झोका आठवणींचा, मराठी लेख - [Jhoka Athavanincha, Marathi Article] गावाला हौस म्हणून झाडाला झोपाळा बांधला जातो तेव्हा त्या घनगर्द झाडाच्या सावलीत घेतलेला झोका वेगळीच उर्जा देतो.
करु नका गलबला रहा गडे शांत
निजतो बाळ राजा निवांत पाळण्यात ॥
नका ग पाऊलांची चाहुल लागू देऊ
हळूच पाळण्याला सख्यांनो झोका देऊ
झोपेल ऎकूनिया अंगाई गोड गीत ॥
असं अंगाई गीत गात आई आपल्या तान्ह्या बाळाला झोपवते. आपण जन्माला आल्यापासून पाळणा आपल्या आयुष्याशी जोडला गेला आहे. लहान बाळाला पाळण्यात ठेवल्यावर त्याच्या चेहर्यावर येणारं खट्याळ हसू मातेला स्वर्गीय सुख देतं. तिचा सर्व शीण थकवा कुठच्या कुठे पळून जातो. या पाळण्याला वरती झुमर लावलं जातं. बाळासाठी छान विरंगुळा असतो तो. त्या तान्ह्या जिवाला ते काहीच समजत नसतं. पण तो किणकिणाट कानाला मधूर वाटतो. बारशानिमित्त याच पाळण्याला छान फुलांनी सजवलं जातं. मग काय, त्या पाळण्याचा दिमाख काही वेगळाच असतो. याच पाळण्यात त्या लहानग्या बाळाला नाव दिलं जातं. नामकरण विधी होतो. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात असं जरी असलं तरी त्या लहान बाळाला त्या वेळी काहीच कळत नसतं. कान, डोळे उघडे असले तरी कसलीच समज नसते. पण आजूबाजूच्या वातावरणाचा संस्कार खोलवर कुठे तरी होत असतोच. कदाचित म्हणूनच साहित्यिक वसंत आबाजी डहाके यांनी पाळण्याला गर्भाशयाचं एक रुप म्हटलयं.
हेच बाळ मोठं झाल्यावर पुढे झोपाळ्यावर बसायला लागतं. पाळण्याची पुढची आवृत्ती म्हणजे झोपाळा. गावाला हौस म्हणून झाडाला झोपाळा बांधला जातो तेव्हा त्या घनगर्द झाडाच्या सावलीत घेतलेला झोका वेगळीच उर्जा देतो. क्षणात आकाश कवेत येतं तर दुसर्याच क्षणी पुन्हा मातीचा स्पर्श आपल्या पावलांना होतो. जर तो घरातला मोठा झोपाळा असेल तर त्या झोपाळ्याशी संबंधित अनेक आठवणी जोडलेल्या असतात. वार्याच्या झुळकीबरोबर घेतलेला उंच झोका अवकाशात तरंगत असल्याची अनुभूती देतो. आपल्या भावंडांबरोबर उंच झोके घेत म्हटलेली गाणी, मे महिन्यात खाल्लेले आंबे सगळं सगळं आठवतं. याच झोपाळ्यावर बसून वाचलेलं रणजीत देसाईंचं ‘स्वामी’ नकळत त्या काळात घेऊन जातं. मग आईने जेवणासाठी मारलेली हाकही आपल्याला ऎकू आलेली नसते. मग कधीतरी वालाचं बिरड खावसं वाटतं आणि मग याच झोपाळ्यावर भिजलेले वाल सोलले जातात. जेवण झाल्यावर आईस्क्रीमचा स्वाद घेतला जातो.
बर्याच वर्षानंतर कधीतरी मग या झोपाळ्याच्या कड्या कुरकुरायला लागतात. त्यांना गंज चढतो. पण खरं तर ते कुरकुरणं वेगळचं असतं. घरातली मुलं मोठी झालेली असतात. त्यांचं गावाला येणही कमी झालेलं असतं. मग ते झोपाळ्यावर बागडणं, तो झोपाळ्यावर घातलेला हौदोस सगंळं त्या झोपाळ्याला आठवत असतं आणि म्हणुन कदाचित तो कुरकुरायला लागतो. बाह्य उपचार म्हणून त्याला तेल लावलं जातं. पण जेव्हा कधीतरी हीच मोठी झालेली लहान बाळं परत आपल्या मित्रमैत्रिणीबरोबर गावाला येतात तेव्हा तोच हौदोस पुन्हा घातला जातो. मग त्या झोपाळ्यामध्ये पुन्हा तेच पुर्वीचं चैतन्य येतं. तो उंच झोके घ्यायला लागतो. अनेक बर्या वाईट घटनांचा साक्षीदार असतो हा झोपाळा.
गावच्या घरातल्या झोपाळ्यावर एका वेळी पाच-सहा जणांना बसायची सोय होती. पण आता शहरात विभक्त कुटंब पद्धतीत एक किंवा दोन बसू शकतील असा झोपाळा लावलेला असतो. मग या झोपाळ्यावर बसून जूनी हिंदी किंवा मराठी गाणी ऎकली जातात किंवा पंडित हरिप्रसाद चौरसिया यांची बासरी ऎकून मन शांत होतं. उंच झोके तर शक्य नसतात पण थकून घरी आल्यावर काही क्षण डोळे मिटून शांत बसलो तरी दिवसभराचा सगळा शीण निघून जातो. पण मनात कुठेतरी त्या घराच्या झोपाळ्याच्या उंच झोक्याची आठवण रुंजी घालत असते आणि मग कविवर्य मंगेश पाडगावकरांच्या कवितेच्या ओळी ओठावर येतात.
झुले बाई झुला माझा झुले बाई झुला
सकाळच्या उन्हात या झोके घेऊ चला
हिरव्या हिरव्या फांदीला गं
झुला माझा बांधिला गं
आता होता भुईवर भेटे आभाळाला
झुले बाई झुला माझा झुले बाई झुला!

- आरती गांगण
अभिप्राय