माझा बालमित्र | Majha Balmitra

इसापनीती कथा | Isapniti Katha

कोल्हा, रानमांजर आणि ससा

Majha Balmitraएक लहानसा भित्राससा एका बिळात राहात असे; त्याने एके दिवशी, कोल्हा आपणास धरून मारून खाण्यासाठी बिळाच्या तोंडावर टपून बसला आहे असे पाहिले. परंतु बिळाचे तोंड लहान असल्यामुळे त्यातून कोल्ह्यास आत येणार नाही, हे पाहून, सशाचे भय थोडेसे कमी झाले. पुढे एके दिवशी, कोल्हा एका रानमांजराबरोबर मोठया सलगीने बोलत बसला आहे, असे त्याच्या दृष्टीस पडले. हे चिन्ह काही बरे नाही, असे त्यास वाटले. थोडया वेळाने, ते रानमांजर सशाच्या बिळात शिरले आणि त्यास आपल्या पंजांनी असे ओरबाडू लागले की, सशास आपला जीव वांचविण्यासाठी बिळातून बाहेर पडावे लागले! तो तेथे कोल्हा बसलाच होता, त्याने त्याजवर झडप घालून त्यास पकडले व रानमांजरासह त्याच्या मांसावर ताव मारण्यास सुरवात केली. मरतेवेळी ससा म्हणाला, `तुम्हा दोघा लुच्चांची मैत्री झाली असे जेव्हा मी पाहिले, तेव्हाच आपली आता धडगत नाही, अशी माझी खात्री होऊन चुकली होती.'

तात्पर्य :- एकमेकांशी शत्रुत्व करणाऱ्या दोन मनुष्यांची मैत्री झाली, की एखादया गरीबावर धाड आलीच म्हणून समजावे.

इसापनीती कथा भाग १

 

  • मोलकरीण आणि कोंबडी
  • पारधी आणि पारवा
  • लहान मासा आणि मोठा मासा
  • कोल्हा आणि वानर
  • कुत्रा आणि लांडगा
  • तारवावरील दोन प्रवासी
  • दोन कोंबडे
  • भविष्यवादी
  • चतुर स्त्रा
  • प्रवासी आणि ज्योतिषी
  • कवडा आणि कोंबडे
  • कोल्ही आणि सिंहीण
  • धनगर व्यापारी झाला होता
  • देव आणि नास्तिक मनुष्य
  • वैद्य आणि रोगी
  • निराश झालेले कोळी
  • मनुष्य आणि त्याचा लाकडी देव
  • गरुड पक्षी आणि मनुष्य
  • शेतकरी आणि त्याचे मुलगे
  • खंडोबा आणि मधमाशी
  • लोहर आणि त्याचा कुत्रा
  • लांडगा आणि सिंह
  • सिंह आणि बैल
  • गप्पीदास
  • खंडोबा आणि प्रवासी

हापूस प्रतियोगीता

हापूस चित्रपटावर आधारीत ७ प्रश्नांची उत्तरे द्या आणि जिंका २० ऑडीओ सीडी अधिक माहीतीसाठी बघा हापूस चित्रपट प्रतियोगीता

मराठी कविता

चुकीच्या कल्पनेवर आधारलेली कविता

मला दि.पू चित्रे, अरुण म्हात्रे होता येत नाही याचं दुःख आहे.

मला वसंत आबाजी डहाके होता येत नाही याचेही वाईट वाटते.

मला हेमंत जोगळेकर सारखं मऊ उबदार लिहीता येत नाही

याचंही टिंब टिंब.

मी सकाळी रीतसर उठतो.