Aksharmanch

ना उमेद मी कधीच नव्हते

Marathi Kavita

सौ. स्वाती दळवी

'ना उमेद' मी कधीच नव्हते -
आडात नाही ते पोहऱ्यात शोधत होते
आणि हातात असतानाही गावभर हिंडत होते
ह्रदयात असुनही देवळात जात होते आणि
दगडासमोर डोके फ़ोडून जखमी मात्र होत होते
'ना उमेद' मी कधीच नव्हते -
तरीही जगण्यासाठी डोळेझाकून काहीतरी शोधत होते
डोळे झाकण्याची चुक माझीच असतानाही
ठेचाळणाऱ्या दगडालाच रागवत होते
प्रयत्न अपुरे असतानाही दैवावरच डाफ़रत होते
पण आळशीपणाने गोंजारलेल्या माझ्याच लहरी
मनाला आता मी सुनावणार आहे
की 'ना उमेद मी कधीच नव्हते -

हापूस प्रतियोगीता

हापूस चित्रपटावर आधारीत ७ प्रश्नांची उत्तरे द्या आणि जिंका २० ऑडीओ सीडी अधिक माहीतीसाठी बघा हापूस चित्रपट प्रतियोगीता

मराठी कविता

चुकीच्या कल्पनेवर आधारलेली कविता

मला दि.पू चित्रे, अरुण म्हात्रे होता येत नाही याचं दुःख आहे.

मला वसंत आबाजी डहाके होता येत नाही याचेही वाईट वाटते.

मला हेमंत जोगळेकर सारखं मऊ उबदार लिहीता येत नाही

याचंही टिंब टिंब.

मी सकाळी रीतसर उठतो.