| Share Your Talent at Balmitra Register Today |
|
| HOME | ABOUT | CONTACT | FEEDBACK | SITE MAP | HELP CENTER |
|
|
| eMail page Link | | |||
![]() |
![]() |
||
| मराठीमाती डॉट कॉम / माझा बालमित्र / सुविचार | Back | Home |
सुविचार suvichar marathi good thoughts marathi suvichar सुविचार ( मित्रांस पाठवा ) ४५१) विचार परीपक्व झाले की शब्दांचे रूप देऊन कागदावर उतरवता येतात. ४५२) नाव ठेवणे सोपे आहे, परंतु नाव कमावणे खूप अवघड. ४५३) राजाला फक्त राज्य मानते, तर बुध्दीवंताला संपूर्ण विश्व. ४५४) निंदकाचे घर असावे शेजारी. ४५५) लोकांचे तुमच्याबद्दल काय मत आहे यापेक्षा तुमचे स्वतःबद्दल काय मत आहे हे महत्त्वाचे. ४५६) कावळ्याच्या मरणाचे वाईट वाटत नाही; मात्र मोर मेला तर आपण हळहळतो. कारण सौंदर्य नष्ट होते. ४५७) बुध्दी आणि भावना यांचा योग्य संयम म्हणजेच विवेक. ४५८) त्याग हा जीवनमंदिराचा कळस आहे. ४५९) आपण पक्षाप्रमाणे आकाशात उडायला शिकलो, माशाप्रमाणे समुद्रात पोहायला शिकलो पण जमिनीवर माणसासारखे वागायला शिकलो का? ४६०) मानसिक स्वातंत्र्य हेच खरे स्वातंत्र्य आहे. ज्याचे मन स्वातंत्र नाही तो मोकळा असूनही गुलाम आहे. ४६१) प्रत्यक्षानुभूती हेच खरे ज्ञान. ४६२) कुणाचेही अंतःकरण न दुखवता बोलणे म्हणजे खरे भाषण ! ४६३) खरे असेल तेच बोलावे, उदात्त असेल तेच लिहावे, उपयोगी तेच शिकावे आणि देशाचे हीत ज्यात असेल तेच करावे. ४६४) जो आत्मप्रौढी करेल त्याची मानहानी होईल आणि जो नम्रतेने राहील त्याला प्रतिष्ठा प्राप्त होईल. ४६५) खरी प्रीती ही कुसुमापेक्षाही कोमल व वज्रापेक्षाही कठोर असते. ४६६) कुरूप मनापेक्षा कुरूप चेहरा चांगला. ४६७) मनुष्याचे मोठेपण हे त्याच्या वयावर नव्हे, तर कर्तृत्त्वावर अवलंबून असते. ४६८) कीर्ती ही सावलीप्रमाणे सदगुणांबरोबर वावरत असते. ४६९) औदार्य म्हणजे तुमच्या क्षमतेपेक्षा अधिक देणं आणि आत्मसन्मान म्हणजे तुमच्या गरजेपेक्षा कमी घेणं. ४७०) हात उगारण्यासाठी नसतात; उभारण्यासाठी असतात. ४७१) तुमचे सौख्य तुमच्या विचारांवर अवलंबून असते. ४७२) माणसाचे चरित्र्य आरशात दिसत नसते. ४७३) वैयक्तिक तृष्णेला अंत नसतो. ४७४) जेथे बुध्दीचे क्षेत्र संपते तेथे श्रध्देचे क्षेत्र सुरू होते. ४७५) सन्मित्र ही जगातील सर्वश्रेष्ठ संपत्ती आहे. १२ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ |
|
||||||
| PRIVACY | LEGAL | PLACE ADVERTISE | SITE MAP | CONTRIBUTE | FEEDBACK |
| Channel Websites - MarathiMati.net | MarathiMati.org | MARATHIPATRA.com | NashikDiary.com | PUNEPRIME.com | NamdeoShimpiSamaj.org | MAHARASHTRAPRIME.com | ||||||||
| Write to: Harshad Khandare All Rights Reserved Worldwide to OWNWAY Art & Technology Master.Harshad N Khandare. मराठीतून मराठीचा वारसा पुढे नेणारी एक अस्सल मराठमॊळी वेबसाईट © २००१ - २००८ |