| Share Your Talent at Balmitra Register Today |
|
| HOME | ABOUT | CONTACT | FEEDBACK | SITE MAP | HELP CENTER |
|
|
| eMail page Link | | |||
![]() |
![]() |
||
| मराठीमाती डॉट कॉम / माझा बालमित्र / सुविचार | Back | Home |
सुविचार suvichar marathi good thoughts marathi suvichar सुविचार ( मित्रांस पाठवा ) ४२६) जीवनाला अखेरची रेषा नसते. ते क्षितिजासारखे रुंदावणारे आहे. ४२७) विचार कराण्यासाढी वेळ द्या. पण एकदा का कृती करण्याची वेळ आली की विचार करणे थाबंवा आणि स्वतःला कार्यात झोकून द्या. ४२८) कर्मण्ये वाधिकारस्ते मा फ़लेषु कदाचन ॥ ४२९) चारीत्र्यात सूर्याची तेजस्विता अन अंतःकरणात चंद्राची शीतलता असायला हवी. ४३०) प्रेमाशिवाय सेवा व्यर्थ आहे. प्रेम नसताना जर कोणी सेवा केली असेल तर ती सेवा नसते, तो व्यापार असतो. ४३१) शरीर पाण्यामुळे, मन सत्यामुळे आणि आत्मा ज्ञानामुळे पवित्र राहतो. ४३२) शक्योतोवर कुणाचेही उपकार घेऊ नका आणि जर का घेतले तर त्या व्यक्तीलाही तशीच मदत करा. ४३३) पाहिलेल्या पावसाळ्यापेक्षा अनुभवलेले पावसाळे अधिक महत्त्वाचे असतात. ४३४) अंधारातच प्रकाशाची खरी किंमत कळते. ४३५) देश तुमच्यासाठी काय करील हे विचारण्यापेक्षा देशासाठी तुम्ही काय कराल ते सांगा. ४३६) अपराध्याला पुन्हाःपुन्हा क्षमा करणं हे अपराध करण्याइतकंच धोक्याचं आहे. ४३७) समुद्राचा तळ शोधल्याशिवाय मोती मिळत नाहीत. ४३८) फांदीला फुलांचं ओझं कधीच वाटत नाही. ४३९) पराभवानेच माणसाला स्वतःची खरी ओळख पटते. ४४०) दुसऱ्याला सावली देण्यासाठी झाडाला स्वतः उन्हात उभं राहावं लागतं. ४४१) श्रध्देच्या जोरावर असाध्य गोष्टी साध्य करता येतात. ४४२) महापुरात झाडे वाहून जातात पण लव्हाळे मात्र वाचते. ४४३) क्रोधाच्या एका क्षणी संयम राखला तर पश्चातापाचे शंभर क्षण वाचतात. ४४४) आळसाचा प्रवास इतका सावकाश असतो की दारिद्र्य त्यास ताबडतोब गाठते. ४४५) पुस्तके म्हणजे मन निर्मळ करणारा अविश्रांत झरा आहे. ४४६) जीवन हा हास्य आणि अश्रू यांचा सुरेख संगम आहे. ४४७) अहंकारापेक्षा नम्रतेचे मोल महान आहे. ४४८) जे तलवार चलवतील ते तलवारीनेच मरतील. ४४९) मैत्रीच्या रोपट्याला नेहमी प्रेमरूपी पाण्याचे सिंचन आवश्यक असते. ४५०) दुष्टांच्या संगतीत सदाचार लोप पावतो. १२ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ |
|
||||||
| PRIVACY | LEGAL | PLACE ADVERTISE | SITE MAP | CONTRIBUTE | FEEDBACK |
| Channel Websites - MarathiMati.net | MarathiMati.org | MARATHIPATRA.com | NashikDiary.com | PUNEPRIME.com | NamdeoShimpiSamaj.org | MAHARASHTRAPRIME.com | ||||||||
| Write to: Harshad Khandare All Rights Reserved Worldwide to OWNWAY Art & Technology Master.Harshad N Khandare. मराठीतून मराठीचा वारसा पुढे नेणारी एक अस्सल मराठमॊळी वेबसाईट © २००१ - २००८ |