Loading ...
/* Dont copy */

जातबळी भाग ७ - मराठी भयकथा

जातबळी भाग ७, मराठी कथा - [Jaatbali Part 7, Marathi Katha] आकाश आणि नभाच्या निर्व्याज्य प्रेमाची जीवाला चटका लावून जाणारी कहाणी म्हणजेच जातबळी.

जातबळी भाग ७ - मराठी कथा | Jaatbali Part 7 - Marathi Katha
पुर्वार्ध: राकेश पूजासोबत नभाच्या घरी येतो तिथे तिचे चार मामा आलेले असतात. राकेश पूजाला आकाशचे सिक्रेट सांगायला लावतो. नभाच्या मामांचा राकेश वर विश्वास बसत नाही. सुभाष मामा राकेशचे थोबाड लाल करतो. पूजा मामांना रात्री स्वतःच खात्री करून घेण्यास सांगून राकेशला त्यांच्यापासून वाचवते आणि दूर घेऊन जाते. राकेश पूजाला आपल्या प्लॅनमध्ये सामील करून घेतो. रात्री आकाशचा आत्मा नभाला भेटायला येतो तेव्हा त्यांच्यावर पळत घेऊन असलेल्या मामांना त्याला पाहून आश्चर्याचा धक्का बसतो. आकाशचा खात्मा करण्यासाठी ते राकेश आणि पूजाला बोलावतात. आकाशचा आत्मा घरी पोहोचतो तिथे तो मेलाय असे समजून डॉक्टरांना बोलावलेले असते. नाईलाजाने आकाश आपल्या सिद्धीबद्दल सर्व काही सांगतो. राकेश आणि पूजा सोबत नभाचे मामा आकाशच्या मर्डरचा प्लॅन बनवतात. पूजा नभाच्या मनात आकाशविरुद्ध विष कालवायचा प्रयत्न करते. पुजाशी बोलल्यापासून नभा डिस्टर्ब असल्याचे रसिका आकाशला सांगते. या सगळ्यामागे राकेश असावा असा आकाशला संशय येतो. तो नभाला समजावण्यासाठी रश्मीची मदत मागतो. नभा अचानक घरी आल्याने चारही मामा तिला तिच्या घरी सापडतात. रवी मामा नभाचे लग्न त्याच्या मेव्हण्याच्या मुलासोबत ठरवल्याचे सांगतो. नभा ऑफिस मधुन लवकर घरी गेल्यामुळे आकाश तिच्या घरी अदृश्य रूपात जातो. नभाच्या मनातील संशय दूर करतो आणि तिला तूर्तास मामांच्या हो ला हो करायला सांगतो. पुढे चालू...

सकाळी आकाशला थोडी उशीरानेच जाग आली. प्रातर्विधी उरकून तो चहा घेण्यासाठी हॉलमध्ये आला आणि समोर जोशी काकांना बाबांशी बोलताना पाहून त्याला आश्चर्य वाटले. “आज काका अचानक घरी कसे आले?” असा विचार आकाशच्या मनात येतो न येतो तोच, “या प्रेमवीर या! तुमचे सगळे पराक्रम आलेत माझ्या कानांवर. असे समोर बसा जरा, थोडे महत्वाचे बोलायचे आहे आपल्याशी.” असे म्हणत जोशी काकांनी बाजूची खुर्ची आकाशला बसण्यासाठी पुढे केली.

आकाश बसल्यावर जोशी काकांनी आकाशच्या आईलाही बोलावून घेतले. प्रथमदर्शनी मिश्किल वाटणारे काका एकदम गंभीर झाले. “मी या आधीही वहिनींना आकाशच्या बाबतीत सावध केले होते. आजही मी त्याच संदर्भात इथे आलो आहे. आकाशच्या पत्रिकेत एक घाणेरडा योग आहे, आणि त्यामुळे त्याच्या जीवाला धोका आहे. येणारे चार दिवस आकाशच्या आयुष्याचा निर्णय करणारे आहेत. हे चार दिवस जर व्यवस्थित गेले तर नंतर आकाशला कसलाच त्रास होणार नाही. पुढे सगळे चांगलेच होईल. पण येणारे चार दिवस फारच धोकादायक आहेत.”

[next] “वहिनी आणि आकाश तुम्ही तुमची साधना सुरूच ठेवा. आकाश, पुढच्या चार दिवसात तू घरातच राहा. बाहेर न जाशील तर उत्तमच. अर्थात घरी राहिल्यामुळे पुर्णपणे सुरक्षित राहशील असे नव्हे पण दगडापेक्षा विट मऊ असा हा प्रकार आहे. तुला मी अमानवीय शक्तींपासून सुरक्षेसाठी ताईत दिला आहे, तो सतत धारण कर. मी या घराभोवती एक सुरक्षा कवच बनवेन त्यामुळे बाहेरून हल्ला करणाऱ्या अघोरी शक्ती आत येऊ शकणार नाहीत. पण त्या अशी परिस्थिती निर्माण करतील की तुला घरातून बाहेर पडणे क्रमप्राप्त होईल. पण काहीही झाले तरी तू घरातून बाहेर पडायचे नाहीस.”

एवढे बोलून जोशी काकांनी हॉलच्या मध्यावर एक कुंकवाचे मंडळ काढले. त्यामध्ये कुंकवानेच एक तारा बनवला. आकाशच्या घराभोवती सुरक्षा चक्र निर्माण करण्यासाठी सोबत आणलेले समुद्री मिठाचे पोते त्या मंडळाच्या मध्यावर ठेवले. त्यानंतर त्यांनी हातामध्ये दोन पळ्या पाणी घेतले आणि डोळे मिटून ते वास्तुरक्षा मंत्राचा जप करू लागले. मंत्राची दशसहस्त्र आवर्तने झाल्यावर तो मंत्र सिद्ध झाला. नंतर त्यांनी “वास्तुरक्षामी कुरु कुरु स्वाहा!” म्हणत हातातील अभिमंत्रित पाणी त्या मिठाच्या पोत्यावर तीन वेळा शिंपडले. हे सर्व झाल्यावर त्यांनी त्या पोत्यातील मिठाने संपुर्ण घराभोवती एक रिंगण काढले.

आकाशचे घर सुरक्षित झाल्याची खात्री झाल्यावर जोशी काकांनी चार दिवस आकाशला घरीच राहण्यास सांगितले. तसेच कोणत्याही परिस्थितीत आत्मा शरीराबाहेर काढून नभाला भेटायला जायचे नाही अशी सक्त ताकीद दिली. कारण त्यात त्याच्या जीवाला धोका संभवत होता. "जोश्या एक विचारू का?" आकाशचे बाबा म्हणाले. “विचार ना? अगदी क्षुल्लक जरी वाटली तरी कोणतीही शंका विचार? वेळ अशी आहे की बारीक सारीक गोष्टीकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही.” जोशी काकांनी उत्तर दिले.

[next] “अरे मला एक सांग तू अमानवीय शक्ती वगैरे जे काही म्हणालास ते आकाशच्या मागे का लागतील? खरेच असे काही असते का?” आकाशच्या वडीलांनी आपली शंका विचारली. “सांगतो. मुळात अमानवीय शक्ती म्हणजे मानवेतर शक्ती आहेत. म्हणजेच ज्या माणुस नाहीत. उदाहरणार्थ अतृप्त पिशाच्च. मांत्रिक लोक अशा अमानवीय शक्तींना वश करून त्यांच्याकडून सर्वसामान्य माणसाला शक्य नसलेल्या गोष्टी करवून घेतात. त्या बदल्यात लोकांकडून पैसे, धान्य, नशेची साधने किंवा त्यांना हव्या असलेल्या गोष्टी घेतात.”

“पण या गोष्टी तर ते त्या वश केलेल्या पिशाच्चाकडून पण मिळवू शकत असतील ना? मग त्यासाठी कोणाकडून पैसे घेऊन त्या अमानवीय शक्तींमार्फत इतर कोणाचे नुकसान करायची काय गरज?” आकाशच्या वडीलांनी आपली शंका उपस्थित केली. “बरोबर आहे, पण समजा जर मला कोणाचे वाईट करायचे असेल आणि कायद्याच्या कचाट्यात पण अडकायचे नसेल तर मला या मांत्रिकांशिवाय दुसरा सोयीचा ऑप्शन उरत नाही ना? काही पुरावाच मिळत नाही आणि कामही बिनबोभाट होते.”

“आता आकाशच्या पत्रिकेत जो घाणेरडा योग झाला आहे, त्यामध्ये त्याला मृत्यू संभवतो आहे. त्यात दोन शक्यता आहेत. पहिला म्हणजे घातपात, जो माणसाकडून संभवतो आणि दुसरा म्हणजे अमानवीय शक्तींकडून. यासाठी मी त्याला घराबाहेर पडण्यास मज्जाव केला आहे. यामुळे पहिली शक्यता म्हणजे घातपात निकालात निघेल. कारण पुढचे चार दिवस त्याचा केवळ घरातील माणसांशीच संबंध राहील. त्यामुळे त्याला बाहेरच्या माणसांकडून कडून काही दगा फटका होण्याचा काही चान्सच उरणार नाही. या चार दिवसात त्याने फोनही घेणे टाळले पाहिजे.”

[next] “दुसरी शक्यता जी अमानवीय शक्तींकडून नुकसान होण्याची आहे, त्यासाठी मी त्याला ताईत दिला आहे. त्यातील मंतरलेली विभुती त्याचे रक्षण करेलच पण अजुन खबरदारी म्हणुन मी संपुर्ण घराभोवतीच एक सुरक्षाचक्र बनवले आहे त्यामुळे अमानवीय शक्ती घरात प्रवेश करूच शकणार नाहीत. पण त्या शक्ती अशी परिस्थिती नक्कीच निर्माण करू शकतात की तुम्हाला संशय पण येणार नाही आणि आकाशला घराबाहेर पडावे लागेल. खबरदारी म्हणुन तुम्ही कोणीही हे चार दिवस घराबाहेर पडला नाहीत तर फार बरे होईल.” जोशी काकांनी सावध केले.

“अरे, आकाशने चार दिवस घराबाहेर न पडणे एकवेळ ठीक आहे, पण आम्ही चार दिवस घरात बसून काय करणार? आम्हा दोघांना ऑफिसमधून अशी अचानक चार दिवस सुट्टी मिळताना मुश्किल आहे. ऑफिस मध्ये कामाचा किती लोड आहे! बरं धरून चाल, सुट्टीचे ऍडजस्ट केले. अगदी चार दिवस लागणारे सामान पण घरात आणून ठेवले पण बाकीचे व्यवहार कसे टाळणार? घरात बाहेरून येणाऱ्या लोकांना, नातेवाईकांना काय सांगणार? तुम्ही आमच्या मुलाला काही दगाफटका करू शकता त्यामुळे प्रिकॉशन म्हणुन आम्ही तुम्हाला घरात घेऊ शकत नाही, तुम्ही चार दिवसानंतर या म्हणुन? बी प्रॅक्टिकल यार!” आकाशचे वडील थोडे वैतागून म्हणाले.

यावर जोशी काकांनी थंड स्वरात विचारले, “मला एक सांग, तुला तुझ्या मुलाचा जीव महत्वाचा आहे की लोक काय म्हणतील हे महत्वाचे आहे? आणि याचे उत्तर तू मला देऊ नकोस, स्वतःलाच दे. जे तुला योग्य वाटते ते कर. मी माझे काम केले आहे, आता पुढे काय करायचे तो तुझा विषय आहे. मी निघतो. आणि हो, मला चार दिवसानंतर माझा शिष्य जीवंत दिसायला हवाय हे लक्षात ठेव.” एवढे बोलून जोशी काका उठले. आकाशच्या वडीलांना आपली चूक उमजली आणि ते खजील झाले.

[next] जोशी काकांना अडवत ते म्हणाले, “अरे जोश्या चिडतोस काय एकदम? आम्ही घराबाहेर पडल्यामुळे काय प्रॉब्लेम होऊ शकतो ते मला समजले नाही म्हणुन मी असे म्हणालो.” “अरे बाबा, काहीही होऊ शकते, तुम्हाला ओलीस ठेऊन आकाशला घराबाहेर पडण्यासाठी भाग पाडले जाऊ शकते. तुमचा ऍक्सिडंट होऊ शकतो ज्यामुळे आकाशला बाहेर पडावे लागू शकते. अगणित शक्यता आहेत ज्यांचा आपण अंदाज पण नाही बांधू शकत. मी आकाशच्या बाबतीत कोणतीही रिस्क घेऊ इच्छित नाही म्हणुन एवढे सांगतोय.”

“प्लिज, समजण्याचा प्रयत्न कर. अरे बाप आहेस ना त्याचा? तुला या गोष्टीचा सिरीयसनेस का समजत नाही आहे? तुला यातले काही कळत नाही आणि यावर विश्वास पण नाही हे मी जाणतो. पण एक मित्र म्हणुन, तुझ्या मुलाचा गुरु किंवा हितचिंतक म्हणुन तरी माझ्यावर विश्वास ठेव. हे थोतांड नाही तर शास्त्र आहे. डॉक्टरांचे डायग्नोसिस कधी कधी चुकते मग जसा पेशंटला हवा तो रिझल्ट मिळत नाही तसेच या शास्त्रात देखील आहे.” आकाशच्या वडीलांनी मान डोलावली. “मग मी सांगतो तसे कर. काहीही कंफ्युजन वाटल्यास मला लगेच फोन कर, आता मी निघतो.” असे पोटतिडकीने बोलून जोशी गुरुजी तिथून आपल्या घरी निघाले.

आकाशची बरीच कामे पेंडिंग होती आणि अख्खे चार दिवस त्याला नभाला भेटता येणार नव्हते त्यामुळे त्याच्या कपाळावर आठ्या पसरल्या. नभाच्या मनातून रश्मी विषयीचा संशय पुर्णपणे गेला आहे की नाही याची त्याला खात्री वाटत नव्हती त्यामुळे मनातून तो खुप अस्वस्थ झाला होता. पण उगाच लेक्चर नको म्हणुन तो काहीच बोलला नाही. त्याने फक्त मान हलवली. सर्वांना काळजी घेण्यास सांगून जोशी काका निघून गेले.

[next] त्यानंतर आकाशच्या आई बाबांनी ऑफिसला न जाता चार दिवसांची सुट्टी टाकून घरीच राहण्याचे ठरवले. आकाशने पण आपल्या गडी माणसांना फोनवर सूचना दिल्या आणि फॅमिली सोबत चार दिवस घरीच घालवण्याचा निर्णय घेतला. आकाश भेटायला न आल्यामुळे नभा बेचैन झाली होती. तिने ऑफिस सुटल्यावर आकाशला फोन लावला. आकाशने तिला सर्व प्रकार समजावून सांगितला. ते सर्व ऐकल्यावर तिला आकाशची इतकी काळजी वाटू लागली की तिने त्याच्या घरचे काय म्हणतील या विचाराला झुगारून देऊन आकाशच्या घरी जायचा निर्णय घेतला.

दहा मिनिटातच ती आकाशच्या घरी पोहोचली. घराची बेल वाजताच आकाशच्या आईने किचन मधून त्याला आवाज दिला, "आकाश! कोण आलंय ते बघ जरा, आणि हो दरवाज्याच्या बाहेर पाऊल टाकू नकोस." थोड्याशा नाखुशीनेच आकाश जिन्यावरून दणदणत खाली आला आणि दरवाजा उघडताच नभाला समोर बघून त्याला आश्चर्याचा धक्काच बसला. तो काही बोलणार एवढ्यात नभा त्याच्या मिठीत शिरली आणि रडू लागली. आकाश तिचे सांत्वन करू लागला.

तिच्या मुसमुसण्याच्या आवाजाने आकाशची आई किचन मधून बाहेर आली. आकाशला मिठी मारून रडणाऱ्या नभाला पाहून ती संभ्रमात पडली पण तिने अंदाज बांधला की ती नभाच असू शकते. तिने नभाची थोडी फिरकी घ्यायची ठरवले. "आकाश! काय रे, कोण ही मुलगी? आणि तुला मिठी मारून का रडतेय? खरं सांग, तू काही गोंधळ तर नाही ना घालून ठेवला आहेस?" नभा एकदम दचकून आकाशपासून दूर सरकली. "अगं आई असं काय करतेस? ही नभा. तू पण ना! तोंडाला येईल ते बोलतेस." आकाशला मेल्याहून मेल्यासारखे झाले.

[next] "अच्छा, हीच काय ती नभा? काय गं! काय अशी जादू केलीस माझ्या आकाशवर? तुझ्यापुढे त्याला इतर कोणी दिसतंच नाही! गेली २० वर्ष माझ्या शब्दाबाहेर नसलेला माझा मुलगा तू आल्यावर दोन महिन्यात माझे ऐकेनासा झाला. काय भरवलेस तू त्याच्या डोक्यात आमच्या विरुद्ध ते जरा मला पण कळू दे." आकाशची आई रागावल्याचे नाटक करत म्हणाली. तिचे वाक्य मनाला लागल्यामुळे नभाचे डोळे पुन्हा पाझरू लागले.

नभा धावतच तिच्या जवळ गेली आणि तिचे पाय धरून म्हणाली, "नाही हो! मी कशाला त्याच्या डोक्यात तुमच्याविरुद्ध काही भरवू. उलट त्यानेच मला येईल तो दिवस आनंदात कसा जगावा ते शिकवले, हसायला, स्वप्न पाहायला शिकवले आणि प्रेम करायलाही शिकवले. त्याचे तुमच्या सगळ्यांवर खुप प्रेम आहे. खास करून तुमच्यावर त्याचा खुप जीव आहे. तो नेहेमी तुमच्या बद्दल बोलत असतो. आज सकाळपासून त्याच्याशी बोलणे झाले नाही आणि आता हे सगळे कळल्यावर माझा जीव घुसमटल्यासारखा झाला, आणि म्हणुन मी इथे आले. माझा कोणाला त्रास द्यायचा हेतू नव्हता."

आकाशच्या आईने नभाला उठवले आणि म्हणाली, "छान बोलतेस की तू! याच बोलण्यामुळे हा तुझ्या प्रेमात पडला वाटतं." यावर नभा म्हणाली, "माझे हे बोलणे पण त्याचेच देणे आहे. माझे खुप प्रेम आहे हो त्याच्यावर. माझा जीव देऊन जर त्याचा जीव वाचणार असेल तर मी त्यालाही तयार आहे. मी त्याच्याशिवाय नाही जगू शकत." भावनावेगाने नभा हमसून हमसून रडू लागली. आकाशच्या आईने तिला आपल्या छातीशी धरले व म्हणाली, "अगं अगं रडू नकोस. गंमत केली मी तुझी. मला माहित आहे सर्व काही. आकाश माझ्यापासून काहीच लपवून ठेवत नाही.

[next] या घाणेरड्या योगामुळे त्याच्या जीवाला धोका जरी झाला असला तरी जोशी काकांनी उपाययोजना केली आहे. माझीही उपासना सुरु आहे. आकाश एकटा नाही, त्याच्या सोबत आपल्या सर्वांचे प्रेम आहे, पूर्वजांचे आशीर्वाद आहेत. ते त्याला या संकटातून तारून नेतील याची मला खात्री आहे. माझे दैवत गजानन महाराजही आपल्या पाठीशी आहेत तेव्हा तू बिलकुल काळजी करू नकोस. फक्त आजचा आणि पुढचे तीन दिवस या घराच्या बाहेर पडायला त्याला मनाई आहे. एकदा का हे दिवस व्यवस्थित गेले की आपण सुटलो. मग काही धोका नाही. तोपर्यंत तो तुला सुक्ष्म रूपात भेटायला येऊ शकणार नाही बरं!"

त्याबरोबर नभाने चमकून आकाशच्या आईकडे आणि मग त्याच्याकडे पाहिले. "हो, मला सर्व काही माहित आहे. तुम्ही दोघे सर्व जगाच्या नकळत एकमेकांना कसे भेटता ते तुमचे सिक्रेट मलाच काय, आता घरातील सर्वांनाच माहित आहे." आकाशच्या आईच्या या वाक्यावर नभा गोड लाजली आणि तिच्या कुशीत शिरली. आकाशच्या आईनेही तिला प्रेमाने कवटाळले. "म्हणजे सासूबाईंना सून पसंत पडली तर!" आकाशच्या बाबांकडे सर्वांनीच चमकून पाहिले. "अरे मिया, बीबी और सासू भी राजी, तो क्या करेगा ये ससूर काजी? आकाशच्या बाबांच्या या वाक्यावर सगळेच हसू लागले.

नभाने चटकन पुढे होत त्यांच्या पावलांना हात लावला. "अखंड सौभाग्यवती भव!" म्हणत त्यांनी तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवला. "आकाश, बाकी चॉईस छान आहे हा तुझा! मला पण पसंत आहे." "थँक्स बाबा" म्हणत आकाश धावत त्यांच्या मिठीत शिरला. "नभा, तुला म्हटले नव्हते? की माझे आई बाबा आपल्या पाठीशी उभे राहतील म्हणुन? आकाशचे हे वाक्य पुर्ण होते न होते तोच "त्याची आजीही पाठीशी उभी आहे बरं" असे म्हणत आकाशची आजी त्या सर्वांना जॉईन झाली.

[next] आकाश आणि नभाने तिच्याही पायाला हात लावून आशीर्वाद घेतला. तिने दोघांच्या डोक्यावरून मायेने हात फिरवत त्यांना जवळ घेतले. एवढ्या टेंशनच्या वातावरणातही घरात आनंदोत्सव सुरु असलेला पाहून कॉलेज मधून परतलेला अनुज पुरता गोंधळला होता. नभाच्या रूपात आपल्या घरी आता वहिनी येणार हे कळल्यावर त्यालाही खुप आनंद झाला. तो आपल्या दादाला नभावरून चिडवू लागला तसा आकाश त्याला पकडायला धावू लागला. त्यांची मस्ती पाहून सर्वच जण हसू लागले.

आकाशच्या कुटुंबाचा हा आनंद नभाच्या मागावर आलेल्या राकेश आणि सुभाष मामा दुरूनच पाहत होते. त्यांना काही ऐकू जरी येत नसले तरी खिडकीतून जे दिसले त्यावरून नभाला आकाशच्या कुटुंबाने आपली सून म्हणुन स्विकारले आहे हे मात्र त्यांच्या लक्षात आले. सुभाष मामाला हे सहन झाले नाही. तो रागाच्या भरात दात ओठ खात त्यांच्या दिशेने जाऊ लागला. राकेशने मोठ्या प्रयत्नाने त्याला रोखले. "रवी मामाला विचारल्याशिवाय काहीही करणे चुकीचे ठरेल" असे राकेश म्हणताच सुभाष शांत झाला. नभा निघायच्या तयारीत दिसताच ते दोघे तिथून निघून गेले.

सुभाष आणि राकेशने पाहिलेला सर्व प्रकार रवी मामाच्या कानावर घातला. रवी मामाच्या तळ पायाची आग मस्तकात गेली. तो जळजळीत नजरेने राकेशकडे पाहत म्हणाला, "माझ्याकडे जास्त झाले होते म्हणुन तुला दहा हजार दिले नव्हते. वेळ हातातून निघून गेल्यावर कामाला लागणार आहेस काय? लक्षात ठेव, जर माझे काम झाले नाही ना, तर घशात हात घालून पैसे वसूल करेनच पण तुमची दोघांची चामडी सोलून त्याचे जोडे करून पायात घालेन."

[next] राकेश आतून चांगलाच घाबरला पण त्याने चेहऱ्यावर तसे दाखवले नाही. स्वतःला सावरत तो म्हणाला, "तशी वेळच येणार नाही. मी काय सांगतो ते लक्षपूर्वक ऐका. सर्व प्रथम तुम्ही नभाला काही तरी कारण काढून बेळगावीला पाठवा किंवा घरात तरी डांबून ठेवा जेणेकरून ती आपल्या प्लॅन मध्ये काही अडचण आणणार नाही." असे म्हणुन त्याने आपली योजना सांगायला सुरवात केली. जस जसा तो बोलत होता तस तसे रवी आणि त्याच्या भावांच्या चेहऱ्यावरचे भाव झपाट्याने बदलत होते.

राकेशचे बोलणे संपताच रवी मामाने खुश होऊन त्याच्या हातावर टाळी दिली आणि म्हणाला, "तुझी आयडिया तर बेस्ट आहे पण एवढ्या सगळ्या उचापती करणे तुला शक्य होईल?" "हो नक्कीच, पण त्यासाठी पैशांची गरज लागेल. मांत्रिक, गुंड आणि इतर गोष्टींची जुळवा जुळव करावी लागेल. दोन लाख तरी खर्च होतील." राकेश म्हणाला. "काय दोन लाख? आम्हाला काय चू** समजलास काय रे? आधीच दहा हजार घेऊन बसला आहेस आणि आता सरळ सरळ दोन लाख!" सुभाष वैतागून म्हणाला.

"ठीक आहे मग तुमचे तुम्ही बघा काय करायचे ते. मी निघतो." असे म्हणुन राकेश तिथून निघू लागला. तेव्हा त्याला अडवत रवी मामा म्हणाला, "ठीक आहे. मंजूर पण जर का काम झाले नाही किंवा आम्हाला गोत्यात आणलेस तर..." "तर तुम्ही माझ्या कातडीचे जोडे करून घालाल. मला चांगले ठाऊक आहे. माझ्यावर विश्वास ठेवा. काम खुप जोखमीचे आहे. आकाश सोबत अजून एखाद दुसरा मर्डर होऊ शकतो. ते सर्व प्रकरण दाबावे लागेल. आपले नांव कुठेही येणार नाही याचीही खबरदारी घ्यावी लागेल." राकेशने त्यांना विश्वास देत म्हणाला."

[next] "अरे दादा, पण दोन लाख ..." सुभाषने बोलायचा प्रयत्न केला पण रवीने हात वर करताच त्याला मुग गिळून शांत बसावे लागले. राकेशकडे रोखून बघत रवी म्हणाला "ठीक आहे दिले तुला पैसे, अर्धे काम होण्याआधी आणि अर्धे काम झाल्यावर. पण काम अगदी चोख व्हायला पाहिजे. अगदी या कानाचे त्या कानाला कळता कामा नये हे लक्षात ठेव. सकाळी ये आणि पैसे घेऊन जा." राकेश मान डोलावून निघून गेला.

दुसरा दिवस उजाडला तोच एका वाईट बातमीने. सकाळी सकाळीच आकाशच्या मोठ्या मामीचा फोन आला. ती फोनवर ओक्सबोक्शी रडत होती. आकाशच्या आईने तिला शांत केले व काय झाले ते जाणून घ्यायचा प्रयत्न केला. थोडे बोलणे झाल्यावर "आम्ही लगेच निघतोय तुम्ही काळजी करू नका" असे सांगून तिने फोन ठेवला. एवढ्यात आकाशचे बाबा तिथे आले. आपल्या बायकोचा चिंताक्रांत चेहरा पाहून त्यांनी विचारले, "तू एवढी टेन्शन मध्ये का दिसतेस? कोणाचा फोन होता?"

तिने त्यांना सांगितले, "अहो मोठ्या वहिनींचा फोन होता. भाईची (आकाशच्या मोठ्या मामाची) तब्येत खुप बिघडली आहे. कालपासून अन्न सोडलंय आणि निपचित पडून आहे. त्यात नाना (आकाशच्या धाकटा मामा) पण ट्रकवर गुजरातचे भाडे घेऊन गेलाय त्यामुळे भाईला दवाखान्यात ऍडमिट करण्यासाठी आपल्यालाच जावे लागेल. आता कसं करायचं? जोशी भाऊजी बोलले होते तसंच घडतंय. आता या परिस्थितीत न जाऊन पण चालणार नाही. तुम्ही भाऊजींना जरा फोन करता का?"

[next] आकाशचे वडील पण विचारात पडले. त्यांनी जोशी काकांना फोन लावला पण त्यांचा फोनच लागत नव्हता. तीन चार वेळा कॉल करूनही फोन न लागल्यामुळे शेवटी त्यांनी एकट्याने घरातुन बाहेर पडायचा निर्णय घेतला. आकाशचे वडील आपल्या मेव्हण्याच्या घरी जायला एकटेच निघाले व आकाशची आई घरीच थांबली. तिची परिस्थिती मोठी विचित्र झाली होती. एकीकडे पती तर दुसरीकडे सख्खा भाऊ होता पण पर्यायच नसल्यामुळे तिने त्यांना काळजी घ्यायला सांगितले. तिची समजूत घालून ते निघाले.

"पोहोचलात की फोन करा." दारातूनच ती ओरडली. तिच्या आवाजातली काळजी जाणवून आकाशचे बाबा, "काळजी करू नकोस मी सगळे मॅनेज करतो आणि लवकरात लवकर परत येतो" असे म्हणुन कार घेऊन बाहेर पडले. जिमला जायचे नसल्यामुळे घरातच वर्क आऊट करून झाल्यावर आकाश आपले व्हे प्रोटीन शेक घेण्यासाठी किचन मध्ये आला. दरवाजात रडवेली झालेली आई आणि कार घेऊन बाहेर पडत असलेल्या आपल्या वडीलांना पाहून त्याला समजेना की नक्की काय झालंय. तो धावतच आईजवळ गेला.

"आई तू रडतेस का? काय झालंय? आणि अशी काय इमर्जन्सी होती की जोशी काकांनी बाहेर पडू नका म्हणुन सांगितले असताना सुद्धा बाबा बाहेर पडले?" त्याला काहीच कळत नव्हते. आईकडून त्याला सर्व प्रकार कळल्यावर तोही टेन्शन मध्ये आला. त्यांच्याकडे फोनची वाट पाहण्यापलीकडे काहीच ऑप्शन नव्हता. दुपारपर्यंत आकाशच्या वडीलांचा फोन न आल्यामुळे घरात सगळेच टेन्शन मध्ये होते. शेवटी अडीच वाजता त्यांचा फोन आला.

[next] आकाशच्या मामाला आय.सी.यु ला शिफ्ट करण्यात आले होते. तो अंडर ऑबझर्वेशन होता. डॉक्टर संध्याकाळी साडेपाचला येणार होते त्यानंतरच खरी परिस्थिती कळणार होती. त्यामुळे आकाशच्या वडीलांनी बाहेरच काहीतरी खाऊन संध्याकाळी डॉक्टरांना भेटूनच परत येण्याचा निर्णय घेतला. अजुन तरी काही अनुचित घडले नव्हते पण ते असे पुर्वसूचना देऊन थोडी ना घडणार होते?

खराब फ्रेंड सर्कलमुळे राकेशच्या काही नको त्या माणसांशी ओळखी झाल्या होत्या. त्यात मांत्रिक, अघोरी साधना करणारे तसेच सराईत गुन्हेगार व सुपारी घेऊन गेम वाजवणारे पण होते. त्याला स्वतःला आकाशचा काटा काढायचा होता. मनात आणले असते तर त्याने केव्हाच आकाशची सुपारी दिली असती पण त्याला त्याच्या वडीलांची खुप भीती वाटत असे. त्याचे वडील राकेशच्या अगदी उलट स्वभावाचे होते. ते एक नावाजलेले बिल्डर होते.

जाधव बिल्डर्स अँड डेव्हलपर्स या नांवाने कंस्ट्रक्शनचा त्यांचा मोठा बिझनेस होता. त्यांना समाजात चांगला मान होता. सच्चाईने व सचोटीने बिझनेस करणारे म्हणुन त्यांचे मोठे नांव होते. त्यांच्या कामाची क्वालिटी नेहेमी उत्तम असे त्यामुळे केवळ त्यांच्या नांवावरच बिझनेस चालत असे. त्यांनी राकेशवर कायम चांगलेच संस्कार केले. वाईट सवयी लागू नयेत म्हणुन त्याला कधी पॉकेटमनी दिला नाही पण त्याच्या सर्व गरजा व्यवस्थित पुर्ण होतील याची पुरेपूर काळजी घेतली.

[next] बाप एवढा श्रीमंत असुनही राकेशच्या हातात पैसा नसे त्यामुळे कॉलेज मध्ये त्याचे मित्र त्याची खुप खेचायचे. राकेशला आपल्या वडीलांचा खुप राग यायचा. मग त्याच्या एका मित्राने त्याला एक आयडिया सांगितली. राकेश वडीलांना मदत म्हणुन कॉलेज सुटल्यावर धंद्यात लक्ष घालू लागला. साहजिकच हळूहळू बिझनेसमुळे खर्चासाठी त्याच्या हातात पैसे येऊ लागले. खोटी बिलं सबमिट करून तो त्यातून पैसे काढून लागला.

दोन चार व्यवहारातच त्याच्या वडीलांच्या लक्षात ही गोष्ट आली तेव्हा त्यांनी राकेशला पार्ट टाईम जॉब करायला लावून त्याने लाटलेले पैसे वसूल केले होते. बिझनेस मधून त्याला हाकलले ते वेगळेच. मग राकेश कायदा तोडून, उलट सुलट कामे करून, कधी कमिशनमधून काही रुपये कमवत असे पण त्याची कायमच तंगी असे. राकेशची वृत्तीच जिथे चांगली नव्हती तिथे त्याच्या वडीलांनी त्याला कितीही सुधारायचे प्रयत्न केले तरी ते अपुरेच ठरत होते.

आकाशने जेव्हा राकेशची धुलाई केली होती तेव्हा तर राकेशने त्याची सुपारी जवळजवळ दिलीच होती पण कसे कोणास ठाऊक त्याच्या वडीलांना त्याची बातमी लागली. त्यांनी अशी काही त्याची खरडपट्टी काढली की, आकाश परवडला पण बाप नको अशी राकेशची परिस्थिती झाली. राकेशने त्यांना वचन दिले की तो त्यांच्या समाजातील वजनाचा गैरफायदा घेऊन कधीही कोणाचेही वाईट करणार नाही पण कुत्र्याची शेपटी वाकडी ती वाकडीच.

[next] नभाच्या मामांमुळे राकेशला आयतीच संधी मिळाली. त्याने विचार केला की साप पण मरेल आणि काठी पण तुटणार नाही. दुर्दैवाने जर का प्रकरण अंगलट आलेच तर तो सगळे नभाच्या मामांच्या अंगावर ढकलून मोकळा होणार होता. ठरल्याप्रमाणे सकाळी त्याने रवीकडून एक लाख रुपये कॅश घेतली आणि आकाशवर वॉच ठेवण्यासाठी काही गुंड कामाला लावले. आकाशच्या फार्महाउससमोर ते घिरट्या घालत होते.

दुपार झाली तरी आकाशचा पत्ता नाही म्हटल्यावर त्यांच्या पैकी एकाने आतमध्ये जाऊन आकाशची चौकशी केली. त्याला कळले की आकाश घरगुती कामामुळे तीन दिवस येणार नाही आहे. त्यांनी लागलीच ही बातमी राकेशच्या कानावर घातली. राकेशच्या अंगाची लाही लाही झाली. पण त्याने सबुरीने घ्यायचे ठरवले. त्याचे भाडोत्री गुंड आकाशच्या घराजवळ पाळत ठेऊन होते. आकाश सगळीकडे बुलेट घेऊनच जात असे. त्याची बुलेट दारातच होती म्हणजे तो घरातच होता असा राकेशने अंदाज बांधला.

त्याने त्याच्या माणसांना आकाश बाहेर पडला की लगेच कळवण्यास सांगितले पण संध्याकाळ झाली तरी आकाश घराबाहेर पडला नाही. आकाशच्या घरी असे काय चाललंय की तो तीन दिवस घरातच राहणार आहे हे कोडे राकेशला काही उलगडेना. पुर्ण दिवसात आकाश एकदाही घराबाहेर दिसला नव्हता. तो नक्की घरी आहे की कुठे बाहेरगावी गेला आहे हे कळायला काही मार्ग नव्हता. मग राकेशने रवी मामाला फोन लावला.

[next] "मामा, आकाश तीन दिवस घरीच असणार असल्याचे कळले आहे पण आज सकाळपासून माझी माणसे त्याच्या घराभोवती आणि फार्महाउस भोवती चक्कर मारत आहेत पण एकदाही तो कुठे दिसला नाही. तुम्ही नभाकडून काही माहिती मिळतेय का ते पहा. काही माहिती मिळाल्यास मला कळवा. मला काही माहिती मिळाली तर मी तुम्हाला कळवतोच. मी पूजाला सुद्धा या कामावर सोडतो. (पाच हजार रुपये असे फुकटात थोडी ना मिळतात?)" असे स्वतःशीच पुटपुटून राकेशने फोन ठेवला.

संध्याकाळी साडे सहाच्या सुमारास आकाशचे वडील डॉक्टरांना भेटून घरी परतले. घरात शिरताना त्यांनी आपल्या घराजवळ घुटमळणारी चार पाच माणसे हेरली होती. त्यांच्या अंतर्मनाने त्यांना धोक्याची सुचना दिली. गाडी पार्क करून ते पटकन घरात शिरले. घरातील सर्वजण त्यांची आतुरतेने वाट पाहत होते. आकाशच्या मामाचे शरीर कोणताच रिस्पॉन्स देत नसल्यामुळे डॉक्टरांनी त्याला अंडर ऑबझर्वेशन ठेवले होते. त्यांच्याकडून ही बातमी कळताच सर्वचजण हवालदिल झाले.

आकाशच्या आईचे तर अश्रूच थांबत नव्हते. तिने रडत रडत त्यांना विचारले, "आता भाईच्या जवळ कोण आहे?" "वहिनी आणि राजू (नानाचा मुलगा) हॉस्पिटल मध्ये थांबले आहेत. पण भाई आय.सी.यु मध्ये असल्यामुळे आत कोणालाच सोडत नाही आहेत. तो कधी शुद्धीवर येईल याचा डॉक्टरांना पण काही अंदाज नाही आहे. पुढचे दोन दिवस त्याच्यासाठी फार क्रुशियल असल्याचे त्यांनी सांगितले आहेत. तो शुद्धीवर आला की मग ट्रीटमेंटची दिशा ठरवता येणार आहे." आकाशचे वडील खिन्न स्वरात म्हणाले.

[next] "देवा काय रे दिवस दाखवलेस हे आम्हाला? का माझ्या मुलाच्या आणि भावाच्या जीवावर उठलास? गजानन महाराज आता तुमचाच आसरा आहे. आता या संकटातून तुम्हीच आम्हाला तारा किंवा मारा" असे म्हणत ती रडत रडत देवघरात गेली आणि देवासमोर बसली. "आकाश! इन्स्पेक्टर शिंदेना फोन लाव आणि काही माणसे आपल्या घरावर पाळत ठेऊन असल्याचे त्यांना सांग. मी जरा तुझ्या आईला सावरतो. काही वाटलेच तर मला हाक मार."

आकाश आपल्या बाबांचे वाक्य ऐकून हैराणच झाला. "काय आपल्या घरावर पाळत ठेऊन आहेत! पण का? आणि कोण आहेत ही माणसं? त्यांना कोणी पाठवले असेल?" त्याच्या एवढ्या सगळ्या प्रश्नांवर त्याचे बाबा म्हणाले, "तेच माहिती करून घेण्यासाठी इन्स्पेक्टर शिंदेना फोन लाव." आणि ते आत निघून गेले. आकाशने खिडकीतून वाकून बाहेरचा अंदाज घेण्याचा प्रयत्न केला. त्याची आणि एका गुंडासारख्या दिसणाऱ्या माणसाची नजरा नजर झाली आणि एकाच वेळी त्या दोघांनी कानाला फोन लावला.

"म्हणजे आकाश घरातच आहे तर, खबर पक्की आहे ना?" पलीकडून बोलणाऱ्या राकेशचा आवाज त्या गुंडाच्या कानात शिरला. "हो. पण मला त्याच्या एकंदरीत पाहण्यावरून असं वाटतं की त्याला आमचा संशय आला असावा. मगाशी त्याचा बाप पण आमच्याकडे संशयाने पाहात घरात शिरला होता. त्याने पोलिसांना तर फोन लावला नसेल?" त्या गुंडाच्या या बोलण्यावर राकेश एकदम सावध झाला. त्याने त्या सर्वांना तिथून ताबडतोब निघण्यास सांगितले आणि रवी मामाला फोन लावला.

[next] "मामा, आकाश घरातच आहे पण एक लोच्या झालाय. त्याला संशय आलाय असं वाटतंय. मी माझी माणसे त्याच्या घराजवळून हटवली आहेत. उगाच पोलिसांचे लचांड पाठीमागे लागायला नको. आकाशला घराबाहेर काढण्यासाठी मी काही तरी दुसरा उपाय शोधतो. तुम्हाला नभाकडून काही कळले का?" राकेशचे बोलणे ऐकल्यावर रवी मामाने त्याला एक अस्खलित शिवी घातली आणि म्हणाला, "पैसे मागताना तोंड चांगलच उघडतं की तुझं. मग प्लॅन बनवताना काय अक्कल शेण खायला जाते?

तुला बिनबोभाट काय ते कर असं सांगितले होते ना? मग पोलीस कुठून आले मधेच? मला काही लोच्या नकोय सांगून ठेवतोय. सगळं कसं निस्तरायचं ते तुझं तू ठरव. मला फक्त रिझल्ट पाहिजे. आणि हो, कालपासून नभा खुप टेन्शन मध्ये दिसत होती तिला बरंच खोदून विचारल्यावरही तिने काही सांगितले नाही. आम्ही तिच्यावर पळत ठेऊनच होतो. रात्री उशिरा तिला तिच्या मैत्रिणीशी फोनवर बोलताना आम्ही ऐकले की आकाशच्या पत्रिकेत कसला तरी घाणेरडा योग झाला आहे त्यामुळे त्याला मृत्यू येण्याची शक्यता आहे.

काही अनुचित प्रकार टाळण्यासाठी गुरुजींनी त्याला घरीच राहण्यास सांगितले आहे. अमानवीय शक्तींपासून त्याचे रक्षण करण्यासाठी संपुर्ण घराभोवती कसले तरी सुरक्षाचक्र पण काढले आहे. त्याला चार दिवस भारी आहेत आणि त्या चार दिवसातले दोन दिवस ऑलरेड़ी गेले आहेत. आता फक्त दोन दिवस शिल्लक आहेत, आणि त्यातच आपल्याला आकाशचे या पृथ्वीतलावरील वास्तव्य संपवणे गरजेचे आहे. हे सगळे कसे मॅनेज करायचे ते तुझे तू बघ." एवढे बोलून रवीने फोन कट केला.

[next] रवी मामाकडून प्राप्त झालेल्या नव्या माहितीने राकेशचे डोकेच चक्रावून गेले. जर तो म्हणतो त्याप्रमाणे असेल तर आता दोन दिवसात आकाशची गेम वाजवण्यासाठी काहीही करून आकाशला घराबाहेर काढणे गरजेचे होते. राकेशचा सैतानी मेंदू फार वेगात विचार करू लागला. सर्वप्रथम त्याने त्याच्या माणसांपैकी एकाला तिथे थांबण्यास सांगून बाकीच्यांना तिथुन निघण्यास सांगितले. बराच वेळ तो विचार करत बसला होता अचानक त्याच्या डोळ्यात एक वेगळीच चमक आली आणि मनाशी काही तरी पक्के करून त्याने कानाला फोन लावला.

आकाशने इन्स्पेक्टर शिंदेना फोन लावला. "हॅलो शिंदे काका, मी आकाश साळवी बोलतोय. थोडे काम होते तुमच्याकडे. काही लोक आमच्या घरावर पाळत ठेऊन असल्याचा बाबांना संशय आहे. आता परिस्थिती अशी झाली आहे की कोणताही निष्काळजीपणा रिस्की ठरू शकतो. हो, ते सर्व मी तुम्हाला भेटल्यावर सांगतो. तुम्ही घरी येऊ शकता का प्लिज? बाबा पण घरीच आहेत. ठीक आहे मी वाट बघतो." असे म्हणून आकाशने फोन ठेवला. अर्ध्या तासात इन्स्पेक्टर शिंदे आपल्या मित्राच्या घरी पोहोचले.

लगेचच राकेशच्या माणसाने इंस्पेक्टर शिंदे साळवींच्या घरी पोहोचल्याचे त्याच्या कानावर घातले. आपला अंदाज खरा ठरल्याचे आणि योग्य वेळी आपण आपली माणसे तिथून हलवल्याबद्दल राकेशने मनातल्या मनात स्वतःचीच पाठ थोपटली. बेल वाजताच आकाशच्या वडीलांनी दार उघडले आणि इन्स्पेक्टर शिंदेना आपल्या स्टडीरूम मध्ये घेऊन गेले. आत शिरताच शिंदेनी विचारले, "एनिथिंग सिरीयस शंतनू? आकाशचा फोन आला होता की कोणीतरी घरावर पळत ठेऊन आहे म्हणुन!" यावर आकाशचे वडील म्हणाले, "हो रे, साला काय कळत नाही काय चाललंय ते! इतक्या वर्षात कधी असे झाले नव्हते."

[next] "तू टेन्शन घेऊ नकोस, आणि मला नीट सांग काय झाले आहे ते म्हणजे मी काही तरी मदत करू शकेन." इन्स्पेक्टर शिंदे दिलासा देत म्हणाले. मग आकाशच्या वडीलांनी, आकाशच्या पत्रिकेत झालेला योग, त्यावर जोशींनी सांगितलेला उपाय, आकाशच्या मामाचे अचानक आजारी पडणे आणि त्याला हॉस्पिटलमध्ये भरती करून परत येताना त्यांच्या घराजवळ संशयास्पद हालचाली करणारे गुंडांसारखे वाटणारे लोक या बद्दल सर्व काही सांगितले.

ते ऐकल्यावर इन्स्पेक्टर शिंदे म्हणाले, "अरे माझा या पत्रिकेवर वगैरे काही विश्वास नाही. त्या जोशाला खरंच त्यातले काही कळते का हा माझ्यासाठी मोठा प्रश्नच आहे. आणि राहता राहिला प्रश्न तुझ्या घरावर पाळत ठेऊन असलेल्या गुंडांचा, तर मी येताना सगळा परिसर बारकाईने डोळ्याखालून घातला पण मला संशयास्पद वाटावा असा एकही माणूस दिसला नाही. तू उगाच टेन्शन घेऊ नकोस. पण जर का तुला काही संशयास्पद वाटलेच तर मला फोन लाव. मी लगेच माझी टीम घेऊन तुझ्याकडे येईन, काळजी करू नकोस." आपल्या मित्राला आश्वस्त करून इन्स्पेक्टर शिंदे तिथून निघाले.

तिसरा दिवस उजाडला. सकाळी साळवी कुटुंबीय नाश्ता करत असतानाच आकाशला बागेतून रामा गड्याचा फोन आला. आकाश फोनवर बोलत असताना अचानक त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलू लागले. त्याच्या चेहऱ्यावरची चिंता पाहून त्याला काय झाले असे विचारायला आलेल्या आईला त्याने हातानेच जरा थांब अशी खूण केली. आता काय नवीन प्रॉब्लेम झाला असे मनात येऊन सगळेच आकाशच्या फोन ठेवण्याची वाट पाहू लागले.

[next] "ठीक आहे तुम्ही सर्वांनी दोन दिवस सुट्टी घ्या, मी पाहतो काय करायचे ते." असे म्हणुन आकाशने फोन ठेवताच त्याचे बाबा म्हणाले, "काय रे काही प्रॉब्लेम झालाय का बागेत? सर्वांना सुट्टी दिलीस, एनिथिंग सिरीयस?" त्यावर आकाश उद्गारला, "काल रात्री कोणीतरी बागेची खुप नासधूस केली आहे. बरीचशी लागती झाडे मोडून पडली आहेत. रामा सांगत होता की कोणीतरी अजस्त्र ताकदीने ती पिळवटून टाकावीत अशी दिसत आहेत. काही मुळासकट उपटून लांब फेकून दिली आहेत, फार्म हाऊसची अवस्था तर बघवत नाही म्हणाला.

रात्र पाळीच्या गड्यांपैकी एकही धड बोलण्याच्या अवस्थेत नाही. त्याची जणू वाचाच बसली आहे. सगळे प्रचंड घाबरले आहेत आणि त्या सगळ्यांनाच सणकून ताप भरला आहे. तापात असंबद्ध बरळत आहेत. त्यो सोडणार नाय कोनास्नी बी, मालकास्नी धोका हाय. समदा इस्कोट करून टाकल्यान त्यानं वगैरे वगैरे. कोणीच बागेत काम करायला तयार नाही आहे. रात्रपाळीच्या गडयांना त्यांच्या घरी घेऊन गेले आहेत. बागेच्या गेटच्या बरोबर मध्यावर हळद कुंकू वाहिलेली, सुया टोचलेली लिंब, गुलाल टाकलेला भात, काळे उडीद वगैरे एका पत्रावळीत ठेवलेले रामाला सकाळी आढळले.

तो म्हणतो की हे बाहेरचे आहे, वेळीच बंदोबस्त नाही केला तर माझ्या जीवाला धोका आहे. मला तर काहीच कळत नाही आहे." आकाश डोक्याला हात लावत म्हणाला. आकाशचे बोलणे ऐकताच सर्वांच्या तोंडचे पाणीच पळाले. "मला कळले आहे काय चालले आहे ते. शंतनू, तू जोशी गुरुजींना पहिला फोन लाव आणि सगळे कानावर घाल. तेच काय तो उपाय करतील." आकाशची आजी म्हणाली. तिचे बोलणे ऐकताच आकाशच्या वडीलांनी आपल्या मित्राला फोन लावला.

[next] झालेला प्रकार समजताच जोशी गुरुजींनी त्यांना सांगितले, "वेळ जवळ येत चालली आहे, कोणत्याही परिस्थितीत तुमच्या पैकी कोणीही घरातून पाऊलही बाहेर काढायचे नाही. आकाश बाहेर पडावा म्हणुन अमानवीय ताकदीच्या मदतीने हे सगळे कारस्थान सुरु आहे. सगळ्यांनी आपापले फोन पहिले बंद करून ठेवा. बाहेरच्या जगाशी दोन दिवस अजिबात संपर्क ठेऊ नका यातच तुमचे भलं आहे. माझा जप सुरु आहेच. आकाश आणि वहिनींना पण त्यांची साधना सुरु ठेवायला सांग. पुढचे सगळे त्या विधात्याच्याच हातात आहे.

हे सगळे कोण करत आहे ते सांगणे आत्ता मला शक्य नाही पण मी ते लवकरच शोधून काढेन पण यावेळेला तरी आकाशची सेफ्टी सगळ्यात महत्वाची आहे. काही वाटले तर मला लगेच फोन कर." एवढे बोलून जोशी गुरुजींनी फोन कट केला. सगळ्यांचे डोळे आकाशच्या वडीलांवर खिळले होते. ते काय सांगतात ते ऐकण्यासाठी सगळे आतुर झाले होते. ते म्हणाले, "जोशी गुरुजींनी सर्वाना जास्त सावध राहायला सांगितले आहे आणि कोणत्याही परिस्थितीत कोणीही घराबाहेर पडू नका म्हणाले आहेत. कोणीतरी हे मुद्दामहुन घडवून आणतंय पण कोण? हे काही माझ्या लक्षात येत नाही.

आकाश तुझी कोणाशी दुश्मनी किंवा भांडण वगैरे?" तेव्हा थोडा विचार करून आकाश म्हणाला, तशी दुश्मनी वगैरे नाही पण कॉलेज मध्ये असताना राकेश नावाच्या एका मुलासोबत माझा थोडा मॅटर झाला होता. मागे त्याने मला मारायला पोरं पण आणली होती पण मीच त्याला धु धु धुतला होता. त्यानंतर नुकताच त्याने माझे आणि नभाचे ब्रेकप व्हावे म्हणुन आमच्याच वर्गातील पूजा सोबत मिळून नभाचे कान भरायचा प्रयत्न केला होता. पण तो या थराला जाईल असे मला नाही वाटत."

[next] "कॉलेज मध्ये झालेल्या भांडणाला आता इतके महिने झाले तरीही तो हे सगळे उद्योग करतोय तर मग तो या थराला का नाही जाऊ शकणार? अहो, तुम्ही माझे ऐका, आधी शिंदे भाऊजींना फोन लावा." आकाशची आई म्हणाली. तिचे म्हणणे पटल्यामुळे आकाशचे बाबा इन्स्पेक्टर शिंदेना फोन लावायला उठले. आकाशने त्यांना अडवायचा प्रयत्न केला, "बाबा राकेश त्या जाधव बिल्डरचा मुलगा आहे. सबळ पुरावा असल्याशिवाय शिंदे काका केवळ संशयाच्या आधारावर त्याची साधी चौकशी पण करू शकणार नाहीत. समजा केलीच आणि त्याचा या मागे हात नसला तर आपण त्याच्या वडीलांचा फुकट रोष ओढवून घेऊ.

तो माणुस जरी चांगला असला तरी त्याने ठरवले तर आपल्याला त्रास द्यायला तो पुरेसा केपेबल आहे. शेवटी त्याला त्याची इमेज खराब झालेली बिलकुल खपणार नाही. त्यामुळे घाई करू नका. तसेही दोनच दिवसांचा प्रश्न आहे. मला वाटते थोडे सबुरीने घ्यावे. उगीच आगीतून फोफाट्यात पडायला नको." आकाशच्या वडीलांना त्याचे म्हणणे पटले पण तरीही त्यांनी आपल्या पत्नीकडे पाहिले. तिलाही आकाशचे म्हणणे पटल्यामुळे तिनेही त्याच्या म्हणण्यापुढे मान तुकवली.

तेवढ्यात आकाशच्या मामीचा फोन आला, मोठ्या मामाची तब्येत अधिकच बिघडली होती. त्याला व्हेंटिलेटरवर शिफ्ट केले गेले होते. स्वभावाने भेदरट असलेल्या तिला काय करावे ते सुचत नसल्यामुळे तिने लगेच नणंदेला फोन केला. आता काय करावे हा मोठा प्रश्न पडला. ती तर हट्टून बसली होती की आकाशच्या वडीलांसोबत तुम्ही पण या म्हणुन. शेवटी तिला दोघेही येतो असे सांगून आकाशच्या आईने फोन ठेवला. आता बाहेर जावे तरी प्रॉब्लेम आणि न जावे तरी प्रॉब्लेम.

[next] तेव्हा आकाशने आपल्याला दिलेला ताईत त्यांना काढून दिला आणि म्हणाला, "तुम्ही दोघे हा ताईत सोबत घेऊन जा म्हणजे तुम्ही दोघे सेफ राहाल. मी घरीच आहे आणि घराला सुरक्षा चक्राने सुरक्षित केल्यामुळे आम्ही सर्व सुरक्षित आहोत. तेव्हा काळजी करायचे कारण नाही. फक्त मामाची विचारपूस करून झाल्यावर तुम्ही दोघे लगेच परत या." आकाशचा हा तोडगा त्यांना पटला नसला तरी सद्य परिस्थितीत तोच एक मार्ग दिसत असल्यामुळे साळवी दाम्पत्याने शेवटी घराबाहेर पडायचा निर्णय घेतला.

जोशी गुरुजींना फोन केला असता तर त्यांनी चोख नकार दिला असता हे जाणत असल्यामुळे त्यांनी त्यांना फोन करायचे टाळले. शेवटी जोशी गुरुजींनी सांगितल्याप्रमाणेच सगळे घडत होते. परिस्थितीच अशी आली की एवढे सावध करूनही साळवी दाम्पत्याला घराबाहेर पडावेच लागले. म्हणतात ना जे घडायचे ते कसेही करून घडतेच. आकाशचे आईवडील पटकन आवरून तयार झाले. आकाशच्या आईने डब्यामध्ये थोडा नाश्ता सोबत घेतला व ते तातडीने कारमधून हॉस्पिटलकडे निघाले. अर्ध्या तासात ते हॉस्पिटलला पोहोचले. आकाशच्या मामीला त्यांनी धीर दिला आणि डॉक्टर येण्याची वाट पाहू लागले.

डॉक्टरांना आपला राउंड संपवून यायला बराच उशीर लागला. तेवढ्यात जेवणाची वेळ झाल्यामुळे ते हॉस्पिटल मधून निघून गेले. डॉक्टरांना मनातल्या मनात शिव्या घालण्याव्यतिरिक्त शंतनू साळवी काहीच करू शकले नाहीत. शेवटी जेवणाची वेळ झालीच असल्यामुळे ते सर्वाना सोबत घेऊन जवळच्याच एका हॉटेलमध्ये जेवायला गेले. जेवून परतल्यावर त्यांना कळले की डॉक्टर आता संध्याकाळीच भेटतील. त्यामुळे घरी जाऊन परत बाहेर पडण्यापेक्षा त्यांना हॉस्पिटलमध्येच चरफडत संध्याकाळपर्यंत थांबण्यावाचून पर्याय नव्हता.

[next] आकाशचे आईवडील कारमधून कुठे तरी बाहेर गेल्याची खबर खबरीने लगेचच राकेशला दिली होती. बागेत झालेल्या प्रकारची बातमी एव्हाना आकाशला लागली असेल हे राकेशने ताडले होते. त्याला अपेक्षा होती की एवढ्या मोठया घटनेनंतर तरी आकाश घराबाहेर पडेल पण तसे घडले नव्हते. उलट त्याचे आईवडील कुठे तरी बाहेर गेले होते. याचा अर्थ आकाशच्या आजी आणि लहान भावाव्यतिरिक्त त्याला अडवणारे मोठे घरात कोणीच नव्हते. असे काय करता येईल जेणेकरून आकाशला घराबाहेर पडावेच लागेल याचा राकेश विचार करत होता.

त्याने बऱ्याच शक्यतांचा विचार केला पण त्याला काही सुचेना. एवढ्यात एका गुंडाने त्याला सूचवले, “त्या पोराची एखादी आयटम असेल तर तिला उचलून आणू मग कसा बाहेर पडत नाही तेच बघू!” तेव्हा राकेशच्या डोक्यात ट्युब पेटली, “अरे येस हे तर माझ्या ध्यानातच आले नाही. आकाशचा विक पॉईंट म्हणजे नभा. नभाला आपण हातही लावू शकणार नाही कारण तिचे मामा तसे करू देणार नाहीत. पण नभाच्या जीवाला आपल्यापासून धोका आहे अशी खोटी बातमी तर आकाशपर्यंत नक्कीच पोहोचवू शकतो.”

“नभाचे मामा तिला आकाशचा फोन घेऊ देणार नाहीत. त्यामुळे आकाशला खरे खोटे करण्यासाठी सुक्ष्म रूपात का होईना घराबाहेर पडावेच लागेल आणि हीच वेळ असेल जेव्हा आपल्याला त्याला संपवता येईल. पण आकाशपर्यंत ही बातमी पोहोचवायची कशी? रश्मी! येस, रश्मीचा या कामी उपयोग करून घ्यायचा. तिचा बदला घ्यायचा अजून बाकी आहे. हे तर एका बाणात दोन शिकार साधण्यासारखे होईल. या कामी माझी प्रिय मैत्रीण पूजाशिवाय दुसरे कोण उपयोगी पडणार?”

[next] “पैसे हवेत ना? मग काम तर करावे लागणारच, पूजा डार्लिंग! फुकटात तर या जगात जन्म पण घेता येत नाही मग पैसे उकळणे तेही माझ्याकडून केवळ अशक्य आहे.” राकेश स्वतःच्या विचारांवरच खुश होत मोठ्याने हसला आणि त्याने पूजाला फोन लावला. “हॅलो पूजा, राकेश बोलतोय. लाईन वर राहा मी रश्मीला कॉन्फरन्स मध्ये घेतोय. का ते तुला कळेलच, तू फक्त मी जे बोलेन त्याला रिस्पॉन्स दे. तिला असे वाटले पाहिजे की क्रॉस कनेक्शन लागले आहे आणि ती आपल्यासाठी त्या आकाशला त्याच्या घराबाहेर काढण्याचे काम न सांगताच करेल.”

फोनची रिंग वाजताच रश्मीने फोन उचलला आणि हॅलो म्हटले. राकेशने अभिनयाला सुरवात केली, “हॅलो पूजा, मी राकेश बोलतोय. आज मी माझ्या दुश्मनाचा त्या आकाशचा बदला घेणार.” राकेशचा आवाज ऐकून रश्मी सावध झाली आणि ती लक्षपूर्वक ऐकू लागली. आता पलीकडून पूजा बोलू लागली, “तू नक्की काय करणार आहेस राकेश?” रश्मी आपले बोलणे ऐकत असल्याची राकेशची खात्री झाल्यावर तो पुढे बोलू लागला. “त्याच्या गर्ल फ्रेंडला, त्या नभाला मी किडनॅप केलंय आणि त्याच्याच फार्महाऊसवर आणलंय.”

“आपण त्या दोघांच्यात फूट पडायचा प्रयत्न करूनही त्यात यश आले नाही पण हरकत नाही. त्याला स्वप्नात पण वाटणार नाही की मी असे काही करेन आणि तेही त्याच्याच फार्म हाऊसवर.” “तू नभासोबत नक्की काय करायचं ठरवलं आहेस राकेश?”, पूजाच्या या प्रश्नावर राकेश मोठयाने हसला आणि म्हणाला, “त्याने माझ्यापासून रश्मीला दूर केले ना! मी त्याच्या पासून त्याच्या गर्ल फ्रेंडला दूर करणार. मी तिची अशी हालत करणार की तो तिला कधीच एक्सेप्ट करू शकणार नाही आणि जर केलेच तर आयुष्यभर त्याला माझे उष्टे खावे लागेल.”

[next] “जेव्हा जेव्हा तो तिच्या जवळ जाईल, तेव्हा तेव्हा त्याला तिच्या चेहऱ्यात माझा चेहरा दिसेल. आयुष्यभर पश्चात्ताप करायला लावेन मी त्याला. साला मला नडतो काय! हा राकेश काय चीज आहे हे अजून त्याला ठाऊक नाही आहे” “म्हणजे तू नभाचा, रेप करणार आहेस? तो ही आकाशच्याच फार्महाऊस वर? तू खुप चिप आहेस राकेश! बदल्याच्या भावनेने तुला आंधळे केले आहे. तू आत्ताच्या आत्ता नभाला तिच्या घरी सुखरूप सोड नाहीतर मी आकाशला फोन करून सांगेन तुझा सगळा डाव, मग तो तुला जीवंत सोडतो का ते बघच तू!” पूजा फणकाऱ्याने म्हणाली.

यावर पुन्हा राकेश कुत्सित हसला, आणि आपल्या आवाजात प्रचंड जरब आणत त्याने पूजाला धमकावले, “अरे वा! हमारी बिल्ली और हमी से म्याव? तू तुझ्या मनात असला विचार जरी आणलास ना पूजा, तर नभाच्या नंतर तुझ्यासोबत सुद्धा तेच घडेल हे ध्यानात ठेव. मग तुझ्यासाठी ए.टी.म असलेला तुझा बॉय फ्रेंडच काय पण इतर कोणीही तुझ्याशी लग्न करायला तयार होणार नाही. तू कोणाला तोंड दाखवू शकणार नाहीस याची मी तुला गॅरंटी देतो. आकाश बद्दल सहानुभूती दाखवणे तुला खुप महागात पडेल हे लक्षात ठेव. चल ठेव फोन.” असे दरडावत राकेशने फोन कट केला.

राकेशचे ते बोलणे ऐकून रश्मी थिजुन गेली. तिने जे ऐकले ते इतके भयंकर होते की ते क्रॉस कनेक्शन असावे की राकेशने मुद्दामहून केले असावे असा कोणताच विचार तिच्या मनात आला नाही. तिला फक्त एकच समजत होते. नभाची अब्रू धोक्यात होती आणि आकाशला सावध करणे गरजेचे होते. तिने मागचा पुढचा विचार न करता आकाशला फोन लावला. आकाशला रश्मीकडून ती बातमी कळताच त्याचा राग अनावर झाला आणि रागाच्या भरात त्याने लोडेड पिस्तूल खिशात कोंबले आणि घराबाहेर पाऊल टाकले.

[next] त्याबरोबर ध्यानाला बसलेल्या जोशी काकांना त्याची जाणीव झाली. जे घडू नये तेच घडले होते. त्यांचे सगळे उपाय फेल गेले होते. आकाशची आजी आणि अनुज बुलेटचा आवाज ऐकून आपापल्या रूममधून बाहेर आले. ते आकाशला अडवेपर्यंत तो बुलेट वरून गेटच्या बाहेर पडला देखील होता. ते पाहताच घाबरी घुबरी झालेल्या आजीने आपल्या मुलाला फोन लावण्यास अनुजला सांगितले. आकाश तणतणत घरातून बाहेर पडल्याचे कळताच त्याच्या आईवडीलांचे धाबे दणाणले. ते कशी बशी मामीची समजूत काढून तातडीने घराकडे निघाले.

आकाश बुलेटवरून फुल स्पीडमध्ये आपल्या फार्म हाऊसकडे निघाला. नभाला फोन करून खात्री करून घेण्याचेही त्याच्या लक्षात आले नाही. तो थेट आपल्या मृत्यूच्याच दिशेने चालला होता. आकाशला फोन केल्यावर काहीतरी अघटित घडणार याची कल्पना आल्यावर रश्मीही आपल्या ऍक्टिवावरून त्याच्या फार्म हाऊसच्या दिशेने निघाली. पूजा राकेशच्याच गोटातली असली तरी, राकेशची धमकी खोटी असूनही तिला चांगलीच झोंबली. तिच्या स्त्रीत्वाचा तो अपमान होता.

राकेश तिच्याबद्दल असे काही बोलेल असे तिला स्वप्नातही वाटले नव्हते. तिला स्वतःचीच किळस वाटली. राकेशच्या त्या वाक्याने अचानक तिची अस्मिता जागी झाली. आपण जे करतोय ते चुकीचे आहे अशी बोच तिच्या मनाला लागली. राकेशसारख्या नीच माणसाची मदत करून आपण आकाश, रश्मी आणि नभाचे विनाकारण खुप मोठे अपराधी झालो आहोत याचे शल्य तिला सहन होईना. तिचे मन तिचा धिक्कार करू लागले. तिने आपली चुक सुधारायचे ठरवले. लगेचच तिने आकाशच्या घरी फोन लावला पण तो पर्यंत खुप उशीर झाला होता.

[next] आकाश केव्हाच बाहेर निघून गेला होता. थोड्या वेळाने आकाशचे आईवडील आपल्या घरी पोहोचले. आकाश कोणालाही न सांगता घरातून निघून गेला कुठे? अशी कोणती ईमर्जन्सी आली होती हेच त्यांना कळेना. इतक्यात जोशी गुरुजींचा फोन आला. त्यांनी आकाशची चौकशी करताच आकाशच्या वडीलांची अवस्था मोठी बिकट झाली. आकाश घरात नाही याची खात्री झाल्यावर ते पुन्हा ध्यानाला बसले व ते आकाशशी टेलीपथीने संपर्क साधण्याचा प्रयत्न करू लागले.

पण आकाशच्या मनात प्रचंड संताप आणि राकेश बद्दल बदल्याची भावना वाढल्याने त्याचे मन आपल्या गुरूंच्या मनाशी तादात्म्य पावू शकले नाही. पूजा नावाच्या मुलीचा आकाशची चौकशी करण्यासाठी फोन आला होता व तिने आकाशला फार्म हाऊस वर जाऊ देऊ नका, त्याच्या जीवाला धोका आहे असेही म्हटल्याचे आकाशच्या आजीने आपल्या मुलाला सांगितले. रिसिव्हड नंबर मधून तिचा नंबर डायल केल्यावर पण तो नंबर नॉट रिचेबल येत होता. दोन तीन वेळा ट्राय केल्यावरही फोन न लागल्यामुळे त्यांनी इन्स्पेक्टर शिंदेंचा नंबर डायल केला. पण ते ही फोन उचलत नव्हते.

वैतागून त्यांनी पोलीस स्टेशनला फोन लावला. तिथे कळले की इन्स्पेक्टर साहेब बंदोबस्तासाठी बाहेर गेले आहेत. परत आपल्यावर आपल्याला तातडीने फोन करण्यास सांगून आकाशचे वडील फार्म हाऊसवर निघाले. आकाशची आई सुद्धा येते म्हणाली पण कोणाचा फोन आल्यास, किंवा घरी कोणी आल्यास दोघांपैकी कोणी तरी हवे म्हणुन त्यांनी तिला येण्यास मनाई केली. ते सतत तिच्या संपर्कात राहतील असे सांगून ते बाहेर पडले.

क्रमशः


केदार कुबडे | Kedar Kubade
सभासद, मराठीमाती डॉट कॉम
मराठी कथा, मराठी भयकथा, मराठी कविता या आणि अशा विविध विभागांत लेखन.

अभिप्राय

तुमची टिप्पणी आमच्यासाठी महत्त्वाची आहे!
तुमचा अभिप्राय / टिप्पणी ही आम्ही कसे कार्य करतो? त्यातील सुधारणांसाठी आणि आम्ही सातत्याने उच्च-गुणवत्तेची सेवा प्रदान करतोय की नाही हे समजून घेण्यासाठी आमच्यासाठी महत्वाची आहे.

नाव

अ रा कुलकर्णी,1,अ ल खाडे,2,अ ज्ञा पुराणिक,1,अंकित भास्कर,1,अंजली भाबट-जाधव,1,अंधश्रद्धेच्या कविता,5,अकोला,1,अजय दिवटे,1,अजित पाटणकर,18,अनंत दळवी,1,अनंत फंदी,1,अनंत भावे,1,अनिकेत येमेकर,2,अनिकेत शिंदे,1,अनिल गोसावी,2,अनिल भारती,1,अनिल वल्टे,8,अनुभव कथन,19,अनुरथ गोरे,1,अनुराधा पाटील,1,अनुराधा फाटक,39,अनुवादित कविता,1,अपर्णा तांबे,7,अब्राहम लिंकन,2,अभंग,6,अभिजित गायकवाड,1,अभिजीत टिळक,2,अभिव्यक्ती,1386,अभिषेक कातकडे,5,अभिषेक घुगे,1,अमन मुंजेकर,7,अमरश्री वाघ,2,अमरावती,1,अमित पडळकर,4,अमित पवार,1,अमित बाविस्कर,3,अमित सुतार,1,अमुक-धमुक,1,अमृत जोशी,1,अमृता शेठ,1,अमोल कोल्हे,1,अमोल तांबे,1,अमोल देशमुख,1,अमोल बारई,7,अमोल वाघमारे,1,अमोल सराफ,2,अरविंद जामखेडकर,1,अरविंद थगनारे,5,अरुण कोलटकर,1,अरुण म्हात्रे,1,अर्चना कुळकर्णी,1,अर्चना डुबल,2,अर्जुन फड,3,अर्थनीति,3,अल्केश जाधव,1,अविनाश धर्माधिकारी,2,अशोक थोरात,1,अशोक रानडे,1,अश्विनी तातेकर-देशपांडे,1,अश्विनी तासगांवकर,2,अस्मिता मेश्राम-काणेकर,7,अहमदनगर,1,अक्षय वाटवे,1,अक्षरमंच,1132,आईच्या कविता,29,आईस्क्रीम,3,आकाश पवार,2,आकाश भुरसे,8,आज,6,आजीच्या कविता,1,आठवणींच्या कविता,18,आतले-बाहेरचे,3,आतिश कविता लक्ष्मण,1,आत्मविश्वासाच्या कविता,15,आदर्श कामिरे,4,आदित्य कदम,1,आदेश ताजणे,8,आनंद दांदळे,8,आनंद प्रभु,1,आनंदाच्या कविता,26,आमट्या सार कढी,18,आर समीर,1,आरती गांगण,2,आरती शिंदे,4,आरत्या,82,आरोग्य,21,आशा गवाणकर,1,आशिष खरात-पाटील,1,आशिष चोले,1,इंदिरा गांधी,1,इंदिरा संत,6,इंद्रजित नाझरे,26,इंद्रजीत भालेराव,1,इतिहास,281,इलाही जमादार,1,इसापनीती कथा,48,उत्तम कोळगावकर,2,उदय दुदवडकर,1,उन्मेष इनामदार,1,उपवासाचे पदार्थ,15,उमा पाटील,1,उमेश कानतोडे,1,उमेश कुंभार,14,उमेश चौधरी,1,उस्मानाबाद,1,ऋग्वेदा विश्वासराव,5,ऋचा पिंपळसकर,10,ऋचा मुळे,18,ऋषिकेश शिरनाथ,2,ऋषीकेश कालोकार,2,ए श्री मोरवंचीकर,1,एच एन फडणीस,1,एप्रिल,30,एम व्ही नामजोशी,1,एहतेशाम देशमुख,2,ऐतिहासिक स्थळे,2,ऑक्टोबर,31,ऑगस्ट,31,ऑडिओ कविता,15,ऑडिओ बुक,1,ओंकार चिटणीस,1,ओम ढाके,8,ओमकार खापे,1,ओशो,1,औरंगाबाद,1,कपिल घोलप,12,करण विधाते,1,करमणूक,72,कर्क मुलांची नावे,1,कल्पना देसाई,1,कल्याण इनामदार,1,कविता शिंगोटे,1,कवितासंग्रह,280,कवी अनिल,1,कवी ग्रेस,4,कवी बी,1,काजल पवार,1,कार्यक्रम,12,कार्ल खंडाळावाला,1,कालिंदी कवी,2,काशिराम खरडे,1,कि का चौधरी,1,किरण कामंत,1,किल्ले,97,किल्ल्यांचे फोटो,5,किशोर चलाख,6,किशोर पवार,1,कुठेतरी-काहीतरी,3,कुणाल खाडे,3,कुणाल लोंढे,1,कुसुमाग्रज,9,कृष्णकेशव,1,कृष्णाच्या आरत्या,5,के के दाते,1,के तुषार,8,के नारखेडे,2,केदार कुबडे,40,केदार नामदास,1,केदार मेहेंदळे,1,केशव मेश्राम,1,केशवकुमार,2,केशवसुत,5,कोल्हापूर,1,कोशिंबीर सलाड रायते,14,कौशल इनामदार,1,खंडोबाची स्थाने,2,खंडोबाच्या आरत्या,2,खरगपूर,1,ग दि माडगूळकर,6,ग ल ठोकळ,3,ग ह पाटील,4,गंगाधर गाडगीळ,1,गझलसंग्रह,1,गडचिरोली,1,गणपतीच्या आरत्या,5,गणपतीच्या गोष्टी,24,गणेश कुडे,2,गणेश तरतरे,20,गणेश निदानकर,1,गणेश पाटील,1,गणेश भुसारी,1,गण्याचे विनोद,1,गाडगे बाबा,1,गायत्री सोनजे,5,गावाकडच्या कविता,14,गुरुदत्त पोतदार,2,गुरूच्या आरत्या,2,गुलझार काझी,1,गो कृ कान्हेरे,1,गो गं लिमये,1,गोकुळ कुंभार,13,गोड पदार्थ,55,गोपीनाथ,2,गोविंद,1,गोविंदाग्रज,1,गौतम जगताप,1,गौरांग पुणतांबेकर,1,घरचा वैद्य,2,घाट,1,चंद्रकांत जगावकर,1,चंद्रपूर,1,चटण्या,3,चातुर्य कथा,6,चित्रपट समीक्षा,1,चैतन्य म्हस्के,1,चैत्राली इंगळे,2,जयश्री चुरी,1,जयश्री मोहिते,1,जवाहरलाल नेहरू,1,जळगाव,1,जाई नाईक,1,जानेवारी,31,जालना,1,जितेश दळवी,1,जिल्हे,31,जीवनशैली,432,जुलै,31,जून,30,ज्योती किरतकुडवे,1,ज्योती मालुसरे,1,टीझर्स,1,ट्रेलर्स,3,ठाणे,2,डिसेंबर,31,डॉ मानसी राजाध्यक्ष,1,डॉ. दिलीप धैसास,1,तनवीर सिद्दिकी,1,तन्मय धसकट,1,तरुणाईच्या कविता,7,तिच्या कविता,63,तुकाराम गाथा,4,तुकाराम धांडे,1,तुतेश रिंगे,1,तेजश्री कांबळे-शिंदे,4,तेजस्विनी देसाई,1,दत्ता हलसगीकर,2,दत्ताच्या आरत्या,5,दत्तात्रय भोसले,1,दत्तो तुळजापूरकर,1,दया पवार,1,दर्शन जोशी,2,दर्शन शेळके,1,दशरथ मांझी,1,दादासाहेब गवते,1,दामोदर कारे,1,दिनदर्शिका,366,दिनविशेष,366,दिनेश बोकडे,1,दिनेश लव्हाळे,1,दिनेश हंचाटे,1,दिपक शिंदे,2,दिपाली गणोरे,1,दिवाळी फराळ,26,दीपा दामले,1,दीप्तीदेवेंद्र,1,दुःखाच्या कविता,76,दुर्गेश साठवणे,1,देवीच्या आरत्या,3,देशभक्तीपर कविता,3,धनंजय सायरे,1,धनराज बाविस्कर,71,धनश्री घाणेकर,1,धार्मिक स्थळे,1,धुळे,1,धोंडोपंत मानवतकर,12,नमिता प्रशांत,1,नलिनी तळपदे,1,ना के बेहेरे,1,ना घ देशपांडे,4,ना धों महानोर,3,ना वा टिळक,1,नांदेड,1,नागपूर,1,नारायण शुक्ल,1,नारायण सुर्वे,2,नाशिक,1,नासीर संदे,1,निखिल पवार,3,नितीन चंद्रकांत देसाई,1,निमित्त,4,निराकाराच्या कविता,16,निवडक,9,निसर्ग कविता,37,निसर्ग चाटे,2,निळू फुले,1,नृसिंहाच्या आरत्या,1,नोव्हेंबर,30,न्याहारी,50,पथ्यकर पदार्थ,2,पद्मा गोळे,4,परभणी,1,पराग काळुखे,1,पर्यटन स्थळे,1,पल्लवी माने,1,पवन कुसुंदल,2,पांडुरंग वाघमोडे,3,पाककला,322,पाककृती व्हिडिओ,15,पालकत्व,7,पावसाच्या कविता,40,पी के देवी,1,पु ल देशपांडे,9,पु शि रेगे,1,पुंडलिक आंबटकर,4,पुडिंग,10,पुणे,15,पुरुषोत्तम जोशी,1,पुरुषोत्तम पाटील,1,पुर्वा देसाई,2,पूजा काशिद,1,पूजा चव्हाण,1,पूनम राखेचा,1,पोस्टर्स,5,पोळी भाकरी,27,पौष्टिक पदार्थ,20,प्र श्री जाधव,12,प्रकाश पाटील,1,प्रजोत कुलकर्णी,1,प्रतिक बळी,1,प्रतिभा जोजारे,1,प्रतिमा इंगोले,1,प्रतिक्षा जोशी,1,प्रदिप कासुर्डे,1,प्रफुल्ल चिकेरूर,10,प्रभाकर महाजन,1,प्रभाकर लोंढे,3,प्रवास वर्णन,1,प्रवासाच्या कविता,11,प्रविण पावडे,15,प्रवीण दवणे,1,प्रवीण राणे,1,प्रशांतकुमार मोहिते,2,प्रसन्न घैसास,2,प्रज्ञा वझे,2,प्रज्ञा वझे-घारपुरे,10,प्राजक्ता गव्हाणे,1,प्रितफुल प्रित,1,प्रिती चव्हाण,27,प्रिया जोशी,1,प्रियांका न्यायाधीश,3,प्रेम कविता,97,प्रेरणादायी कविता,17,फ मुं शिंदे,3,फादर स्टीफन्स,1,फेब्रुवारी,29,फोटो गॅलरी,11,फ्रॉय निस्सेन,1,बहिणाबाई चौधरी,6,बा भ बोरकर,8,बा सी मर्ढेकर,6,बातम्या,11,बाबा आमटे,1,बाबाच्या कविता,10,बाबासाहेब आंबेड,1,बायकोच्या कविता,5,बालकविता,14,बालकवी,9,बाळाची मराठी नावे,1,बाळासाहेब गवाणी-पाटील,21,बिपीनचंद्र नेवे,1,बी अरुणाचलाम्‌,1,बी रघुनाथ,1,बीड,1,बुलढाणा,1,बेकिंग,9,बेहराम कॉन्ट्रॅक्टर,1,भंडारा,1,भक्ती कविता,23,भक्ती रावनंग,1,भरत माळी,2,भा दा पाळंदे,1,भा रा तांबे,7,भा वें शेट्टी,1,भाग्यवेध,1,भाज्या,29,भाताचे प्रकार,16,भानुदास,1,भानुदास धोत्रे,1,भावनांची वादळे,1,भुषण राऊत,1,भूगोल,1,भूमी जोशी,1,म म देशपांडे,1,मं वि राजाध्यक्ष,1,मंगला गोखले,1,मंगळागौरीच्या आरत्या,2,मंगेश कळसे,9,मंगेश पाडगांवकर,5,मंजुषा कुलकर्णी,2,मंदिरांचे फोटो,3,मंदिरे,4,मधल्या वेळेचे पदार्थ,41,मधुकर आरकडे,1,मधुकर जोशी,1,मधुसूदन कालेलकर,2,मनमोहन नातू,3,मनाचे श्लोक,205,मनिषा दिवेकर,3,मनिषा फलके,1,मनोज शिरसाठ,9,मराठी,1,मराठी उखाणे,2,मराठी कथा,107,मराठी कविता,1173,मराठी कवी,3,मराठी कोट्स,4,मराठी गझल,30,मराठी गाणी,2,मराठी गोष्टी,67,मराठी चारोळी,42,मराठी चित्रपट,19,मराठी टिव्ही,53,मराठी नाटक,1,मराठी पुस्तके,7,मराठी प्रेम कथा,23,मराठी भयकथा,44,मराठी मालिका,20,मराठी रहस्य कथा,2,मराठी लेख,48,मराठी विनोद,1,मराठी साहित्य,288,मराठी साहित्यिक,2,मराठी सुविचार,2,मराठीप्रेमी पालक महासंमेलन,5,मराठीमाती,145,मसाले,12,महात्मा गांधी,8,महात्मा फुले,1,महाराष्ट्र,307,महाराष्ट्र फोटो,11,महाराष्ट्राचा इतिहास,32,महाराष्ट्रीय पदार्थ,22,महालक्ष्मीच्या आरत्या,2,महेंद्र म्हस्के,1,महेश जाधव,3,महेश बिऱ्हाडे,9,मांसाहारी पदार्थ,17,माझं मत,4,माझा बालमित्र,88,मातीतले कोहिनूर,19,माधव ज्यूलियन,6,माधव मनोहर,1,माधवानुज,3,मानसी सुरज,1,मारुतीच्या आरत्या,2,मार्च,31,मिलिंद खांडवे,1,मीना तालीम,1,मुंबई,12,मुंबई उपनगर,1,मुकुंद भालेराव,1,मुकुंद शिंत्रे,35,मुक्ता चैतन्य,1,मुलांची नावे,1,मुलाखती,1,मे,31,मैत्रीच्या कविता,8,मोहिनी उत्तर्डे,2,यवतमाळ,1,यशपाल कांबळे,4,यशवंत दंडगव्हाळ,25,यादव सिंगनजुडे,2,योगा,1,योगेश कर्डिले,6,योगेश सोनवणे,2,रंगपंचमी,1,रंजना बाजी,1,रजनी जोगळेकर,5,रत्नागिरी,1,रविंद्र गाडबैल,1,रविकिरण पराडकर,1,रवींद्र भट,1,रा अ काळेले,1,रा देव,1,रागिनी पवार,1,राजकारण,2,राजकीय कविता,12,राजकुमार शिंगे,1,राजेंद्र भोईर,1,राजेश पोफारे,1,राजेश्वर टोणे,3,राम मोरे,1,रामकृष्ण जोशी,2,रामचंद्राच्या आरत्या,5,रायगड,1,राहुल अहिरे,3,रुपेश सावंत,1,रेश्मा जोशी,2,रेश्मा विशे,1,रोहित काळे,7,रोहित साठे,15,लघुपट,3,लता मंगेशकर,2,लहुजी साळवे,1,लक्ष्मण अहिरे,2,लक्ष्मीकांत तांबोळी,2,लातूर,1,लिलेश्वर खैरनार,2,लीना पांढरे,1,लीलावती भागवत,1,लोकमान्य टिळक,3,लोणची,9,वंदना विटणकर,2,वर्धा,1,वसंत बापट,12,वसंत साठे,1,वसंत सावंत,1,वा गो मायदेव,1,वा ना आंधळे,1,वा भा पाठक,2,वा रा कांत,3,वात्रटिका,2,वादळे झेलतांना,2,वामन निंबाळकर,1,वासुदेव कामथ,1,वाळवणाचे पदार्थ,6,वि दा सावरकर,3,वि भि कोलते,1,वि म कुलकर्णी,5,वि स खांडेकर,1,विंदा करंदीकर,8,विक्रम खराडे,1,विचारधन,215,विजय पाटील,1,विजया जहागीरदार,1,विजया वाड,2,विजया संगवई,1,विठ्ठल वाघ,3,विठ्ठलाच्या आरत्या,5,विद्या कुडवे,4,विद्या जगताप,2,विद्याधर करंदीकर,1,विनायक मुळम,1,विरह कविता,58,विराज काटदरे,1,विलास डोईफोडे,5,विवेक जोशी,3,विशाल शिंदे,1,विशेष,12,विष्णूच्या आरत्या,4,विज्ञान तंत्रज्ञान,2,वृषाली सुनगार-करपे,1,वेदांत कोकड,1,वैभव गव्हाळे,1,वैभव सकुंडे,1,वैशाली झोपे,1,वैशाली नलावडे,1,व्यंगचित्रे,17,व्रत-वैकल्ये,1,व्हिडिओ,13,शंकर रामाणी,1,शंकर विटणकर,1,शंकर वैद्य,1,शंकराच्या आरत्या,4,शरणकुमार लिंबाळे,1,शशांक रांगणेकर,1,शशिकांत शिंदे,1,शां शं रेगे,1,शांततेच्या कविता,9,शांता शेळके,11,शांताराम आठवले,1,शाम जोशी,1,शारदा सावंत,4,शाळेचा डबा,15,शाळेच्या कविता,11,शितल सरोदे,1,शिरीष पै,1,शिरीष महाशब्दे,8,शिल्पा इनामदार-आर्ते,1,शिवाजी महाराज,7,शिक्षकांवर कविता,4,शुभम बंबाळ,2,शुभम सुपने,2,शेतकर्‍याच्या कविता,14,शेती,1,शेषाद्री नाईक,1,शैलेश सोनार,1,श्याम खांबेकर,1,श्रद्धा नामजोशी,9,श्रावणातल्या कहाण्या,27,श्री दि इनामदार,1,श्री बा रानडे,1,श्रीकृष्ण पंडित,1,श्रीकृष्ण पोवळे,1,श्रीधर रानडे,2,श्रीधर शनवारे,1,श्रीनिवास खळे,1,श्रीपाद कोल्हटकर,1,श्रीरंग गोरे,1,श्रुती चव्हाण,1,संघर्षाच्या कविता,33,संजय उपाध्ये,1,संजय डोंगरे,1,संजय पाटील,1,संजय बनसोडे,2,संजय शिंदे,1,संजय शिवरकर,5,संजय सावंत,1,संजीवनी मराठे,3,संत एकनाथ,1,संत चोखामेळा,1,संत जनाबाई,1,संत तुकडोजी महाराज,2,संत तुकाराम,8,संत नामदेव,3,संत ज्ञानेश्वर,6,संतोष जळूकर,1,संतोष झोंड,1,संतोष सेलुकर,30,संदिप खुरुद,5,संदीपकुमार खुरुद,1,संदेश ढगे,39,संध्या भगत,1,संपादक मंडळ,1,संपादकीय,11,संपादकीय व्यंगचित्रे,2,संस्कार,2,संस्कृती,133,सई कौस्तुभ,1,सचिन पोटे,12,सचिन माळी,1,सण-उत्सव,22,सणासुदीचे पदार्थ,32,सतिश चौधरी,1,सतीश काळसेकर,1,सदानंद रेगे,2,सदाशिव गायकवाड,2,सदाशिव माळी,1,सनी आडेकर,10,सप्टेंबर,30,समर्थ रामदास,206,समर्पण,8,सरबते शीतपेये,8,सरयु दोशी,1,सरला देवधर,1,सरिता पदकी,3,सरोजिनी बाबर,1,सलीम रंगरेज,8,सविता कुंजिर,1,सांगली,1,सागर बनगर,1,सागर बाबानगर,1,सातारा,1,साने गुरुजी,5,सामाजिक कविता,113,सामान्य ज्ञान,8,सायली कुलकर्णी,7,साहित्य सेतू,1,साक्षी खडकीकर,9,साक्षी यादव,1,सिंधुदुर्ग,1,सिद्धी भालेराव,1,सिमा लिंगायत-कुलकर्णी,3,सुदेश इंगळे,24,सुधाकर राठोड,1,सुनिल नागवे,1,सुनिल नेटके,1,सुनील गाडगीळ,1,सुभाष कटकदौंड,2,सुमती इनामदार,1,सुमित्र माडगूळकर,1,सुरज दळवी,1,सुरज दुतोंडे,1,सुरज पवार,1,सुरेश भट,2,सुरेश सावंत,2,सुशील दळवी,1,सुशीला मराठे,1,सुहास बोकरे,6,सैनिकांच्या कविता,4,सैरसपाटा,128,सोपानदेव चौधरी,1,सोमकांत दडमल,1,सोलापूर,1,सौरभ सावंत,1,स्तोत्रे,2,स्नेहा कुंभार,1,स्फुटलेखन,4,स्फूर्ती गीत,1,स्माईल गेडाम,4,स्वप्ना पाटकर,1,स्वप्नाली अभंग,5,स्वप्नील जांभळे,2,स्वाती काळे,1,स्वाती खंदारे,320,स्वाती गच्चे,1,स्वाती दळवी,9,स्वाती नामजोशी,31,स्वाती पाटील,1,स्वाती वक्ते,2,ह मुलांची नावे,1,हमार्टिक समा,1,हरितालिकेच्या आरत्या,1,हर्षद खंदारे,42,हर्षद माने,1,हर्षदा जोशी,3,हर्षवर्धन घाटे,2,हर्षाली कर्वे,2,हसनैन आकिब,3,हितेशकुमार ठाकूर,1,हिरवळ,1,हेमंत जोगळेकर,1,हेमंत देसाई,1,हेमंत सावळे,1,हेमा चिटगोपकर,8,होळी,5,ज्ञानदा आसोलकर,1,ज्ञानदेवाच्या आरत्या,2,marathimati,1,
ltr
item
मराठीमाती । माझ्या मातीचे गायन: जातबळी भाग ७ - मराठी भयकथा
जातबळी भाग ७ - मराठी भयकथा
जातबळी भाग ७, मराठी कथा - [Jaatbali Part 7, Marathi Katha] आकाश आणि नभाच्या निर्व्याज्य प्रेमाची जीवाला चटका लावून जाणारी कहाणी म्हणजेच जातबळी.
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhHkY9mn44ZpoFfnFEqC5dV5bWqXRzaKk_vdBWosyny1MuaT67G-pmSzWg6DbPFMrxbhRMqawatTx3nVa2-DrYRCM8gShPq34YKwaL-D7CGxSZu2nMbh0cMfJMGKWqD_M-uWb9GAwh2Ex4n/s1600/jaatbali-part-7-marathi-katha.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhHkY9mn44ZpoFfnFEqC5dV5bWqXRzaKk_vdBWosyny1MuaT67G-pmSzWg6DbPFMrxbhRMqawatTx3nVa2-DrYRCM8gShPq34YKwaL-D7CGxSZu2nMbh0cMfJMGKWqD_M-uWb9GAwh2Ex4n/s72-c/jaatbali-part-7-marathi-katha.jpg
मराठीमाती । माझ्या मातीचे गायन
https://www.marathimati.com/2018/07/jaatbali-part-7-marathi-katha.html
https://www.marathimati.com/
https://www.marathimati.com/
https://www.marathimati.com/2018/07/jaatbali-part-7-marathi-katha.html
true
2079427118266147504
UTF-8
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची