खांदेरी उंदेरी किल्ला - [Khanderi Underi Fort] खांदेरी उंदेरी किल्ला जलदुर्ग प्रकारातील आहे. रायगड जिल्ह्यातील पश्चिम कोकण डोंगररांगेतील खांदेरी उंदेरी किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने सोपा समजला जातो.
सह्याद्रीतील भटक्या ट्रेकर्सला ऐकून सुपरिचित असलेली परंतु या सर्व ट्रेकर्सपैकी अत्यंत कमी जणांनी प्रत्यक्ष पाहिलेली जलदुर्गांची जोडगळ म्हणजेच किल्ले खांदेरी उंदेरी.
खांदेरी उंदेरी किल्ला - [Khanderi Underi Fort] खांदेरी उंदेरी किल्ला जलदुर्ग प्रकारातील आहे. रायगड जिल्ह्यातील पश्चिम कोकण डोंगररांगेतील खांदेरी उंदेरी किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने सोपा समजला जातो. सह्याद्रीतील भटक्या ट्रेकर्सला ऐकून सुपरिचित असलेली परंतु या सर्व ट्रेकर्सपैकी अत्यंत कमी जणांनी प्रत्यक्ष पाहिलेली जलदुर्गांची जोडगळ म्हणजेच किल्ले खांदेरी उंदेरी. समुद्राच्या लाटांना समर्थपणे तोंड देत दिमाखाने उभे असणाऱ्या खांदेरी-उंदेरीचे वैशिष्ट्य म्हणजे मजबूत तटबंदी, उंदेरीवर असणाऱ्या १५-१६ तोफा तर खांदेरीवरच्या अत्यंत दुर्मिळ अशा तोफांना वाहून नेणाऱ्या गाड्यासहीत असणाऱ्या ३ तोफा.खांदेरी उंदेरी किल्ल्यावर पहाण्यासारखी ठिकाणे
खांदेरी किल्ल्याकडे होडीने जात असतांनाच खांदेरीची मजबूत तटबंदी, बुलंद बुरुज आणि त्यावर असनारे ‘मुंबई पोर्ट ट्रस्ट’चे दिपगृह आपले लक्ष वेधून घेते खांदेरीवर दक्षिणेला ३० मी. उंचीची तर उत्तरेला २० मी. उंचीची टेकडी आहे. या दोन टेकड्यांमध्ये बोटींसाठी धक्का बांधलेला आहे. या धक्क्यावर ज्या ठिकाणी समुद्राच्या पाण्याचा स्पर्श होतो तेथे चक्क एक तोफ पुरलेली आहे. तोफेचा मागचा भाग पाण्यातून डोकावतांना दिसतो. बाजूलाच बोटीची एक शेड बांधली आहे.
वेताळाचे मंदिर: धक्क्याच्या बाजूलाच उजवीकडे वेताळाचे लाकडी मंदिर आहे. आत एक मोठी पांढऱ्या रंगाने रंगविलेली शिळा आहे. ही शिळा म्हणजेच वेताळ होय. ही शिळा दरवर्षी आकाराने मोठी होत जाते अशी गावकऱ्यांची श्रद्धा आहे. होळीच्या दिवशी येथे जत्रा भरते.
भांड्याचा आवाज येणारा खडक: डावीकडे असणाऱ्या धक्क्यावरून उतरून आपण दिपगृहकडे निघालो की आपण बाजुलाच झाडांमध्ये हा मध्यम आकाराच खडक दिसतो. छोट्या दगडांनी यावर ठोकून पाहिले असता अक्षरक्ष भांड्यावर ठोकल्या सारखा आवाज येतो.
गाड्यावरील असणाऱ्या तोफा: धक्क्यावरून दिपगृहाकडे जातांना दिपगृहाला लागुनच असणारे एक तळे आहे. ते मागे टाकून दिपगृहाच्या बाजूने पुढे जातांना बुरुजावर जाण्यासाठी पायऱ्या केलेल्या आहेत. वर पोहचल्यावर आपल्याला दिसते ती गाड्यांवर ठेवलेली तोफ. ही तोफ आकाराने मध्यम असून ती आजही सुस्थित आहे. अशाच दोन तोफा लहान टेकडीच्या बाजूला असणाऱ्या बुरुजावर आहेत.
दिपगृह: १८६७ मध्ये बांधण्यात आलेले दिपगृह २५ मी. उंचीचे असून षट्कोनी आकाराचे आहे. दिपगृहाच्या अर्ध्या उंचीवर दिपगृहाच्या दोन्ही बाजूला एक गच्ची लागते. दिपगृहाच्या शिखरावरून किल्ल्याचा मनोरम देखावा आपण पाहू शकतो.
मजबूत तटबंदी: दिपगृहाच्या बाजूला तटबंदीवरजिथे हेलिपॅड आहे. तिथेच खाली एक दरवाजा आहे. हादरवाजा आपल्याला किल्ल्याच्या बाहेरील समुद्राकडे घेऊन जातो. येथून बाहेर पडल्याअर कडेकडेने चालतांना किल्ल्याच्या मजबूत तटबंदीची आणि बुरुजांनी कल्पना येते. याशिवाय किल्ल्यावर महादेवाचे एक जुने मंदिर असून गणपति मारुति चे अलिकडे बांधलेले मंदिरे पण आहे. किल्ल्यावर पाण्याचे टाकेसुद्धा आहे. वेताळाच्या मंदिराच्या दिशेने चालत गेल्यावर तटबंदीमध्ये एक द्वार आहे. तिथेच एक छोटी खोली आहे.
उंदेरी: खांदेरी किल्ल्याप्रमाणे उंदेरीवर पण दोन कमी उंचीच्या टेकड्या आहेत. या ठिकाणी बोटी लागतात तेथून किल्ल्याच्या तटबंदीवर पडझड झालेल्या दगडांवरून चालत जावे लागते. आपल्या सारख्या गिरिदुर्गावर भेट देणाऱ्या ट्रेकर्सला किल्ल्यावर तोफांचे दर्शन तसे दुर्लभच मात्र उंदेरीवर तोफांचा खजिनांच बघायला मिळतो. संपूर्ण किल्ल्यावर एकंदर १५ ते १६ तोफा आहेत. किल्ल्यावर तीन पाण्याची टाकी असून त्यातील पाणी पिण्यासाठी मात्र उपयोगी नाही. किल्ल्यावर काही ठिकाणी खूपच झाडी असून वाटेत एका ठिकाणी तर चक्क झाडाच्या खोडांचे दार तयार झालेले आहे. किल्ल्याच्या तटबंदीमध्ये एक अगदी लहान दार असून येथून बाहेर गेले असतांना किल्ल्याच्या मजबूत तटबंदीची आणि बुरुजाची कल्पना येऊ शकते. येथे बोट लावून पण आपण किल्ल्यात शिरू शकतो.
खांदेरी उंदेरी गडावर जाण्याच्या वाटा
थळ मार्गे: खांदेरी उंदेरी या जलदुर्गावर जाण्यासाठी आपल्याला जावे लागते. ते म्हणजे अलिबागला. अलिबाग ते रेवस या मार्गावर अलिबागपासून ४ कि.मी. अंतरावर थळ नावाच्या गावाचा फाटा लागतो. या फाट्यापासून २ ते ३ कि.मी. वर थळ गाव आहे. अलिबागहून येथपर्यंत येण्यासाठी एस.टी. बस उपलब्ध आहेत. थळ बाजारपेठे जवळून आपल्याला किल्ल्यावर जाण्यास बोटी मिळू शकतात. अलिबागहून थळ आगाराकडे जाणाऱ्या एस.टी. ने ही आपण बाजरपेठेकडे जाणाऱ्या फाट्यावर उतरून चालत येथे पर्यंत येऊ शकतो.
थळ बाजारपेठे जवळच्या समुद्रकिनाऱ्याहून दिसणारी दोन बेटे आपले लक्ष. सहज वेधून घेतात. यापैंकी जवळ असणारा किल्ला म्हणजे उंदेरी व डाव्याबाजूच्या थोड्या लांब असणारा किल्ला म्हणजे खांदेरी. खांदेरी किल्ला त्यावर असणाऱ्या दिपगृहामुळे लगेचच लक्षात येतो. थळ बाजारपेठेच्या ठिकाणी सकाळी लवकर येणे सोईस्कर अन्यथा किनाऱ्यावरील बोटी मासेमारी करण्यासाठी सकाळी ६, ६.३० च्या आत समुद्रात जायला निघतात. उशीरा पोहचल्यास मासेमारी करून येणाऱ्या बोटी आपल्याला मिळू शकतात. साधारण मध्यम आकाराच्या ५ ते ६ लोक बसू शकतील अशा होड्या संपूर्ण खांदेरी-उंदेरी दाखवून परत आणण्याचे होडीवाले भाव सांगतांना मात्र दुप्पट सांगतात. खांदेरी किल्ल्यावर ज्याप्रमाणे बोटींना धक्क्याची सोय आहे.
ती सोय उंदेरीवर नाही. त्यामुळे उंदेरीवर ओहटीच्या वेळेसच जाता येते. खांदेरीवर कधीही गेले तरी चालते मात्र उंदरीवर भरती ओहटीची वेळ पाळूनच जावे लागते. भरती ओहटीची वेळ काढण्याची सोपी पद्धत म्हणजे आपण ज्या दिवशी किल्ला पाहण्यास जाऊ यादिवशी मराठी पंचागाप्रमाणे जी तिथी असेल तिला ३/४ ने गुणल्यास पूर्ण भरतीची वेळ सांगणारा आकडा मिळतो. उदा. जर चतुर्थी असेल तर ४ ला ३/४ ने गुणल्यास ३ आकडा मिळतो.
म्हणजेच ३ वा रात्री किंवा दुपारी पूर्ण भरती असेल याचप्रमाणे पूर्ण भरतीच्या वेळेनंतर ठिक ६ तासांनी पूर्ण ओहटीची वेळ असते. तर वरील उदा. मध्ये ९ वाजता रात्री आणि सकाळी ओहटी असते. थळच्या समुद्रकिनाऱ्याहून उंदेरी किल्ला समुद्रात साधारण अडीच कि.मी. वर आहे. तर खांदेरी किल्ला किनाऱ्यापासून तीन साडेतीन कि.मी वर आहे. उंदेरीहून पश्चिमेला पाऊण कि.मी. वर खांदेरी आहे.
किल्ल्यावर राहण्याची सोय नाही. जेवणाची सोय आपण स्वतः करावी लागते. खांदरीवर पिण्याचे पाण्याचे टाके आहे, उंदेरीवर अजिबात नाही. किल्ल्यावर जाण्यासाठी अलिबाग मार्गे २ तास लागतात.
अभिप्राय