिसेंबर दिनविशेष
विषय -
जानेवारी · फेब्रुवारी · मार्च · एप्रिल · मे · जून · जुलै · ऑगस्ट · सप्टेंबर · ऑक्टोबर · नोव्हेंबर · डिसेंबर
अभिप्राय