पाककला | Maharashtrian Recipes

मसूर डाळीची खिचडी | Rice Recipes

साहित्य :

१ वाटी तांदूळ, अर्धी वाटी मसूरडाळ, अर्धी वाटी गाजराचे तुकडे, अर्धी वाटी कोबी किंवा कॉलीफ्लॉवर (चिरलेला), ४-५ छोटे कांदे ( ऐच्छिक), १ टोमॅटो, अर्धा चमचा जिरे, १ हिरवी मिरची, पाव चमचा हळद, दीड चमचा मीठ, २ चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर, २ चमचे तूप, २ चमचे ओले खोबरे

 

कृती :

डाळ व तांदूळ वेगवेगळे धुवून ठेवावे. पातेल्यात तुपावर जिरे व मिरची फोडणीस टाकून त्यावर भाज्या, मीठ, हळद, टोमॅटो घालून ३-४ मिनिटे परतावे. त्यात डाळ घालून ५ वाट्या गरम पाणी घालावे. उकळी आली की तांदूळ वैरावे (घालावे). दहा मिनिटांनंतर आंच कमी करावी व झांकण ठेवावे. मंद आंचेवर खिचडी शिजू द्यावी. भाताची कणी शिजलेली दिसली की खाली उतरवून झाकूण ठेवावी. पाच मिनिटांनंतर कडेने चमचाभर साजूक तूप सोडावे. वाढताना कोथिंबीर व खोबरे वर शिवरावे. पापड, लोणचे, दही व ताक याबरोबर ही खिचडी खावी.

पथ्य करणारांना तसेच रविवारी टीव्हीच्या वेळेला वेळेला ही खिचडी सोयीची आहे.

हापूस प्रतियोगीता

हापूस चित्रपटावर आधारीत ७ प्रश्नांची उत्तरे द्या आणि जिंका २० ऑडीओ सीडी अधिक माहीतीसाठी बघा हापूस चित्रपट प्रतियोगीता

मराठी कविता

चुकीच्या कल्पनेवर आधारलेली कविता

मला दि.पू चित्रे, अरुण म्हात्रे होता येत नाही याचं दुःख आहे.

मला वसंत आबाजी डहाके होता येत नाही याचेही वाईट वाटते.

मला हेमंत जोगळेकर सारखं मऊ उबदार लिहीता येत नाही

याचंही टिंब टिंब.

मी सकाळी रीतसर उठतो.