मराठी म्हणी - मराठी भाषेतील आगळ्या - वेगळ्या आणि नव्या - जुन्या अशा सर्वोत्तम मराठी म्हणींचा संग्रह (Marathi Mhani).

मराठी भाषेतील आगळ्या-वेगळ्या आणि सर्वोत्तम मराठी म्हणींचा संग्रह...
मराठी म्हणी
मराठीमाती संपादक मंडळ
शेवटचा बदल ४ फेब्रुवारी २०२५
अंग मेहनतीचं काम, तेणे मिळे आराम. |
आंधळी पाण्याला गेली, घागर फोडून घरी आली. |
आंधळ्याने पांगळा पाहीला, पांगळ्याने मार्ग दाविला. |
अभ्यास करेल त्याची विद्या, जपेल त्याची लक्ष्मी. |
अरे चे उत्तर कारे, अहो चे उत्तर काहो. |
अपकिर्ती झाली जनी, तो अर्धा मेला मनी. |
अगंगं म्हशी, मला कुठं नेशी. |
अडला नारायण, धरी गाढवाचे पाय. |
अति तेथे माती. |
अति राग, भीक माग. |
असतील शिते, तर जमतील भुते. |
असंगाशी संग, प्राणाशी गाठ. |
अतिशहाणा त्याचा बैल रिकामा. |
असून अडचण, नसून खोळंबा. |
असेल तेव्हा सोहळे, नसेल तेव्हा ओसरीत लोळे. |
आधी पोटोबा, मग विठोबा. |
आईचा हात, गोड लागे शिळा भात. |
आगीतून निघाला, फुफाट्यात पडला. |
आजा मेला, नातु झाला. |
आधी गुंतु नये आणि गुंतल्यावर कुंथु नये. |
आळशाला आजाराचे निमंत्रण. |
आधी देव, मग जेव. |
आपण हसतो लोकाला, शेंबुड आपल्या नाकाला. |
आपला तो बाळ्या, दुसर्याचे ते कारटे. |
आपला हात जगन्नाथ. |
आपलेच ओठ अन् आपलेच दात. |
आपले ठेवायचे झाकून, दुसर्याचे बघायचे वाकून |
आपले ते गोजीरवाणे, दुसर्याचे ते लाजीरवाणे. |
आयत्या बिळात नागोबा. |
आमंत्रण दिले सगळ्या गावा, वादळ सुटले घरी जेवा. |
आयत्या पिठावर रेघोट्या. |
आल्यावर विपत्ती, कवे मैत्री आहे किती. |
आवड असली की सवड मिळते. |
आवडीने केला नवरा, त्याच्या पायात भवरा. |
आई जेवू घालीना, बाप भीक मागु देईना. |
आला चेव अन् केला देव. |
इकडे आड तिकडे विहीर. |
ईश्वराची करणी, नारळात पाणी. |
उंदराचा जीव जातो अन् मांजराचा खेळ होतो. |
उचलली जीभ की लावली टाळ्याला. |
उघड्यापाशी नागडे गेले, सारी रात हिवाने मेले. |
उडाला तर कावळा, बुडाला तर बेडूक. |
उतावळा नवरा, गुडघ्याला बाशिंग. |
उथळ पाण्याला, खळखळाट फार. |
उद्योगाच्या घरी, रिद्धीसिद्धी पाणी भरी. |
उस गोड झाला, म्हणून मुळा सकट खाऊ नये. |
एक गाव, बारा भानगडी. |
एकटा जीव सदाशिव. |
एक घाव दोन तुकडे, काम करावे रोकडे. |
एक ना धड, भारा भर चिंध्या. |
एकपट विद्या, दसपट गर्व. |
एका हाताने टाळी, कधी न वाजे कोण्याकाळी. |
एकाची होळी तर दुसर्याची दिवाळी. |
एकाने करायचे, सार्यांनी भरायचे. |
एवढीशी थट्टा, भल्या भल्यांना लावी बट्टा. |
ऐकावे जनाचे, करावे मनाचे. |
ऐकुन घेत नाही, त्याला सांगु नये काही. |
कठीण समय येता, कोण कामास येतो. |
कर नाही त्याला डर कशाला. |
करावे तसे भरावे. |
करून करून भागला, अन् देव पुजेला लागला. |
कला कौशल्य ज्याचे हाती, त्याची होई जगी ख्याती. |
कशात काय आणि फाटक्यात पाय. |
कामापुरता मामा, ताकापुरती आजी. |
काखेत कळसा, गावाला वळसा. |
कावळ्याच्या शापाने गायी मरत नाहीत. |
काळ आला होता पण वेळ आली नव्हती. |
कुठेही गेलं तरी पळसाला पाने तिनच. |
कुत्र्याचे जीणे, फजितीला काय उणे. |
कुर्हाडीचा दांडा गोतास काळ. |
केर डोळ्यात नि फुंकर कानात. |
कोकणात नारळ फुकट. |
कोणाच्या संगतीने काशी नि कोणाच्या संगतीने फाशी. |
कोणी निंदा कोणी वंदा, आमचा स्वहिताचा धंदा. |
कोणाच्या म्हशी, कोणाला उठाबशी. |
कोंबडे झाकले म्हणून, तांबडे फुटायचे रहात नाही. |
खर्याचे खोटे, लबाडाचे तोंड मोठे. |
खटपट करी, तोच पोट भरी. |
खर्याचा दास नि खोट्याचा वस्ताद. |
खान तशी माती, गहू तशी रोटी. |
खाणे थोडे, मचमच फार. |
खाऊन पिऊन सुखी, हरीनाम मुखी. |
खाईन तर तुपाशी, नाहीतर उपाशी. |
खायला फार नि भुईला भार. |
खाली मुंडी, पाताळ धुंडी. |
गरज सरो, वैद्य मरो. |
गरीबांचा वाली परमेश्वर. |
गर्जेल तो पडेल काय, बोलेल तो करेल काय. |
गाढवापुढे वाचली गीता, कालचा गोंधळ बरा होता. |
गाव करी ते राव न करी. |
गाढवास गुळाची चव काय? |
गाड्या बरोबर नळ्याची जत्रा. |
गोगलगाय अन् पोटात पाय. |
घटकेची फुरसत नाही, दमडीची मिळकत नाही. |
घरा सारखा गुण, सासु तशी सुन. |
घर जळाल्यावर बोंब अन् नाटक संपल्यावर सोंग. |
घर धन्याचे हाल अन् फुकट्याचे वर गाल. |
घरात नाही दाणा, म्हणे मला बाजीराव म्हणा. |
घरात नाही लोटा, अन् दिमाख मोठा. |
घरोब्याला घर खा, पण हिशोबाला चोख रहा. |
घर पहावे बांधुन अन् लग्न पहावे करून. |
घोडी मेली ओझ्याने व शिंगरु मेले हेलपाट्याने. |
चढणीस घोडा, उतरणीस रेडा. |
चव ना ढव, दडपून ठेव. |
चावल्याशिवाय गिळत नाही, अनुभवल्याशिवाय कळत नाही. |
चोरात चोर अन् वर शिरजोर. |
चोराच्या उलट्या बोंबा. |
चोराच्या मनात चांदणं. |
चोराला सोडून संन्याशाला फाशी. |
चोरीचा मामला हळूहळू बोंबला. |
छडी लागे छम छम, विद्या येई घम घम. |
जगन्नाथाचा भात, सर्वजण पसरे हात. |
जसे दान, तसे पुण्य. |
जात कळते पण मत कळत नाही. |
जातीची खावी लाथ पण परजातीचा खाऊ नये भात. |
ज्याचे जळे, त्याला कळे. |
ज्याची करावी कीव, तोच घेतो जीव. |
ज्याला नाही अक्कल, त्याची घरोघर नक्कल. |
जित्याची खोड मेल्या वाचुन जात नाही. |
जीव जावो पण जिलेबी खावो. |
जुने ते सोने. |
जुन्याला लाथा अन् नव्याच्या चरणी माथा. |
जो बायकोशी भला, तो खाई दही काला. |
जो बोलण्यात बोलका, तो कृतीत हलका. |
झाकली मुठ सव्वा लाखाची, उघडली म्हणजे फुकाची. |
झोपेला धोंडा अन् भुकेला कोंडा. |
ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला, वाण नाही पण गुण लागला. |
ढेकणाच्या संगे, हिराही भंगे. |
तप केल्यास बळ, वृक्ष लावल्यास फळ. |
तहान लागल्यावर विहीर खोदणे. |
तळहाताने सुर्य झाकत नाही. |
ताकापुरती आज. |
ताकापुरते रामायण. |
ताकाला जाऊन गाडगे लपविणे. |
तुझे माझे पटेना, तुझ्या वावुन करमेना. |
तुझे राहुदे तिकडे, माझे घे इकडे. |
तुला ना मला, घाल कुत्र्याला. |
तेल गेले तूप गेले, हाती धुपाटणे आले. |
तोंड चोपडा, मनात वाकडा. |
तोंड दाबून, बुक्यांचा मार. |
तोंडावर गोड, मनात वाकडा. |
तोंडावर हांजी हांजी आणि मागे दगलबाजी. |
दात कोरल्याने पोट भरत नाही. |
दाम करी काम, बिवी करी सलाम. |
दिवसभर चरते, मंगळवार धरते. |
दिव्याखाली अंधार. |
दिवाळी दसरा, हात पाय पसरा. |
दिसते तसे नसते, म्हणून जग फसते. |
दिसतो मोठा, अकलेचा तोटा. |
दिसायला भोळा, मुदलावर डोळा. |
दुष्काळात तेरावा महिना. |
दुःख सांगावे मना, सुख सांगावे जना. |
दुर्गुण आणि विपत्ती, आळसापासून उत्पत्ती. |
दुधाची तहान ताकाने भागविणे. |
दुधात कालविते मीठ, हा स्वभाव नाही नीट. |
दुरून डोंगर साजरे. |
दुरून बगळा दिसतो साधा, आत कपटाची बाधा. |
देखल्या देवा दंडवत. |
देव नाही देव्हारी, धुपाटणे उड्या मारी. |
देह देवळात, चित्त खेटरात. |
दे रे हरी, पलंगावरी. |
देव तारी त्याला कोण मारी. |
देश तसा वेश. |
दैव देते कर्म नेते. |
दोघांचे भांडण तिसर्याचा लाभ. |
धरले तर चावते, सोडले तर पळते. |
न खात्या देवाला, नैवेद्य फार. |
नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न. |
नकटे व्हावे पण धाकटे होऊ नये. |
नखभर सुख, हातभर दुःख. |
नदीचे मुळ आणि ऋषीचे कुळ कधी पाहू नये. |
नमस्कार फुकाचा, आशिर्वाद लाखाचा. |
नशीब लागले द्यायला, पदर नाही घ्यायला. |
न कर्त्याचा वार शनिवार. |
नळी फुंकले सोनारे, इकडून तिकडून गेले वारे. |
न बोलता दुःख फार, बोलण्याने हलका भार. |
नाक दाबले की तोंड उघडते. |
नाकापेक्षा मोती जड, सासुपेक्षा सून अवजड. |
नाकाच्या शेंड्याला जीभ पुरविणे. |
नाकापर्यंत पदर अन् वेशीपर्यंत नजर. |
नाचता येईना, अंगण वाकडे. |
नाव मोठे लक्षण खोटे. |
नाव सगुणी पण करणी अवगुणी. |
निंदकाचे घर, असावे शेजारी. |
पाण्याची धाव समुद्राकडे, बायकांची धाव सोन्याकडे. |
पाण्यात पडल्याशिवाय पोहता येत नाही. |
पाण्यात राहून माशाशी वैर करू नये. |
पी हळद आणि हो गोरी. |
पुढच्यास ठेच, मागचा शहाणा. |
प्रकृती तितक्या विकृती. |
फाटके नेसावे पण स्वतंत्र असावे. |
फुकटचे खाय, त्याला स्वस्त महाग काय? |
बळी तो कान पिळी. |
बढाईला पुढे अन् लढाईला मागे. |
बाप दाखव, नाही तर श्राद्ध कर. |
बायकोचा भाऊ, लोण्याहून मऊ. |
बुडत्याचे पाय डोहाकडे. |
बुडत्याला काडीचा आधार. |
बोलण्यात जोर अन् कामात अंगचोर. |
भटाला दिली ओसरी, भट हात पाय पसरी. |
भित्यापाठी ब्रह्मराक्षस. |
भुकेले कोल्हे, काकडीला राजी. |
मरावे परी कीर्ती रूपे उरावे. |
मन नाही स्थिरी, बहु तीर्थ करी. |
मान सांगावा जना, अपमान सांगावा मना. |
मामाच्या घरी भाचा कारभारी. |
माय तसं लेकरू, गाय तसं वासरू. |
मुलाचे पाय पाळण्यात दिसतात. |
मुर्ख भांडती, वकील घरे बांधती. |
मेंढी जाते जीवानिशी, खाणारा मागतो वातड होती. |
मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. |
यथा राजा तथा प्रजा. |
रात्र थोडी, सोंग फार. |
राजा बोले, दाढी हाले. |
लबाड्याचे निमंत्रण, जेवल्यावर खरे. |
लहान तोंडी, मोठा घास. |
लाथ मारीन तिथे पाणी काढीन. |
लाज ना अब्रु, कशाला घाबरू. |
लेकीला तूप साखर, सुनेला मीठ साखर. |
लेकी बोले, सुने लागे. |
लोकासांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडा पाषाण. |
लंगडी गाय, वासरात शहाणी. |
वड्याचे तेल वांग्यावर काढणे. |
वराती मागून घोडे. |
विंचवाचे बिर्हाड पाठीवर. |
वेड घेऊन पेडगावास जाणे. |
वेष असावा बावळा, परी अंगी असाव्या नाना कळा. |
वेळ ना वखत् अन् गाढव चालले भुकत. |
वेळीच जो जागे तो भीक ना मागे. |
व्यक्ती तितक्या प्रकृती, आणि देश तितक्या संस्कृती. |
शहाण्याला एक बात, मुर्खाला सारी रात. |
शितावरून भाताची परिक्षा. |
सगळा गाव मामाचा, एक नाही कामाचा. |
सर्व आहे घरी, पण नियत नाही बरी. |
सोळा हात लुगडी आणि अर्धी तंगडी उघडी. |
स्नान करून पुण्य घडे, तर पाण्यात बेडूक काय थोडे. |
हसतील त्याचे दात दिसतील. |
हपापाचा माल गपापा. |
हाताचे सोडून पळत्याच्या पाठीमागे लागू नये. |
अर्थासह मराठी म्हणी आणि वाक्यात उपयोग.
अभिप्राय