जास्वंद
हर्षद खंदारे

तुमच्या कुशीत माझा पाषाण मोम झाला
डोळ्यांत साठलेला ऋतुगंध सैल झाला
जवळी अलास तेव्हा श्वासांत कैफ आला
अन् मोगरा सुगंधी लाजुन धुंद झाला..
अंती, गंध सारे गुलाबी ओठांवरी पहुडले
क्षण, अंगावरी बहरता जास्वंद मंद झाला..
तुमच्या कुशीत माझा पाषाण मोम झाला
डोळ्यांत साठलेला ऋतुगंध सैल झाला

