॥ माझी शपथ ॥
उध्वस्त होण्यातही एक मजा असते
स्वतःचेच आसूड स्वतःवर फटकावतांना
ती ही एक गोड सजा असते
मजनू होण्यास कोणती अदा असते?
Please सांगू नका कुणी कुणाला ! माझी शपथ !
प्रेयसीच नादान झाली तर
मरणाचही मरण गोठून गोठून थोटं होत
ती हुरहुर ---- तो क्षण आणि त्या स्मृती
काळ्याकुट्ट असल्यातरी चालतील
पण तीच नादान झाली तर?
स्मृतीच भ्रष्ट नष्ट होऊन भेगा पडतात मेंदुला
मेंदूचा मुडदा पडला तरी चालेल पन साला तो अमर आहे
भेकडांचही एक तत्त्वज्ञान असत
राणी, तू केविलवाणी का झालीस ?
ए वेडाबाई, रडतेस कशाला?
म्हणजे तुझे माझ्यावर प्रेम/बीम आहे की काय?
`अश्रूच्या पाटात' प्रेमाच कमळ! मस्त राणी मस्त !
सालं, आमचा बापजाद्यांनाही जमल नाही
आम्ही तर कोणीच नसून असल्यासारखे केलेस
आणि प्रत्यक्ष असतांनाच का बदनामकेलेस
तू रडलीस अन उध्वस्त होण्यातली मजाच गेली
`मी तुला परमात्मा'
भलतच काय बोलतेस
वटवट बंद कर - चल बोहल्यावर चढ
काय म्हणतेस ? `तुला मी आजन्म विसरणार नाही'
माझ मरण मीच मरवणार आहे चल चालती हो - सुखी हो
माझा कमीत कमी `मजनू' तरी करावयास
तुझ्या आसवात `मजनू'च कलेवर कशाला बुड्वलस
आणि असच करायच होतं ता लैलाच का झालीस
म्हणून तर उध्वस्त होण्यातली मजाच गेली ! |