माझा बालमित्र | Majha Balmitra

सामान्य ज्ञान

General Knowledge in Marathi

तुम्हाला ठाऊक आहे काय?

आपले सामान्य ज्ञान(General Knowledge) पडताळून पाहा

  • अगामा ही आफ्रिका खंडामध्ये सर्वत्र खडकाळ वाळवंटि प्रदेशात आढळणारी पालीची जात आहे.
  • अगाउ ही इथिओपियन पठाराच्या उत्तर व मध्य भागांमध्ये आढळणारी प्रचीन जमात आहे.
  • अग्नाथा (हल्लींची अगौटी) ही अमेरिकेतील विषुववृत्तीय भागात आढळणारी घुशीची जात आहे.
  • `एअरंडेल टेरिअर' हीटेरिअर जातीच्या कुत्र्यांची सर्वात मोठ्या आकारांची जात आहे.
  • जिओव्हानी आग्नेली हे फियाट मोटर कंपनीचे संस्थापक होते.
  • ऍग्न्स डेई हे येशू ख्रिस्ताचे ख्रिश्चन धर्मोपासनेतील संबोधन आहे.
  • जॉर्जियस ऍग्रिकोला, याजर्मन शास्त्रज्ञाला 'खनिजशास्त्राचे जनक म्हणतात.
  • 'केप ऍगुल्हास' हे आफ्रिका खंडाचे दक्षिण टोक आहे.

ईतीहास

ख्रिस्तपूर्व सहाव्या व पाचव्या शतकांमध्ये झालेल्या गंगा खोऱ्यातील सत्तासंघर्षामध्ये सर्वात प्रबळ ठरलेले मगध राज्य होय.

बिहार मधील सासाराम येथे शेरशहा सूर या मध्ययुगीन सम्राटाची कबर आहे.

इ.स. १८३१ ते१८८१ या कालावधीत्र ब्रिटिश प्रशासनाचे मुख्यालय बंगळूर येथे होते.

भुगोल

'बोकारो' व 'कोणार' या नद्या पूर्व भारतातील दामोदर नदीच्या उपनद्या आहेत.

नव्या झारखंड राज्याची राजधानी रांची आहे.

सांभर भारतातील सर्वात मोठे अल्पकालीन खारे सरोवर आहे.

खेळ

कुस्ती या क्रीडाप्रकारात प्रतिस्पर्थ्याचे खांदे जमिनीला टेकवायचे असतात.

व्यापार हा खेळ अमेरिकेत सुरू झालेला व खाजगी पेटंटाखाली जगभर सर्वात जास्त मागणी असलेला स्थावर संपत्तीविषयक पटाचा खेळ होय.

हेरॉल्ड लारवूड हा चौदाव्या वर्षापासून कोळसा खाणीत काम केल्यानंतर ते काम सोडून ट्रेंटा बिज, नॉटिगहॅम येथे मैदानावरील कर्मचारी म्हणून काम करणारा ब्रिटिश क्रिकेटपटू होय.

साहित्य आणि कला

राम लक्ष्मणांना भुलवून दूर नेणाऱ्या रामायणातील सोनेरी हरणाचे नाव मारीच होते.

शैवपंथियांचे, पवित्र धर्मग्रंथ असलेल्या मध्ययुगीन भारतातील हिंदू तंत्रग्रंथांना आगम म्हणतात.

ऋग्वेद हा सर्वात प्राचीन हिंदू धर्मग्रंथ आहे.

विज्ञान

पाणी पिऊन किंवा स्नान करून रोगमुक्ती साधणारी उपचार पद्धतीला हायड्रोपथी म्हणतात.

विजेच्या मूलभूत एककास `इलेक्ट्रॉन' ही संज्ञा जॉर्ज जॉन्स्टन स्टोनी यांनी दिली.

इग्वाना (घोरपड) पाल प्राणीवर्गात मोडते.

व्यक्ती आणि प्रसंग

मल्याळम साहित्यातील उल्लेखनीय कामगिरीबद्दलचा एझहुताचन पुरस्कार इ.स. २००० साली पाला नारायणन नायर यांना मिळाला.

इंदिरा गांधी या भारतीय स्त्रीला `सहस्त्रक पुरंध्री' (वुमन ऑफ द मिलेनियम) हा बहुमान बीबीसीच्या मतगणनेतून मिळाला.

बांगलादेश हा देश `गंगा मेकांग' गटाचा सभासद नाही.

हापूस प्रतियोगीता

हापूस चित्रपटावर आधारीत ७ प्रश्नांची उत्तरे द्या आणि जिंका २० ऑडीओ सीडी अधिक माहीतीसाठी बघा हापूस चित्रपट प्रतियोगीता

मराठी कविता

चुकीच्या कल्पनेवर आधारलेली कविता

मला दि.पू चित्रे, अरुण म्हात्रे होता येत नाही याचं दुःख आहे.

मला वसंत आबाजी डहाके होता येत नाही याचेही वाईट वाटते.

मला हेमंत जोगळेकर सारखं मऊ उबदार लिहीता येत नाही

याचंही टिंब टिंब.

मी सकाळी रीतसर उठतो.