१० जुलै दिनविशेष - इतिहासातील जागतिक दिवस, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवसांची संदर्भासहित माहिती देणारे दिनांक १० जुलै चे दिनविशेष.
जागतिक दिवस
ठळक घटना / घडामोडी
जन्म / वाढदिवस / जयंती
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतीदिन
आज
सर्व विभाग / सेवा सुविधा / मराठी दिनदर्शिका / दिनविशेष / जुलै महिन्यातील दिनविशेष
विभाग -
जानेवारी दिनविशेष · फेब्रुवारी दिनविशेष · मार्च दिनविशेष · एप्रिल दिनविशेष · मे दिनविशेष · जून दिनविशेष · जुलै दिनविशेष · ऑगस्ट दिनविशेष · सप्टेंबर दिनविशेष · ऑक्टोबर दिनविशेष · नोव्हेंबर दिनविशेष · डिसेंबर दिनविशेष
विषय -
जानेवारी · फेब्रुवारी · मार्च · एप्रिल · मे · जून · जुलै · ऑगस्ट · सप्टेंबर · ऑक्टोबर · नोव्हेंबर · डिसेंबर
१० जुलै रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस
- बहामास स्वातंत्र्य दिवस.
- मॉरिटानिया सैन्य दिन.
- जलसंपत्ती दिवस.
- जागतिक ऊर्जा स्वातंत्र्य दिवस.
ठळक घटना / घडामोडी
१० जुलै रोजी घडलेल्या ठळक घटना आणि घडामोडी
- १२१२: लंडन शहराला लागलेली आग ज्यात शहराचा मोठा भाग प्रचंड आगीच्या भक्ष्यस्थानी गेला होता.
- १५८४: ऑरेंजचे ‘विल्यम पहिले’ यांची राहत्या महालात हत्या.
- १७७८: अमेरिकन क्रांती, फ्रान्सने युनायटेड किंग्डम विरुद्ध युद्ध पुकारले (फ्रान्सची अमेरिकन क्रांतीला मदत).
- १७९६: ‘कार्ल फ्रीदरिश गाउस’ यांच्या सर्वप्रथम लक्षात आले की कोणताही आकडा जास्तीत जास्त तीन त्रिकोणी आकड्यांची बेरीज असतो.
- १८००: कोलकाता येथे ‘फोर्ट विल्यम कॉलेज’ची स्थापना.
- १८५०: ‘मिलार्ड फिलमोर’ अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी.
- १८९०: ‘वायोमिंग’ अमेरिकेचे ४४ वे राज्य झाले.
- १९१३: ‘कॅलिफोर्निया’तील ‘डेथ व्हॅली’मध्ये तापमान १३४ अंश फूट (५७ अंश सेल्सिअस) पर्यंत वाढले, जे पृथ्वीवरील सर्वात उच्च तापमानाचे रेकॉर्ड आहे.
- १९२३: ‘मुसोलिनी’ यांनी इटलीतील सर्व राजकीय पक्षांवर बंदी घातली.
- १९२५: मेहेर बाबा (अवतार मेहेर बाबा) यांनी मौनव्रताची सुरुवात करून सलग ४४ वर्षे त्यांनी हे व्रत मृत्यूपर्यंत पाळले.
- १९२५: तास या सोवियेत संघाच्या वृत्तसंस्थेची स्थापना.
- १९२५: उत्क्रांतीवाद शिकवल्या बद्दल अमेरिकेच्या डेटन, टेनेसी शहरात जॉन टी. स्कोप्स या शिक्षकावर खटला भरण्यात आला.
- १९४०: दुसरे महायुद्ध - विची फ्रांसच्या सरकारची रचना.
- १९४०: बॅटल ऑफ ब्रिटन या नावाने ओळखले जाणारे हवाईयुद्ध सुरू झाले.
- १९४७: मुहम्मद अली जिना पाकिस्तानच्या गव्हर्नर-जनरलपदी.
- १९६२: ‘टेलस्टार’ या जगातील पहिल्या संदेशवाहक उपग्रहाचे प्रक्षेपण.
- १९६७: न्यू झीलँडने आपले चलन दशमान पद्धतीत आणले (न्यू झीलँड दशांश चलन दिवस).
- १९६८: मॉरिस कुव्ह दि मुरव्हिल फ्रांसच्या पंतप्रधानपदी.
- १९७३: बहामास युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.
- १९७३: पाकिस्तानने बांगलादेशचे स्वातंत्र्य मान्य केले.
- १९७६: इटलीत सेव्हेसो येथे विषारी वायुगळती. ३,००० प्राणी मृत्युमुखी. ७०,००० अजून प्राण्यांची कत्तल.
- १९७८: मॉरिटानियात लश्करी उठाव.
- १९७८: मुंबई येथे महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ स्थापन करण्यात आले.
- १९९१: बोरिस येल्त्सिन रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदी.
- १९९२: मादक द्रव्यांच्या तस्करी बद्दल पनामाच्या भूतपूर्व राष्ट्राध्यक्ष मनुएल नोरिगाला फ्लोरिडात ४० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा.
- १९९२: आर्वी येथील विक्रम इनसॅट भू-केंद्र राष्ट्राला अर्पण केले.
- १९९२: संपूर्ण स्वदेशी बनावटीच्या इन्सॅट-२ए या उपग्रहाचे फ्रेंच गयानातील कोउरू येथून प्रक्षेपण झाले.
- १९९५: म्यानमारमधील लोकशाही चळवळीच्या प्रणेत्या आंग सान सू क्यी यांची ६ वर्षांच्या नजरकैदेतून बिनशर्त मुक्तता करण्यात आली.
- २०००: मनुभाई मेहता पुरस्कार शास्त्रज्ञ वि. ग. भिडे यांना जाहीर.
- २०००: नायजेरियात फुटलेल्या तेलवाहिकेत स्फोट. त्यातून गळणारे पेट्रोल भरण्यासाठी जमलेल्यांपैकी २५० व्यक्ती ठार.
- २००३: हॉंग कॉंगमध्ये बस अपघातात २१ ठार.
जन्म / वाढदिवस / जयंती
१० जुलै रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
- १९०३: रामचंद्र भिकाजी जोशी / रा. भि. जोशी (साहित्यिक, मृत्यु: ६ नोव्हेंबर १९९१).
- १९१३: पद्मा गोळे (आधुनिक मराठी कवियत्री, मृत्यु: १२ फेब्रुवारी १९९८).
- १९१४: जो शस्टर (सुपरमॅन हिरो चे सहनिर्माते, मृत्यू: ३० जुलै १९९२).
- १९२२: गुरुनाथ आबाजी कुलकर्णी / जी. ए. कुलकर्णी (मराठी लेखक, कथाकार, मृत्यु: ११ डिसेंबर १९८७).
- १९४०: लॉर्ड मेघनाद देसाई (अर्थशास्त्रज्ञ आणि इंग्लंडच्या हाऊस ऑफ लॉर्डस चे सभासद).
- १९४३: आर्थर अॅश (अमेरिकन टेनिस खेळाडू, मृत्यू: ६ फेब्रुवारी १९९३).
- १९४५: व्हर्जिनिया वेड (इंग्लिश टेनिस खेळाडू).
- १९४९: सुनील गावसकर / सुनील मनोहर गावसकर (क्रिकेटपटू, समालोचक).
- १९५०: बेगम परवीन सुलताना (पतियाळा घराण्याच्या शास्त्रीय गायिका).
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतीदिन
१० जुलै रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
- १५५९: राजे हेन्री (दुसरे) (फ्रान्सचे राजे, जन्म: ३१ मार्च १५१९).
- १९६९: डॉ. पांडुरंग सखाराम पिसुर्लेकर (इतिहासकार, जन्म: ३० मे १८९४).
- १९७०: ब्यार्नी बेनेडिक्ट्सन (आईसलँडचे पंतप्रधान, जन्म: ३० एप्रिल १९०८).
- १९७१: भिखारी ठाकूर (भोजपुरी भाषेचे कवी, नाटककार, गीतकार, अभिनेते, लोकनृत्यकर्ते, लोक गायक आणि सामाजिक कार्यकर्ते, जन्म: १८ डिसेंबर १८८७).
- १९८९: प्रभाकर ऊर्ध्वरेषे (साम्यवादी विचारवंत साहित्यिक, जन्म: ९ जानेवारी १८१९).
- २०००: वक्कोम मजीद (भारतीय पत्रकार आणि राजकारणी, जन्म: २० डिसेंबर १९०९).
- २००५: जयवंत कुलकर्णी, (मराठी गायक, जन्म: ३१ ऑगस्ट १९३१).
- २०१३: गोकुलानंद महापात्रा (भारतीय लेखक आणि शैक्षणिक, जन्म: २१ मे १९२२).
- २०१४: जोहरा सेहगल (भारतीय अभिनेत्री, नृत्यांगना आणि नृत्यदिग्दर्शक, जन्म: २७ एप्रिल १९१२).
- २०२०: आनंद मोहन चक्रवर्ती (भारतीय अमेरिकन सूक्ष्मजीवविज्ञानी, वैज्ञानिक आणि संशोधक, जन्म: ४ एप्रिल १९३८).
१० जुलै दिनविशेष संबंधी महत्त्वाचे दुवे:
जुलै महिन्यातील दिनविशेष | ||||||
---|---|---|---|---|---|---|
१ | २ | ३ | ४ | ५ | ६ | ७ |
८ | ९ | १० | ११ | १२ | १३ | १४ |
१५ | १६ | १७ | १८ | १९ | २० | २१ |
२२ | २३ | २४ | २५ | २६ | २७ | २८ |
२९ | ३० | ३१ | ||||
तारखेप्रमाणे जुलै महिन्यातील सर्व दिनविशेष पहा. |
- [col]
- [col]
- - मराठी व्यंगचित्र
- - विचारधन
- - मराठी शब्द
- ... आज
आज
सर्व विभाग / सेवा सुविधा / मराठी दिनदर्शिका / दिनविशेष / जुलै महिन्यातील दिनविशेष
विभाग -
जानेवारी दिनविशेष · फेब्रुवारी दिनविशेष · मार्च दिनविशेष · एप्रिल दिनविशेष · मे दिनविशेष · जून दिनविशेष · जुलै दिनविशेष · ऑगस्ट दिनविशेष · सप्टेंबर दिनविशेष · ऑक्टोबर दिनविशेष · नोव्हेंबर दिनविशेष · डिसेंबर दिनविशेष
विषय -
जानेवारी · फेब्रुवारी · मार्च · एप्रिल · मे · जून · जुलै · ऑगस्ट · सप्टेंबर · ऑक्टोबर · नोव्हेंबर · डिसेंबर
अभिप्राय