| Share Your Talent at Balmitra Register Today |
|
| HOME | ABOUT | CONTACT | FEEDBACK | SITE MAP | HELP CENTER |
|
|
| eMail page Link | | |||
![]() |
![]() |
||
| मराठीमाती डॉट कॉम / माझा बालमित्र / सुविचार | Back | Home |
सुविचार suvichar marathi good thoughts marathi suvichar सुविचार ( मित्रांस पाठवा ) ४०१) सदगुणांसाठी दुसऱ्याकडे बघा व दुर्गूणांसाठी स्वतःवर नजर ठेवा. ४०२) भित्री माणसे मरण्यापुर्वी अनेकदा मरतात पण शूर माणसे एकदाच जन्मतात आणि एकदाच मरतात. ४०३) परमेश्वाराची कृपा होते पण, श्रध्दा आणि सबुरी हे दोन गुण असतील तेव्हाच. ४०४) माणसाला त्याचे श्रेष्ठत्त्व जातीने नव्हे तर गुणांनी प्राप्त होते. ४०५) स्वावलंबी शिक्षण हेच खऱ्या विद्यार्थ्याचे ब्रीद. ४०६) चारीत्र्यवान मनुष्यच खरा सुशिक्षित. ४०७) काम करणे हे जर अटळ आहे तर ते काम हसत हसत का करू नये? ४०८) अभ्यासाचा कंटाळा म्हणजे भाग्याला टाळा. ४०९) यशाचे मधुर चांदणे हवे असेल तर प्रयत्नांचा चंद्रमा अखंड तेवत ठेवली पाहिजे. ४१०) सत्याला शपथांच्या टेकूची गरज नसते. ४११) सुखापेक्षा दुःखामुळे होणारे ज्ञान श्रेष्ठ दर्जाचे असते. ४१२) अशक्य हा शब्दच आपल्या शब्दकोशातून काढून टाका. ४१३) झाडासारखे जगा... खूप उंच व्हा... पण जीवन देणाऱ्या मातीला विसरू नका. ४१४) स्वर्गापेक्षाही चांगल्या पुस्तकाचे अधिक स्वागत करा. कारण चागंली पुस्तके जिथे असतील तिथे स्वर्ग निर्माण होईल. ४१५) इच्छा दांडगी असली की मदद आपणहून तुमच्याकडे चालत येते. ४१६) अज्ञानाची फळे नश्वर असतात. ती सकाळी जन्माला येतात आणि सायंकाळी नष्ट होतात. ४१७) कोणी कितीही चिडवण्याचा प्रयत्न केला तरी मनावर संयम ठेवणे, शांत राहणे हेच खरे शौर्याचे लक्षण आहे. ४१८) अपयशाची भीती ही सर्वात मोठी भीती होय. ४१९) तलवार ही शुरांची नव्हे; भीतीची निशाणी आहे. ४२०) जूलूम सहन करणे म्हणजे सोशिकपणा नव्हे, परमार्थही नव्हे, ती केवळ लाचारी आहे. ४२१) आज्ञेला सामर्थ्य यायला आधी सेवा करावी लागते . ४२२) माणूस नेहमी प्रगतीशील असला तरच मोठा होण्यासाठी धडपडतो . अल्पसंतूष्ट माणूस निष्क्रीय बनतो . ४२३) जीभ जिंकणारा जग जिंकतो. ४२४) झाले गेले विसरुनि जावे... पुढे पुढे चालावे... जीवनगाणे गातच राहावे. ४२५) गुलाब पाणी देणाऱ्या हातांना त्याचा सुगंध चिकटल्याशिवाय राहत नाही. १२ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ |
|
||||||
| PRIVACY | LEGAL | PLACE ADVERTISE | SITE MAP | CONTRIBUTE | FEEDBACK |
| Channel Websites - MarathiMati.net | MarathiMati.org | MARATHIPATRA.com | NashikDiary.com | PUNEPRIME.com | NamdeoShimpiSamaj.org | MAHARASHTRAPRIME.com | ||||||||
| Write to: Harshad Khandare All Rights Reserved Worldwide to OWNWAY Art & Technology Master.Harshad N Khandare. मराठीतून मराठीचा वारसा पुढे नेणारी एक अस्सल मराठमॊळी वेबसाईट © २००१ - २००८ |