पाककला | Maharashtrian Recipes

तूर डाळीचा पुलाव | Rice Recipes

साहित्य :

३ वाट्या तांदूळ, १ वाटी तुरीची डाळ, २०० ग्रॅम कांदे, १०-१२ लसूण पाकळ्या, २ इंच आले, २०० ग्रॅम गाजरे, २०० ग्रॅम बीन्स (श्रावणघेवडा), २ मोठे तुकडे दालचिनी, ४ वेलदाडे, ७-८ मिरी, २ चमचे (चवीनुसार) मीठ, ४ मोथे चमचे तूप, आवडीनुसार सजावट

 

कृती :

डाळ व तांदूळ एकत्र धुवून तासभर बाजूला ठेवावी. बीन्सचे लहान तुकडे चिरावे. गाजराच्या चकत्या कराव्या. कांदे उभे चिरावे. आले-लसूण बारीक वाटावे. दालचिनी, मिरी व वेलदोडे एकत्र कुटावे. तुपावर कांदा गुलाबी तांबूस परतावा व त्यावर आले-लसणाची गोळी व भाज्या घालून २-३ मिनिटे परताव्या. त्यावर डाळ-तांदूळ घालून ३-४ मिनिटे परतावे. ९ वाट्या गरम पाणी, कुटलेली मसाला पूड व मीठ घालावे. पुलाव कुकरमध्ये शिजवावा. वाढण्यापूर्वी चमचाभर साजूक तूप वरून सोडावे.

हापूस प्रतियोगीता

हापूस चित्रपटावर आधारीत ७ प्रश्नांची उत्तरे द्या आणि जिंका २० ऑडीओ सीडी अधिक माहीतीसाठी बघा हापूस चित्रपट प्रतियोगीता

मराठी कविता

चुकीच्या कल्पनेवर आधारलेली कविता

मला दि.पू चित्रे, अरुण म्हात्रे होता येत नाही याचं दुःख आहे.

मला वसंत आबाजी डहाके होता येत नाही याचेही वाईट वाटते.

मला हेमंत जोगळेकर सारखं मऊ उबदार लिहीता येत नाही

याचंही टिंब टिंब.

मी सकाळी रीतसर उठतो.