About MarathiMati.com

माझी मराठीमाती

About MarathiMati.com

हर्षद खंदारे

MarathiMati.com Logo

मराठीमाती । माझ्या मातीचे गायन..

मराठी भाषेच्या प्रेमात अनेका प्रमाणे मी ही लहानपणा पासून आहेच, मराठी भाषेचं सामर्थ्य त्याची व्यापकता आणि विविधता, मराठी भाषेचं 'अंतराळ' तर्क - अनुमानाच्या पलीकडे असल्याचा मला जसा - जसा बोध झाला तसा - तसा या भाषेच्या कैफात मी अधिकच बुडालो आणि मराठी मन म्हणजे मराठी भाषेचं एक दालन असु शकतं, असा बोध होत असतांनाच या भाषेच्या अंतरंगात शिरण्याची मला प्रेरणा झाली. आणि म्हणुन शब्दांना पकडून मराठी भाषा कशी हे जर सांगण्याची वेळ आली तर...

अनेकांचे निराकार विचार जेथे साकार होतात, शिवाय बहू आयामी आणि 'विश्व स्पर्शि शिल्प' कलाकार जिच्यातून निर्माण करतात ती माझी, तुमची, सर्वांची मराठी मायबोली मी मानतो.

मराठीमाती विषयी अनेकांनी खुप काही सांगीतलेले आहे, अनेकांच्या अनेक संकल्पना आहेत, मुळात मराठीमाती हा विषय हा विषय एक खजाना आहे किंवा त्याला महासागराची उपमा देता येईल.

भाषेच्या काठावरुन सागराच्या तळाशी आपण जीतके खोल जावु तेवढ्या प्रमाणात शब्द सामर्थ्याची आणि विविध माहितीची दौलत हाती लागेल, यावर माझा विश्वास आहे, आणि माझी ही छोटीशी बुडी माझ्या इवल्याश्या मुठीत जे काही देईल ती मुठ तुमच्या समोर उघडी करतांना मला आनंद होत आहे.

marathimati world visits map

मराठीमाती परिवार

MarathiMati Family

आपल्या मराठीमाती परिवारात सहभागी व्हा..

हर्षद खंदारे

Harshad Khandare

I too have been in love with the Marathi language since my childhood.

योगदान

Contribute in MarathiMati

मराठी लेख, कविता आणि साहित्य पाठविण्यासाठी आम्हाला संपर्क करा.

वाचकांच्या प्रतिक्रिया

Ashok Naigaonkar

प्रिय हर्षद, मराठीमाती वर जाऊन आलो. अतिशय सुन्दर वेबसाईट बनवल्या बद्दल हार्दिक अभिनंदन.

हापूस प्रतियोगीता

हापूस चित्रपटावर आधारीत ७ प्रश्नांची उत्तरे द्या आणि जिंका २० ऑडीओ सीडी अधिक माहीतीसाठी बघा हापूस चित्रपट प्रतियोगीता

मराठी कविता

चुकीच्या कल्पनेवर आधारलेली कविता

मला दि.पू चित्रे, अरुण म्हात्रे होता येत नाही याचं दुःख आहे.

मला वसंत आबाजी डहाके होता येत नाही याचेही वाईट वाटते.

मला हेमंत जोगळेकर सारखं मऊ उबदार लिहीता येत नाही

याचंही टिंब टिंब.

मी सकाळी रीतसर उठतो.