Loading ...
/* Dont copy */

महाराष्ट्रातील धर्म आणि पंथ (महाराष्ट्र)

महाराष्ट्रातील धर्म आणि पंथ (महाराष्ट्र) - महाराष्ट्रातील धर्म आणि पंथ यांची सखोल माहीती देणारा लेख [Dharma Aani Pantha, Maharashtra].

महाराष्ट्रातील धर्म आणि पंथ (महाराष्ट्र)

महाराष्ट्रातील धर्म आणि पंथ यांची सखोल माहीती


महाराष्ट्रातील धर्म आणि पंथ (महाराष्ट्र)

(Dharma Aani Pantha - Maharashtra) महाराष्ट्रात उदयास आलेल्या किंवा ज्यांनी आपल्या वैशिष्ट्यांमुळे आजचा महाराष्ट्र व मराठी संस्कृती निर्माण करण्यास मदत केली. अशाच धर्मसंप्रदयांचा प्रस्तुत लेखात थोडक्यात आढावा घेण्याचा प्रयत्न आहे. महाराष्ट्रात मुख्यतः पाच संप्रदाय आहेत. वास्तविक पहाता हे संप्रदाय वैष्णव अथवा शैव पंथांच्या शाखा आहेत. हे संप्रदाय आपापल्या विशिष्टपणामुळे प्रसिद्धिस आले. इतर राज्यात आढळणारा वैष्णव व शैव या दोन पंथांतील दुरावा महाराष्ट्रात दिसून येत नाही.


(छायाचित्र: वारकरी दिंडी)


वैष्णव संप्रदाय


महानुभाव


ह्या प्रमुख संप्रदायांपैकी महानुभाव, वारकरी व रामदासी हे तीन वैष्णव पंथ आहेत. यादव काळात, सुमारे १३ व्या शतकात महानुभाव हा अत्यंत लोकप्रिय पंथ होता. या पंथाची स्थापना चक्रधर स्वामींनी केली. त्यांना "पंचकृष्णा" पैकी एक अवतार मानीत असत. या पंथांची वैदिक धर्मावर श्रद्धा नसली तरी त्याबद्दल आस्था होती. एक सामाजिक गरज म्हणून चातुर्वर्ण्यावर महानुभावांचा विश्वास आहे. मात्र तत्त्व म्हणून ते जातिभेद, स्त्री-पुरुष भेद मानीत नाहीत. ते कृष्णभक्त आहेत आणि कृष्णाचे पाच अवतार झाले असे मानतात. ते भक्तिमार्गी असून काही नियम पाळतात. त्यातील प्रमुख चार नियम म्हणजे शणागती, प्रसाद सेवा, मूर्तिध्यान वा मूर्तिज्ञान आणि नामस्मरण हे होत.

या पंथांवर जैन व बौद्ध धर्मांचा बराच प्रभाव पडलेला दिसून येतो. यतिधर्म (संन्यास) व गृहस्थधर्म या दोहोवर त्यांचा भर आहे. स्त्रियांना मठात संन्यासिनी म्हणून जगण्याचा अधिकार आहे. मात्र विधवांना हा हक्क नाही. ते अहिंसा, शाकाहार, सात्विक जीवन, भिक्षा मागणे व देशभ्रमण या गोष्टी काटेकोरपणे पाळतात. त्यानी एक सांकेतिक लिपी शोधून काढली. ती नऊ तऱ्हांनी लिहिता येते. मराठी भाषेवर महानुभावांचे फार मोठे उपकार आहेत; तसेच त्यांनी भारतीय तत्वज्ञानात मोलाची भर घातली आहे. त्यांचे सुत्रपाठ, सतिग्रंथ, आख्यान काव्य, साधना ग्रंथ, टीकाग्रंथ आणि भाष्यग्रंथ अत्यंत मोलाचे आहेत.

सोळाव्या शतकात महानुभाव पंथाचा प्रसार पंजाबमध्ये झाला. कृष्णराज नावाच्या पंजाबी व्यापाऱ्याने हा धर्मग्रंथ तिकडे नेला. ते पुढे कृष्णमुनी म्हणून प्रसिद्धीस आले. त्यांचा हा संप्रदाय जयकृष्ण पंथ म्हणून पंजाबमध्ये प्रसिद्ध आहे. मराठीत लिहिलेले सूत्रपाठ हिंदी अथवा पंजाबी मातृभाषा असलेले अनुयायी अद्यापही वाचतात. सतराव्या शतकात मोगल बादशहा औरंगजेब याने पंथाला जिझिया करापासून मुक्त केले. कारण त्याला हिन्दू फकीर वाटले. गेली साडेसातशे वर्षे हा पंथ महाराष्ट्रात, मध्य प्रदेशात व पंजाबमध्ये अस्तित्वात आहे. महानुभावांची कृष्णाची मंदिरे मुंबई, दिल्ली व अमृतसर या ठिकाणी आढळतात.

[next]

वारकरी संप्रदाय


वारकरी पंथाचे लोक विष्णूची विठ्ठल या रूपाने आराधना करतात. तेही भक्तिमार्गी आहेत. कर्नाटकच्या होयसाल राज्यकर्त्यांनी या पंथाची प्रथम महाराष्ट्राला ओळख करूने दिली. ज्ञानेश्वर व नामदेव या दोघा संतांनी त्याचा पाया महाराष्ट्रात भक्कम केला. म्हणूनच म्हटले आहे- ज्ञानदेवे रचिला पाया. वारकरी पंथ हा महाराष्ट्रातील एक अत्यंत लोकप्रिय व प्रमुख पंथ आहे. आजही हजारो वारकरी मोठ्या पालख्या घेऊन आषाढी-कार्तिकी एकादशांना दिंड्या काढून पंढरपूरला विठोबाच्या दर्शनासाठी पायी जाताना आढळतात.

विठ्ठल हे दैवत नामदेव वा ज्ञानदेवाच्या जन्माच्या आधीपासून महाराष्ट्रात ठाऊक होते. पंढरपूरच्या देवालयातील शिलालेख त्याची स्थापना सहाव्या शतकात झाली असे दाखवितो. परंतु नामदेव व ज्ञानेश्वरांनी या पंथात एक चैतन्य निर्माण करून या पंथाचा महाराष्ट्रात सर्वत्र प्रसार केला. ज्ञानयोग, भक्तियोग व अद्वैताचा अवलंब करून त्यांनी या भक्तिमार्गाला एक नवा दृष्टिकोन दिला.

वारकरी पंथ जातिभेद, स्त्री-पुरुष भेद मानीत नाही. यज्ञायाग, चातुर्वर्ण्य, दलित वर्ग व स्त्रिया यांचे शोषण याविरूद्ध या पंथाच्या अनुयायी बंडखोरी पुकारली. दलित वर्गीय व स्त्रिया यांना विठ्ठलावर अभंग रचून ते गाण्याचे अधिकार प्राप्त झाले. सर्वांनी मिळून समूहाने अभंग, प्रार्थना, भजन करण्याचा प्रघात पडला. त्याचप्रमाणे कीर्तन हा प्रकार लोकप्रिय झाला. या समूह गायनामध्ये गरीब-श्रीमंत, स्त्री-पुरूष, बुद्धिवान वा निरक्षर असा भेद कधीच केला गेला नाही. या सर्व नव्या रूढीमुळे महाराष्ट्र विठ्ठल भक्तीमुळे उजळून निघाला. देवभक्ती व मानवता या दोन्ही गोष्टींचा महाराष्ट्रावर फार मोठा परिणाम झाला आणि पर्यायाने महाराष्ट्रीय जनतेची एकजूटही वाढली.

या पंथाचा ध्वज वारकरी पंथातील सर्व जातीजमातीतील अनुयायांनी फडकत ठेवला. चोखामेळा (महार), सावता माळी (माळी), तुकाराम (वैश्य) व एकनाथ (ब्राह्मण) अशा सर्व थरातील शिश्यांनी या पंथाला समाजात विशेष स्थान प्राप्त करून दिले. या पंथात गुरू नाही की मठ नाही. वारकरी हा स्वतःच्या हिंमतीने स्वतःला वैकुंठाप्रत नेण्याची आकांक्षा बाळगतो. ते करताना त्याचे भक्तिमार्ग, ज्ञानमार्ग वा कर्ममार्ग या कोणत्याही मार्गाचा अवलंब करावा. असे करीत असता तो जे थोडबहुत नियम पाळतो ते असे- शाकाहार करणे, मद्यपान अथवा स्वैराचार वर्ज्य, एकादशीला उपवास करणे, चंदनाचा टिळा कपाळावर लावणे, गळ्यात तुळशीची माळ घालणे व पंढरपूरची वारी करणे. या अत्यंत साध्या नियमांमुळे अतिशय दरिद्री अथवा निरक्षर माणूससुद्धा या पंथाच्या चौकटीत स्वतःचे स्थान मिळवू शकतो. या संप्रदायामुळे मराठी भाषेला काव्याप्रमाणेच तत्वज्ञानाचे लेणे लाभले.

[next]

समर्थ संप्रदाय


समर्थ रामदास यांचा जन्म ब्राह्मण कुळात, मराठवाडा विभागातील जांब येथे १६०८ साली झाला. रामदास हे रामाचे उपासक होते. परंतु त्यांनी हनुमान उपासनेवर विशेष भर दिला. हा संप्रदाय वर्णाश्रम धर्म, वैदिक तत्त्वज्ञान व मोक्ष मानतो. रामदासांचा विशेष म्हणजे ते स्वतः सामाजिक व राजकीय समस्यांबद्दल अत्यंत जागरूक होते. त्याचप्रमाणे त्यामुळे त्या काळी जनतेवर होणाऱ्या अन्यायाबद्दल त्यांना चीड होती. या सर्वांचा परिणाम त्यांच्या शिकवणुकीवर झाला.

त्यांनी महाराष्ट्रात ठिकठिकाणी मठ स्थापना केली व देवालये बांधली. बलोपासना व एकजूट होण्यासाठी त्यांनी मारूती उपासनेच्या प्रचार केला. व्यायामशाळा, कुस्त्यांचे फड, मर्दानी खेळ यांना प्रोत्साहन दिले. याशिवाय त्यांनी संन्यासधर्म तरुण मंडळीत प्रचलित केला. त्यांनी संन्यासी स्वयंसेवकांची पथके निर्माण केली. हे तरुण संन्यासी मठात रहात. सामाजिक व राजकीय अन्यायांबद्दल जागरूक असत. अन्याय, जुलूम, जबरदस्ती आढळेल तेथे धाव घेऊन लोकांना न्याय मिळवून देत. रामदास हे स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांना गुरुस्थानी होते. त्यांनी महाराजांना उपदेशात्मक लिहिलेले आहे. समर्थांचे मठ हे कित्येक मराठी सैनिकांची आश्रयस्थाने असत.

रामदास तत्वज्ञानी व विद्वावान होते. त्यांने निर्गुण व निराकार अशा विष्णूची (रामाच्या) भक्तिमार्गाची शिकवण दिली. या पंथात पादुका-पूजेला एक आगळे स्थान आहे. हे आणि त्यांचे शिष्य यांनी मराठी वाङ्‍मयात विशेष भर घातली आहे. रामदासांचा दासबोध व मनाचे श्लोक महाराष्ट्रात आजही मोठा प्रमाणावर वाचले जातात. भागवत धर्मामध्ये समर्थ संप्रदायाला एक विशेष स्थान आहे. त्यांनी लोकजागृती, लोकांची एकजूट व राजकारणाबद्दल आस्था यावर विशेष भर दिला. त्याचप्रमाणे मनाच्या सौंदर्याप्रमाणे तितकेच आवश्यक आहे अशी शिकवणूक दिली.

[next]

दत्त संप्रदाय


या पंथांत विष्णू आणि शिवभक्तीचा मिलाफ दिसून येतो. दत्तात्रेय हा ब्रह्म, विष्णू आणि महेश या त्रयींचा संगम होय. पुराणे व उपनिषदे या दैवताच्या उत्पतीची, तसेच त्याच्या कार्याची, शिष्यांची व तत्वज्ञानाची माहिती पुरवितात. या सर्व लेखी पुराव्यावरून हे दैवत मुळात कारण शाक्तपंथीय असावे असे वाटते. पाच ‘म’कारांच्या उपभोगाचीही माहिती यात आढळते. बाराव्या शतकात दत्तात्रेयाची मूर्ती एकमुखी आढळते. मात्र पंधराव्या शतकापासून ते त्रिमुखी झालेली दिसते.

महाराष्ट्रात या दैवताचा उल्लेख महानुभाव, वारकरी व नाथ पंथातही आढळतो. श्री नृसिंहसरस्वती (इ.स.१३००) यांचा जन्म अकोला येथे झाला. त्यांनी दत्तोपासनेला एक वेगळेच स्वरूप देऊन महाराष्ट्रात हा पंथ लोकप्रिय केला. ते स्वतः गावोगावी हिंडले व पंथाचा प्रचार केला. त्यांनी सुदैवाने अत्यंत गुणी असा शिष्यगण प्राप्त झाला. उदाहरणादाखल नावे घ्यावयाची झाल्यास जनार्दनस्वामी, दासोपंत, मुक्तेश्वर, माणिक प्रभू व श्रीधरस्वामी यांना विसरता येणार नाही.

दत्तात्रेयाचे उपासक य दैवताची पूजा ‘गुरू’च्या स्वरूपात करतात. म्हणूनच की काय गुरूदेव दत्त किंवा श्रीगुरू दत्त असा त्याचा उल्लेख होत असतो. हा पंथ वर्णाश्रम धर्माचा पुरस्कार करीत असला तरी संन्यास धर्माला विशेष मानतो. गुरूभक्ती, साधना, सिद्धान्त व पादुका पूजा यावर या संप्रदायाचा विशेष भर आहे. उपासक वर्ग हा बहुधा माहूर, औदुंबर, नरसोबाची वाडी व गाणगापूर (कर्नाटक) येथे यात्रा करीत असतो. शिरडीचे साईबाबा हे काहींच्या मते दत्तात्रेयाचे अवतार आहेत. या संप्रदायाकडे हिंदू संन्यासीच नव्हे पण मुसलमान फकीरसुद्धा आकर्षित झाले होते.

[next]

शैव आणि शाक्त पंथ


नाथ संप्रदाय


नाथ संप्रदाय हा महाराष्ट्रातील एक लोकप्रिय व प्राचीन संप्रदाय आहे. महाराष्ट्रातील हरीनाथ यांची शिकवण विदर्भ व मराठवाडाभर पसरली तर बंगालचे मत्स्येन्द्रनाथ यांचे शिकवण महाराष्ट्रातील इतर भागात पसरली हरिनाथांचा भर वेदान्त सिद्धान्तावर तर. मत्स्येन्द्रनाथांचा भर योगतंत्रावर अधिक होता.

आदिनाथा हे या सांप्रदायाचे प्रवर्तक. नवनाथ व सिद्ध या नावाने ओळखली जाणारी त्यांची मोठी शिष्यपरंपरा आहे. अकराव्या आणि बाराव्या शतकात महाराष्ट्रभर या संप्रदायाचा प्रसार झाला. ज्ञानेश्वरांचे वडील बंधू निवृत्तीनाथ यांचे गुरू गहिनीनाथ हे नाथ पंथीयच होते. या दोन्ही बंधूंच्या शिकवणीचा वारकरी व महानुभव पंथांवर परिणाम झाला. नाथ संप्रदायातील बरीच तत्वे वारकरी पंथात शिरली ती केवळ निवृत्तीनाथ व ज्ञानेश्वर यांच्यामुळेच, म्हणून वारकरी पंथात विठ्ठल भक्तीशिवाय द्वैत, अद्वैत, योग आणि तंत्र यांची सांगड घातलेली दिसते.

नाथ पंथीय योगविद्येत विशेष प्रवीण होते. हठयोग हा तर त्यांचा आवडता छंद, असे म्हणता की हठयोगामुळे पाण्यावरून चालणे, अवकाशात फिरणे अथवा श्वसनक्रियेवर ताबा मिळवून आयुष्य वाढविणे या गोष्टी त्यांना सहजसाध्य होत्या. आत्यंतिक गुरूभक्ती हा तर त्यांचा एक विशेष. गोरक्षनाथाच्या शिष्याने आपल्या गुरूची वडा खाण्याची इच्छा पूर्ण करण्याकरिता एका वृद्ध बाईला आपला डोळा अर्पण केला अशी आख्यायिका आहे. योगामुळे सिद्धि प्राप्त होतात. परंतु त्याचे प्रदर्शन करू नये असा एक दण्डक होता. तांत्रिक विद्येलासुद्धा या पंथात स्थान आहे. तंत्रसाधना करण्यासाठी शजयान व वज्रयान या मार्गाचा ते अवलंब करीत.

महायान बौद्धधर्माची आपल्याला इथे आठवण येते. शिव आणि शक्ती या एकच आहेत, परंतु योग्य वेळी त्यांची फारकत करता येते असा त्यांचा विश्वास आहे. शिव-शक्ती-अद्वैतवाद हे नवीन तत्त्व गोरक्षनाथांनी शिकविले. या पंथात स्त्रियांना मानाने वागविले गेले. गोरक्षनाथांच्या विमलादेवी नांवाच्या तांत्रिक विद्येतील शिष्येने महाराष्ट्रात आई-नाथ असा एक उपपंथही काढला होता. नाथपंत मुख्यत्वे बीड, आळंदी, अहमदनगर व सातपुडा येथे जास्त लोकप्रिय आहे. शैव संप्रदायात जेजूरीचा खंडोबा, नाशिकचा त्र्यंबकेश्वर व अष्टविनायक मोडतात. ही दैवतेही महाराष्ट्रात अजून प्रचलित आहेत आणि लोकप्रिय आहेत.

[next]

शाक्तपंथ


शाक्तपंथाचा महाराष्ट्रातील इतिहास हा तसा गूढच आहे. परंतु पार्वतीची उपासना निरनिराळ्या नावाने इथे प्रचलित आहे. तिची एकंदर साडेतीन पीठे महाराष्ट्रात आहेत. ती म्हणजे महालक्ष्मी, भवानी, रेणुका व सप्तश्रृंगी होत. प्रत्येक महाराष्टीय कुटुंबाला एकेक कुलदैवत व कुलदेवी असते. ज्यांची ते मनोभावे पुजा करतात.

मातृक-देवता


महालक्ष्मी अम्बा या नावाने विशेष प्रसिद्ध आहे.तिचे देऊळ कोल्हापूला असून त्यातील शिलालेखावरून ते राष्ट्रकूटांच्या कारकीर्दीत नवव्या शतकात उभे राहिले असे दिसते. या देवालयातील एका भिंतीवर श्री-यंत्र कोरलेले दिसते. त्यावरून ही देवी शाक्तपंथीय असावी असे वाटते. हे दैवत मराठ्यांच्या काळात विशेष प्रसिद्धीस आले. क्षत्रिय व वैश्य अशा सर्व जातीत या देवीचे भक्त आहेत.

भवानीचे देऊळ तुळजापूरला आहे. ही देवी मराठ्यांच्या काळात लौकिकास आली. छत्रपती शिवाजी महाराज तिच्या दर्शनास येत व तेथे त्यांना स्फूर्ती मिळत असे. भोसले घराण्याचे हे कुलदैवत आहे. रामदास स्वामी देखील हिचे उपासक होते. या देवीला पशूबळी व मद्य यांचा नैवेद्य दाखवीत. ही प्रथा आता नष्ट होत चालली आहे. परंतु ती प्रथा शाक्त पंथाची द्योतक आहे.

रेणुका ही महाराष्ट्रातील एकवीरा, यमाई व यलम्मा या नावानीही ओळखली जाते. एकवीरा देवीचे अर्थ कोरीव शिल्प कार्ले येथील लेण्यांच्या आवारात आढळते. एकवीरा हा शब्द एक विहार (बुद्धभिक्षूंचे रहाण्याचे स्थान) यावरून आला असावा. भाषा-नियम शास्त्रानुसार या तर्काला पुष्टी मिळते. गंमत अशी की हे दैवत फक्त क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र या जातीतील लोकांचेच कुलदैवत आहे. ब्राह्मणांचे कुलदैवत असल्याचे ऐकिवात नाही. ही सूचकता आपल्याला प्राचीन महाराष्ट्राच्या इतिहासात तर घेऊन जात नाही ना की जेव्हा बौद्धधर्म महाराष्ट्रात अत्यंत लोकप्रिय असून या तिन्ही थरातील लोक त्याचे निष्ठावंत उपासक होते. दर वर्षी हजारो भक्त चैत्र पौर्णिमेला कार्ले (लोणावळे) येथे जाऊन तिचे दर्शन घेतात. तिला कोंबडी अथवा बकरे नैवेद्य म्हणून अर्पण करतात.

यमाईचे भक्तगण बहुधा सातारा, सोलापूर, पुणे व अहमदनगर या जिल्ह्यात आढळतात. तिचे देऊळ औंध येथे टेकडीवर बांधलेले आहे. काही विद्वानांच्या मते यमाई ही दुर्गादेवीचा एक अवतार आहे. यलम्मा देवी कर्नाटकात जास्त मानली जाते.

सप्तशृंगी ही देवता अर्धपीठ म्हणून समजली जाते. इतरांप्रमाणे हिचे देऊळ सप्तशृंगीच्या डोंगरावर आढळते. ते नाशिक जिल्हयात आहे. ती बऱ्याच महाराष्ट्रीय कुटुंबांची कुलदेवता आहे. नाशिक, धुळे व जळगांव या जिल्ह्यात ती अधिक लोकप्रिय आहे.

सुफी पंथ


हिंदू धर्मातील संप्रदायांप्रमाणेच काही अहिंदू संप्रदायांनीही महाराष्ट्रीय जनतेवर छाप बसविली. अशा संप्रदायांपैकी एक म्हणजे सुफी-पंथ हा इस्लाम धर्मीय पंथ असून इस्लाम धर्मातील भक्तिमार्गी पंथ आहे. हा पंथ महाराष्ट्रात नवव्या शतकात इजिप्तमधील नुरूद्दिन या संताने आणला. यादवोत्तर काळात, सुमारे १३ व्या शतकाला मुतजबोद्देन याने याचा प्रचार पैठण, विजापूर, गाणगापूर, पुणे आणि पेण या भागात केला. याच शतकात नाथ व महानुभाव पंथीय उपासकांची त्यांच्याशी देवाणधेवाण झाली. ही देवाणघेवाण तत्वांची होती. काबूलच्या बाब रतन हाजीचा संबंध गोरखनाथाशी आला व त्याने काफिर-बोध नावाचा ग्रंथ लिहिला. पुष्कळ इस्लाम धर्म पंथीयांनी नाथ पंथात प्रवेश केला तसेच महानुभावींचे मठ देखील काबूल व कंदाहार मध्ये स्थापले गेले. याशिवाय आठव्या शतकात कोकणात अनेक अरब व्यापारी आले आणि त्यांच्यामुळे महाराष्ट्रात इस्लाम धर्माचा प्रसार होण्यास मदत झाली.

बौद्धधर्म (नवबौद्ध धर्म)


सदर लेख नवबौद्धधर्माचा उल्लेख न केल्यास अपुरा ठरेल. महाराष्ट्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या हजारो अनुयायांसह १९५६ च्या विजयादशमीच्या दिवशी बुद्धधर्मात प्रवेश केला. हा दीक्षा समारंभ नागपूर येथे झाला. महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा व कोकण येथील दलित समाजाने यात मोठ्या प्रमाणात भाग घेतला.

पुरातन वास्तू व प्राचीन लिखाण यांचा शोध घेतला असता बौद्धधर्म महाराष्ट्रात सातव्या शतकापर्यंत मोठ्या प्रमाणावर प्रचलित होता. पर्सी ब्राऊन या विद्वानाच्या मते बौद्ध शिल्पांपैकी अर्ध्याहून अधिक शिल्पे महाराष्ट्रात सापडतात ही गोष्ट बौद्ध धर्माला महाराष्ट्रात त्या काळी असलेली लोकप्रियता दर्शविते. अशा तऱ्हेची डोंगरात खोदून काढलेली वास्तु-शिल्पे कोणी वास्तुसौंदर्यासाठी निर्माण करीत बसत नाहीत किंवा वैयक्तिक आवडीपोटीही ती निर्माण होत नाहीत हे उघडच आहे.

या चळवळीमध्ये दलित वर्गातील महार समाज डॉ. आंबडेकरांच्या पाठीशी निर्धाराने उभा राहिला. आज नवबौद्धांमध्ये स्वतःबद्दल आत्मविश्वास आढळतो. कित्येकांनी आपली चांगली उन्नती केली आहे. बरेच जन सरकारी नोकर म्हणुन काम करीत आहेत. मोठ्या प्रमाणात उच्च शिक्षण घेत आहेत. जगातील इतर बौद्धधर्मीयापेक्षा ते अनेक दृष्टींनी वेगळे आहेत. कारण ते भारतीय आहेत. बव्हंशी बौद्ध धर्मातील हीनयान पंथाचे ते अनुयायी असून आज महाराष्ट्रात त्यांनी स्वतःचे असे वेगळे स्थान निर्माण केले आहे.


महाराष्ट्रातील धर्म आणि पंथ (महाराष्ट्र) संबंधी महत्त्वाचे दुवे:


- मीना तालीम


मराठीमाती डॉट कॉम संपादक मंडळ
२००२ । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.

अभिप्राय

नाव

अ रा कुलकर्णी,1,अ ल खाडे,2,अ ज्ञा पुराणिक,1,अंकित भास्कर,1,अंजली भाबट-जाधव,1,अंधश्रद्धेच्या कविता,5,अकोला,1,अजय दिवटे,1,अजित पाटणकर,18,अनंत दळवी,1,अनंत फंदी,1,अनंत भावे,1,अनिकेत येमेकर,2,अनिकेत शिंदे,1,अनिल गोसावी,2,अनिल भारती,1,अनिल वल्टे,8,अनुभव कथन,19,अनुरथ गोरे,1,अनुराधा पाटील,1,अनुराधा फाटक,39,अनुवादित कविता,1,अपर्णा तांबे,7,अब्राहम लिंकन,2,अभंग,6,अभिजित गायकवाड,1,अभिजीत टिळक,2,अभिव्यक्ती,1386,अभिषेक कातकडे,5,अभिषेक घुगे,1,अमन मुंजेकर,7,अमरश्री वाघ,2,अमरावती,1,अमित पडळकर,4,अमित पवार,1,अमित बाविस्कर,3,अमित सुतार,1,अमुक-धमुक,1,अमृत जोशी,1,अमृता शेठ,1,अमोल कोल्हे,1,अमोल तांबे,1,अमोल देशमुख,1,अमोल बारई,7,अमोल वाघमारे,1,अमोल सराफ,2,अरविंद जामखेडकर,1,अरविंद थगनारे,5,अरुण कोलटकर,1,अरुण म्हात्रे,1,अर्चना कुळकर्णी,1,अर्चना डुबल,2,अर्जुन फड,3,अर्थनीति,3,अल्केश जाधव,1,अविनाश धर्माधिकारी,2,अशोक थोरात,1,अशोक रानडे,1,अश्विनी तातेकर-देशपांडे,1,अश्विनी तासगांवकर,2,अस्मिता मेश्राम-काणेकर,7,अहमदनगर,1,अक्षय वाटवे,1,अक्षरमंच,1132,आईच्या कविता,29,आईस्क्रीम,3,आकाश पवार,2,आकाश भुरसे,8,आज,6,आजीच्या कविता,1,आठवणींच्या कविता,18,आतले-बाहेरचे,3,आतिश कविता लक्ष्मण,1,आत्मविश्वासाच्या कविता,15,आदर्श कामिरे,4,आदित्य कदम,1,आदेश ताजणे,8,आनंद दांदळे,8,आनंद प्रभु,1,आनंदाच्या कविता,26,आमट्या सार कढी,18,आर समीर,1,आरती गांगण,2,आरती शिंदे,4,आरत्या,82,आरोग्य,21,आशा गवाणकर,1,आशिष खरात-पाटील,1,आशिष चोले,1,इंदिरा गांधी,1,इंदिरा संत,6,इंद्रजित नाझरे,26,इंद्रजीत भालेराव,1,इतिहास,281,इलाही जमादार,1,इसापनीती कथा,48,उत्तम कोळगावकर,2,उदय दुदवडकर,1,उन्मेष इनामदार,1,उपवासाचे पदार्थ,15,उमा पाटील,1,उमेश कानतोडे,1,उमेश कुंभार,14,उमेश चौधरी,1,उस्मानाबाद,1,ऋग्वेदा विश्वासराव,5,ऋचा पिंपळसकर,10,ऋचा मुळे,18,ऋषिकेश शिरनाथ,2,ऋषीकेश कालोकार,2,ए श्री मोरवंचीकर,1,एच एन फडणीस,1,एप्रिल,30,एम व्ही नामजोशी,1,एहतेशाम देशमुख,2,ऐतिहासिक स्थळे,2,ऑक्टोबर,31,ऑगस्ट,31,ऑडिओ कविता,15,ऑडिओ बुक,1,ओंकार चिटणीस,1,ओम ढाके,8,ओमकार खापे,1,ओशो,1,औरंगाबाद,1,कपिल घोलप,12,करण विधाते,1,करमणूक,72,कर्क मुलांची नावे,1,कल्पना देसाई,1,कल्याण इनामदार,1,कविता शिंगोटे,1,कवितासंग्रह,280,कवी अनिल,1,कवी ग्रेस,4,कवी बी,1,काजल पवार,1,कार्यक्रम,12,कार्ल खंडाळावाला,1,कालिंदी कवी,2,काशिराम खरडे,1,कि का चौधरी,1,किरण कामंत,1,किल्ले,97,किल्ल्यांचे फोटो,5,किशोर चलाख,6,किशोर पवार,1,कुठेतरी-काहीतरी,3,कुणाल खाडे,3,कुणाल लोंढे,1,कुसुमाग्रज,9,कृष्णकेशव,1,कृष्णाच्या आरत्या,5,के के दाते,1,के तुषार,8,के नारखेडे,2,केदार कुबडे,40,केदार नामदास,1,केदार मेहेंदळे,1,केशव मेश्राम,1,केशवकुमार,2,केशवसुत,5,कोल्हापूर,1,कोशिंबीर सलाड रायते,14,कौशल इनामदार,1,खंडोबाची स्थाने,2,खंडोबाच्या आरत्या,2,खरगपूर,1,ग दि माडगूळकर,6,ग ल ठोकळ,3,ग ह पाटील,4,गंगाधर गाडगीळ,1,गझलसंग्रह,1,गडचिरोली,1,गणपतीच्या आरत्या,5,गणपतीच्या गोष्टी,24,गणेश कुडे,2,गणेश तरतरे,20,गणेश निदानकर,1,गणेश पाटील,1,गणेश भुसारी,1,गण्याचे विनोद,1,गाडगे बाबा,1,गायत्री सोनजे,5,गावाकडच्या कविता,14,गुरुदत्त पोतदार,2,गुरूच्या आरत्या,2,गुलझार काझी,1,गो कृ कान्हेरे,1,गो गं लिमये,1,गोकुळ कुंभार,13,गोड पदार्थ,55,गोपीनाथ,2,गोविंद,1,गोविंदाग्रज,1,गौतम जगताप,1,गौरांग पुणतांबेकर,1,घरचा वैद्य,2,घाट,1,चंद्रकांत जगावकर,1,चंद्रपूर,1,चटण्या,3,चातुर्य कथा,6,चित्रपट समीक्षा,1,चैतन्य म्हस्के,1,चैत्राली इंगळे,2,जयश्री चुरी,1,जयश्री मोहिते,1,जवाहरलाल नेहरू,1,जळगाव,1,जाई नाईक,1,जानेवारी,31,जालना,1,जितेश दळवी,1,जिल्हे,31,जीवनशैली,432,जुलै,31,जून,30,ज्योती किरतकुडवे,1,ज्योती मालुसरे,1,टीझर्स,1,ट्रेलर्स,3,ठाणे,2,डिसेंबर,31,डॉ मानसी राजाध्यक्ष,1,डॉ. दिलीप धैसास,1,तनवीर सिद्दिकी,1,तन्मय धसकट,1,तरुणाईच्या कविता,7,तिच्या कविता,63,तुकाराम गाथा,4,तुकाराम धांडे,1,तुतेश रिंगे,1,तेजश्री कांबळे-शिंदे,4,तेजस्विनी देसाई,1,दत्ता हलसगीकर,2,दत्ताच्या आरत्या,5,दत्तात्रय भोसले,1,दत्तो तुळजापूरकर,1,दया पवार,1,दर्शन जोशी,2,दर्शन शेळके,1,दशरथ मांझी,1,दादासाहेब गवते,1,दामोदर कारे,1,दिनदर्शिका,366,दिनविशेष,366,दिनेश बोकडे,1,दिनेश लव्हाळे,1,दिनेश हंचाटे,1,दिपक शिंदे,2,दिपाली गणोरे,1,दिवाळी फराळ,26,दीपा दामले,1,दीप्तीदेवेंद्र,1,दुःखाच्या कविता,76,दुर्गेश साठवणे,1,देवीच्या आरत्या,3,देशभक्तीपर कविता,3,धनंजय सायरे,1,धनराज बाविस्कर,71,धनश्री घाणेकर,1,धार्मिक स्थळे,1,धुळे,1,धोंडोपंत मानवतकर,12,नमिता प्रशांत,1,नलिनी तळपदे,1,ना के बेहेरे,1,ना घ देशपांडे,4,ना धों महानोर,3,ना वा टिळक,1,नांदेड,1,नागपूर,1,नारायण शुक्ल,1,नारायण सुर्वे,2,नाशिक,1,नासीर संदे,1,निखिल पवार,3,नितीन चंद्रकांत देसाई,1,निमित्त,4,निराकाराच्या कविता,16,निवडक,9,निसर्ग कविता,37,निसर्ग चाटे,2,निळू फुले,1,नृसिंहाच्या आरत्या,1,नोव्हेंबर,30,न्याहारी,50,पथ्यकर पदार्थ,2,पद्मा गोळे,4,परभणी,1,पराग काळुखे,1,पर्यटन स्थळे,1,पल्लवी माने,1,पवन कुसुंदल,2,पांडुरंग वाघमोडे,3,पाककला,322,पाककृती व्हिडिओ,15,पालकत्व,7,पावसाच्या कविता,40,पी के देवी,1,पु ल देशपांडे,9,पु शि रेगे,1,पुंडलिक आंबटकर,4,पुडिंग,10,पुणे,15,पुरुषोत्तम जोशी,1,पुरुषोत्तम पाटील,1,पुर्वा देसाई,2,पूजा काशिद,1,पूजा चव्हाण,1,पूनम राखेचा,1,पोस्टर्स,5,पोळी भाकरी,27,पौष्टिक पदार्थ,20,प्र श्री जाधव,12,प्रकाश पाटील,1,प्रजोत कुलकर्णी,1,प्रतिक बळी,1,प्रतिभा जोजारे,1,प्रतिमा इंगोले,1,प्रतिक्षा जोशी,1,प्रदिप कासुर्डे,1,प्रफुल्ल चिकेरूर,10,प्रभाकर महाजन,1,प्रभाकर लोंढे,3,प्रवास वर्णन,1,प्रवासाच्या कविता,11,प्रविण पावडे,15,प्रवीण दवणे,1,प्रवीण राणे,1,प्रशांतकुमार मोहिते,2,प्रसन्न घैसास,2,प्रज्ञा वझे,2,प्रज्ञा वझे-घारपुरे,10,प्राजक्ता गव्हाणे,1,प्रितफुल प्रित,1,प्रिती चव्हाण,27,प्रिया जोशी,1,प्रियांका न्यायाधीश,3,प्रेम कविता,97,प्रेरणादायी कविता,17,फ मुं शिंदे,3,फादर स्टीफन्स,1,फेब्रुवारी,29,फोटो गॅलरी,11,फ्रॉय निस्सेन,1,बहिणाबाई चौधरी,6,बा भ बोरकर,8,बा सी मर्ढेकर,6,बातम्या,11,बाबा आमटे,1,बाबाच्या कविता,10,बाबासाहेब आंबेड,1,बायकोच्या कविता,5,बालकविता,14,बालकवी,9,बाळाची मराठी नावे,1,बाळासाहेब गवाणी-पाटील,21,बिपीनचंद्र नेवे,1,बी अरुणाचलाम्‌,1,बी रघुनाथ,1,बीड,1,बुलढाणा,1,बेकिंग,9,बेहराम कॉन्ट्रॅक्टर,1,भंडारा,1,भक्ती कविता,23,भक्ती रावनंग,1,भरत माळी,2,भा दा पाळंदे,1,भा रा तांबे,7,भा वें शेट्टी,1,भाग्यवेध,1,भाज्या,29,भाताचे प्रकार,16,भानुदास,1,भानुदास धोत्रे,1,भावनांची वादळे,1,भुषण राऊत,1,भूगोल,1,भूमी जोशी,1,म म देशपांडे,1,मं वि राजाध्यक्ष,1,मंगला गोखले,1,मंगळागौरीच्या आरत्या,2,मंगेश कळसे,9,मंगेश पाडगांवकर,5,मंजुषा कुलकर्णी,2,मंदिरांचे फोटो,3,मंदिरे,4,मधल्या वेळेचे पदार्थ,41,मधुकर आरकडे,1,मधुकर जोशी,1,मधुसूदन कालेलकर,2,मनमोहन नातू,3,मनाचे श्लोक,205,मनिषा दिवेकर,3,मनिषा फलके,1,मनोज शिरसाठ,9,मराठी,1,मराठी उखाणे,2,मराठी कथा,107,मराठी कविता,1173,मराठी कवी,3,मराठी कोट्स,4,मराठी गझल,30,मराठी गाणी,2,मराठी गोष्टी,67,मराठी चारोळी,42,मराठी चित्रपट,19,मराठी टिव्ही,53,मराठी नाटक,1,मराठी पुस्तके,7,मराठी प्रेम कथा,23,मराठी भयकथा,44,मराठी मालिका,20,मराठी रहस्य कथा,2,मराठी लेख,48,मराठी विनोद,1,मराठी साहित्य,288,मराठी साहित्यिक,2,मराठी सुविचार,2,मराठीप्रेमी पालक महासंमेलन,5,मराठीमाती,145,मसाले,12,महात्मा गांधी,8,महात्मा फुले,1,महाराष्ट्र,307,महाराष्ट्र फोटो,11,महाराष्ट्राचा इतिहास,32,महाराष्ट्रीय पदार्थ,22,महालक्ष्मीच्या आरत्या,2,महेंद्र म्हस्के,1,महेश जाधव,3,महेश बिऱ्हाडे,9,मांसाहारी पदार्थ,17,माझं मत,4,माझा बालमित्र,88,मातीतले कोहिनूर,19,माधव ज्यूलियन,6,माधव मनोहर,1,माधवानुज,3,मानसी सुरज,1,मारुतीच्या आरत्या,2,मार्च,31,मिलिंद खांडवे,1,मीना तालीम,1,मुंबई,12,मुंबई उपनगर,1,मुकुंद भालेराव,1,मुकुंद शिंत्रे,35,मुक्ता चैतन्य,1,मुलांची नावे,1,मुलाखती,1,मे,31,मैत्रीच्या कविता,8,मोहिनी उत्तर्डे,2,यवतमाळ,1,यशपाल कांबळे,4,यशवंत दंडगव्हाळ,25,यादव सिंगनजुडे,2,योगा,1,योगेश कर्डिले,6,योगेश सोनवणे,2,रंगपंचमी,1,रंजना बाजी,1,रजनी जोगळेकर,5,रत्नागिरी,1,रविंद्र गाडबैल,1,रविकिरण पराडकर,1,रवींद्र भट,1,रा अ काळेले,1,रा देव,1,रागिनी पवार,1,राजकारण,2,राजकीय कविता,12,राजकुमार शिंगे,1,राजेंद्र भोईर,1,राजेश पोफारे,1,राजेश्वर टोणे,3,राम मोरे,1,रामकृष्ण जोशी,2,रामचंद्राच्या आरत्या,5,रायगड,1,राहुल अहिरे,3,रुपेश सावंत,1,रेश्मा जोशी,2,रेश्मा विशे,1,रोहित काळे,7,रोहित साठे,15,लघुपट,3,लता मंगेशकर,2,लहुजी साळवे,1,लक्ष्मण अहिरे,2,लक्ष्मीकांत तांबोळी,2,लातूर,1,लिलेश्वर खैरनार,2,लीना पांढरे,1,लीलावती भागवत,1,लोकमान्य टिळक,3,लोणची,9,वंदना विटणकर,2,वर्धा,1,वसंत बापट,12,वसंत साठे,1,वसंत सावंत,1,वा गो मायदेव,1,वा ना आंधळे,1,वा भा पाठक,2,वा रा कांत,3,वात्रटिका,2,वादळे झेलतांना,2,वामन निंबाळकर,1,वासुदेव कामथ,1,वाळवणाचे पदार्थ,6,वि दा सावरकर,3,वि भि कोलते,1,वि म कुलकर्णी,5,वि स खांडेकर,1,विंदा करंदीकर,8,विक्रम खराडे,1,विचारधन,215,विजय पाटील,1,विजया जहागीरदार,1,विजया वाड,2,विजया संगवई,1,विठ्ठल वाघ,3,विठ्ठलाच्या आरत्या,5,विद्या कुडवे,4,विद्या जगताप,2,विद्याधर करंदीकर,1,विनायक मुळम,1,विरह कविता,58,विराज काटदरे,1,विलास डोईफोडे,5,विवेक जोशी,3,विशाल शिंदे,1,विशेष,12,विष्णूच्या आरत्या,4,विज्ञान तंत्रज्ञान,2,वृषाली सुनगार-करपे,1,वेदांत कोकड,1,वैभव गव्हाळे,1,वैभव सकुंडे,1,वैशाली झोपे,1,वैशाली नलावडे,1,व्यंगचित्रे,17,व्रत-वैकल्ये,1,व्हिडिओ,13,शंकर रामाणी,1,शंकर विटणकर,1,शंकर वैद्य,1,शंकराच्या आरत्या,4,शरणकुमार लिंबाळे,1,शशांक रांगणेकर,1,शशिकांत शिंदे,1,शां शं रेगे,1,शांततेच्या कविता,9,शांता शेळके,11,शांताराम आठवले,1,शाम जोशी,1,शारदा सावंत,4,शाळेचा डबा,15,शाळेच्या कविता,11,शितल सरोदे,1,शिरीष पै,1,शिरीष महाशब्दे,8,शिल्पा इनामदार-आर्ते,1,शिवाजी महाराज,7,शिक्षकांवर कविता,4,शुभम बंबाळ,2,शुभम सुपने,2,शेतकर्‍याच्या कविता,14,शेती,1,शेषाद्री नाईक,1,शैलेश सोनार,1,श्याम खांबेकर,1,श्रद्धा नामजोशी,9,श्रावणातल्या कहाण्या,27,श्री दि इनामदार,1,श्री बा रानडे,1,श्रीकृष्ण पंडित,1,श्रीकृष्ण पोवळे,1,श्रीधर रानडे,2,श्रीधर शनवारे,1,श्रीनिवास खळे,1,श्रीपाद कोल्हटकर,1,श्रीरंग गोरे,1,श्रुती चव्हाण,1,संघर्षाच्या कविता,33,संजय उपाध्ये,1,संजय डोंगरे,1,संजय पाटील,1,संजय बनसोडे,2,संजय शिंदे,1,संजय शिवरकर,5,संजय सावंत,1,संजीवनी मराठे,3,संत एकनाथ,1,संत चोखामेळा,1,संत जनाबाई,1,संत तुकडोजी महाराज,2,संत तुकाराम,8,संत नामदेव,3,संत ज्ञानेश्वर,6,संतोष जळूकर,1,संतोष झोंड,1,संतोष सेलुकर,30,संदिप खुरुद,5,संदीपकुमार खुरुद,1,संदेश ढगे,39,संध्या भगत,1,संपादक मंडळ,1,संपादकीय,11,संपादकीय व्यंगचित्रे,2,संस्कार,2,संस्कृती,133,सई कौस्तुभ,1,सचिन पोटे,12,सचिन माळी,1,सण-उत्सव,22,सणासुदीचे पदार्थ,32,सतिश चौधरी,1,सतीश काळसेकर,1,सदानंद रेगे,2,सदाशिव गायकवाड,2,सदाशिव माळी,1,सनी आडेकर,10,सप्टेंबर,30,समर्थ रामदास,206,समर्पण,8,सरबते शीतपेये,8,सरयु दोशी,1,सरला देवधर,1,सरिता पदकी,3,सरोजिनी बाबर,1,सलीम रंगरेज,8,सविता कुंजिर,1,सांगली,1,सागर बनगर,1,सागर बाबानगर,1,सातारा,1,साने गुरुजी,5,सामाजिक कविता,113,सामान्य ज्ञान,8,सायली कुलकर्णी,7,साहित्य सेतू,1,साक्षी खडकीकर,9,साक्षी यादव,1,सिंधुदुर्ग,1,सिद्धी भालेराव,1,सिमा लिंगायत-कुलकर्णी,3,सुदेश इंगळे,24,सुधाकर राठोड,1,सुनिल नागवे,1,सुनिल नेटके,1,सुनील गाडगीळ,1,सुभाष कटकदौंड,2,सुमती इनामदार,1,सुमित्र माडगूळकर,1,सुरज दळवी,1,सुरज दुतोंडे,1,सुरज पवार,1,सुरेश भट,2,सुरेश सावंत,2,सुशील दळवी,1,सुशीला मराठे,1,सुहास बोकरे,6,सैनिकांच्या कविता,4,सैरसपाटा,128,सोपानदेव चौधरी,1,सोमकांत दडमल,1,सोलापूर,1,सौरभ सावंत,1,स्तोत्रे,2,स्नेहा कुंभार,1,स्फुटलेखन,4,स्फूर्ती गीत,1,स्माईल गेडाम,4,स्वप्ना पाटकर,1,स्वप्नाली अभंग,5,स्वप्नील जांभळे,2,स्वाती काळे,1,स्वाती खंदारे,320,स्वाती गच्चे,1,स्वाती दळवी,9,स्वाती नामजोशी,31,स्वाती पाटील,1,स्वाती वक्ते,2,ह मुलांची नावे,1,हमार्टिक समा,1,हरितालिकेच्या आरत्या,1,हर्षद खंदारे,42,हर्षद माने,1,हर्षदा जोशी,3,हर्षवर्धन घाटे,2,हर्षाली कर्वे,2,हसनैन आकिब,3,हितेशकुमार ठाकूर,1,हिरवळ,1,हेमंत जोगळेकर,1,हेमंत देसाई,1,हेमंत सावळे,1,हेमा चिटगोपकर,8,होळी,5,ज्ञानदा आसोलकर,1,ज्ञानदेवाच्या आरत्या,2,marathimati,1,
ltr
item
मराठीमाती । माझ्या मातीचे गायन: महाराष्ट्रातील धर्म आणि पंथ (महाराष्ट्र)
महाराष्ट्रातील धर्म आणि पंथ (महाराष्ट्र)
महाराष्ट्रातील धर्म आणि पंथ (महाराष्ट्र) - महाराष्ट्रातील धर्म आणि पंथ यांची सखोल माहीती देणारा लेख [Dharma Aani Pantha, Maharashtra].
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEj3W4zQvlF_jdttPZRb0GQvcWFolPkm9v5oK85yqEwnyUxgORNaS2sj0iqALhnQHtneeIKYyiBTsKTwek_LYzl5X1oeEyIHu0CMIIHcqnxdFkLs7Dr_vEi10_nEtgrWY061ZyEIfUJluWf9mTSj61mNnsZprMLuFko6q1SBdJaSdkIszvE/s1600-rw/varkari-dindi.webp
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEj3W4zQvlF_jdttPZRb0GQvcWFolPkm9v5oK85yqEwnyUxgORNaS2sj0iqALhnQHtneeIKYyiBTsKTwek_LYzl5X1oeEyIHu0CMIIHcqnxdFkLs7Dr_vEi10_nEtgrWY061ZyEIfUJluWf9mTSj61mNnsZprMLuFko6q1SBdJaSdkIszvE/s72-c-rw/varkari-dindi.webp
मराठीमाती । माझ्या मातीचे गायन
https://www.marathimati.com/2008/04/dharma-aani-pantha-maharashtra.html
https://www.marathimati.com/
https://www.marathimati.com/
https://www.marathimati.com/2008/04/dharma-aani-pantha-maharashtra.html
true
2079427118266147504
UTF-8
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची