Loading ...
/* Dont copy */

जातबळी भाग १ - मराठी भयकथा

जातबळी भाग १, मराठी कथा [Jaatbali Part 1, Marathi Katha] - आकाश आणि नभाच्या निर्व्याज्य प्रेमाची जीवाला चटका लावून जाणारी कहाणी म्हणजेच जातबळी.

जातबळी भाग १ - मराठी कथा | Jaatbali Part 1 - Marathi Katha

आकाश आणि नभाच्या निर्व्याज्य प्रेमाची जीवाला चटका लावून जाणारी कहाणी

वयात आल्यावर प्रत्येक जण कोणा ना कोणाच्या प्रेमात पडतो. कोणाचे प्रेम सफल होते तर कोणाचे असफल. आकाश नावाचा एक तरुण परजातीतील नभाच्या प्रेमात पडतो. तिच्यासाठी सर्वसामान्य माणुस कल्पना पण करू शकणार नाही अशा अचाट गोष्टी करतो. त्या दोघांच्या निर्व्याज्य प्रेमाची जीवाला चटका लावून जाणारी कहाणी म्हणजेच जातबळी.

दहावीला ७०.४२% टक्के गुण मिळाल्यामुळे ‘आकाश साळवीचा’ ‘गोगटे कॉलेजमध्ये’ विज्ञान विभागात प्रवेश घेण्याचा मार्ग सुकर झाला. प्रवेश प्रक्रियेचे सोपस्कार पुर्ण झाल्यावर कॉलेजच्या पहिल्या दिवशी थोडासा बावरलेला आकाश, त्याच्या सारख्याच १२० मुलामुलींनी खचाखच भरलेल्या अकरावी ‘क’ च्या मोठ्या वर्गात दाखल झाला. शाळेत सोबत असलेला एकही ओळखीचा चेहरा संपुर्ण वर्गात न दिसल्यामुळे बिचारा हिरमुसला होता.

एवढ्यात एक प्राध्यापक डायसवर आले त्यांनी सर्वांना एक एक करून त्यांची नावे, शाळा, मिळालेले गुण वगैरे विचारायला सुरवात केली. मुले पण क्रमाक्रमाने आपापली माहिती सांगु लागली. सगळे काही शिस्तीत सुरु असताना अचानक वर्गात एक वयस्क व्यक्ती आली. त्यांना पाहताच डायस वर उभे असलेले प्राध्यापक वर्गाला असलेल्या मोठ्या खिडकीतून चक्क पळून गेले.

सगळी मुले गोंधळून गेली. नक्की झाले तरी काय ? प्राध्यापक असे खिडकीतून पळाले का ? नंतर समजले की ती व्यक्ती प्राध्यापक नव्हतीच मुळी; तो तर एम. एस. सी अखेरच्या वर्षाला असलेला एक वरिष्ठ विद्यार्थी होता. महाविद्यालयाच्या पहिल्याच दिवशी आपली शाळा झाल्याचे लक्षात येताच सगळेच ओशाळले. पहिलाच दिवस असल्यामुळे फार काही शिकवले गेले नाही. मुलांना ६ वाजे ऐवजी ४ वाजताच सुटी देण्यात आली.
[next]
दुसऱ्या दिवसापासून कंटाळवाणे लेक्चर्स आणि प्रॅक्टिकल्सना सुरवात झाली. एक एक दिवस सरत होता पण आकाशचे लक्ष अभ्यासात लागायची चिन्हे काही दिसेनात. शाळेतून महाविद्यालयामध्ये येणाऱ्या प्रत्येकासारखीच त्याच्याही मनावर हिंदी सिनेमाची भुरळ पडलेली होतीच. सिनेमात पाहिलेले कलरफुल महाविद्यालय आणि वास्तवातील महाविद्यालय यांच्यातील प्रचंड तफावत पचवणे इतरांप्रमाणेच त्यालाही खुप जड गेले.

कॉलेजमध्ये गेल्यावर आपल्याला पण एखादी सुंदर मुलगी पटेल, मग आपण तिला घेऊन बाईकवर फिरायला जाऊ. मस्त रोमान्स करू या त्याच्या फिल्मी कल्पना, कॉलेजच्या रटाळ वातावरणात कुठे विरून गेल्या ते त्याचे त्यालाच कळले नाही. असे नाही की वर्गात सुंदर मुली नव्हत्या, पण कोणाशी मैत्री करणे तर दूर साधे बोलायचे धाडस पण त्याला व्हायचे नाही. मग एखादीला प्रपोज करणे तर खुप दूर राहीले. शाळेत असतानाही त्याची तीच परिस्थिती होती.
त्याच्या चुझी स्वभावामुळे त्याचे मित्रही मोजकेच होते. जे काही मित्र मिळाले ते सायन्सला असल्यामुळे अभ्यास एके अभ्यासवाले होते. त्यामुळे मित्रांबरोबर लेक्चर्स बंक करून सिनेमाला जाणे, समुद्रावर फिरायला जाणे, पोहायला जाणे, कट्ट्यावर बसून मुलींना न्याहाळणे, कॉमेंट्स करणे वगैरे काही त्याच्या नशीबात आले नाही. मुळात चंचल असलेला आकाश त्या सर्व परिस्थितीने अगदी मेटाकुटीला आला. कॉलेजला जाणे त्याला संकट वाटू लागले.

रंगाने गव्हाळ, ५ फूट ११ इंचाची मस्त उंची, योग्य डाएट आणि नियमित व्यायामाने कमावलेले मजबूत शरीर असलेला आकाश, कॉलेजमधील एन. सी. सी युनिटच्या ऑफिसर्सच्या नजरेतून सुटणे जवळ जवळ अशक्यच होते. त्याला नेव्हल एन. सी. सी मध्ये जबरदस्तीने भरती करून घेतले गेले. मग काय! पठ्ठ्याचा प्रत्येक रविवार, सकाळी ७ वाजल्यापासून दुपारी २ वाजेपर्यंत कॉलेजच्या परेड ग्राउंडवर उन्हात प्रॅक्टिस करण्यात जाऊ लागला.
[next]
कॉलेजपासून काही किलोमीटरवर असलेल्या खाडीमध्ये पुलिंग-सेलिंगच्या प्रॅक्टिसमुळे त्याच्या अंगातील रग चांगलीच जिरत होती. हळूहळू त्याला त्याच्यात इंटरेस्ट वाटू लागला. आपण इंडियन नेव्हीमध्ये जावे असे त्याला वाटू लागले. त्याला त्याच्या वडीलांसारखाच गोड गळा लाभला होता. फावल्या वेळात मित्रमंडळींमध्ये, गेट टुगेदर मध्ये, कॉलेजच्या सांस्कृतिक कार्यक्रमात, एन.सी.सीच्या कॅम्पमध्ये त्याचे गाणे हे अगदी मस्ट असायचे.

त्याचे प्रभावी व्यक्तिमत्व, सुरेल आवाज, आत्मविश्वास आणि सर्वांच्या मदतीला धावून जाण्याची वृत्ती यामुळे थोड्याच काळात तो कॉलेजमध्ये पॉप्युलर झाला. एन.सी.सी चे कमांडिंग ऑफिसर पण त्याला नावाने ओळखु लागले होते. नेव्हीच्या पांढऱ्या शुभ्र युनिफॉर्ममध्ये तो एकदम रुबाबदार दिसायचा. पण एवढे असुनही बिचाऱ्याच्या भकास आयुष्यात हिरवळ फुलवणारी एखादी गोड परी, यायचे लक्षण काही दिसेना.

आपल्या दिसण्याबद्दल त्याच्या मनात न्युनगंड तयार होऊ लागला. त्यामुळेच की काय तो मुलींना टाळू लागला. प्रॅक्टिकल्सना पण तो ग्रुप मधील मुलांशी तेवढेच बोलायचा. प्रत्येक प्रॅक्टिकल नंतर त्याचे जर्नल, वेळच्या वेळी पुर्ण असायचे. त्यातील चित्रे खुप सुबक असायची त्यामुळे त्याच्या जर्नलची कॉपी करण्यासाठी नंबर लागायचे पण थेअरी मध्ये मात्र तो मागे पडत होता. शेवटी परीक्षेमध्ये मॅथ्सला लाल शाई लागलीच. ३ मार्कांनी प्रमोट करून त्याला बारावीला प्रवेश देण्यात आला.
अशा तऱ्हेने आपल्या कथेचा नायक ‘बारावी’ नावाच्या महाभयानक आणि टेन्शनवाल्या वर्षात प्रवेश करता झाला. बारावी महत्वाचे वर्ष असल्यामुळे एन. सी. सी ला थोडी बगल देऊन आकाशने अभ्यासावर लक्ष केंद्रित करायचे ठरवले. त्याचे दहावी पर्यंतचे सर्व शिक्षण मराठी मिडीयममध्ये झाले होते. सुरवातीपासूनच त्याला इंग्लिश विषयाची खुप आवड होती पण शाळेत इंग्लिश हा एकच विषय इंग्रजीमध्ये होता. आता कॉलेजला आल्यावर भाषा सोडल्या तर बाकी सर्वच विषय इंग्रजी भाषेतून होते. इतर मुलांसारखेच त्याला मराठीत शिकलेल्या गोष्टी इंग्रजीमध्ये लिंक करणे थोडे जड जात होते.[next]अलजेब्रा, जीओमेट्री, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, संस्कृत, मराठी, इंग्रजी अशा विषयांचा अभ्यास करता करता आकाशच्या तोंडाला फेस आला होता. त्यात जोडीला प्रॅक्टिकल्स, असाइनमेंट्स आणि शिवाय घरचीही कामे होतीच. कशी बशी बारावीची परीक्षा पार पडली आणि पास व्हायची पण अपेक्षा नसलेला आकाश ४३.१७% गुण मिळवून पास झाला. घोडं गंगेत न्हालं एकदाचं! पण ४३ टक्क्यांना विचारतो कोण?

मेडिकल, इंजिनीअरिंग, पॉलिटेक्निक, फिशरीज कशातच त्याला रस नव्हता आणि तसेही ऍडमिशन मिळणे एकंदर कठीणच होते म्हणा! मग काहीच पर्याय नसल्यामुळे बारावी नंतर ग्रॅज्युएशनचा सरधोपट मार्ग त्यानेही स्विकारला आणि हीच त्याची मोठी चुक ठरली. एकतर फिजिक्स आणि मॅथ्सशी त्याचा ३६ चा आकडा आणि बायोलॉजीला फारसा स्कोप नसल्यामुळे त्याने केमिस्ट्रीला ऍडमिशन घेतली. ऑरगॅनिक केमिस्ट्री, फिजिकल केमिस्ट्री, इनऑरगॅनिक केमिस्ट्री आणि इंडस्ट्रियल केमिस्ट्री अशा सगळ्यांनी मिळून आकाशची पुरती वाट लावली.

बारावीला सोडलेली एन. सी. सी त्याने एफ वाय बी. एस. सी ला परत जॉईन केली. पुन्हा परेड, सेलिंग, पुलिंगची प्रॅक्टिस सुरु झाली. आधी कॅडेट असलेला आकाश आता लिडिंग कॅडेट झाला होता. एन. सी. सी तील ‘बी सर्ट’ एक्झाम त्याने पास केली. त्याच्या चांगल्या परफॉर्मन्समुळे लवकरच त्याला पी. ओ कॅडेट या रँक वर बढती देण्यात आली.

या सर्वात अभ्यासाकडे दुर्लक्ष झाल्यामुळे आकाशला पहिल्याच वर्षात ए. टी. के. टी लागली, पण दुसऱ्या वर्षात त्याला प्रवेश मिळाला. दुसऱ्या वर्षी खुप मेहनत घेऊन आकाशने पहिल्या वर्षाची ए. टी. के. टी सोडवली. एन. सी. सी तील कठीण अशी ‘सी सर्ट’ एक्झामही त्याने पहिल्या प्रयत्नात पास केली. त्याचे खुप कौतुक झाले पण तशी प्रगती त्याला आपल्या एस. वाय बी. एस. सी च्या अभ्यासात दाखवता आली नाही.
[next]
परीक्षा जवळ आल्यावर तो लायब्ररीत जाऊन बसू लागला पण पंधरा मिनिटांच्यावर त्याचे लक्ष पुस्तकात लागेल तर शप्पथ. नजर पुस्तकात पण त्याचे मन मात्र भलतीकडेच विहरत असायचे. अभ्यासाचा सर्व हुरूप मावळलेला हा कॉलेज कुमार, मग अभ्यासाच्या नावावर हॉस्टेलवर जाऊन मित्रांबरोबर टाईमपास करू लागला. समुद्रावर, थिबा पॉंईंटवर, भाट्यातील सुरुबनामध्ये, टायटॅनिक पॉइंटवर, तर कधी पावस, गणपती पुळ्याला मित्रांसोबत बाईकवर फिरायला जाऊ लागला. शेवटी व्हायचे तेच झाले.

सेकंड ईयरला परत ए. टी. के. टी लागली. आकाशने उदास मनाने आता थर्ड ईयरला प्रवेश घेतला. घरातून वडीलांच्या रोजच्या शिव्या बसत होत्याच पण परिस्थिती मात्र जैसे थेच होती. अकरावीला एन. सी. सी चे फर्स्ट ईयर, एफ वाय ला सेकंड ईअर आणि एस वाय ला थर्ड ईअर पुर्ण झाल्यामुळे आता एन. सी. सी चे निमित्त देता येणार नव्हते. अभ्यास तर करावा लागणारच होता. पुन्हा लेक्चर्स आणि प्रॅक्टिकल्स सुरु झाली. परीक्षेला बसण्यासाठी वर्गात ८५% हजर असणे आवश्यक असल्यामुळे शरीराने तो वर्गात असायचा पण त्याचे मन मात्र भरकटत असायचे.

आपले भवितव्य एकंदरीत अंधारमय दिसत असताना आकाशला कल्पनाही नव्हती की त्याच्या रटाळ आयुष्यात असेही काही घडणार आहे. एके दिवशी प्रॅक्टिकलच्या सरांना एच. ओ. डी नी काही महत्वाचे काम सांगितल्यामुळे त्या दिवशीचे प्रॅक्टिकल कॅन्सल झाले आणि इंडस्ट्रियल केमिस्ट्रीच्या पुऱ्या १६ जणांच्या बॅचने नाचण्याच्या तळ्यावर पोहायला जाण्याचे ठरवले. आकाश, राहुलची वाट पाहत पार्किंगमध्ये टाईमपास करत होता. इतक्यात त्याची नजर बारावी कॉमर्सच्या वर्गाच्या खिडकीतून आत गेली. बेंचवर एक गोड मुलगी आपल्या मैत्रिणीसोबत बसली होती. आकाश तिच्याकडे पाहातच राहीला.

गोरा रंग, सुंदर प्रमाणबद्ध चेहरा, नितळ त्वचा, मोगऱ्याच्या कळ्यांसारखे दात, नाजुक जिवणी, गुलाबाच्या पाकळ्यांसारखे गुलाबी ओठ, काळेभोर डोळे आणि गालांना चोरटा स्पर्श करणारे तिचे मऊशार तलम केस त्याला वेडावून गेले. तिच्या आरसपानी सौंदर्याने पुरता घायाळ झालेल्या आकाशला, इतक्या दिवसात ही आपल्याला दिसली कशी नाही? नवीन ऍडमिशन तर नाही? असे प्रश्न पडू लागले. आपल्या नाजुक लांबसडक बोटांनी पेनासोबत चाळा करणाऱ्या त्या मुलीची नजर तिच्याकडे अनिमिष नेत्रांनी पाहत असलेल्या आकाशकडे गेली.
[next]
प्रथम तिने दुर्लक्ष केले पण आकाशच्या तिच्याकडे एकटक पाहण्याने ती पुरती डिस्टर्ब् झाली होती. तिचे वर्गात लक्ष नाही हे पाहून सरांनी तिला ओरडताच आकाश भानावर आला. आपल्यामुळे एका सुंदर मुलीला ओरडा खावा लागला याचे त्याला वाईट वाटले. एवढ्यात राहुल आणि त्याचे इतर मित्र तिथे आल्यामुळे त्याला तिथुन निघावे लागले. ती मुलगी प्रयत्नपुर्वक लेक्चरमध्ये लक्ष देत होती. आकाश जाताना तिच्याकडे वळुन वळुन पाहत होता. तिने एकदा तरी त्याच्याकडे पाहावे म्हणुन तो मनातल्या मनात देवाची विनवणी करत होता.

अखेर त्याची प्रार्थना फळाला आली. त्या मुलीने त्याच्याकडे चोरटा कटाक्ष टाकला. येऽऽऽस! म्हणत त्याने आपला आनंद व्यक्त केला. हे पाहून ती मुलगी खुद्कन हसली पण लगेच तिने स्वतःला सावरले आणि लेक्चरमध्ये लक्ष देऊ लागली. चेहऱ्यावर एक गोड हसू मिरवत रोजच्या प्रमाणे सिक्युरिटी गार्डच्या हातावर टाळी देत तो कॉलेजच्या गेटमधुन बाहेर पडला. तळ्यावर पोहोचताच आकाश सोडून सर्वांनी आपले कपडे काढले आणि पाण्यात शिरले.

सर्वजण पाण्यात मस्ती करत होते. कोणी सूर मारत होते, कोणी डुंबत होते, तर कोणी पाण्यात पकडा पकडी खेळत होते. पण आकाशचे चित्त थाऱ्यावर कुठे होते? त्याच्या डोळ्यासमोर केवळ त्या मुलीचा चेहरा तरळत होता. राहुलने त्याला विचारलेही, “काय रे! लक्ष कुठाय तुझे? मगासपासून पाहतोय कुठे तरी हरवलायस. पाण्यात उतरणार आहेस की नाही? चल लवकर पोहायला.” मग आकाशचा हात धरून त्याला बळे बळेच पाण्यात ओढले.

नंतर पोहणे आटपल्यावर सर्वजण आपापल्या घरी गेले. घरी पोहोचल्यावर देखील आकाशची तिच अवस्था होती. तो केवळ शुन्यात नजर लावून बसला होता. त्या मुलीचा विचार त्याच्या मनातुन जायचे नावचं घेईना. रात्री कसेबसे दोन घास खाऊन तो आपल्या खोलीत गेला. बेडवर पडून तो वर गरगरणाऱ्या पंख्याकडे एकटक पाहत होता. त्या पंख्यातही त्याला तिचाच चेहरा दिसत होता. पापण्या न लवता बराच वेळ एकटक पाहिल्यामुळे वाऱ्याने त्याचे डोळे झोंबायला लागले तेव्हा कुठे त्याने डोळे मिटले. रात्रभर त्याला झोप अशी लागलीच नाही.
[next]
कधी एकदा कॉलेजला जातोय आणि तिला पाहतोय असे त्याला झाले होते. लव्ह ऍट फर्स्ट साईट त्याने ऐकले होते, पण आज पहिल्यांदा तो ते स्वतः अनुभवत होता. कॉलेजला गेल्यावर पार्किंगमध्ये आपली बाईक पार्क केल्यावर त्याची नजर त्या मुलीला शोधू लागली. सुदैवाने ती वर्गातच होती. लेक्चर अजुन सुरु व्हायचे होते त्यामुळे ती आणि तिच्या मैत्रिणी बेंचवर बसुन गप्पा मारत होत्या. एवढ्यात त्या मुलीच्या मैत्रिणीचे लक्ष आकाशकडे गेले आणि तिने तिला खिडकी बाहेर पाहण्यास खुणावले.

तिला पार्किंगमध्ये उभा असलेला आकाश दिसला आणि तिच्या कपाळावर आठ्या पसरल्या. त्याच्यामुळे काल तिला सरांचा ओरडा खावा लागला होता. तिने त्याच्याकडे रागाने पाहिले. आपली चुक लक्षात येताच आकाशने नकळत आपल्या हातांनी दोन्ही कानांच्या पाळ्या धरल्या आणि डोळे बारीक करून चेहरा कसानुसा करत तिथुनच तिला सॉरी म्हटले. त्याच्या त्या कृतीमुळे तिला खुद्कन हसू आले. ती आपल्यावर रागावलेली नाही हे पाहून आकाशच्या पण चेहऱ्यावर एक मस्त स्माईल आली.

तिला त्याची चेष्टा करायची लहर आली. तिने रागावल्याचे नाटक करत त्याला खुणेनेच उठाबशा काढण्यास सांगितले. आता मात्र आकाशची परिस्थिती बिकट झाली. आता सर्वांसमोर उठाबशा काढायच्या म्हणजे इज्जतीचा फालुदाच की! इकडे तिकडे पाहत त्याने हळूच कान पकडत उभ्या उभ्याच चार पाच मिनी उठाबशा काढल्या आणि अंग मोकळे केल्यासारखे केले. जेणे करून कोणाच्या काही लक्षात यायला नको. त्याची ती अवस्था पाहून ती खो खो करून हसत सुटली.

आकाश तिच्या हसण्याने पार विरघळून गेला. एवढ्यात घंटा वाजली आणि शिक्षक वर्गात आले त्याबरोबर त्या छोट्याश्या प्रेम कथेने तिथेच स्वल्पविराम घेतला. आकाशही आपल्या वर्गात गेला. मधल्या सुट्टीत आकाश पार्किंगमध्ये परत आला. पुन्हा दोघे नजरेनेच एकमेकांशी बोलू लागले. जणू आता शब्दांची त्यांना गरजच वाटत होती. हा त्यांचा नजरेचा खेळ बरेच दिवस सुरु होता. मधल्या सुट्टीत आकाश पार्किंगमध्ये दिसला नाही तर ती मुलगी बेचैन व्हायची.
[next]
तिचे लेक्चरमध्ये लक्षच लागायचे नाही आणि आकाश तर आधीच तिच्या प्रेमात आकंठ बुडाला होता त्यामुळे त्याचीही अवस्था याहून वेगळी नव्हती. तिला पण आपण आवडू लागलो आहोत याची जाणीव त्याला एव्हाना झाली होती. आता आकाशचा धीर चेपला होता. त्या मुलीच्या वर्गातील काही मुले एन.सी.सी मध्ये त्याला ज्युनियर होती त्यांच्याकडून त्याने तिची माहिती मिळवली. तिचे नाव रश्मी सावंत असल्याचे त्याला समजले. रश्मीचा कोणी बॉय फ्रेंड नसल्याचे कळल्यावर, त्याला फार हायसे वाटले.

आता त्याला तिला पटवण्यासाठी कोणाशी कॉम्पिटिशन करावी लागणार नव्हती, त्यामुळे त्याचे काम थोडे सोपे झाले होते. एके दिवशी आकाश नेहेमी प्रमाणे पार्किंग मध्ये उभा होता. रश्मी वर्गातच होती. तिच्या मैत्रिणीने तिला दोन चार वेळा खुणावलेले आकाशने पहिले पण रश्मीने त्याच्याकडे मुळीच लक्ष दिले नाही. एकदा चुकून नजरा नजर झाली तर तिने नाक मुरडत तोंड फिरवले. आकाशला समजेना की रश्मीला अचानक झाले तरी काय? त्याने वेळ न घालवता रश्मीला प्रपोज करायचे ठरवले.

कॉलेज सुटल्यावर तो पार्किंगमध्ये रश्मीच्या गाडीजवळ तिची वाट पाहत बसला होता. इतके दिवस दुरून बिनधास्तपणे न्याहाळणारी रश्मी, आज आकाशला समोर पाहून सोबत दोन मैत्रिणी असुनही बावरली होती. तिच्या मैत्रिणी तिच्यापासून दूर जाऊ लागल्या तशी ती घाबरली. त्यांचे हात धरून त्यांना आपल्याकडे ओढू लागली, त्यांना सोबत थांबण्यास सांगु लागली. पण आकाशला रश्मीला प्रपोज करायचे आहे हे लक्षात आल्यामुळे त्यांनी तिला आकाशच्या दिशेने ढकलले आणि दूर जाऊन उभ्या राहिल्या.

गाडी पार्किंगमध्येच असल्यामुळे रश्मीचा नाईलाज झाला व ती आकाशच्या दिशेने जाऊ लागली. आधी तिची भीतीने गाळण उडालेली पाहून गालात हसणारा आकाश सुद्धा आता थोडा नर्वस झाला होता. ती त्याच्यासमोर जाऊन खाल मानेने उभी राहिली. काही क्षण कोणीच काही बोलले नाही. आकाश काही बोलत नाही हे पाहून तिने सॅक मधुन आपल्या गाडीची चावी काढली आणि गाडीकडे जाऊ लागली. तिला निघालेली पाहताच आकाश म्हणाला, "रश्मी, एक मिनिट. मला तुझ्याशी थोडं बोलायचे होते." त्याबरोबर रश्मी तिथेच थांबली.
[next]
तो आता काय बोलतो याकडे तिचे कान लागले होते. हातातील चावीशी चाळा करत ती तिथेच खाल मानेने उभी होती. “रश्मी, हाय! मी आकाश. थर्ड ईयर बी.एस.सी ला आहे. मला तू खुप आवडतेस, तुला पहिल्यांदा जेव्हा पाहिले त्याच क्षणाला मी तुझ्या प्रेमात पडलो. तुझ्याशिवाय मला दुसरे काहीच सुचत नाही. सगळीकडे केवळ तूच दिसतेस. कशातही लक्ष लागत नाही, सतत तुझाच विचार मनात असतो. तू आयुष्यभरासाठी माझी साथ देशील?” एका दमात आकाश बोलून गेला. क्षणभर रश्मी काहीच बोलली नाही. नंतर तिने मान वर केली आणि म्हणाली, “मला घरी जायला उशीर होतोय. मी तुला नंतर सांगेन.”

“नंतर कधी?” आकाशचा आतुरलेला स्वर. “उद्या.” असे म्हणुन रश्मीने आपली गाडी स्टार्ट केली आणि तिथुन निघून गेली. ती होय म्हणणार याची आकाशला खात्री होती त्यामुळे तो खुप खुश झाला होता. "येऽऽऽस!" तो आनंदाने जवळ जवळ ओरडलाच. नंतर गाडीला किक मारून तोही घरी निघाला. प्रचंड टेन्शन, उत्सुकता आणि आनंदाच्या भरात हा सर्व प्रकार काहीजण दुरून पाहत आहेत याकडे त्याचे लक्षच गेले नाही. घरी पोहोचल्यावर त्याच्या लक्षात आले की दुसऱ्या दिवशी रविवार होता. “शिट यार! रश्मीने मस्त येडा बनवला आपल्याला. आता सोमवारीच तिची भेट होईल. बसा आता तडफडत!” तो मनातल्या मनात चरफडला.

सोमवारी आकाश वेळेआधीच कॉलेजला पोहोचला, पार्किंगमध्ये गाडी लावल्यावर त्याने रश्मीच्या वर्गाकडे पाहिले, तिथे ती न दिसल्यामुळे त्याचे डोळे तिला कॉलेजमध्ये शोधू लागले. रश्मी कुठेच न आढळल्यामुळे त्याच्या डोक्यात शंकांचे रान उठले. तिचा नकार तर नसेल? तिची तब्येत तर ठीक असेल ना? तिच्या घरी तर कळले नसेल? अशा एक ना अनेक शंका त्याच्या मनात तांडव करू लागल्या. एवढ्यात त्याच्याच वर्गातील राकेशच्या बाईकवर मागे बसुन गेटमधून आत शिरणारी रश्मी त्याला दिसली.
[next]
ते पाहून आकाशच्या पायाखालची जमीनच सरकली. राकेशने विजयी मुद्रेने त्याच्याकडे पाहत, त्याच्यासमोरच गाडी पार्क केली आणि रश्मी आकाशची नजर चोरत वर्गाकडे पळाली. आकाश काय समजायचे ते समजला. केवळ एका दिवसात त्याचे नशीब फिरले होते पण कसे? ते मात्र त्याच्या लक्षात येत नव्हते. वर्गात तो सुन्न झाल्यासारखा बसला होता. आपण रश्मीला कसे प्रपोज केले, ती कसे हो म्हणाली याचे वर्णन, तिखट मीठ लावून आकाशला ऐकू जाईल अशा आवाजात राकेश सर्वाना सांगत होता. त्याचे मित्र पण त्याला आणखीन चढवत होते.

ते सगळे ऐकून आकाशच्या काळजाला काय वेदना होत होत्या, हे तोच जाणे. इतक्या वर्षाच्या प्रतीक्षेनंतर एक मुलगी त्याच्या आयुष्यात येत होती तिलाही त्या राकेशने त्याच्यापासून हिरावून नेले होते हे तो सहन करू शकला नाही. हा प्रकार पाहत असलेला योगेश समजुन चुकला की आता काहीतरी आक्रित घडणार, त्यामुळे तो लगेचच आकाश जवळ आला. रागाने आकाशच्या मुठी आवळल्या जात होत्या. राकेशचे थोबाड फोडायला तो उठणार एवढ्यात योगेशने त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि आकाशच्या कानात पुटपुटला.

“आत्ता नाही. यासाठी ही वेळ योग्य नाही. तुला बरेच काही सांगायचे आहे. तुझ्या विरुद्ध काय कारस्थान शिजले याची तुला काहीच माहिती नाही. सर येत आहेत. लेक्चर संपल्यावर आपण समुद्रावर जाऊ, तिथे तुला सर्व काही सांगतो मग तुच ठरव काय करायचे ते!” आपला राग गिळून आकाश लेक्चर संपायची वाट पाहत बसला. समुद्रावर पोहोचल्यावर योगेशने मोठा सुस्कारा सोडला आणि आकाशला सर्व काही सांगायला सुरवात केली.

“त्या दिवशी आपले प्रॅक्टिकल कॅन्सल झाले होते आठवतंय? पार्किंगमध्ये तू रश्मीकडे पाहात बसला होतास. राकेश आणि त्याच्या मित्रांनी ते पाहिले होते. नंतर ते तुझ्यावर वॉच ठेऊन होते. तुझे रश्मीशी चाललेले मुक संभाषण त्यांनी पाहिले होते. तु जेव्हा रश्मीच्या मागुन तिच्या घरापर्यंत गेला होतास तेव्हा पण ते तुझ्या मागेच होते. तु रश्मीच्या विचारात एवढा गुंग झाला होतास की आजू बाजूला काय चालू आहे याचे तुला भानच नव्हते.”
[next]
तु रश्मीला प्रपोज करण्याआधीच राकेशने आपल्याच वर्गातील पूजाची मदत घेतली. पूजाने रश्मीशी ओळख करून घेतली. रश्मीच्या नजरेत तुला व्हिलन आणि राकेशला हिरो बनवले. तु एक फालतू मुलगा आहेस, कित्येक मुलींचा गैरफायदा उचलला आहेस आणि जर का रश्मी तुझ्या भानगडीत पडली तर तिला पश्चात्ताप करण्याची वेळ येईल हे तिने तिला पटवून दिले. राकेशने वेळीच तुझा डाव ओळखून रश्मीला तुझ्या जाळ्यात फसण्यापासून वाचवण्यासाठी पूजाकडे मदत मागितली, असे सांगून राकेशबद्दल रश्मीच्या मनात आपलेपणाची भावना निर्माण केली.

रश्मीला तु आवडला होतास पण ती तुला ओळखत नव्हती. त्यात तिच्यासमोर तुझे असे निगेटिव्ह चित्र उभे केल्यामुळे ती घाबरली आणि पूजा एक मुलगी असल्यामुळे साहाजिकच तिने तिच्या सांगण्यावर विश्वास ठेवला. तुझ्या एकंदर हालचालींवरून तु रश्मीला आज ना उद्या प्रपोज करणार हे राकेशने ओळखले होते. त्यामुळे तु रश्मीला प्रपोज करणार असून तिचाही इतर मुलींसारखा वापर करून सोडून देणार असल्याचे पूजाने तिला सांगितले. दुसऱ्याच दिवशी जेव्हा तु रश्मीला प्रपोज केलेस तेव्हा रश्मीची खात्री पटली की पूजाने जे सांगितले तेच खरे आहे म्हणुन. तिने जास्त विचार न करता यावर विश्वास ठेवला की तु चांगला मुलगा नाहीस.

पूजाने सांगितल्याप्रमाणे रश्मीने तुला उद्या उत्तर देते सांगून वेळ मारून नेली. रविवारी रश्मी राकेश आणि पूजाला भेटली आणि तु तिला प्रपोज केल्याचे तिने सांगितले. तुझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल तिला पश्चात्ताप होतोय म्हणाली आणि तुझ्यापासून तिला वाचवल्याबद्दल त्या दोघांना तिने ट्रीट पण दिली. रश्मीचा आपल्यावर विश्वास बसल्याचे पाहून पूजाने तिच्यासाठी राकेश कसा योग्य आहे हे तिला पटवून दिले आणि राकेशलाही ती आवडत असल्याचे सांगितले.
[next]
“तुझ्या दुर्दैवाने राकेश आणि रश्मीची शाळा एकच असल्याने जरी ती त्याला जास्त ओळखत नसली तरी तो तिच्या पाहण्यात होता आणि तु पूर्णपणे अनोळखी! त्यामुळे परिस्थिती तुझ्या विरोधात गेली आणि राकेशने प्रपोज केल्यावर मनात नसूनही ती त्याला हो म्हणाली. तुझ्याबद्दल कळल्यावर तिला जबरदस्त धक्का बसला होता. त्यातून सावरण्यासाठी तिला आधाराची गरज होतीच आणि तो आधार...” “राकेश ने तिला दिला.” योगेशचे वाक्य पूर्ण करत आकाश म्हणाला.

“अगदी बरोबर! तर हे असे आहे सगळे. आता तुच ठरव पुढे काय करायचे ते?” असे म्हणुन योगेशने एक दीर्घ श्वास घेतला. नंतर पाच दहा मिनिटे कोणीच काही बोलले नाही. सर्व ऐकून आकाश सुन्न झाला होता. बराच वेळ कोणत्यातरी विचारात हरवलेला आकाश, अचानक मोठमोठ्याने हसू लागला. त्याने योगेशकडे चक्क टाळी मागितली. आकाशच्या डोक्यावर परिणाम झाला की काय असे वाटून योगेश त्याला म्हणाला, “सावर स्वतःला! जे व्हायचे ते होऊन गेले. रश्मीपेक्षा चांगली मुलगी तुला नक्कीच भेटेल, तू खचून जाऊ नकोस.”

यावर आकाश म्हणाला, “अरे योग्या, मी चिडलोही नाही आणि खचलो तर मुळीच नाही. माझी खात्री आहे की रश्मीपेक्षा चांगली मुलगी मला नक्की मिळणार. बरं मला एक सांग, हे सर्व इतक्या डिटेलमध्ये तुला कसे माहित? आणि हे तु मला आधी का नाही सांगितलेस?” त्यावर योगेश उत्तरला, “अरे, राकेश माझ्या घराजवळच राहतो हे तर तुला ठाऊक आहेच. काल रात्री रश्मीने हो म्हटल्याच्या आनंदात त्याने पार्टी दिली होती. त्याचे आईवडील एका लग्नासाठी बाहेरगावी गेल्यामुळे त्याने सर्व मित्रांना आपल्या फार्म हाऊस वर बोलावले होते.”
[next]
“मी दिसल्यावर मला पण जबरदस्ती सोबत घेऊन गेला. तो फुल्ल टल्ली झाल्यावर तुला खुप शिव्या देत होता, स्वतःचा मोठेपणा सर्वांना सांगत होता. मी याचा फायदा घेऊन त्याच्याकडून सर्व माहिती काढून घेतली. मला माहित आहे की तु एक चांगला मुलगा आहेस, सर्वांना वेळोवेळी मदत करतोस. मला देखील किती तरी वेळा मदत केलीस, तिही न मागता! जे तुझ्या बाबतीत घडले ते योग्य नव्हते. तुझी रश्मीसाठी नियत वाईट नव्हती. तुझे तिच्यावर मनापासून प्रेम होते म्हणुन मी तुला सर्व काही सांगितले.”

“पण एक गोष्ट प्लिज लक्षात ठेव, मी तुला भेटलेलो नाही आणि या सगळ्या प्रकाराबद्दल काही सांगितलेही नाही. नाहीतर तुमच्या भानगडीत माझा फुकटचा बळी जायचा.” “तु काही काळजी करू नकोस, तुझे नांव नाही येणार. तु मला सर्व काही सांगून माझ्यावर खुप उपकार केलेस. माझ्या मनावरचा सर्व ताण आता दूर झाला. झाले गेले सर्व काही विसरून मला आता अभ्यासाला लागले पाहिजे. हे प्रेम वगैरे सगळे बकवास आहे. महत्वाचे आहे ते करियर. बाकी सर्व मग आपसुकच मिळत जाते, हे मला चांगले समजले आहे.” आकाश म्हणाला.

“म्हणजे? राकेशने तुझे प्रेम तुझ्यापासून हिरावुन नेले याचे तुला काहीच वाटत नाही? तु त्याचा बदला घेणार नाहीस?” योगेश संभ्रमात पडला. “अरे, राकेशने माझे प्रेम हिरावुन घेतले नाही. कारण, मुळात रश्मीचे माझ्यावर प्रेमच नव्हते. तिला मी फक्त आवडलो होतो. मुळात जी मुलगी इतक्या हलक्या कानाची आहे, की कोणाच्या तरी सांगण्यावरून कसलीच शहानिशा न करता, मला नाकारते आणि राकेश सारख्या थर्डक्लास माणसाला स्वीकारते, ती माझ्या प्रेमाच्या लायकच नाही. राकेशने मला फसवले नसून स्वतःलाच गोत्यात आणले आहे.”
[next]
“दे टाळी!” असे म्हणत आकाशने हसत हसत पुन्हा एकदा योगेशकडे टाळीसाठी हात पुढे केला. आकाशचे बोलणे ऐकून पुरता गोंधळलेला योगेश म्हणाला, “ते कसे काय? त्याला तर इतकी सुंदर गर्लफ्रेंड मिळाली!” “हो आणि सोबत पोलिसात असलेला खडूस सासरा पण मिळालाय. अरे रश्मी काही अशी तशी मुलगी नाही! ती राकेशला कधीच स्वतःचा गैरफायदा घेऊ देणार नाही. आपल्या स्वभावाला अनुसरून राकेश तसे वागलाच तर तिचा बाप त्याला लॉकपमध्ये घेऊन टायरमध्ये घालून तुडवल्याशिवाय राहणार नाही. रश्मीवर त्याचा खुप जीव आहे. झक मारत राकेशला तिच्याशी लग्न करावेच लागेल.”

“अरे, राकेशच्या या आधीच्या गर्लफ्रेंड्स काय सुंदर नव्हत्या? पण दरवेळी त्याने दुसरी मिळाल्यावर पहिलीला डिच केलेच ना? रश्मी कितीही सुंदर असली तरी काही दिवसात राकेश तिला कंटाळेलच कारण त्याचे तिच्यावर खरे प्रेम नाही. आपले इप्सित साध्य झाल्यावर तो तिला टाळू लागेल मग खरी गंमत सुरु होईल. रश्मी हे राकेशला मिळालेले बक्षीस नव्हे तर शिक्षा ठरणार आहे. एवढे मोठे प्लॅनिंग केले ना माझ्या विरोधात? आता स्वतःच्या जाळ्यात स्वतःच अडकलाय बिचारा. पुअर गाय!”

“आज ना उद्या रश्मीला खरे खोटे कळेलच पण तिच्या दुर्दैवाने तोपर्यंत मी तिच्या आयुष्यातून कायमचा दूर गेलेला असेन. हलके कान असल्याची, तिला राकेशच्या रूपात चांगली शिक्षा मिळाली आहे. सुंदर मुली तर अनेक भेटतील रे! पण आपल्यावर विश्वास ठेवणारी, भरभरून प्रेम करणारी, संकटात समर्थपणे पाठीशी उभी राहणारी, धीर देणारी, आपल्या घरच्यांना व आपल्याला सांभाळणारी आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्याला समुजून घेणारी अशी सुस्वभावी मुलगी मिळणे गरजेचे आहे. म्हणुन म्हटले दे टाळी!” हसत हसत आकाश म्हणाला.
[next]
त्यावर त्याला टाळी देत योगेश म्हणाला, “खरे आहे तुझे! लुझर तु नाहीस तर रश्मी आहे. तु तर तुझ्यावर प्रेम न करणारी मुलगी गमावलीस पण तिने मात्र तिच्यावर मनापासून प्रेम करणारा, एक अत्यंत समजुतदार आणि चांगला मुलगा गमावला. नशीब तिचे, दुसरे काय?” “सोड तो विषय, चल तुला भेळ आणि आईस्क्रीम खाऊ घालतो. आज आपला मुड एकदम मस्त आहे, कारण हे माझे ब्रेकअप नाही तर वेकप आहे. दे टाळी! काका! दोन ओली भेळ.” आकाशने ऑर्डर सोडली.

दुसऱ्या दिवशी आकाशचा पडलेला चेहरा पाहण्यासाठी राकेश मुद्दामहून रश्मीला आपल्या मागे बसवून कॉलेजला आला. पण त्या दोघांना पाहूनही आकाशचा चेहरा न पडल्याचे त्याला जाम आश्चर्य वाटले. उलट आकाश मोठ्याने म्हणाला, “अँड हिअर कम्स द लव्हली कपल! काँग्रॅट्स राकेश अँड रश्मी. अरे, व्हॉट अ कोइन्सिडन्स! तुमच्या नावांची तर इनिशियल्स पण मॅच होतात. अगदी मेड फॉर इच अदर असल्यासारखी. राकेश! तुला काय बाबा आता इतकी सुंदर गर्लफ्रेंड मिळाली आहे, त्यामुळे तू लेक्चरला येणार नसशीलच? आम्हाला मात्र बोअरिंग लेक्चर अटेंड करावंच लागणार. यु गाईज एन्जॉय. बाऽऽऽय!” असे म्हणून आकाश राहुलच्या खांद्यावर हात टाकून मस्त शीळ घालत वर्गाच्या दिशेने चालू लागला.

राकेश आणि रश्मी पाठमोऱ्या आकाशकडे पाहतच राहिले. हळू हळू रश्मीचा आकाशला पाहिल्यावर होणार संकोच कमी झाला आणि ती राकेश सोबत आपले लव्ह लाईफ जगू लागली. नंतर आकाश तिच्यासमोर कधी आलाच नाही. ती लांबून येताना दिसली की तो आधीच आपला मार्ग बदलायचा. हळूहळू तिही त्याला विसरून गेली. बघता बघता डिसेंबर उजाडला आणि सर्वजण सांस्कृतिक स्पर्धांच्या तयारीला लागले.
[next]
व्यक्तिमत्व स्पर्धेसाठी आकाश आणि राकेश दोघांनीही भाग घेतला होता आणि विशेष म्हणजे रश्मीनेही आपले नाव दिले होते. कॅटवॉकची प्रॅक्टिस करताना रश्मीला आकाश दिसला. तो मित्रांसोबत प्रॅक्टिस करत होता. ती आधी बावरली पण आकाशच्या वागण्यात संकोच न दिसल्यामुळे ती पण रिलॅक्स झाली. प्रॅक्टिसच्या वेळी ती आकाशला ऑबझर्व्ह करायची. त्याचे इतर मुलींशी अदबशीर वागणे, सर्वांच्या मदतीला धावून जाणे, त्याचा विनोदी स्वभाव आणि सदैव हसतमुख असणे हे पूजा आणि राकेशने सांगितलेल्या आकाशच्या वागण्याच्या अगदीच विरुद्ध असल्याचे तिला जाणवले.

त्याचा चांगुलपणा तिच्या लक्षात आला. म्हणतात ना, चंदनाचा सुवास लपवला तरी लपत नाही! एकदा प्रॅक्टिस करण्यासाठी रश्मी हॉलवर आली तेव्हा गाण्याच्या स्पर्धेची तयारी सुरु होती. आकाश आपल्या सुरेल आवाजात 'आने वाला पल, जानेवाला है' हे किशोर कुमार यांनी गायलेले सुंदर गाणे गात होता. ती मंत्रमुग्ध होऊन त्याचे गाणे ऐकत होती. टाळ्यांच्या कडकडाटाने ती भानावर आली. हा मुलगा नक्कीच फालतू नाही असे तिचे मन तिला सांगून गेले. राकेश आणि पूजाच्या शब्दांवर विश्वास ठेवल्याबद्दल तिला स्वतःचाच राग आला.

अजून राकेश आला नसल्यामुळे तिने आकाशशी बोलायचे ठरवले. आपले गाणे संपवून आकाश स्टेजवरून खाली येऊन समोर मांडलेल्या खुर्च्यांपैकी एका खुर्चीवर बसला. तो हातातील वहीमध्ये काही नोटेशन्स लिहीत होता. रश्मी त्याच्यासमोर उभी राहिली. आकाशचे आपल्याकडे लक्ष नाही हे पाहून ती संकोचली पण काहीतरी बोलायचे म्हणुन ती म्हणाली, “तू आकाश ना?‘”
[next]
त्याबरोबर आकाशने मान वर करून पाहिले, क्षणभर तिला न्याहाळून म्हणाला, “अरे वा! इतक्या लवकर मला विसरलीस? इतकी की, मीच आकाश आहे का याची खात्री करावी लागली? स्ट्रेंज!” “नाही तसे नाही, पण बऱ्याच महिन्यात आपली भेट झाली नाही ना! म्हणुन, बाकी काही नाही.” ती वरमली होती. “चुक तुझी नाही. तसेही आपल्या भेटण्याला काही कारणच उरले नव्हते. नाही का? आणि जे काही कारण होते ते तू तेव्हाच संपवले होतेस. बाय द वे, तू खूप छान दिसतेस या ड्रेसमध्ये.” आकाश तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला.

त्याच्या शेवटच्या वाक्याने तिची कळी खुलली. “ओह थँक्स. तुझे गाणेही खुप छान झाले. किती गोड गळा लाभलाय तुला! असे वाटते की तुझे गाणे संपूच नये, केवळ ऐकतच राहावे. स्पर्धा तूच जिंकणार याचा मला विश्वास आहे.” ती म्हणाली. “असाच विश्वास तू माझ्यावर आधी दाखवला असतास, तर आज कदाचित परिस्थिती वेगळी असती,” तो खेदाने म्हणाला. त्याच्या वाक्यातील दुःखाची झालर तिला जाणवली. पुढे काय बोलावे ते न कळल्यामुळे ती गप्प उभी राहिली.

क्षणात तिचे डोळे भरले आणि अश्रू वाहू लागले. “मी तुला समजु शकले नाही आकाश! मी तुझे मन दुखावले. प्लिज मला माफ कर. तुझ्यावर अविश्वास दाखवून मी खुप मोठी चूक केली.” रडवेल्या आवाजात रश्मी त्याची माफी मागू लागली. भावुक झालेला आकाश स्वतःला सावरत म्हणाला, “प्लिज रडू नकोस. जे झाले ते झाले. आता ते उगाळण्यात काहीच अर्थ नाही. आपल्याला मागचे विसरून पुढे जायला हवे. चल आता डोळे पूस बघू! आपल्याला कॅटवॉकची प्रॅक्टिस पण करायची आहे.”
[next]
“तू खुप छान करते आहेस. सुंदर तर तू आहेसच फक्त थोडा कॉन्फिडन्स पाहिजे. तो वाढला की मग यश तुझंच आहे.” “म्हणजे हा देखील मला ऑबझर्व्ह करतोय तर!” ती स्वतःशीच म्हणाली. ते दोघे प्रॅक्टिससाठी जायला निघाले आणि तेवढ्यात समोरून राकेश आला. रश्मीला आकाशसोबत पाहून त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली. रश्मी पुरती गोंधळून गेली. राकेशच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून आकाश मात्र सुखावला. त्याला मस्त स्माईल देत तो बाजूने निघून गेला आणि राकेशच्या रागाचा पहाड रश्मीवर कोसळला.

आकाश वरून तिला तो वाटेल तसे अद्वातद्वा बोलू लागला. हळव्या रश्मीचे डोळे, पुन्हा एकदा अश्रुंनी डबडबले. तमाशा नको म्हणुन तिने तिथून जाणेच पसंत केले. मग राकेशही तिच्या मागे चरफडत प्रॅक्टिससाठी गेला. पुढे सांस्कृतिक स्पर्धेतील गाण्याची स्पर्धा आकाशने अगदी सहज खिशात टाकली. आपल्या सुरेल आवाजाने त्याने रसिकांची मने जिंकली होती आणि कदाचित रश्मीचेही. व्यक्तिमत्व स्पर्धेतून राकेश पहिल्या राउंडमधेच बाहेर फेकला गेला. रश्मीही काही राउंड्सनंतर बाहेर पडली.

या वर्षीची व्यक्तिमत्व स्पर्धा देखील आकाशने जिंकली. आपल्या रुबाबदार व्यक्तिमत्वाबरोबरच, हजारजबाबीपणाने आणि योग्य उत्तरांनी त्याने परीक्षकांची मते आपल्या बाजुला वळवली. रश्मीला खुप आनंद झाला. प्राईझ डिस्ट्रिब्युशन नंतर आकाश जेव्हा स्टेजच्या मागे आला, तेव्हा सर्व जण त्याचे अभिनंदन करू लागले. रश्मी आणि राकेश एका कोपऱ्यात बोलत उभे होते. आकाशला पाहताच रश्मी धावतच त्याच्याकडे गेली. तिने काँग्रॅट्स म्हणत चक्क त्याला घट्ट मिठी मारली. राकेश आ वासून केवळ पाहताच राहिला.
[next]
तिला थँक्स म्हणुन आकाशने सुचितार्थाने राकेशकडे पाहिले, जणू त्याला म्हणायचे होते बघ जिला तू माझ्यापासून तोडलेस ती आज तुझ्या नाकावर टिच्चून पाय देऊन शेवटी माझ्याकडेच आली. राकेशची नजर शरमेने खाली वळली. आज रश्मीला जिंकूनही राकेश हरला होता. आकाशबद्दल त्याने रश्मीच्या मनात संशयाचे बीज पेरले. त्याला वेळोवेळी खतपाणी घालून त्याचा विषवृक्ष केला पण सत्याच्या कुऱ्हाडीने तो मुळासकट छाटून टाकला होता.

ज्या मुलीला आकाशपासून दूर ठेवण्यासाठी त्याने एवढे षडयंत्र रचले, जिच्या नजरेतून आकाशला पाडले, त्याच्याबद्दल तिच्या मनात उमलणाऱ्या प्रेमाच्या कळीला खुडून टाकले आणि तिच्या निरागसतेचा फायदा उचलत तिला आपल्या जाळ्यात ओढले, आज तीच मुलगी त्याच्या समोर आकाशला मिठी मारून शुभेच्छा देत होती. याहून मोठी हार ती कोणती? अपमान आणि सूडाच्या आगीत होरपळत तो काही न बोलता तिथून खालमानेने निघून गेला.

आज आकाश खऱ्या अर्थाने जिंकला होता. रश्मी आकाशच्या मिठीत विरघळली होती. तिच्या मिठीतुन स्वतःला सोडवून त्याने तिला थँक्स म्हटले आणि तो आपल्या मित्रांकडे निघून गेला. पाठमोऱ्या आकाशला पाहत रश्मी दिवास्वप्नात रंगली पण त्या दिवसानंतर मात्र त्याने रश्मीशी भेटणे तर दूर तिच्याशी बोलणेही टाळले. ती समोरून येताना दिसताच तो पूर्वीसारखाच आपला रस्ता बदलत असे. तिही समजून गेली की रंगीबेरंगी दगड गोळा करण्याच्या नादात तिला सापडलेला हिरा ती गमावून बसली होती.
[next]
सांस्कृतिक स्पर्धा तर आकाशने गाजवली पण त्याच्या दुर्दैवाने त्याची दुसऱ्या वर्षाची ए. टी. के. टी सुटली नव्हती. नियमानुसार सर्व ए. टी. के. टी क्लिअर झाल्याशिवाय शेवटच्या वर्षाला परीक्षेला बसता येत नसल्यामुळे, एस. वाय ला ए. टी. के. टी असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना कॉलेजने एक संधी देत त्यांची पुन्हा परीक्षा घेतली. ज्यांनी सर्व विषय सोडवले त्यांनाच शेवटच्या वर्षाला परीक्षेला बसू देण्यात आले. आकाश त्या सुदैवी विद्यार्थ्यांमध्ये होता पण पुन्हा एकदा त्याच्या दुर्दैवाने त्याला पुन्हा एकदा जमीनीवर आदळले.

आधीच्या सर्व ए. टी. के. टी तर सुटल्या पण आकाश थर्ड ईयरला फिजिकल केमिस्ट्री विषयात नापास झाला. प्रॅक्टिकलला पैकीच्या पैकी मार्क्स मिळूनही एका विषयाने त्याचा घात केला होता. यावेळी आकाशच्या वडीलांनी त्याला खुपच सुनावले. अपयशाने खचलेल्या आकाशला त्याच्या आईने सावरले. त्याला नवी उमेद दिली. आकाशने पुन्हा नव्या दमाने अभ्यासाला सुरवात केली. तिसऱ्या वर्षाला पुन्हा ऍडमिशन घेतली. एक्स्टर्नल क्लासेस लावले. हळू हळू त्याला केमिस्ट्रीमध्ये रस वाटू लागला. ऑरगॅनिक केमिस्ट्रीमधील बेन्झीन रिंग स्ट्रक्चर्स कशी बनतात ते त्याला समजू लागले. तो खूप मेहनत घेऊ लागला.

पाहता पाहता वर्ष संपले, परीक्षा झाल्या. रिझल्ट यायला बराच अवकाश असल्यामुळे वेळेचा सदुपयोग होईल आणि थोडे पैसेही मिळतील असा विचार करून त्याने राहुल आणि योगेश सोबत एका शैक्षणिक संस्थेत शैक्षणिक सल्लागार म्हणुन जॉब पकडला. आकाशचे प्रभावी व्यक्तिमत्व, त्याचा आत्मविश्वास आणि समोरच्याला उत्तमरित्या कन्व्हिन्स करण्याचे कसब पाहून संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी त्याचे लगेच सिलेक्शन केले. तिथे ऍडमिन हेड असलेल्या नभाशी त्याची ओळख झाली.

क्रमशः


केदार कुबडे | Kedar Kubade
सभासद, मराठीमाती डॉट कॉम
मराठी कथा, मराठी भयकथा, मराठी कविता या आणि अशा विविध विभागांत लेखन.

अभिप्राय

नाव

अ रा कुलकर्णी,1,अ ल खाडे,2,अ ज्ञा पुराणिक,1,अंकित भास्कर,1,अंजली भाबट-जाधव,1,अंधश्रद्धेच्या कविता,5,अकोला,1,अजय दिवटे,1,अजित पाटणकर,18,अनंत दळवी,1,अनंत फंदी,1,अनंत भावे,1,अनिकेत येमेकर,2,अनिकेत शिंदे,1,अनिल गोसावी,2,अनिल भारती,1,अनिल वल्टे,8,अनुभव कथन,19,अनुरथ गोरे,1,अनुराधा पाटील,1,अनुराधा फाटक,39,अनुवादित कविता,1,अपर्णा तांबे,7,अब्राहम लिंकन,2,अभंग,6,अभिजित गायकवाड,1,अभिजीत टिळक,2,अभिव्यक्ती,1386,अभिषेक कातकडे,5,अभिषेक घुगे,1,अमन मुंजेकर,7,अमरश्री वाघ,2,अमरावती,1,अमित पडळकर,4,अमित पवार,1,अमित बाविस्कर,3,अमित सुतार,1,अमुक-धमुक,1,अमृत जोशी,1,अमृता शेठ,1,अमोल कोल्हे,1,अमोल तांबे,1,अमोल देशमुख,1,अमोल बारई,7,अमोल वाघमारे,1,अमोल सराफ,2,अरविंद जामखेडकर,1,अरविंद थगनारे,5,अरुण कोलटकर,1,अरुण म्हात्रे,1,अर्चना कुळकर्णी,1,अर्चना डुबल,2,अर्जुन फड,3,अर्थनीति,3,अल्केश जाधव,1,अविनाश धर्माधिकारी,2,अशोक थोरात,1,अशोक रानडे,1,अश्विनी तातेकर-देशपांडे,1,अश्विनी तासगांवकर,2,अस्मिता मेश्राम-काणेकर,7,अहमदनगर,1,अक्षय वाटवे,1,अक्षरमंच,1132,आईच्या कविता,29,आईस्क्रीम,3,आकाश पवार,2,आकाश भुरसे,8,आज,6,आजीच्या कविता,1,आठवणींच्या कविता,18,आतले-बाहेरचे,3,आतिश कविता लक्ष्मण,1,आत्मविश्वासाच्या कविता,15,आदर्श कामिरे,4,आदित्य कदम,1,आदेश ताजणे,8,आनंद दांदळे,8,आनंद प्रभु,1,आनंदाच्या कविता,26,आमट्या सार कढी,18,आर समीर,1,आरती गांगण,2,आरती शिंदे,4,आरत्या,82,आरोग्य,21,आशा गवाणकर,1,आशिष खरात-पाटील,1,आशिष चोले,1,इंदिरा गांधी,1,इंदिरा संत,6,इंद्रजित नाझरे,26,इंद्रजीत भालेराव,1,इतिहास,281,इलाही जमादार,1,इसापनीती कथा,48,उत्तम कोळगावकर,2,उदय दुदवडकर,1,उन्मेष इनामदार,1,उपवासाचे पदार्थ,15,उमा पाटील,1,उमेश कानतोडे,1,उमेश कुंभार,14,उमेश चौधरी,1,उस्मानाबाद,1,ऋग्वेदा विश्वासराव,5,ऋचा पिंपळसकर,10,ऋचा मुळे,18,ऋषिकेश शिरनाथ,2,ऋषीकेश कालोकार,2,ए श्री मोरवंचीकर,1,एच एन फडणीस,1,एप्रिल,30,एम व्ही नामजोशी,1,एहतेशाम देशमुख,2,ऐतिहासिक स्थळे,2,ऑक्टोबर,31,ऑगस्ट,31,ऑडिओ कविता,15,ऑडिओ बुक,1,ओंकार चिटणीस,1,ओम ढाके,8,ओमकार खापे,1,ओशो,1,औरंगाबाद,1,कपिल घोलप,12,करण विधाते,1,करमणूक,72,कर्क मुलांची नावे,1,कल्पना देसाई,1,कल्याण इनामदार,1,कविता शिंगोटे,1,कवितासंग्रह,280,कवी अनिल,1,कवी ग्रेस,4,कवी बी,1,काजल पवार,1,कार्यक्रम,12,कार्ल खंडाळावाला,1,कालिंदी कवी,2,काशिराम खरडे,1,कि का चौधरी,1,किरण कामंत,1,किल्ले,97,किल्ल्यांचे फोटो,5,किशोर चलाख,6,किशोर पवार,1,कुठेतरी-काहीतरी,3,कुणाल खाडे,3,कुणाल लोंढे,1,कुसुमाग्रज,9,कृष्णकेशव,1,कृष्णाच्या आरत्या,5,के के दाते,1,के तुषार,8,के नारखेडे,2,केदार कुबडे,40,केदार नामदास,1,केदार मेहेंदळे,1,केशव मेश्राम,1,केशवकुमार,2,केशवसुत,5,कोल्हापूर,1,कोशिंबीर सलाड रायते,14,कौशल इनामदार,1,खंडोबाची स्थाने,2,खंडोबाच्या आरत्या,2,खरगपूर,1,ग दि माडगूळकर,6,ग ल ठोकळ,3,ग ह पाटील,4,गंगाधर गाडगीळ,1,गझलसंग्रह,1,गडचिरोली,1,गणपतीच्या आरत्या,5,गणपतीच्या गोष्टी,24,गणेश कुडे,2,गणेश तरतरे,20,गणेश निदानकर,1,गणेश पाटील,1,गणेश भुसारी,1,गण्याचे विनोद,1,गाडगे बाबा,1,गायत्री सोनजे,5,गावाकडच्या कविता,14,गुरुदत्त पोतदार,2,गुरूच्या आरत्या,2,गुलझार काझी,1,गो कृ कान्हेरे,1,गो गं लिमये,1,गोकुळ कुंभार,13,गोड पदार्थ,55,गोपीनाथ,2,गोविंद,1,गोविंदाग्रज,1,गौतम जगताप,1,गौरांग पुणतांबेकर,1,घरचा वैद्य,2,घाट,1,चंद्रकांत जगावकर,1,चंद्रपूर,1,चटण्या,3,चातुर्य कथा,6,चित्रपट समीक्षा,1,चैतन्य म्हस्के,1,चैत्राली इंगळे,2,जयश्री चुरी,1,जयश्री मोहिते,1,जवाहरलाल नेहरू,1,जळगाव,1,जाई नाईक,1,जानेवारी,31,जालना,1,जितेश दळवी,1,जिल्हे,31,जीवनशैली,432,जुलै,31,जून,30,ज्योती किरतकुडवे,1,ज्योती मालुसरे,1,टीझर्स,1,ट्रेलर्स,3,ठाणे,2,डिसेंबर,31,डॉ मानसी राजाध्यक्ष,1,डॉ. दिलीप धैसास,1,तनवीर सिद्दिकी,1,तन्मय धसकट,1,तरुणाईच्या कविता,7,तिच्या कविता,63,तुकाराम गाथा,4,तुकाराम धांडे,1,तुतेश रिंगे,1,तेजश्री कांबळे-शिंदे,4,तेजस्विनी देसाई,1,दत्ता हलसगीकर,2,दत्ताच्या आरत्या,5,दत्तात्रय भोसले,1,दत्तो तुळजापूरकर,1,दया पवार,1,दर्शन जोशी,2,दर्शन शेळके,1,दशरथ मांझी,1,दादासाहेब गवते,1,दामोदर कारे,1,दिनदर्शिका,366,दिनविशेष,366,दिनेश बोकडे,1,दिनेश लव्हाळे,1,दिनेश हंचाटे,1,दिपक शिंदे,2,दिपाली गणोरे,1,दिवाळी फराळ,26,दीपा दामले,1,दीप्तीदेवेंद्र,1,दुःखाच्या कविता,76,दुर्गेश साठवणे,1,देवीच्या आरत्या,3,देशभक्तीपर कविता,3,धनंजय सायरे,1,धनराज बाविस्कर,71,धनश्री घाणेकर,1,धार्मिक स्थळे,1,धुळे,1,धोंडोपंत मानवतकर,12,नमिता प्रशांत,1,नलिनी तळपदे,1,ना के बेहेरे,1,ना घ देशपांडे,4,ना धों महानोर,3,ना वा टिळक,1,नांदेड,1,नागपूर,1,नारायण शुक्ल,1,नारायण सुर्वे,2,नाशिक,1,नासीर संदे,1,निखिल पवार,3,नितीन चंद्रकांत देसाई,1,निमित्त,4,निराकाराच्या कविता,16,निवडक,9,निसर्ग कविता,37,निसर्ग चाटे,2,निळू फुले,1,नृसिंहाच्या आरत्या,1,नोव्हेंबर,30,न्याहारी,50,पथ्यकर पदार्थ,2,पद्मा गोळे,4,परभणी,1,पराग काळुखे,1,पर्यटन स्थळे,1,पल्लवी माने,1,पवन कुसुंदल,2,पांडुरंग वाघमोडे,3,पाककला,322,पाककृती व्हिडिओ,15,पालकत्व,7,पावसाच्या कविता,40,पी के देवी,1,पु ल देशपांडे,9,पु शि रेगे,1,पुंडलिक आंबटकर,4,पुडिंग,10,पुणे,15,पुरुषोत्तम जोशी,1,पुरुषोत्तम पाटील,1,पुर्वा देसाई,2,पूजा काशिद,1,पूजा चव्हाण,1,पूनम राखेचा,1,पोस्टर्स,5,पोळी भाकरी,27,पौष्टिक पदार्थ,20,प्र श्री जाधव,12,प्रकाश पाटील,1,प्रजोत कुलकर्णी,1,प्रतिक बळी,1,प्रतिभा जोजारे,1,प्रतिमा इंगोले,1,प्रतिक्षा जोशी,1,प्रदिप कासुर्डे,1,प्रफुल्ल चिकेरूर,10,प्रभाकर महाजन,1,प्रभाकर लोंढे,3,प्रवास वर्णन,1,प्रवासाच्या कविता,11,प्रविण पावडे,15,प्रवीण दवणे,1,प्रवीण राणे,1,प्रशांतकुमार मोहिते,2,प्रसन्न घैसास,2,प्रज्ञा वझे,2,प्रज्ञा वझे-घारपुरे,10,प्राजक्ता गव्हाणे,1,प्रितफुल प्रित,1,प्रिती चव्हाण,27,प्रिया जोशी,1,प्रियांका न्यायाधीश,3,प्रेम कविता,97,प्रेरणादायी कविता,17,फ मुं शिंदे,3,फादर स्टीफन्स,1,फेब्रुवारी,29,फोटो गॅलरी,11,फ्रॉय निस्सेन,1,बहिणाबाई चौधरी,6,बा भ बोरकर,8,बा सी मर्ढेकर,6,बातम्या,11,बाबा आमटे,1,बाबाच्या कविता,10,बाबासाहेब आंबेड,1,बायकोच्या कविता,5,बालकविता,14,बालकवी,9,बाळाची मराठी नावे,1,बाळासाहेब गवाणी-पाटील,21,बिपीनचंद्र नेवे,1,बी अरुणाचलाम्‌,1,बी रघुनाथ,1,बीड,1,बुलढाणा,1,बेकिंग,9,बेहराम कॉन्ट्रॅक्टर,1,भंडारा,1,भक्ती कविता,23,भक्ती रावनंग,1,भरत माळी,2,भा दा पाळंदे,1,भा रा तांबे,7,भा वें शेट्टी,1,भाग्यवेध,1,भाज्या,29,भाताचे प्रकार,16,भानुदास,1,भानुदास धोत्रे,1,भावनांची वादळे,1,भुषण राऊत,1,भूगोल,1,भूमी जोशी,1,म म देशपांडे,1,मं वि राजाध्यक्ष,1,मंगला गोखले,1,मंगळागौरीच्या आरत्या,2,मंगेश कळसे,9,मंगेश पाडगांवकर,5,मंजुषा कुलकर्णी,2,मंदिरांचे फोटो,3,मंदिरे,4,मधल्या वेळेचे पदार्थ,41,मधुकर आरकडे,1,मधुकर जोशी,1,मधुसूदन कालेलकर,2,मनमोहन नातू,3,मनाचे श्लोक,205,मनिषा दिवेकर,3,मनिषा फलके,1,मनोज शिरसाठ,9,मराठी,1,मराठी उखाणे,2,मराठी कथा,107,मराठी कविता,1173,मराठी कवी,3,मराठी कोट्स,4,मराठी गझल,30,मराठी गाणी,2,मराठी गोष्टी,67,मराठी चारोळी,42,मराठी चित्रपट,19,मराठी टिव्ही,53,मराठी नाटक,1,मराठी पुस्तके,7,मराठी प्रेम कथा,23,मराठी भयकथा,44,मराठी मालिका,20,मराठी रहस्य कथा,2,मराठी लेख,48,मराठी विनोद,1,मराठी साहित्य,288,मराठी साहित्यिक,2,मराठी सुविचार,2,मराठीप्रेमी पालक महासंमेलन,5,मराठीमाती,145,मसाले,12,महात्मा गांधी,8,महात्मा फुले,1,महाराष्ट्र,307,महाराष्ट्र फोटो,11,महाराष्ट्राचा इतिहास,32,महाराष्ट्रीय पदार्थ,22,महालक्ष्मीच्या आरत्या,2,महेंद्र म्हस्के,1,महेश जाधव,3,महेश बिऱ्हाडे,9,मांसाहारी पदार्थ,17,माझं मत,4,माझा बालमित्र,88,मातीतले कोहिनूर,19,माधव ज्यूलियन,6,माधव मनोहर,1,माधवानुज,3,मानसी सुरज,1,मारुतीच्या आरत्या,2,मार्च,31,मिलिंद खांडवे,1,मीना तालीम,1,मुंबई,12,मुंबई उपनगर,1,मुकुंद भालेराव,1,मुकुंद शिंत्रे,35,मुक्ता चैतन्य,1,मुलांची नावे,1,मुलाखती,1,मे,31,मैत्रीच्या कविता,8,मोहिनी उत्तर्डे,2,यवतमाळ,1,यशपाल कांबळे,4,यशवंत दंडगव्हाळ,25,यादव सिंगनजुडे,2,योगा,1,योगेश कर्डिले,6,योगेश सोनवणे,2,रंगपंचमी,1,रंजना बाजी,1,रजनी जोगळेकर,5,रत्नागिरी,1,रविंद्र गाडबैल,1,रविकिरण पराडकर,1,रवींद्र भट,1,रा अ काळेले,1,रा देव,1,रागिनी पवार,1,राजकारण,2,राजकीय कविता,12,राजकुमार शिंगे,1,राजेंद्र भोईर,1,राजेश पोफारे,1,राजेश्वर टोणे,3,राम मोरे,1,रामकृष्ण जोशी,2,रामचंद्राच्या आरत्या,5,रायगड,1,राहुल अहिरे,3,रुपेश सावंत,1,रेश्मा जोशी,2,रेश्मा विशे,1,रोहित काळे,7,रोहित साठे,15,लघुपट,3,लता मंगेशकर,2,लहुजी साळवे,1,लक्ष्मण अहिरे,2,लक्ष्मीकांत तांबोळी,2,लातूर,1,लिलेश्वर खैरनार,2,लीना पांढरे,1,लीलावती भागवत,1,लोकमान्य टिळक,3,लोणची,9,वंदना विटणकर,2,वर्धा,1,वसंत बापट,12,वसंत साठे,1,वसंत सावंत,1,वा गो मायदेव,1,वा ना आंधळे,1,वा भा पाठक,2,वा रा कांत,3,वात्रटिका,2,वादळे झेलतांना,2,वामन निंबाळकर,1,वासुदेव कामथ,1,वाळवणाचे पदार्थ,6,वि दा सावरकर,3,वि भि कोलते,1,वि म कुलकर्णी,5,वि स खांडेकर,1,विंदा करंदीकर,8,विक्रम खराडे,1,विचारधन,215,विजय पाटील,1,विजया जहागीरदार,1,विजया वाड,2,विजया संगवई,1,विठ्ठल वाघ,3,विठ्ठलाच्या आरत्या,5,विद्या कुडवे,4,विद्या जगताप,2,विद्याधर करंदीकर,1,विनायक मुळम,1,विरह कविता,58,विराज काटदरे,1,विलास डोईफोडे,5,विवेक जोशी,3,विशाल शिंदे,1,विशेष,12,विष्णूच्या आरत्या,4,विज्ञान तंत्रज्ञान,2,वृषाली सुनगार-करपे,1,वेदांत कोकड,1,वैभव गव्हाळे,1,वैभव सकुंडे,1,वैशाली झोपे,1,वैशाली नलावडे,1,व्यंगचित्रे,17,व्रत-वैकल्ये,1,व्हिडिओ,13,शंकर रामाणी,1,शंकर विटणकर,1,शंकर वैद्य,1,शंकराच्या आरत्या,4,शरणकुमार लिंबाळे,1,शशांक रांगणेकर,1,शशिकांत शिंदे,1,शां शं रेगे,1,शांततेच्या कविता,9,शांता शेळके,11,शांताराम आठवले,1,शाम जोशी,1,शारदा सावंत,4,शाळेचा डबा,15,शाळेच्या कविता,11,शितल सरोदे,1,शिरीष पै,1,शिरीष महाशब्दे,8,शिल्पा इनामदार-आर्ते,1,शिवाजी महाराज,7,शिक्षकांवर कविता,4,शुभम बंबाळ,2,शुभम सुपने,2,शेतकर्‍याच्या कविता,14,शेती,1,शेषाद्री नाईक,1,शैलेश सोनार,1,श्याम खांबेकर,1,श्रद्धा नामजोशी,9,श्रावणातल्या कहाण्या,27,श्री दि इनामदार,1,श्री बा रानडे,1,श्रीकृष्ण पंडित,1,श्रीकृष्ण पोवळे,1,श्रीधर रानडे,2,श्रीधर शनवारे,1,श्रीनिवास खळे,1,श्रीपाद कोल्हटकर,1,श्रीरंग गोरे,1,श्रुती चव्हाण,1,संघर्षाच्या कविता,33,संजय उपाध्ये,1,संजय डोंगरे,1,संजय पाटील,1,संजय बनसोडे,2,संजय शिंदे,1,संजय शिवरकर,5,संजय सावंत,1,संजीवनी मराठे,3,संत एकनाथ,1,संत चोखामेळा,1,संत जनाबाई,1,संत तुकडोजी महाराज,2,संत तुकाराम,8,संत नामदेव,3,संत ज्ञानेश्वर,6,संतोष जळूकर,1,संतोष झोंड,1,संतोष सेलुकर,30,संदिप खुरुद,5,संदीपकुमार खुरुद,1,संदेश ढगे,39,संध्या भगत,1,संपादक मंडळ,1,संपादकीय,11,संपादकीय व्यंगचित्रे,2,संस्कार,2,संस्कृती,133,सई कौस्तुभ,1,सचिन पोटे,12,सचिन माळी,1,सण-उत्सव,22,सणासुदीचे पदार्थ,32,सतिश चौधरी,1,सतीश काळसेकर,1,सदानंद रेगे,2,सदाशिव गायकवाड,2,सदाशिव माळी,1,सनी आडेकर,10,सप्टेंबर,30,समर्थ रामदास,206,समर्पण,8,सरबते शीतपेये,8,सरयु दोशी,1,सरला देवधर,1,सरिता पदकी,3,सरोजिनी बाबर,1,सलीम रंगरेज,8,सविता कुंजिर,1,सांगली,1,सागर बनगर,1,सागर बाबानगर,1,सातारा,1,साने गुरुजी,5,सामाजिक कविता,113,सामान्य ज्ञान,8,सायली कुलकर्णी,7,साहित्य सेतू,1,साक्षी खडकीकर,9,साक्षी यादव,1,सिंधुदुर्ग,1,सिद्धी भालेराव,1,सिमा लिंगायत-कुलकर्णी,3,सुदेश इंगळे,24,सुधाकर राठोड,1,सुनिल नागवे,1,सुनिल नेटके,1,सुनील गाडगीळ,1,सुभाष कटकदौंड,2,सुमती इनामदार,1,सुमित्र माडगूळकर,1,सुरज दळवी,1,सुरज दुतोंडे,1,सुरज पवार,1,सुरेश भट,2,सुरेश सावंत,2,सुशील दळवी,1,सुशीला मराठे,1,सुहास बोकरे,6,सैनिकांच्या कविता,4,सैरसपाटा,128,सोपानदेव चौधरी,1,सोमकांत दडमल,1,सोलापूर,1,सौरभ सावंत,1,स्तोत्रे,2,स्नेहा कुंभार,1,स्फुटलेखन,4,स्फूर्ती गीत,1,स्माईल गेडाम,4,स्वप्ना पाटकर,1,स्वप्नाली अभंग,5,स्वप्नील जांभळे,2,स्वाती काळे,1,स्वाती खंदारे,320,स्वाती गच्चे,1,स्वाती दळवी,9,स्वाती नामजोशी,31,स्वाती पाटील,1,स्वाती वक्ते,2,ह मुलांची नावे,1,हमार्टिक समा,1,हरितालिकेच्या आरत्या,1,हर्षद खंदारे,42,हर्षद माने,1,हर्षदा जोशी,3,हर्षवर्धन घाटे,2,हर्षाली कर्वे,2,हसनैन आकिब,3,हितेशकुमार ठाकूर,1,हिरवळ,1,हेमंत जोगळेकर,1,हेमंत देसाई,1,हेमंत सावळे,1,हेमा चिटगोपकर,8,होळी,5,ज्ञानदा आसोलकर,1,ज्ञानदेवाच्या आरत्या,2,marathimati,1,
ltr
item
मराठीमाती । माझ्या मातीचे गायन: जातबळी भाग १ - मराठी भयकथा
जातबळी भाग १ - मराठी भयकथा
जातबळी भाग १, मराठी कथा [Jaatbali Part 1, Marathi Katha] - आकाश आणि नभाच्या निर्व्याज्य प्रेमाची जीवाला चटका लावून जाणारी कहाणी म्हणजेच जातबळी.
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhoC-EXL303CsOpg_l3qJqW02x_Q3xyeq2fYXPGC9wVNUOM-pwkwkZ26FOENhfrOkC4p40o2uMGKjIUg0PAk2WR6U84Bb90VPtNx2UrsLstfMXLgs45-hqRw3s_GMRDB70NPyKw7AXFOSGl/s1600/jaatbali-part-1-710x360.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhoC-EXL303CsOpg_l3qJqW02x_Q3xyeq2fYXPGC9wVNUOM-pwkwkZ26FOENhfrOkC4p40o2uMGKjIUg0PAk2WR6U84Bb90VPtNx2UrsLstfMXLgs45-hqRw3s_GMRDB70NPyKw7AXFOSGl/s72-c/jaatbali-part-1-710x360.jpg
मराठीमाती । माझ्या मातीचे गायन
https://www.marathimati.com/2018/06/jaatbali-part-1.html
https://www.marathimati.com/
https://www.marathimati.com/
https://www.marathimati.com/2018/06/jaatbali-part-1.html
true
2079427118266147504
UTF-8
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची