तेज
हर्षद खंदारे
निळसर केशार आभासावर शोधतो स्वतःला
लाटा-घेवुन काठावरती लोटतो स्वतःला!
जगणेही या मरणाच्या प्रेमात धावते आता!
कुंपण तोडून पळतांना मी पाहतो स्वतःला!
पाऱ्यावरची छबी दिसेना आरशात आता!
छबी घेवुनी फरार येता पाहतो स्वतःला!
तळहांताच रेषीमजाळे विरुन गेले आता!
तळव्यामध्ये जळतांना मी पाहतो स्वतःला!
हुरहुर ऐसे मायेची हा सुर थांबला आता!
भुरभुर होवुन कोसळता मी पाहतो स्वतःला!
चिराचिरांतून होवुन व्याकुळ सैर-भैर आता!
आभाळातून विज ओकता पाहतो स्वतःला!

