| Share Your Talent at Balmitra Register Today |
|
| HOME | ABOUT | CONTACT | FEEDBACK | SITE MAP | HELP CENTER |
|
|
| eMail page Link | | |||
![]() |
![]() |
||
| मराठीमाती डॉट कॉम / माझा बालमित्र / सुविचार | Back | Home |
सुविचार suvichar marathi good thoughts marathi suvichar सुविचार ( मित्रांस पाठवा ) ६२६) शहाणा मनुष्य स्वत:च्या उत्पन्नाप्रमाणेच स्वत:चे जीवन जगतो. ६२७) प्रत्येक माणसाचा सर्वात मोठा शत्रू तो स्वत:च असतो. ६२८) विश्वास म्हणजे मनुष्याला जीवंत ठेवणारी शक्ती होय. ६२९) चंद्र व चंदनापेक्षाही सज्जनांचा सहवास अधिक शितल असतो. ६३०) जर तुम्ही परमेश्वराचे प्रिय होऊ इच्छित असाल, तर त्याच्याकडे काही मागू नका. त्याने जे दिले आहे त्याबद्दल त्याचे आभार माना. ६३१) विचार हेतूकडे नेतो, हेतू कृतीकडे नेतो, कृतीमुळेच सवय लागते, सवयीमुळे स्वभाव बनतो आणि स्वभावामुळेच साध्य प्राप्त होते. म्हणजे विचार हीच यशाची पहिली पायरी आहे. ६३२) मृत्यूला सांगाव, ये ! कुठल्याही रुपाने ये. पण जगण्यासारखं काहीतरी जोपर्यंत माझ्याकडे आहे तोपर्यंत तुला या दाराबाहेर थांबावं लागेल. ६३३) जगातील प्रत्येक घर हे शाळा आहे, आणि माता पिता हे शिक्षक ! ६३४) स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंतकाळाची माता असते. ६३५) ज्यांना नमस्कार करायला जागा नाही अशी माणसं अभागी आणि जागा असूनही ज्यांना नमस्कार करता येत नाही ती निव्वळ कपाळकरंटी. ६३६) सर्वात चांगले पाहूणे तेच की जे कधीच पाहूणचार घेत नाहीत. य़ेतो म्हणतात पण येत नाहीत. ६३७) नदीचे पाणी आटल्यावर पाय न भिजवता नदी पार करु शकू असं म्हणून मुर्खासारखं थांबण्यापेक्षा नदीच्या पात्रात उडी घेऊन, प्रवाह कापून नदी पार करणे शहाणपणाचे असते. ६३८) धर्माच्या नावाने मुक्या प्राण्यांचा बळी देऊ नका. मुक्या प्राण्यांच्या जीवाशी खेळणे हा अधर्म आहे. ६३९) हुंडा घेऊन लग्न करणे म्हणजे स्वत:ची विक्री केल्यासारखे आहे. ६४०) या जगात एकच जात आहे- माणूस ! आणि धर्मही एकच- माणूसकी! ६४१) परिस्थितीच्या अधीन होऊ नका, परिस्थितीवर मात करा. ६४२) कला म्हणजे सत्य, शिव आणि सुंदर यांचे संमेलन. ६४३) नवीन गोष्ट शिकण्याची ज्याची उमेद गेली तो म्हातारा. ६४४) खरा तो एकचि धर्म । जगाला प्रेम अर्पावे ॥ ६४५) ध्येयवादाला स्वत:च्या ह्रदयातील उतावळेपणाचे भय असते. म्हणूनच, कोणत्याही कामात उतावळेपणा करु नका; संयम पाळा. ६४६) ज्ञानाशिवाय भक्ती आंधळी आहे. भक्तीशिवाय कर्म आंधळे आहे. आणि ज्ञान, भक्ती व कर्म याशिवाय जीवन आंधळे आहे. ६४७) आपले अंत:करण जोपर्यंत शुध्द आहे तोपर्यंत कशाचीही भीती बाळगण्याची जरुरी नाही. ६४८) पुस्तकांच्या सहवासात शांत आयुष्य वेचण्यासारखा दुसरा आनंद नाही. ६४९) ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा । काय भुललासी वरलिया रंगा ॥ ६५०) स्पर्श न करता विद्यार्थ्याला शिक्षा करता येते तोच खरा शिक्षक !
१२ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ |
|
||||||
| PRIVACY | LEGAL | PLACE ADVERTISE | SITE MAP | CONTRIBUTE | FEEDBACK |
| Channel Websites - MarathiMati.net | MarathiMati.org | MARATHIPATRA.com | NashikDiary.com | PUNEPRIME.com | NamdeoShimpiSamaj.org | MAHARASHTRAPRIME.com | ||||||||
| Write to: Harshad Khandare All Rights Reserved Worldwide to OWNWAY Art & Technology Master.Harshad N Khandare. मराठीतून मराठीचा वारसा पुढे नेणारी एक अस्सल मराठमॊळी वेबसाईट © २००१ - २००८ |