Loading ...
/* Dont copy */

जातबळी भाग ६ - मराठी भयकथा

जातबळी भाग ६, मराठी कथा - [Jaatbali Part 6, Marathi Katha] आकाश आणि नभाच्या निर्व्याज्य प्रेमाची जीवाला चटका लावून जाणारी कहाणी म्हणजेच जातबळी.

जातबळी भाग ६ - मराठी कथा | Jaatbali Part 6 - Marathi Katha

पुर्वार्ध: अदृश्य रूपातील आकाश नभाला त्याने प्राप्त करून घेतलेल्या सिद्धी बद्दल सांगतो आणि तिला नवी उमेद देतो. नभाच्या आईला ती अचानक बरी झाल्याचे पाहून आश्चर्य वाटते. ती नभावर लक्ष ठेऊन असते. एकदा तिला नभाच्या रुममधुन आकाशचा आवाज ऐकू येतो आणि ती घर डोक्यावर घेते. पण नभा तिला वेड्यात काढते. नभाचे वडील आपल्या पत्नीला तिथून जबरदस्तीने घेऊन जातात. दुसऱ्या दिवशी नभाची आई तिच्या भावाला फोन करून सर्व प्रकार सांगते. त्यालाही आश्चर्य वाटते. आकाश पास होतो पण नोकरी ऐवजी आपली बाग डेव्हलप करायचा निर्णय घेतो. हळूहळू आपली साधना वाढवून आकाशचा आत्मा नभासमोर दृश्य स्वरूपात येऊ लागतो. राकेश बरा होतो. त्याला आकाश आणि नभा बद्दल समजते. तो पूजाला नभाच्या ऑफिस मध्ये जॉब पकडून आकाश व नभा बद्दल माहिती पुरवण्यास तयार करतो. एक दिवस दुपारी पूजा आकाशला अचानक नभा समोर प्रकट झालेले पहाते व त्यांचे बोलणे चोरून ऐकते. आकाशला प्राप्त झालेल्या विद्येबद्दल ती राकेशला सांगते. राकेश नभाच्या आईला फोन करून नभा त्यांना फसवत असल्याचे सांगतो. नंतर पूजासोबत तो नभाच्या घरी जातो तिथे नभाचे चारही मामा आलेले असतात जे राकेश काय सांगतो याची उत्सुकतेने वाट पाहत असतात. पुढे चालू...



पूजाने आपला मोबाईल फ्लाईट मोडवर टाकला आणि गाडीवरून उतरताना हळूच आपल्या मोबाईल मधील व्हॉइस रेकॉर्डरचे बटन दाबले. राकेशने स्वतःची आणि पूजाची ओळख करून देत, पूजाला तिने पाहिलेला सर्व प्रकार त्यांना सव्वीस्तर सांगण्यास सांगितले. पुजानेही जे पाहिले व ऐकले ते सर्व त्यांना सांगितले. पूजाच्या बोलण्यावर त्यांचा विश्वास बसला नाही. सर्वात मोठ्या रवी मामाने तर राकेशची गचांडी धरली. “आम्हाला चूxx समजलास काय? या पोरीला पढवून काय वाटेल ते सांगतोस. काय तर म्हणे, तो आकाश का कोण? आपल्या शरीरातून आत्मा बाहेर काढू शकतो आणि आमच्या नभाला येऊन भेटतो.”

“आत्मा केवळ माणूस मेल्यावरच शरीराच्या बाहेर पडतो हे लहान पोराला सुद्धा माहिती असेल. चला निघा इथून आमचा वेळ फुकट घालवू नका नाहीतर दोघांचीही चामडी सोलून काढेन. इतके हाल करीन की तुमच्या दोघांचे आत्मे तुमच्या शरीरातून बाहेर पडायला आतुर होतील.” “याला असा सोडण्यात अर्थ नाही दादा, चांगला धडा शिकवून मग सोडला पाहिजे, म्हणजे पुन्हा असले उद्योग करणार नाही” सुभाष मामा गरजला. आणि त्याने सरळ राकेशचे थोबाड रंगवायला सुरवात केली. चार पाच कानाखाली बसताच राकेशला भोवळ आली.

ते पाहून पूजा पुढे झाली ती म्हणाली, “प्लिज त्याला मारू नका, तुमचा विश्वास नसेल तर आज रात्री स्वतःच पाहून खात्री करून घ्या. आकाशचा आत्मा रात्री सगळे झोपल्यावर नभाला भेटायला येणार आहे असे म्हणाला होता. आम्ही खरं तेच सांगतोय. आमच्यावर विश्वास ठेवा.” तेव्हा रवीने सुभाषला राकेशला सोडण्यास सांगितले आणि पूजाच्या जवळ जाऊन म्हणाला, “तू एवढ्या कॉन्फिडन्सने सांगतेस तर मी विश्वास ठेवतो, पण जर का आज रात्री असे काही नाही झाले तर गाठ आम्हा चौघा भावांशी आहे हे विसरू नकोस.”

“तुमचे दोघांचे फोन नंबर देऊन ठेवा म्हणजे गरज लागली तर तुम्हाला बोलवायला नाहीतर तुमची हाडे खिळखिळी करायला तुमच्या घरी येण्याच्या कामी येतील. तोंडावर पाणी मार रे त्याच्या, हा भxxx तर दोन थपडातच गारठला.” सगळे भाऊ या वाक्यावर हसू लागले. पूजाने दोघांचे नंबर लिहून दिले आणि राकेशला सावरत बाईकवर बसवले. राकेश पुरा थरथरत होता त्यामुळे तिनेच त्याची बाईक चालवत तिथून त्याला घेऊन जाणे पसंत केले. थोडे अंतर गेल्यावर तिने बाईक थांबवली, “तरी मी तुला सांगत होते मला या भानगडीत पाडू नकोस म्हणुन, स्वतः पण अडकलास आणि मला पण अडकवलेस. ते चारही जण माणसं नाहीत, राक्षस आहेत राक्षस.”

“त्या आकाश सोबत आपल्याला पण कुठे पोहोचवतील ना ते समजणार पण नाही. कशाला मी तुझ्या शब्दात अडकले असे मला झालंय.” पूजा राकेशवर आणि स्वतःवरही जाम भडकली होती. पुढे काय बोलावे ते न सुचल्यामुळे ती रडू लागली. तो पर्यंत राकेश सावरला होता. त्याचा सैतानी मेंदू परत काम करू लागला होता. “टेन्शन नको घेऊस, आकाशची वाट लावायला आपल्याला जशी त्यांची गरज आहे तशी त्यांना पण आपली गरज आहे. त्यामुळे ते आपल्याला काही करू शकणार नाहीत आणि आपण याचाच फायदा घ्यायचा.” राकेश तिला समजावत म्हणाला.

“हो का? आणि त्यांचे काम झाल्यावर ते कशावरून आपला पत्ता साफ करणार नाहीत? त्यापेक्षा विषाची परीक्षा घ्यायलाच नको ना!” पूजाने आपली शंका मांडली. “तू जरा जास्तच घाबरतेस असे नाही वाटत तुला? तुझी इच्छा असो किंवा नसो, तुला आता माझी साथ तर द्यावीच लागणार आहे, मग व्यवस्थित दे आणि माल पण कमव. आता कोणत्याही गोष्टीत थोडीफार रिस्क तर घ्यावी लागतेच.” राकेशने पूजाला पैशाचे आमिष दाखवले. “मी तुला स्पष्टच सांगते राकेश, पैशा पेक्षा मला माझा जीव प्यारा आहे.”

“या प्रकरणातून बाहेर पडल्यावर मला तुझे तोंड पण पाहायची इच्छा नाही. त्यामुळे या पुढे तू माझ्याकडून कसल्याही मदतीची अपेक्षा ठेवू नकोस आणि मला भेटू पण नकोस. टच वुड मी या सगळ्यापासून दूर मुंबईला जाणार आहे कायमची.” पूजा फणकाऱ्याने म्हणाली. “बरं बाई तु म्हणशील तसे, पण आता तरी यातून बाहेर पडायला मला मदत कर. मग जा तुझ्या बॉयफ्रेंडकडे मुंबईला. बाईकवर बस, तुला घरी सोडतो.” राकेशने सांगुनही पूजा तिथेच उभी राहिली. शेवटी तिचा नाईलाज झाल्याने ती बाईकवर बसली आणि राकेशची बाईक सुसाट सुटली. पूजाने व्हॉइस रेकॉर्डर बंद केला आणि तिच्या डोक्यात विचारांचे चक्र सुरु झाले.

संध्याकाळी नभा घरी येण्याअगोदरच तिचे चारही मामा घरातून निघून गेले. ते आल्याचे नभाला आणि तिच्या वडीलांना अजिबात कळता कामा नये अशी धमकी पूनम, हेमंत, सचिन आणि नभाच्या आईला देऊन गेले. त्यामुळे नभाला तिचे मामा आल्याचे कळायला काहीच मार्ग नव्हता. ती नेहेमीसारखी बिनधास्त होती. रात्री जेवण झाल्यावर घरातली आवरा आवार करून नभा व घरातील सदस्य झोपायला गेले. नभा आपल्या खोलीत जाताच तिच्या आईने आपल्या भावांना बोलावून घेतले. नभाच्या दरवाजाला कान लावून ते कानोसा घेऊ लागले.

बराच वेळ काहीच हालचाल जाणवली नाही तसे ते वैतागु लागले होते. साधारण १२ वाजता आकाशचा आत्मा नभाच्या खोलीत आला. नभा त्यावेळी झोपेच्या अंमला खाली होती. बराच वेळ तो तिला एकटक पाहत राहिला. तिची झोप डिस्टर्ब् करायचे त्याच्या जीवावर आले होते. एवढ्यात नभाला कसलीशी चाहुल लागली आणि तिने डोळे उघडले. आकाशला एकदम समोर पाहून ती दचकली आणि किंचाळणार एवढ्यात आकाशने पटकन तिच्या तोंडावर हात ठेवला. "ओरडू नकोस, मी आहे. तुच रात्री ये म्हणाली होतीस ना? केवढी घाबरतेस? आता किंचाळली असतीस तर केवढा गोंधळ झाला असता? बिनडोक कुठली!" तो दबक्या आवाजात म्हणाला.

“मी झोपेत होते, तुला एकदम समोर पाहिल्यामुळे मी घाबरून गेले. सॉरी ना! किती चिडतोस माझ्यावर?” असे म्हणत नभाने हाताची घडी घालत आपले तोंड फिरवले. आपली चुक लक्षात येताच आकाशने आपले कान पकडले, “बरं वेडाबाई! हे बघ मी कान पकडले, आता नाराज नको ना होऊस, प्लिऽऽऽज!” त्याने ‘प्लिज’ एवढे एवढ्या विनोदी पद्धतीने म्हटले की नभाला खुद्कन हसू आले. तिचा राग कुठल्या कुठे पळाला. त्याच्या गळ्यात हात घालून तिने त्याला आपल्या जवळ खेचले.

दोघे एकमेकांच्या बाहुपाशात गुंतले. आकाशचे ओठ नभाच्या ओठांना भेटण्यासाठी अलगद खाली झुकले, पापण्यांच्या आडून पाहताना तिचे डोळे मात्र खुद्कन हसले. दोघे एकमेकांत हरवले असताना खिडकीच्या फटीतून त्यांचा प्रणय प्रसंग पाहणारे डोळे मात्र आग ओकत होते. आपली भाची एका पर जातीतील मुलासोबत रंग उधळत असल्याचे पाहून रवीला राग अनावर झाला. ते पाहाणे असह्य झाल्यामुळे तो मागे सरकला.

पण गडबडीत त्याच्या शर्टची कॉलर खिडकीच्या झडपेत अडकली आणि खिडकी उघडली गेली. त्यामुळे हलका पण स्पष्ट आवाज झाला. तो आवाज नभा आणि आकाश दोघांच्या कानांनी टिपला. त्याच क्षणी ते एकमेकांच्या मिठीतुन दूर झाले. खिडकी उघडली गेल्यामुळे चंद्राचा प्रकाश खोलीत पसरला “नक्कीच खिडकी जवळ कोणीतरी आहे, आकाश प्लिज तू आता जा आपण उद्या भेटू” घाबरलेली नभा म्हणाली. तिचे पटकन एक चुंबन घेत आकाशचा आत्मा तिथून नाहीसा झाला.

तो प्रकार पाहून चारही मामा चाट पडले. “म्हणजे ती पोरगी सांगत होती ते खरे होते तर!” रवी पुटपुटला. ते चौघेही तिथून अंधारात गायब झाले आणि तिथून जवळच असलेल्या एका लॉजमधील दुपारीच बुक केलेल्या आपल्या रूममध्ये आले. नभा आणि आकाशचा प्रणय प्रसंग आणि त्याहीपेक्षा आकाशचे हवेतल्या हवेत गायब होणे आठवून त्या चौघांची मतीच गुंग झाली होती. रवीला काय बोलावे तेच समजत नव्हते सुभाष प्रचंड भडकला होता.

आपल्या मुठी आवळत तो म्हणाला “आत्ता जाऊ आणि त्या भाडxxचे सगळे खानदान कापून काढू.” “नाही! आत्ता नाही. अशी काही तरी आयडिया केली पाहिजे की साप पण मरेल आणि काठी पण तुटणार नाही. आपल्या नभाला बहकवणाऱ्या त्या हरामखोराला तडफडवून मारायचं पण तिच्या नकळत. नाहीतर ती स्वतःच्या जीवाचे काहीतरी बरे वाईट करून घेण्याची शक्यता आहे. उद्या सकाळी त्या राकेश आणि पूजाला बोलवून घ्या. त्यांच्याशी बोलून मग ठरवू काय करायचे ते” रवी सुभाषला अडवत म्हणाला.

इकडे घाबरलेली नभा खिडकीतून बाहेर पाहत कानोसा घेत होती, पण तिला कोणतीच हालचाल जाणवली नाही. म्हणुन ती आपल्या खोलीचा दरवाजा उघडून हॉल मध्ये आली पण तिथेही कोणीच नव्हते. “आपल्याला भास तर नाही ना झाला? पण खिडकी आपोआप कशी उघडेल? आकाश आणि मी दोघांनीही तो आवाज स्पष्ट ऐकलं होता याचा अर्थ कोणीतरी नक्की होते तिथे. काहीच समजायला मार्ग नाही.” ती स्वतःशीच बडबडत होती. तिने आपल्या आई वडीलांची आणि भावंडांची रूम चेक केली सर्व आतून बंद होत्या. मग ती निर्धास्त झाली. माठातील थंडगार पाणी प्यायल्यावर तिला थोडे बरे वाटले. ती शांतपणे आपल्या खोलीत जाऊन झोपली.

आकाशचा आत्मा जेव्हा घरी पोहोचला तेव्हा घरात उजेड पाहून दारातच थबकला. तो त्या बंद दरवाजातून हळूच आत शिरला आणि अचानक त्याच्या कानावर आपल्या रडणाऱ्या आईचा आवाज शिरला. तो आवाज त्याच्याच खोलीतून येत होता. त्याने आपल्या खोलीत शिरून पाहिले तर डॉक्टर त्याच्या अचेतन शरीराची नाडी तपासत होते. आई डोक्याला हात लावून रडत होती. त्याचे वडील, भाऊ, आजी सर्वच शोकाकुल होते.

“अरे देवा हे सगळे माझ्या रूममध्ये कशाला आले? आणि डॉक्टर माझी नाडी तपासत आहेत म्हणजे बहुतेक ह्यांना वाटतंय की मी मेलोय म्हणुन. नशीब मी वेळेत आलो नाहीतर एव्हाना माझी चिता पेटवायची तयारी सुरु झाली असती. मला ताबडतोब माझ्या शरीरात शिरले पाहिजे.” असे म्हणुन आकाशचा आत्मा आपल्या शरीरात शिरला. आत्मा आपल्या शरीरात शिरताच आकाशची नाडी सुरु झाली आणि त्याने डोळे उघडले. ते पाहून डॉक्टर चक्रावून गेले.

त्यांच्या इतक्या वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये ते पहिल्यांदाच अशी केस पाहत होते. आकाशने डोळे उघडलेले पाहताच त्याच्या आईने त्याला उराशी कवटाळले आणि हमसून हमसून रडू लागली. तिचे सांत्वन करत आकाश म्हणाला, “अगं आई, काय झाले? तू रडतेस का? सगळे का जमले आहेत? आणि डॉक्टरांना कशाला बोलावलय?” आकाशचा आवाज ऐकताच सर्व जण त्याच्या भोवती गोळा झाले. आकाशचे बाबा म्हणाले, “अरे गेला अर्धा तास तू असा निपचित पडला होतास. तुझ्या हृदयाची धडधड होत नव्हती म्हणुन आम्ही डॉक्टरांना बोलावले.”

“त्यांनी तुला चेक केले तर त्यांना पण तुझी नाडी लागेना आणि आता तू अचानक उठून विचारतोयस की डॉक्टर कशाला आलेत म्हणुन! आम्ही तुला आता हॉस्पिटलला हलवणार होतो.” डॉक्टर अजुनही शॉकमध्ये होते. “आय कान्ट बिलिव्ह धिस! हिज पल्स वॉज कंप्लिटली ऍबसेन्ट फॉर लास्ट फिफ्टीन मिनिट्स. धिस इज सिम्पली अ मिरॅकल. आय ह्याव नेव्हर सिन एनी सच इन्सिडन्स बिफोर, इन माय लाईफ.” डॉक्टरांच्या चेहऱ्यावर आश्चर्य ओसंडून वाहत होते.

“मी एकदम ठीक आहे, वाटल्यास तुम्ही माझी नाडी पुन्हा एकदा चेक करा.” आकाश उद्गारला. ‘त्याची काही गरज नाही यंग मॅन! मी जस्ट चेक केली आहे. मिस्टर साळवी युअर सन इज ऍबसोल्युटली फाईन. नो नीड टू वरी. हिज ब्लड प्रेशर इज अल्सो नॉर्मल. हि जस्ट निड सम रेस्ट. आय टेक युअर लिव्ह नाऊ.” असे म्हणुन डॉक्टर त्यांची फी घेऊन तिथून निघून गेले. “पण तुम्हाला कसे कळले की माझी नाडी बंद पडली आहे म्हणुन?” आकाशचे कुतूहल वाढले होते.

“अरे दादा, मला टॉयलेट लागल्यामुळे जाग आली. झोपेतच मी बेडवरुन खाली उतरलो. माझा पाय तुझ्या हातावर पडला आणि मी तोल जाऊन तुझ्या अंगावर कोसळलो. पण तुझ्याकडून कसलीच रिऍक्शन नाही मिळाली. म्हणुन मी तुझ्या छातीवर हात ठेवला तर हार्टबीट जाणवेना, नाका जवळ हात नेला तर तुझा श्वासोच्छवास पण सुरु नव्हता. मग मी घाबरलो आणि आई बाबांना जाऊन उठवले.” आकाशचा लहान भाऊ अनुज म्हणाला.

“तरीच मी म्हणतोय माझ्या बरगडीत दुखतंय का?” आकाश आपली बरगडी चोळत म्हणाला. “आकाश खरं सांग काय चाललंय? तुझी नाडी का सुरु नव्हती? कसल्या बिनकामाच्या साधना सुरु आहेत तुझ्या?” आकाशची आई त्याला दमात घेत म्हणाली. “अगं आई खरंच काही नाही सुरु आहे. मलाच माहित नाही काय झाले होते ते!” आकाश तिची नजर चुकवत म्हणाला. “आता तू सांगतोस, की मी जोशी काकांना फोन लावू? तो ही या वेळी!” आईने पुन्हा आपले ठेवणीतले अस्त्र बाहेर काढले.

मग आकाशला नाईलाजाने जोशी काकांकडून शिकलेल्या विद्येबद्दल सर्व काही सांगावेच लागले. ते ऐकताच तिने आपल्या डोक्यावर हात मारून घेतला. “नालायका तू सूक्ष्म रूपात गावभर उंडगत होतास आणि आमच्या जीवाला फुकटचा घोर लावलास. खरं सांग त्या नभाला भेटायला गेला होतास ना?” आईने हा प्रश्न घरातील सर्व सदस्यांसमोर, खास करून बाबांसमोर विचारल्यामुळे आकाश पुरता क्लीन बोल्ड झाला. “आई पण ना! हिला न सांगता सगळे कसे काय कळते देव जाणे! पण बाबांसमोर हे विचारायची काय गरज होती?”

आकाश आपल्याच विचारात असताना आईच्या आवाजाने भानावर आला. “काय रे? काय विचारतेय मी? लक्ष कुठाय तुझं? बाबांचे टेन्शन घेऊ नकोस, मी त्यांना आधीच सगळे सांगितले आहे. तू फक्त माझ्या प्रश्नाचे उत्तर दे” आज आई विकेट वर विकेट घेत होती. आकाशला आता हो म्हणण्या व्यतिरिक्त पर्यायच उरला नव्हता. त्याने कबुली देताच त्याची आई त्याच्यावर एकदम चिडली, “अरे! तुला जोशी काकांनी सगळे समजावून सांगितले होते ना? तरीही तू त्या मुलीला भेटायला गेलास, ते ही असा?”

“तुझ्या जीवाला धोका होऊ शकतो म्हणुन मी इथे जप, जाप, पूजा पाठ वगैरे काय काय करतेय; आणि तू मजनुगिरी करत फिरतोयस! तुला जरा सुद्धा आमचा विचार नाही का रे? उद्या तुझ्या जीवाचे बरे वाईट झाले तर आम्ही कसे जगायचे ते पण सांग बाबा! प्रेमात एवढा वेडा झाला आहेस की इतर कसलाच विचार शिरत नाही का तुझ्या डोक्यात?” आई जाम चिडली होती. “ही एकदा सुरु झाली की तासभर तरी थांबायची नाही. अजुन काही गुपीत बाहेर पडण्याअगोदर माफी मागून विषय बंद करणेच आता आपल्या फायद्याचे आहे.” असा विचार मनात येताच आकाशने तिची माफी मागितली.

“माझे चुकले. मला माफ कर आई, पण काकाच तर म्हणाले होते की जे विधिलिखित आहे ते टळणार नाही म्हणुन? मग असे घाबरत किती दिवस जगायचे? मरण तर एक ना एक दिवस प्रत्येकाला येणारच आहे. त्याच्या भीतीने आपण जगणे सोडायचे का? जे काही दिवस आपल्या वाट्याला आहेत ते मजेत जगावेत. आता नभावर मी काही ठरवून प्रेम केले नाही. ते होणारच होते कारण ते माझ्या नशिबात लिहिलेले होते. उद्या कदाचित नभाच्या प्रेमाच्या ताकदीमुळे माझे मरण टळूही शकेल.”

“एक आई म्हणुन तू माझी काळजी करणे साहजिकच आहे. पण तू मला पण समजून घे ना! मी मरणाला भीत नाही पण नभा माझ्या आयुष्यात असणार नाही या विचारानेही मला कसेतरीच होते. मला एक समजते ते म्हणजे तुमची वेळ आली असेल तर तुम्हाला कोणीही वाचवू शकत नाही आणि वेळ आली नसेल तर कोणीही तुम्हाला मारू शकत नाही. मग कशाला घाबरायचे?” एवढे बोलून आकाश बोलायचे थांबला आणि घरात एक भयाण शांतता पसरली.

आकाशचे बोलणे लॉजिकल असले तरी आई ती आईच. ती तर आपल्या मुलाची काळजी करणारच. शेवटी आकाशच्या बाबांनी हस्तक्षेप केला. “ठीक आहे. आकाश सुखरूप आहे हे माझ्यासाठी जास्त महत्वाचे आहे. राहता राहिला त्या विद्येचा प्रश्न. माझा या सगळ्यावर विश्वास नाही पण आज जे काही पाहिले त्यावरून माझा हा भ्रम नाहीसा झाला आहे.”

एखादी गोष्ट आपल्याला दिसत नाही म्हणजे ती अस्तित्वातच नाही हा माझा समज आज खोटा ठरला. आपल्याला माहित नसलेल्या अनेक गोष्टींनी हे विश्व व्यापलेले आहे. विज्ञान हे अंधारात फडफडणाऱ्या दिव्याप्रमाणे आहे. दिव्याचा प्रकाश जेवढा तेवढेच आपल्याला दिसते. त्या प्रकाशा पलीकडे अंधारात खुप काही लपले असू शकते आपल्यावर झडप घालण्यासाठी, ज्याची आपल्याला कल्पना पण नसते.

“हा विषय इथेच थांबवूया. मी उद्या जोश्याला जाऊन भेटतो मग ठरवू काय करायचे ते. तो पर्यंत तू तुझी साधना आणि तू तुझे जप, जाप, पूजा पाठ वगैरे सुरूच ठेव.” आकाशचे वडील आकाश आणि आपल्या पत्नीकडे पाहत म्हणाले. “चला आता झोपायला जा सगळे.” असे म्हणुन ते आपल्या खोलीत निघून गेले. त्यांच्या पाठोपाठ आईही गेली पण जाता जाता तिने आकाशकडे पहिले आणि म्हणाली, “मरणावर मस्त स्पिच दिलेस पण माझ्या मनाच्या यातना तुला कधीच समजू शकणार नाहीत, त्यासाठी तुला आईच्या जन्माला यावे लागेल.”

आकाशवर जीवापाड प्रेम करणारी, प्रसंगी त्याला बाबांच्या रागापासून वाचवणारी त्याची आजीही तिच्या खोलीत निघून गेली पण काहीही न बोलता, याचे आकाशला फार वाईट वाटले. अनुजला वाटले की दादा आता सगळा राग त्याच्यावर काढणार. नकळत का होईना आकाशचे सिक्रेट त्याच्याकडूनच उघड झाले होते. पण आकाश त्याला काहीच बोलला नाही आणि निमूट झोपी गेला.

दुसऱ्या दिवशी सकाळी राकेश आणि पूजाला सुभाष मामाने फोन करून लॉजवर बोलावून घेतले. पूजा मोबाईल घेऊन तयारीतच गेली. ते दोघे आल्यावर रवी म्हणाला, “त्या आकाशचा काटा काढायचा आहे, आणि या कामात आम्हाला तुमच्या मदतीची गरज आहे. पण या गोष्टीची खबर नभाला बिलकुल होता नये.” रवीच्या या वाक्यावर राकेशने पूजाकडे सूचक अर्थाने पाहिले, जणू त्याला तिला म्हणायचे होते, बघ मी सांगितले नव्हते तुला, की यांना आपली गरज लागणार म्हणुन?

“आकाशचा काटा काढायचा आहे म्हणजे नक्की काय करणार आहात तुम्हीं? त्याला ठार मारायचा विचार तर करत नाही आहात ना?” पूजाच्या या प्रश्नावर राकेश आणि नभाचे चारही मामा कुटील हसू लागले. ते पाहून पूजा चांगलीच घाबरली. “म्हणजे तुम्ही आकाशचा खुन करायचे ठरवलंय? प्लिज, मला यात गुंतवू नका, तसाही या कामात तुम्हाला माझा काहीच उपयोग नाही. मला जाऊ द्या.” असे म्हणुन पूजा रडू लागली.

“तुला सर्व काही कळलंय, आता तुला असेच कसे जाऊ देऊ? तू कुणाला काही बोललीस तर आमची मान फासावर लटकायला वेळ लागणार नाही.” रमेश मामा म्हणाला. “मी शपथ घेऊन सांगते, मी कुणालाच नाही सांगणार. प्लिज मला जाऊ द्या. जर का तुम्ही आकाशच्या जीवाचे काही बरे वाईट केलेत तर आज ना उद्या ही गोष्ट बाहेर आल्याशिवाय राहणार नाही मग सगळ्यांनाच फासावर जावे लागेल. त्यापेक्षा आकाशला कुठे तरी अडकवून ठेवा आणि नभाला बेळगावीला नेऊन तुमच्या आवडीच्या मुलाशी तिचे लग्न लावून द्या.”

“हे समजल्यावर आकाश स्वतःच जीव देईल. त्यामुळे आकाशला मारायची गरज पण पडणार नाही आणि आपल्या मानेभोवती फास लागण्याची भीती पण उरणार नाही.” पूजाने मधला मार्ग सुचवला. “तुझी आयडिया छान आहे पण तू हे विसरतेस की आकाशला आपला आत्मा आपल्या शरीराबाहेर काढून जगाच्या पाठीवर कुठेही क्षणात पोहोचायची विद्या अवगत आहे. आपण त्याला धरला किंवा पकडून ठेवला तर त्याचा आत्मा क्षणात नभाच्या जवळ पोहोचू शकतो आणि तिला आपला प्लॅन सांगू शकतो. मग त्याला मारले तरीही काही उपयोग होणार नाही.”

“कारण नभा इतर कोणाशी लग्नाचा विचार पण करणार नाही. कदाचित ती आपल्या जीवाचे काही बरे वाईट करून घेऊ शकते. त्यामुळे त्याला बेसावध गाठून त्याचा काटा काढावा लागेल. त्याला नभापासून सुटका हवी असल्यामुळे तो नभाला सोडून कायमचा कुठे तरी निघून गेला आहे असे तिला एकदा पटले की ती आपल्या ईगोमुळे इतर कोणाशी लग्न करायला तयार होईल. त्यामुळे आकाशला मारावे तर लागेलच.”

“आता या सगळ्यात तुझे काम काय? तर नभाच्या जवळ थांबून तिच्यावर तिच्या नकळत नजर ठेवायची. आकाश बद्दल तिच्या मनात संशय निर्माण करायचा आणि जरा जरी काही वेगळे घडतंय असे वाटल्यास आम्हाला लगेच कळवायचे. चल लाग कामाला.” विकास मामा कालपासून पहिल्यांदाच बोलला. “एक मिनिट, तू नभाला रश्मी बद्दल सांग. कसा आकाश तिच्यासाठी वेडा झाला होता? तिला फसवून तिचा गैरफायदा घ्यायचा त्याचा प्लॅन होता ते जरा रंगवून सांग.”

“तसेच या आधी त्याने बऱ्याच मुलींना कसे नादी लावले ते पण मीठ मसाला लावून सांग. मग बघ नभा त्याचे तोंड सुद्धा बघणार नाही आणि एकदा का ती त्याच्या पासून दूर झाली की आकाश जगला काय किंवा मेला काय, तिला काहीच फरक पडणार नाही. मग आपण त्याचा बदला घेऊ. म्हणजे मामांचे पण काम होईल आणि आपले पण.” राकेश आपल्या सैतानी मेंदूवर खुश होत म्हणाला. राकेशचा हा प्लॅन रवी मामला चांगलाच पसंत पडला. ह्यामुळे त्यांचे बरेचसे श्रम आणि वेळ वाचणार होता.

“सुभाष, तुला म्हणालो नव्हतो की हा पोरगा पक्का हxx आहे म्हणुन! कसला मस्त उपाय शोधून काढलाय पठ्ठ्याने!” रवी मामा हसत हसत म्हणाला. राकेशला हxx शब्द झोंबला होता पण त्याने आपला राग मनात दाबत म्हटले, “आय टेक इट ऍज कॉम्प्लिमेंट, जेव्हा आकाश आणि नभामध्ये फूट पडेल तेव्हा आकाशला कसा ट्रॅप करायचा ते पण पाहू. पूजा तुला अजून काही दिवस त्या ऑफिसमध्ये काम करावे लागेल. मामा, जरा खर्चासाठी खिसा हलवलात तर बरे होईल. बरीच कामे करायची आहेत. प्लॅनिंग करायचे आहे.” राकेश आपल्या उजव्या हाताचा तळवा खाजवत म्हणाला.

त्याचा इशारा समजून रवीने सुभाषला दहा हजार रुपये राकेशला देण्यास सांगितले. हातात पैसे येताच राकेशने ते सगळेच आपल्या खिशात ठेवले. त्याबरोबर पूजा वैतागली तिने भुवया चढवत त्याच्याकडे सूचक अर्थाने पाहत हात पुढे केला व पैसे देण्यास खुणावले. राकेशने नाईलाजाने पूजाच्या हातावर तीन हजार ठेवले व बाकीचे आपल्या खिशात ठेवले. आपल्याला तीनच हजार दिलेले पाहून पूजा राकेशवर भडकली.

“हे काय राकेश? तू स्वतःला सात हजार ठेवलेस आणि मला फक्त तीन? पार्टनर आहोत तर हिस्सा पण सारखाच हवा. माझ्या कामाच्या यशावरच तुमचे पुढचे काम होणार आहे हे विसरू नकोस आणि गपगुमान आणखी दोन हजार ढिले कर. नाहीतर मी नभाला सगळे काही सांगून टाकेन, मग बस बोंबलत.”

“ही पण काही कमी नाही. मगाशी म्हणत होती माझा तुम्हाला काही उपयोग होणार नाही आणि आता पैसे मिळत आहेत तर लगेच हिश्श्याच्या गोष्टी करू लागली. साला पैसा भी क्या कुत्ती चीज है!” सुभाष छद्मी हसत बोलला. रवीने नजरेने खुणावताच राकेशने गपचूप २००० रुपये काढून पूजाच्या हातावर ठेवले. पैसे घेऊन राकेश आणि पूजा तिथून निघाले.

नभाचे ऑफिस सुरु व्हायच्या वेळेस आकाश त्याच्या नव्या कोऱ्या बुलेटवरून पेढे द्यायला आला. बहुतांश बुलेट प्रेमींप्रमाणे बुलेट हे त्याचे पहिले प्रेम होते. साठवलेले पैसे आणि बाबांची थोडी फार मदत या जोरावर त्याने उडी मारली होती. तो प्रचंड खुश होता. त्याला आलेले पाहून नभा पटकन ऑफिस मधून बाहेर आली. त्याने नभाला पाहताच पटकन मलाई पेढ्यांचा बॉक्स उघडला आणि एक पेढा तिच्या तोंडात कोंबला.

कोणी पहिले तर नाही ना? असा विचार करत नभाने ऑफिसकडे वळून पाहिले तर रसिका गालातल्या गालात हसताना तिला दिसली. रसिकाने इशाऱ्यानेच चालू दे तुमचे! असे खुणावले तेव्हा नभाला लाजेने मेल्याहून मेल्यासारखे झाले. तिने आकाशकडे पाहत नेहेमी प्रमाणे डोळे वटारले. त्यानेही मग वरमल्यासारखे केले. पुढच्याच क्षणाला दोघे हसू लागले, रसिकाही त्याच्या हसण्यात सामील झाली. सर्वांना आपल्या नव्या बुलेटचे पेढे दिल्यावर आकाश नभाच्या डेस्कपाशी आला. त्याने नभाला गाडी कशी वाटली असे विचारले. नभानेही तिला गाडी आवडल्याचे सांगितले.

त्याला एवढे खुश पाहून तिला खूप बरे वाटले. बऱ्याच दिवसांनी तो इतका खुश दिसत होता. त्याला तिला गाडीवरून राउंड मारून आणायचा होता पण संध्याकाळी बुलेट वरून समुद्रावर जाऊ असे तिने म्हणताच त्यानेही ते काबुल केले. नभा आणि आकाश बोलत असतानाच राकेशने पूजाला ऑफिसला सोडले आणि पुढे निघून गेला. पूजा दरवाज्यातून आत जाणार तेवढ्यात तिला नभाला बाय करून निघणारा आकाश दिसला तशी ती एकदम बावचळली. काय करावे ते न कळल्याने ती झटक्यात वळून त्याच्याकडे पाठ करून उभी राहिली.

आकाश तिच्या बाजूने निघून जाताच ती उलटी फिरली आणि ऑफिसमध्ये शिरली. हीच संधी आहे असा विचार करून ती सरळ नभा जवळ गेली. “बिझी आहेस?” नभाने नकारार्थी मान हलवली. “चल ना थोडे बोलायचे आहे.” असे म्हणुन तिने नभाचा हात धरला आणि वॉश रूमकडे निघाली. “अगं हो हो! काय एवढे महत्वाचे बोलायचे आहे? तुझी तब्येत ठीक आहे ना?” नभाने तिला अडवत विचारले. "सांगतेऽऽऽ तू चल तर!” म्हणुन पूजा नभाला घेऊन वॉशरूम मध्ये गेली.

“आत्ता जो बाहेर गेला तो आकाश होता ना?” पूजाने विचारले, यावर नभाने हो म्हटले आणि विचारले, “तू आकाशला कशी ओळखतेस?‘” पूजा याच प्रश्नाची वाट पाहत होती. “मला तर त्याचे नांव पण घ्यायची इच्छा नाही, पण तुला त्याच्याशी बोलताना पाहून मला राहवले नाही.” “तुला नक्की काय म्हणायचंय? असं काय केलंय आकाशने की तुला त्याचे नांव पण घ्यावेसे वाटत नाही?” नकळत नभाचा आवाज चढला होता. “अगं एक नंबरचा हलकट आणि फालतू माणूस आहे तो! तू त्याच्या पासून लांब राहा बाई. तुला पण इतर मुलींसारखे जाळ्यात ओढून, तो तुझेही आयुष्य बरबाद करेल.”

पूजा असे बोलताच नभाचा संयम सुटला आणि ती जवळ जवळ ओरडलीच “पूजा! तुला लाज नाही वाटत आकाश सारख्या चांगल्या माणसाची बदनामी करताना? माझा आकाश असा मुळीच नाही आहे.” पूजाच्या चेहऱ्यावर छद्मी हास्य उमटले. “माझा आकाश! तू त्याच्या प्रेमात तर पडली नाहीस ना? असशील तर वेळीच सावध हो नभा, मी खोटे कशाला सांगू? त्याची बदनामी करून माझा काय फायदा होणार आहे? मी खरे तेच सांगतेय. तो माझ्या बरोबर कॉलेजला होता. बघावं तेव्हा मुलींच्या मागे असायचा. त्यांना आपल्या जाळ्यात अडकवायचा प्रयत्न करायचा.”

“रश्मी सावंत नावाच्या एका मुलीला त्याने आपल्या जाळ्यात अडकवायचा प्रयत्न केला होता. मी आणि राकेशने तिला वेळीच सावध केल्यामुळे ती वाचली, नाहीतर त्याने वाट लावलेल्या मुलींच्या यादीत आणखी एक भर पडली असती. ती आजही आम्हाला धन्यवाद देते त्याबद्दल. माझ्यावर विश्वास ठेव, त्याची नजर चांगली नाही. गोड बोलून, स्तुती करून, मदत करून, गिफ्ट्स देऊन नाना प्रकारे तो मुलींना आपल्या चांगुलपणाची भुरळ पाडतो आणि नंतर त्यांचा गैरफायदा उचलतो.”

“तुझा विश्वास बसत नसेल तर त्याला रश्मीबद्दल विचार आणि बघ त्याच्या चेहऱ्यावर कसे बारा वाजतात ते. मी तुला सावध करायचे काम केले. पुढे तू ठरव काय करायचे ते.” पूजा शांत झाली आणि नभाचे मन ढवळून गेले. नभाला विचारात हरवल्याचे पाहून पूजाने तिच्या खांद्यावर थोपटले आणि वॉशरूमच्या बाहेर निघून गेली. नभा एकदम सुन्न झाली होती. तिचा तिच्या कानांवर विश्वास बसत नव्हता. “माणुस ओळखायला मी आजपर्यंत कधीच चुकले नाही. मग आकाशच्या बाबतीत कशी चुकेन? नाही, नाही! हे खरे असूच शकत नाही.”

“माझा आकाश, माझा राजा असे वाईट काम करूच शकत नाही. ऑफिस मध्ये इतर मुलींशी त्याचे वागणे किती अदबशीर होते? मी स्वतः त्याला जवळ येऊ दिले तरीही त्याने आपली सीमा कधीच ओलांडली नाही. माझा आणि इतर मुलींचाही त्याने नेहेमी सम्मानच केला. त्याच्या डोळ्यात मला माझ्या बद्दल अपार प्रेमच दिसले ना की वासना. एक स्त्री असूनही मला स्वतःला त्याच्या मिठीत शिरावे, त्याला किस करावे असे वाटलेच ना? मग तो तर पुरुष आहे, त्याला असे वाटले तर त्यात गैर काय?”

“इतर पुरुषांच्या गर्दीतील चोरट्या घाणेरड्या स्पर्शाप्रमाणे त्याच्या स्पर्शाची मला कधीही किळस वाटली नाही. उलट त्यात माया, काळजी, प्रेम, आपलेपणा आणि विश्वासच जाणवला. तो स्पर्श नेहेमी हवा हवासा वाटला. त्याची मिठी मला माझ्यासाठी जगातील सगळ्यात सेफ जागा वाटली. इतका निरागस, साधा, सरळ, प्रेमळ आणि देखणा आकाश खरंच पूजाने सांगितल्याप्रमाणे असू शकेल?” नभाचे मन आयुष्यात पहिल्यांदाच दोलायमान झाले होते. एकीकडे तिला आकाशवर अविश्वास दाखवल्याबद्दल अपराधीपणाची भावना निर्माण झाली होती आणि दुसरीकडे पूजाच्या बोलण्यामुळे खऱ्या खोट्याची शहानिशा केलीच पाहिजे असेही वाटत होते.

“आपले आकाशवरील प्रेम इतके कमकुवत आहे का? की कोणीतरी त्याच्या बद्दल काहीतरी उलट सुलट बोलल्यामुळे ते तुटेल? पण पूजा ज्या कॉन्फिडन्सने सगळे बोलत होती त्याचे काय? कोण ही रश्मी याचा पत्ता लावलाच पाहिजे. जर का हे खोटे निघाले तर पायातल्या चपलेने आकाश समोरच त्या पूजाने तोंड नाही फोडले तर नभा नांव नाही सांगणार. पण जर का माझ्या दुर्दैवाने हे खरे ठरले तर? आयुष्यात आकाशचे तोंडही बघणार नाही.”

आकाशसाठी प्रचंड हळवी असलेल्या नभाच्या डोळ्यातून श्रावणधारा कधी बरसू लागल्या ते तिचे तिलाही कळले नाही. अश्रूंनी तिचे गाल भिजले तशी ती भानावर आली. डोळे पुसून तिने आपला चेहरा नीट केला. स्वतःला तिने सावरले आणि आपल्या डेस्कवर आली. तिची अस्वस्थता इतर कोणाच्याही लक्षात आली नसली तरी रसिकाने मात्र ती अचूक टिपली. चेहऱ्यावरून नेहेमीसारखीच शांत भासणाऱ्या नभाच्या मनाची अवस्था मात्र उधाण आलेल्या समुद्रात सापडलेल्या एखाद्या छोट्या नौकेसारखी झाली होती.

रसिकाने आपल्या भुवया उंचावून डोळ्यानेच तिला काय झाले असे विचारले, त्यावर मान हलवून तिने हसून काही नाही असे खुणावले. रसिका समजून चुकली की पूजाने काही तरी उद्योग करून ठेवला आहे आणि त्यामुळेच नभा एवढी डिस्टर्ब झाली आहे. तिने पूजाकडे पाहिले तेव्हा ती नभाकडेच पाहत होती आणि तिच्या चेहऱ्यावर असुरी आनंद स्पष्ट दिसत होता. आपले काम चोख झाल्याची तिला खात्री पटली होती. रसिका काहीच न बोलता बाहेर निघून गेली आणि तिने आकाशला फोन लावला.

पूजा नभाला वॉशरूम मध्ये घेऊन गेल्यापासून नभाची अवस्था खुप नाजुक झाल्याचे तिने आकाशला सांगितले. पूजा नांव ऐकल्यावर आकाशला संशय आला व त्याने तिच्या बद्दल रसिकाकडे अधिक चौकशी केली आणि त्याची खात्री पटली की ही पूजा दुसरी तिसरी कोणी नसून तीच आहे जिने त्याच्या आयुष्यात या आधीही विष कालवले होते आणि कदाचित ती पुन्हा तेच करत होती. ज्याअर्थी या सगळ्या मागे पूजा आहे त्याअर्थी राकेशही कुठेतरी पडद्याआड कार्यरत असणार याची आकाशला खात्री पटली.

“पण पूजाने नभाला असे काय सांगितले असावे की ती एवढी डिस्टर्ब व्हावी? पूजा आणि राकेश एकत्र आहेत म्हणजे रश्मी बद्दल तर नव्हे? रश्मीने राकेशला डच्चू दिल्यामुळे तसाही तो पिसाळला होता. त्यातुन माझ्यावर पोरं आणून हल्ला केला पण त्यातही सडकून मार खाल्ला. इज्जत गेली ती वेगळी. माझ्यावरून रश्मीने हॉस्पिटलमध्ये सर्वांसमोर धुलाई केली होती. या सगळ्याचा राग तर तो काढत नसावा? माझी आणि रश्मीची लव्ह स्टोरी तर बनण्याआधी या दोघांनीच उध्वस्त केली होती मग सांगण्यासारखे उरले काय?” मग आकाशची ट्यूब पेटली.

“रश्मी ज्या प्रमाणे राकेशला सोडून गेली त्याप्रमाणे नभा मला सोडून जावी म्हणुन माझा बदला घेण्यासाठी तर हे सगळे नसावे? येस! दॅट्स इट. हे माझ्या लक्षात आधी कसे आले नाही? आता यातून मला एकच व्यक्ती वाचवू शकते ती म्हणजे स्वतः रश्मी. रश्मीने नभासमोर या दोघांचे पितळ उघडे पाडले की मग राकेश काय किंवा पूजा काय कोणीच काहीही करू शकत नाही.” रसिकाने वेळीच सावध केल्याबद्दल तिला थँक्स म्हणुन आकाशने रश्मीला फोन लावला.

“हॅलो रश्मी! मी आकाश बोलतोय. या क्षणाला मला तुझी खुप गरज आहे गं!” आकाशचे शब्द थेट रश्मीच्या काळजालाच भिडले. रश्मी सुखावली. “हो रे माझ्या राजा! मला पण तुझी खुप गरज आहे.” रश्मीचे हे अनपेक्षित वाक्य कानावर पडताच आकाश चक्रावलाच. नकळत आपण काय बोलून गेलो हे लक्षात येताच त्याने आपली जीभ चावली. आपण काहीच ऐकले नाही या आविर्भावात तो पुढे म्हणाला, “अगं त्या पूजा आणि राकेशने माझ्यापुढे मोठा प्रॉब्लेम उभा केला आहे आणि त्यातून मला तूच बाहेर काढू शकतेस.”

“त्यांनी आपल्या बद्दल उलट सुलट सांगून नभाचे कान भरले आहेत. ती खुप चिडली आहे. आज संध्याकाळी कदाचित मी नभाला घेऊन तुला भेटायला येईन. तू तिला सर्व काही खरे सांगावेस आणि आपल्यात तसे काहीच नव्हते याची तिला खात्री पटवून द्यावीस, माझी एवढीच तुला विनंती आहे.” आकाश एका दमात बोलून गेला. क्षणभर फोनवर भयाण शांतता पसरली. रश्मीच्या हुंदक्याने ती भंगली आणि मग फोन कट झाला.

रश्मीच्या अश्रूंचा बांध एव्हाना फुटला असणार आणि तिचे अश्रू, तिची ओढणी भिजवायचे काम इमाने इतबारे करत असणार याची आकाशला खात्री होती. पण तो तरी काय करू शकत होता? रश्मी त्याचा भूतकाळ होती तर नभा त्याचा वर्तमानकाळ आणि हे दोन्ही काळ त्याच्या सोबत एकत्र राहू शकत नाहीत याची त्याला जाणीव होती. या दोघींपैकी एकीची निवड करणे त्याला भाग होते आणि ती निवड त्याने आधीच केली होती. रश्मीने त्याला आपले मानले पण त्याला खुप उशीर झाला होता.

ज्या क्षणाला रश्मीने त्याला सोडून राकेशला जवळ केले त्याच क्षणाला त्याने तिला आपल्या मनातून आणि डोक्यातूनही काढून टाकले होते. त्यामुळेच कॉलेज डेजमध्ये जेव्हा रश्मीने तिच्या मनाचा कौल त्याच्या बाजूने दिला होता तेव्हाही तो तटस्थ राहिला. आता तर तो फक्त नभाचा होता, तेही मनापासून. नभा त्याचे सर्वस्व होती आणि तिनेही सर्वांच्या विरोधात जाऊन त्याची साथ दिली होती. एवढेच नव्हे तर आपला जीव धोक्यात घालून अमानवीय शक्ती पासूनही त्याला वाचवले होते. आता तर तो तिला अंतर देण्याबद्दल विचारही करू शकत नव्हता. त्याने मानेला एक झटका देऊन रश्मीचा विचार मनातून काढून टाकला.

आता त्याला नभाला फेस करायचे होते आणि यात तो यशस्वी होणार यात त्याला तिळमात्रही संशय नव्हता. पूजाला वाटले होते त्यापेक्षा खुप लवकर तिला नभाच्या मनात संशय निर्माण करण्याची संधी मिळाली, आणि ती त्या संधीचा पुरेपूर फायदा उचलण्यात यशस्वी पण झाली. तिने लगेचच राकेशला फोन लावून ही बातमी दिली. पूजा या कामात एवढ्या लवकर यशस्वी होईल याची राकेशला अपेक्षाच नव्हती. जेव्हा पूजाने त्याला सांगितले की ती तिला दिलेल्या कामात यशस्वी झाली आहे, तेव्हा तो जाम खुश झाला. त्याचबरोबर आता त्याला कामाला लागावे लागेल याची त्याला जाणीव झाली.

तवा गरम आहे तोपर्यंत आपली पोळी भाजून घेणे गरजेचे आहे हे त्याने ताडले. पूजाचा फोन झाल्यावर त्याने लगेच नभाच्या मामाला फोन लावला आणि पूजाने आपले काम चोख केल्याचे सांगितले. ते ऐकल्यावर रवी मामा खुश झाला आणि त्याने आकाशला अडकवण्याचे काम सुरु करण्यास सांगून फोन ठेवला. इकडे विचार करून करून नभाचे डोके दुखू लागले होते, इतके की तिला ऑफिसमध्ये बसून काम करणे अशक्य झाले. तब्येत बरी नसल्याचे कारण सांगून ती घरी निघाली.

ती अचानक घरी आल्याने चारही मामा आयतेच घरात सापडले. त्यांना पाहून तिला खूप आश्चर्य झाले. ती आनंदाने रवी मामला बिलगली. आनंदाचा भर ओसरल्यावर ती म्हणाली, “अरे वा तुम्ही सगळे कधी आलात? मला कळवले पण नाही. मी ऑफिस मधून सुट्टीच घेतली असती.” काही तरी बोलून सारवा सारव करायची म्हणुन रवी मामा म्हणाला, “तुला ते काय म्हणतात ते, सरप्राईज द्यायचे होते. पण तू अचानक घरी कशी काय आलीस?” आता उत्तर द्यायची पाळी नभाची होती. “अरे, सकाळ पासून माझे ऑफिसमध्ये कामात लक्षच लागत नव्हते, सारखे घरी जावे असेच वाटत होते. कदाचित तुम्ही येणार होतात म्हणुन असेल.”

“मग काय तब्येत बरी नाही सांगून आले आणि खरंच तुम्ही सगळे आलात. बघ, तू न सांगताही मला कळले!” नभाला आनंद झाला असला तरी चारही मामा अचानक येण्यामागे आपली आई असल्याचे तिच्या लक्षात आल्या वाचून राहिले नाही. पण तिने तसे चेहऱ्यावर बिलकुल दाखवले नाही. “आता खऱ्या अर्थाने माझी लढाई सुरु होणार आहे. पण त्या रश्मीचे काय? आकाश खरंच माझ्याशी प्रामाणिक आहे की नाही, हे कळणार कसे? सर्वांच्या विरोधात जायचे तर आपले नाणे खणखणीत असायला पाहिजे” असा विचार तिच्या मनात तरळून गेला. पण तो तिने झटकून टाकला.

संध्याकाळी आकाश आपले बागेतील काम संपवून नभाला भेटण्यासाठी तिच्या ऑफिसवर आला पण रसिकाकडून त्याला कळले की तिची तब्येत बरी नसल्यामुळे ती दुपारीच घरी गेली होती. आकाशला आश्चर्य वाटले, “तब्येत बरी नाही? नक्की काय झाले? आणि मला काहीच कसे कळवले नाही? पूजाने रश्मी बद्दल सांगितल्यामुळे तर तिला त्रास झाला नसावा?” एकामागून एक प्रश्न आकाशच्या डोक्यात पिंगा घालू लागले. त्याला नभाची काळजी वाटू लागली.

न राहवून आकाशने रसिकाला विचारले, “काय होत होते तिला? मला फोन का नाही केला? काही निरोप वगैरे ठेवला आहे का माझ्यासाठी?” यावर रसिका त्याला म्हणाली, “अरे एवढे काही सिरीयस झालेले नाही. तिचे 'डोकं दुखत होते इतकेच. निरोप म्हणशील तर काहीच नाही ठेवला आहे. सगळे ठीक आहे. तू एवढे टेन्शन नको घेऊस.” “टेन्शन घेऊ नकोस नव्हे, टेन्शनचीच गोष्ट आहे. त्या पूजाने तिला काय पट्टी पढवली असेल देव जाणे. आमचे रिलेशन स्टेकवर आहे रसिका! ती हरामखोर पूजा कुठे दिसत नाही ती?” आकाश ऑफिसमध्ये नजर फिरवत म्हणाला.

“अरे नभा बाहेर पडल्यावर ती सुद्धा निघून गेली. कुठे? का? ते काही माहित नाही. सर पण विचारत होते. तसेही तिचे कामात नीट लक्ष नसल्यामुळे सर तिला काढून टाकतील असेच दिसतंय.” आकाशने नभाच्या घरी अदृश्य रूपात जाऊन नक्की काय प्रकार आहे ते पाहायचे ठरवले व रसिकाला बाय करून तो आपल्या बागेत परत गेला. तिथे त्याने फार्म हाऊस मध्ये आपले शरीर सुरक्षित राहील याची काळजी घेऊन आपला आत्मा शरीराबाहेर काढला व नभाच्या घराकडे निघाला.

घरी नभा, तिचे चारही मामा व घरातील सर्व सदस्य चहा घेत गप्पा मारत होते. त्या चार अनोळखी माणसांना पाहिल्यावर आकाशने अंदाज बांधला की तेच नभाचे मामा आहेत. रवी मामा बोलत होता, “आम्ही पिंकी साठी स्थळ बघितलंय, माझ्या बायकोच्या भावाचाच मुलगा आहे. बेळगावीला भरपूर शेती आहे, साखर कारखाने आहेत. घर, जमीन, गाडी, नोकर चाकर कशाची कमी नाही. आपली पिंकी सुखी राहील आणि नात्यातच असल्यामुळे स्थळही माहितीतील आहे. हुंड्याचाही प्रश्न येणार नाही. बोला कधी करायची बोलणी?”

त्यावर नभा उठून तिच्या खोलीत निघून गेली. “लाजली वाटतं, बोला भावोजी तुमचे काय मत?” रवी मामाने नभाच्या वडीलांकडे पाहत विचारले. नभाचे बाबा म्हणाले, “थोडी घाई होतेय असे नाही वाटत? नभाचे लग्नाचे वय झालेले नाही. तिला पुढे शिकायचे आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे तिची पसंती पण लक्षात घेणे गरजेचे आहे. आजकाल परिस्थिती बदलली आहे, मुलं मुली स्वतः आपला जोडीदार निवडतात. नभाच्या मनात कोणी असेल तर आधी ते जाणून घेतले पाहिजे. जबरदस्तीने काम बिघडू शकते.”

यावर रवी मामाचा पारा एकदम चढला. “भावोजी, जग बदलले असेल, पण आपण जसे आहोत तसेच राहणार. नभाचे लग्न माझ्या मेव्हण्याच्या मुलासोबतच होणार. लग्नाचा सगळा खर्च आम्ही चौघे मिळून करू. तुम्हाला १ पैसा पण खिशातून काढायची गरज नाही. नभाच्या भल्या बुऱ्याचा विचार करायला आम्ही अजुन जीवंत आहोत. तिला काय कळतंय यातलं? शिकून काय करणार? पुढे घरच सांभाळायचे आहे तिला. ग्रॅज्युएट झाली आहे ना? ते पुरेसे आहे की! चांगले स्थळ हातातून जाईल, तेव्हा आता जास्त विचार करू नका आणि हो म्हणा.”

रवी मामाने नभाच्या वडीलांसमोर कोणताही पर्यायच ठेवला नाही. नभा तिच्या खोलीत विचार करत बसली होती. मामा आता आपले काही ऐकणार नाहीत हे तिने एकंदर प्रकारावरून ओळखले होते. तिला आकाशची खुप आठवण येत होती. त्या क्षणाला तिला त्याची सर्वात जास्त गरज होती. अचानक तिला कोणीतरी आपल्या अवतीभवती असल्याची जाणीव झाली आणि तिच्या चेहऱ्यावर स्मित पसरले. “कसे कळते रे तुला माझ्या मनातले? तुझाच विचार करत होते आणि तू आलास.”

तिला जवळ घेत आकाश म्हणाला, “कसे कळणार नाही शोना? तुझ्यावर जीवापाड प्रेम जे करतो! तुला त्रासात पाहून माझ्या जीवाला कशी चैन पडेल?” “औऽऽऽ, माझं माऊ ते! किती प्रेम करतोस तु माझ्यावर! त्या पूजाने माझ्या मनात तुझ्याबद्दल संशय निर्माण केला आणि मी महामूर्ख तिच्या बोलण्यात अडकले. प्लिज मला माफ कर बाबु” नभा त्याला घट्ट बिलगत म्हणाली. आकाश तिला कुरवाळत असताना अचानक नभा म्हणाली, “बाबू, एक सांग. ही रश्मी कोण आहे?”

आकाशला हा गुगली अपेक्षितच होता. त्याने तो सेफली खेळायचे ठरवले. “अगं, मी कॉलेजला असताना, माझीही एखादी गर्ल फ्रेंड असावी अशी माझी फार इच्छा होती. शेवटच्या वर्षाला एक रश्मी नावाची मुलगी मला खुप आवडली होती. पण माझ्या वर्गातील पूजा आणि राकेश नावाच्या एका मुलाने माझ्याबद्दल उलटसुलट सांगून तिला घाबरवले. नंतर राकेशने त्या मुलीला पटवले. पुढे त्या मुलीला लक्षात आले की त्यांनी मी जसा आहे म्हणुन तिला सांगितले होते तसा मी बिलकुल नसून उलट राकेशच तिचा गैरफायदा घ्यायचा प्रयत्न करत होता.”

“मग तिने त्याला फाट्यावर मारले. म्हणुन राकेशने पूजाच्या मदतीने माझा बदला घेण्यासाठी तुझे कान भरले. त्यांना वाटले की तू मला सोडून जाशील पण माझे प्रेम खरे असल्यामुळे ते त्यांच्या मनसुब्यात यशस्वी झाले नाहीत. रश्मीच्या मनात आजही माझ्याबद्दल त्या भावना आहेत. पण त्या निर्माण होण्याअगोदरच मी पूर्णपणे तुझा झालो असल्यामुळे माझ्या मनात फक्त तू आणि तूच आहेस. हवे असल्यास मी तुला रश्मीचा नंबर देतो, तू तिच्याशी बोलून अथवा भेटूनही आपली खात्री पटवून घेऊ शकतेस. माझा आणि रश्मीचा काहीही संबंध नाही. माझ्या आयुष्यात फक्त तूच होतीस, आहेस आणि कायम राहशील.”

नभा आकाशच्या छातीवर डोकं ठेऊन त्याच्या हृदयाची धडधड ऐकत होती. तिने एकवेळ त्याच्या डोळ्यात खोलवर पाहिले आणि तिची खात्री पटली की आकाश खरे बोलत आहे. ती त्याला म्हणाली, “त्याची काही एक गरज नाही. माझा तुझ्यावर विश्वास आहे. पूजाच्या बोलण्यामुळे तो थोडा हलला जरूर होता पण तुटणे शक्यच नाही. मला खात्री आहे तू मला कधीच धोका देणार नाहीस. मी फक्त तुझीच आहे आणि मरेपर्यंत तुझीच राहीन हे मी तुला वचन देते. पण मामांनी हे स्थळाचे जे मधेच काढले आहे त्याचे काय करायचे?”

“सध्या तू हो ला, हो कर. आपल्याला लगेच काही प्रॉब्लेम नकोय. योग्य वेळ आली की मामांना तू सगळे नीट समजावून सांग मग मी माझ्या आई बाबांना मध्यस्ती करायला सांगून आपल्या लग्नाचे बोलायला सांगेन. काळजी करू नकोस. सगळे व्यवस्थित होईल.” एवढे बोलून आकाशने नभाला घट्ट मिठीत घेतले आणि तिच्या ओठांवर एक गोड किस केले. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी नभाला बुलेट वरून समुद्रावर देण्याचे कबुल करून तो तिथून निघाला. आकाशचा आत्मा शेतघरात ठेवलेल्या आपल्या शरीरात शिरतो न शिरतो तोच त्याची गडी माणसे काम संपवून पगारासाठी त्याच्या शेतघरापाशी आली. सर्वांचा हिशेब पुर्ण करून पगार वाटप झाल्यावर दुसऱ्या दिवशीच्या कामाचे नियोजन करून आकाश रात्री उशीरा आपल्या घरी पोहोचला.

क्रमशः

- केदार कुबडे

अभिप्राय

  1. प्रत्युत्तरे
    1. जातबळी या भयकथेचा भाग ७ नुकताच प्रकाशित करण्यात आला आहे.
      जातबळी भाग ७ या दुव्यावर उपलब्ध आहे:
      https://www.marathimati.com/2018/07/jaatbali-part-7-marathi-katha.html

      हटवा
तुमची टिप्पणी आमच्यासाठी महत्त्वाची आहे!
तुमचा अभिप्राय / टिप्पणी ही आम्ही कसे कार्य करतो? त्यातील सुधारणांसाठी आणि आम्ही सातत्याने उच्च-गुणवत्तेची सेवा प्रदान करतोय की नाही हे समजून घेण्यासाठी आमच्यासाठी महत्वाची आहे.

नाव

अ रा कुलकर्णी,1,अ ल खाडे,2,अ ज्ञा पुराणिक,1,अंकित भास्कर,1,अंजली भाबट-जाधव,1,अंधश्रद्धेच्या कविता,5,अकोला,1,अजय दिवटे,1,अजित पाटणकर,18,अनंत दळवी,1,अनंत फंदी,1,अनंत भावे,1,अनिकेत येमेकर,2,अनिकेत शिंदे,1,अनिल गोसावी,2,अनिल भारती,1,अनिल वल्टे,8,अनुभव कथन,19,अनुरथ गोरे,1,अनुराधा पाटील,1,अनुराधा फाटक,39,अनुवादित कविता,1,अपर्णा तांबे,7,अब्राहम लिंकन,2,अभंग,6,अभिजित गायकवाड,1,अभिजीत टिळक,2,अभिव्यक्ती,1386,अभिषेक कातकडे,5,अभिषेक घुगे,1,अमन मुंजेकर,7,अमरश्री वाघ,2,अमरावती,1,अमित पडळकर,4,अमित पवार,1,अमित बाविस्कर,3,अमित सुतार,1,अमुक-धमुक,1,अमृत जोशी,1,अमृता शेठ,1,अमोल कोल्हे,1,अमोल तांबे,1,अमोल देशमुख,1,अमोल बारई,7,अमोल वाघमारे,1,अमोल सराफ,2,अरविंद जामखेडकर,1,अरविंद थगनारे,5,अरुण कोलटकर,1,अरुण म्हात्रे,1,अर्चना कुळकर्णी,1,अर्चना डुबल,2,अर्जुन फड,3,अर्थनीति,3,अल्केश जाधव,1,अविनाश धर्माधिकारी,2,अशोक थोरात,1,अशोक रानडे,1,अश्विनी तातेकर-देशपांडे,1,अश्विनी तासगांवकर,2,अस्मिता मेश्राम-काणेकर,7,अहमदनगर,1,अक्षय वाटवे,1,अक्षरमंच,1132,आईच्या कविता,29,आईस्क्रीम,3,आकाश पवार,2,आकाश भुरसे,8,आज,6,आजीच्या कविता,1,आठवणींच्या कविता,18,आतले-बाहेरचे,3,आतिश कविता लक्ष्मण,1,आत्मविश्वासाच्या कविता,15,आदर्श कामिरे,4,आदित्य कदम,1,आदेश ताजणे,8,आनंद दांदळे,8,आनंद प्रभु,1,आनंदाच्या कविता,26,आमट्या सार कढी,18,आर समीर,1,आरती गांगण,2,आरती शिंदे,4,आरत्या,82,आरोग्य,21,आशा गवाणकर,1,आशिष खरात-पाटील,1,आशिष चोले,1,इंदिरा गांधी,1,इंदिरा संत,6,इंद्रजित नाझरे,26,इंद्रजीत भालेराव,1,इतिहास,281,इलाही जमादार,1,इसापनीती कथा,48,उत्तम कोळगावकर,2,उदय दुदवडकर,1,उन्मेष इनामदार,1,उपवासाचे पदार्थ,15,उमा पाटील,1,उमेश कानतोडे,1,उमेश कुंभार,14,उमेश चौधरी,1,उस्मानाबाद,1,ऋग्वेदा विश्वासराव,5,ऋचा पिंपळसकर,10,ऋचा मुळे,18,ऋषिकेश शिरनाथ,2,ऋषीकेश कालोकार,2,ए श्री मोरवंचीकर,1,एच एन फडणीस,1,एप्रिल,30,एम व्ही नामजोशी,1,एहतेशाम देशमुख,2,ऐतिहासिक स्थळे,2,ऑक्टोबर,31,ऑगस्ट,31,ऑडिओ कविता,15,ऑडिओ बुक,1,ओंकार चिटणीस,1,ओम ढाके,8,ओमकार खापे,1,ओशो,1,औरंगाबाद,1,कपिल घोलप,12,करण विधाते,1,करमणूक,72,कर्क मुलांची नावे,1,कल्पना देसाई,1,कल्याण इनामदार,1,कविता शिंगोटे,1,कवितासंग्रह,280,कवी अनिल,1,कवी ग्रेस,4,कवी बी,1,काजल पवार,1,कार्यक्रम,12,कार्ल खंडाळावाला,1,कालिंदी कवी,2,काशिराम खरडे,1,कि का चौधरी,1,किरण कामंत,1,किल्ले,97,किल्ल्यांचे फोटो,5,किशोर चलाख,6,किशोर पवार,1,कुठेतरी-काहीतरी,3,कुणाल खाडे,3,कुणाल लोंढे,1,कुसुमाग्रज,9,कृष्णकेशव,1,कृष्णाच्या आरत्या,5,के के दाते,1,के तुषार,8,के नारखेडे,2,केदार कुबडे,40,केदार नामदास,1,केदार मेहेंदळे,1,केशव मेश्राम,1,केशवकुमार,2,केशवसुत,5,कोल्हापूर,1,कोशिंबीर सलाड रायते,14,कौशल इनामदार,1,खंडोबाची स्थाने,2,खंडोबाच्या आरत्या,2,खरगपूर,1,ग दि माडगूळकर,6,ग ल ठोकळ,3,ग ह पाटील,4,गंगाधर गाडगीळ,1,गझलसंग्रह,1,गडचिरोली,1,गणपतीच्या आरत्या,5,गणपतीच्या गोष्टी,24,गणेश कुडे,2,गणेश तरतरे,20,गणेश निदानकर,1,गणेश पाटील,1,गणेश भुसारी,1,गण्याचे विनोद,1,गाडगे बाबा,1,गायत्री सोनजे,5,गावाकडच्या कविता,14,गुरुदत्त पोतदार,2,गुरूच्या आरत्या,2,गुलझार काझी,1,गो कृ कान्हेरे,1,गो गं लिमये,1,गोकुळ कुंभार,13,गोड पदार्थ,55,गोपीनाथ,2,गोविंद,1,गोविंदाग्रज,1,गौतम जगताप,1,गौरांग पुणतांबेकर,1,घरचा वैद्य,2,घाट,1,चंद्रकांत जगावकर,1,चंद्रपूर,1,चटण्या,3,चातुर्य कथा,6,चित्रपट समीक्षा,1,चैतन्य म्हस्के,1,चैत्राली इंगळे,2,जयश्री चुरी,1,जयश्री मोहिते,1,जवाहरलाल नेहरू,1,जळगाव,1,जाई नाईक,1,जानेवारी,31,जालना,1,जितेश दळवी,1,जिल्हे,31,जीवनशैली,432,जुलै,31,जून,30,ज्योती किरतकुडवे,1,ज्योती मालुसरे,1,टीझर्स,1,ट्रेलर्स,3,ठाणे,2,डिसेंबर,31,डॉ मानसी राजाध्यक्ष,1,डॉ. दिलीप धैसास,1,तनवीर सिद्दिकी,1,तन्मय धसकट,1,तरुणाईच्या कविता,7,तिच्या कविता,63,तुकाराम गाथा,4,तुकाराम धांडे,1,तुतेश रिंगे,1,तेजश्री कांबळे-शिंदे,4,तेजस्विनी देसाई,1,दत्ता हलसगीकर,2,दत्ताच्या आरत्या,5,दत्तात्रय भोसले,1,दत्तो तुळजापूरकर,1,दया पवार,1,दर्शन जोशी,2,दर्शन शेळके,1,दशरथ मांझी,1,दादासाहेब गवते,1,दामोदर कारे,1,दिनदर्शिका,366,दिनविशेष,366,दिनेश बोकडे,1,दिनेश लव्हाळे,1,दिनेश हंचाटे,1,दिपक शिंदे,2,दिपाली गणोरे,1,दिवाळी फराळ,26,दीपा दामले,1,दीप्तीदेवेंद्र,1,दुःखाच्या कविता,76,दुर्गेश साठवणे,1,देवीच्या आरत्या,3,देशभक्तीपर कविता,3,धनंजय सायरे,1,धनराज बाविस्कर,71,धनश्री घाणेकर,1,धार्मिक स्थळे,1,धुळे,1,धोंडोपंत मानवतकर,12,नमिता प्रशांत,1,नलिनी तळपदे,1,ना के बेहेरे,1,ना घ देशपांडे,4,ना धों महानोर,3,ना वा टिळक,1,नांदेड,1,नागपूर,1,नारायण शुक्ल,1,नारायण सुर्वे,2,नाशिक,1,नासीर संदे,1,निखिल पवार,3,नितीन चंद्रकांत देसाई,1,निमित्त,4,निराकाराच्या कविता,16,निवडक,9,निसर्ग कविता,37,निसर्ग चाटे,2,निळू फुले,1,नृसिंहाच्या आरत्या,1,नोव्हेंबर,30,न्याहारी,50,पथ्यकर पदार्थ,2,पद्मा गोळे,4,परभणी,1,पराग काळुखे,1,पर्यटन स्थळे,1,पल्लवी माने,1,पवन कुसुंदल,2,पांडुरंग वाघमोडे,3,पाककला,322,पाककृती व्हिडिओ,15,पालकत्व,7,पावसाच्या कविता,40,पी के देवी,1,पु ल देशपांडे,9,पु शि रेगे,1,पुंडलिक आंबटकर,4,पुडिंग,10,पुणे,15,पुरुषोत्तम जोशी,1,पुरुषोत्तम पाटील,1,पुर्वा देसाई,2,पूजा काशिद,1,पूजा चव्हाण,1,पूनम राखेचा,1,पोस्टर्स,5,पोळी भाकरी,27,पौष्टिक पदार्थ,20,प्र श्री जाधव,12,प्रकाश पाटील,1,प्रजोत कुलकर्णी,1,प्रतिक बळी,1,प्रतिभा जोजारे,1,प्रतिमा इंगोले,1,प्रतिक्षा जोशी,1,प्रदिप कासुर्डे,1,प्रफुल्ल चिकेरूर,10,प्रभाकर महाजन,1,प्रभाकर लोंढे,3,प्रवास वर्णन,1,प्रवासाच्या कविता,11,प्रविण पावडे,15,प्रवीण दवणे,1,प्रवीण राणे,1,प्रशांतकुमार मोहिते,2,प्रसन्न घैसास,2,प्रज्ञा वझे,2,प्रज्ञा वझे-घारपुरे,10,प्राजक्ता गव्हाणे,1,प्रितफुल प्रित,1,प्रिती चव्हाण,27,प्रिया जोशी,1,प्रियांका न्यायाधीश,3,प्रेम कविता,97,प्रेरणादायी कविता,17,फ मुं शिंदे,3,फादर स्टीफन्स,1,फेब्रुवारी,29,फोटो गॅलरी,11,फ्रॉय निस्सेन,1,बहिणाबाई चौधरी,6,बा भ बोरकर,8,बा सी मर्ढेकर,6,बातम्या,11,बाबा आमटे,1,बाबाच्या कविता,10,बाबासाहेब आंबेड,1,बायकोच्या कविता,5,बालकविता,14,बालकवी,9,बाळाची मराठी नावे,1,बाळासाहेब गवाणी-पाटील,21,बिपीनचंद्र नेवे,1,बी अरुणाचलाम्‌,1,बी रघुनाथ,1,बीड,1,बुलढाणा,1,बेकिंग,9,बेहराम कॉन्ट्रॅक्टर,1,भंडारा,1,भक्ती कविता,23,भक्ती रावनंग,1,भरत माळी,2,भा दा पाळंदे,1,भा रा तांबे,7,भा वें शेट्टी,1,भाग्यवेध,1,भाज्या,29,भाताचे प्रकार,16,भानुदास,1,भानुदास धोत्रे,1,भावनांची वादळे,1,भुषण राऊत,1,भूगोल,1,भूमी जोशी,1,म म देशपांडे,1,मं वि राजाध्यक्ष,1,मंगला गोखले,1,मंगळागौरीच्या आरत्या,2,मंगेश कळसे,9,मंगेश पाडगांवकर,5,मंजुषा कुलकर्णी,2,मंदिरांचे फोटो,3,मंदिरे,4,मधल्या वेळेचे पदार्थ,41,मधुकर आरकडे,1,मधुकर जोशी,1,मधुसूदन कालेलकर,2,मनमोहन नातू,3,मनाचे श्लोक,205,मनिषा दिवेकर,3,मनिषा फलके,1,मनोज शिरसाठ,9,मराठी,1,मराठी उखाणे,2,मराठी कथा,107,मराठी कविता,1173,मराठी कवी,3,मराठी कोट्स,4,मराठी गझल,30,मराठी गाणी,2,मराठी गोष्टी,67,मराठी चारोळी,42,मराठी चित्रपट,19,मराठी टिव्ही,53,मराठी नाटक,1,मराठी पुस्तके,7,मराठी प्रेम कथा,23,मराठी भयकथा,44,मराठी मालिका,20,मराठी रहस्य कथा,2,मराठी लेख,48,मराठी विनोद,1,मराठी साहित्य,288,मराठी साहित्यिक,2,मराठी सुविचार,2,मराठीप्रेमी पालक महासंमेलन,5,मराठीमाती,145,मसाले,12,महात्मा गांधी,8,महात्मा फुले,1,महाराष्ट्र,307,महाराष्ट्र फोटो,11,महाराष्ट्राचा इतिहास,32,महाराष्ट्रीय पदार्थ,22,महालक्ष्मीच्या आरत्या,2,महेंद्र म्हस्के,1,महेश जाधव,3,महेश बिऱ्हाडे,9,मांसाहारी पदार्थ,17,माझं मत,4,माझा बालमित्र,88,मातीतले कोहिनूर,19,माधव ज्यूलियन,6,माधव मनोहर,1,माधवानुज,3,मानसी सुरज,1,मारुतीच्या आरत्या,2,मार्च,31,मिलिंद खांडवे,1,मीना तालीम,1,मुंबई,12,मुंबई उपनगर,1,मुकुंद भालेराव,1,मुकुंद शिंत्रे,35,मुक्ता चैतन्य,1,मुलांची नावे,1,मुलाखती,1,मे,31,मैत्रीच्या कविता,8,मोहिनी उत्तर्डे,2,यवतमाळ,1,यशपाल कांबळे,4,यशवंत दंडगव्हाळ,25,यादव सिंगनजुडे,2,योगा,1,योगेश कर्डिले,6,योगेश सोनवणे,2,रंगपंचमी,1,रंजना बाजी,1,रजनी जोगळेकर,5,रत्नागिरी,1,रविंद्र गाडबैल,1,रविकिरण पराडकर,1,रवींद्र भट,1,रा अ काळेले,1,रा देव,1,रागिनी पवार,1,राजकारण,2,राजकीय कविता,12,राजकुमार शिंगे,1,राजेंद्र भोईर,1,राजेश पोफारे,1,राजेश्वर टोणे,3,राम मोरे,1,रामकृष्ण जोशी,2,रामचंद्राच्या आरत्या,5,रायगड,1,राहुल अहिरे,3,रुपेश सावंत,1,रेश्मा जोशी,2,रेश्मा विशे,1,रोहित काळे,7,रोहित साठे,15,लघुपट,3,लता मंगेशकर,2,लहुजी साळवे,1,लक्ष्मण अहिरे,2,लक्ष्मीकांत तांबोळी,2,लातूर,1,लिलेश्वर खैरनार,2,लीना पांढरे,1,लीलावती भागवत,1,लोकमान्य टिळक,3,लोणची,9,वंदना विटणकर,2,वर्धा,1,वसंत बापट,12,वसंत साठे,1,वसंत सावंत,1,वा गो मायदेव,1,वा ना आंधळे,1,वा भा पाठक,2,वा रा कांत,3,वात्रटिका,2,वादळे झेलतांना,2,वामन निंबाळकर,1,वासुदेव कामथ,1,वाळवणाचे पदार्थ,6,वि दा सावरकर,3,वि भि कोलते,1,वि म कुलकर्णी,5,वि स खांडेकर,1,विंदा करंदीकर,8,विक्रम खराडे,1,विचारधन,215,विजय पाटील,1,विजया जहागीरदार,1,विजया वाड,2,विजया संगवई,1,विठ्ठल वाघ,3,विठ्ठलाच्या आरत्या,5,विद्या कुडवे,4,विद्या जगताप,2,विद्याधर करंदीकर,1,विनायक मुळम,1,विरह कविता,58,विराज काटदरे,1,विलास डोईफोडे,5,विवेक जोशी,3,विशाल शिंदे,1,विशेष,12,विष्णूच्या आरत्या,4,विज्ञान तंत्रज्ञान,2,वृषाली सुनगार-करपे,1,वेदांत कोकड,1,वैभव गव्हाळे,1,वैभव सकुंडे,1,वैशाली झोपे,1,वैशाली नलावडे,1,व्यंगचित्रे,17,व्रत-वैकल्ये,1,व्हिडिओ,13,शंकर रामाणी,1,शंकर विटणकर,1,शंकर वैद्य,1,शंकराच्या आरत्या,4,शरणकुमार लिंबाळे,1,शशांक रांगणेकर,1,शशिकांत शिंदे,1,शां शं रेगे,1,शांततेच्या कविता,9,शांता शेळके,11,शांताराम आठवले,1,शाम जोशी,1,शारदा सावंत,4,शाळेचा डबा,15,शाळेच्या कविता,11,शितल सरोदे,1,शिरीष पै,1,शिरीष महाशब्दे,8,शिल्पा इनामदार-आर्ते,1,शिवाजी महाराज,7,शिक्षकांवर कविता,4,शुभम बंबाळ,2,शुभम सुपने,2,शेतकर्‍याच्या कविता,14,शेती,1,शेषाद्री नाईक,1,शैलेश सोनार,1,श्याम खांबेकर,1,श्रद्धा नामजोशी,9,श्रावणातल्या कहाण्या,27,श्री दि इनामदार,1,श्री बा रानडे,1,श्रीकृष्ण पंडित,1,श्रीकृष्ण पोवळे,1,श्रीधर रानडे,2,श्रीधर शनवारे,1,श्रीनिवास खळे,1,श्रीपाद कोल्हटकर,1,श्रीरंग गोरे,1,श्रुती चव्हाण,1,संघर्षाच्या कविता,33,संजय उपाध्ये,1,संजय डोंगरे,1,संजय पाटील,1,संजय बनसोडे,2,संजय शिंदे,1,संजय शिवरकर,5,संजय सावंत,1,संजीवनी मराठे,3,संत एकनाथ,1,संत चोखामेळा,1,संत जनाबाई,1,संत तुकडोजी महाराज,2,संत तुकाराम,8,संत नामदेव,3,संत ज्ञानेश्वर,6,संतोष जळूकर,1,संतोष झोंड,1,संतोष सेलुकर,30,संदिप खुरुद,5,संदीपकुमार खुरुद,1,संदेश ढगे,39,संध्या भगत,1,संपादक मंडळ,1,संपादकीय,11,संपादकीय व्यंगचित्रे,2,संस्कार,2,संस्कृती,133,सई कौस्तुभ,1,सचिन पोटे,12,सचिन माळी,1,सण-उत्सव,22,सणासुदीचे पदार्थ,32,सतिश चौधरी,1,सतीश काळसेकर,1,सदानंद रेगे,2,सदाशिव गायकवाड,2,सदाशिव माळी,1,सनी आडेकर,10,सप्टेंबर,30,समर्थ रामदास,206,समर्पण,8,सरबते शीतपेये,8,सरयु दोशी,1,सरला देवधर,1,सरिता पदकी,3,सरोजिनी बाबर,1,सलीम रंगरेज,8,सविता कुंजिर,1,सांगली,1,सागर बनगर,1,सागर बाबानगर,1,सातारा,1,साने गुरुजी,5,सामाजिक कविता,113,सामान्य ज्ञान,8,सायली कुलकर्णी,7,साहित्य सेतू,1,साक्षी खडकीकर,9,साक्षी यादव,1,सिंधुदुर्ग,1,सिद्धी भालेराव,1,सिमा लिंगायत-कुलकर्णी,3,सुदेश इंगळे,24,सुधाकर राठोड,1,सुनिल नागवे,1,सुनिल नेटके,1,सुनील गाडगीळ,1,सुभाष कटकदौंड,2,सुमती इनामदार,1,सुमित्र माडगूळकर,1,सुरज दळवी,1,सुरज दुतोंडे,1,सुरज पवार,1,सुरेश भट,2,सुरेश सावंत,2,सुशील दळवी,1,सुशीला मराठे,1,सुहास बोकरे,6,सैनिकांच्या कविता,4,सैरसपाटा,128,सोपानदेव चौधरी,1,सोमकांत दडमल,1,सोलापूर,1,सौरभ सावंत,1,स्तोत्रे,2,स्नेहा कुंभार,1,स्फुटलेखन,4,स्फूर्ती गीत,1,स्माईल गेडाम,4,स्वप्ना पाटकर,1,स्वप्नाली अभंग,5,स्वप्नील जांभळे,2,स्वाती काळे,1,स्वाती खंदारे,320,स्वाती गच्चे,1,स्वाती दळवी,9,स्वाती नामजोशी,31,स्वाती पाटील,1,स्वाती वक्ते,2,ह मुलांची नावे,1,हमार्टिक समा,1,हरितालिकेच्या आरत्या,1,हर्षद खंदारे,42,हर्षद माने,1,हर्षदा जोशी,3,हर्षवर्धन घाटे,2,हर्षाली कर्वे,2,हसनैन आकिब,3,हितेशकुमार ठाकूर,1,हिरवळ,1,हेमंत जोगळेकर,1,हेमंत देसाई,1,हेमंत सावळे,1,हेमा चिटगोपकर,8,होळी,5,ज्ञानदा आसोलकर,1,ज्ञानदेवाच्या आरत्या,2,marathimati,1,
ltr
item
मराठीमाती । माझ्या मातीचे गायन: जातबळी भाग ६ - मराठी भयकथा
जातबळी भाग ६ - मराठी भयकथा
जातबळी भाग ६, मराठी कथा - [Jaatbali Part 6, Marathi Katha] आकाश आणि नभाच्या निर्व्याज्य प्रेमाची जीवाला चटका लावून जाणारी कहाणी म्हणजेच जातबळी.
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgAMKB0M_SVl1eCjj67en7FDJG14PDxtgcZv_yMlRH8tVTTY6rhG5AmqiwwdVa4fqz8uG8NmKSeoeFAPTm3rB_G4LVuFQ-StjajK30zBdJ4hdDi9ndF_EEiI2rSkMsjF57a_B-bJcjx_ZpZ/s1600/jaatbali-part-6-marathi-katha.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgAMKB0M_SVl1eCjj67en7FDJG14PDxtgcZv_yMlRH8tVTTY6rhG5AmqiwwdVa4fqz8uG8NmKSeoeFAPTm3rB_G4LVuFQ-StjajK30zBdJ4hdDi9ndF_EEiI2rSkMsjF57a_B-bJcjx_ZpZ/s72-c/jaatbali-part-6-marathi-katha.jpg
मराठीमाती । माझ्या मातीचे गायन
https://www.marathimati.com/2018/07/jaatbali-part-6-marathi-katha.html
https://www.marathimati.com/
https://www.marathimati.com/
https://www.marathimati.com/2018/07/jaatbali-part-6-marathi-katha.html
true
2079427118266147504
UTF-8
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची