Loading ...
/* Dont copy */

महाराष्ट्र आपला प्रदेश (महाराष्ट्र)

महाराष्ट्र आपला प्रदेश (महाराष्ट्र) - महाराष्ट्राची भूमी थंड झालेल्या लाव्हाच्या थरांची बनलेली आहे [Maharashtra Aapala Pradesh - Maharashtra].

महाराष्ट्र आपला प्रदेश (महाराष्ट्र)

महाराष्ट्राची भूमी थंड झालेल्या लाव्हाच्या थरांची बनलेली आहे


महाराष्ट्र आपला प्रदेश (महाराष्ट्र)

(Maharashtra Aapala Pradesh - Maharashtra) भारतीय भूमिपृष्ठाचा तोल दक्षिण कातळाने (डेक्कन ट्रॅपने) सांभाळला आहे. या दक्षिण कातळावरच्या महाराष्ट्र प्रदेशाने भारताच्या राष्ट्रीय जीवनाला असाच भक्कम आधार दिलेला आहे. अतिप्राचीन काळच्या इतिहासाचा कानोसा घेतला नाही तरी गेल्या सहस्त्रकातील महाराष्ट्राची जडणघडण त्याचे मोठेपण सांगून जाते. या हजार वर्षांत महाराष्ट्राची अस्मिता विविध अंगांनी संपन्न होत गेलेली आहे.

महाराष्ट्राच्या घडणीला भौगोलिक वैशिष्टये कारणीभूत आहेत हे खरे; पण त्याबरोबरच संस्कृती आणि राजकीय जीवन या क्षेत्रांतील लक्षणीय वेगळेपणामुळे भारतीय संघराज्यात महाराष्ट्राला महत्त्वपूर्ण स्थान प्राप्त झाले आहे. महाराष्ट्राच्या भूगोल, इतिहास आणि संस्कृती मुख्यत: मराठी साहित्य - यांचे निरीक्षण केले तर महाराष्ट्राच्या अस्मितेची कारणे आणि तिची व्यवच्छेदक लक्षणे स्पष्ट दिसू लागतात.


(छायाचित्र: पश्चिम सह्याद्री, माथेरान)

महाराष्ट्राची भूमी थंड झालेल्या लाव्हाच्या थरांची बनलेली आहे. सुमारे सात कोटी वर्षापूर्वी घडलेल्या नैसर्गिक उद्रेकाने ही घटना घडली असे भूगूर्भशास्त्र सांगते. सह्याद्री हा महाराष्ट्राचा कणा आहे, तो हिमालया इतका विस्तीर्ण आणि उत्तुंग नसला तरी वयाने वडील आहे, त्याचा देह मजबूत आहे आणि तो भारताच्या पश्चिम किनाऱ्याला समांतर असल्याने पावसाळी वारे त्याच्यावर आदळत असतात. त्याच्याशी काटकोन करून सातपुडा पर्वताच्या रांगा पूर्वेकडे गेलेल्या आहेत. या दोघा रक्षकांनी दक्षिण पठाराचे संरक्षण केले आहे. समुद्रकिनाऱ्यापासून सरासरी चाळीस मैलांवर तो उभा आहे; आणि तेवढ्या भूमीला कोकणपट्टी म्हणतात.

पर्वताच्या पश्चिम बाजूला ढाळ मोठा आहे. तेथे पाऊस पुष्कळ पडतो आणि पश्चिम वाहिनी नद्यांना, छोट्या झऱ्यांना, पऱ्ह्यांना पाणी चांगले असते. तरीही जमीन खडकाळ असल्यामुळे कोकणातील शेती अतिशय कष्टांची असते. जीवनसंघर्ष उग्र असतो. अशा परिस्थितीत माणसेही सहनशील, काटक, बुध्दिमान आणि काहीशी रांगडी बनली असली तर नवल नाही. सह्याद्रीच्या पूर्वेकडील जमीन मात्र सावकाश सपाटीकडे जाणारी आहे. या पठाराच्या प्रदेशाला देश महणतात. देशावरील जमिनीचा पोत आणि कस यांत फार विविधता आहे. वऱ्हाड-खानदेशकडची काळी जमीन आणि सातारा-कोल्हापूरकडची मळईची जमीन सुपीक आहे, तर नगर-सोलापूरकडाची जमीन बव्हंशी कोरडी, रूक्ष आणि परिणामी नापीक, कोकणच्या मानाने देशावरची शेती अधिक बरकतीची आहे. पण एकंदरीत पाहता महाराष्ट्रातील लोकांना शेतीभाती पिकविण्यासाठी फार मेहनत करावी लागते. एका मुडपलेल्या पंखावर कोकण आणि दुसऱ्या पसरलेल्या पंखावर देश असा सह्याद्री उभा आहे. त्याच्या पूर्वेकडच्या उतारावर त्याच्या शाखांमुळेच खोरी निर्माण झाली आहेत, त्यांना मावळ म्हणतात.

सह्य सातपुडाच्या सपाट माथ्यांवर ठायीठायी किल्ले उभे आहेत. एवढे दुर्ग जगात दुसऱ्या कोणत्याही पर्वतावर नाहीत. याचा अर्थच असा की मराठ्यांना या सह्याद्रीने भक्कम संरक्षण दिलेले आहे आणि त्या बळावरच आक्रमकांचा प्रतिकार ते करू शकले. याशिवाय डोंगराकड्यांवर अनेक मंदिरे बांधलेली आहेत. मुळातच चित्रिविचित्र असलेली सह्याद्रीची मस्तके किल्ल्यांनी आणि मंदिरांनी नटलेली असल्यामुळे सह्याद्रीच्या परिसरातील क्षितिजरेषा चित्राकार झालेल्या आहेत. सह्याद्रीच्या कुशीत कोरलेल्या गुंफांतून प्राचीन काळची सौंदर्याची लेणी आपण पाहू शकतो. प्रचंड खडक, ताशीव कडे, मुकुटावर शिखरे, उंच‍उंच बोडके सुळके,अधूनमधून किर्र झाडीने भरलेलेया दऱ्या अशा अनेक वैशिष्ट्यांमुळे सह्याद्रीला फार वेगळे सामर्थ्य आणि सौंदर्य प्राप्त झाले आहे.

[next]

भूमीच्या वैशिष्ट्यांबरोबर सृष्टी आणि हवामान यांतही विविधता निर्माण होणे स्वाभाविक आहे. त्यातच पावसाचे प्रमाण सर्वत्र भिन्नभिन्न असल्यामुळे महाराष्ट्राला अर्थातच एकजिनसी रूप नाही. कुठे माळ, कुठे खडकाळ, कुठे हिरवळ, कुठे रेताड, कुठे घनदाट रान, कुठे उजाड ओसाडी. कुठे पायऱ्यापायऱ्यांची, तर कुठे साफसपाटीची- म्हणाल तसली जमीन महाराष्ट्रात आहे. सृष्टीचीही अनेक रूपे. कुठे काटेरी झुडुपे, कुठे साग पळसांची राने, तर कुठे माडपोफळींची, आंबेफणसांची गर्दी. तरीही एकंदर चित्र पाहावे तर माणसाच्या जिजीविषेला आणि कर्तृत्वाला कठोर आव्हान देणारा हा प्रदेश आहे.

अशा प्रदेशातली माणसे म्हणूच घट्टमुट्ट आणि अभिमानी झालेली आहेत. जिथे खुषीची सोपी शेती असते तिथला जीवनसंघर्ष तुलनेने सोपा असतो. पण खडकाळ जमिनीशी आणि दुष्काळी परिस्थितीशी कायम मुकाबला करणाऱ्या मरहट्ट्यांची परिस्थिती वेगळी आहे. आठव्या शतकात उद्योतनसूरी या जैन ग्रंथकाराने कुवलय माला नामक ग्रंथात रेखलेली मराठ्यांची प्रतिमा आजही यथातथ्य वाटते, ‘मराठे सुदृढ आणि सावळे असतात; सहनशील, अभिमानी आणि कलहप्रिय असतात. दिल्याघेतल्याची भाषा फार करतात,’ असे हा ग्रंथकार म्हणतो. मराठी माणसे असा शब्दप्रयोग ज्यांच्याबद्दल होतो ती एका वंशाची माणसे असा शब्दप्रयोग ज्यांच्याबद्दल होतो ती एका वंशाची माणसे मात्र नाहीत.

महाराष्ट्र ही अनेक मानववंशाची मीलनभूमी आहे, अर्थातच मराठ्यांची लक्षणे वांशिक नाहीत. त्यांचे स्वभावविशेष भूगोलाने, सृष्टिवैचित्र्याने निर्माण केलेले आहेत. मराठे कलहप्रिय अभिमानी असतील पण प्रसंग ओढवल्याशिवाय ते लढायला बाहेर पडत नाहीत. मूलत: शांतपणे शेतीभाती करणारा हा कृषीवल समाज आहे. ईशान्य आशियातल्या टोळ्यांप्रमाणे क्रूर लांडगेतोड करीत आक्रमण करणे, प्रचंड नरमेध आणि विध्वंस करणे मराठ्यांच्या स्वभावात नाही. पण वैऱ्याचा सूड घ्यावा, स्वातंत्र्य आणि स्वाभिमान यांचे रक्षण करावे आणि अन्यायाचा प्रतिकार करावा ही मराठ्यांची जीवनमूल्ये आहेत. चिनी प्रवासी ह्यू-एन-त्संग याने महाराष्ट्राचे अवलोकन केल्यावर लिहिले आहे: ‘येथील लोक धाडसी, उमदे, परंतु प्रामाणिक आणि साधे आहेत.

विद्याभ्यासाचे ते चाहते आहेत. उपकारकर्त्याचे उपकार ते कधीही विसणार नाहीत; परंतु कोणी अपमान केला. तर प्राणाची तमा न बाळगता ते त्याच्यावर सूड उगविल्याशिवाय राहणार नाहीत. नि:शस्त्र माणसावर तो बेसावध असताना ते कधीही हल्ला करणार नाहीत. ज्याच्यावर हल्ला करावयाचा आहे, त्याला ते पूर्वसूचना देतील. त्याचप्रमाणे त्याला शस्त्रसज्ज होण्यास वेळ देतील. नंतरच त्याच्याशी चार हात करतील. पळणाऱ्या शत्रूचा ते पाठलाग करतील, पण शरणागताला उदार मनाने अभय देतील."

[next]

सातवाहनांपासून यादवांपर्यंत अनेक पराक्रमी राजांनी उत्तरेकडून होणारी आक्रमणे विंध्याचलात थोपवून धरली. चालुक्य, आभीर, वाकाटक, राष्ट्रकूट, कदंब, शिलाहार अशा अनेक राजवटींनी लक्षात घेण्याजोगी कर्तबगारी दाखविलेली असली तरी या सर्वांत यादव राजवंशाचे स्थान महत्वाचे आहे. यादवांच्या आधी सुंदर लेणी निर्माण झाली आणि अपभ्रंश भाषेत ग्रंथनिर्मितीही झाली. परंतु महाराष्ट्राचे मऱ्हाटपण सिद्ध झाले ते यादव काळात. त्यातही मुख्य श्रेय आहे ते मराठी साहित्याच्या प्राणप्रतिष्ठेला. या युगात गुजरातेतून महाराष्ट्रात आलेल्या चक्रधरांनी महानुभाव संप्रदायाची स्थापना केली. त्यांनी आणि त्यांच्या पंथाने मराठीला धर्मभाषेचे स्थान दिले. मराठीचा प्रखर अभिमान धरला. त्यांच्या वाङ्‍मयात मराठी गद्याच्या आदिपर्वाचे मनोज्ञ दर्शन घडते.

महानुभाव पंडित कवींनी कलात्मक आख्यान कवितेचा पायाही घातला. नरींद्र कवीचे रूक्मिणी स्वयंवर, भास्करभट्ट बोरीकरांचे शिशुपाल वध आणि दामोदर पंडिताचे वंछाहरण हे ठळक ग्रंथ आहेत. शिवाय चक्रधरांची स्मरणे गुंफून निर्माण झालेले लीळाचरित्र, ऋद्धिपूर वर्णन, दृष्टांतपाठ इत्यादी गद्य ग्रंथावरून महानुभावांनी केलेली मराठीची सेवा डोळ्यांत भरते. भागवत संप्रदयाचे म्हणजेच वारकरी पंथाचे कार्यही यादव काळातच सुरू झाले. संत ज्ञानेश्वराना तर महाराष्ट्राचा आद्य भाग्यविधाता म्हणता येईल. नाना मतांच्या गलबल्यात चिरफळ्या उडालेल्या समाजाला भक्तीच्या सुलभ शिकवणुकीने एकत्र आणण्याचे श्रेय ज्ञानेश्वराना आणि त्यांच्या नेतृत्वाने प्रभावित झालेल्या उत्तरकालीन संतमंडळाला दिले पाहिजे. नव्या मानवताधर्माचे चक्रप्रवर्तवन तर ज्ञानदेवांनी केलेच; पण ते करीत असतानाच मराठी भाषा त्यांनी अनुप्राणित केली. तिच्या सौंदर्याचे आणि सामर्थ्याचे प्रभावी दर्शन घडविले.

संस्कृत भाषेशी त्यांचे वैर नव्हते; पण संस्कृत धर्मग्रंथाच्या आश्रयाने समाजात मान्यता पावलेल्या कर्मकांडाशी आणि अनुदारतेशी त्यांनी झुंज घेतली. स्त्री-वैश्य-शूद्रादिकांना मोक्षाचा अधिकार आहे असे भगवद्‌गीतेचे प्रतिपादन असले तरी देशी भाषेतून धर्मविचार त्यांच्यापर्यंत पोचविल्याशिवाय हे घडावे कसे? ज्ञानेश्वरांची आपल्या अभूतपूर्व कर्तृत्वाने हे सांस्कृतिक परिवर्तन घडविले. त्यासाठी ज्ञानेश्वरीच्या रूपानेच गीतेचे हृदय मऱ्हाटा बोलांतून व्यक्त केले. कोणताही गहन विचार आणि आर्त भावना सहज सुंदर रीतीने प्रकट करण्याएवढी प्रगल्भता आणि समर्थता मराठी भाषेत आहे हे त्यांनी प्रत्ययास आणले.

आत्मविश्वासाने पण विजयाने बोलणाऱ्या ज्ञानेदेवांनी मराठीचा कैवार घेतला. तिचे वैभव कृतीने सिद्ध केले आणि महाराष्ट्रातील जनसामान्यांच्या मनात स्वभाषेविषयी आस्था निर्माण केली. त्यांच्या आधी मुकुंदराजाने मराठीची कैफियत मांडलेली होती. आणि महानुभावांनीही ‘संस्कृत भाषेने सामान्य माणसे नागवली जाता म्हणून मराठी भाषेतच ग्रंथ लिहिला पाहिजे’ हे स्पष्टपणे सांगितले होते. पण या सर्वांहून ज्ञानेदेवांनी निर्माण केलेला मराठी भाषेचा अभिमान काही आगळाच आहे. त्यात आत्मविश्वास आहे पण आक्रमण नाही. मराठी भाषेचे नागरपण प्रतिपदीं सुंदर आशयाची वलये निर्माण करून त्यांनी सिद्ध केले. श्रेष्ठ साहित्याला जन्म देण्याची मराठीची क्षमता ज्ञानेश्वरीमुळे सर्वमान्य झाली. एक संत म्हणून त्यांनी केलेली कामगिरी तर मोलाची आहेच; पण मायेभाषेचा जबरदस्त अभिमान निर्माण करणाऱ्या या कवीश्वरांनी महाराष्ट्राच्या अस्मितेला नवा सबल संदर्भ निर्माण केला.

महाराष्ट्र म्हणजे मराठीच्या अभिमान्यांचा प्रदेश असे व्याख्यालक्षण प्रस्थापित करणे ही असामान्य कामगिरीच म्हटली पाहिजे. त्याच्यानंतरच्या सातशे वर्षांच्या दीर्घ साहित्यप्रंपरेने त्यांचा अभिमान रास्त ठरवला. मध्ययुगात ज्ञानेश्वरांच्या नंतरही संत कवींनी आपल्या भाषेची संपन्नता वाढवलेली आहे. नामदेव, एकनाथ आणि तुकाराम हे या प्रंपरेतले प्रमुख कवी होत. पण त्यांच्याबरोबरच गोरा कुंभार, सावता माळी, परसा भागवत, नरहरी सोनार, चोखामेळा, सोयराबाई, जनाबाई, राका, बंका, सेना न्हावी, शेख महंमद अशा समाजाच्या अनेक थरांच्या प्रतिनिंधी महाराष्ट्रातील आध्यात्मिक लोकशाही बळकट केली. आणि हे सामाजिक काम करीत असताना मराठी भाषेला आपल्या साहित्याचा उपहार दिला. धर्म आणि भाषा या दोन्ही क्षेत्रात प्रचंड परिवर्तन घडवणाऱ्या संताच्या साहित्याने मध्ययुगीने महाराष्ट्राला खास निराळा आशय प्राप्त करून दिला.

आसामपासून काठेवाडपर्यंत उसळलेल्या भक्तिमार्गाच्या विराट लाटेमध्ये महाराष्ट्राच्या कर्तुत्वाचा रंग वेगळेपणाने उठून दिसतो. या मालिकेपासूण थोडा फटकून असलेला संतपुरुष समर्थ रामदास हा होय. आपल्या समकालीन समाजाचे दुबळेपण कशात आहे याचा शोध घेऊन, तसेच धर्म आणि न्याय यांचे संरक्षण करणाऱ्या राजशक्तीचा सदैव पुरस्कार करून, रामदासांनी समाजगुरू ही आपली पदवी यथार्थ केली. भागवत संप्रदायातला समतेचा विचार रामदासांच्या मनाला फारसा पटला नाही. भेद ईश्वराने केला, आता तो त्याच्या बापालाही मोडता येणार नाही, हा त्यांचा विचार प्रतिगामीच म्हणावा लागेल. परंतु तरीही अवघ्या मध्ययुगीन भारतवर्षात असे मुलुखावेगळे व्यक्तित्व दुसऱ्या कोणत्याही संताजवळ दिसत नाही.

राजकीय दुर्दशा, दारिद्रय, करंटेपणा, सारांश, लोकजीवनाचा अध:पात करणाऱ्या सर्व गोष्टींची, रामदासांना चिंता वाटत होती, आणि या परिस्थितीच्या विरुद्ध लोकजागृती करण्याचा त्यांचा सारा खटाटोप होता. तारुण्याच्या उंबरठ्यावर असतानाच संन्यासी वृत्ती स्वीकारणाऱ्या रामदासांनी, आधी प्रपंच नेटका करावा आणि मग परमार्थ साधेल, अशी प्रवृत्तीपर शिकवण समाजाला द्यावी हाही एक विशेषच म्हटला पाहिजे. त्यांनी महाराष्ट्र धर्माची जी संकल्पना केली होती तिच्यात अखंड सावधानता, सत्य आणि न्याय यांचा कैवार, स्वाभिमान आणि स्वातंत्र्य यांची जपणूक, सामर्थ्याची उपासना अशा अनेक श्रेष्ठ जीवनमूल्यांचा समावेश आहे. महाराष्ट्र धर्म ही एक मूर्त सांप्रदायिक कल्पना नव्हे आणि तरीही त्याला एक जीवनदृष्टी अभिप्रेत आहे. तिचे स्वरूप समजावून घेणे म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाचा अन्वयार्थ लावणे असे म्हणता येईल.

[next]

ज्ञानेश्वरांच्या कर्तृत्वाने व्यापक स्वरूप ध्यानात घेतल्यानंतर महाराष्ट्राचा दुसरा थोर भाग्यविधाता म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घ्यावयास हवे. यादवकाळानंतर साडेतीनशे वर्षेपर्यंत बहामनी सुलतानांच्या अमलाखाली महाराष्ट्र आला होता. या राजवटीच्या खुणा महाराष्ट्रातील भग्नावशेषांत जशा दिसतात. तशा मराठी भाषेत घडून आलेल्या अनेक बदलांतही दिसतात. मराठी शब्दसंपत्तीत अरबी आणि फारसी वाणाच्या शब्दांची मोठी भर या काळात पडली.

अपभ्रंश भाषांचे लेवाडेपण मराठीत नाही. तिच्यावर संस्कृतीचे बेमालूम कलम करून सिद्ध झालेल्या मराठी भाषेची वीण चांगलीच मजबूत आहे. अरबी, फारसी शब्दांचा प्रवाहही मराठीने रिचवून टाकला आणि तोही असा की भाषा दुबळी होण्याऐवजी तिचे सामर्थ्य आणि देखणेपण वाढले. हे घडत असताना राजकीय आणि सामजिक दृष्ट्या मात्र महाराष्ट्राचा विपत्काल ओढवलेला होता. गुलामीचे जिणे महाराष्ट्राच्या वाट्याला आले होते. रयतेवर जुलूम जबरदस्ती आणि अत्याचार होत होते. रयतेवर जुलूम जबरदस्ती आणि अत्याचार होत होते.

उत्तरेतील मोगल सम्राटांची नजरही महाराष्ट्राकडे वळल्यावर तर हे ग्रहण आता कधीच सुटणार नाही असे वाटून जनसामान्यांची मने अगतिक झाली होती. वर्षांमागून वर्षे, शतकांमागून शतके उलटली तेव्हा कोठे मराठा सरदार दरकदार जरा डोके वर काढू लागले आणि शहाजी राजे भोसले बहामनी सुलतानांच्या सिंहासनामागचे सूत्रधार बनले. या सुलतानांचे जोखड झुगारून स्वराज्यांची स्थापना करावी हे धाडस मात्र शहाजी राजांना झाले नाही किंवा झेपले नाही. ते महत्कार्य त्यांचा पुत्र शिवाजीच करू धजावला.

शहाजी आणि शिवाजी या पिता पुत्रांमधील पिढीचे अंतर जबरदस्त म्हटले पाहिजे. स्वजनांची मानहानी थांबवण्यासाठी, दीनदुबळ्यांचा छळ नाहीसा करण्यासाठी आणि स्वधर्माचे रक्षण करण्यासाठी दक्षिणेतील सुलतान आणि दिल्लीचा सम्राट या दोहोंविरूद्ध तरवार उपसणाऱ्या या महापुरुषाने लोकोत्तर गुणांच्या बळावर महाराष्ट्रात स्वराज्यांची प्राणप्रतिष्ठा केली. छत्रपतींचे चरित्र आणि चारित्र्य यांनी प्रभावित झालेल्या मराठ्यांनी पुढे अवघ्या हिंदुस्तानच्या संरक्षणाचा वसाच घेतला मराठ्यांच्या यशापयशांची पुष्कळ मीमांसा झाली आहे, होत आहे आणि पुढेही होत राहील. परंतु राष्ट्रीय स्वभिमानाचा आणि अन्याय प्रतिकाराचा तेजस्वी आदर्श मराठ्यांनी निर्माण केला हे ऐतिहासिक सत्य अबाधितच राहील.

[next]

ज्ञानेश्वरांच्याप्रमाणे शिवाजी महाराजांनाही प्रस्थापित समाजधुरीणांविरूद्ध झुंजावे लागले. छोट्यामोठ्या जहागिरी आणि वतने सांभाळीत बसलेल्या आणि केवळ स्वार्थाच्या लोभाने जुलमी सत्तेविरूद्ध हत्यार उचलावयास नाखूष असलेल्या सरदार वतनदारांचा शिवाजी महाराजांना विरोधच होता. मोरे, शिर्के, सुर्वे, सावंत प्रभूती त्या काळचे मातबर सरदार स्वराज्याच्या शत्रूच्या फळीतच राहिले. मराठी मातीतून छत्रपतींनी नवी माणसे उभी केली. मावळ खोऱ्यांतले मावळे आणि कोकणचे काटक कुणबी यांच्यामधूनच कर्तबगार माणसे तयार करून शिवाजी महाराजांनी प्रचंड साम्राज्य शाहीला हादरा देण्याचा चमत्कार करून दाखवला, ज्ञानेश्वरादी संतानी कर्मकांडाचा दबदबा नाहीसा करून जड धार्मिक नेतृत्वाचा निरास केला.

नेमेकी अशीच कामगिरी शिवाजी महाराज आणि त्यांच्या धारकऱ्यांनी केली. सामान्यांतून असामान्य वीर पुरुष निर्माण केले. नवे लढाऊ राजकीय नेतृत्व जन्माला घातले. सूर्यवंश, चंद्रवंश असल्या मानीव कल्पनांचा अहंकार धरून खानदानाच्या खोट्या अभिमानाने क्षुद्र वतने सांभाळत बसलेल्या दिखाऊ सरदारांची मिजास शिवाजी महाराजांनी साफ उतरवली, पालकर, पासलकर, जेधे, मालुसरे, गुजर, महाडीक ही शिवकालातली नावे पहा. किंवा त्यानंतरही जाधव, घोरपडे, वगैरे वीरांची नावे पहा. हे सर्वसामान्य थरांतून वर आलेले नेतृत्व होते जे स्पष्ट आहे.

पुढेही पहिल्या बाजीरावाने शिंदे, होळकर, गायकवाड असे नवे सरदार निर्माण करून हिंदुस्तानभर मराठ्यांचा अमल बसवला. ‘शिवाजीने सारे नूतनच केले’ असा अभिप्राय राचंद्रपंत अमात्यांच्या आज्ञापत्रांत आहे. या नूतन पुरुषार्थात पराक्रम शक्ती, युक्ती, सावधानता हे शककर्त्याच्या अंगी स्वाभाविक असणारे विशेष गुण येतात. त्याप्रमाणे सामान्य माणसांकडून असामान्य कर्तृत्व करवून घेण्याची प्रतिभाही येते. शिवाजी महाराजांच्या थोरवीचा प्रत्यय त्यांच्या मृत्युनंतर येतो. १६८० मध्ये शिवाजी महाराजांच्या मृत्यु झाल्यावर बलाढ्य औरंगजेबाशी सत्तावीस वर्षे मराठे गनिमी काव्याने लढत राहिले. निर्नायक झालेल्या महाराष्ट्राने प्रबळ मोगलशाहीशी दिलेली झुंज ही महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्याच्या तेजस्वी अभिमानाची ज्वलंत साक्ष आहे.

औरंगजेबाला महाराष्ट्राच्या भूमीत १७०७ साली मूठमाती मिळाल्यावर ही झुंज संपली. मोगल साम्राज्यशाहीचे पेकाट मराठ्यांनी असे मोडले की मिळमिळीत सौभाग्यासारखी ती दिल्लीली जेमेतेम टिकून राहिली इतकेच. मोगल साम्राज्याची ही कथा तर मग दक्षिणेतील दुबळ्या पातशाह्या नष्ट झाल्या असल्या तर नवल कसले?

[next]

महाराष्ट्राला शिवाजी महाराजांचा विलक्षण अभिमान आहे. पुष्कळांना हा अभिमान अतिरेकी वाटतो. आजही महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात सर्व पक्षांचे, पंथाचे अनुयायी शिवछ्त्रपतींच्या विषयी असीम आदरभाव बाळगतांना दिसतात. या घटनेचे कारण नीट समजावून घेतले पाहिजे. प्रथम ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की शिवाजी महाराजांची स्वराज्यस्थापना म्हणजे सामान्य सत्तांतर नव्हते; ते युगांतर होते. कोणीही यावे आणि लुटावे, लुबाडावे हे चालू देणार नाही हा आपल्या राष्ट्राचा निर्धार शिवछत्रपतींच्या कर्तृत्वामुळे निर्माण झालीले आहे. स्वराज्य म्हणजे काय आणि राजाचा धर्म कसा असावयास पाहिजे याचे महाराजांना विलक्षण स्पष्ट भान होते. त्यांनी जाणीवपूर्वक देनदुबळ्यांचा सतत कैवार घेतला.

मस्तवाल लोकांनी चालवलेली स्त्रीच्या अब्रूची धूळदाण बंद केली. सैन्याने सर्व रसद सरकारातून घेतली पाहिजे आणि जरूरच पडली तर सर्व काही बाजारात किंमत मोजून विकत घेतली पाहिजे असा छत्रपतींचा दंडक होता. तो घालून देताना महाराजांनी आपल्या अधिकाऱ्यांस बजावले होते ‘गरीबाच्या भाजीच्या काडीला दाम दिल्याशिवाय हात लावाल तर खबरदार. तसे केलेत तर यापरीस मोगल परवडला असे रयतेस होऊन जाईल’ अशा अनेक गोष्टी आहेत. त्यावरून त्या प्रजाहितदक्ष राजाची दृष्टी चोख होती. त्याला न्यायाची कदर होती आणि गरिबांचा कळवळा होता हे सहज समजते. त्यामुळे राजकीय यश आणि पराक्रम यांच्याबरोबर शिवाजी राजांच्या आदर्श राजधर्माची महती महत्त्वाची आहे.

युरोपीय व्यापारी म्हणजे सामान्य व्यापारी नव्हत हे त्यांनी ओळखले होते. समुद्रावरुन येणाऱ्या आक्रमकांचा बंदोबस्त समुद्रावरच केला पाहिजे हे ओळखून त्यांनी अजिंक्य नौकादल उभारले. अशी दूरदृष्टी इतिहासकाळात कोणीच दाखवलेली दिसत नाही. शिवाजी महाराजांची दृष्टी धार्मिक भेदांच्या बाबतीत उदार होती, व्यापक होती. त्यांच्या सैन्यात मुसलामानांचाही भरणा होता. राज्यात हिंदु देवस्थाप्रमाणे, मशिदी आणि दर्गे यांचाही सांभाळ केला जाई. शिवाजी राजे अत्यंत न्यायी होते. प्रसंगी अपराध्यांना कडक शासन करावे लागले तरी त्यांची वृत्ती अंध, लहरी, दुष्टपणाची नसे. अपराध्याला शासन करून पुढीलांना जरब बसवावी असा त्यांचा हेतू असे.

सहसा त्यांची वृत्ती क्षमाशीलतेची होती. जातीने मोहिमा कराव्या, आदर्श घालून द्यावा पण त्याबरोबरच कनिष्ठ सहकाऱ्यांकडून कामगिरी करून घ्यावी असे नेतृत्वाचे गुण त्यांच्या ठायी होते. आधीच्या सलतनती आणी पुंडपाळेगार यांच्या अन्यायी, जुलमी कारभारच्या काळ्याकुट्ट पार्श्वभूमीवर शिवछत्रपतींची प्रजाहितदक्ष आणि न्यायाची भूमिका झळझळीपणे उठून दिसते. सतराव्या शतकात शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वामुळे महाराष्ट्राचा कायाकल्प झाला. आणि अठराव्या शतकात मराठ्यांचे कर्तृत्व झपाट्याने चहूदिशा पसरले.

[next]

मराठी मनाला या अलौकिक इतिहासाचा फार अभिमान आहे; क्वचित इतिहासाच्या अभिमानाचा अतिरेकही होत असेल. महाराष्ट्राचे त्रिदोष सांगताना विनोबांनी या अतिरेकाकडे अंगुलिनिर्देश केलेला आहे. पूर्वजांच्या गौरवावर भर देऊन आपली कर्तृत्वशून्यता छपवण्याचा प्रयत्न करणे अर्थातच गैर आहे. परंतु या गोष्टीला दुसरी एक बाजू आहे. या अभिमानानेच मराठ्यांचे सत्त्वरक्षण केलेले आहे आणि राष्ट्रासाठी त्याग करण्याची प्रेरणा सतत जागृत ठेवलेली आहे. शिवाजी महाराजांच्या नंतरही पहिले बाजीराव पेशवे म्हणजे मध्ययुगातील एक अत्यंत श्रेष्ठ सेनापती. त्यांच्या मर्दुमकीने दिल्लीच्या पातशाहीचा पायाच उखडला गेला आणि मोगल सत्ता हे महादजी शिंद्याच्या हातचे खेळणे होऊन बसले.

स्वराज्याचे साम्राज्य होण्याच्या या प्रक्रियेत शिवाजी महाराजांनी दिलेली व्यापक दृष्टी हळूहळू अंधुक होत गेली असली तरी ती अगदीच नष्ट झाली नाही. म्हणून तर १७६१ साली पानिपताच्या तिसऱ्या युद्धात अफगाण आणि रोहिले यांच्या आक्रमाणचा बंदोबस्त करण्यासाठी मराठी फौजा उत्तरेत दौडत गेल्या. खैबर खिंडीतून कोसळणारी आक्रमणे थोपवलीच पाहिजेत या ईर्ष्येने सिंधु आणि काबुल नद्यांच्या संगमापाशी असलेल्या अटकच्या किल्ल्यावर धडकलेले होते याचा महाराष्ट्राला का अभिमान वाटू नये? त्यांच्या विजयी वारूची छाती पानपतावर फुटली पण म्हणून काही त्यांच्या पराक्रमाची, अवघ्या हिंदुस्तानच्या रक्षणासाठी त्यांनी प्रकट केलेल्या वीरश्रीची किंमत कमी होत नाही.

आपण हिंदुस्तानचे राज्य जिंकले ते शेवटी मराठ्यांचा पराभव करूनच याची इंग्रजांना पुरती जाणीव होती. मरहट्टे सूडाला, प्रवृत्त झाल्याशिवाय राहात नाहीत हेही त्यांना माहीत होते. इतर काही प्रदेशांप्रमाणे महाराष्ट्राला केवळ निष्ठूर छ्ळाच्या बळावर गुलामगिरीत जखडता येणार नाही हेही त्यांनी ओळखले होते. म्हणूनच एकोणिसाव्या शतकात, वरकरणी सामोपचाराचा मुखवटा चढवून, इंग्रजांनी महाराष्ट्रावर सावध करडी नजर ठेवली. तरीही महाराष्ट्र शक्य तसे आणि शक्य तेवढे वैर करीतच राहिला.

परकीय आक्रमक राज्यकर्त्यांना महाराष्ट्र कधीच मनोमन क्षमा करीत नसतो. सन १८८५ मध्ये राष्ट्रीय कॉंग्रेसची स्थापना होऊन अखिल भारतीय राजकरणाचे नवे युग सुरू होण्यापूर्वी महाराष्टाची तेजस्विता कित्येकदा प्रकट झाली. हे १८५७ च्या स्वातंत्र्य युद्धावरून आणि त्या नंतरही वासुदेव बळवंत फडके यांच्या सारख्यांच्या बंडखोरीवरून सहज कळून येते.

या सुमारे सहाशे वर्षांच्या कालखंडात भाषा आणि साहित्य यांची समृद्धी वाढत गेली. सुलभ भक्तिमार्गाच्या रूपाने एक धार्मिक परिवर्तन घडून आले आणि उज्ज्वल इतिहासाने एक नवा सामूहिक पुरुषार्थ अस्तित्वात आणला. चातुर्वर्ण्याला मूठमाती देण्याएवढी शक्ती या धार्मिक आणि राजकीय परिवर्तनात नसली तरी त्याची धार थोडी बोथट करण्यात महाराष्ट्राला यश आले असे म्हणता येईल. मध्ययुगीन भारताचे सर्व दोष आणि उणीवा अर्थात महाराष्ट्रातही आढळतातच. भौतिक विद्यांची हेळसांड इतकेच नव्हे तर एकूण शिक्षणाविषयी संपूर्ण अनास्था हा त्यांतील प्रमुख दोष होता. त्यामुळेच तर अधिक प्रगत विज्ञानापुढे आणि सामाजिक संघटनेपुढे भारताला- पर्यायाने महाराष्ट्राला शरणागती पत्करावी लागली. ते काहीही असो- महाराष्ट्राची जमेची बाजूही फार मोठी असल्यामुळे मराठी मुलखाचा स्वत: विषयीचा अभिमान अदम्य आणि अजिंक्य राहिला आहे.

[next]

नव्या युगाची चाहूल भारतात आधी बंगालला आणि नंतर महाराष्ट्राला लागली. परंतु बंगालमध्ये निर्माण झालेल्या नव्या प्रेरणा मुख्यत: धर्म आणि शिक्षण यांच्या क्षेत्रांतील होत्या. महाराष्ट्रात मात्र समाजसुधारणा आणि राजकीय आकांक्षा यांनी भारलेले महापुरुष जन्माला आले. स्वराज्यनाशानंतरचा अंधार जेमेतेम पन्नास वर्षेही टिकला नाही. नव्या प्रबोधन युगाची फुटल्याचे पहिले चिन्ह रावबहादूर गोपाळ हरी देशमुख ऊर्फ लोकहितवादी यांच्या लेखनात प्रकटते. आपल्या समाजची कठोर चिकित्सा करून, त्यांनी समाजाचा वरिष्ठपणा मिरवणाऱ्या ब्राह्मणांच्या खुळवट धार्मिक समजुतींवर आणि निरूपयोगी विद्येवर कडक टिका केली.

सामजिक सुधारणेची प्रबल प्रेरणा निर्माण करण्याचे श्रेय त्यांच्या लेखनाला दिले पाहिजे. १८५८ च्या आसपास भारतातील तीन प्रमुख विद्यापीठे जन्माला आली. त्यांतून बाहेर पडलेल्या काही नामवंत महाराष्ट्रीय सुशिक्षितांना नवी दृष्टी प्राप्त झाली होती असे म्हणता येईल. न्यायमूर्ती रानडे, विष्णुशास्त्री चिपळूणकर, लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर आणि गोपाळ कृष्ण गोखले यांची नांवे येथे सहजच आठवतात समाजाला सर्वांगी नवीन बळ प्राप्त व्हावे म्हणून आयुष्यभर वैचारिक आणि सामाजिक कार्य करणारे न्यायमूर्ती रानडे यांनी संस्थात्मक कार्याचा पाया घातला. राष्टीय सभेच्या स्थापनेतही त्यांचा सहभाग मोठा होता. प्रार्थना समाज स्थापना करून त्यांनी नवी धर्मप्रवणता प्रकट केली.

भारतीय अर्थशास्त्रांचा पाया घातला. नव्या राष्ट्रवादाचा पहिला उद्‌गाता म्हणजे विष्णुशास्त्री चिपळूणकर त्यांना आयुष्य अवघे बत्तीस वर्षांचे लाभले. त्यांचे लेखन मुख्यत: ज्या निबंधमालेत प्रसिद्ध झाले, ती माला ते केवळ आठ वर्षे चालवू शकले. पण एवढ्या अल्प अवधीत आपला इतिहास, भाषा, संस्कृती आणि राष्ट्र याविषयींचा ज्वलंत अभिमान त्यांनी जागवला आणि हे कार्य करीत असतानाच मराठी गद्याला अपूर्व सामर्थ्य आणि तेज दिले. गोपाळ गणेश आगरकर, महात्मा जोतीबा फुले यांसारख्या थोर, त्यागी समाजसुधारकांनी एका नव्या समाजचे स्वप्न आपणापुढे उभे केले. लोकमान्य टिळक यांनी जनतेच्या शक्तीनेच पारतंत्र्य नष्ट होऊ शकले हा विश्वास अवघ्या राष्ट्राला दिला.

‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे’ ही घोषणा करणाऱ्या निर्भय लोकमान्यांनी ब्रिटिश सत्तेला पहिला प्रचंड हादरा दिला. खडतर कारावासाने दबून जाण्याइतकी आपली आत्मशक्ती लेचीपेची नाही हे स्वत:च्या कृतीने त्यांनी सिद्ध केले. लोकशक्तीनेच स्वातंत्र्यसंपादन आणि स्वातंत्र्यरक्षण होऊ शकते आणि ती जागृत करणाऱ्या प्रत्येकापाशी धैर्य हवे. देहदंड सोसण्याची तयारी हवी ही शिकवण देणारा हा थोर राष्ट्रपुरुष ज्ञानेश्वर आणि शिवाजी यांच्या मालिकेत शोभू लागला.

गेल्या शंभर वर्षांच्या इतिहसावर नजर टाकली तर या महापुरुषांच्या बरोबरच आणखीही थोर विभूती दिसू लागतात. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, महर्षी कर्वे, चाफेकर, कर्वे, कान्हेरे प्रभूती क्रांतीकारक, सेनापती बापट, स्वातंत्र्यवीर सावरकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, साने गुरुजी, अशी नररत्ने महाराष्ट्राच्या कुशीत जन्माला आली. अगदी गेल्या पन्नाससाठ वर्षांतही महात्मा गांधीप्रणीत सत्याग्रही आंदोलने असोत किंवा सशस्त्र क्रांतिकारकांची आतंकवादी आंदोलने असोत, महाराष्ट्राने बलिदान करणाऱ्या अनेक त्यागी वीरांना जन्म दिला असे दिसेल, सारांश, आधुनिक भारताच्या जडणघडणीतही महान्‌ कामगिरी करून महाराष्ट्राने आपले नांव सार्थ केले आहे.

[next]

पराक्रमाची धडाक्याने वाजणारी नौबत, भक्तीच्या मळ्यात अखंड दुमदुमणारा गजर आणि समाजक्रांतीसाठी चाललेल्या आंदोलनांतील घोषणा आणि यांच्या धडाक्यात सौंदर्योपासनेचा मंद्रमधुर आवाज बुडुन जातो. या सौंदर्योपासनेने आमच्या महावस्त्राला जरीचे काठ लावले आहेत. आणि यांच्यावर जरीचेच असंख्य बुंदही झळकावले आहेत. उत्तर भारताच्या मानाने महाराष्ट्रात साधनसमृद्धी कमी आहे आणि म्हणून ख्याली-खुशालीही बेताची आहे. दक्षिण भारताच्या तुलनेने पाहता महाराष्ट्राला शांतताही फार थोडी लाभली. परिणामी महाराष्ट्रात बुलंद भव्य इमारती उभ्या राहिल्या नाहीत आणि नाजूक नक्षीची प्रचंड मंदिरही झाली नाहीत. मराठी तट्टे ठेगणी आणि माणसेही अटकर बांध्याची; तसेच इथले स्थापत्यही अल्पप्रमाण. अंबरनाथ किंवा सिन्नर येथील देवळांसारखे काही अपवाद वगळले तर शिल्पी लोकांची करामत फारशी दिसत नाहे. काही गढ्या आणि वाडे यांचे बांधकाम प्रेक्षणीय आहे. क्वचितच कळाशीदार कारंजी, चौक आणि बगीचेही आहेत. पण एकंदरीने भव्यतेपेक्षा उपयुक्ततेलाच अधिक महत्त्व होते. महाराष्ट्राला अभिमान वाटतो तो दोन गोष्टींचा.

सह्याद्रीच्या कुशीतली लेणी आणि सह्याद्रीच्या माथ्यावरचे किल्ले. पहिली सौंदर्यतीर्थे आणि दुसरी सामर्थ्याची आधिष्ठाने. घारापुरीच्या त्रिमूर्तीएवढे भव्य आणि प्रभावी शिल्प क्वचितच कोठे दिसेल. सुडौल रेषा, उजळ रंग आणि भावदर्शी मुद्रा यांच्यामुळे अजिंठ्याच्या लेण्यांतली चित्रकला जगविख्यात झाली आहे. वेरूळची लेणी म्हणजे पाषाणशिल्पांच्या गतिमानतेचा चिरंतन प्रत्यय. अर्थात ही सर्व कमाई प्राचीन काळची आहे. महाराष्ट्राचे ‘महाराष्ट्रपण’ पूर्ण होण्याच्या आधीची. त्या मानाने किल्ले निकटच्या इतिहास काळतले आहेत. त्यांचे तटबुरुज आणि दरवाजे सौंदर्यपेक्षा सामर्थ्याचा अनुभव देतात. राजगड, रायगड, प्रतापगड, पुरंदर यांसारखे सह्याद्रीच्या सिखरांवरचे गड, औरंगाबादजवळील देवगिरी ऊर्फ दौलताबाद; आणि जंजिरा, सिंधुदुर्ग यांसारखे जलदुर्ग ज्या प्रदेशात आहेत त्याच्या वीरवृत्तीचा पुरावा अधिक शोधण्याची गरज नाही.

अलीकडे मराठाकालीन चित्रकलेचे काही चांगले नमुने प्राप्त झाले आहेत. परंतु चित्रकलेच्या वैभवाचे दर्शन आधुनिक महाराष्ट्रातच घडते. केरळीय चित्रकार राजा रविवर्म्याने महाराष्ट्रात वास्तव्य केले होते तेव्हापासून आभिजात वळणाऱ्या चित्रकलेने येथे मूळ धरले. मुंबई शहरात कलाशिक्षणाचा आरंभ झाल्यापासून चित्रकलेच्या विश्वात एक मुंबई पठडी निर्माण झाली. स्वरूपाच्या चित्रक्लेचा आपल्या देशतील चित्रकारांना परिचय होऊ लागला. त्यामुळे या विविध शैली आणि निष्ठा जोपासणारे अव्वल दर्जाचे अनेक चित्रकार महाराष्ट्राने भारताला दिले आहेत. त्या मानाने महाराष्ट्रातील शिल्पकला डोळ्यात भरण्याजोगी नाही. तिला जवळ असणारी पुतळे घडवण्याची कला मात्र येथे उच्च दर्जाची आहे.

[next]

कलेच्या क्षेत्रात महाराष्ट्राची अभिमानजनक कामगिरी आहे ती नाट्य आणि संगीत यांच्या क्षेत्रात. यांत महाराष्ट्र अग्रेसरच आहे. जवळ जवळ ह्जार वर्षे भारतात रंगभूमी लुप्तप्राय झालेली होती. तंजावरच्या मराठा राज्यात अठराव्या शतकात तेथील, राजांच्या प्रोत्साहने आणि त्यांच्या प्रत्यक्ष सहभागाने भारतीय नाट्यसृष्टीचा पुनर्जन्म झाला. दुर्दैवाने दळवळणाच्या अभावी तंजावरी नाटके मराठी असूनही महाराष्ट्रात पोचलीच नाहीत. पुढे १८४३ साली सांगलीच्या संस्थानिकांच्या सूचेवरून विष्णुदास भावे यांनी सीतास्वयंवर नाटक रचले. आधुनिक मराठी रंगभूमीचा शुभारंभ या नाटकाने झाला असे मानतात. त्यानंतर चाळीस वर्षे विष्णुदासी पद्धतीची पौराणिक नाटके रंगभूमीवर येत राहिली. या काळातच संस्कृत आणि इंग्रजी नाटकांच्या अनुवादांचा कालखंड आला. १८८० मध्ये अण्णासाहेब किर्लोस्करांनी मराठी शाकुंतल रंगभूमीवर आणले आणि येथूनच मराठी रंगभूमीचा वैभवकाळ सुरू झाला.

चित्रपट सृष्टीचा प्रभावामुळे मराठी रंगभूमीच्या वैभवात दहापंधरा वर्षेच काय तो खंड पडला. एरवी गेली शंभर वर्षे नाट्यसृष्टी विविध प्रकारच्या नाट्यकृतींनी सैव बहरलेली दिसते. याचे श्रेय किर्लोस्कर, देवल, कोल्हटकर, गडकरी, खाडीलकर, वीर वामनराव जोशी, सावरकर, वरेरकर, अत्रे, रांगणेकर, वर्तक, काणेकर, शिरवाडकर, कानेटकर, तेंडुलकर, जयवंत दळवी, मतकरी, प्रभूती नाटकारांना आहे. तसेच भाऊराव कोल्हटकर, गणपतराव जोशी, केशवराव भोसले, बालगंधर्व, मास्टर दीनानाथ, केशवराव दाते, गणपतराव बोडस, पेंढारकर, नानासाहेब, फाटक, ज्योस्त्ना भोळे, दुर्गा खोटे, मास्टर दत्ताराम, श्रीराम लागू, काशीनाथ घाणेकर, विजया मेहता, दामू केंकरे.... अशा कित्येक गुणी प्रतिभाशाली कलाकारांनाही हे श्रेय दिले पाहिजे.

अवघ्या शंभर वर्षाच्या इतिहसात उत्तमोत्तम नाटके निर्माण होणे हा महाराष्ट्राचा भाग्ययोगच म्हटला पाहिजे. महाराष्ट्र हा खरोखरच नाटकवेडा मुलुख आहे. व्यावसायिक नाटक कंपन्या आणि हौशी नटसंच दोहोंची संख्या येथे फार मोठी आहे. येथील रंगभूमी राजधानीच्या शहरापुरती आणि अति सुसंस्कृत लोकांपुरतीच मर्यादित नाही. अनेक शहरे, छोटीमोठी खेडी, कामगारांच्या वसाहती सर्वत्र रंगभूमीच्या उपासना चालू असते.

[next]

गेल्या दीड शतकात हिंदुस्तानी संगीत कलेकाही महाराष्ट्रात माहेरघर मिळालेले आहे. पंडित बाळकृष्ण बुवा इचलकरंजीकर, विष्णु दिगंबर पलुस्कर, भातखंडे, भास्करबुवा बखले, प्रो. देवधर नारायणराव व्यास, विनायकबुवा पटवर्धन, रातंजनकर प्रभूनींनी अभिजात संगीताचा प्रसार भारतभर करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केलेई. रहिमतखां, अबदुल करीम खां, अलादियाखा आणि या सर्वांचे शिष्य-प्रशिष्य यांनी महाराष्ट्रात अभिजात संगीत रसिकप्रिय केले. बझेबुवा, भास्करबुवा, मास्तर कृष्णराव, बालगंधर्व, गोविंदराव टेंबे, सुरेशबाबू, हिराबाई, केसरबाई, मोगूबाई, भीमसेन जोशी, मल्लिकार्जुन मन्सूर, कुमार गंधर्व, वसंतराव देशपांडे, जसराज, जितेन्द्र अभिषेकी माणिक वर्मा, किशोरी अमोणकर, प्रभा अत्रे, शोभा गुर्टू...

अशी उल्लेखनीय कलाकारांनी नामावळी फार मोठी आहे. ही नामावळी लांबवण्याचा मोह टाळून एवढेच नमूद केले पाहिजे की अखिल भारतातील गाणारे-बजावणारे कलावंत, मग ते थोर असोत की होतकरू, आपल्या कलेचे चीज करण्यासाठी महाराष्ट्राकडेच मोहरा वळवतात. ‘गानेवाले जगह जगह पर होते हैं सुननिवाले सिर्फ महाराष्ट्र में मिलते हैं’ हा एक बुजुर्ग गायकाचा- बडे गुलाम अलींचा अभिप्राय पुरेसा बोलका आहे. संगीताची उपासना करणाऱ्या लेकी सुना आणि पुरुषही महाराष्ट्रात घरोघरी आढळतील.

चित्रपटसृष्तीचा भारतातील मुळारंभ महाराष्ट्रात झाला. दादासाहेब फाळके भारतीय चित्रसृष्टीचे जनक आहेत. या कलेच्या विकासक्रमातला ‘प्रभातकाल’ महाराष्ट्रातच उगवला; आजही चित्रपटांमध्ये विविध दालनात अनेक नामवंत महाराष्ट्रीय कलाकार वावरत आहेत. चित्रपटातील पार्श्वगायनाच्या क्षेत्रातील सर्वश्रेष्ठ कलावती म्हणून स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर हे नांव सर्व दुनियेत मशहूर झाले आहे.

महाराष्ट्रात आदिवासी जीवनपासून ते अत्याधुनिक नागरी जीवनापर्यंत कलासक्ती आणि सौंदर्यपूजा यांना फार महत्त्वाचे स्थान आहे आदिवासींचे सण-उत्सव गाण्यानाचण्यानेच साजरे होतात, वारली ठाकर, महादेव कोळी, कोकणे, गोंड, माडिया असे अनेक प्रकारचे आदिवासी समाज महाराष्ट्राची संस्कृती श्रीमंत करतात. तीच गोष्ट वंजारा, धनगर, मच्छीमार कोळी, इत्यादींची, भक्तींच्या मस्तीत नाचणारे, वाघ्ये आणि मुरळ्या, वासुदेव, भुत्ये, चित्रकथी, भराडी, गोंधळी असे अनेक प्रकारचे कलावंत महाराष्ट्रात पुर्वापार आहेत.

[next]

शिवकालानंतर महाराष्ट्रात शाहिरी कलेचा विकासही खूप झाला. ‘ अकट-बिकट कवनांच्या चाली’ मधले पवाडे गाणारे शाहीर लोकमंच गाजवीत असतात. मोजक्या साथीदारांच्या मदतीने आणि डफ-तुण्याच्या साथीवर शाहिरी पवाड्याचा बुलंद आवाज ऐकू आला की मराठमोळ्या मनाला वेगळे स्फुरण चढते. देवळात भजन रंगते तर चव्हाट्यावर शाहिरी कला. उत्तर पेशवाईपासून लावण्याची रचना मराठी मनाला, भुलवू लागली. लावणीचे आकर्षण आजही कमी झालेले नाही. गण, गौळण, लावण्या आणि हजरजबाबी संवाद यांनी फुलवलेला तमाशाही रांगड्या मनाला पसंत पडतो. या तोकप्रिय कलांचे माध्यम स्वमतप्रसारासाठी भिन्न विचार प्रणालीच्या लोकांनी वापरलेले आहे. या सर्व कला सर्वार्थीं लोककला असल्यामुळे त्या शहरांतून, खेड्यांतून हजारोंच्या समुदायांपुढे सादर केल्या जातात. सनई-चौघड्यांच्या स्वरांत उगवलेला महाराष्ट्रातला दिवस भजनाच्या किंवा लावणीपवाड्याच्या किंवा नाट्यसंगीताच्या, किंवा अभिजात संगीताच्या स्वरांनीच संपतो.

भक्ती, शक्ती आणि कलासक्ती यांचे संगमतीर्थ म्हणजे महाराष्ट्र, महाराष्ट्रातल्या या गुणसंपदेचा महाराष्ट्राला अभिमान वाटतो. येथे भक्तीला समतेचे अधिष्ठान आहे. शक्तीला स्वातंत्र्यप्रेमाचे वरदान आहे. आणि कलाशक्तीची परिणती जीवनानंदात होणारी आहे. ही अस्मिता केवळ परंपरेतून आणि पूर्वजपूजेतून निष्पन्न झालेली नाही. तिला कालानुरूप भिन्नभिन्न स्वरूपे प्राप्त होतात. सामाजिक प्रबोधन, राजकीय जागृती, विधायक कर्तृत्व, कला आणि क्रीडा यांतील गुणोत्कर्षासाठी धरलेली ईर्ष्या ही या अस्मितेची आधुनिक रूपे आहेत.

आधुनिक भारताच्या म्हणजेच गेल्या शंभर वर्षाच्या इतिहासाकडे नजर टाकली तरी असे दिसेल की राष्ट्रनिर्मितीच्या आणि प्रगतीच्या हेतूने जे जे उपक्रम झाले त्यांत महाराष्ट्र बिनीवरच राहिलेला आहे. राष्ट्रीय सभेची स्थापना आणि स्वातंत्र्याचे आंदोलन; धर्मसुधारणेचे प्रयत्न आणि समतेसाठी केलेले संघर्ष; ग्रामीण, पुनर्रचनेचे विधायक कार्य आणि ज्ञान-विज्ञानाची उपासना; कलाविकास आणि क्रीडा चातुर्य... लोकजीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर असणे हा महाराष्ट्राचा नैसर्गिक स्वभावधर्म झाला आहे. राष्ट्रावर आलेल्या परचक्रांच्या वेळी ही महाराष्ट्राने आपला हविर्भाग आंनदाने दिला आहे.

[next]

महाराष्ट्र रांगडा आहे आणि रसिक आहे. झुंजार आहे आणि भाविक आहे. मराठी मातीच्या अभिमानाबरोबरच येथे साऱ्या देशाची चिंता आहे. ऐषआराम आणि मिजास यांच्यापेक्षा तो साधेपणा आणि सत्त्व सांभाळणारा आहे. महाराष्ट्र तत्त्वासाठी भांडतो आणि जीवनमूल्ये जपण्यासाठी निकराने झुंजतो; पन राष्ट्रापेक्षा आपण महान आहोत असे त्याने कधीही मानलेले नाही. महाराष्ट्राचे व्यक्तित्व म्हणजे केवळ गुणसंपदेचे भांडार नाही. जगात निर्दोष असे काय आहे? पीळ थोडा सैल केला, अभिमानाला अहंकाराचा वास मारू दिला नाही, निर्भय नि:स्पृह बाण्याला तुसडेपणाचि झाक आली नाही, ‘सत्यं ब्रूयात’ ला ‘प्रिय ब्रूयात’ ही जोड देता आली, तर महाराष्ट्र सर्वप्रिय होऊ शकेलही. पण मग तो कदाचित महाराष्ट्र राहाणार नाही.

भारताच्या तारांगणात महाराष्ट्रा हा व्याधाचा तारा आहे. तेजस्वी. विविधरंगी. वैशिष्ट्याने डोळ्यात भरणारा. भारताचे सर्वच प्रदेश आपापल्या परीने सुंदर आहेत, तसा महाराष्ट्र ही सुंदर आहे आणि बाकी सर्वांच्या सौंदर्याला आधार देण्याएवढे त्याचे सामर्थ्य उदंड आणि उदार आहे. राष्ट्राने आपल्या सत्त्वशीलतेची कदर करावी आणि सेवा रुजू करून घ्यावी एवढेच त्याचे मागणे आहे.

- वसंत बापट


मराठीमाती डॉट कॉम संपादक मंडळ
२००२ । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.

अभिप्राय

नाव

अ रा कुलकर्णी,1,अ ल खाडे,2,अ ज्ञा पुराणिक,1,अंकित भास्कर,1,अंजली भाबट-जाधव,1,अंधश्रद्धेच्या कविता,5,अकोला,1,अजय दिवटे,1,अजित पाटणकर,18,अनंत दळवी,1,अनंत फंदी,1,अनंत भावे,1,अनिकेत येमेकर,2,अनिकेत शिंदे,1,अनिल गोसावी,2,अनिल भारती,1,अनिल वल्टे,8,अनुभव कथन,19,अनुरथ गोरे,1,अनुराधा पाटील,1,अनुराधा फाटक,39,अनुवादित कविता,1,अपर्णा तांबे,7,अब्राहम लिंकन,2,अभंग,6,अभिजित गायकवाड,1,अभिजीत टिळक,2,अभिव्यक्ती,1386,अभिषेक कातकडे,5,अभिषेक घुगे,1,अमन मुंजेकर,7,अमरश्री वाघ,2,अमरावती,1,अमित पडळकर,4,अमित पवार,1,अमित बाविस्कर,3,अमित सुतार,1,अमुक-धमुक,1,अमृत जोशी,1,अमृता शेठ,1,अमोल कोल्हे,1,अमोल तांबे,1,अमोल देशमुख,1,अमोल बारई,7,अमोल वाघमारे,1,अमोल सराफ,2,अरविंद जामखेडकर,1,अरविंद थगनारे,5,अरुण कोलटकर,1,अरुण म्हात्रे,1,अर्चना कुळकर्णी,1,अर्चना डुबल,2,अर्जुन फड,3,अर्थनीति,3,अल्केश जाधव,1,अविनाश धर्माधिकारी,2,अशोक थोरात,1,अशोक रानडे,1,अश्विनी तातेकर-देशपांडे,1,अश्विनी तासगांवकर,2,अस्मिता मेश्राम-काणेकर,7,अहमदनगर,1,अक्षय वाटवे,1,अक्षरमंच,1132,आईच्या कविता,29,आईस्क्रीम,3,आकाश पवार,2,आकाश भुरसे,8,आज,6,आजीच्या कविता,1,आठवणींच्या कविता,18,आतले-बाहेरचे,3,आतिश कविता लक्ष्मण,1,आत्मविश्वासाच्या कविता,15,आदर्श कामिरे,4,आदित्य कदम,1,आदेश ताजणे,8,आनंद दांदळे,8,आनंद प्रभु,1,आनंदाच्या कविता,26,आमट्या सार कढी,18,आर समीर,1,आरती गांगण,2,आरती शिंदे,4,आरत्या,82,आरोग्य,21,आशा गवाणकर,1,आशिष खरात-पाटील,1,आशिष चोले,1,इंदिरा गांधी,1,इंदिरा संत,6,इंद्रजित नाझरे,26,इंद्रजीत भालेराव,1,इतिहास,281,इलाही जमादार,1,इसापनीती कथा,48,उत्तम कोळगावकर,2,उदय दुदवडकर,1,उन्मेष इनामदार,1,उपवासाचे पदार्थ,15,उमा पाटील,1,उमेश कानतोडे,1,उमेश कुंभार,14,उमेश चौधरी,1,उस्मानाबाद,1,ऋग्वेदा विश्वासराव,5,ऋचा पिंपळसकर,10,ऋचा मुळे,18,ऋषिकेश शिरनाथ,2,ऋषीकेश कालोकार,2,ए श्री मोरवंचीकर,1,एच एन फडणीस,1,एप्रिल,30,एम व्ही नामजोशी,1,एहतेशाम देशमुख,2,ऐतिहासिक स्थळे,2,ऑक्टोबर,31,ऑगस्ट,31,ऑडिओ कविता,15,ऑडिओ बुक,1,ओंकार चिटणीस,1,ओम ढाके,8,ओमकार खापे,1,ओशो,1,औरंगाबाद,1,कपिल घोलप,12,करण विधाते,1,करमणूक,72,कर्क मुलांची नावे,1,कल्पना देसाई,1,कल्याण इनामदार,1,कविता शिंगोटे,1,कवितासंग्रह,280,कवी अनिल,1,कवी ग्रेस,4,कवी बी,1,काजल पवार,1,कार्यक्रम,12,कार्ल खंडाळावाला,1,कालिंदी कवी,2,काशिराम खरडे,1,कि का चौधरी,1,किरण कामंत,1,किल्ले,97,किल्ल्यांचे फोटो,5,किशोर चलाख,6,किशोर पवार,1,कुठेतरी-काहीतरी,3,कुणाल खाडे,3,कुणाल लोंढे,1,कुसुमाग्रज,9,कृष्णकेशव,1,कृष्णाच्या आरत्या,5,के के दाते,1,के तुषार,8,के नारखेडे,2,केदार कुबडे,40,केदार नामदास,1,केदार मेहेंदळे,1,केशव मेश्राम,1,केशवकुमार,2,केशवसुत,5,कोल्हापूर,1,कोशिंबीर सलाड रायते,14,कौशल इनामदार,1,खंडोबाची स्थाने,2,खंडोबाच्या आरत्या,2,खरगपूर,1,ग दि माडगूळकर,6,ग ल ठोकळ,3,ग ह पाटील,4,गंगाधर गाडगीळ,1,गझलसंग्रह,1,गडचिरोली,1,गणपतीच्या आरत्या,5,गणपतीच्या गोष्टी,24,गणेश कुडे,2,गणेश तरतरे,20,गणेश निदानकर,1,गणेश पाटील,1,गणेश भुसारी,1,गण्याचे विनोद,1,गाडगे बाबा,1,गायत्री सोनजे,5,गावाकडच्या कविता,14,गुरुदत्त पोतदार,2,गुरूच्या आरत्या,2,गुलझार काझी,1,गो कृ कान्हेरे,1,गो गं लिमये,1,गोकुळ कुंभार,13,गोड पदार्थ,55,गोपीनाथ,2,गोविंद,1,गोविंदाग्रज,1,गौतम जगताप,1,गौरांग पुणतांबेकर,1,घरचा वैद्य,2,घाट,1,चंद्रकांत जगावकर,1,चंद्रपूर,1,चटण्या,3,चातुर्य कथा,6,चित्रपट समीक्षा,1,चैतन्य म्हस्के,1,चैत्राली इंगळे,2,जयश्री चुरी,1,जयश्री मोहिते,1,जवाहरलाल नेहरू,1,जळगाव,1,जाई नाईक,1,जानेवारी,31,जालना,1,जितेश दळवी,1,जिल्हे,31,जीवनशैली,432,जुलै,31,जून,30,ज्योती किरतकुडवे,1,ज्योती मालुसरे,1,टीझर्स,1,ट्रेलर्स,3,ठाणे,2,डिसेंबर,31,डॉ मानसी राजाध्यक्ष,1,डॉ. दिलीप धैसास,1,तनवीर सिद्दिकी,1,तन्मय धसकट,1,तरुणाईच्या कविता,7,तिच्या कविता,63,तुकाराम गाथा,4,तुकाराम धांडे,1,तुतेश रिंगे,1,तेजश्री कांबळे-शिंदे,4,तेजस्विनी देसाई,1,दत्ता हलसगीकर,2,दत्ताच्या आरत्या,5,दत्तात्रय भोसले,1,दत्तो तुळजापूरकर,1,दया पवार,1,दर्शन जोशी,2,दर्शन शेळके,1,दशरथ मांझी,1,दादासाहेब गवते,1,दामोदर कारे,1,दिनदर्शिका,366,दिनविशेष,366,दिनेश बोकडे,1,दिनेश लव्हाळे,1,दिनेश हंचाटे,1,दिपक शिंदे,2,दिपाली गणोरे,1,दिवाळी फराळ,26,दीपा दामले,1,दीप्तीदेवेंद्र,1,दुःखाच्या कविता,76,दुर्गेश साठवणे,1,देवीच्या आरत्या,3,देशभक्तीपर कविता,3,धनंजय सायरे,1,धनराज बाविस्कर,71,धनश्री घाणेकर,1,धार्मिक स्थळे,1,धुळे,1,धोंडोपंत मानवतकर,12,नमिता प्रशांत,1,नलिनी तळपदे,1,ना के बेहेरे,1,ना घ देशपांडे,4,ना धों महानोर,3,ना वा टिळक,1,नांदेड,1,नागपूर,1,नारायण शुक्ल,1,नारायण सुर्वे,2,नाशिक,1,नासीर संदे,1,निखिल पवार,3,नितीन चंद्रकांत देसाई,1,निमित्त,4,निराकाराच्या कविता,16,निवडक,9,निसर्ग कविता,37,निसर्ग चाटे,2,निळू फुले,1,नृसिंहाच्या आरत्या,1,नोव्हेंबर,30,न्याहारी,50,पथ्यकर पदार्थ,2,पद्मा गोळे,4,परभणी,1,पराग काळुखे,1,पर्यटन स्थळे,1,पल्लवी माने,1,पवन कुसुंदल,2,पांडुरंग वाघमोडे,3,पाककला,322,पाककृती व्हिडिओ,15,पालकत्व,7,पावसाच्या कविता,40,पी के देवी,1,पु ल देशपांडे,9,पु शि रेगे,1,पुंडलिक आंबटकर,4,पुडिंग,10,पुणे,15,पुरुषोत्तम जोशी,1,पुरुषोत्तम पाटील,1,पुर्वा देसाई,2,पूजा काशिद,1,पूजा चव्हाण,1,पूनम राखेचा,1,पोस्टर्स,5,पोळी भाकरी,27,पौष्टिक पदार्थ,20,प्र श्री जाधव,12,प्रकाश पाटील,1,प्रजोत कुलकर्णी,1,प्रतिक बळी,1,प्रतिभा जोजारे,1,प्रतिमा इंगोले,1,प्रतिक्षा जोशी,1,प्रदिप कासुर्डे,1,प्रफुल्ल चिकेरूर,10,प्रभाकर महाजन,1,प्रभाकर लोंढे,3,प्रवास वर्णन,1,प्रवासाच्या कविता,11,प्रविण पावडे,15,प्रवीण दवणे,1,प्रवीण राणे,1,प्रशांतकुमार मोहिते,2,प्रसन्न घैसास,2,प्रज्ञा वझे,2,प्रज्ञा वझे-घारपुरे,10,प्राजक्ता गव्हाणे,1,प्रितफुल प्रित,1,प्रिती चव्हाण,27,प्रिया जोशी,1,प्रियांका न्यायाधीश,3,प्रेम कविता,97,प्रेरणादायी कविता,17,फ मुं शिंदे,3,फादर स्टीफन्स,1,फेब्रुवारी,29,फोटो गॅलरी,11,फ्रॉय निस्सेन,1,बहिणाबाई चौधरी,6,बा भ बोरकर,8,बा सी मर्ढेकर,6,बातम्या,11,बाबा आमटे,1,बाबाच्या कविता,10,बाबासाहेब आंबेड,1,बायकोच्या कविता,5,बालकविता,14,बालकवी,9,बाळाची मराठी नावे,1,बाळासाहेब गवाणी-पाटील,21,बिपीनचंद्र नेवे,1,बी अरुणाचलाम्‌,1,बी रघुनाथ,1,बीड,1,बुलढाणा,1,बेकिंग,9,बेहराम कॉन्ट्रॅक्टर,1,भंडारा,1,भक्ती कविता,23,भक्ती रावनंग,1,भरत माळी,2,भा दा पाळंदे,1,भा रा तांबे,7,भा वें शेट्टी,1,भाग्यवेध,1,भाज्या,29,भाताचे प्रकार,16,भानुदास,1,भानुदास धोत्रे,1,भावनांची वादळे,1,भुषण राऊत,1,भूगोल,1,भूमी जोशी,1,म म देशपांडे,1,मं वि राजाध्यक्ष,1,मंगला गोखले,1,मंगळागौरीच्या आरत्या,2,मंगेश कळसे,9,मंगेश पाडगांवकर,5,मंजुषा कुलकर्णी,2,मंदिरांचे फोटो,3,मंदिरे,4,मधल्या वेळेचे पदार्थ,41,मधुकर आरकडे,1,मधुकर जोशी,1,मधुसूदन कालेलकर,2,मनमोहन नातू,3,मनाचे श्लोक,205,मनिषा दिवेकर,3,मनिषा फलके,1,मनोज शिरसाठ,9,मराठी,1,मराठी उखाणे,2,मराठी कथा,107,मराठी कविता,1173,मराठी कवी,3,मराठी कोट्स,4,मराठी गझल,30,मराठी गाणी,2,मराठी गोष्टी,67,मराठी चारोळी,42,मराठी चित्रपट,19,मराठी टिव्ही,53,मराठी नाटक,1,मराठी पुस्तके,7,मराठी प्रेम कथा,23,मराठी भयकथा,44,मराठी मालिका,20,मराठी रहस्य कथा,2,मराठी लेख,48,मराठी विनोद,1,मराठी साहित्य,288,मराठी साहित्यिक,2,मराठी सुविचार,2,मराठीप्रेमी पालक महासंमेलन,5,मराठीमाती,145,मसाले,12,महात्मा गांधी,8,महात्मा फुले,1,महाराष्ट्र,307,महाराष्ट्र फोटो,11,महाराष्ट्राचा इतिहास,32,महाराष्ट्रीय पदार्थ,22,महालक्ष्मीच्या आरत्या,2,महेंद्र म्हस्के,1,महेश जाधव,3,महेश बिऱ्हाडे,9,मांसाहारी पदार्थ,17,माझं मत,4,माझा बालमित्र,88,मातीतले कोहिनूर,19,माधव ज्यूलियन,6,माधव मनोहर,1,माधवानुज,3,मानसी सुरज,1,मारुतीच्या आरत्या,2,मार्च,31,मिलिंद खांडवे,1,मीना तालीम,1,मुंबई,12,मुंबई उपनगर,1,मुकुंद भालेराव,1,मुकुंद शिंत्रे,35,मुक्ता चैतन्य,1,मुलांची नावे,1,मुलाखती,1,मे,31,मैत्रीच्या कविता,8,मोहिनी उत्तर्डे,2,यवतमाळ,1,यशपाल कांबळे,4,यशवंत दंडगव्हाळ,25,यादव सिंगनजुडे,2,योगा,1,योगेश कर्डिले,6,योगेश सोनवणे,2,रंगपंचमी,1,रंजना बाजी,1,रजनी जोगळेकर,5,रत्नागिरी,1,रविंद्र गाडबैल,1,रविकिरण पराडकर,1,रवींद्र भट,1,रा अ काळेले,1,रा देव,1,रागिनी पवार,1,राजकारण,2,राजकीय कविता,12,राजकुमार शिंगे,1,राजेंद्र भोईर,1,राजेश पोफारे,1,राजेश्वर टोणे,3,राम मोरे,1,रामकृष्ण जोशी,2,रामचंद्राच्या आरत्या,5,रायगड,1,राहुल अहिरे,3,रुपेश सावंत,1,रेश्मा जोशी,2,रेश्मा विशे,1,रोहित काळे,7,रोहित साठे,15,लघुपट,3,लता मंगेशकर,2,लहुजी साळवे,1,लक्ष्मण अहिरे,2,लक्ष्मीकांत तांबोळी,2,लातूर,1,लिलेश्वर खैरनार,2,लीना पांढरे,1,लीलावती भागवत,1,लोकमान्य टिळक,3,लोणची,9,वंदना विटणकर,2,वर्धा,1,वसंत बापट,12,वसंत साठे,1,वसंत सावंत,1,वा गो मायदेव,1,वा ना आंधळे,1,वा भा पाठक,2,वा रा कांत,3,वात्रटिका,2,वादळे झेलतांना,2,वामन निंबाळकर,1,वासुदेव कामथ,1,वाळवणाचे पदार्थ,6,वि दा सावरकर,3,वि भि कोलते,1,वि म कुलकर्णी,5,वि स खांडेकर,1,विंदा करंदीकर,8,विक्रम खराडे,1,विचारधन,215,विजय पाटील,1,विजया जहागीरदार,1,विजया वाड,2,विजया संगवई,1,विठ्ठल वाघ,3,विठ्ठलाच्या आरत्या,5,विद्या कुडवे,4,विद्या जगताप,2,विद्याधर करंदीकर,1,विनायक मुळम,1,विरह कविता,58,विराज काटदरे,1,विलास डोईफोडे,5,विवेक जोशी,3,विशाल शिंदे,1,विशेष,12,विष्णूच्या आरत्या,4,विज्ञान तंत्रज्ञान,2,वृषाली सुनगार-करपे,1,वेदांत कोकड,1,वैभव गव्हाळे,1,वैभव सकुंडे,1,वैशाली झोपे,1,वैशाली नलावडे,1,व्यंगचित्रे,17,व्रत-वैकल्ये,1,व्हिडिओ,13,शंकर रामाणी,1,शंकर विटणकर,1,शंकर वैद्य,1,शंकराच्या आरत्या,4,शरणकुमार लिंबाळे,1,शशांक रांगणेकर,1,शशिकांत शिंदे,1,शां शं रेगे,1,शांततेच्या कविता,9,शांता शेळके,11,शांताराम आठवले,1,शाम जोशी,1,शारदा सावंत,4,शाळेचा डबा,15,शाळेच्या कविता,11,शितल सरोदे,1,शिरीष पै,1,शिरीष महाशब्दे,8,शिल्पा इनामदार-आर्ते,1,शिवाजी महाराज,7,शिक्षकांवर कविता,4,शुभम बंबाळ,2,शुभम सुपने,2,शेतकर्‍याच्या कविता,14,शेती,1,शेषाद्री नाईक,1,शैलेश सोनार,1,श्याम खांबेकर,1,श्रद्धा नामजोशी,9,श्रावणातल्या कहाण्या,27,श्री दि इनामदार,1,श्री बा रानडे,1,श्रीकृष्ण पंडित,1,श्रीकृष्ण पोवळे,1,श्रीधर रानडे,2,श्रीधर शनवारे,1,श्रीनिवास खळे,1,श्रीपाद कोल्हटकर,1,श्रीरंग गोरे,1,श्रुती चव्हाण,1,संघर्षाच्या कविता,33,संजय उपाध्ये,1,संजय डोंगरे,1,संजय पाटील,1,संजय बनसोडे,2,संजय शिंदे,1,संजय शिवरकर,5,संजय सावंत,1,संजीवनी मराठे,3,संत एकनाथ,1,संत चोखामेळा,1,संत जनाबाई,1,संत तुकडोजी महाराज,2,संत तुकाराम,8,संत नामदेव,3,संत ज्ञानेश्वर,6,संतोष जळूकर,1,संतोष झोंड,1,संतोष सेलुकर,30,संदिप खुरुद,5,संदीपकुमार खुरुद,1,संदेश ढगे,39,संध्या भगत,1,संपादक मंडळ,1,संपादकीय,11,संपादकीय व्यंगचित्रे,2,संस्कार,2,संस्कृती,133,सई कौस्तुभ,1,सचिन पोटे,12,सचिन माळी,1,सण-उत्सव,22,सणासुदीचे पदार्थ,32,सतिश चौधरी,1,सतीश काळसेकर,1,सदानंद रेगे,2,सदाशिव गायकवाड,2,सदाशिव माळी,1,सनी आडेकर,10,सप्टेंबर,30,समर्थ रामदास,206,समर्पण,8,सरबते शीतपेये,8,सरयु दोशी,1,सरला देवधर,1,सरिता पदकी,3,सरोजिनी बाबर,1,सलीम रंगरेज,8,सविता कुंजिर,1,सांगली,1,सागर बनगर,1,सागर बाबानगर,1,सातारा,1,साने गुरुजी,5,सामाजिक कविता,113,सामान्य ज्ञान,8,सायली कुलकर्णी,7,साहित्य सेतू,1,साक्षी खडकीकर,9,साक्षी यादव,1,सिंधुदुर्ग,1,सिद्धी भालेराव,1,सिमा लिंगायत-कुलकर्णी,3,सुदेश इंगळे,24,सुधाकर राठोड,1,सुनिल नागवे,1,सुनिल नेटके,1,सुनील गाडगीळ,1,सुभाष कटकदौंड,2,सुमती इनामदार,1,सुमित्र माडगूळकर,1,सुरज दळवी,1,सुरज दुतोंडे,1,सुरज पवार,1,सुरेश भट,2,सुरेश सावंत,2,सुशील दळवी,1,सुशीला मराठे,1,सुहास बोकरे,6,सैनिकांच्या कविता,4,सैरसपाटा,128,सोपानदेव चौधरी,1,सोमकांत दडमल,1,सोलापूर,1,सौरभ सावंत,1,स्तोत्रे,2,स्नेहा कुंभार,1,स्फुटलेखन,4,स्फूर्ती गीत,1,स्माईल गेडाम,4,स्वप्ना पाटकर,1,स्वप्नाली अभंग,5,स्वप्नील जांभळे,2,स्वाती काळे,1,स्वाती खंदारे,320,स्वाती गच्चे,1,स्वाती दळवी,9,स्वाती नामजोशी,31,स्वाती पाटील,1,स्वाती वक्ते,2,ह मुलांची नावे,1,हमार्टिक समा,1,हरितालिकेच्या आरत्या,1,हर्षद खंदारे,42,हर्षद माने,1,हर्षदा जोशी,3,हर्षवर्धन घाटे,2,हर्षाली कर्वे,2,हसनैन आकिब,3,हितेशकुमार ठाकूर,1,हिरवळ,1,हेमंत जोगळेकर,1,हेमंत देसाई,1,हेमंत सावळे,1,हेमा चिटगोपकर,8,होळी,5,ज्ञानदा आसोलकर,1,ज्ञानदेवाच्या आरत्या,2,marathimati,1,
ltr
item
मराठीमाती । माझ्या मातीचे गायन: महाराष्ट्र आपला प्रदेश (महाराष्ट्र)
महाराष्ट्र आपला प्रदेश (महाराष्ट्र)
महाराष्ट्र आपला प्रदेश (महाराष्ट्र) - महाराष्ट्राची भूमी थंड झालेल्या लाव्हाच्या थरांची बनलेली आहे [Maharashtra Aapala Pradesh - Maharashtra].
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEj3o-bneoHpEEuvu54f8os6ns6TTWut2-3OMakyaITl7rM_k-Plg0Pgkn-8b0b0iT8KF0-N4RiVXvwqBDeKFcad-OdpXTWDqkN7EwTKfvAim4iPIGuhvAjZNa_5TeilgC3cuGtT_w9chO1O/s1600-rw/paschim-sahyadri-matheran.webp
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEj3o-bneoHpEEuvu54f8os6ns6TTWut2-3OMakyaITl7rM_k-Plg0Pgkn-8b0b0iT8KF0-N4RiVXvwqBDeKFcad-OdpXTWDqkN7EwTKfvAim4iPIGuhvAjZNa_5TeilgC3cuGtT_w9chO1O/s72-c-rw/paschim-sahyadri-matheran.webp
मराठीमाती । माझ्या मातीचे गायन
https://www.marathimati.com/2008/04/aapala-pradesh-maharashtra.html
https://www.marathimati.com/
https://www.marathimati.com/
https://www.marathimati.com/2008/04/aapala-pradesh-maharashtra.html
true
2079427118266147504
UTF-8
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची