| Share Your Talent at Balmitra Register Today |
|
| HOME | ABOUT | CONTACT | FEEDBACK | SITE MAP | HELP CENTER |
|
|
| eMail page Link | | |||
![]() |
![]() |
||
| मराठीमाती डॉट कॉम / माझा बालमित्र / सुविचार | Back | Home |
सुविचार suvichar marathi good thoughts marathi suvichar सुविचार ( मित्रांस पाठवा ) ५५१) तुम्ही आपल्या कर्माचा पडदा काचेसारखा स्वच्छ कराल तर त्यातून तुम्हाला परमेश्वर दिसेल. ५५२) थोरांचे सदगुण घेणे हीच त्यांना वाहिलेली खरी श्रध्दांजली ! ५५३) थोर काय अगर सामान्य काय ! प्रत्येकाला प्रत्येकाची गरज ही असतेच. ५५४) दुर्बल व्यक्ती एखादे उच्च ध्येय समोर ठेवून समाजात वावरु लागते तेव्हा धाडस व साहस हे गुण तिच्यात आपोआप येतात. ५५५) दु:ख विभागल्याने कमी होते आणि सुख विभागल्याने वाढते. ५५६) दुसऱ्याचे ओझे उतरवण्यासाठी जेव्हा तुम्ही पुढे होता, तेव्हा तुमचे ओझे पूर्वीपेक्षा हलके होते हे लक्षात ठेवा. ५५७) दुसऱ्याचे ओझे उतरवण्यासाठी जेव्हा तुम्ही पुढे होता, तेव्हा तुमचे ओझे पूर्वीपेक्षा हलके होते हे लक्षात ठेवा. ५५८) दुसऱ्याला सावली देण्यासाठी झाडाला स्वत: उन्हात उभं राहावं लागतं. ५५९) दिव्याची काच स्वच्छ असून भागत नाही, आत ज्योत ही हवीच. ५६०) दुसऱ्याचा विचार करायला शिकला तोच खरा सुशिक्षित. ५६१) ध्येयाचा ध्यास लागला; म्हणजे कामाचा त्रास वाटत नाही. ५६२) नम्रता ही शिक्षणाची पहिली पायरी आहे. ५६३) नशीब रुसलं तर किती रुसेल आणि हसलं तर किती हसेल याचा नेम नाही. ५६४) नियमितपणा हा दुसऱ्याच्या वेळेला किंमत देण्यातून जन्माला येतो. ५६५) प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते. ५६६) पुराचा लोट अडविण्यात अर्थ नसतो, तो आपोआप जिरू द्यावा लागतो. ५६७) कलेची पारंबी माणसाला बळ देते. ५६८) फ़ुलांच्या पाकळ्या तोडणाऱ्याला फ़ुलांचे सौंदर्य कधीच आस्वादता येत नाही. ५६९) बुद्धीमत्तेपेक्षा चारित्र्य श्रेष्ठ आहे. ५७०) काही बदलायचं असेल तर सर्वात आधी स्वत:ला बदला. ५७१) मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ. ५७२) मुलांच्यात बदल हाच शिक्षकाचा आनंदाचा ठेवा ! ५७३) माणसानं राजहंसासारखं असावं. आपल्याला जे पटेल तेच घ्यावं, नाही ते सोडून द्यावं. ५७४) माणसाचं छोट दु:ख जगाच्या मोठ्या दु:खात मिसळून गेलं की त्याला सुखाची चव येते. ५७५) माणसाचे मोठेपण त्याने किती माणसे मोठी केली, यावरुन मोजता येते. १२ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ |
|
||||||
| PRIVACY | LEGAL | PLACE ADVERTISE | SITE MAP | CONTRIBUTE | FEEDBACK |
| Channel Websites - MarathiMati.net | MarathiMati.org | MARATHIPATRA.com | NashikDiary.com | PUNEPRIME.com | NamdeoShimpiSamaj.org | MAHARASHTRAPRIME.com | ||||||||
| Write to: Harshad Khandare All Rights Reserved Worldwide to OWNWAY Art & Technology Master.Harshad N Khandare. मराठीतून मराठीचा वारसा पुढे नेणारी एक अस्सल मराठमॊळी वेबसाईट © २००१ - २००८ |