Loading ...
/* Dont copy */

महाराष्ट्रातील चालीरीती आणि परंपरा

महाराष्ट्रातील चालीरीती आणि परंपरा - महाराष्ट्रातील चालीरीती आणि परंपरा यांचा इतिहास आणि सखोल माहिती देणारा (Chaliriti Aani Parampara - Maharashtra).

महाराष्ट्रातील चालीरीती आणि परंपरा

महाराष्ट्रातील चालीरीती आणि परंपरा यांचा इतिहास आणि सखोल माहिती देणारा अभ्यासपूर्ण लेख


महाराष्ट्रातील चालीरीती आणि परंपरा

(Chaliriti Aani Parampara of Maharashtra).


(छायाचित्र: महालक्ष्मीची पूजा)


वाजत्या घुंगूरवाळ्याची पावलं घरात उमटणार आहेत अगर आपण आत्या होणार आहोत यातली चाहूल घरात लागली तरी आमची ब्रह्मानंदी टाळी लागायची. अशा वेळी मनात यायचं की, आपल्या वहिनीला एक सुंदर देखणी मुलगी व्हावी. त्या चंद्रज्योतीच्या उजेडात सारं घरदार उजळून निघावं आणि आपण हौसे मजेच्या सगळ्या सोपस्कारांच्या धांदलीत स्वतःला हरवून बसावं.

लाल चुटूक होठांच, भुरभुरत्या जावळाचं, मऊसूच अंगाचं, गुलाबी गालांचं हसरं बाळ घरात यायचं म्हणजे केवढा आनंद! रेशमी खणाच्या कुंजीत हे राजबिंड रुपडं गुंडाळून सरीबिंदलीच्या न्‌ वाघनखाच्या साजानं नटवलं किंवा शेलक्या वस्त्रांच्या झुबल्या टोपड्यांनी शिणगारीत हातावर घेतलं म्हणजे किती मज्जा! हो बाई, सोनार घरी जाऊन सगळी बाळलेणी घडवून आणीन तरच राहीन पाच कुवारणी पुजून जिवतीची आराधना करीत घरात ह्या राणीच्या रुपानं महादेवीच अवतरलीय असा सांगावा घरोघरी धाडीन तरच नावची म्हणावी मी!

खरंच, दादाला मुलगी झाली ना की, माझ्या पायाला भिंगरी लावीन कायम काय आणायला फिरीन मी, झालंच तर मनाला पंख लावीत संगं भूक-लाडू तहान-लाडू घेऊन बारशाची निमंत्रण करायला घरोघरीचे उंबरठे झिजवीन. आमची आजी तर म्हणते की, पहिली मुलगी व्हावी म्हणजे घरात लक्ष्मी नांदते. तिच्या रुपानं सरस्वतेचा संचार होतो घरोदारी. तिच तर सांगणंच मुळी की, समींदर उफडा करीत हिरे माणीक वेचून बाळाचं झबलं टोपडं गुंफावं. खेळण्या पाळण्याला राघू मैना लावावेत. चंद्रसूर्याचे दिवे पाजळावेत. दारी लामण दिव्यांची रोषणाई करावी आणिक जिनगराला सांगून पाळण्यावर खेळण्याची अब्दागिरी झोकात तयार करून घ्यावी.

पाच सवाष्णींच्या ओट्या भराव्यात. गावातल्या देवीला पुरणावरणाच महानैवेद्य दाखवून बाळीला आशीर्वाद मागावेत. झेंडू झेंडू गोंडं लावून राणीला टोपडं घालाव. आणिक त्या टोपड्याला पिंपळपान जडवून बाळीच्या गोरेपणाची बडेजाई मांडावी.

आमची आई तर म्हणते की, दादाची लेक म्हणजे दुधावरची साय. लेकासारखी तिची जोपा व्हावी.

लेकीची अंगलट जाईच्या फोफावानी
बया माऊलींन जोपा केलीया लेकावानी
अशीच भाषा बघणारानं केली तर खरं म्हणावं!

वाढत्या वयाचं लेणं लेत लाडाची लाडुबाई घरात रांगायला लागली, घुंगूरते पाय घेऊन पळायला लागली म्हनजे तिच्या कवतिकाला आमच्या घरी उधाण येत. आमच्या ताईला मुलगी झाली तर तिला खेळायला गावोगांच्या किती मावल्या आल्या. भाजक्या चूल उतरंडीचा रग्गड खेळ घरात आला. तऱ्हेतऱ्हेच्या गोंड्यांनी तिची लांबसडाक केसांची वेणी गुंफली गेली. जरतारी काठाची रेशमी पोताची परकर पोलकी शिवली गेली न्‌ भातुकलीचा अगर भोंडल्याचा घरातल्या ओसरीवर दणका उडून गेला. चवीधवीचे खाऊ खिरापतीला आले. निरनिराळ्या गीतांचे स्वर घुमले न्‌ आजोळ घराला जशी इंद्रसभेची शोभा आली. भातुकलीला तर सगळं गाव बघायला लोटावं अशी बारकाली-बारकाली भांडीकुंडी गोळा झाली. लेकीला जणू संसाराचा श्रीगणेशा शिकवला गेला. बरोबरच्या मुलीबाळींच्या सहवासात तिचं बालपण झोकात सजलं गेलं.

घरातली मुलगी म्हणजे काळजाचा घड. आज नाही उद्या ती सासरी जाणार. म्हणून तिचं कौतुक आणखीनच. देवादिकांनी ऊसमुळे, पानमळे आया मुलींना आंदण दिले तर आपणही काही भरघोस द्यावं हो हौस. त्यासाठी मुलगी वयात आल्यापासूनची तयारी. ऐपतीप्रमाणं देण्याघेण्याचा विचार. बरोबरीचा जावई शोधण्यासाठी धडपड. शिवाय

तुझ्या ग गालावरी कुणी ग गोंदले
फूल कुणी ग टोचले गुलाबाचे
लेकीच्या देखणेपणाबद्दलची ही हौस मौज मनात, त्यातून मग-
नवरी पाहू आले आले गडाचे गणपती
भांगतुऱ्या लक्ष मोती उषाताईंच्या
नवरी पाहू आले सोपा चढूनी अंगणी
नवरी शुक्राची चांदणी मैनाराणी
ठुश्या पेट्याखाली कंठ्याचे बारा सर
दिल्या घरी राज्य कर उषाताई
असली भाषा घरात निघालेली. जाई जुईच्या मांडवाची बोलणी चाललेली. आणखीन्‌-
गोरज मुहूर्त मुहूर्त पवित्र
उच्चारती मंत्र ब्रह्मवृंद

अशा सुख सोहळ्याचा विचार झालेला, वाजंत्री बोलाविलेली. पाच कळसांत न्हाणं धुणं व्हायचा बेत जुळवलेला. रुखवत सजवलेले. सवाष्णींनी गणगोतांसह देवदेवताना आमंत्रित करणारी गीतं गात हळद दळलेली. मुहूर्तमेढ पूजलेली. आंबा शिंपावा, घाणा भरावा, गौर पुजावी यातली आखणी झालेली. तर अशा धांदलीत शेलक्या वस्त्रालंकारांनी सुशोभित झालेली राधिका लगीन साज लेत बोहल्यावर आली की, आता ती परत घरी जाणार या कल्पनेनं काळीज हादरून जातं.

जरतारी पायघोळ साडी नेसलेली, गोऱ्या कपाळी कुंकवाची चिरी त्यालेली, वेणीवर मोगरीच्या कळ्या माळलेली, कोवळ्या नाकात सर्जाचे नथ घातलेली, बाजुबंद वेळा त्यालेली, तोडीचे वाक्या न्‌ कुलपाचा कंबरपट्टा घातलेली लाडकी लेक चार चौघींच्या कळपातून उठून जाणार म्हणून वारा डुरा झालेली जीव कसाबसा सावरीत आईवडील एक अंगाला उभे रहातात. जावयाला डोळे भरून पहातात. "आम्हा घरीचा पाळणा तुम्हा घरी बांधिला" म्हणत व्याही-विहिणींना विनवीत "बाळीला सांभाळा" म्हणतात.

अशा वेळी पतीबरोबर सात पावलं चालून त्याच्याबरोबर आपल्या घरी जायला उतावीळ झालेली मैना गृहलक्ष्मी होऊन उंबरठ्यावरचं माप ओलांडीत पुढं निघालेली असते. लहानपण मागं सरलेलं असतं. पोक्त पणानं घेरलेलं असतं, जबाबदारीनं माखलेलं असतं. माहेरघरचा विरह हलक्या पावलांनी मागं लोटीत उगवत्या चंद्राच्या भेटीला केव्हा जाईन या उत्सुकतेनं ती भुलून जाते... म्हणून हंड्या-झुंबरांच्या लखलखाटातील मांडव ओलांडून डोईवर जरीमंदील ल्यालेल्या, त्यात मानाचा तुरा खोवलेल्या, हळदीच्या गालावर काळी टिकली लावलेल्या, कपाळावर वर्खाचा मळवट माखलेल्या, अंगावर जरीकाठी उपरणं घेतलेल्या, अंगात कोट न्‌ पायात नवा जोडा घातलेल्या, शिरी बाशिंग लेवून ऐटबाज नजरेनं तिच्याकडे पहाणाऱ्या जीवन साथीबरोबर ती हळूहळू चाललेली असते... तिला

भरताराचं सुख हसत सांगे वालू
मुखीच्या तांदूळानं सर्जे नथीचं झालं लालू.
या सुखाची मालकीन केव्हा एकदा होईन झालेला असतं...
एवढचं नाहीतर-
जाई मोगऱ्याच्या कळ्या लाल भरजरी शेल्या
सांगा वहिनी तुम्हा गुंफीता कशा आल्या
संसार करायची अशी जिद्द तिनं ध्यानी मनी बाळगलेली असते, तिला स्वतःचं जग निर्माण करायचं असतं. "चंद्रानं केलं खळं, सूर्यानं केली खोपी न्‌ रावांच्या मांडीवर मी गेली झोपी " असला उखाणा घालीत आयुष्याचा अर्थ लावायचा असतो. शिवाय-

टिप्पूर चांदणं चांदण्याजोगी रात
शेजेच्या भ्रताराची देवासारखी सोबत
यातील गंमत चाखायची असते. राजलक्ष्मीचं वैभव उभं करीत जावानणंदात नाव कमवायचं असतं. शेरभर सोन्याचे अंलकार लेण्यापेक्षा ठसठशीत कुंकवाची मला गरज अधिक आहे हे तिला सिद्ध करायचं असतं. म्हणून मग ती ज्याला सांगून टाकते-

हिऱ्यामाणकांचं मला नाही भूषण
हळदीवैल कुंकू माझं जरीचं निशाण

आणि त्याच दिमाखानं आपल्या घरात प्रवेश करते. दिल्या घरी सुखानं राहिल पाहिजे ही आईच्या शिकविणीची बाळघुटी तिच्या संगती असल्यामुळे घरदार सावरताना आईचं प्यालेलं दूध तिच्या मनगटी खेळतं रहातं. सर्वाच्या मर्जीमाप तिचं वागणं बोलणं झाल्याकारणानं ती कुणाच्या नजरेला खुपत नाही का कुणाच्या टोचणीतही गवसत नाही. सासुरवासातले खाचखळगे हे राधा हसत मुखानं बुजवून टाकते.

होता होता ह्या राणीला दिवस जातात. तोंडावर गर्भाकाया उमटते न्‌ मग घरात आनंदी आनंद उसळून जातो, " डोहाळे कडक आहेत" यापलिकडे बोभाटा होत नाही. आवड निवड लक्षात घेऊन गाभुळली चिंच आणा, पिकलं कवठ आणा, गुलाबी पेरू मागवा, कोवळी वाळकं आणा, कोवळ्या वांग्याची भाजी करा, आवळे आणून द्या, थालीपीठे लावा असल्या कितीक गोष्टी कौतुकानं पुढं येतात. त्यामुळे आधीच उलट्या झाल्यानं अन्नाची शिसारी आलेली ही मैना आणखीनच लाजून चूर होते. आडभिंतीला बसून रानमेवा खातखात उदरी येणाऱ्या बाळराजाबद्दलची गोड चित्रं मनोमनी उभारते.

दरम्यानच्या काळातील सण उत्सव घरी झोकात साजरे होतात. दारी सडा सारवण येऊन तऱ्हेतऱ्हेची रांगोळी घातली जाते हळदकुंकवाची बोलावणी होतात. महानैवैद्य पुरणावरणाचा शिजतो. देवदेवतांची महापूजा बांधली जाते. सौभाग्यवाणाची देवघेव होत रहाते. पोरीचा जीव भरल्या निरीमुळे हाबकला जाऊ नये अगर भीतीन तिला घेरलं जाऊ नये म्हणून परोपरीनं तिची जोपा होते.

पाचव्या अगर सातव्या महिन्याचा मुहूर्त साधून कधी मळ्यातल्या केळीच्या बनातल्या मखरात बसवीत तर कधी रानातल्या झाडांना झोपाळा बांधून त्यावर बसवीत, कधी घरात वाडी भरून चौरंगावर बसवीत तर कधी नदीतल्या होडीत बसवीत अशी थाटामाठानं गणगोतांच्या सहवासात डोहाळजेवणं साजरी केली जातात. आवडी निवडीचे शिजवीत तिला धीर दिला जातो. हिरव्या बांगड्या, हिरवी साडी, फुलांचा रंगी-बेरंगी साज तिच्या साठी आणून हौस मौजेने तिचं कौतुक मांडल जातं.

गर्भीणनारी तुझा गर्भ डौलदार
उदराला येऊं दे कृष्णदेवाचा अवतार
या कल्पनेनं घरदार उल्हासून जातं. चांदण्या रात्री जेवणं होतात. जेणेकरून तिचं मन खुशीन रमेल ते सारे सोपस्कार पार पाडले जातात. सासरीमाहेरी अशी दुहेरी गुंफा मोठ्या आनंदानं पार पडते. अशावेळी-

राणीला डोहाळे कंताला काय कळे
रसलिंबू गळे बागेमधी
राणीला डोहाळे कंतानं जाणीयले
रुमाली आणीयेले बाल-आंबे

असली गंमत घडून आल्यामुळं त्यातली चव हिच्या मुखी आणखीनच सुखावते. डोहाळ्याची गीते गात तिचं घरात झालेले जेवण तिला चांगलं मानवतं. आपल्या बाळाबद्दलची सुखस्वप्नं ती रंगवीत असते.

सडा घालून रांगोळी काढताना दाराशी गाईची पावलं मग ती अशी सुरेख काढते की, जणू तिच्या बाळाला ही पायघडी घालायला निघालीय म्हणावी! स्वस्तिक म्हणजे सूर्यदेवाची बैठक, तर ते काढताना हिच्या मनात आपल्या बाळाचं उज्ज्वल भवितव्य असायचं. म्हणून त्या भाग्य रेषा उमटताना तिचा जीव हारखायचा.

घरात सणासुदींचे दिवस आले की, महालक्ष्मीगत हिची सासू हिला पण हातावर सुवासाचा गंध माखायला लावायची. त्यामुळे घागरी फुंकताना तिचे ओठ हलायचे-

घागर घूमूदे घूमू दे
रामा पवा वाजू दे
चंदनाची उटी गवर माजी लेवू दे.

त्यामुळं सायासानं घरात उभ्या केलेल्या महालक्ष्मी प्रसन्न झालेल्या दिसायच्या. हळदीकुंकवाला येणाऱ्या बायकांनी मग कौतुकानं म्हणावं, तुमच्या घरची ही लक्ष्मी सुखा समाधानाच्या पावलांनी आलीय! तुम्ही मोठ्या भाग्याच्या तशी सासू मालन हारखून जात खुशीन मान हलवणार. तिरक्या नजरेने सुनेला बघणार न्‌ रात्रीला मीठ मोहऱ्यांनी तिची नजर काढून टाकणार.

अशा वेळी कामकारणानं गावाला गेलेल्या वकीलाची वार्ता हिच्या ओठांवर घुमणार-

माळ्याच्या मळ्यामंदी केळी नारळी जावा जावा
मधी गुलाबा तुजी हवा वास घेणार गेले गावा

राणीचा गळा तर असा सुरेख की, ऐकणाराची तहानभूकच हरपून जावी... घरातल्या कामाधामाचा तर हिला उरक दांडगा. त्यामुळं तिकडून जाता येता ही गुणगुणणार-

कपाळीचं कुंकू बाई घामानं रंगलं
आत्तीचं ग माझ्या फूल जाईचं चांगलं
भरताराचं सुख जसं पुनवेचं चांदणं
हावशा कांत माझा जणु केवड्याचं पान

पण मग क्वचितच माहेर आठवलं की, हे साजणी कावरीबावरी झालीच म्हणावी. आई, वडील, भाऊ, बहीण, भावजय, भाचे मंडळी, काका, मावशी, चुलता, चुलती, आजी, आजोबा सगळे सगळे नजरेपुढं आले की, तिनं जाऊन येते आईकडं अशा घोकणी नवऱ्यापुढं घातलीच समजावी. मग इथला डामडौल किती पण असून दे ! तिथल्या सुखाची सर इथं नाही न्‌ इथल्याची तिथं नाही हे कळत असलं तरी तुलना सोडून देत ती आल्या गेल्याजवळ सांगावा देणारच की, कमानी दरवाजाच्या माझ्या माहेरी जाऊन आईला सांगा की, मला घेऊन जा म्हणावं! मग काय? शेलक्या वारूवर स्वार होऊन दादाराया येणार न्‌ ही पण चट्‌किनी दीड दोन दिवसांच्या बोलीनं का होईना जाणार म्हणजे जाणारच. अशावेळी पुरण पोळीची, लाडवाची नाही तर सजुरीची पाटीभर बुत्ती तिच्यासंगं येताजाताना जाणार.

आणिक घरोघरी मैना आल्याची खूण म्हणून तिचं वाटपही होणारच. तशात नागारपंचमी यावी म्हणजे मग तर बघायलच नको. श्रावण मासातल्या रिमझिमत्या पाऊस काळात नागदेवांची पूजा करून माहेरी असलेल्या बंधुराजांचं उदंड चिंतायचं. आणि सासर घरच्या धनदौलतीचा, वाडवडिलांच्या रुपानं येणारे नागदेव, सांभाळ करतील म्हणून मनोभावे त्यांच्यापुढ नतमस्तक व्हायचं!... घराण्याचे कुळाचार सांभाळायचे. नागांचा फणा दुखावेल म्हणून काही वाटायचं नाही, काही कुटायचं नाही, काही चिरायचंही नाही!... घरच्या वडिलधाऱ्यांच हे वळण उचलायचं... तीच गोष्ट संक्रांतीची. नवीन गाडगी सुगडं-(ववसा) आणून धुवून घेत रंगवायची.

या सुगडांना रंगीत पाटावर मांडून त्यात उसाचे गरे, ओल्या हरभऱ्याचे घोस, गाजराचे तुकडे, पावट्याच्या शेंगा, गव्हाच्या ओंच्या, शेंगदाणे असलं काय काय परीचं शेतात नव्यानं आलेले घालायचं. तीळगूळ घ्यायचा. पुरणावरणाचा नैवेद्य दाखवून पाच सवाष्णींना सुगड देत घेत सौभाग्यवर्धन साधायचं घरची चालरीत सांभाळायची.

तर अशा कामात ही राधिका मोठी हुषार. एकदा पाहिल की ते लगेच ध्यानात घेईल. कृतीत आणील. म्हणून तिचं शहाणपण सर्वांच्या खात्रीत उतरतं न्‌ ती घरात सुगरण ठरते.

आता माणूस कितीही शहाणा असला तरी भांड्याला भांडं लागलं की, कुरबूर निघतेच. पण म्हणून डगमगून अगर रडत बसून होत नाही. उठता बसता नवऱ्याकडे कागाळी करून चालत नाही. जो भेटेल त्याच्या जवळ माहेरी सांगावा देऊन वातावरण पेटवता येत नाही. सार पाणी प्यावं त्या रीतीनं गिळावं लागतं.

बंधुजी विचारीतो मैना सासुरवास कसा
चिताकाचा फासा रूतावा तसा
अगर
बरम्या लिवून गेला तसा

यातली पण वाटाघाट करून निभाव लागत नाही, म्हणून मग ही शहाणी विचार करते की, उद्या माझं बाळ माझा पांग फेडील. हसत मुखानं मी त्याला एकेकाच्या मांडीवर दिलं की, सगळ्यांचा राग खाली बसेल. आणि ही गोष्ट खरी. लहानग्या बाळराजाच्या दर्शनानं माणूस झाल गेल विसरून जातो. मोकळ्या मनानं बाळाशी खेळतो. हा आपला कुलदिपक आहे या विचारानं कडीखांद्यावर घेत त्याची हौसेनं जोपा करतो. घरातलं बाळराज म्हणजे जणु सोन्याचा ढीग, भलं दांडगं ऐश्वर्य. जिवाभावाचा विसावा. सासरमाहेरचे ऋणानुबंध जोडणारा सांधा. वडीलधाऱ्यांसकट सर्वांच सुख निधान.

म्हणून मग ही गर्भारपणातल्या त्रास आनंदान सहन करीत लवकरच जन्माला येणाऱ्या आपल्या राजबिंड्याच्या विचारात स्वतः हरवून बसते. बाळाचे डोळे कसे असतील, ओठ कसे असतील, हातपाय कसे नाचतील, आपल्याकडे बघत बघत आपल्या अंगावर पिताना बाळ कसं सुखावेल, आपली त्यावेळी ब्रह्मानंदी कशी टाळी लागेल. बाळाचं कौतुक सासरी माहेरी कोण्या रीतीनं केलं जाईल वगैरे वगैरे अनेक कल्पना तिच्या मनी घोळू लागतात...

त्यामुळं आपला बाळ कुणासारखा दिसेल या विचारात असताना ते थोरामोठ्यांची आठवण करते. देवदिकांच्या पूजेत रमते. वडीलधाऱ्यांच्या विचारात रहाते. पतीदेवाच्या गुणरूपात गुरफटून घेते न्‌ मग अखेर शेवटी माझं बाळ कृष्णदेवाच्या रूपानं येऊंदेल या कल्पनेत विसावते. त्या कारणानं उदरातील बाळाचा भार पेलीत वडीलधाऱ्यांना नमस्कार करताना ती बाळाला आशीर्वाद मागते. एवढच नाही तर आपलं आयुष्य उणं करीत बाळाचं वाढूं दे म्हणून देवापाशी मागणं मागीत तुळशीला प्रदक्षिण घातले... अशा वेळी ढुश्श्या मारीत तिचं बाळ तिला सांगून टाकतं की, ‘थांब, मी कोण आहे ते तुला लौकरच दाखवतो’ ...त्यासरशी ती अशी खुदकिनी हसते की, जणू तीच यशोदा न्‌ देवकी झालीय म्हणावी!

- सरोजिनी बाबर


मराठीमाती डॉट कॉम संपादक मंडळ
२००२ । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.

अभिप्राय

नाव

अ रा कुलकर्णी,1,अ ल खाडे,2,अ ज्ञा पुराणिक,1,अंकित भास्कर,1,अंजली भाबट-जाधव,1,अंधश्रद्धेच्या कविता,5,अकोला,1,अजय दिवटे,1,अजित पाटणकर,18,अनंत दळवी,1,अनंत फंदी,1,अनंत भावे,1,अनिकेत येमेकर,2,अनिकेत शिंदे,1,अनिल गोसावी,2,अनिल भारती,1,अनिल वल्टे,8,अनुभव कथन,19,अनुरथ गोरे,1,अनुराधा पाटील,1,अनुराधा फाटक,39,अनुवादित कविता,1,अपर्णा तांबे,7,अब्राहम लिंकन,2,अभंग,6,अभिजित गायकवाड,1,अभिजीत टिळक,2,अभिव्यक्ती,1386,अभिषेक कातकडे,5,अभिषेक घुगे,1,अमन मुंजेकर,7,अमरश्री वाघ,2,अमरावती,1,अमित पडळकर,4,अमित पवार,1,अमित बाविस्कर,3,अमित सुतार,1,अमुक-धमुक,1,अमृत जोशी,1,अमृता शेठ,1,अमोल कोल्हे,1,अमोल तांबे,1,अमोल देशमुख,1,अमोल बारई,7,अमोल वाघमारे,1,अमोल सराफ,2,अरविंद जामखेडकर,1,अरविंद थगनारे,5,अरुण कोलटकर,1,अरुण म्हात्रे,1,अर्चना कुळकर्णी,1,अर्चना डुबल,2,अर्जुन फड,3,अर्थनीति,3,अल्केश जाधव,1,अविनाश धर्माधिकारी,2,अशोक थोरात,1,अशोक रानडे,1,अश्विनी तातेकर-देशपांडे,1,अश्विनी तासगांवकर,2,अस्मिता मेश्राम-काणेकर,7,अहमदनगर,1,अक्षय वाटवे,1,अक्षरमंच,1132,आईच्या कविता,29,आईस्क्रीम,3,आकाश पवार,2,आकाश भुरसे,8,आज,6,आजीच्या कविता,1,आठवणींच्या कविता,18,आतले-बाहेरचे,3,आतिश कविता लक्ष्मण,1,आत्मविश्वासाच्या कविता,15,आदर्श कामिरे,4,आदित्य कदम,1,आदेश ताजणे,8,आनंद दांदळे,8,आनंद प्रभु,1,आनंदाच्या कविता,26,आमट्या सार कढी,18,आर समीर,1,आरती गांगण,2,आरती शिंदे,4,आरत्या,82,आरोग्य,21,आशा गवाणकर,1,आशिष खरात-पाटील,1,आशिष चोले,1,इंदिरा गांधी,1,इंदिरा संत,6,इंद्रजित नाझरे,26,इंद्रजीत भालेराव,1,इतिहास,281,इलाही जमादार,1,इसापनीती कथा,48,उत्तम कोळगावकर,2,उदय दुदवडकर,1,उन्मेष इनामदार,1,उपवासाचे पदार्थ,15,उमा पाटील,1,उमेश कानतोडे,1,उमेश कुंभार,14,उमेश चौधरी,1,उस्मानाबाद,1,ऋग्वेदा विश्वासराव,5,ऋचा पिंपळसकर,10,ऋचा मुळे,18,ऋषिकेश शिरनाथ,2,ऋषीकेश कालोकार,2,ए श्री मोरवंचीकर,1,एच एन फडणीस,1,एप्रिल,30,एम व्ही नामजोशी,1,एहतेशाम देशमुख,2,ऐतिहासिक स्थळे,2,ऑक्टोबर,31,ऑगस्ट,31,ऑडिओ कविता,15,ऑडिओ बुक,1,ओंकार चिटणीस,1,ओम ढाके,8,ओमकार खापे,1,ओशो,1,औरंगाबाद,1,कपिल घोलप,12,करण विधाते,1,करमणूक,72,कर्क मुलांची नावे,1,कल्पना देसाई,1,कल्याण इनामदार,1,कविता शिंगोटे,1,कवितासंग्रह,280,कवी अनिल,1,कवी ग्रेस,4,कवी बी,1,काजल पवार,1,कार्यक्रम,12,कार्ल खंडाळावाला,1,कालिंदी कवी,2,काशिराम खरडे,1,कि का चौधरी,1,किरण कामंत,1,किल्ले,97,किल्ल्यांचे फोटो,5,किशोर चलाख,6,किशोर पवार,1,कुठेतरी-काहीतरी,3,कुणाल खाडे,3,कुणाल लोंढे,1,कुसुमाग्रज,9,कृष्णकेशव,1,कृष्णाच्या आरत्या,5,के के दाते,1,के तुषार,8,के नारखेडे,2,केदार कुबडे,40,केदार नामदास,1,केदार मेहेंदळे,1,केशव मेश्राम,1,केशवकुमार,2,केशवसुत,5,कोल्हापूर,1,कोशिंबीर सलाड रायते,14,कौशल इनामदार,1,खंडोबाची स्थाने,2,खंडोबाच्या आरत्या,2,खरगपूर,1,ग दि माडगूळकर,6,ग ल ठोकळ,3,ग ह पाटील,4,गंगाधर गाडगीळ,1,गझलसंग्रह,1,गडचिरोली,1,गणपतीच्या आरत्या,5,गणपतीच्या गोष्टी,24,गणेश कुडे,2,गणेश तरतरे,20,गणेश निदानकर,1,गणेश पाटील,1,गणेश भुसारी,1,गण्याचे विनोद,1,गाडगे बाबा,1,गायत्री सोनजे,5,गावाकडच्या कविता,14,गुरुदत्त पोतदार,2,गुरूच्या आरत्या,2,गुलझार काझी,1,गो कृ कान्हेरे,1,गो गं लिमये,1,गोकुळ कुंभार,13,गोड पदार्थ,55,गोपीनाथ,2,गोविंद,1,गोविंदाग्रज,1,गौतम जगताप,1,गौरांग पुणतांबेकर,1,घरचा वैद्य,2,घाट,1,चंद्रकांत जगावकर,1,चंद्रपूर,1,चटण्या,3,चातुर्य कथा,6,चित्रपट समीक्षा,1,चैतन्य म्हस्के,1,चैत्राली इंगळे,2,जयश्री चुरी,1,जयश्री मोहिते,1,जवाहरलाल नेहरू,1,जळगाव,1,जाई नाईक,1,जानेवारी,31,जालना,1,जितेश दळवी,1,जिल्हे,31,जीवनशैली,432,जुलै,31,जून,30,ज्योती किरतकुडवे,1,ज्योती मालुसरे,1,टीझर्स,1,ट्रेलर्स,3,ठाणे,2,डिसेंबर,31,डॉ मानसी राजाध्यक्ष,1,डॉ. दिलीप धैसास,1,तनवीर सिद्दिकी,1,तन्मय धसकट,1,तरुणाईच्या कविता,7,तिच्या कविता,63,तुकाराम गाथा,4,तुकाराम धांडे,1,तुतेश रिंगे,1,तेजश्री कांबळे-शिंदे,4,तेजस्विनी देसाई,1,दत्ता हलसगीकर,2,दत्ताच्या आरत्या,5,दत्तात्रय भोसले,1,दत्तो तुळजापूरकर,1,दया पवार,1,दर्शन जोशी,2,दर्शन शेळके,1,दशरथ मांझी,1,दादासाहेब गवते,1,दामोदर कारे,1,दिनदर्शिका,366,दिनविशेष,366,दिनेश बोकडे,1,दिनेश लव्हाळे,1,दिनेश हंचाटे,1,दिपक शिंदे,2,दिपाली गणोरे,1,दिवाळी फराळ,26,दीपा दामले,1,दीप्तीदेवेंद्र,1,दुःखाच्या कविता,76,दुर्गेश साठवणे,1,देवीच्या आरत्या,3,देशभक्तीपर कविता,3,धनंजय सायरे,1,धनराज बाविस्कर,71,धनश्री घाणेकर,1,धार्मिक स्थळे,1,धुळे,1,धोंडोपंत मानवतकर,12,नमिता प्रशांत,1,नलिनी तळपदे,1,ना के बेहेरे,1,ना घ देशपांडे,4,ना धों महानोर,3,ना वा टिळक,1,नांदेड,1,नागपूर,1,नारायण शुक्ल,1,नारायण सुर्वे,2,नाशिक,1,नासीर संदे,1,निखिल पवार,3,नितीन चंद्रकांत देसाई,1,निमित्त,4,निराकाराच्या कविता,16,निवडक,9,निसर्ग कविता,37,निसर्ग चाटे,2,निळू फुले,1,नृसिंहाच्या आरत्या,1,नोव्हेंबर,30,न्याहारी,50,पथ्यकर पदार्थ,2,पद्मा गोळे,4,परभणी,1,पराग काळुखे,1,पर्यटन स्थळे,1,पल्लवी माने,1,पवन कुसुंदल,2,पांडुरंग वाघमोडे,3,पाककला,322,पाककृती व्हिडिओ,15,पालकत्व,7,पावसाच्या कविता,40,पी के देवी,1,पु ल देशपांडे,9,पु शि रेगे,1,पुंडलिक आंबटकर,4,पुडिंग,10,पुणे,15,पुरुषोत्तम जोशी,1,पुरुषोत्तम पाटील,1,पुर्वा देसाई,2,पूजा काशिद,1,पूजा चव्हाण,1,पूनम राखेचा,1,पोस्टर्स,5,पोळी भाकरी,27,पौष्टिक पदार्थ,20,प्र श्री जाधव,12,प्रकाश पाटील,1,प्रजोत कुलकर्णी,1,प्रतिक बळी,1,प्रतिभा जोजारे,1,प्रतिमा इंगोले,1,प्रतिक्षा जोशी,1,प्रदिप कासुर्डे,1,प्रफुल्ल चिकेरूर,10,प्रभाकर महाजन,1,प्रभाकर लोंढे,3,प्रवास वर्णन,1,प्रवासाच्या कविता,11,प्रविण पावडे,15,प्रवीण दवणे,1,प्रवीण राणे,1,प्रशांतकुमार मोहिते,2,प्रसन्न घैसास,2,प्रज्ञा वझे,2,प्रज्ञा वझे-घारपुरे,10,प्राजक्ता गव्हाणे,1,प्रितफुल प्रित,1,प्रिती चव्हाण,27,प्रिया जोशी,1,प्रियांका न्यायाधीश,3,प्रेम कविता,97,प्रेरणादायी कविता,17,फ मुं शिंदे,3,फादर स्टीफन्स,1,फेब्रुवारी,29,फोटो गॅलरी,11,फ्रॉय निस्सेन,1,बहिणाबाई चौधरी,6,बा भ बोरकर,8,बा सी मर्ढेकर,6,बातम्या,11,बाबा आमटे,1,बाबाच्या कविता,10,बाबासाहेब आंबेड,1,बायकोच्या कविता,5,बालकविता,14,बालकवी,9,बाळाची मराठी नावे,1,बाळासाहेब गवाणी-पाटील,21,बिपीनचंद्र नेवे,1,बी अरुणाचलाम्‌,1,बी रघुनाथ,1,बीड,1,बुलढाणा,1,बेकिंग,9,बेहराम कॉन्ट्रॅक्टर,1,भंडारा,1,भक्ती कविता,23,भक्ती रावनंग,1,भरत माळी,2,भा दा पाळंदे,1,भा रा तांबे,7,भा वें शेट्टी,1,भाग्यवेध,1,भाज्या,29,भाताचे प्रकार,16,भानुदास,1,भानुदास धोत्रे,1,भावनांची वादळे,1,भुषण राऊत,1,भूगोल,1,भूमी जोशी,1,म म देशपांडे,1,मं वि राजाध्यक्ष,1,मंगला गोखले,1,मंगळागौरीच्या आरत्या,2,मंगेश कळसे,9,मंगेश पाडगांवकर,5,मंजुषा कुलकर्णी,2,मंदिरांचे फोटो,3,मंदिरे,4,मधल्या वेळेचे पदार्थ,41,मधुकर आरकडे,1,मधुकर जोशी,1,मधुसूदन कालेलकर,2,मनमोहन नातू,3,मनाचे श्लोक,205,मनिषा दिवेकर,3,मनिषा फलके,1,मनोज शिरसाठ,9,मराठी,1,मराठी उखाणे,2,मराठी कथा,107,मराठी कविता,1173,मराठी कवी,3,मराठी कोट्स,4,मराठी गझल,30,मराठी गाणी,2,मराठी गोष्टी,67,मराठी चारोळी,42,मराठी चित्रपट,19,मराठी टिव्ही,53,मराठी नाटक,1,मराठी पुस्तके,7,मराठी प्रेम कथा,23,मराठी भयकथा,44,मराठी मालिका,20,मराठी रहस्य कथा,2,मराठी लेख,48,मराठी विनोद,1,मराठी साहित्य,288,मराठी साहित्यिक,2,मराठी सुविचार,2,मराठीप्रेमी पालक महासंमेलन,5,मराठीमाती,145,मसाले,12,महात्मा गांधी,8,महात्मा फुले,1,महाराष्ट्र,307,महाराष्ट्र फोटो,11,महाराष्ट्राचा इतिहास,32,महाराष्ट्रीय पदार्थ,22,महालक्ष्मीच्या आरत्या,2,महेंद्र म्हस्के,1,महेश जाधव,3,महेश बिऱ्हाडे,9,मांसाहारी पदार्थ,17,माझं मत,4,माझा बालमित्र,88,मातीतले कोहिनूर,19,माधव ज्यूलियन,6,माधव मनोहर,1,माधवानुज,3,मानसी सुरज,1,मारुतीच्या आरत्या,2,मार्च,31,मिलिंद खांडवे,1,मीना तालीम,1,मुंबई,12,मुंबई उपनगर,1,मुकुंद भालेराव,1,मुकुंद शिंत्रे,35,मुक्ता चैतन्य,1,मुलांची नावे,1,मुलाखती,1,मे,31,मैत्रीच्या कविता,8,मोहिनी उत्तर्डे,2,यवतमाळ,1,यशपाल कांबळे,4,यशवंत दंडगव्हाळ,25,यादव सिंगनजुडे,2,योगा,1,योगेश कर्डिले,6,योगेश सोनवणे,2,रंगपंचमी,1,रंजना बाजी,1,रजनी जोगळेकर,5,रत्नागिरी,1,रविंद्र गाडबैल,1,रविकिरण पराडकर,1,रवींद्र भट,1,रा अ काळेले,1,रा देव,1,रागिनी पवार,1,राजकारण,2,राजकीय कविता,12,राजकुमार शिंगे,1,राजेंद्र भोईर,1,राजेश पोफारे,1,राजेश्वर टोणे,3,राम मोरे,1,रामकृष्ण जोशी,2,रामचंद्राच्या आरत्या,5,रायगड,1,राहुल अहिरे,3,रुपेश सावंत,1,रेश्मा जोशी,2,रेश्मा विशे,1,रोहित काळे,7,रोहित साठे,15,लघुपट,3,लता मंगेशकर,2,लहुजी साळवे,1,लक्ष्मण अहिरे,2,लक्ष्मीकांत तांबोळी,2,लातूर,1,लिलेश्वर खैरनार,2,लीना पांढरे,1,लीलावती भागवत,1,लोकमान्य टिळक,3,लोणची,9,वंदना विटणकर,2,वर्धा,1,वसंत बापट,12,वसंत साठे,1,वसंत सावंत,1,वा गो मायदेव,1,वा ना आंधळे,1,वा भा पाठक,2,वा रा कांत,3,वात्रटिका,2,वादळे झेलतांना,2,वामन निंबाळकर,1,वासुदेव कामथ,1,वाळवणाचे पदार्थ,6,वि दा सावरकर,3,वि भि कोलते,1,वि म कुलकर्णी,5,वि स खांडेकर,1,विंदा करंदीकर,8,विक्रम खराडे,1,विचारधन,215,विजय पाटील,1,विजया जहागीरदार,1,विजया वाड,2,विजया संगवई,1,विठ्ठल वाघ,3,विठ्ठलाच्या आरत्या,5,विद्या कुडवे,4,विद्या जगताप,2,विद्याधर करंदीकर,1,विनायक मुळम,1,विरह कविता,58,विराज काटदरे,1,विलास डोईफोडे,5,विवेक जोशी,3,विशाल शिंदे,1,विशेष,12,विष्णूच्या आरत्या,4,विज्ञान तंत्रज्ञान,2,वृषाली सुनगार-करपे,1,वेदांत कोकड,1,वैभव गव्हाळे,1,वैभव सकुंडे,1,वैशाली झोपे,1,वैशाली नलावडे,1,व्यंगचित्रे,17,व्रत-वैकल्ये,1,व्हिडिओ,13,शंकर रामाणी,1,शंकर विटणकर,1,शंकर वैद्य,1,शंकराच्या आरत्या,4,शरणकुमार लिंबाळे,1,शशांक रांगणेकर,1,शशिकांत शिंदे,1,शां शं रेगे,1,शांततेच्या कविता,9,शांता शेळके,11,शांताराम आठवले,1,शाम जोशी,1,शारदा सावंत,4,शाळेचा डबा,15,शाळेच्या कविता,11,शितल सरोदे,1,शिरीष पै,1,शिरीष महाशब्दे,8,शिल्पा इनामदार-आर्ते,1,शिवाजी महाराज,7,शिक्षकांवर कविता,4,शुभम बंबाळ,2,शुभम सुपने,2,शेतकर्‍याच्या कविता,14,शेती,1,शेषाद्री नाईक,1,शैलेश सोनार,1,श्याम खांबेकर,1,श्रद्धा नामजोशी,9,श्रावणातल्या कहाण्या,27,श्री दि इनामदार,1,श्री बा रानडे,1,श्रीकृष्ण पंडित,1,श्रीकृष्ण पोवळे,1,श्रीधर रानडे,2,श्रीधर शनवारे,1,श्रीनिवास खळे,1,श्रीपाद कोल्हटकर,1,श्रीरंग गोरे,1,श्रुती चव्हाण,1,संघर्षाच्या कविता,33,संजय उपाध्ये,1,संजय डोंगरे,1,संजय पाटील,1,संजय बनसोडे,2,संजय शिंदे,1,संजय शिवरकर,5,संजय सावंत,1,संजीवनी मराठे,3,संत एकनाथ,1,संत चोखामेळा,1,संत जनाबाई,1,संत तुकडोजी महाराज,2,संत तुकाराम,8,संत नामदेव,3,संत ज्ञानेश्वर,6,संतोष जळूकर,1,संतोष झोंड,1,संतोष सेलुकर,30,संदिप खुरुद,5,संदीपकुमार खुरुद,1,संदेश ढगे,39,संध्या भगत,1,संपादक मंडळ,1,संपादकीय,11,संपादकीय व्यंगचित्रे,2,संस्कार,2,संस्कृती,133,सई कौस्तुभ,1,सचिन पोटे,12,सचिन माळी,1,सण-उत्सव,22,सणासुदीचे पदार्थ,32,सतिश चौधरी,1,सतीश काळसेकर,1,सदानंद रेगे,2,सदाशिव गायकवाड,2,सदाशिव माळी,1,सनी आडेकर,10,सप्टेंबर,30,समर्थ रामदास,206,समर्पण,8,सरबते शीतपेये,8,सरयु दोशी,1,सरला देवधर,1,सरिता पदकी,3,सरोजिनी बाबर,1,सलीम रंगरेज,8,सविता कुंजिर,1,सांगली,1,सागर बनगर,1,सागर बाबानगर,1,सातारा,1,साने गुरुजी,5,सामाजिक कविता,113,सामान्य ज्ञान,8,सायली कुलकर्णी,7,साहित्य सेतू,1,साक्षी खडकीकर,9,साक्षी यादव,1,सिंधुदुर्ग,1,सिद्धी भालेराव,1,सिमा लिंगायत-कुलकर्णी,3,सुदेश इंगळे,24,सुधाकर राठोड,1,सुनिल नागवे,1,सुनिल नेटके,1,सुनील गाडगीळ,1,सुभाष कटकदौंड,2,सुमती इनामदार,1,सुमित्र माडगूळकर,1,सुरज दळवी,1,सुरज दुतोंडे,1,सुरज पवार,1,सुरेश भट,2,सुरेश सावंत,2,सुशील दळवी,1,सुशीला मराठे,1,सुहास बोकरे,6,सैनिकांच्या कविता,4,सैरसपाटा,128,सोपानदेव चौधरी,1,सोमकांत दडमल,1,सोलापूर,1,सौरभ सावंत,1,स्तोत्रे,2,स्नेहा कुंभार,1,स्फुटलेखन,4,स्फूर्ती गीत,1,स्माईल गेडाम,4,स्वप्ना पाटकर,1,स्वप्नाली अभंग,5,स्वप्नील जांभळे,2,स्वाती काळे,1,स्वाती खंदारे,320,स्वाती गच्चे,1,स्वाती दळवी,9,स्वाती नामजोशी,31,स्वाती पाटील,1,स्वाती वक्ते,2,ह मुलांची नावे,1,हमार्टिक समा,1,हरितालिकेच्या आरत्या,1,हर्षद खंदारे,42,हर्षद माने,1,हर्षदा जोशी,3,हर्षवर्धन घाटे,2,हर्षाली कर्वे,2,हसनैन आकिब,3,हितेशकुमार ठाकूर,1,हिरवळ,1,हेमंत जोगळेकर,1,हेमंत देसाई,1,हेमंत सावळे,1,हेमा चिटगोपकर,8,होळी,5,ज्ञानदा आसोलकर,1,ज्ञानदेवाच्या आरत्या,2,marathimati,1,
ltr
item
मराठीमाती । माझ्या मातीचे गायन: महाराष्ट्रातील चालीरीती आणि परंपरा
महाराष्ट्रातील चालीरीती आणि परंपरा
महाराष्ट्रातील चालीरीती आणि परंपरा - महाराष्ट्रातील चालीरीती आणि परंपरा यांचा इतिहास आणि सखोल माहिती देणारा (Chaliriti Aani Parampara - Maharashtra).
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEj_r56Cv6JQvNYqYTzOVDfSm7xLlw8estR-XIe0qaS76Z0lOXc_1oAaRQ3UKVQYZ89HUieZZAIxq6D3tPSvc54vTLKq5LCN7_8Ntc-XHeHvBzfmJxC77_NAT1dnW1zsHk6ItHwKrJ6ZRmpD/s1600-rw/mahalaxmi-puja.webp
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEj_r56Cv6JQvNYqYTzOVDfSm7xLlw8estR-XIe0qaS76Z0lOXc_1oAaRQ3UKVQYZ89HUieZZAIxq6D3tPSvc54vTLKq5LCN7_8Ntc-XHeHvBzfmJxC77_NAT1dnW1zsHk6ItHwKrJ6ZRmpD/s72-c-rw/mahalaxmi-puja.webp
मराठीमाती । माझ्या मातीचे गायन
https://www.marathimati.com/2008/04/chaliriti-aani-parampara-maharashtra.html
https://www.marathimati.com/
https://www.marathimati.com/
https://www.marathimati.com/2008/04/chaliriti-aani-parampara-maharashtra.html
true
2079427118266147504
UTF-8
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची