Aksharmanch

मला साळला जायाच हाय

Marathi Kavita

सौ. स्वाती दळवी

मला आता साळला जायाचं हाय
शिकुण शहाण व्हायाचं हाय...
रामु झाला डाक्टर
दामु झाला हापीसर
मलाबी सायेब व्हायाच हायं
मला आता साळला जायाचं हाय
शिकुण शहाण व्हायाचं हाय...
इंग्रजीच पुस्तक वाचायच हाय
मराठी कविता लिव्हायची हाय
गावाला साक्षर करायच हाय
मला आता साळला जायाचं हाय
शिकुण शहाण व्हायाचं हाय...
वहिणीचा मार आता थांबवायचा हाय
ताईचा हुंडाबळी रोखायचा हाय
स्त्रिया सन्मान द्यायाचा हाय
मला आता साळला जायाचं हाय
शिकुण शहाण व्हायाचं हाय...
सावकाराचा जुलुम थांबवायचा हाय
शेतकऱ्याला मानानं जगवायचं हाय
बाबाला कर्जातून सोडवायचा हाय
मला आता साळला जायाचं हाय
शिकुण शहाण व्हायाचं हाय...
आईला लुगडं चोळी घ्यायाची हाय
डोक्यावर छप्पर बांधायच हाय
गावाचा विकास करायचा हाय
ज्ञानाचा प्रकाश फ़ेकायचा हाय
मला आता साळला जायाचं हाय
शिकुण शहाण व्हायाचं हाय...

हापूस प्रतियोगीता

हापूस चित्रपटावर आधारीत ७ प्रश्नांची उत्तरे द्या आणि जिंका २० ऑडीओ सीडी अधिक माहीतीसाठी बघा हापूस चित्रपट प्रतियोगीता

मराठी कविता

चुकीच्या कल्पनेवर आधारलेली कविता

मला दि.पू चित्रे, अरुण म्हात्रे होता येत नाही याचं दुःख आहे.

मला वसंत आबाजी डहाके होता येत नाही याचेही वाईट वाटते.

मला हेमंत जोगळेकर सारखं मऊ उबदार लिहीता येत नाही

याचंही टिंब टिंब.

मी सकाळी रीतसर उठतो.