| Share Your Talent at Balmitra Register Today |
|
| HOME | ABOUT | CONTACT | FEEDBACK | SITE MAP | HELP CENTER |
|
|
| eMail page Link | | |||
![]() |
![]() |
||
| मराठीमाती डॉट कॉम / माझा बालमित्र / सुविचार | Back | Home |
सुविचार suvichar marathi good thoughts marathi suvichar सुविचार ( मित्रांस पाठवा ) ३५१) वाड्मय हे देशाच्या घटनेचे आणि प्रगतीचे एक प्रभावशाली अस्त्र आहे . ३५२) जिथे आपल्या अस्तित्वाची गैरहजेरी जाणवत नाही तिथे उपस्थित राहण्यात काय अर्थ ! ३५३) निढळाचा घाम घाळून श्रमतो त्याचीच पृथ्वीवर खरी मालकी असते. ३५४) एका हाताने दिलेले दान दुसऱ्या हातालाही कळू देऊ नये. ३५५) माणासाला माणसाजवळ आणणे हीच खरी प्रगती. ३५६) समताधिष्ठीत समाजात माणूस म्हणून जगण्याचा हक्क प्रत्येकाला आहे. ३५७) क्रोधाला लगाम घालण्यासाठी मौनाइतका उत्तम मार्ग दुसरा नाही. ३५८) द्वेषाला सहानुभुतीने व निष्कपटतेने जिंका. ३५९) तीन गोष्टी सतत देत राहा-मान, दान आणि ज्ञान. ३६०) विज्ञानाखेरीज अपल्याला भविष्य नाही पण त्याला आध्यात्माचा लगाम हवा. ३६१) आघात करायचा पण रक्त काढायचे नाही; जीव ओतायचा पण जीवन हरपायचे नाही; विसर्जित व्हायचे पण स्वत्व गमवायचे नाही. ३६२) चांगले तेवढे घ्या; वाईट फेकून द्या. ३६३) कर्ज, शत्रू आणि रोग यांची थोडीसुध्दा बाकी ठेवू नये. ३६४) अर्धवट ज्ञानी म्हणजे दुःखाचा धनी. ३६५) कला अशी हवी की, जी एकाचवेळी लाखांशी बोलू शकेल. ३६६) रणातून पळणारा भीरू हा मित्राचाच नव्हे, तर शत्रूचाही आदर गमावतो. ३६७) दान स्वीकारणाऱ्याने आपल्याला मिळालेले दान कधीही विसरू नये आणि दान देणाऱ्याने आपण ते दिले हे कधीही लक्षात ठेवू नये. ३६८) जगात दुसऱ्याला हसण्याइतके सोपे व दुसऱ्यासाठी रडण्याइतके कठीण काम दुसरे कोणतेही नाही. ३६९) चार गोड शब्दांनी जे काम होते ते पैशानेही होत नाही. ३७०) प्राप्तीच्या आनंदापेक्षा प्रयत्नांचा आनंद अधिक असतो. ३७१) लुळ्यापांगळ्या श्रीमंतीपेक्षा धट्टीकट्टी गरिबी बरी. ३७२) खूप कष्ट घेऊनही अपेक्षित यश लाभलं नाही तर नियती देईल ते आनंदाने स्वीकारा. ३७३) मन एकाग्र केल्यावर अशक्य असे एकही काम नाही. ३७४) मनुष्याला आपल्या दारिद्र्याची लाज वाटता कामा नये. ला वाटायला पाहीजे ती दुर्गुणांची. ३७५) श्रीमंत होण्यापेक्षा गुणवंत होण्याचा प्रयत्न करा १२ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ |
|
||||||
| PRIVACY | LEGAL | PLACE ADVERTISE | SITE MAP | CONTRIBUTE | FEEDBACK |
| Channel Websites - MarathiMati.net | MarathiMati.org | MARATHIPATRA.com | NashikDiary.com | PUNEPRIME.com | NamdeoShimpiSamaj.org | MAHARASHTRAPRIME.com | ||||||||
| Write to: Harshad Khandare All Rights Reserved Worldwide to OWNWAY Art & Technology Master.Harshad N Khandare. मराठीतून मराठीचा वारसा पुढे नेणारी एक अस्सल मराठमॊळी वेबसाईट © २००१ - २००८ |