Maharashtra News | घडामोडी

स्टार माझा सन्मान पुरस्कार

Star Majha Sanman Puraskar

स्टार माझा अधिकृत संकेतस्थळ : http://www.starmajha.com

Star Majha Sanman Puraskar

स्टार माझाच्यावतीने यावर्षीपासून माझा सन्मान पुरस्कार देण्यात येणार आहेत. कोणत्याही अपेक्षेशिवाय सातत्याने चांगले काम करून ज्यांनी महाराष्ट्राला समृद्द केले, निखळ आनंद दिला असे अनेक दिग्गज महाराष्ट्रात आहेत. त्य़ांच्याविषयी समाजाच्यावतीने कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी माझा सन्मान पुरस्काराचा उपक्रम स्टार माझानं हाती घेतलाय. येत्या १४ तारखेला माझा सन्मान पुरस्काराचं वितरण होणार आहे. विविधक्षेत्रातील नामवंत मंडळींच्या उपस्थितीत संध्याकाळी ७ वाजता हा कार्यक्रम मुंबईच्या हयात रिजन्सी हॉटेलमध्ये होत आहे. सुप्रसिद्ध अभिनेता आमीरखान या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाचं प्रसारण १८ जुलै,रविवारी संध्याकाळी ७ वाजता स्टार माझावर केलं जाईल.

हापूस प्रतियोगीता

हापूस चित्रपटावर आधारीत ७ प्रश्नांची उत्तरे द्या आणि जिंका २० ऑडीओ सीडी अधिक माहीतीसाठी बघा हापूस चित्रपट प्रतियोगीता

मराठी कविता

चुकीच्या कल्पनेवर आधारलेली कविता

मला दि.पू चित्रे, अरुण म्हात्रे होता येत नाही याचं दुःख आहे.

मला वसंत आबाजी डहाके होता येत नाही याचेही वाईट वाटते.

मला हेमंत जोगळेकर सारखं मऊ उबदार लिहीता येत नाही

याचंही टिंब टिंब.

मी सकाळी रीतसर उठतो.