पाककला | Maharashtrian Recipes

लिंबाच्या सालीचे लोणचे | Pickle Recipes

साहित्य :

२०-२५ लिंबांच्या साली

एका वेळेस इतकी सगळी लिंबे हवीत असे नाही. रोजच्या वापरात लिंबाचा रस काढून झाला की सालीचे चार तुकडे जराशा मीठात घोळवावे व एका घट्ट झांकणाच्या मोठ्या बाटलीत भरावे. साली साठत जातील तशा मीठात घोळवून बाटलीत भराव्या आवश्यक वाटल्यास थोडे जास्त मीठ घालावे.

१ वाटी, पाव वाटी लाल तिखट, २ वाट्या साखर, ६ लिंबाचा रस व साली.

 

कृती :

सर्व जिन्नस एका थाळ्यात किंवा तसराळ्यात कालवावे. बाटलीतल्या सालीही त्यात मिसळाव्या. रुंद तोंडाच्या बरणीत हे मिश्रण भरावे. चौपदरी मलमली फडल्याचा दादरा बांधावा व बरणी ८-१० दिवस उन्हात ठेवावी. संध्याकाळी उचलून घरात ठेवताना बरणी हलवावी. दहा दिवसांनंतर दादरा सोडून झाकण लावावे. झाकणावरून दुसरा दादरा बांधांवा. लोणच्याचा रंग बदलला की ते तयार झाले असे समजावे. आवश्यक वाटल्यास मीठ व साखर थोडी जास्त घालावी.

हापूस प्रतियोगीता

हापूस चित्रपटावर आधारीत ७ प्रश्नांची उत्तरे द्या आणि जिंका २० ऑडीओ सीडी अधिक माहीतीसाठी बघा हापूस चित्रपट प्रतियोगीता

मराठी कविता

चुकीच्या कल्पनेवर आधारलेली कविता

मला दि.पू चित्रे, अरुण म्हात्रे होता येत नाही याचं दुःख आहे.

मला वसंत आबाजी डहाके होता येत नाही याचेही वाईट वाटते.

मला हेमंत जोगळेकर सारखं मऊ उबदार लिहीता येत नाही

याचंही टिंब टिंब.

मी सकाळी रीतसर उठतो.