महिलांसाठी मराठी उखाणे - पत्नीने पतीचे नाव घेण्यासाठी संग्रहित केलेले पारंपारिक मराठी उखाणे [Marathi Ukhane for Female].
महिलांसाठी पारंपारिक मराठी उखाण्यांचा संग्रह
महिलांसाठी मराठी उखाणे
(Marathi Ukhane for Female) पत्नीने पतीचे नाव घेण्यासाठी संग्रहित केलेले पारंपारिक मराठी उखाणे.
महिलांसाठी मराठी उखाणे
१) मंदिरात वाहते फुल आणि पान __________ रावांचे नाव घेते, ठेवून सर्वांचा मान.
२) छन छन बांगड्या, छुम छुम पैंजन, __________ रावांचे नाव घेते, ऐका सारे जण.
३) गोकुळासारखं सासर, सारे कसे हौशी, __________ रावाचे नाव घेते, तिळसंक्रांतीच्या दिवशी.
४) माहेर तसं सासर, नाते संबंधही जुने, __________ राव आहेत सोबत, मग मला कशाचे उणे.
५) कपाळाचे कुंकु, जसा चांदण्याचा ठसा, __________ रावांचे नाव घेते, सारे जण बसा.
६) रातराणीचा सुगंध, त्यात मंद वारा, __________ रावांच्या नावाचा, भरला हिरवा चुडा.
७) खडी साखरेची गोडी अन् फुलांचा सुगंध, __________ रावांच्या संसारात, स्वर्गाचा आनंद.
८) पंच पक्वानांच्या ताटात, वाढले लाडू पेढे, __________ रावांचे नाव घेताना, कशाला आढे वेढे.
९) मंदिराचे वैभव, परमेश्वराची मुर्ती, __________ रावांचे नाव घेऊन करेन एच्छापुर्ती.
१०) सनई आणि चौघडा, वाजे सप्त सुरात, __________ रावांचे नाव घेते, __________ च्या घरात.
११) संसार रूपी वेलीचा, गगनात गेला झुला, __________ रावांचे नाव घेते, आशिर्वाद द्या मला.
१२) अंगणात वृंदावन, वृंदावनात तुळस, __________ रावांचं नाव घेताना, कसला आला आळस.
१३) लावित होते कुंकु, त्यात पडला मोती, __________ रावांसारखे मिळाले पती, भाग्य मानू किती.
१४) ताजमहल बांधायला, कारागीर होते कुशल, __________ रावांचे नाव घेते, तुमच्यासाठी स्पेशल.
१५) शंकराची पूजा पार्वती करते खाली वाकुन, __________ रावांचे नाव घेते, सर्वांचा मान राखुन.
१६) श्री विष्णुच्या मस्तकावर सदैव असतो शेष, __________ रावांचं नाव घेऊन करते गृहप्रवेश.
१७) यमुना जलावर पडली, ताजमहालाची सावली, __________ रावांची जन्मदाती, धन्य ती माऊली.
१८) लोकमान्य टिळक स्वराज्याचा हिरा, __________ रावांचं नाव घेऊन उखाणा करते पुरा.
१९) सावित्रीने नवस केला, पती मिळावा सत्यवान, __________ रावांच्या जीवावर मी आहे भाग्यवान
२०) जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने, __________ रावांचे नाव घेते, पत्नी या नात्याने.
२१) मोह नाही, माया नाही, नाही मत्सर हेवा, __________ रावांचे नाव घेते, नीट लक्ष ठेवा.
२२) कपाळावर कुंकू, हिरवा चुडा हाती, __________ रावांचे नाव घेते, पत्नी या नात्याने.
२३) धरला यांनी हात, वाटली मला भीती, हळुच म्हणाले __________ राव अशीच असते प्रिती.
२४) हृद्यात दिले स्थान, तेव्हा दिला हातात हात, __________ रावांच्या जीवनात लाविते प्रितीची फुलवात.
२५) नव्हती कधी गाठभेठ, एकदाच झाली नजरा नजर, आई वडील विसरले __________ रावांसाठी सुटला प्रितीचा पाझर.
२६) चांदीचे जोडवे पतीची खुण, __________ रावांचे नाव घेते, __________ ची सुन.
२७) दारी होता टेबल, त्यावर होता फोन, __________ रावांनी पिक्चर दाखवला हम आपके है कोन?
२८) अंगणी होती तुळस, तुळशीला घालत होती पाणी, आधी होती आई बाबाची तान्ही, आता आहे __________ रावांची राणी.
२९) गुलाबाचे फुल दिसायला ताजे, __________ रावांचे नाव घेते, सौभाग्य माझे.
३०) डाळिंब ठेवले फोडून, संत्र्याची काढली साल, __________ रावांच्या नावाने कुंकू लावते लाल.
३१) अंगणात होती मेथी, पाणी घालू किती, __________ रावांच्या हातात सत्यनारायणाची पोथी.
३२) हिमालय पर्वतावर, बर्फाच्या राशी, __________ रावांचे नाव घेते, __________ च्या दिवशी.
३३) शरदाचे संपले अस्तित्व, वसंताची लागली चाहूल, __________ रावांच्या संसारात टाकते पहिले पाऊल.
३४) गृहकामाचे शिक्षण देते माता, __________ रावांचे नाव घेते तुमच्या आग्रहाकरिता.
३५) चंदेरी सागरात, रुपेरी लाटा, __________ रावांच्या सुखदुःखात अर्धा माझा वाटा.
३६) नाजुक अनारसे साजुक तुपात तळावे, __________ रावांसारखे पती जन्मोजन्मी मिळावे.
३७) पौर्णिमेचा दिवस चंद्राला लागते चाहूल, __________ रावांच्या जीवनात टाकते मी पहिले पाऊल.
३८) तळहातावर मेंदी रचली, त्यावर तेलही शिंपडले, __________ रावांचे मन, मी केव्हाच जिंकले.
३९) केसात माळते रोज, मी गुलाबाचे फुल, __________ राव माफ करतात माझी प्रत्येक भूल.
४०) मी नव्हती सुंदर, तरीही मला निवडले, __________ रावांचे हेच रूप मला फार आवडले.
४१) आज सारे सुख माझ्या दारी दाटले, __________ रावांचे प्रेम अजून तरीनाही आटले.
४२) सासरी आहे माझ्या सुंदर हिरवा मळा, ___________ रावामुळेच लागला मला त्याचा लळा.
४३) शिक्षणाने विकसित होते, संस्कारीत जीवन, __________ रावांच्या संसारात राखीन मी सर्वांचे मन.
४४) इंद्रधनुष्यात असतात सप्तरंग, __________ रावांच्या संसारात आहे मी दंग.
४५) निळ्या नभात चंद्राचा प्रकाश, __________ रावांवर आहे माझा विश्वास.
४६) प्रेमाचे कच्चे धागे खेचती मागे पुढे, __________ रावांच्या साथीसाठी माहेर सोडावे लागे.
४७) प्रेमळ शब्दामागे भावना असते कौतुकाची, __________ रावांच्या साथीने सुरवात करते सहजीवनाची.
४८) मला गुणवान पती मिळाले, याचा वाटतो प्रत्येकीला हेवा, __________ राव माझ्या जीवनातील मौल्यवान ठेवा.
४९) चंद्राचा झाला उदय अन् समुद्राला आली भरती, __________ रावांच्या प्रेमाने सर्व दुःख हरती.
५०) नील नाभाच्या तबकात नक्षत्रांचा हार, __________ रावांचा स्वभाव आहे फारच उदार.
५१) करवंदाची साल चंदनाचे खोड, __________ रावांचे बोलणे अमृतापेक्षा गोड.
५२) सुख दुःखाच्या धाग्यांनी जीवन वस्त्र विणले, __________ रावांचा सहवासाचे भाग्य मला लाभले.
५३) सुशिक्षित घराण्यात जन्मले, कुलवंत घराण्यात आले, __________ रावांशी लग्न करून सौभाग्यवती झाले.
५४) मंगलदेवी, मंगलमाता वंदन करते तुला, __________ रावांचे नाव घेते अखंड सौभाग्य दे मला.
५५) पिवळा पितांबर श्रीकृष्णाच्य अंगावर घातला, __________ रावांच्या जीवनासाठी स्त्री जन्म घेतला.
५६) पतीव्रतेचे व्रत घेऊन, नम्रतेने वागते, __________ रावांचे नाव घेऊन आशीर्वाद मागते.
५७) गळ्यात मंगळसुत्र, मंगळसुत्रात डोरलं, __________ रावांचे नाव माझ्या हृदयात कोरलं.
५८) मंद मंद गंध घेताना झाले मी धुंद, __________ रावांचे नाव घ्यायचा लागला मला छंद.
५९) पेरूची फोड दिली पिंजर्यातल्या पोपटाला, __________ रावांचे नाव घेते, चंद्र तारे साक्षीला.
६०) कशी बाई कोकिळा, कुहू कुहू बोले, __________ रावांनी आणले माझ्यासाठी सोन्याची कर्णफुले.
६१) मंदिराच्या गाभार्यात विठ्ठलाची मुर्ती, __________ रावांनी होवो सगळीकडे किर्ती.
६२) चांदीच्या चमच्याने वाढते मीठ, घाबरू नका __________ रावांचा संसार करीन मी नीट.
६३) आपले राष्ट्रगीत आहे जन-गण-मन, __________ रावांना अर्पण केले तन-मन-धन.
६४) आधुनिक स्वयंपाक घरात शोभतो डायनिंग टेबल, __________ रावांच्या नावासमोर माझ्या नावाचे लागले लेबल.
६५) दिल्ली राजधानी आहे भारताची, मुंबई राजधानी आहे महाराष्ट्राची, __________ राव आहेत तर कमी नाही कशाची.
६६) पुर्णा नदीच्या काठावर कृष्ण वाजवितो बासरी, __________ रावांसोबत आले मी सासरी.
६७) इंग्रजी भाषेत पाण्याला म्हणतात वॉटर, __________ रावांचे नाव घेते __________ डॉटर.
६८) हिमालय पर्वतातून नदी वाहते कनिका, __________ रावांचं नाव घेते __________ बालिका.
६९) इंग्रजी भाषेत चंद्राला म्हणतात मुन, __________ रावांचे नाव घेते __________ सुन.
७०) गुलाबाचे फुल मधोमध पिवळे, __________ राव दिसतात कृष्णासारखे सावळे.
७१) दत्ताच्या फोटोला हार घालते वाकुन, __________ रावांचे नाव घेते तुमचा मान राखून.
७२) कवीची कविता कवीनेच वाचावी, __________ रावांची प्रेमाची फुले ओंजळीने वेचावी.
७३) अंगणी टाकला सडा, त्यावर घातली रांगोळी, __________ रावांचे नाव घेते हळदी कुंकवाचे वेळी.
७४) जीवनरुपी कादंबरी वाचली दोघांनी, __________ रावांचे नाव घेते पत्नी या नात्यानी
७५) गुलाबाचं फुल दिसायला छान, __________ रावांचे नाव घेते ठेवते आपला मान.
७६) ज्योतीला मिळेल ज्योत आता पडेल प्रकाश, __________ रावांच्या जीवनात ठेंगणे होईल आकाश.
७७) ज्ञानदानाने करते मी कर्तव्य पुर्ती, __________ रावांच्या शब्दांनी मिळते मला स्फुर्ती.
७८) चांगली पुस्तके आहेत माणसांचे मित्र, __________ रावांच्या सहवासात रंगविते संसाराचे चित्र.
७९) विद्येचं माहेरघर आहे म्हणतात पुणं, __________ रावांच्या सहवासात / जीवनात / संसारात मला नाही उणं.
८०) गुलाबाच्या फुलाचा लाजवाब सुगंध, __________ रावांना केले मी हृदयात बंद.
८१) इंग्रजी भाषेत गवताला म्हणतात ग्रास, __________ रावांचे नाव घ्यायला वाटत नाही त्रास.
८२) तान्हाजी-शिवाजी जीवलग मित्र, __________ रावांनी आणले माझ्यासाठी मंगळसूत्र.
८३) श्रावणात महादेवाला दुधाचा अभिषेक, __________ रावांच्या नावाने बेल वाहिले एकशे एक.
८४) गणेशाला आवडती रक्तवर्ण कमळे, __________ रावांसोबत माहेर विसरुन रमले.
८५) कवींच्या कवितेत मोरोपंताची आर्या, __________ रावांचे नाव घेते __________ भार्या.
८६) टिळकांचा केसरी, अत्र्यांचा ललकार, __________ रावांची विद्वत्ता हाच माझा अलंकार.
८७) भक्तांच्या भेटीसाठी वेडा झाला नंदाचा नंदन, __________ रावांचे नाव घेऊन मंगळागौरीला करते वंदन.
८८) सोन्याच्या ताटात चांदीची वाटी, सात जन्म घेईल मी __________ रावांसाठी.
८९) रोज माझ्या अंगणात रांगोळी सजते, __________ रावांच्या डोळ्यात सदैव माझेच प्रतिबिंब दिसते.
९०) घन निळा, सुसाट वारा, __________ राव छेडीती माझ्या हृदयाच्या तारा.
९१) सासरी आहेत माझ्या सासु, सासरे अन् दिर, __________ रावांना आवडते रव्याची खीर.
९२) दोन वाती दोन ज्योती, दोन शिंपले दोन मोती, __________ रावांची राहो मी अखंड सौभाग्यवती.
९३) नयनरम्य बागेत नाचत होता मोर, __________ रावासारखे पती मिळाले भाग्य माझे थोर.
९४) नीलवर्ण आकाशात पक्षी उडाले सात, __________ रावांच्या हातात दिला मी हात करण्या जन्मोजन्मीची साथ.
९५) पौर्णिमेच्या दिवशी चंद्र उगवला बरवा, __________ राव बसले पुजेला मी निवडते दुर्वा.
९६) निळ्या निळ्या आकाशात उगवला शशी, __________ रावांचे नाव घेते __________ च्या दिवशी.
९७) असा असावा संसार जिथे दुर्दैवाला घ्यावी लागे माघार, __________ राव आहेत माझ्या जीवनाचा आधार.
९८) चांदीच्या निरंजनात मनोभावे लावते फुलवात, __________ रावांच्या सोबत करते सुखी जीवनाला सुरुवात.
९९) तानसेन मेघ बरसण्यासाठी आळवित असे मेघ मल्हार, __________ रावांसारखे प्रेमळ पती लाभले मला सहचर.
१००) फुलात फुल जाईचे, प्रेमात प्रेम आईचे, __________ राव आहेत माझ्या प्रितीचे.
१०१) घरावर परडं परड्यात गहू, तुमच्या आग्रहासाठी __________ रावांचं नाव किती वेळा घेऊ.
१०२) महादेवाच्या पिंडीवर संत्र्याची फोड, __________ रावांचं बोलणं साखरेहून गोड.
१०३) चांदीच्या सुपात फणसाची गरे, __________ राव दिवसात बरे पण वागवतील तेव्हा खरे.
१०४) अंगठीत चमकतो हिरा, आकाशात चमकतो तारा, __________ रावांसारखे पती मिळाले हाच भाग्योदय खरा.
१०५) गर्व नसावा श्रीमंताचा, अभिमान नसावा स्वरूपाचा, __________ रावांचे नाव घेते, संसार करते सुखाचा.
१०६) घराला असावे अंगण, अंगणात डोलावी तुळस, __________ रावांच्या नावाचा संसारावर चढविन कळस.
१०७) लग्नानंतर प्रत्येक स्त्री होते जबाबदार, __________ राव माझे दिसतात फारच रूबाबदार.
१०८) कुंकू लावते ठळक, हळद लावते किंचीत, __________ रावांचं नाव घेते हेच माझं संचीत.
१०९) जिथे घराची स्वच्छता, तिथे घराची शोभा, __________ रावांच्या पाठीमागे परमेश्वर उभा.
११०) सोन्याचे पंचपाळ त्याला नागाचा वेढा, __________ रावांचा आणि माझा सात जन्माचा जोडा.
१११) नवीन निघाल्या कादंबर्या, वाचून घ्यावा बोध, __________ रावांच्या जीवनात लागला सुखाचा शोध.
११२) नभी उमटले सप्तरंगाचे इंद्रधनुष्य, __________ रावांचे नाव घेते मिळो दिर्घायुष्य.
११३) रुसलेल्या राधेला कृष्ण म्हणतो हास, __________ रावांचे नाव घेते आज दिवस आहे खास.
११४) सूर तेच छेडीता गीत उमटले नवे, __________ रावांचे नाव घेते अखंड सौभाग्य मला हवे.
११५) जीवनासाठी कला म्हणून कलेवर केली मात, कलात्मक जीवन जगण्यासाठी __________ रावांच्या हाती दिला हात.
११६) पौर्णिमेच्या दिवशी पृथ्वीवर पडतो चंद्राचा प्रकाश, गृहलक्ष्मी सह भाग्यलक्ष्मी येवो __________ रावांच्या घरात.
११७) नाव घ्या! नाव घ्या! सगळे झाले गोळा, __________ रावांचे नाव आहे लाख रूपये तोळा.
११८) सागरतिरी शुभ्र वाळू, __________ राव म्हणतात चल राणी टेनिस खेळू.
११९) सोन्याचे मणी रेशमात गुंफले, __________ राव माझे वाचनात गुंतले.
१२०) थंडगार पाण्याला वाळ्याचा सुवास, __________ रावांचे नाव घेते जोडी आमची खास.
१२१) शुभदिनी, शुभकाळी, आली आमची वरात, __________ रावांचे नाव घेते __________ च्या वरात.
१२२) शिवरायांनी राज्य केले शक्तीपेक्षा युक्तीने, __________ रावांचे नाव घेते प्रेमभाव भक्तीने.
१२३) संसाररूपी सागरात उसळल्या लाटा, __________ रावांच्या सुखदुःखात माझा अर्धा वाटा.
१२४) पानोपानी फुल फुलावे, रंग गहिरे असावे, __________ रावांच्या सहवासात सुख माझे हसावे.
१२५) चंद्राची जशी चंद्रिका, वशिष्ठांची जशी अरूंधती, तशीच मी होईन __________ रावांची आवडती.
१२६) जिर साळीचा भात पिकतो मावळात, __________ रावांचे नाव घेते __________ च्या देवळात.
१२७) पुणेरी टांगा त्याला अरबस्तानी घोडे, __________ रावांचे नाव घेते सत्यनारायणापुढे.
१२८) देवाजवळ करते मी दत्ताची आरती, __________ राव आहेत माझ्या जीवनाचे सारथी.
१२९) प्राजक्ताच्या पायथ्याशी, शुभ्र फुलांच्या राशी, __________ रावांचे नाव घेतांना, मनात दाटते खुशी.
१३०) भावनात जन्मली कल्पना, फुल गुंफिले शब्दांचे, __________ रावांचे नाव घेते मन राखुन सर्वांचे.
१३१) चालती सप्तपदीची सात पावले, __________ रावांच्या नावाने मंगळसुत्र बांधले.
१३२) कृष्ण प्राप्तीसाठी रुक्मिणीने लिहिले पत्र, __________ रावांच्या नावाने बांधले मंगळसुत्र.
१३३) सत्यम्, शिवम्, सुंदरम् साहित्याची आस, __________ रावांना घालते मी लाडवाचा घास.
१३४) एका वाफ्याची तुळस दुसर्या वाफ्यात रूजवली, __________ ची माणसे मी आपली मानली.
१३५) पेटी वीणा वाजे सतार वाजे छान, __________ रावांचे नाव घेते राखुन सर्वांचा मान.
१३६) श्रीकृष्णाने केले अर्जुनाच्या रथाचे सारथ्य, __________ राव आणि माझ्या संसारात होईल सर्वांचे आदरतिथ्य.
१३७) शिवाजीला जन्म देणारी धन्य जिजाऊ माता, __________ रावांचे नाव घेते आपल्या शब्दाकरिता.
१३८) जीवनात ही घडी अशीच राहू दे, __________ रावांची प्रीत सदैव अशीच फुलू दे.
१३९) माहेरचे निरांजन सासरची वात, __________ रावांचे नाव घेऊन करते संसाराला सुरूवात.
१४०) सासरच्या कौतुकात राहिले नाही काळाचे भान, __________ रावांचे नाव घेते सर्वांचा राखुन मान.
१४१) कुलदेवतेला स्मरून वंदन करते देवाला, __________ रावांचे सौभाग्य अखंड दे मला.
१४२) कपाळाला कुंकू गळ्यात मोत्याचा हार, __________ रावांचे नाव घेतांना आनंद होतो फार.
१४३) संसारात स्त्रीने नेहमी रहावे दक्ष, __________ रावांचे नाव घेते इकडे द्या लक्ष.
१४४) मन असावे स्वच्छ, प्रेमळ आणि पवित्र, __________ रावांच्या जीवनात राहो आनंद सर्वत्र.
१४५) मोठ्यांचा करावा मान सन्मान, __________ रावांच्या नावाने घेते सौभाग्याचे वाण.
१४६) शुक्राची चांदणी ढगाला देते शोभा, __________ रावांच्या पाठीमागे परमेश्वर उभा.
१४७) आई वडिल करित होते काळजी, कसे मिळते घर, __________ रावांचे नाव घेते भाग्य माझे थोर.
१४८) जाई जुईच्या वेलीखाली हरीण घेते विसावा, __________ रावांचे नाव घेते तुमचा आशिर्वाद असावा.
१४९) चांदीच्या ताटात लावते तुपाची फुलवात, __________ रावांचे नाव घेऊन आजपासून करते संसाराला सुरूवात.
१५०) प्रेम द्यावे प्रेम घ्यावे, प्रेमाचा असावा साठा, __________ रावांच्या सुखदुःखात माझा अर्धा वाटा.
१५१) निलवर्णी आकाशात मधुर पक्षांचा टाहो, __________ रावांचं नाव घेते अखंड सौभाग्य राहो.
१५२) सोन्याचे ताट चांदीची वाटी, सात जन्म घेईन मी __________ रावांसाठी.
१५३) सुंदर काळ्याभोर केसात सजते गुलाबाचे फुल, __________ राव क्षमा करतात माझी प्रत्येक भुल.
१५४) रखरखत्या वैशाखात प्रेमाचा धुंद वारा, जीवनाचा खेद समजला __________ रावांमुळेच सारा.
१५५) कपाळावर कुंकू त्याखाली हळद सजते, हातावरच्या मेहंदीत __________ रावांचे नाव रेखाटते.
१५६) देवाजवळ सायंकाळी करेल प्रभुची आरती, __________ राव आहेत माझ्या जीवनाचे सारथी.
१५७) ध्येयपुर्तीसाठी प्रत्येकानी झटावे, __________ रावांचे नाव घेण्यास मागे कशाला हटावे.
१५८) __________ रावांच्या प्रेमाला जगात नाही तोड, प्रभुच्या चरणी प्रार्थना शेवट व्हावा गोड.
१५९) __________ राव आमचे आहेत मोठे करारी, म्हणुन तर मी घेऊ शकले उंच भरारी.
१६०) संसार सौख्याची मनामध्ये आस, __________ ना घालते __________ चा घास.
१६१) संध्याकाळच्या चंदन गंधनात अधिर झाली दिशा, __________ रावांचे आयुष्य कळीकळीने उमलावे हीच माझी मनिषा.
१६२) मंगल झाली प्रभात, विहंग उडाले गात, __________ च्या हाती दिला हात.
१६३) नेत्रांच्या निरांजनात प्रितीची वात, __________ रावांच्या नावाने संसाराला करते सुरुवात.
१६४) नील नभांगण जणु अंगठी, चंद्र शोभे त्यातला खडा, ईश्वर सदा सुखी ठेवो __________ राव नी माझा जोडा.
१६५) सरस्वतीच्या मंदिरात साहित्याच्या राशी, __________ रावांचे नाव घेते शुभ मंगल दिवशी.
१६६) सर्व कार्याचा पाठीराखा विघ्नहर्ता गणेश, __________ राव हेच माझ्या जिवीताचे परमेश.
१६७) संध्याकाळी तुळशीपाशी मंद ज्योत तेवते, __________ दिवस म्हणुन __________ रावांचे नाव घेते.
१६८) कोसळल्या जलधारा, धरा आनंदली रातोरात, __________ रावांच्या सहवासात होवो सौख्याची बरसात.
१६९) जलाशयात असते जसे निर्मळ पाणी, तशीच मी __________ रावांची सहधर्मचारिणी.
१७०) लक्ष्मी माते वंदन करते, मनी श्रद्धेचे बळ, __________ रावांच्या संसारी दे समृद्धीचे फळ.
१७१) स्वप्नातला गुलाब गालात हसला, __________ रावांचे नाव घेण्यास मान कसला.
१७२) कृष्णाच्या हातात सोनेरी बासरी, __________ रावांचे नाव घेतांना सदा मी हसरी.
१७३) रातराणीच्या सुगंधाने आसमंत झाला मोहीत, __________ रावांना आयुष्य मागते सासु-सासर्या सहीत.
१७४) अमावस्येच्या रात्री चांदोबाचं लपणं, __________ राव हेच माझं गुलाबी स्वप्न.
१७५) नको मोहन माळ, नको हिर्याचा हार, __________ रावांच्या जीवनात मी सुखी फार.
१७६) गुढीपाडव्याच्या सणाला पुरणपोळीचा मान, __________ रावांच्या सहवासात विसरते मी भुक तहान.
१७७) गणपतीला दुर्वा शिवाला बेल, __________ रावांच्या संगतीत बहरली संसाररुपी वेल.
१७८) आहे हौशी नणंद, प्रेमळ आहे जाऊ, __________ रावांच्या गुणांचे गोडवे किती गाऊ.
१७९) शितल आहे चांदणे, वारा आहे मंद, __________ रावांना सिनेमाचा भारीच छंद.
१८०) फुलला पळस रानोरानी, मोहरला आंबा पानोपानी, __________ राव माझे धनी मी त्यांची अर्धांगिनी.
१८१) वसंत ऋतुच्या आगमनाला, कोकिळा गाते गाणी, अर्पण करते आयुष्य __________ रावांच्या चरणी.
१८२) पित्याने दिली विद्या, मातेने दिले गृहशिक्षण, __________ राव मिळाले हेच माझे भुषण.
१८३) नाव घ्या, नाव घ्या आग्रह कशासाठी, __________ रावांचे नाव होते ओठावरती पण थांबले होते उखाण्यासाठी.
१८४) ज्यांच्या सर्व्हिसला व्होल वर्ल्ड इज रेडी, अश्या __________ रावासाहेबांची मी ब्युटीफुल लेडी.
१८५) शाळेच्या ग्राउंडवर खेळत होते गेम, तिकडून आले __________ राव त्यांनी विचारले व्हॉट इज युवर नेम.
१८६) सुशिल माझे सासु सासरे, सुशिल माझे मात पिता, __________ रावांचे नाव घेते __________ ची माता.
१८७) माहूर गडावर रेणूकेची वस्ती, __________ रावांना मिळावे आयुष्य माझ्यापेक्षा जास्ती.
१८८) वैचारिक प्रगल्भतेचे __________ राव मला लाभले, म्हणून जीवनी स्वप्न माझे साकारले.
१८९) पती पत्नी असतात सुख दुःखाचे साथी, __________ रावांचे नाव घेते जगदंबे, वरद हस्ते असुदे माथी.
१९०) विचाराने, सरळ मनाने निर्मळ __________ राव मला लाभले, सुर ताल मिळाल्याने जीवन स्वर्ग अवतरले.
१९१) प्रांजळपणे बोलणे मनमोकळे हसणे, __________ रावांच्या सहवासात कशाला हवे रुसणे?
१९२) कर्ता करविता परमेश्वर त्यावर टाकते मी भार, __________ रावांचे नाव घेते कर देवा नौका पार.
१९३) सप्तपदीच्या सात पावलांनी केली संसाराची नांदी, __________ रावांच्या संसारात __________ राहील आनंदी.
१९४) कळत नाही माझेच मला, आहे स्वप्न की भास, __________ रावांचे नाव घेते तुमच्यासाठी खास.
१९५) भवसागरात तरंगते संसाररुपी होडी, लक्ष्मीच्या कृपेने सुखी राहो __________ व __________ ची जोडी.
१९६) विनय हाच खरा स्त्रीचा अलंकार, __________ रावांच्या सहवासात होवो ध्येय-आशा साकार.
१९७) एकनाथाच्या घरी हरी पाणी भरतो कावडीने, __________ रावांचे नाव घेईन मी आवडीने.
१९८) भवसागरात तरंगते संसाररुपी नौका, __________ रावांचे नाव घेते सर्व जणी ऐका.
१९९) लज्जेचे बंधन असले तरी नाव आहे ओठी, __________ रावांचे नाव घेते तुमच्या आग्रहासाठी.
२००) विशाल सागराला भेटण्याकरिता खळखळ जाते सरिता, __________ रावांचे नाव घेते तुमच्याकरिता.
२०१) संसाररुपी कादंबरीत रेखल्या भावनेच्या ओळी, __________ रावांचे नाव घेते __________ च्या वेळी.
२०२) यौवनात पदार्पण केले सरले माहेरचे अंगण, __________ रावांचे नाव घेऊन सोडते मी कंकण.
२०३) नेत्रीच्या निरांजनात तेवते प्रीतीची फुलवात, __________ रावांच्या साथीने संसाराला करते सुरुवात.
२०४) बर्याच दिवसांची आकांक्षा आज झाली साकार, __________ रावांनी केलाय माझा पत्नी म्हणून स्वीकार.
२०५) भुंग्याच्या सहवासात विकसिते कळी, __________ रावांचे नाव घेते __________ च्या वेळी.
२०६) मंगळसुत्राच्या दोन वाट्या म्हणजे सासर-माहेरचा संगम, __________ रावांच्या सहवासाने आज झाला सौभाग्याचा उगम.
२०७) असावे नेहमी हसतमुख, बोलावे नेहमी गोड, __________ रावांच्या संसाराला __________ ची लाभली जोड.
२०८) भुंग्याच्या सहवासात विकसिते कळी, __________ रावांच्या साक्षीने लिहिते सौभाग्याच्या ओळी.
२०९) विद्येचा नसावा अभिमान, पैशाचा नसावा गर्व, __________ रावांचे नाव घेते ऐकत आहात ना सर्व.
२१०) सौभाग्याचे लेणे आहे काळी पोत, __________ रावांच्या जीवनात उजळते जीवन ज्योत.
अभिप्राय